Pavan Pawar (देशमुख)

Drama Horror Action

3.4  

Pavan Pawar (देशमुख)

Drama Horror Action

सावली - एक चेटकिण

सावली - एक चेटकिण

21 mins
715


विजय खूप दिवसापासून वाचनालयात गेला नव्हता याला भयरसाची पुस्तके वाचण्याचा खूप आनंद. हा खूप साहसी व्यक्तीमत्व असलेल्या तरुण. तो वर्तमान पत्रात भूत - प्रेत यांच्यावर संशोधन केलेल्या घटना मांडत होता. एक दिवस त्याला पत्रकार कार्यालयातून एक पत्र मिळाले त्यात त्याला प्रेसने एक घर बक्षीस म्हणून दिले होते. त्याच्या कामावर खूश होऊन त्या पत्र वर्तमान पत्रकाच्या मालकाने त्याला बक्षीस म्हणून हे घर दिले होते. विजय एक गरीब कुटुंबातील होता. त्याची आई आणि वडील गावाकडे रहायचे. हा एकटाच शहरात राहायचा. त्यामुळे याने देखील त्या घरात रहायला धन्यता मानली. रोजच्या आर्थिक व्यवहारात भाड्याच्या खोली पेक्षा स्वताच्या घरात जाणे कुणाला नाही आवडत. विजय त्या घरात रहायला गेला. त्या घराची साफ सफाई आणि रंग - रंगोटी झाली. घर जरा जूणे होते पण खर्च करून त्याने त्या घराची कायापालट केली होती. रात्रीचे 11 वाजले होते. त्याच्या डोळ्यात झोप येत नव्हती काही दिवसा पासून तो कामावर गेला नव्हता म्हणून त्याचीच चिंता असावी. त्याला लेखनासाठी चांगला विषय हवा होता. ज्याने त्याच्या जिवनाला कलाटणी बसेल. तो पलंगावर झोपला होता तेवढ्यात बाजूच्या कपाटावर एका मांजरीने धाप टाकली. त्या आवाजाने विजय झोपेतून उठला. त्याने लाईट लावला तर त्याला एक मांजर दिसली जिने उंदीर आपल्या तोंडात घेतला होता. विजयला पाऊन ती मांजर पळाली. पण तेव्हा त्या कपाटा वरून एक डायरी खाली पडली. ती डायरी या घरात राहणाऱ्या जून्या मालकाची असावी. या विचाराने विजयने ती डायरी उचलली. ती डायरी वाचावी म्हणून उघडली तर ती डायरी कोरी होती त्या डायरीत एक पत्र होते. त्या पत्रातील लिहिलेला मजकूर अतिशय भीतीदायक होता.


                                                पवन देशमुख, 

                                                महाकाल नगर,

                                                मालेगाव.


अशोक गायकवाड,

संपादक राजीव प्रकाशक,

शिरसुड वाटिका,

पुणे.


        विषय : मागील घटनेचा दुष्परिणाम सांगण्याबद्दल.


अशोक नमस्कार,

      हे पत्र लिहीण्याचे कारण की काही दिवसापासून हरभूमी मधील घटना मला मानसिक त्रास देत आहेत. जणूकाही त्या घटनेचे कर्तावीर माझ्या समोर उभे आहेत. काही दिवसापूर्वी संदीप- मोहिनी देखील भेटले त्यांनी देखील त्या भयावह त्यांना होणारी अनुभूती सांगीतली. "सावली" ही चेटकीन होती की पीशाच्च माहीती नाही किंवा आपल्याला याबद्दल माहीतीही नाही. पण हो तिने आता हरभूमी सोडली असा मला भास होत आहे. मी हरभुमितील कितीदायक अनुभव या डायरीत लिहून तुला पाठवीत आहे. ज्याने त्या प्रदेशाबद्दल सर्वांना माहिती होणार. तू ते पुस्तक तुझ्या प्रकशनातून प्रकाशित करावे अशी विनंती.


                                                     तुझा मित्र



हे पत्र वाचल्यावर विजयला नवीन विषय मिळाला तो म्हणजे सावली. सावली ही कोण होती ती चेटकीन किंवा पिशाच्च कसे झाली. काय आहे तिची कहाणी असे अनेक विचार त्याच्या मनात घर करू लागले. पण सावलीचा थरारक अनुभव या गृहस्थांना कसा आला याचा उलगडा करायला पाहिजे. म्हणून या उद्देशाने त्याने राजीव प्रकाशन याचे संपादक श्री गायकवाड साहेबांच्या घरी धाव घेतली. विजय पुण्यात दाखल झाला राजीव प्रकाशक काही वर्षांपूर्वीच बंद पडले होते. त्यांनी गायकवाड साहेबांचा दरवाजा दाखवला दरवाजा एका 40-45 वर्षाच्या गृहस्थांनी उघडला. विजयने आपला परिचय त्यांना दिला काही वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या नंतर विजयने त्यांच्याकडे येण्याचे कारण सांगितले. सावलीचे नाव ऐकतात त्या गृहस्थाचा चेहरा उतरला होता. मिलिंद गायकवाड हे त्यांचे नाव. मिलिंद गायकवाड हे अशोक गायकवाड यांचा नातू. त्यांनी सर्वांनी पाठवलेली डायरी विजयच्या हाती दिली आणि सांगितले की सावली ही एक अशुभ व्यक्ती आहे. तिच्याबद्दल ज्याने कोणी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला तो अकस्मात मृत्युमुखी पडला. 1951 ते 1970 च्या दशकात या सावलीबद्दल जाणून घेण्याचा अनेक संशोधकांनी प्रयत्न केला. ये डायरीमध्ये सावली हे चेटकिन आहेत हेच दर्शविले आहे मात्र एक आयुर्वेदाचार्य देखील होती हे मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे. 1835 ते 1840 चाळीसच्या दशकात तिने लिहिलेले आयुर्वेदिक पुस्तकांच्या माध्यमातून अनेक जीव घेणाऱ्या बिमाऱ्यांना सामोरे जाता आले. ब्रिटिश काळात जॉर्ज वाईलायर यांनी देखील तिच्या आयुर्वेदिक ज्ञानाचा उलगडा केला होता. तसेच मोगल काळातही अनेक वैद्यांनी तिच्याबद्दल दंतकथा सांगितले. आता ही सावली कोण होती याची माहिती करून घेण्यासाठी हरभूमी ते रंकानगरी या प्रदेशाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सावली बद्दल मला एवढेच माहिती आहे. तिच्याबद्दल मी फक्त ऐकले वाचले नाही. मिलिंद गायकवाडचे शब्द विजयच्या डोक्यात घर करून बसली होती. त्याला जाणून घ्यायची होती ही सावली कोण. पण त्या अगोदर ही सावली एक चेटकीन कशी झाली याचा अभ्यास करणे गरजेचे. म्हणून विजय ती डायरी घेऊन आपल्या घरी आला आणि ती डायरी वाचायला सुरुवात केली.

सकाळचे दहा वाजले होते. महाविद्यालयात जाण्यासाठी मला चांगलाच उशीर झाला होता. मी धावपळ करून बस स्टॉप वर आलो. संदीप राजीव कॉलनी मध्ये असलेल्या बस स्टॉप वर माझी वाट बघत होता. मी तिथे पोहोचलो आणि त्याच्या बाइकवर बसून कॉलेजमध्ये पोहोचलो. सर्व मित्र एका ठिकाणी पोहोचले होते. महाविद्यालयाच्या परिसरात आम्ही सर्व मित्र बसलो होतो. संदीप मोहिनी माझ्यासमोर बसले होते. यांचे लवकरच लग्न होणार होते. माझा व्यवस्थापनाचा क्लास असल्यामुळे ही मी त्यांचा निरोप घेऊन माझ्या वर्गात गेलो. वर्गात गेल्यावर वर्ग पूर्ण खाली होता वर्गात कोणताही विद्यार्थी अथवा शिक्षक नव्हते आजचा क्लास रद्द झाला असावा असे मला वटायला. म्हणून मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये जाऊन माझ्या मित्रा जवळ गेलो तर तेही तिथे उपस्थित नव्हते. आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण कॉलेजमध्ये एकही विद्यार्थी दिसत नव्हता. बहुतेक सर्वांचे वर्ग सुरू झाली असावी असा विचार मणी बाळगून मी ग्रंथाला गेलो. ग्रंथालय मध्ये गेलो. ग्रंथालयात आता मी आणि मीच होतो. ग्रंथालयाच्या बाकावर बसून मी नारायण धारप सरांचे देवाज्ञा हे पुस्तक वाचत होतो. तेवढ्यात एक मुलगी ग्रंथालयात आली दिसायला सावळी होती परंतु शरीर बांधणी अत्यंत मोहक दिसत होती. तिच्याकडे बघितल्यावर कुणाचेही भान हरवनार असे तिचे सौंदर्य. माझ्या समोरच्या बाकावर ती बसली होती मी तिला विचारलं तुझं नाव काय तर तिने नंदिनी असा तिचा परिचय करून दिला. मी एक नजर पुस्तकात टाकायचो तर एक नजर तिच्याकडे अचानक ग्रंथालयाच्या मागील बाजूला काही पुस्तके पडली मी मागे वळून बघितले तर पुस्तकांचा ठीक खाली पडला होता आणि त्या ढिगावर काळेभोर वस्त्र घातलेली मुलगी माझ्याकडे बघून हसत होती. मी तिच्याकडे हिन नजरेने बघून समोर बघितले तर नंदिनी तिथे नव्हती. एकदा मागे नजर टाकली तर शरीरात सरकार झाला होता जिथे पुस्तके पडली होती तिथं काहीच नव्हते सर्व पुस्तके व्यवस्थित लागलेली होती. मी नंदिनीला शोधण्यासाठी ग्रंथालय फिरत होतो तेवढ्यात ग्रंथपाल साहेबांच्या केबिनमध्ये लख्ख प्रकाश पडला होता जणू काही त्यांच्या केबिनमध्ये कोणी आग लावलेली असावी. मी धावत धावत त्यांच्या केबिनमध्ये गेलो. तर तिथं गेल्यावर माझे शहर थंड पडले भीतीने हातपाय थरथरत होते. नंदिनी, हो नंदिनी ग्रंथपाल सरांच्या छाताडावर बसून त्यांचे रक्त पीत होती. तिचे ते खुले केस रक्ताने भरलेले दात. मनाला अत्यंत भीती देत होते. माझे पाऊल मागे पडत होते मागे चलता चलता माझा पाय घसरला आणि मी जमिनीवर आदळलो. संदीप व मोहीनी माझ्या समोर होते. मला धक्का बसला तो म्हणजे मानसीकतेचा. मी कॉलेज कॅम्पस मधेच होतो. अर्थात वर्गात जाणं , ग्रंथालयात घडलेली घटना ही फक्त एक स्वप्न होते. तेवढ्यात संदीप ने माझा परीचय त्याच्या मित्राच्या बहीनी सोबत करून दिला. ती दुसरी - तिसरी कोणी नव्हती ती नंदीनी होती. पण कसं शक्य आहे . जिला मी स्वप्नात बघीतने ती माझ्या समोर कशी. नंदीनीने माझ्याकडे पाहीले आणि मला विचारले" पवनजी आपण यापूर्वी कधी भेटलो का मला अस वाटतं आहे की आपण यापूर्वी देखील भेटलो आहे" नाही ! आपण कधी भेटलो नाही असे शब्द माझ्या मर्जी विना तोंडातून बाहेर पडले. तेवढ्यात मोहीनी म्हणाली माझ्या सर्व मित्रांनो तुम्हाला आजच निमंत्रण देते की संदीप व मी लग्न करणार आहे. लग्नाचा कार्यक्रम तसा घरगुती आहे पण तुम्ही सर्वांनी यायचं. आम्ही सर्वांनी त्यांना सुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील ते वर्ष समोर - समोर जात होते. कळत नकळत नंदीनीची आणि माझी जवळीक वाढत जात होती. एकदा नंदीनी ग्रंथालयात एकटी होती. मी तिला त्रास देण्यासाठी आत गेलो. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तिच्या सोबत भांडत होता. तो बरडत होता "तु कोण आहेस , इंध काय करत आहेस निघून जा निघून जा असे त्याचे शब्द येत होते". मी नंदिनिकडे बघितले तर तिच्या डोळ्यात वेगळी आग होती. मला कळतं नव्हतं त्यांच्या मध्ये काय झाले. मी त्यांच्या जवळ गेलो तर ग्रंथपाल साहेब माझ्याकडे बघून बरडत सुटले पवन तुला कळत नाही तू निघून जा इथून. ही बया नंदिनी नाही हीला सोडून दे ही नंदीनी नाही ही एक ...... वाक्य पूर्ण करणार तेच ग्रंथपाल साहेबांचा पाय घसरला आणि ते ग्रंथालयांच्या पाचव्या माळा वरून कोसळले आणि खाली पडून त्यांचा मृत्यु झाला. हे पाहुन नंदीनी खूप घाबरली आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करत होती. तिने मला मिठी मारली तिचे शरीर थरथरत होते मात्र तिचे शब्द हे तिरस्कारचे दर्शन देत होते. आम्ही सर्वांनी खाली धाव घेतली पण वेळ निघून गेला होता. ग्रंथपाल सरांच्या डोक्यात काय चालले होते हे कळतं नव्हतं. डॉक्टरांनी सांगीतले की त्यांच्या डोक्यावर परीणाम झाल्यामुळे ते स्वतःचे भान विसरून असे कृत्य करत होते. त्यांचा मृत्यू हा त्या परिणामाची एक घटना होती. मोहीनी आणि संदीपचे लग्न झाले. कॉलेज संपले होते, महाविदयाल मधील विचारांचा आणि आठवणीचा संग्रह करून आम्ही आपल्या आपल्या आयुष्यात रमलो होतो, एक दिवस माझ्या घरी पत्र आले. त्या पत्रात लिहिले होते.


                   प्राचार्य,

                   श्री. सुदीप ताम्हणकर,

                   जयनाथ वाणिज्य कॉलेज,

                   अकोला 4441004.


प्रति,

पवन पवार -देशमुख,

जयनाथ वाणिज्य कॉलेज,

माजी विद्यार्थी अध्यक्ष.


      विषय- महाविदयालयाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करण्याबद्दल.


महोदय,


   प्रीय विद्यार्थी, तुम्हाला कळावण्यात अत्यंत आनंद होत आहे की, महाविद्यायातर्फे मागील माजी विद्यार्थाना माथेरान मधील महाविद्यालयीन सम्मेलनात आपल्या जयनाथ वाणिज्य कॉलेजचे नेतृत्व करावयाचे आहे. तरी सुद्धा तुम्ही त्या कार्यक्रमात जाऊन आपल्या महाविदयालयाचे नेतृत्व करावें ही विनंती.



                                                  प्राचार्य,

                                         श्री. सुदीप ताम्हणकर,

                                    जयनाथ वाणिज्य कॉलेज


पत्र वाचल्यावर मला संदीपचा फोन आला त्याने सुद्धा या पत्राचा उल्लेख त्याच्या संवादात केला म्हणून आम्ही रात्री भेटायचे ठरवले. रात्री सर्व जुने मीत्र भेटणार होते. कॉलेज सोडून ४ वर्ष झाले होते. रात्री नर्मदा गार्डन मध्ये सर्वांनी येण्याचे ठरवले. मी रात्री आठ वाजता तिथं पोहचलो. तिथं संदीप - मोहीनी , राघव - नंदीनी , महेश आणि निशा उपस्थित होते. जणू काही ते माझीच वाट बघत होते. मी पोहचताच नंदीनीच्या चेहऱ्यावर प्रेमहास्य आले होते, पण आता त्या प्रेमाचा विसर पडला होता. मला बघताच संदीप समोर आला त्याने म्हटले " पवन किती वर्षांनी भेटला कुठ होता इनकी बर्ष" नाही रे कामात व्यस्त होतो. बरं संपूर्ण बॅच येणार ना? नाही ! नंदीनीचे उद्गार होते. ती म्हणाली "मी महावीदयालयात गेली होती संचालक मंडळाने सांगीतले की आपल्यालाच तिथं जावं लागेल. जी समिती पर्यटन विकाससाठी आपल्या वेळी नेमली होती. तीच समिती या संमेलनाचे नेतृत्व करणार. तिचे शब्द ऐकून सर्व निष्काळजी झाले. आणि सर्व मित्र माथेरान इथ जाण्यासाठी तयार झाले.आम्ही सर्व मित्र माथेरानला जात होतो. महामार्गावर भीषण अपघात झाल्यामुळे रस्ता ट्रॅफिकने भरला होता. या कारणाने संदीपने आमची कार शॉर्टकट मार्गावर टाकली. पण रस्त्याची परिस्थिती खूप वाईट होती. मोबाईलचे जीपीएस च्या सहाय्याने आम्ही समोर जात होतो. रस्ता सापडत नव्हता सांगायचे तर रस्ता आम्ही विसरलो होतो. एका जंगलात रस्त्याची भूल पडली होती. काही तासाने आमची गाडी एका हॉटेलच्या बाजूला उभी राहिली शालिनी गेस्ट हाऊस असे त्याचे नाव. आम्ही बाहेर पडलो त्या हॉटेलमधून एक वेटर बाहेर आला. त्यांनी कमलेश असा त्याचा परिचय करून दिला. आमच्या लगेच घेऊन तो आत मध्ये गेला आणि आम्हाला आमच्या रूम दाखवून दिल्या. रात्र झाली होती म्हणून आम्ही सर्व मित्र त्या गेस्ट हाऊस च्या गार्डनमध्ये शेकोटी करून त्या शेकोटी भोवती बसलो होतो. संदीप आणि मोहिनीचे लग्न झाले असल्यामुळे ते जवळच बसले होते. बाकी नंदिनी राघव कमलेश आणि मी रिंगण करून बसलो होतो. त्या गेस्ट हाऊस मध्ये मनीषा आणि कार्तिक नावाचे नवविवाहित जोडपे होते ते देखील आमच्यासोबत आनंद घेत होती. एवढ्यात कोणत्याच प्रकारची हवा नसताना शेकोटी विजली हा प्रकार पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला मात्र संदीप म्हणाला की एकांतात असं होत असते आपल्याला कळत नाही आणि वाऱ्याचा झोका येऊन याचे काम करून घेतो. रात्र जास्त झाली होती मला देखील झोप येत होती म्हणून मी माझ्या रूम मध्ये जाण्याचे ठरवले त्यावर सर्वांनी आपापल्या रूममध्ये जाण्याचे बेतले. आम्ही सर्व गेस्ट हाऊसच्या आत जाणार होतो तेवढ्यात गेस्ट हाउस च्या बाहेरून एका महिलेचा जोराचा आवाज ऐकू आला. आम्ही त्या दिशेने जाणार तेवढ्यात कमलेशने त्या हॉटेलचे गेट बंद केले आणि आम्हाला आत जाण्याची सांगितले. त्याच्या शब्दाला विरोध राघव आणि संदीप करत होता कमलेशने सांगितले की ही जागा भुताटकीची आहे. इथेसा आत्मा प्रेत चेटकिन असा आवाज काढून माणसांना पकडतात आणि त्यांना गायब करतात. आता या वैज्ञानिक युगात विश्वास करायचा कसा. तरी त्यांचा नकार देत संदीप आणि राघव त्या गेस्ट हाऊसच्या बाहेर पडले. कमलेश ने माझा हात पकडून मला त्या गेस्ट हाऊस दुसऱ्या माळावर नेले. मला खिडकीतून बाहेर दिसत होते की दोन तरुण एका तरुणीवर जबरदस्ती करत होती. तेवढ्यात संदीप आणि राघव त्यांच्याकडे जाताना दिसला अचानक वाऱ्याचा वेग वादळाच्या स्वरूपात आला आणि ते तरुण आणि तरुणी त्या ठिकाणावरून अदृश्य झाली. हा प्रकार बघितल्यावर माझ्या अंगाला घाम फुटला होता तेवढ्यात मागे वळून बघतो ती तरुणी माझ्यासमोर उभी होती तिथं कमलेश नव्हता. कानात माझाच आवाज ऐकू येत होता. तो आवाज मनीषा चा होता मी तिच्याकडे बघितले तर तिने म्हटलं की कोणाच्या विचारात आहेस आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न काय बघतोस. मी त्या गेस्ट हाऊसच्या गार्डनमध्ये होतो अंताक्षरीच्या मैफिलीत म्हणजे मी डोळे उघडून पुन्हा असे स्वप्न बघितले ज्याची कल्पना मी कधी केली नव्हती. मनीषाचे शब्द ऐकून मन स्तब्ध झाले होते. मला पडलेले स्वप्न मनीषाला कसे समजले याचा मला विचार पडला होता. तरीदेखील मी तिच्या प्रश्नाला नकार देला. नाही! मी उघड्या डोळ्यांनी स्वप्न नाही बघत. मात्र माझ्या शब्दावर तिला विश्वास झाला होता असं नाही माझ्या शब्दात खोटेपणा तिला जाणवत होता. गेस्ट हाउस मधील एक किंकाळी आमच्या कानावर पडली. आम्ही सर्व मित्र त्या दिशेने पळालो. गेस्ट हाउस मध्ये पाय ठेवतात विपरीत घटना घडू लागले. अगोदर तर हॉटेल वरील असलेली लाईट चालली गेली. अचानक आकाशात विजा कडकडून लागल्या. हॉटेलमध्ये असलेल्या रिसेप्शन टेबल वरती मेणबत्ती लावलेल्या होत्या. त्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्या हॉटेलची रिसेप्शनिस्ट मैथिली घाबरलेली दिसली आणि तिच्या पायथ्याशी तिची मैत्रीण बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. आम्ही सर्व मित्र त्यांच्याकडे गेलो. मैथिलीची दातखिडी बसली होती. नंदिनी पाण्याचा ग्लास आणला आणि रचनाच्या चेहऱ्यावर पाण्याची झळ मारत होती. मोहिनी आणि मनीषा मैथिलीला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात रचना शुद्धीवर आली आणि अचानक लाईट आली. बाहेर चालत असलेला विजेचा कडकडाट थांबला आता मैथीली देखील शुद्धीवर होती. राघवनी तिखट शब्दात मैथिलीला विचारले काय झालं होतं जे तुम्ही इतक्या मोठ्या आवाजात आरोळी ठोकली. राघव चे शब्द हे हिन दरजाचे होते. नंदिनी आपुलकीच्या भावनेने मैथिलीला जवळ घेतले आणि विचारले काय झालं इतकं घाबरायला. मैथिली म्हणाली मी आणि रचना खिडकी मधून तुम्हाला बघत होतो तेवढ्यात तुमच्या मागे असलेल्या बिल्डिंगवर काही मुली उभ्या होते मात्र त्यातील एका मुलगी वरून खाली पडली. ते दृश्य बघून माझ्या तोंडातून आरोळी निघाली. हा प्रकार ऐकून आम्ही सर्व मित्र त्या बिल्डिंग कडे गेलो आणि तिथेच तपास करू लागलो मात्र तिथे काहीच नव्हते. राघव रचना आणि मैथिलीला आपल्या शब्दात बोलत होता संदीप मात्र रस्त्याच्या काठावर काहीतरी बघत होता. मोहिनीने त्याला विचारले काय बघत आहात तेवढ्यात संदीपने म्हटले की इथे रक्त सांडलेले आहे. रक्ताचे नाव ऐकताच राघव शांत झाला होता तो आता विनाकारण चिडत नव्हता त्याने मौन धारण केली होते. काहीतरी विपरीत घडलं त्याची शाश्वती त्यालासुद्धा अनुभवली होती. इथं काय झालं पण या बिल्डिंगमध्ये तर कोणीच नाही याची चौकशी व्हायला पाहिजे हो घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली पाहिजे पण द्यायची कशी कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. कमलेश समोर आला त्याने म्हटले की साहेब इथून 15 किलोमीटर दूर पोलीस चौकी आहे मी जाऊन झालेला प्रकार त्यांना सांगतो. संदीप ने त्याला जाण्याचा इशारा दिला तो रचनाला घेऊन पोलीस स्टेशन कडे निघाला. आम्ही देखील तिथे उभे होतो. शांत बसून काही उपयोग नाही कार्तिक म्हणाला आपल्याला शोधाशोध करावी लागेल. जर का बिल्डिंग वरून कोणी आत्महत्या केली तर त्याचा मृतदेह असा गायब होता कामा नये होऊ शकते ती हत्या असावी. कार्तिकच्या शब्दात सत्यता दिसून येत होती. कार्तिक आणि मनीषा एका दीशीने निघून गेले. नंदिनी राघवला घेऊन त्या बिल्डिंगच्या टेरिस्टवर गेली. मैथिली घाबरत होती. तिची भीती दूर व्हावी म्हणून तिला घेऊन शालिनी गेस्ट हाऊसच्या बाहेर पडलो. आणि त्या रस्त्याने शोधत निघालो. मैथिलीला सुरक्षित वाटावे म्हणून मी निरर्थक बडबड करत होतो. बोलता बोलता दोन अडीच किलोमीटर चालत पुढे आलो. पण त्या रस्त्याने काही दिसत नव्हते. तेवढ्यात एक मंदिर दिसले. घसा तहान लागल्यामुळे सोकला होता. मंदिरातून आपण पाणी प्यावे असा विचार मनात आला. आणि मी मैथिलीला घेऊन मंदिरा जवळ आलो. मंदिरात प्रवेश करणार तेच माझ्या कानावर गावात आढळला. थांबा कोण आहात तुम्ही. मागे वळून बघितले तर एक म्हातारा होता बहुतेक हा या मंदिराचा पुरोहित असावा. त्यापूर्वी पुरोहिताचे वय 80 पेक्षा जास्त दिसत होते. पांढऱ्या केसाने चेहऱ्यावर नक्षीकाम केले होते. चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या त्याचा जीवनाचा अनुभव सांगत होतो. त्यांनी आमच्याकडे बघितले आणि आपुलकीच्या भावनेने विचारले. "बाळांनो तुम्ही या मनुष्यहीन जंगलात काय करत आहात? इथं पशु पक्षी पावसाचा थारा नाही. अशा या भयान ठिकाणी तुमचा येण्याचा उद्देश कुठला". महाराज माझं नाव पवन आहे. आणि ही मैथिली. मी मैथिलीकडे इशारा केला तर तिथेसा ती नव्हती. किंवा ती असल्याचा लावलेश देखील दिसत नव्हता. तेवढ्यात ते महाराज म्हणाले कोण मैथिली? या ठिकाणी तर तू एकटाच आहेस. नाही महाराज ती इथेच होती अचानक कुठे गेली कळत नाही. बर तुम्ही इथे काय करत आहात ते सांगा महाराजांच्या प्रश्नांची उत्तर मला द्यावी असे वाटले. मी त्यांना पूर्ण वृत्तांत सांगितलं त्यांनी माझ्याकडे बघितलेली दृष्टी ही समस्यास्पद होती इथे जंगलात कोणीच राहत नाही आणि तुम्हाला एक गेस्ट हाऊस दिसले. तू खरं बोलत आहेस ना महाराजांच्या शब्द मनाला भीती निर्माण करत होते. 

महाराजांनी म्हटले की या जंगलात कोणीच राहत नाही. या भयावर जंगलात तुझ्यासोबत घडलेली विपरीत घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. या ठिकाणी राहतात शरीर त्यागलेल्या परंतु इच्छा पूर्ण न झालेल्या आत्मा, ज्यांचे प्राण दैत्य शक्तीने आपल्या ताब्यात घेतली अशा उदासिन प्रेतांचे, चेटकिणींचे आणि पिशाच्च स्वरूपाच्या भुतांची हे ठिकाण. पवन या मंदिरासमोर तू उभा आहे हे दत्त मंदिर या मंदिराची अशी मान्यता आहे की जेव्हा द्वापार युगात प्रभू श्रीराम यांनी करायला सुरुवात केली होती त्यावेळी काही रक्षकांनी याच मंदिरात भगवान विष्णूची आराधना करायला सुरुवात केली. त्यांची आराधना भंग करण्यासाठी अनेक उपाय योजना केली परंतु परमपिता ब्रह्माजींनी या प्रांतात त्या दैत्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा कवच निर्माण केली. त्रेतायुग मध्ये भगवंत श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिले. त्या राक्षसांनी त्यांना वरदान मागितलेली या मंदिरात ज्या व्यक्तींनी रक्ताने आमचा अभिषेक केला तर त्याची आत्मा अत्यंत शक्तिशाली आणि अपराजित होणार. पृथ्वी आकाश वायू कोणत्याच तळावर त्याचा अंत होणार नाही. या वरदानाला भगवंताची मंजुरी मिळाली. मात्र भगवान श्रीकृष्णाने या मंदिराभोवती अशा प्रकारची माया निर्माण केली की या मंदिराच्या आत कोणता जीव कोणता प्राणी कोणताही व्यक्ती येण्याची साहस करत नव्हता. या मंदिराजवळ आल्यावर त्याच्या कानावर अनेक वाईट शक्तींचा आवाज ऐकून जेणेकरून तो या ठिकाणावरून दूर जायला निघाला. कालांतराने ही जागा मनुष्याच्या राहण्याची लायकीची नाही इथे दैत्य शक्ती वास करतात म्हणून या मंदिराला दैत्य मंदिर म्हणून घोषित करण्यात आले. आणि गावातील लोकांनी या मंदिराच्या बाहेर नवीन गाव निर्माण केले तीच हरभूमी. त्या हर भूमीत राहनारी सावली नावाची मुलगी तिच्या हातून नकळत या मंदिरात रक्त सांडली आणि तिची आत्मा आज प्रचंड शक्तिशाली आणि असुरी बनली. ज्यामुळे या मंदिराजवळ येणारे आवाज सर्व काही बंद झाले.


पण महाराज ही सावली कोण? माझ्या शब्दाकडे त्यापूरोहितने बघितली आणि सावली ची कथा सांगायला सुरुवात केली.


रवी आणि किरण हे लहानपणीचे मित्र दोघेही रात्री शहरात गेले होते ते म्हणजे सिनेमा बघायला. सिनेमा रात्री होत असल्याने गावाकडे येण्यास चांगलाच उशीर झाला. गावाची वाट ही तशी बरी होती. नुकतेच गावात डांबरीकरण झाले होते. किरणचे पाऊल गावाच्या दिशेने चालत होते. शहरातून येणारी बस गावाच्या फाट्याजवळ थांबली. रवीने आपली मोटरसायकल सुरु केली किरण त्याच्या मागे बसला. रात्री गावातील आणि बाहेर जाणाऱ्या लोकांना गावात प्रवेश नव्हता कारण माहीती गावातील जुने मानसं सांगायचे की रात्रीच्या वेळी गावाबाहेर दैत्यशक्ती असतात त्यांना गावात यायचे तर गावकऱ्यांचा सहारा घ्यावा लागणार , रंकानगरी या गावाची निर्मीती दैन्यावर नावाच्या दैत्याने केली होते रंकानगरी ही सतयुगात यज्ञ करणाऱ्या पुरोहनाचे नर्क स्थान होते. येथे देवभक्ती करणाऱ्या लोकांना मारल्या जात असत. असे ऐकण्यात आले द्वापर युगात श्रीकृष्ण यांनी या नगरीत प्रवेश करून येथील दैत्यांचा नाश केला आणि या नगरीला हरभूमी असे नाव दिले. कालांतराने ही वस्ती गावात रूपांतरीत झाली. पण या गावात दैत्य शक्तीचा प्रभाव होता . रात्रीच्या वेळी गावाबाहेरून कोणी गावात प्रवेश केला तर त्याचा अक्लपित मृत्यू होत असे. म्हणून मुघल काळात स्वामी जयनाथ नावाचे दिव्य पुरुष गावात आले होते त्यांना ही घटना कळली. त्यांनी हरभूमीमध्ये यज्ञकरून गावाच्या सीमेवर दीव्यशक्तीचे आवरण केले. ज्याने दैत्यशक्याचा प्रभाव कमी होईल. मात्र समाजील काही विकृत लोकांनी सर्वांच्या लपून दैत्यपूजा करण्यास सुरवात केली त्यांनी दैन्यासूरला जागृत केले पण त्याला परत पाठवणे त्यांना जमले नाही हा दैन्यासूर गावात प्रवेश शकत नव्हता मात्र रात्रीच्या वेळी कोणी गावाच्या सिमेबाहेर दिसले की त्यांचा अंत करून द्यायचा. या दैन्यासूराच्या भितीने मुघलही या हरभूमीत प्रवेश करत नसत. मात्र मुघल सम्राटच्या दरबारात त्यांचे एक धर्मगुरू होते . ते शीख समुदयाचे बाबा हरदास सींह त्यांचे आगमन हरभूमीत झाले. त्यानी आपल्या अपार दिव्य शक्तीच्या जोरावर हरभुमीमधील नकारात्मक शक्तीचा नायनाट केला आणि गावाला त्या सर्व नकारात्मक शक्यापासून सुटका केली. गावात दैत्य मंदीर आहे तिथं पर्यंत त्या मंदीरात सात्विक विचाराचा व्यक्ती प्रवेश करून मंदीर स्वच्छ करत नाही तिथ पर्यत या गावावर दैत्य शक्तीचा प्रभाव राहील. हरभुमित सावली नावाची महीला राहायची. 

     सावली एक अत्यंत गुणी मुलगी होती. ती आपल्या आजोबा सोबत राहायची. रंगाने गोरी उंचीपूरी होती शरीरयष्ठी अंत्यत मोहक स्वरूची. पहिल्या नजरेत कुणाची देखील कामवासना जागृत होणार. पण चांगल्या गुणासोबत वाईट वृत्ती देखील असते. सावलीला आपल्या सौंदर्याचा झालेला अहंकार आकाशाला भिडला होता काही विकृत विचार ठेवणाल्या तरुणांचा तीच्या द्वारे झालेला अपमान हा तिच्याच जिवावर बेतला. एक दिवस गावाच्या नदीवरून पाणी घेऊन ती आपल्या घरी येत होती. रस्त्याने रवी आणि कीरण तिची थट्टा काढत होते. त्यांच्या या वागच्यामुळे सावलीचा मनस्ताप वाढला व तिने रवीच्या कानाखाली वाजवली. सावलीने आपल्या कानाखाली मारली म्हणून तिचा सूड घ्यायचा अशी विकृत कल्पना रवी आणि कीरणच्या मनात घर करू लागली. अमावस्येची ती रात्र. सावलीच्या आजोबाचे शरीर थंडे पडले होते. त्याची तबीयत घालावली होती. म्हणून सावली गावाच्या वैद्याकडे गेली होती. रस्त्याने अंधार होता. कीरण आणि रवी दारूच्या नशेत लुप्त होते. सावली येत आहे हे बघुन त्यांची कामवासना जागृत झाली. त्यानी सावलीची छेड काढायला सुरवात केली. दोघांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न व्यर्थी होत होता. पण सावलीने कसे बसे त्यांच्या तावडीतून सुटका केली पण तीचे वस्त्र मात्र जास्त प्रमाणात फाटले होते. ती धावत - धावत गावाच्या बाहेर असलेल्या मंदीरात अर्थात दैत्य मंदिरात गेली. रवी आणि किरण तिचा पाठलाग करत होते. सावलीला आता आपली अब्रु वाचविण्याचा एकच मार्ग दिसत होता तो आत्महत्येचा सावलीने टोकाचे पाऊल उचलले आणी तेथील दैत्य मुर्तीच्या पायथ्याशी असलेल्या तलवारीवर आपले डोके आपटले. सावलीने आपली मान त्या तलवारीवर आदळून आत्महत्या केली. कालांतराने या घटनेचा वीसर पडला रवी आणि किरणला झाला त्याच्या या कृत्यावर त्यांनीच माती टाकली होती. योग्य वेळी उपचार न झाल्यान सावलीच्या आजोबाचे निधन झाले. एका विकृत विचाराने एक कुटुंब उध्वस्त केले होते. सावली मरताक्षणी आपला प्राण दैत्य मूर्तीसमोर सोडला. ज्यामुळे देह नष्ट झाले मात्र तिची आत्मा ही नष्ट झाली नव्हती. दिवसा या गावात कोणती भिती नसे मात्र रात्री सावली जीवंत राहीली. हीच सावली आता हरभूमीमध्ये काळे ढग घेऊन आली होती. या गावातील लोकं आता आपली जनावरे सूध्दा मोकाट करायला घाबत होती. रवी आणि कीरणची हत्या देखील सावलीच्या प्रतिशोधाचाच भाग होता. दैन्यासुराची संपूर्ण शक्ती सावलीला मिळाली होती. आनी दैन्यसुराच्या वरदानाचा देखील तिच्या आत्म्याला फायदा झाला होता.

         सावलीचा प्रकोप संपूर्ण हरभूमीवर पडला होता. नवविवाहीत तरुणांची हत्या होत होती कळतं नहते काय कारण आहे. कुणावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तरी ती विकृत मुलं नपुसंक व्हायची. गावात शुभकार्याची शहनाई सोडून उदासीनतेच ढोल वाजूय होते लोकांच्या मनात सावलीची भिती दाट वाढली होती. कळंत नव्हते तीला शांत कसे करायचे. लोकांनी गाव सोडायला सुरुवात केली. कालांतराने हे संपूर्ण गाव वसान पडले. सध्य काळात जनावर देखील हे गाव सोडू लागले होते. गेल्या काही वर्षापासून ही भूमी वसान आणि मणूष्यहीन झाली , मी देखील या मंदीराच्या सहायाने राहत आहे. त्या पुरोहीनाचे शब्द ऐकुण मी निशब्द झालो. पण त्यात सत्यता होती. महाराज या संकटापासून काहीतरी निघण्याचा मार्ग असल तो सांगावा. त्यावर त्या महाराजांनी सांगतिलो की सुर्यास्ताच्या वेळी सूर्याची पहीली कीरण जमीनीवर पडली की या मंदीराच्या कळसातून सप्तरंगी प्रकाशनिघतो तो प्रकाश ज्या दिशेने जानो त्या दिशेने जाव लागेल. तो प्रकाश कमी वेळात अदृष्य होतो. एकदा त्या प्रकाशामागे पळत असला तर मागे फिरून बघायचं नाही. त्या तीन - चार मिनीटात विकृत शक्त्या लुप्त होतात त्याच वेळी तून्हीं या हरभूमी बाहेर पडू शकणार. त्या पुरोहीताच्या सांगण्यावरून मी शालीनी गेस्ट हाऊसकडे परत जाण्यासाठी निघालो. काही वेळान मी त्या रस्त्याने जात होतो तर त्या सत्यावरून मला सर्व मित्र माझ्याकडेच पळत येत असतांना दिसले. ते खूप घाबरले होते नंदनी धापा टाकत होती. काय प्रकार घडला असावा. ज्या प्रकाराने यांची मानसिकता बदलून टाकली. मी नंदनीला विचारले काय झालं. जे तुम्ही इतक्या वेगाने धावत आहात. 

नंदिनी: पवन तु मैथिलीला घेऊन बाहेर गेला त्या वेळी राघव आणि मी शालिनी गेस्ट हाउस च्या मागे त्या मुलीचा मृतदेह शोधत होतो, तर राघवचा पाया एका जाळ्यात अडवून राघव जमीनीवर पडला. जेव्हा त्याने जमिनीवरून उठून व्यवस्थित बघितले तर त्याला तिथेसा अनेक मानसांचे कंकाल पडलेले दिसले. आम्ही ते बघत नाही तर मानिशाचा आवाज गेस्ट हाउस मधून आला. मी गेस्टहाऊस कडे गेली. राघव ते कंकाल बघून त्याची शुद्ध हरपली होती. मनीषाचाआवाज कानावर आल्यामुळे माझी भीती वाढली होती. मी गेस्ट हाउस मधे गेली त्यावेळी सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. मोहीनी व संदीपचे डोळे फाटले होते. रचना व कमलेश हे हवेत तरंगत होते. त्यांनी मनिषाला वर उचलून घेतले होते. मनीषा स्वताला वाचविण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. कारण की तिची लढाई ही एका नश्वर आत्म्याशी होती. रचनाने मनीषाचा पाय आपल्या हाताने धरला होता. बघता बघता रचनाने मनीषाच्या पायाचा चावा घेतला आणि मनीषाचे रक्त पीण्यास सुरुवात केली. मनीषा आमच्या समोर रक्तहीन होत होती तिचे शरीर पांढरे पडत होती. हे दृश्य बघून आम्ही तिथून पळ काढला. शालीनी गेस्ट हाऊस पासून आपल्या कारपर्यंत आलो तर एक भूकंप झाला आणि कारचे चारही चाक जमिनीत पुरले होते. आम्ही सैरावैरा धावत सुटलो तेवढ्यात आमच्या समोर मनीषाचा मृतदेह येऊन पडला. कार्तिक तिच्या जवळ गेला तिला आलिंगन देऊन रडत होता. आम्ही देखील त्याच्या आजूबाजूला होतो. तर अचानक मनीषाने कार्तिकला मिठी मारली आणि आपल्या हात कार्तिकच्या छातीतून बाहेर काढले. कार्तिक आणि त्याचा झालेला मृत्यू अतिशय भीती देत होता. मनीषा उभी राहिली तिचे दात काळेकुट झाले होते तीच्या आवाजात असुरीपणा आला होता. हो ती जवंत होती तिचे शरीर आता चेटकीणचे झाले होते. ती एक रक्तपिषाच झाली होती. तिचे शरीरात अचनाक पुरुषी शक्ती संचारली होती ती बघत असतांना तीने अचानक राधववर हल्ला केला. काही वेळात राघवची मान तिच्या दातात फसली होती. एका रक्त पिशाचिनीप्रमाणे ती राघवच्या मानेतून रक्त पीत होती. काही वेळात रागावच्या शरीरातील रक्त संपले. राघव चे शरीर पांढरे पडले होते त्याचे हात काळे झाले होते. मनीषाला अडवण्याची हिंमत आमच्या मध्ये नव्हती. अचानक संपूर्ण वातावरण शांत झाले मनीषा व राघव आता आमच्या समोर उभे होते जिवंत प्रेत म्हणून. रागावला जसं काही संसर्गजन्य रोग झाला असं वाटत होती परंतु चेटकिनने रक्त पिल्यामुळे राघव देखील पिशाच झाला होता. तेवढ्यात त्या गेस्ट हाऊस मधून रचना आणि मैथिली बाहेर पडली. कमलेश आणि कार्तिक यांनी आपल्या डोक्यावर एक पालखी घेऊन आले होते. त्या पालखीत असणारा चेहरा अस्पष्ट होता. नंदीनी ती घटना सांगत होती तेवढ्यात मृत्यूच्या पालखीत वाजणारा आवाज माझ्या कानावर पडला नंदीनी समोर होता होता तो राघव. राघव आता चेटकीणच्या आहारी गेला असावा मोहीनी व संदीपने माझ्या मागे सहारा घेतला. समोरून पीशाच्च रुपाचे लोक आमच्याकडे येत होती. ते समोर आल्यावर त्यांचा चेहरा दिसला. कमलेश - कार्तीकच्या खांदयावर एक लहान पालखी होती. त्या पालखीमध्ये पांढऱ्या शुभ्र केसाची डोक्यावर पडलेली झालर रंगाने गोरीपान डोळ्यात मात्र अग्नीसारखी ज्याला दिसत होती. जणू त्या डोळ्यात काहीच नव्हती पूर्ण डोळे पांढरे शुभ्र होते. रक्ताने भरलेले दात तिच्या असुरीपणाची साक्ष देत होती. तु सावली आहेस माझ्या तोंडातून शब्द निघाले. तेव्हा त्या पालखीतील त्या चेटकीनने आपल्या असूरी आवाजात म्हटले की "हो मीच सावली. मीच असुर कन्या सावली. तुमच्या रक्ताने अंघोळ करायला आली आहे. तीचे शब्द अंत्यत कठोर होते. तीच्या पालखी समोर रचना ढोल वाजवित होते. राघव व मैथिलीने आपले पिशाच्च रूप धारण करून आमच्यावर चढण्याचा बेत आखला होता. तेवढ्यात देवाची कृपा झाली आणि सूर्यास्त होण्याची वेळ झाली त्यांच्या अंगान थकवा जानवत होता. काही वेळात त्या मंदीराच्या कळावर लख प्रकाश पडला तो सर्वांना आश्चर्य वाटले. तेवढ्यात इंद्रधनुष्याचा रंगाचा एक मार्ग प्रकाशित झाला. मी कोणतीही प्रतिक्रिया न देता सर्व मित्रांना त्या रस्त्यावर पळायला लावले. त्या रस्त्यावर धावत असताना. नंदिनी मोहिनी आणि संदीप समोर ठेवले आणि मी त्यांच्या मागे होतो. अनेक प्रकारच्या आवाज आमच्या काणी आदळत होती. प्रत्येक वेळी मी त्यांना मागे वळून बघण्यास मनाई करत होतो. काही क्षणात आम्ही त्या जंगलाच्या बाहेर पळालो आणि तेथून सर्वकाही सुरक्षित दिसत होते. आमच्यासमोर एक पाटी होती त्यावर लिहिले होते माथेरान 40KM. तेव्हा कधी माझ्या जीवात जीव आला. जेव्हा मागे वळून बघितले तर घनदाट जंगल होते जाण्यासाठी मार्ग दिसत नव्हता. ही सर्व देवाची कृपा म्हणाली की ज्याने आमचा जीव वाचला. आता समोर प्रश्न होता तो त्या दैत्य मंदिरातील पुरोहिताचा. त्याचे वय त्याला या जंगलाच्या बाहेर पडू देत नसेल असे मणी बाळगले आणि आम्ही माथेरानच्या महाविद्यालयीन संमेलनात पोहोचलो. तिथे गेल्यावर कळले की असे कोणतेच संमेलन इथे आयोजित करण्यात आलेले नाही. मग आम्हाला मिळालेले पत्र कुणाची हा प्रश्न तोंड वासून उभा होता.


डायरीत लिहिलेला मजकूर इथे संपला होता पवन व त्यांचे मित्र हरभुमितून बाहेर पडल्यावर काय झालं. सावलीचा अध्याय इतक्या लवकर संपणार नाही तिच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याची भूक विजयला लागली.




Rate this content
Log in

Similar marathi story from Drama