AKSHAY KUMBHAR

Drama Tragedy Fantasy

3  

AKSHAY KUMBHAR

Drama Tragedy Fantasy

हॉटेल नंदिनी

हॉटेल नंदिनी

11 mins
219


कॉलेजचे दिवस होते.

शेवटच वर्ष आणि शेवटचा परिक्षेचा पेपर.

पेपरच्या दिवशी सर्वांनी ठरवल होत कि पेपर कसा ही जावो पण आपण काही दिवसानंतर एकत्र फिरायला जायचच.


कारण आत्ता परिक्षेचा निकाल लागल्यावर सगळे नोकरीच्या मागे पळतील मग हे स्वातंत्र्य ही मज्जा परत भेटणार नाही.


पेपर झाला.


आदेश, मी, रवी, सुरज आम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर आलो.

रवी आणि सुरजला पेपर अवघड गेला होता. पण आदेश आणि मला पण ठीक गेला होता.

सगळ्यांनी झालेल्या पेपरचा विषय बाजूला ठेऊन फिरायला कुठ जायच तेच चालू झाल.


सर्वांनी ओळखीची ठिकाणे सांगितली.

कोण बोलल किल्ल्यावर जाऊ, कोण बोलल थंड हवेच्या ठिकाणी कोण बोलल गोव्याला जाऊ.


आदेशः थांबा रे. आपण सर्वजण माझ्या गावी जाऊ.

माझ गाव प्रेक्षणीय स्थळ नाही, माझ्या गावात समुद्र, नदी नाही, पण खूप सुंदर अस निसर्गमय वातावरण, घाट, पवनचक्क्या, डोंगर आहेत.

माझ घर म्हणजे जुना वाडा आहे, तिथे विहीर आहे. खूप मज्जा येल

माझे काका काकी तिथच राहतात जेवणाचा बेत पण जोरात होईल.

मटण, चिकणची पार्टी करु.

जवळच असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगला जाऊ.


सगळेजण हे ऐकून खूप खूश झाले. तिथे जायाला तयार झाले.


सूरजः घसा ओला झाला पाहिजे बाबा. तरच मी येणार.

रवीः मी येणार

आदेशः आकाश तू ?

मीः पिण्याचा कार्यक्रम करणार असाल तर मी येणार नाही. तुम्ही पिला तर तुम्हाला भान राहत नाही.


आदेशः म्हणून तर तुला नेतोय. तु पाहिजेस यार. हे बघ आकाश परत ही मज्जा भेटणार नाही.


सुरजः तु पिऊ पण नकोस पण तू यायच म्हणजे याच.


सगळ्यांनी मला गोड गोड बोलून विनवण्या करुन मला तयार केल.


दिवस ठरला,

संध्याकाळी सगळ्यांनी आदेशच्या घरी भेटायच ठरवल.

आदेश त्याची गाडी काढणार होता.

रवी,सुरज, मी.

असे तिघ जण आदेशच्या घरी पोहचलो

तीन दिवस आम्ही आदेशच्या गावी राहणार आणि फिरणार होतो.


आदेशच गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातल माण तालुक्यातल विरळी नावाच गाव.

आम्ही साताऱ्यावरुन कोरेगाव-म्हसवड मार्गे त्याच्या गावी जाणार होतो. मध्ये गोंदवल्याला रवीच्या घरी जायच होत.


रात्री सर्व सामान गाडीवर बांधायला आम्हाला संध्याकाळचे ७.३० वाजले. नंतर आदेशच्या घरी सर्वांची जेवण झाली.


रात्री ८.३० वाजता आम्ही निघालो.

सगळे खूश मज्जा करायच्या हिशोबाने निघाले होते.

प्रवास सुरु झाला.

मी काही बोलत नाही म्हणून सगळे माझी टिंगल करत माझ्यावर हसत होते.

खर तर

मला सुरजचा राग आला होता कारण सुरजने एक पूर्ण दारुचा बॉक्स आणला होता. तो पितो पितो आणि भांडण करतो, तमाशा करतो, मारामारी करतो सकाळी उठल कि बोलतो मी काय केल.


आम्ही रात्री १२ ला कोरेगाव फाट्यावरुन आत आलो. नवीन झालेल्या रस्त्यावर आदेश गाडी जबरदस्त पळवत होता. अचानक गाडीतून आवाज आला आणि गाडी बंद पडली.

सगळे झोपेतून गाडीच्या आवाजाने उठले.


मीः काय झाल रे आदेश ?


आदेशः थांब बघतो.


रवीः कसला आवाज आला ?


सुरजः कुणाला उडवलस रे ?


आदेश आणि मी गाडीतून उतरलो.

गाडीच बोनेट खोलल तसा धूर यायला लागला.



पूर्ण सुनसान रस्ता. जवळपास साध घर नव्हत का लाईट नव्हती. आदेशने शॉर्टकटने येण्यासाठी चांगला हायवे सोडला होता.

आम्ही हायवेपासून खूप आत होतो.


आम्ही पूरेपूर अडकलो होता.


आजूबाजूला फक्त झाडी, शेतं रस्त्याला एक माणूस नाही का गाडी नाही.


कुणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हत.


आत्ता काय करायच म्हणून सगळ्यांनी गाडीत बसायच ठरवल. तेवढ्यात दोनचाकी गाडीचा आवाज आला. लाईट दिसली.


मी उतरुन हात दाखवला.


तो माणूस थोडा घाबरला आणि पुढे जाऊन थांबला.


माणूसः काय झाल.


मीः अहो काका गाडी बंद पडलीय जवळ कुठ मॕकनिक भेटेल का ?


माणूसः अर इथ कुठ भेटणार मॕकनिक, अस कर पुढ हॉटेल हाय तिथ विचार कुणाला तरी.


मी आणि आदेश त्या काकांसोबत गाडीवरुन हॉटेल कडे निघालो.


त्या काकांनी आम्हाला हॉटेल कडे सोडून निघाले.


हॉटेल नंदिनी

पूर्ण जंगलात एकच अस उनाड हॉटेल.


हॉटेल चकाचक रॉयल वाटत होत. पण रात्रीच कोण दिसत नव्हत.


आम्ही रिसेप्शन ला गेलो. फक्त एक बाई होती. तिच्या साडीवर नावाची एक पाटी पण होती.

तिच नाव होत कमला


कमलाः बोला सर. रुम आहे.


मीः आमची गाडी रस्त्यावर बंद पडलीय. आम्हाला जवळ कुठे मॕकनिक मिळेल का ?


कमलाः सर हे गाव आहे. तुम्हाला इथून १० किलोमीटर वर एक मॕकनिक भेटेला असता.


आदेशः भेटला असता म्हणजे ?


कमलाः तो बेवडा आहे. झोपला असेल. अस करा तुम्ही आज हॉटेलवर राहा. उद्या सकाळी आमचा कामगार येल त्याच्यासोबत त्याला बोलवू.


आदेशः चालेल. किती आहे भाड एका रुमच आम्ही चौघे आहोत.


कमलाः फक्त २०० रुपये.


आदेशः चालेल. पण आमचे मित्र रस्त्यात आहेत. त्यांना कस आणू. फोन करुन बोलवू पण शकत नाही.


कमलाः तिथे माझी स्कुटी आहे. ही घ्या चावी. तुम्ही त्यांना घेऊन या.


आदेशः खूप खूप आभार तुमचे.


मी आदेशला बाजूला घेऊन आलो


मीः आदेश हॉटेल मध्ये कशाला थांबायच ?


आदेशः मग काय रात्र गाडीत काढायची.


मीः मला ही बाई ठीक वाटत नाही.


आदेशः तु गप्प, हॉटेलमध्ये आपण सुरक्षित राहू. तिथ जंगलात रस्त्यावर राहण खूप अवघड आहे. चोर असतात. पैशासाठी मारायला कमी करणार नाहीत. जनावर असू शकतात.


मीः बर.


आदेशः तु इथ थांब मी त्या दोघांना १० मिनटात आणतो.


खरंतर तर ती बाई मला ठीक वाटत नव्हती. तिच बोलण आमच्याकडे बघण. मला गडबड वाटत होती. कोणत्या हायफाय हॉटेलच भाड २०० रु. असू शकेल. एवढ कमी तर शक्यच नाही.


ती बाई मला विचित्रच वाटत होती.

मोकळे सोडलेले केस, डोक्यावर लाल मोठी कुंकूवाची टिकली,घारे डोळे, डोळ्यात काजळ, लाल साडी.

भूत वाटत होती.


मी विचार करत होतो तेवढ्यात ती मागून कोणतरी आल.


कमलाः काय झाल सर ?


मी दचकत


मीः काय नाही.


कमलाः या आपण ते येईपर्यंत नोंदवहीत सर्व नोंद करुन घेऊ.


मी घाबरतच


मीः हो.


मी आणि ती रिसेप्शनवर आलो तिने वही काढली आणि विचारपूस सुरु केली.


सर्व नोंद झाली. तेवढ्यात हे तिघ पण आले.


कमलाः सर तुम्ही जेवणार का ?


आदेशः नाही आम्ही जेवलोय. आम्हांला फक्त रुम द्या.


कमलाः सर तुमच्या दोन रुम बुक केल्यात.


आदेशः अहो दोन नको एकच द्या.


बाईः एका रुम मध्ये चौघांची झोपण्याची सोय होणार नाही.


आदेशः चालेल द्या मग.


कमलाः तुम्ही ड्रिंक करणार आहात का ?


सुरजः हो आमचा स्टॉक आम्ही आणलाय.


कमलाः मग त्यासोबत चकणा काही हवा का ?


रवीः काय काय भेटेल ?


कमलाः चकली, फरसाण, शेंगदाणे. नॉनवेज, चायनीज सुध्दा भेटेल.


सुरजः आदेश एक नंबर काम केलस. मॕडम आम्हाला चकली, शेंगदाणे पाठवा.


रवीः चिकण ६५ भेटेल का ? मॕडम.


कमलाः हो मिळेल सर फक्त थोडा वेळ लागेल.


आदेशः चालेल आम्हाला.


कमलाः ईशा, रोहिणी साहेबांच्या बँगा न्या त्यांना रुम दाखवा.


अस बोलताच दोन शर्ट आणि शॉर्ट घातलेल्या मुली आल्या आणि आदेशच्या हाततली बँग घेऊन पुढे निघाल्या.


हॉटेलमध्ये एकही पुरुष नव्हता सर्व स्रियांच दिसत होत्या. हे जरा विचित्रच होत.


आदेश आणि मी पुढे निघालो.


त्या बाईने सुरजला मागे बोलावल. ती त्याला कायतरी बोलली. पण तिने ती गोष्ट सांगितल्यावर सुरज खूश होत आमच्या जवळ आला.


सुरजः भाईलोग आपने को फ्री बॉडी मसाज मिलने वाला है.

रवी आदेश हे ऐकून खूश होते. पण मला आत्ता अजून संशय याला लागला होता.


गावाच्या सारख्या ठिकाणी एवढ्या सुविधा ते पण कमी पैशात.


आम्ही रुमवर आलो. त्या मुली पण आमच्याकडे हसत वेगळ्या नजरेने बघून गेल्या.



आदेशः आधी पिऊ, मग मसाज घेऊ मग झोपू, आत्ताशी १.३० वाजलेत.


मीः मी झोपतो. मला खूप झोप आलीय.


रवीः तुझ आयुष्य वाया गेल हेच तुला वाटत राहिल. मज्जा करायला शिक. घे जरा एक एक घोट.


मीः नको मला. घ्या तुम्ही.


मी फ्रेश होऊन एका रुममध्ये झोपलो. हे दुसऱ्या रुम मध्ये प्यायला बसले.


मला गाढ झोप लागली होती.


अचानक मला जाग आली. हातातल घड्याळ बघितल तर ३ वाजले होते. यांचा कुणाचा आवाज येत नव्हता.


मी उठून दुसऱ्या रुम कडे गेलो.

तर तिथ फक्त दारुच्या संपलेल्या बाटल्या, मोकळे, अर्धे दारुचे भरलेले ग्लास. तिथ या तिघांपैकी कोणीही नव्हत.


मी त्यांना आजूबाजूला शोधल. तर कुठेच कोणी दिसल नाही.


हॉटेल पूर्ण शांत होत.

मी डोळे चोळत चोळत रिसेप्शनला गेलो तिथ पण कोण नव्हत.


फोन करायचा म्हणल तर मोबाईल नेटवर्क नव्हत.


काय कराव, कुठ शोधाव सुचत नव्हत.

हॉटेलच्या आजूबाजूला शोधाव म्हणून मी हॉटेलच्या मागे पाहिले. तिथ एक दरवाजा दिसला.

तिथे जातोच


तोच

पायाखालची जमीन सरकली.

एका सेंकदात घामाघूम झालो.

समोरच चित्र बघून चक्कर आल्यासारख झाल.


तीन बायका रक्ताने माखलेल्या रवीला नेत होते.

त्याला प्लास्टिक पिशवीत गुंडाळला होता.

मला त्याच्या हाततल्या ब्रेसलेट मुळे कळल तो रवी होता.

पूर्ण पिशवी रक्ताने भरली होती.

तो रवीच आहे का ते कळत नव्हत.

रवी निपचित होता काहीच हालचाल नव्हती.

यावरुन कळल रवीला मारलय.


एक बाईः सुनंदा एका बकऱ्याला हलाल केलाय. खड्डा खणून ठेवलाय. या साल्याला टाका खड्ड्यात अजून तीन बकरे लवकरच कापून येतील. आटपा लवकर.



तीच ते शब्द ऐकून आपले मित्र आणि मी संकटात सापडलोय याची जाणीव झाली.


तीन बायका पुढ गेल्यावर हळूच मी त्या दरवाजाकड धावलो. एक वाट तळघरात गेली होती.

तळघराकड पाहिल तर रक्ताचे टिपके दिसले.

मी सगळीकडे बघत बघत पुढ सरकलो.

त्या रक्ताच्या टिपके बघत मी एका खोलीसमोर आलो.


पाहतो तर काय

समोरच दृश्य इतक भयानक होत कि मला काय कराव सुचत नव्हत.


आदेश आणि सुरजला लाकडी खांबाना बांधल होत. दुसर कोणी नव्हत.

त्यांची तोंड ओठांतून दोरे ओवून शिवली होती.

हात, पाय काटेरी तारांनी बांधले होते.

बिचाऱ्याचे डोळे लाल होऊन अश्रुने भरले होते.

हातावर खिळे ठोकून ते त्या लाकडी खांबात रुतवले होते.


इतक हिंसक चित्र मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल होत.


मला बघून ते इशारे करु लागले.


तिथ समोर सगळी हत्यार ठेवली होती.

मी तिथली पक्कड घेऊन खिळे काढण्याचा प्रयत्न करु लागलो तोच बायकांचा हसण्याचा आवाज आला.

मी घाबरलो. एक कोपऱ्यातला खिडकीचा पडदा बघून पडद्या मागे लपलो.


पहिली बाई आली ती रिसेप्शनिस्ट होती


कमलाः एक संपला. आत्ता ही दोघ.

दुसरी बाईः मॕडम चौथा बोकड कधी कापायचा.


कमलाः सुनंदा घाई नको करु आधी ह्यांना तडपवायच. मग चौथ्याला मारायला जास्त मज्जा येल.


सुनंदाः रेखा त्या पहिल्याच ब्रेसलेट, चैन काढलीस का सोन्याची होती ती.


रेखाः काढली ग. सोन सुटत का माझ्या डोळ्यात. शेवटच्या वेळी एकाचा गाल फाडून सोन्याचा दात तोडला होता.


कमलाः खिदळू नका जास्त. या कीड्यांना मारायच आहे अजून.


मला सगळ ऐकून या खतरनाक बायका असून यांनी खूप जणांना मारलय याची जाणीव झाली.


पण ह्या अस का करतायत

पैशासाठी ?का अजून कशासाठी

हेच कळत नव्हत.


रेखाः मॕडम तोंड शिवलीत, हातात खिळे मारलेत. आत्ता पुढ काय ?


कमलाः व्वा. दोघांना त्या खिळ्यांच्या धोपटण्याने बडवा. जरा अंगावर लाल रंग येऊ द्या.


तिने हुकुम देताच सुनंदा, रेखाने दोघांना त्या खिळ्यांच्या धोपडण्याने मारायला सुरवात केली.


कमलाः बस्स. लगेच मारुन टाकू नका.


माझ्यासमोर सगळ चालु होत आणि डरपोक सारखा बघत होतो.


एका क्षणातच सुरज आणि आदेश रक्ताने माखले गेले. तोंड शिवल्यामुळे त्यांना ओरडता पण येत नव्हते.


कमलाः दोघांची हाताची पायाची बोट कटरने तोडा.


दोघी हसत हसत बोट तोडायला लागली.


रेखाः मॕडम हा मेला.


कमलाः काय. असा कसा मेला. पाणी मार उठव. अजून तडपायच आहे. एवढ सोप मरण नाही.


रेखाः मेलाय.


सुरजला ही क्रुर वेदना सहन झाली नाही त्याने जीव सोडला.



तिघी हसायला लागल्या.


रेखाः मॕडम तुम्हाला पाप लागणार त्याची शेवटची इच्छा नाही विचारली तुम्ही.


कमलाः हो कि. अरेरे. याला विचारा. मरायच्या आधी. तोंड उसवा त्याच.


सुनंदा पुढे आली आणि आदेशच्या ओठांचा दोरा जोरात ओढला. आदेश चे सुजलेले ओठ फाटले.


तो जीवाच्या आकांताने किंचाळला, पण त्याला ओरडता पण येत नव्हत.


कमलाः किंचाळू नको, तुझ्या मदतीला कोण येणार नाही इथ आपल्याशिवाय कोण नाही.

तुझी शेवटची इच्छा बोल.


आदेशला बोलताच येत नव्हत तो काय बोलणार.


आदेशः का? का? का?


कमलाः ओके तुझी शेवटची इच्छा ही आहे कि तुला अस का मारतोय


रेखा, सुनंदा हसायला लागल्या.


सुनंदाः सांगा मॕडम आपला भुतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ.


कमलाः तू मरणार आहेस कारण तू पुरुष आहेस.

पुरुष या धरतीवरचा कचरा, घाण आहे जी आम्ही साफ करतोय.

तु जर स्री असतास तर वाचला असतास पण तु पुरुष आहेस.

ज्याची या जगात गरज नाही.

या जगात पुरुषाने जन्म घेऊन काय केलय

लोकसंख्या वाढवली,

बलात्कार केले,

ॲसिड हल्ले केले,

स्रीयांचा मानसिक शारीरिक छळ केला,

शक्तीचा वापर करुन स्रीला मनस्ताप दिला,

आई बापाला रस्त्यावर आणल

प्रत्येक स्रीला वाईट नजरेने बघून बघून डोळ्यांनी विनयभंग केला,

स्रीला भोगायची वस्तू बनवली.

स्रीयांनी पोर सांभाळायची, घर बघायची, मोठयांची काळजी घ्याची आणि पुरुषांनी बाहेर जाणून घाण खायची,

काही कमी पडल कि स्वतः किती श्रेष्ठ आणि स्रिया किती नीच हेच दाखवायच.


कॉलेजच्या पोरांना मिशा नाही फुटल्या तर बाजारात जाऊन स्रियांना विकत घ्यायच.


स्रियांचा बाजार खोलून त्याच शोषण करणारे पुरुष.


अशा सर्व पुरुषांना आम्ही संपवणार.



इथ फक्त स्रियाच राहतील.

जे पुरुष स्रीपुढे झुकून राहतील तेच जगतील.

आत्तापर्यत २०० च्या वर पुरुष आम्ही संपवलेत.


त्यांना एवढ्या क्रुरतेने मारल कि परत पुरुष म्हणून जन्मच घेणार नाहीत.


भविष्यात हॉटेल नंदिनीच्या शाखा उघणार

पहिल प्रत्येक तालुक्यात

नंतर प्रत्येक जिल्ह्यात

नंतर प्रत्येक राज्यात

नंतर प्रत्येक देशात

नंतर प्रत्येक खंडात


सगळीकडे पसरुन पुरुषांना क्रुर मरण देणार.

त्याचे लाईव्ह विडि ओ बनवणार.


प्रत्येक क्षणाला तुम्हांला वाटल पाहिजे का पुरुष झालो.

पुरुषांची संख्या जास्त याच गोष्टीचा घमंड आहे. तो आम्ही तोडणार


भविष्यात

स्रीप्रधान देश असणार

राष्ट्रपती, पंतप्रधान, आमदार, खासदार, नगरसेवक स्रियांच असणार.


सैन्यात फक्त स्रियांच असणार.


पुरुषांनी देश चालवून देशाची वाट लावली, भ्रष्टाचार, अधोगती कडे देश नेला.

आम्ही जगाला शिकवू स्रिपेक्षा श्रेष्ठ कोण नाही.

स्रिला रस्त्यात बघून प्रत्येक पुरुषाची नजर झुकली पाहिजे.

अभ्यासात हुशार असून स्रियांना दुय्यम स्थान भेटत


कळल का ?


तु विचार कर. तु कसा तडपणार आहेस ते.


सुनंदा...


सुनंदाः बोला मॕडम


कमलाः भाषण संपल.

या पुरुषाला क्रुर शिक्षा मिळालीच पाहिजे.


ज्या वाईट नजरेने हा स्रीयांकडे बघतो त्याच्या डोळ्यात ॲसिड टाकून याचे डोळे फोडा.


ज्या वाईट विचाराने हा स्रिला स्पर्श करेल त्या हाताचे तुकडे करा.


ज्या जीभेचा वापर याने स्रिला फसवण्यासाठी केलाय त्या जीभेवर जळता कोळसा टाका.


आणि


शेवटच एकच वस्तु जी पुरुषाला पुरुष बनवायला मदत करते,

बलात्कार करायला प्रोत्साहन देते ती वस्तू कापा.


वेदना इतव्या वाईट आसल्या पाहिजेत कि शरीर कापत राहिल पाहिजे.


पुरुष संपवा


मॕडमच्या हुकूम सुनंदा आणि रेखाने अमंलात आणताच आदेशने जीव सोडला.


कमलाः कसे लगेच मरतात हे पुरुष.

     रेखा...


रेखाः बोला मॕडम


कमलाः दोघांच्या मुंडी हतोड्याने तोडा. दोघांच्या पूर्ण शरीराचे बारीक तुकडे करायचे आणि आपण पाळलेल्या गिधाडांना टाका.


मी निपचित उभा राहून ते क्रुर दृश्य पाहिल खूप रडलो पण मी काहीच करु शकलो नाही. कारण त्या तिघी नव्हत्या दहा पेक्षा जास्त होत्या.


तळघरात मी घुसलेली खोली सोडून तीन चार अजून खोल्या होत्या.


काय कराव काहीच सुचत नव्हत.


माझ्यासमोर आदेश आणि सुरजचे तुकडे तुकडे झाले. ते सगळे तुकडे मोठया प्लास्टिक च्या पिशवीत भरुन सुनंदा, रेखा घेऊन गेल्या.


तेवढ्यात बाहेरुन एक बाई धावत आली.


ती बाईः मॕडम तो चौथा माणूस रुमवर नाहीय.


कमला ओरडून म्हणाली

कमलाः तो माणूस नाही तो पुरुष आहे. माणस चांगली असतात. घाबरु नका आपला भाग सोडून तो कुठच पळू शकत नाही. रसिका तु गाडी घेऊन रस्ते शोध. माझ्या तावडीतून कोणता पुरुष वाचूच शकत नाही.


सगळे गेले मॕडम एकटीच तिथ होती. मॕडम मोबाईल बघायला लागल्या.


मी धाडस करुन हळू हळू पुढ सरकलो.


कमलाः ये तू.


ती काय बोलणारच तोच मी समोरच खिळ्यांच धोपाटण उचलून मी तिच्या कानावर मारल.

ती बाजूला पडली. मी ते तसच हातात घेऊन पुढ जातोय तोच.


रेखा समोर आली तिलाही मी पाठीत मारल ती ओरडत खाली कोसळली तिचा आवाज सुनंदाला गेला त्यामुळे ती सावध झाली.


तिच्याकडे असलेली बंदुक तीने बाहेर काढली आणि माझ्या दिशेने चालवली मी वाचण्याचा प्रयत्न केला पण गोळी हाताला चाटून गेली.

परत गोळी चालवणार तोच ते धोपटण पूर्ण शक्तीने मी सुनंदाच्या डोक्यात मारल. ती तशीच खाली पडली.


गोळीचा आवाज ऐकून सर्व बायका बाहेर हातात हत्यार घेऊन माझ्यादिशेने ओरडत पळायला लागल्या.


मी मागच्या दरवाजाने बाहेर पडलो, पळत पळत पुढे रिसेप्शन पर्यत आलो. तिथ अडकवलेली स्कुटीची चावी घेतली आणि स्कुटीकडे पळालो, गाडी चालू करुन मी निघतोय तोच दोन तीन गोळ्या समोरुन झाडल्या गेल्या,

गाडीची हेडलाईट फुटली, एक आरसा फुटून माझ्या हातात काच घुसली.


पण मी भानावर नव्हतो. जीवाच्या आकांताने परत साताऱ्याच्या दिशेने निघालो 


पुढच काहीच दिसत नव्हत. तेव्हा चंद्राच्या प्रकाशावर अंदाजे गाडी चालवून मी हायवेला लागलो. लगेच गाडी बाजूला झाडीत घुसावली.

तिथच लपून बसलो.


मागून दोन चारचाकी गाड्या माझा पाठलग करत होत्या. एक गाडी साताऱ्याच्या दिशेने तर एक म्हसवडच्या दिशेने गेल्या.


दोन्ही गाड्या गेल्यावर मी हायवेवर आलो. एक ट्रक आला. तो मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्याला विनंती करुन मी ट्रकात बसलो.


घडलेल्या प्रसंगाने आणि जखमांनी

तिथेच मी बेशुध्द पडलो.


आणि मी जेव्हा उठलो तेव्हा मी त्याच हॉटेलच्या रुमवर होतो.


समोर सर्व बायका हसत होत्या.


सुनंदाः याला कस मारायच मॕडम.


कमलाः ह्याने आपल्याला लय पळवल त्याची शिक्षा तर दिली पाहिजे. हातापायावर ॲसिड ओता.


माझ्या हातावर ॲसिड वतल

माझा हात जळजळू लागला.

मी हात झटकत ओरडून दरवाजाकडे पळायला लागलो.


तर मागे हसाण्याचे आवाज आले.

पाहतो तर काय

मागे आदेश, रवी, सुरज


आदेशः झोपेत कुठे पळतोयस ?


मी घामाने पूर्ण भिजलो होता.


रवीः चहा गरम होती का रे ?


सुरज, रवी, आदेश समोरुन हसायला लागले.


ते ॲसिड नव्हत तर रवीने माझ्या हातावर गरम चहा ओतला होता.


सुरजः अंथरुणातच अंघोळ केली वाटत ?


सगळे हसायला लागले.


म्हणजे ते सगळ स्वप्न होत.


स्वतःला सांभाळून मी खाली बसलो आणि हसायला लागलो

मी स्वतःला मनात विचारल


तेच स्रीया एवढ्या क्रुर असू शकत नाही आणि ते होण्याआधी आपण सर्व स्रियांचा आदर करण

घरातल्या स्रियांना मदत करण शिकल पाहिजे.


या जगात स्रीया आणि पुरुष दोघांपैकी कोणीच श्रेष्ठ नाही


दोघ समान आहेत.


जिथ स्री कमी तिथे पुरुष असतो,

जिथ पुरुष कमी पडतो तिथ स्री असते.

दोघांची एकमेकांना गरज होती, आहे, असेल.


आपल्या प्रत्येकात काहीतरी कमी असते हे कधीच न विसरता समोरचा आहे तसच त्याला स्वीकारण शिकल पाहिजे.


आपल्या समाजात स्रियांना खूप कमी लेखल जात.

अजूनही गाव पातळीवर शिकून काय करणार मुली हीच गोष्ट समजून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल जात.


पण एक गोष्ट कधीच विसरली न पाहिजे ती म्हणजे एक स्री पुढची पिढी घडवते.

तीला शिक्षित, सक्षम करुन तीचा आदर करण तिला आधार देण यातच खरा पुरुषार्थ आहे.


सर्व पुरुषांनौ स्रीयांचा आदर करायला शिका नाहीतर माझ स्वप्न नक्कीच खर होईल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama