Chandanlal Bisen

Action

4.0  

Chandanlal Bisen

Action

अंतर्मनातून झाड बोललं

अंतर्मनातून झाड बोललं

1 min
221


  एके दिवशी लाकूडतोड्या, मोठी कुऱ्हाड घेऊन वर्षभराची सरपण सरपण आणण्याकरिता शेत-शिवारात गेला. शिवारात एक मोठे आंब्याचे झाड होते. त्या झाडाखाली गेला. झाडाची फांदी कापण्याच्या बेतात असतांनाच, त्याच्या अंतर्मनातून आवाज आली. जणूकाही तो वृक्षच बोलत होता.

    

हे लाकूडतोड्या, दर आठवड्याला माझी फांदी कापतोस, किती झाडे लावलीसरे तू? हे सभोवताल झाडे दिसतात ना, तुझ्या आजोबा पंजोबानी दूर दृष्टी ठेवून ही झाडे लावली आहेत. तुला पर्यावरणाचे महत्व माहित नाही का? झाडे लावा, झाडे जगवा ही काळाची आर्त साद् आहे. पर्यावरण असेल तर, जीव सृष्टीचे अस्तित्व टिकेल. अन्यथा खल्लास..!!

    

 तो आंतरिक विचाराने प्रेरित झाला. तो आल्यापावली कुऱ्हाड घेऊन घरी वापस गेला. वृक्षारोपण करण्याचा मनोमनी संकल्प केला व प्रत्येक वर्षी मृगाच्या महिन्यात 20 झाडे लावून, त्या झाडांचे संवर्धन करू लागला.


बोध:- अंतर्मन खऱ्या रूपाने प्रेरित करत असतो. त्यानुरूप कार्य करायला हवे.    


Rate this content
Log in

Similar marathi story from Action