Pavan Pawar

Comedy Horror Action

4  

Pavan Pawar

Comedy Horror Action

प्रतिमूर्ती

प्रतिमूर्ती

15 mins
473


पाऊसाने हजेरी लावली होती पिक काढायला सुरुवात झाली होती. म्हणून बापूसाहेब तालुक्यातून सोयाबीनच्या थैल्या घेऊन आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेतात पेरणी धरायची होती. म्हणून आज रात्री बापूसाहेब शेतात चक्कर मारायला गेले होते. रस्याने जातांना त्यांना आज प्रथमच वेगळे वातावरण दिसून आले होते. वातावरणात भितीदायक वारे फीरत होते. त्यांच्या मनात अनेक शंका निर्माण होत होत्या. पण आपला भ्रम आहे अशी विचार आपल्या मनात बाळगून ते पुढे पाऊल टाकत होते. बापूसाहेब यांचे शेत गावाबाहेर माळरानात होते. माळ चढत असतांना त्यांना अचानक घुंगराचा आवाज त्यांच्या कानात दनकत होता. बापूसाहेबांचे शरीर घामाने ओलेचिंब झाले होते. त्याच्या मनात भितीचे चांगलेच घर केले होते. मागे वळून बघण्याची हीम्मत उरली नव्हती. तरी देखी त्यांनी हिंमत केली आणि मागे वळून बघीतले तर काय आश्चर्य मागे कोणीच नव्हते. पण धुंगराचा आवाज ऐकू येत होता. हा आवाज कोठून येत आहे हाच विचार करत असतांना ते मागे वळून पाहतात पण काहीही दिसत नाही ते पुन्हा शेताच्या रस्त्यावर चालत होते. तर अचानक त्याच्या समोर एक स्त्री येते जिचे केस खुले असतात. दात काळेशार झाले होते. डोळ्यातून रक्ताची धार निघत होती. त्या काळी साडी नेसलेल्या या स्त्रीला पाहून बापूसाहेब बेशुद्ध पडतात. रात्र झाली होती नवरा घरी आला नाही म्हणून राधाबाई चिंतेत होती. तेवढ्यात रमेश घरी आला. वडील घरी आले नाहीत . याची बातमी ऐकुन तो चिंतीत झाला. वडील शेतात गेले आहेत म्हणून आपल्या मित्राजवळ गेला आणि सुदिपला घेऊन माळावर जाण्यास निघाला काही क्षणात ते रत्यावर त्यांना एक मुर्ती दिसली जी मूर्ती एका स्त्रीची होती कोणी तरी तीच्यावर घोतर टाकले होते. सुदीप आणि रमेश यांनी बापूसाहेबांना उचलले आणि घरी आणले. सुदीप डॉक्टरला घेऊन आला रमेशने बापूसाहेबांचे कढले त्यांच्या कुर्त्यामधे चिल्लर पैसे होते. काही क्षणात बापूसाहेब शुध्दीवर आले. बापूसाहेब शुद्धीवर आले असता सर्वांनी विचारले काय घडलं होत. तेा बापूसाहेबांनी सर्व काही सांगीतले त्यावर रमेशचे हसू अनावर झाले. बापूसाहेब रमेशवर हसायला काय झालं. त्यावर रमेशने सांगतले की भूत बित काय नसतं तुम्हाला दिसली ती फक्त एक मुर्ती आहे. आणि राहीला घुंगराचा आवाज तर तुम्ही एवढे घाबरले होते की तुमच्या खिश्यात चिल्लर पैशाची लहान थैली होती हे देखील विसरलात. त्यामुळे तिथे भूत वगैरे काही नाही. तुमचा तो फक्त एक भ्रम होता. त्यामुळे आता जास्त घाबरण्याचे कारण नाही. रमेशचे शब्द ऐकाल्यावर बापू साहेब शांत झाले. त्यांच्या मनातील भीती पुर्णना संपली होती, आता त्यांना शांतपणे झोप लागली होती. सूर्याचा प्रकाश अंगणात पडला होता. बापूसाहेब झोपित होते. काल रात्री झालेल्या प्रकरणामुळे रमेशने त्यांना झोपीतून उठवले नाही. काही वेळात शांतीने चहा घेऊन बापूसाहेबांनी उठवायला गेली. बापूसाहेब अंगावर चादर घेऊन निजले होते. शांतीने बापूसाहेबाच्या अंगावरील चादर ओढली आणि घरातून एक मोठी आरोडी ऐकु आली ही आरोडी ऐकून रमेश तसाच घरात गेला आणि हैराण होऊन जमीनीवर बसला. काल रात्री बापूसाहेबांसोबत घडलेल्या घटनेला आज सत्यता मिळाली होती. कारण की खाटवर बापूसाहेब होते पण आता त्यांची दगडाची मुर्ती झाली होती. हा प्रकार पाहून संपूर्ण गावात भीतीदायक वातावरण झाले होते. गावातील सर्व सदस्य, नागरीक माळावर गेले पण तीथ ति मुर्ती होती. आता तिथे काहीच नव्हते. जमीनीवर देखील दिसत काहीच दिसत नव्हते मात्र झाडावर एक पांढरी साडी होती आणि हातातील कळ होते. काही नक्षीकाम केले होते जणू काही सांकेतिक भाषा कोरलेली असावी. अशीच घटना दुसऱ्या दिवशी घडली गावातील सुधाकरच्या काका त्याच प्रकारे मूर्ती झाले होते. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण पंचकोशीत वाढत होती. अशा घटनांना वेग आला होता यापासून कसे वाचायचे म्हणून गावातील काही व्यक्ती काशीला गेले. काशीला केशव गुरुजी राहतात असे ऐकण्यात होती की केशव गुरुजी एक सिद्ध पुरुष आहे. अनेक दिव्य सिद्धी त्यांनी प्राप्त केल्या होत्या. काही दिवसांनी गावकरी हे केशव गुरुजीना घेऊन गावात आले. केशव गुरुजी वयाने ९० पेक्षा जास्त होते. पण त्यांची नजर अजूनही धारदार होती केशव गुरुजीनी मुर्तीची शाहामीशा केली. गुरुजी बापूसाहेबाच्या घरी होते रमेशने त्यांना सापडलेले कळे दिल होतं. गुरुजी कळ्याकडे एकटक बघत होते त्यावरील भाषा समजण्याचा प्रयत्न करत होते. गुरुजीच्या बोलण्याची वाट संपूर्ण गावकरी बघत होते. केशव गुरुजी घराजवळील झाडाच्या खाली बसले. तेवढ्यात सर्व गावकरी त्यांना घेरून उभे होते. गुरुजी म्हणाले "तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे दक्षीण भारतात मिळतील. या कळ्यावरील काही भाषा कळतं आहे. या नुसार "चित्तरपुरम" या गावात या घटनेचा उलगडा होणार. म्हणून गावातील किती तरुण जाण्यास तयार आहेत. गुरूजीच्या आवाहनाला जास्त प्रतीसाद मिळाला नाही. गावातून फक्त चारच तरुण समोर आले. पवन, सार्थक, रमेश आणि शंकर आम्ही गुरुजीच्या सांगण्यावरून सर्व चितरपुरम येथे गेलो. या गावच्या धर्मशाळेत रात्र काढली. आपण दिवसा येथील गावकऱ्यासोबत याबाबत विचारण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या दिवशी ते कळे घेऊन आम्ही तपास करत होते. पण कोणी काहीही सांगायला तयार नव्हते. खूप जास्त फीरख्यामुळे एक वृद्ध व्यक्ती सापडला पण त्याने काही सांगीतले नाही त्याने काही कागद दिले ज्यावर लॅटिन भाषेतील लिपी होती आणि आम्हाला गावातून निघून जाण्याचा इशारा त्यांनी केला. गावातील वातावरण आमच्यामुळे भीतीदायक झाले होते. आम्ही ती कागदे घेऊन परत पंचकोशीत परतलो. तेथील हवामान जास्तच तापल होते. शुरुजींना लॅटिन भाषा कळत नव्हती पण पवनला या भाषेचे ज्ञान होते म्हणून पवन स्वतः समोर येऊन ही कागदे वाचायला तयार झाला सर्व गावकरी मंडळी मैदानात बसले होते वातावरणात शांतता होती. पवन जे काही वाचत होता ते सर्वना ऐकायला येत होते. पवन वाचायला सुरवात केली.

         नमस्कार माझं नाव रिचर्ड वायलसर प्रस्तुक चरीत्र हे लिहीण्याचे कारण की याचे संबंध भूतकाळातून भविष्यात जाणार आहे. जी विकृत घटना आज घडली आहे याचे पडसाद भविष्याच्या पिढीला भोगावे लागतील. साल 1735 मे 21 या दिवशी माझ्या सैनीकांच्या तुकडीने चित्तरपूरमवर हल्ला करून ते गाव आमच्या ताब्यात घेतले होते. माझ्या सुख सोयीसाठी मी चित्तरपूरमलाच रहायला लागलो. हवामानाचा योग्य अंजाद कसा लागेल यासाठी गावातील नागरीक त्या गावाच्या बाजूला असलेल्या चंद्रमुखपूरच्या राजकन्या निलीमा जवळ जायचे. ती मुलगी लोकांचे भविष्य, वातावरणाचा अंदाज पूर्णता सटीक स्वरुपात सांगत असे. तिला बघण्यासाठी खूप दुरुन दुरुन लोक यायचे. एकदा ब्रिटीश अधिकऱ्यानी चंद्रमुखपुरवर हमला केला पण तिथून वेगळी बातमी समोर आली की जे ब्रिटीश अधीकारी हल्ला करण्यासाठी चंद्रमुखपूरला गेले होते ते सर्व दगडाच्या मूर्तीत रूपांतरित झाले. ही घटना कशी घडली याचा तपास लावण्यासाठी मी चंद्रमुखपुरला गेलो, तीथ सर्व दगडाच्या मुर्तीत स्पांतर झाले होते. या सर्व घटनेचा तपशील देण्यासाठी भी चित्तरपूरमला परत निघालो तर रस्त्याने एक स्त्री जमीनीवर पडलेली दिसली. मी सैनीकांना सांगून तिला माझ्या गाडीत टाकले आणि तिला उपचार करण्यासाठी ब्रिटीश इस्पीतळात दाखल केले. आणि मी माझ्या कार्यालयात जाऊन जिवंत व्यक्ती दगडाच्या मूर्तीत रूपांतरित होणारी घटना खरी आहे याचा तपशील जमा केला. नंतर परत घरी जायला निघालो जातांना इस्पीतळात गेलो तर असे कळले की त्या स्त्रीचे नाव लिलावती असे आहे. तिचे या समाजात कोणतेही सोयरे नव्हते. म्हणून मी माझ्या घरी नेले. मला देखील घराची देखभाल करण्यासाठी एक मोलकरीण हवी होती. काही महिने सोबत असल्याने आमची जवळीक वाढत गेली. लिलावती ही भोकळ्या स्वभावाची होती. रंगाने सुंदर होती कधी तिच्यात जीव दडला मला कळलं देखील नाही. चंद्रमुखपुर मध्ये झालेल्या घटनेची ती एकमात्र साक्षीदार होती. पण त्या घटनेबद्दल तिला जेव्हा पण विचारायचो ति मौन बाळगून ठेवत असे. 21 मे ही तारीख माझ्यासाठी काय महत्व ठेवते माहीत नाही पण 

21 माझा जन्मदिवस. 

21 मे लाच माझी ब्रीटीश सैन्यात नियुक्ती साली.

21 मे 1735 मला तुकडीचा कप्तान बनवीण्यात आले.

आज 21 मे 1935 आज मी आणी लिलावती लग्नाच्या बंधनात अडकणार होतो. आणि आश्चर्यकारक म्हणजे लीलावतीची जन्मतारीख देखील 21 मे 1715.

आमचा विवाह सोहळा दणक्यात पार पाडला. लग्न होऊन आमचा संसार हा सुखाचा सुरु होता. लग्न होऊन तिन वर्ष झाले होते. आम्हाला 21 महिन्याची एक मुलगी होती. आज माझ्या जिवनाला वेगळे वळण मिळणार होते. आज 20 मे 1741 कार्यालयात मी बसलो होतो. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. जोराच्या वीजा कडाडत होत्या. तेवढ्यात एक अधिकारी आला आणि सांगतले की चित्तरपूरमला काही भागातील नागरीक हे दगडाच्या मूर्तीत रूपांतर झाले. मी त्याठीकाणी जाऊन तपास घेतला. त्या ठिकाणी मला एक मोत्याची माळ दिसली. ही माळ माझ्या ओळखीची होती. मी घर गाठले आणि लिलावतीच्या खोलीन गेलो. लीलावती आराम करत होती पण तिचा चेहरा पाहून ती दमलेली दिसली नाही. चप्पल अजून ओली होती. म्हणजे ती आताच बाहेरून आली आहे. मी तिचे कपडे बघितले तर कपडे पावसाने भिजलेले होते. समोरच्या खोलीतून धूर निघत होता. जणू त्या खोलीत काही पेटले असावे. मी दरवाजा खोलतो तेच लीलावती उठून उभी झाली. तिचे डोळे लाल झाले होते. जणू रक्तच डोळ्यातून बाहेर येत आहे. तिच्या शरीरात अदृश्य शक्ती असण्याचा भास होत होता. तिच्या डोळ्यातून एक वीज बाहेर येऊन माझ्यावर चढली. मी स्वतःला त्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात मला यश मिळाले मात्र तिच्या डोळ्यातून निघणारी विज बाजूच्या खोलीतील दरवाजावर आढळली. दरवाजा तुटला त्या खोलीमध्ये बघून मला धक्का बसला. त्या खोलीमध्ये एक होम सुरू होता. पण होम जमिनीवर नव्हता. हा होम उलटा होता. त्यातून निघणाऱ्या अग्नीच्या लाटा आकाशातून जमिनीकडे येत होते. आणि माझी 21 वर्षाची चिमणी त्या लाटे जवळ खेळत होती. काहीच क्षणामध्ये लीलावती तीथ गेली. माझे तळपाय दगडाचे झाले होते. त्यामुळे मला चालणे कठीण झाले होते. मी लीलावतीला विचारले. "तू कोण आहेस आणि मला फसविण्याचे कारण काय या चिमुकल्या जीवाने तुझे काय वाकडे केले ज्याने तू यांच्या जिवावर उठली. जिवंत माणसाला दगडाच्या मूर्तीमध्ये रूपांतरित करणारी तूच आहेत ना."

त्यावेळी लीलावतीचा आवाज हा वेगळाच होता. त्यात स्वत्व होते. 

"हो जिवंत माणसाला दगडाच्या मूर्तीमध्ये रूपांतरित करणारी मीच. तुझा जन्म अमावस्येच्या रात्री सर्व ग्रह एका दिशेने आले होते तेव्हा झाला होता. आणि त्या तीथीला माझा देखील जन्म झाला होता. त्यामुळे आपल्या दोघांच्या संबंधातून निर्माण होणाऱ्या निष्पाप जीवाचा बळी देऊन मला अमरत्व प्राप्त करायचे आहे. त्या कारणाने मी चंद्रमुखपुर या गावात उद्रेक निर्माण केला. तुझ्या वरिष्ठांना संमोहित करून तुला चंद्रमुखपुरला येण्यास भाग पाडले. आणि आता समोर काय घडले हे तुला माहीतच आहे. या जीवाचा बळी देण्यापासून मला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस अन्यथा लेकीच्या अगोदर बापाचा बळी दिल्या जाईल."


तिच्या डोळ्यातून येणाऱ्या किरणातून माझी मुलगी तडपत होती. अचानक माझे हात माझ्या पिस्तुलाकडे वळले आणि कोणताही विचार न करता मी तिच्यावर गोळ्या झाडल्या. मि केलेल्या प्रहारामुळे लिलावती धाराशाही पडली.मी झालेल्या गोळ्यातील एक गोळी लिलावतीच्या उजव्या डोळ्यात लागली. लिलावती जमिनीवर पडली होती पण जाता जाता मला जख्म देऊन गेली माझे पाय दगडाचे झाले होते. मी चालायचा प्रयत्न केला तर एक पाय तुडून पडला होता. मी तिच्या जवळ गेलो आणि ज्या पुस्तकातून ति साधना करत होती ति पुस्तक घेतले. त्या पुस्तकात लिहीलेले होते की व्यक्तीला पाषाण करणारी साधना करतांना साधकाचे संपूर्ण प्राण त्यांच्या डोळ्यात एकत्रीत येतात. त्याचे शरीर हे निर्जीव असते. दुदैवाने त्याच्या दोन डोळ्यात पैकी एका डोळ्यावर कोणी हल्ला केल्यास त्याला अर्धदिवस मृत्यूच्या अर्थात मुर्तीच्या स्वरूपात जगावे लागते. अर्धादिवस व्यक्तीच्या रुपात म्हणजे व लिलावतीच्या जिवनातील अर्धा दिवस मी संपून टाकला. पण पुढं काय तर पुस्तकात असे लिहिले होते की तो साधक दैत्याचे रूप धारण करतो. त्याच्या मनातील प्रेम, वात्सल्य, दया संपून जाते. त्याला फक्त त्याच्या फायद्याचे कृत्य काय आहे तेच करावे वाटते. त्याला त्याचे हित सध्या नाही झाले तर ती व्यक्ती सर्वांचा नाश करणार. रात्रीचे 12.30 मिनिट साले होते.1 मे 1741 पुस्तक वाचताना वेळ कळली नाही पुस्तकात लिहीले होते की नराधम झालेल्या साधकाला शांत करायचे असेल तर ती मुर्ती रूपात असतांनाच तिचा विनाश करावा लागेल. ती मुर्तीरूपात असतांना तीला जाळले तर ती शांत होऊन जाणार. हे वाचल्यावर मी एका पायाने खुर्चीच्या साहाय्याने स्वयंपाक घरात गेलो. घासलेट घेऊन आलो तर काय बघतो लिलावतीची मुर्ती तीथ नव्हती. बाहेरून घोड्याचा आवाज आला मी बाहेर आलो तर चेहरा ढकलेला व्यक्ती घोड़ा गाडीतून लीलावतीच्या मुर्तीला घेऊन जात होता. माझे पाय हे माझी साथ देत नव्हते. पायाचे पौचे दगडाचे झाले होते पाय उचलणं देखील कठीण झाले होते. काही दिवसांनी माझ्या मुलीला मेरी जोसेफकडे मी पाठवून दिले. लीलावतीला शांत करणं आवश्यक आहे. अन्यथा ती संपूर्ण जग नष्ट करेल. मी लिहिलेले पत्र चित्तरपुरं मधील माझे जवळचे मित्र स्वामी अर्थनान सरस्वती यांच्या जवळ राहील. यांचेच वंशज या पत्राचे देखभाल करतील. ज्याने लीलावतीचे अपहरण केले त्यानेच ते तांत्रिक पुस्तक नष्ट केले. लीलावतीच्या क्रोधापासून वाचणे आवश्यक आहे. तिच्या बद्दल जी माहिती माझ्या कडे आहे ती सर्व या पत्राद्वारे मी लिहिली आहे.

   

   आपला 

रिचर्ड वायलसर 

कप्तान AN 45.


रिचर्ड वायलसर यांने एका पत्रात मनुष्याची मुर्ती होणारी घटनेला जबाबदार कोण आहेत यांचे विवेचन केले. पवन वाचलेल्या पत्रातून घडत असलेल्या घटनेमागे कुणाचा हात आहे याचे स्पष्टता देत आला. आता प्रश्न होता लिलावतीबद्दल अजून माहिती प्राप्त करण्याचा. त्या रात्री लिलावतीची मूर्ती घेऊन कोण गेले होते आणि आता दक्षिण भारतातून ही मुर्ती महाराष्ट्रात कोणी ती आणली होती. प्रश्न खूप होते पण उत्तर सापडत नव्हते. आता ही लिलावती कोण होती. तिचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला अशा अनेक प्रश्नाची उत्तर शोधायची होती. चंद्रमुखपूर येथे लिलावती आणि रिचर्ड वायलसर यांची भेट झाली होती. म्हणून रमेश आणि पवन दोघेही चंद्रमुखघूरला गेले. तिथ गेल्यावर चौकशी केली मात्र हाती आली फक्त निराशा. तेवढ्यात त्या गावातील मंदिरात गर्दी व्हायला लागली विचारपूस केल्यावर असे लक्षात की काही वर्षापूर्वी या चंद्रपूरची राजकन्या निलीमा यांची अपहरण झाले होते. पण राजे घरण्याला भविष्य शास्त्राचा वारसा लाभला होता. आम्ही देखील शंकेचे निराकरणं करण्यासाठी मंदिरात गेलो काही वेळात आम्हाला आत बोलावीले. मंदीराच्या गाभान्यात बारा वर्षाचे पोरगं होतं. त्याने आमच्या नजरेत बघीतलं आणि चंद्रमुखपूरच्या उत्तरेस तिन पहाडाची शृंखला आहे त्यातील मथल्या पहाडावर जुण्या महादेवाचे मंदीर आहे. त्याच मंदीरात सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील असे सांगितले. म्हणून आम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तरे सापडण्याकरीता त्या ठीकाणी गेलो. हा रस्ता अत्यंत धोकादायक आणि कठीण वळणाचा होता. तिथ मंदीरात एक अघोरी साधना करत होता त्याचे लक्ष आमच्याकडे गेले . त्याने आम्हाला बोलाऊन घेतले. आणि तीथ येण्याचा हेतू कोणता याचे उत्तर मांगीतले. आम्ही पंचकोशीमध्ये होणाऱ्या घटना सविस्तरपणे त्यांना सांगितले. त्यांनी आम्हाला जवळ बसविले पाणी पाजले आणि पुन्हा साधना करायला गेले. रात्र झाली होती त्या महाराजांच्या शिष्यांनी आम्हाला अल्प आहार दिला. काही क्षणात ते महाराज आपल्या हाती कमंडल घेऊन आले. त्यांच्या एका हातात भस्म होता. ते आमच्या जवळ आले आणि आमच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला डोळे बंद करण्यासाठी सांगितले. काही वेळाने डोळे उघडले तर आम्ही एका वाड्यात होतो. त्यांनी आम्हला तीथ बसविले. त्या ठिकाणी भस्माचे रिंगण करून ती जागा अभीमंत्रीत केली. त्यांना विचारले तर त्यांनी सांगीतले की कोणत्याही मृत शरीराच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप केल्यास तिचा आत्मा आपल्याला हानी पोहोचविण्याचे काम करतो. त्यापासून वाचविण्यासाठी हा भस्म आपली सहायता करेल. महाराजांनी तिथे विधी मांडली आणि आम्ही सर्व अर्थात रमेश पवन ते अघोरी महाराज आणि त्यांचे शिष्य त्या रिंगणात बसले. विधी सुरू असताना अनेक दुष्ट आत्मा ही विधी पूर्ण होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करत होते. काही क्षणातच एक दिव्य प्रकाश विधीच्या ठिकाणी येऊन आढळला त्या दिव्य प्रकाशामधून एक स्त्री समोर आली. महाराजांनी तिला विचारले तुझा परिचय दे. तर तिने सांगितले की ते नीलिमा आहे. लीलावती बद्दल तिने सांगायला सुरुवात केली. 


"लिलावती आणि निलीमा दोन्ही बहीणी पण दोघीचे तत्व एकमेकांच्या विरुद्ध. एक सत्याच्या प्रतिमा जनतेसाठी जगणारी, दिन दुबळ्या लोकांसाठी झजनारी तर दुसरी स्वताच्या स्वार्थासाठी जनतेचा बळी घेणारी. लीलावती लहानपणा पासूनच राक्षसांची पूजा करायची. त्यांना बळी द्यायची. एकदा राजवाड्यातील लहान मुली दिसत नव्हत्या संपूर्ण राजवाडा तपासण्याची आदेश महाराजांनी दिले. महाराज लीलावतीच्या खोलीत गेल्यावर त्यांना धक्का बसला त्यांनी बघितले की लीलावती काळ्या विधीच्या सहाय्याने दैत्य पूजा करत होती. राजवाड्यातील सर्व लहान मुली त्या मूर्तीच्या समोर बेशुद्ध अवस्थेत होती. जणू काही त्यांना बळी देण्यासाठी इथे आणल्या असावी. महाराजांनी ही घटना बघून लीलावतिला राज्याच्या बाहेर काढले. आणि त्रिमुख पहाडी शृंखलेमध्ये बंदिस्त केले. त्रिमुख पहाडी मध्ये असलेल्या तुरुंगात तिला रित्यासूर नावाच्या अर्ध असूर असलेल्या तांत्रिकाची साथ मिळाली. तिथेच तिला नजरेच्या सहाय्याने जिवंत व्यक्तीला मूर्तीत रूपांतरित करण्याची सिद्धी प्राप्त झाली. त्यादिवशी राज दरबार जनतेने भरला होता. ब्रिटिश सरकारची तुकडी राज्यावर हल्ला करण्यासाठी आली होती मात्र आमच्या सैनिकांनी त्यांना पराभूत केले होते. त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांना राजदरबारात उपस्थित करण्यात आले होते. सर्वत्र विजयाचा आनंद होता. तेवढ्यात आकाशात काळे ढग यायला सुरुवात झाली. अचानकपणे विजा कडकळू लागल्या. नदीतील मासे नदीच्या बाहेर येत होते. पशुपक्षी रडायला लागले होते. संपूर्ण वातावरणात भीतीचा पगडा बसला होता. तेवढ्यात सावलीच्या स्वरूपात लीलावती तिथे आली. तिचा चेहरा पाहून संपूर्ण जनता घाबरली होती. तिचे रूप अत्यंत भयंकर होते. तिने एक नजर सर्वत्र टाकली आणि महाराजांकडे बघून त्यांच्यावर वार केला. सैनिकांनी लीलावतीवर प्रहार करायला सुरुवात केली मात्र लीलावतीच्या डोळ्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रत्येक व्यक्ती दगडात रूपांतरित व्हायला लागला. संपूर्ण राज्य दगडात रूपांतरित झाले होते. लीलावतीला थांबवयाचे कसे हा प्रश्न सर्वांनाच परेशान करत होता. बघता बघता संपूर्ण राज्य हे पाषाणात रूपांतरित झाली होती. तिने मला सोडून सर्वांना दगडाच्या मूर्तीत रूपांतर केली होते. ती माझ्याकडे आली आणि मला स्वतःचे भविष्य विचारले भीतीपोटी मी तिला सांगितले. तुझ्या जीवनाचा अंत तुझाच नवरा करेल. तुझा आयुष्य श्रापातच निघून जाणार सूर्याचा प्रकाश तुझ्या नशिबात नसणार. एवढे बोलून तिने माझे शिष धडाच्या वेगळे केले.


नीलिमानी सांगितलेलं लीलावतीच्या विकृत घटनेमुळे सर्व स्तब्ध झाले होते. निलीमाला आम्ही पंचकोशीत घडत असलेला प्रकार संपूर्ण सांगितला त्यावर नीलिमाने मौन बाळगले. ती म्हणाली भविष्यात जे घडणार आहे ते घडू द्या जे होईल ते नियतीलाच मान्य राहील. तिला थांबवण्याचा असेल तर तुम्हाला त्रिमुख पहाडी शृंखलेवर असलेल्या तुरुंगामधील रैत्यासुर याचीच मदत घ्यावी लागेल. रैत्यासुर हा अर्धअसूर आहे. त्याने ब्रह्मदेवाची आराधना करून इच्छा मृत्यूचे वरदान प्राप्त केले आहे. पण त्याला एक श्राप सुद्धा आहे. तो असत ते बोलू शकत नाही आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याचे शरीराचा अर्धा भाग हा दगडाचा झालेला आहे. मात्र त्याचा अर्धा भाग पूर्णता शक्तिशाली आहे. तू जर का तुमची मदत करायला तयार असेल. तर जगावर आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचा मार्ग तोच देनार."


नीलिमाने एक नजर सर्वत्र फिरवली आणि अदृश्य झाली. त्या अघोरी महाराजांनी आमच्या हातात रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि त्रिमुख पर्वत शृंखलेकडे जाणारा मार्ग दाखविला. त्रीमुख प्रमुख पर्वत शृंखला नावाप्रमाणे एकाच शृंखलेत तिन पर्वत होते. मात्र तीन्ही पर्वताना एकाच दिशेने असल्याचे भासत होते. वास्तव्यात ते पर्वत सारखेच होते. पर्वतावर जाण्याचा मार्ग अत्यंत कठीन होता. दगड वाराचा प्रहार सहन करत करत त्रिमुख पर्वत शृखलेवर स्थित तुरुंग दिसला. हा तुरुंग म्हणजे साधारण तूरंग नव्हता या तुरुंगाच्या भिंती वेगळ्याच धातुपासून निर्मीत होत्या. तुरुंगात प्रवेश करताच आतमध्ये रडण्याचा आवाज यायला सुरुवात झाली. तूरंगाच्या खोलीत सापळे होते. या तुरुंगाने अनेक नरभक्षी, दैन्याचे शरीर खाल्ले होते. फीरता - फीरता एका खोलीत एक श्वेत केसाने गुरफटलेला. मळक्या कपडाचा व्यक्ती बसला होता. आम्ही त्याच्या जवळ गेलो तर त्याने तोच रैत्यासूर असल्याचे सांगीतले. त्याचे अर्धशरीर हे दगडाच्या अवस्थेत त्याची ग्वाही देत होते. आम्ही त्यांच्यापासून दुर बसलो आणि पंचकोशीतील सर्व प्रकार सांगून त्यांनी आमची मदत करावी अशी विनंती केली. त्या वेळी त्यांनी सांगीतले की लिलावती ही मुर्तीरूपात असल्यामुळे काही चोरांनी तीला मुर्ती समजून चोरून नेले. मात्र आता तो प्रकार सर्व मयूष्य जातीला महागात जाणार आहे. लिलावतीला शांत करायचे असेल तर तिची मुर्ती जाळावी लागेल पण लक्षात असु दया ज्या व्यक्तीचा गण हा राक्षस आहे तोच तिचा अंत करू शकतो. पवनचे स्मीथ हास्य सांगत होते. पवन हा राक्षस गणातील आहे . रेत्यासूरने पवनला जवळ बोलावीले त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि कानात काही सांगितले. त्याने कठोर शब्दात उच्चार काढले आता लिलावती कुंठ आहे हे तुला दिसनार , रेत्यासूरने तिथ स्थित एक मोरपंख पवनच्या हातात दिला आणि सांगीतले सूर्यास्त झाल्यावर या पंखावर तो मंत्र अभिमंत्रित करजो जो मंत्र मी तुझ्या कानात सांगितला. हे पंख तुला लिलावतीजवळ घेऊन जाणार. ते पंख घेऊन आम्ही पंचकोशीकडे निघालो. आम्हाला पंचकोशीत जायला ७ दिवस लागले लिलावतीने गेल्या काही महीण्यापासून संपूर्ण पंचकोशीत उद्रेक माजविला होता. आम्ही रात्र होण्याच्या वेळी गावात प्रवेश केला. अर्धावरून गावकरी हे आता दगडाच्या मुर्तीत रूपांतरीत झाले होते. लिला वतीने आपल्या सिद्धीच्या मदतीने गावाच्या बाहेर जाण्याचे रस्ते बंद केले होते. आम्ही सर्व गावकरी सदस्यांना जमा केले. आणि गावातील 7-8 तरूण सोबत घेऊन माळरानाच्या दिशेने निघालो. पवनने मयूर पंखावर मंत्र फूंकून हवेत उडवीले रमेशजवळ घासलेट आणि माचीस होती गावातील तरुणांनी चंदणाची लाकड सोबत घेतली होती. हे सर्व मयूर पंखांच्या मागे जात होते काही तासाने ते मयूर पंख एका स्त्रीजवळ गेले ही लिलावती होती तीचे अर्धशरीर दगडाचे झाले होते. ती आपल्या भोवती सुरक्षतेचे आवरण निर्माण करत होती आम्ही लपून त्या आवरणात प्रवेश केला काही वेळाने लिलावतीचे पूर्ण शरीर दगडात रुपांतरीत झाले होते. गावातील एक तरुण लिलावतीच्या समोर गेला तर अचानक तो सुद्धा दगडात रूपांतरीत व्हायला लागला. जंगलात अचानक वादळ सुरु झाले. अनेक विचलीत करणारे विचित्र आवाज कानावर आदळत होते. रमेशने लिलावतीच्या मुर्तिवर घासलेट टाकायला सुरवात केली. तरूणांनी लाकडे फेकून लिलावतीला पूर्व लाकडाने ढकले. जो तरुण दगडात रूपांतरित झाला होता त्याची मुर्ती दूर केली. पवनने माचीसची काडी पेटवली आणि लिलावतीच्या भोवती टाकलेल्या लाकडावर फेकली. आम्हीं पहिल्यांदा काळ्या रंगाच्या लपट्याची आग बघीतली. ज्या पद्धतीने ति आग वाढत होती त्याप्रकारे दगडाच्या मूर्तीत रूपांतरित झालेले तरुण मनुष्य देह धारण करत होते. त्या क्षणी प्रथमच आम्ही दगडाला राख होताना पाहिले. लीलावती संपली होती गावात सुख समृध्दी आली हाती सर्व काही व्यवस्थीत सुरू होते. पण रैत्यासुर याने पवनच्या कानात काय सांगितले होते कळतं नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy