AKSHAY KUMBHAR

Drama Tragedy Inspirational

4.9  

AKSHAY KUMBHAR

Drama Tragedy Inspirational

भाड्याचं गर्भाशय

भाड्याचं गर्भाशय

12 mins
1.3K


माझ नाव जयेश


मी BA च्या शेवटच्या वर्षाला होतो.


संजीवनी माझ्याच क्लास मध्ये होती.


संजीवनीला मी BA च्या पहिल्या वर्षांपासून ओळखतो.


अजून आम्ही दोघे बोलत नाही.


पण


ती माझाशी एकदा चुकून बोलली


"थोडं बाजूला होतोस का ?"


तेवढंच मी तिला ओळखतो.


म्हणजे माझा आणि तिचा काही खास असा संपर्क नाही. पण हीच एकतर्फी प्रेमाची छोटी ती गोष्ट.


एक दिवस मी तिला विचारेन याच आशेने मी कॉलेजला येत होतो.


असं वाटत होत कधी हे कॉलेज संपतंय, चांगली नोकरी लागतेय आणि मी संजीवनीच्या आई बाबांना भेटेन आणि त्यांना लग्नाविषयी बोलणी करेन.


खरचं मी किती स्वप्नात जगतोय.


कधी कधी स्वप्न तुटेल अशी भीती पण वाटते.


पण रिस्क घ्यावी लागते बॉस, जे होईल त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो.


दररोज संजीवनीला लपून पाहण्यात जी मज्जा असते ते सुख या जगात कुठेच नाही.


तीच दिसणं, तीच वागणं, तीच बोलणं, तीच चालणं प्रत्येक गोष्टीने मी अक्षरशः वेडा झालो होतो. तिला मिळ्वण्याआधीच तिला गमावण्याची जास्त भीती वाटत होती.


ती या जगात वेगळीच होती. साधी होती. इतर मुलींसारखं ती मुलांशी बोलायची नाही. ती आणि तिचा अभ्यास. अभ्यासाच्या बाबतीत खूप गंभीर असायची.


तिला अभ्यास खूप आवडायचा.


कॉलेजची मुल- मुली लेक्चर बंक करून फिरायला जायच्या.


ह्या मॅडम सगळे लेक्चरला हजर. फ्री वेळ मिळाला कि ती वाचनालयात पुस्तकात बुडालेली असायची.


ती खूप साधी होती पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती.


एकदम शांत स्वभाव. मॅरेज मटेरियल होती ती.


तिला पाहिलं कि मी एक निर्जीव पुतळा बनून जायचो.


ती जाईल तिथे मी तिचा लपून पाठलाग करायचो.

एक विचित्र आणि वेगळं माझ प्रेम होत तिच्यावर.


एक दिवस तिच्या बेंच जवळ एक रुमाल पडला होता. मी उचलला आणि दुसऱ्या दिवशी रुमालाच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो तर ती एकच वाक्य बोलली.


" हा माझा रुमाल नाही."


तीच बोलणं मला कळलं नाही मी परत काय विचारलं तर ती हसून निघून गेली.


कदाचित तिला कळलं होत कि मी तिच्या प्रेमात पडलोय.


का हा माझा गैरसमज आहे.


ती कॉलेजला नाही आली कि मला कॉलेज नकोस वाटायचं.


कॉलेजला मी शिकायला कमी आणि संजीवनीला पाहायला जास्त याचो.


काही दिवस संजीवनी आली नाही. मी खूप अस्वस्थ झालो.


माझी प्रेमाची कथा कुठे तरी थांबली असच मला वाटलं.


तेव्हा पासून संजीवनी माझ्या आयुष्यातून गायब झाली असच वाटलं.


मी तिला खूप शोधलं. कॉलेज मधून तिच्या घरचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेलो.


ती एका बैठ्या चाळीत राहत होती.

तिला वडिल नव्हते.


तिच्या दरवाजा वाजवला आणि तो एक बाईंनी उघडला


मी: इथे संजीवनी राहते का ?


बाई: इथे कोणी संजीवनी राहत नाही.


मला खूप आश्चर्य वाटलं. कॉलेज ला पण खोटा पत्ता कसा दिला असेल.


मी खूप माहिती काढल्यावर मला कळलं कि तिची बहीण आमच्याच कॉलेजला FYBA ला आहे.


मी तिला भेटलो.


मी: तू संजीवनी ची छोटी बहीण कविता आहेस का ?


कविता: नाही माझी कोणी बहीण नाही.


असं काय होतंय मला काहीच कळत नाही.


खूप वेळ गेला मी अक्षरशः मरुनच गेलो होतो. संजीवनी कुठेच सापडली नाही. माझे सगळे प्रयत्न संपले.


कॉलेज संपलं.


नंतर मी MA केलं. पण संजीवनीला विसरु शकलो नाही.


नंतर मी एका कॉलेजला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो.


आता नोकरीला लागून दोन वर्ष झाले होते.


घरात माझ्या लग्नाच्या मागे लागले, दररोज मला मुलगी बघण्यासाठी घरातून भावनिकरित्या समजूत काढण्यात येऊ लागली.


पहिली मुलगी मी पाहायला गेलो.


खरचं माझी लग्न करायची इच्छाच नव्हती.


सगळेच खुश होते. पण माझी इच्छा नव्हती तरी मी मुलगी बघायला गेलो.


मला आणि मुलीला बोलण्यासाठी टेरेस वर पाठवलं.


मला काय बोलावं तेच समजत नव्हतं. ती काय बोलत होती त्याच्याकडे माझ लक्ष नव्हतं.


तीच एकच वाक्य मी ऐकलं.


"माझ दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तुम्ही मला रिजेक्ट करा."


तीच बोलणं चालू असतानाच माझी नजर रस्त्यावर गेली


आणि मी संजीवनीला पाहिलं.


मी बारकाईने पाहिलं तर ती संजीवनी होतीच.


मी घाई घाईत बाहेर पडलो.


सर्वांची माफी मागितली आणि सर्वाना अर्जंट काम आलं म्हणून निघालो असं म्हणून मी धावत बाहेर आलो.


संजीवनी रस्त्यावर नव्हती. मी पळत पळत सगळीकडे शोधलं. पण ती रस्त्यावरुन गायब झाली होती.


खरचं ती होती का ? का तो माझा आभास होता हेच कळत नव्हतं.


घरातल्यांचे फोन वर फोन येत होते.


मी आईचा फोन उचलला


आई: कुठे आहेस तू ?


मी: अग आमच्या कॉलेज मधले सर वारले. मला तिथं जावं लागलं.


आई: बर बर. घरी आल्यावर बोलू.


थापा मारण्यात मला ऑस्कर मिळाला पाहिजे. मी फोन ठेवला.


आणि

माझी नजर एका बैठ्या घराकडे गेली. तिथून एक लहान मुलगी पळत आली आणि तिच्या मागे संजीवनी होती.


किती वर्षानंतर तिला पाहिलं होत. तिच्या चेहऱ्यावरचं ते तेज कुठे तरी हरवलं होत. एखाद्या आजारी व्यक्तीसारखी ती दिसत होती.


मी शांत झालो.


काहीच सुचत नव्हतं.


मी संजीवनीला हाक मारली.


मी: संजीवनी


तिने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर नजर वळवून ती त्या मुलीला घरात घेऊन दरवाजा लावला.


मी तो दरवाजा ठोकला


तिने तो उघडला


मी: अग संजीवनी मी जयेश. ओळखलं नाहीस का ?


संजीवनी: नाही. मी नाही ओळखलं आणि मी संजीवनी नाही.


मी: काय ? तू असं का बोलतेस. मी तुला चांगलं ओळखतो. तुझा चेहरा मी विसरू शकत नाही. चार वर्षांपूर्वी तू कॉलेज मधून गायब झाली होतीस ते आता भेटते.


संजीवनी: अहो माझ नाव आशा आहे.


मी: शक्यच नाही. संजीवनी तू अशी का वागतेस ? अग मी तुझ्यावर


संजीवनी: जयेश तू इथून जा.


मी: तू मला का टाळतेस.


संजीवनी: मी आशा आहे.


मी: बर. तुझं शिक्षण किती झालाय.


संजीवनी: १० वी नापास.


मी: व्वा. खोट बोलणं तुला जमल नाही. १० वी नापास झालेल्या मुलीला ती आमच्या कॉलेज तर्फे मिळालेली ट्रॉफी कुठून आली.


   ही ट्रॉफी तुला कॉलेज च्या चित्रकलेच्या स्पर्धेत मिळाली होती. तू फसलीस आता.


संजीवनी: हो मीच संजीवनी.


मी: तू कॉलेज का सोडलंस ? ही मुलगी कुणाची ? तू कुठे गायब झालीस ? तुझ्या घरातले तुझी ओळख का लपवत आहेत ?


संजीवनी: ही माझी मुलगी आहे.


मी: काय ? तू लग्न कधी केलस ?


संजीवनी मोठ्यांनी रडायला लागली.


मी: काय झालं नीट सांगशील का ?


संजीवनी: माझ लग्न नाही झालं ?


मी: मग ही मुलगी कुणाची ?


संजीवनी: हीला जन्म मीच दिलाय पण मी हिची खरी आई नाही.


मी: तू वेडी झालीस का ?


संजीवनी: मी तुला सगळं नीट सांगते तू फक्त शांत हो.


मी: मला तुझाकडून ही अपेक्षा नव्हती. का केलस असं. माझ तुझ्यावर खूप प्रेम होत. मी तुला लग्नासाठी मागणी घालणार होतो. चार वर्ष मी तुझ्या आठवणीत वेडा झालो होतो.


संजीवनी: मला माहित होत तुझं माझ्यावर प्रेम आहे. आणि माझंपण तुझ्यावर प्रेम होत. पण आता सगळं संपलं. आयुष्य कुठे तरी हरवलं.


मला माफ कर.


मी: का असं केलंस.


संजीवनी:


 कॉलेज चालू असताना एक दिवस आईला अचानक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं तिला ह्रदयविकार आहे. तीच ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी ५ - ६ लाख रुपये खर्च येल.


आमची परिस्थिती खूप खराब होती. राहायच्या घराचं भाडं देणं अवघड होत. हा ऑपरेशन चा खर्च कुठून देणार. पण ऑपरेशन करण गरजेचं होत. आई जिथ जिथं धुनी-भांडी करायची तिथे मी आणि माझी छोटी बहीण धुणीभांडी करायला लागलो.


पण पैशाचा प्रश्न कसा सोडवावा हेच कळत नव्हतं.


आणि एक दिवस डॉक्टरांचा फोन आला.


डॉक्टर: संजीवनी का ?


मी: हो मी संजीवनीच बोलतेय.


डॉक्टर: अग पैशांची सोय झाली का ?


मी: नाही डॉक्टर. मी प्रयत्न करतेय.


डॉक्टर: अग तुझा पैशांचा प्रोब्लेम मी सोडवतो. तू मला उद्या भेटायला ये.


मी: मी चालेल बोलेल.


दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना भेटायला मी त्यांच्या घरी गेले.


मी: नमस्कार डॉक्टर.


डॉक्टर: ये बस.


मी: तुम्ही माझी मदत करणार आहात का ? मी तुमची खूप आभारी आहे. मी नोकरीला लागली कि पहिले तुमचे पैसे व्याजासकट देणं.


डॉक्टर: नाही. तू शांत ऐकून घे.


मी: बर. बोला.


डॉक्टर: हे बघ. हे जग स्वार्थी आहे. ह्या जगात कोणी कुणाला अशीच मदत करत नाही. त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ असतोच.


मी: मी समजले नाही.


डॉक्टर: मी तुला नीट सांगतो. एक विवाहित कुटुंब आहे. त्यांचं लग्न होऊन पाच वर्ष झाले पण अजून त्यांना मूल बाळ नाही. त्यांना स्वतःच मूल बाळ हवं. तर ते मूल तू त्यांना द्याच.


मी: शी. डॉक्टर तुम्ही इतकं घाणेरडं बोलताय. माझं लग्न नाही झालं त्याचा अर्थ इतका वाईट घेतला. माझ्या भविष्याची वाट लागेल. शी. मी असं काही करणार नाही. मी निघते.


डॉक्टर: अग ऐक. अग तुला काही वाईट करायचं नाही. तुला या बदल्यात ६ लाख रुपये मिळतील.


मी: देहविक्री करून असा पैसे मिळवायचा असता तर मी खूप पैसा कमावला असता. मला हे मान्य नाही.


डॉक्टर: अग तुला देहविक्री करायला नाही सांगत.


मी: मग बिना शरीर संबंध ठेवता मूल कस होणार ?


डॉक्टर: हे विज्ञान आहे. सरोगसी करायची. सरोगसी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय भाड्याने घेणे. स्त्रीचे ‘स्त्री बीज’ आणि ‘पुरुषाचे शुक्राणू’ यांचे प्रयोगशाळेत किंवा आर्टिफिशयल इंसेमनेशनद्वारे फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यानंतर तो गर्भ नऊ महिने वाढू दिला जातो. नऊ महिन्यानंतर ते नवजात मुल पती पत्नीकडे सोपवले जातो. नंतर तुमचा आणि तुझा काहीही संबंध नाही. आणि हे लीगल आहे.


संजीवनी: बापरे असं पण असत.


डॉक्टर: तू तयार झालीस की तुला २ लाख मिळतील. नंतर ७ व्या महिन्यात तुला २ लाख आणि बाळ दिल्यानंतर २ लाख. विचार कर.


मी: मला थोडा वेळ हवा.


डॉक्टर: तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. आईच ऑपरेशन करायला. आणि ही गोष्ट कुणाला सांगू नको.


मी घरी गेल्यावर खूप विचार केला. नंतर मी खरच असं होत का ? यावर गूगल वर तपासलं. सगळी माहिती खरी आहे. भीती वाटत होती. पण काहीच पर्याय सुचत नव्हता. आईची तब्येत बिघडत चालली होती. सगळ्या नातेवाईकांकडे हात पसरुन झाले होते. सोन पण एवढं नव्हतं कि त्यावर लोन मिळेल.


दोन दिवसांनी परत डॉक्टरांचा फोन आला


डॉक्टर: खुश खबर संजीवनी


मी: काय ?


डॉक्टर: ज्यांना बाळ हवाय त्यांना मी तुझी परिस्थिती कशी आहे ते सांगितलं. ते बोलले कि तुझ्या आईच ऑपरेशन ते मोफत करुन देतील. शिवाय तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी १० लाख रुपये देणार आहेत.


तू तयार झालीस कि पाहिलं तुझ्या आईच ऑपरेशन


७ महिन्यानंतर तुला ७ लाख रुपये


बाळ दिल्यानंतर ३ लाख रुपये


फक्त ९ महिन्यांचा प्रश्न आहे.


तुझी पूर्ण काळजी, तुझं खान पिण, ९ महिन्याचा पूर्ण खर्च तेच करणार आहेत.


विचार कर एवढी चांगली ऑफर भेटेल तुला


मी: मला थोडा वेळ हवाय.


डॉक्टर: बघ तू. तूच ठरव आणि मला फोन कर.


मला हे ठीक वाटत नव्हतं. काहीच कळत नव्हतं. पण माझ्याकडे पर्याय नव्हता.


मी डॉक्टरांना फोन करुन होकार कळवला.


माझा होकार येताच आईच ओप्रेशन झालं.


आईला सुखरुप बघून मला विश्वास बसला. मी काही चुकीचं करत नाही.


मी एक नोकरी लागल्याचा बहाणा करुन घरातून निघाली.


मी डॉक्टरांकडे गेले. आम्ही एका दुसऱ्या डॉक्टर कडे गेलो.


माझी सरोगसी करायची प्रक्रिया सुरु झाली.


मला एक मोठ्या बंगल्यात नेण्यात आलं. तिकडे नोकर चाकर होते.


मोठं गार्डन होत. मला सगळं सुरक्षित वाटत होत. मी काय खायचं, कस राहायचं हे शिकवण्यासाठी पण खास लेडीज डॉक्टर माझ्याजवळ होते.


तीन महिने गेले माझी सोनोग्राफी झाली.


सगळं ठीक होत. मी एक माता झाली होती.


बाळाची हालचाल आता जाणवत होती.


या बंगल्यात माझी खूप चांगली काळजी घेण्यात आली. कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता.


आवडेल ते खायला भेटत होत. मला असं वाटत होत कि मी कोणी राजकन्या आहे.


सर्व नीट चालू होत. घरात मी आठवणीने फोन करत होते.


म्हणता म्हणता दिवस सरकत होते. आता पोट दिसून येत होत.


७ वा महिना सुरु झाला. मी पैशांसाठी डॉक्टरांना फोन केला.


मी: डॉक्टर


डॉक्टर: हा संजीवनी बोल. कशी आहेस ?


मी: मी बरी आहे. डॉक्टर ते ५ लाख मिळणार होते त्याच काय झालं ?


डॉक्टर: हा मी बघतो ते. कामात आहे. नंतर फोन करतो.


मला थोडं टेन्शन आलं. मी दोन दिवसांनी परत डॉक्टरांना फोन केला त्यांनी उचलला नाही.


परत त्याचा मोबाईल लागणच बंद झालं. त्यांनी मला ब्लॉक केलं होत.


मला खूप राग आला होता. मी तशा अवस्थेत डॉक्टरांना भेटायला गेली.


मी: डॉक्टर


डॉक्टर: अग संजीवनी ये बस.


मी: तुम्ही मला ब्लॉक का केलय.


डॉक्टर: असं काही नाही.


मी: मला खरं सांगा.


डॉक्टर: अग जे जोडपं तुझ्या पोटातलं बाळ घेणार होत. त्यांचा आंतरिक वादात घटस्फोट होतोय. आता त्यांना ह्या बाळाची गरज नाही. त्या दोघांनी बाळाची जवाबदारी घेण्यास नकार दिला. मी खूप समजूत काढायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकून घेतल नाही.


मी ही गोष्ट ऐकून एकदम स्तब्ध झाले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. क्षणातच सगळं संपलं. हे काय करुन बसले मी. काय करु आता.


मी: काय झालं हे.


डॉक्टर: तू काळजी करु नको. सगळं नीट होईल.


मी: काय नीट व्हायचं राहिलीय. माझं सगळं आयुष्य संपलं. मला मरणाशिवाय पर्याय नाही आता.


डॉक्टर: अग संजीवनी असं काही करु नको. अग आपण कोर्टात जाऊ. तुला तुझे पैसे मिळतील. ह्या बाळाला जन्म दे. त्याला आपण अनाथ आश्रमात पाठवू. सगळं नीट होईल.


मी: व्वा डॉक्टर. तुम्ही पण स्वार्थी निघालात. मला असली भीक नकोच. जे सगळ्यांपासून लपवायचं होत. ते आत्ता तुम्ही सगळ्या जगाला कोर्टात सांगणार. नको मला असला न्याय. यापेक्षा मरण बर.


तेव्हा जाणवलं ही दुनिया किती स्वार्थी आहे. बाळाची गरज होती तेव्हा पाया पडत होते. आता नाही तर दिल आश्रमात फेकून. मी त्याच अवस्थेत घरी आली.




मला अशा अवस्थेत बघून आईने डोक्यावर हात मारुन घेतला. मला घराबाहेर काढलं. मी सगळं घडलं ते तिला सांगितलं पण तिला पटल नाही.

तीच एकच गोष्ट म्हणाली "मी मेले असते तर काय झाल असत तुला हे उद्योग कुणी करायला सांगितले होते. तू आजपासून आमच्यासाठी मेलीस. तुला या घरात जागा नाही."


तेव्हा घर सोडलं.


नंतरच आयुष्य खूप बदलल. लोकांच्या बघण्याच्या नजरा बदलल्या. कुठेही जगणं कठीण झालं होत. पण आता बाळाशिवाय माझं कोणी नव्हतं. एका अनाथ आश्रमात जेवण बनवायला आचारी हवा होता. मी तिथे गेले. मला तिथे खूप चांगली माणसे भेटली. त्यांनी माझी काळजी घेतली. मी पण त्या अनाथ आश्रमाला माझं समजलं. ही गोड परी तिथेच जन्माला आली.


मी माझं शिक्षण मी पूर्ण केलं. माझ्या पदवीनंतर मी छोटी नोकरी केली.


अनाथ आश्रम माझं घर झालं.

पण काही महिन्यांनी तिथे पण राहणं कठीण झालं. कारण त्या अनाथ आश्रमाचा संस्थापक माझ्यावर वाईट नजर ठेवून होता. मी कशी बशी तिथून सटकले.


आणि

आता इथे राहते. कोण नाही माझं. परी लहान असल्यामुळे मला नोकरी करता येत नाही. आणि परीला कुठे सोडू शकत नाही. म्हणून मी घरची काम करायला लागली. काम करता करता मला परीला पण वेळ देता येऊ लागला.


आता फक्त परीच्या भविष्याचा मी विचार करते. जे मला नाही मिळालं ते तिला मला द्याच आहे.


आणि त्यासाठी मी काहीपण करेन.


संजीवनी रडायला लागली.


मी: संजीवनी तु रडू नको प्लीज. तू माझाशी लग्न करशील का ?


संजीवनी: काय ?


मी: मी परीसोबत तुला आपलस करेन परीला वडिलांचं नाव देणं. तू आई नसताना आई बनू शकतेस. तर मी वडील नसून वडील का नाही बनू शकत.


संजीवनी: नको जयेश. माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याची वाट लावू नको. तुझ्या घरातले हे स्वीकारणार नाहीत. मी माझ्या आयुष्याची वाट लावली.


मी: बर मी निघतो.


संजीवनी: मला माफ कर जयेश.



काय माहिती संजीवनीला भेटून मला एक सुख मिळालं होत. मी घरी आलो,


घरी माझे सगळे वाट बघत होते. मी घरी येताच


आई: ये. हे घे पाणी. कशामुळे सर वारले रे ?


मी: आई मी खोट बोललो.


आई : अरे काय खोट बोलला. ते जाऊ दे. तुला मुलगी कशी वाटली ?


बाबा: मुलींच्या घरातल्यानी तुला पसंद केलय. पुढच्या महिन्यात साखरपुडा करुन घेऊ.


मी: मला लग्न नाही करायचं.


बाबा: का पण ?


मी: माझं संजीवनीवर प्रेम आहे. आणि आम्हाला एक मुलगी आहे.


आई: काय ? लग्नाआधी एका मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस ?


आईने खूप मारलं. आई खूप रडायला लागली. बाबांनी खूप शिव्या दिल्या. घरात सगळे माझ्यावर नाराज होते.


दोन दिवस माझाशी कोणीच बोललं नाही. मी पण माझी कपड्यांची बॅग भरली.


घरात सगळे बसले होते.


मी: माझ्या कडून चुकी झाली. ती मला मान्य आहे. मी त्या मुलीशी लग्न करायला जातोय. मी घर सोडून जातोय. माझ्यामुळे तुम्हाला सर्वाना जो त्रास झाला आणि जो त्रास होईल त्यासाठी मी मनापासून माफी मागतो.


त्यांना हे सांगता सांगता मी घर सोडलं.


आज मी एका मुलींसाठी माझ्या आईबाबांना सोडतोय. मला देव यासाठी कधीच माफ करणार नाही. पण आता संजीवनीला परीला माझी गरज आहे.


देवाला कळेल माझ्या मनातलं.


संजीवनीला भेटलो. तिला सांगितलं “ माझं तुझ्यावर तेव्हापण प्रेम होत आता पण आहे. मला फक्त तुझाशीच लग्न करायचं आहे.” ती हे ऐकून तीने मला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली.


तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन बाबांचा होता.


बाबा: स्वतःला जास्त शहाणा समजू नकोस. कोण काही बोलत नाही म्हणून जास्त शहाणपण गाजवू नकोस. त्या पोरीला घरी घेऊन ये आत्ताच्या आत्ता.


मी संजीवनी आणि परीला घरी घेऊन आलो.


आई: पोरी माफ कर. आमच्या पोरामुळे तुझ्यावर ही वाईट वेळ आली. माझी नातं कुठाय. अग पण तू तरी याच आमच्याकडे. का सगृळा त्रास एकटा सहन केलास ? तुझे आई बाबा कुठे आहेत ?


मी: तिला बाबा नाहीत. आणि तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढलं.


आईने परत एक कानाखाली दिली माझ्या


आई: तुझ्यामुळे या पोरीला हे सगळं भोगावं लागलं. आम्ही तुझ्या आईशी बोलतो. आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देतो. आणि जयेश तुला घर सोडायचं असेल तर जा. माझी सून आणि नातं माझ्यासोबतच राहील.


मी: आईबाबा मला माफ करा.


आईने रडत मला घट्ट मिठी मारली.


आमच्या लग्नाची तयारी सुरु झाली.


संजीवनी: तू घरात खोट का बोललास ?


मी: मला अरे तुरे करायचं नाही. अहो जावो करायचं. आता तू हक्काच्या घरात आहेस.


संजीवनी: का हो तुम्ही असं का केलत. स्वतः वाईटपणा का घेतला ?


मी: मूल कितीही वाईट असली तरी आई वडिलांसाठी गुणीच असतात. ते माझी कोणतीही चूक हसत गिळतात. तू तुझ्या आईसाठी परीला जन्म दिलास आणि मी तुझ्यासाठी ह्या खोट्या गोष्टीला जन्म दिला. या खोट्यामुळे मी कुणाचही नुकसान केल नाही. इतिहासात पण खूप अशा चुकीच्या गोष्टी घडल्यात ज्या झाकण्यात आल्या. मी कोणी देव माणूस नाही. पण चांगल करण्यासाठी थोड वाईट झाल तर काय होतय ?

संजीवनीः मी खूप नशीबवान आहे. तुमच्यासारखा जीवनसाथी मला मिळाला. तुमच कुटुंब पण छान आहे.

मीः तुमच नाही आपल.


काही दिवसानंतर संजीवनीची आई बहीण पण एक झाले.


आमचं लग्न झालं.


सगळे खुश होते.


आता आम्ही दोघे नोकरी करतो.


या जगातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे कि

" जे होत असत ते आपल्या चांगल्यासाठीच होत असत."


................

काही वर्षांनी संजीवनीला डॉक्टरांचा परत फोन आला


डॉक्टर: संजीवनी


संजीवनी: बोला डॉक्टर.


डॉक्टर: खुश खबर. अग त्या दोघांचं परत जुळलंय. आणि त्यांना ते बाळ हवय. त्याबदल्यात ते लगेच १ कोटी द्यायला तयार आहेत.


संजीवनीने डॉक्टरांचा फोन कट केला आणि डॉक्टरांना ब्लॉक केलं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama