AKSHAY KUMBHAR

Horror Fantasy Thriller

3  

AKSHAY KUMBHAR

Horror Fantasy Thriller

माळरान - ७ खून १ रहस्य

माळरान - ७ खून १ रहस्य

10 mins
157


अक्षरः आजोबा. आज माझा २५ वा वाढदिवस

मीः हो बाळा. बोल तुला काय भेटवस्तू पाहिजे.

अक्षरः आजोबा तुम्ही न मागता मला सगळ दिल पण एक गोष्ट नाही दिली

मीः कोणती रे ?

अक्षरः माझ्या प्रश्नाच उत्तर.

मीः काही प्रश्न न विचारलेलेच चांगले असतात बेटा.

अक्षरः आजोबा प्लीज. आता मी मोठा झालोय. कुणालाच काही माहित नाही. तुम्हाला सगळ काही माहित असून तुम्ही सांगत नाही. प्लीज सांगा ना माझ्या आईबाबांबद्दल. प्रत्येक मुलाला आईबद्दल माहिती असल पाहिजे. माझी आई बाबा जन्म देऊन अपघातात वारले एवढच तुम्ही मला आजपर्यंत सांगितलय.

पण हे अस कस झाल ? का झाल ? हे तुम्ही मला सांगण दरवेळी टाळलय.

मीः काही सांगण्यासारख नाहीच रे बाळा.


मी विषय टाळून स्वतःच्या कामात गुंतलो.

अक्षर रडत रडत त्याच्या खोलीत गेला.


कल्पनाः तुम्ही सांगत का नाही त्याला सगळ.

मीः आई हा खूप चांगला शब्द आहे. याच्या आईने त्या शब्दाला काळींबा लावलाय.

आई या पवित्र शब्दाची व्याख्या बदलून ठेवली. ते सत्य आजपण जाणवल तरी माझ्या अंगावर काटा येतो. त्याने ऐकल तर काय होईल ?

त्याला सगळ कळेल. तो आपल्यापासून दुरावेल.


कल्पनाः सत्य आपल्या माणसाकडून कळल तर चांगल असत पण दुसऱ्यांकडून चुकीच कळल तर भयंकर असत. तुम्ही त्याला विश्वासात घेऊन सगळ सांगा आज.


मीः बरं. तु बोलतेस ते पण बरोबर आहे.


मी अक्षरच्या खोलीकडे त्याला सगळ सांगायला निघालो.

अक्षरचा दरवाजा उघडाच होता.

आत पूर्ण अंधार होता.

मी लाईट लावली आणि जे पाहिल ते विचित्रच होत.


अक्षर ने मेणबत्ती लावून आजूबाजूला हळदी कुंकूवाचे लिंबू ठेवून स्वतःच बोट कापून, तो हात मेणबत्तीवर ठेवला होता. आणि तो कसले तरी मंत्र बडबडत होता.


मी धावत गेलो. सगळ विसकटल. आणि अक्षरच्या कानाखाली मारली


मीः काय करतोयस हे ?

अक्षर रडत रडत

अक्षरः आईबाबांचा आत्मा बोलवतोय.


मी त्याला मिठीत घेतल. अजून तो जोरात रडायला लागला.


मीः हे बघ बाळा. मी तुला सगळ सांगतो. पण तु मला वचन दे तू अस कधी काय करणार नाहीस.


अक्षरः मला माफ करा आजोबा. मला आई बाबांची खूप आठवण येते. मी हे एका चित्रपटात बघून करत होतो. मी वचन देतो कि अस कधी करणार नाही.


मीः शांत हो. डोळे पुस. बस इथे.


आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात त्यावर आपला विश्वास बसत नाही. खरचं अस असू शकत का ?

पण

निसर्गाला आपण कधीही डावलू शकत नाही.

निसर्गाचा नियमच आहे,

जिथे डोंगर आहे तिथे बाजूला मोठा खड्डा असणारच

जिथे दिवस आहे तिथे रात्र ही असणारच

जिथे सकारात्मक अशी ईश्वरीय शक्ती आहे तिथे नकारात्मक अशी राक्षसीय उर्जा असणारच.


मला या गोष्टीवर कधीच विश्वास नव्हता कारण कधीही अशा नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला नव्हता. त्यात मी माझ्या खूप जवळची माणस गमावलीय.

आजपण ती रात्र आठवली तरी अंगावर शहारे येतात.


खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा तुझा जन्म पण झाला नव्हता.


मी या जगातला सर्वात सुखी माणूस अस मला वाटत होत पण प्रत्येकाला आपआपल्या आयुष्यात पूर्ण अस कधीच मिळत नाही.

माझ्याकडे माझ हसर एकत्र कुंटुंब होत.

माझ्याकडे चांगल्या पैशाची नोकरी होती.

पैसा, घर सोन कशाची कमी नव्हती.


अर्जुन आणि आशाच लग्न होऊन दोन वर्षे झाली खूप प्रयत्न करुन सुध्दा त्यांना मूलबाळ होत नव्हत.

डॉक्टरांच्या सर्व चाचण्या झाल्या होत्या. दोघांमध्ये कोणताही दोष नव्हता. दोघेही बाळाच्या सुखःसाठी आतुरलेले होते.

सर्व प्रकारचे सर्व उपाय झाले होते. पण कोणताही गुण येत नव्हत.


अशा परिस्थितीत दोघांच्या चेहऱ्यावर कधी निराशा नव्हती.

एका दिवशी

आशाला माहेरहून फोन आला आणि ती दोन दिवसासाठी जाऊन आली.


पण

आशा माहेरहून आल्यापासून अस्वस्थ असायची. तिच्या वागण्यात, बोलण्यात खूप बदल झाले होते.

आम्ही सर्वांनी तिला खूप समजावून घेतल.


असेच दिवस चालले होते.


एक दिवस अचानक एक गोड बातमी आली

आणि

काही महिन्यातच

एक सुंदर अशी मुलगी अर्जुनाच्या हातात होती.

आशा आणि अर्जुन खूप खूष होते. पण घरात आम्ही थोडे नाराजच होतो.

कारण

अर्जुनला मुलगा व्हायला पाहिजे होता अस आम्हाला वाटत होत.

एवढे दिवस वाट पाहून मुलगी झाली.


पहिली मुलगी साक्षात स्वर्गाची अप्सराच होती.

तिच्याकडे बघून आमची नाराजी पळूनच गेली.

अर्जुन आणि आशा खूप खूष होते.

मुलीच बारस घालायचा दिवस उजेडला.

मी आनंदात बारशाच्या खरेदीसाठी बाजारात गेलो होतो. आणि मला अर्जुनचा फोन आला.


मीः बोल अजू. काय आणायच आहे का?

अर्जुन रडत बोलला

अर्जुनः बाबा तुम्ही सगळ सोडून घरी या लवकर.


मी घाबरत घरी पोहचलो.

घरात आशाची रडारड चालू होती, घरात सगळीकडे शोधाशोध चालू होती. अर्जुनची मुलगी घरातून गायब होती. आम्ही सर्वांनी खूप शोधाशोध केली पण काहीच ठावठिकाणा लागला नाही.

पोलीसामध्ये तक्रार केली. तपास सुरु झाला.


दिवसांवर दिवस गेले

आठवडे गेले

महिने गेले तरी बाळाचा काहीच तपास लागला नाही.


एकाच क्षणात मिळालेल्या सुखाःवर दडपण आल होत.

आम्ही हळू हळू या वाईट दुखःतून बाहेर आलो.

वर्ष सरतय तोच

परत ईश्वराने सुखाःची बातमी दिली.

आशाला दिवस गेले होते.

घरात परत आनंद शिरु लागला होता.

काही महिन्यातच

आशाला परत एक गोड मुलगी झाली. सगळे खूश होते.

पण तोच प्रसंग परत ओढावला.

दुसऱ्या महिन्यातच मुलगी घरातून गायब झाली होती.

आत्ता तर अर्जुनचा संशय पूर्णपणे आमच्यावर होता.

परत तो पोलीस तपास

आणि मूल नसल्याची भावना

या मानसिक त्रासातून अर्जुन आणि आशा दिवस काढत होते.

अर्जुन दररोज पोलीस स्टेशनचे फेरे मारत होता.

तो घरात कुणाशीच नीट बोलत नव्हता

घरात सारखी भांडण करत होता.

आमच्यावर आरोपांचा पाऊस पाडत होता.

त्याला घरात यावस वाटत नव्हत.

काही दिवसांनी

अर्जुनने घर सोडायचा निर्णय घेतला.

आमची इच्छा नसताना

तालुक्यातच अर्जुन आणि आशा भाड्याच्या घरात राहू लागले.

तो दोन्ही मुलींच्या तपासाची माहिती घ्यायला गावी येत होतो.

माझाशी बोलत नव्हता फक्त त्याच्या आईला भेटून पाहुण्यासारखा निघून जात होता.

मुलाची असलेली आमची भूक यामुळे दोन मुलींच्या हरवण्याच कारण आम्हीच आहोत असच अर्जुनला वाटू लागल होत.

आम्ही अर्जुनला घरी खूप बोलावायचो पण घरी आला नाही.

दिवस जाऊ लागले.

महिने वाहू लागले.

आशातच

आशाने परत एक गोड बातमी दिली.

आशाची गोड बातमी ऐकून अर्जुन खूष झाला पण मनात होती ती भिती होतीच.

आशाने माहेरी जायच ठरवल होत.

कारण जे माझ्या दोन्ही मुलींबद्दल झाल ते तिसऱ्या बाळबाबत होऊ नये हेच तिला वाटत होत.

अर्जुनपण अॉफिसच्या कामात बाहेर जाणार मग आशाकडे कोण लक्ष देणार.

अर्जुनने आशाच्या होकारात होकार देऊन

आशाला माहेरी पाठवल

अर्जुन एकटा पडला होतो पण पर्याय नव्हता.

मूल होईपर्यत अर्जुनच्या मनावर खूप ओझ होत.

तो दररोज न चुकता आशाशी बोलण करत होतो.

आशाची खूप काळजी वाटत होती पण आशा माहेरी सुरक्षित आहे. अस अर्जुनला वाटत होत.

अर्जुनला अॉफिसाच्या कामासाठी औरंगाबादला जाव लागत होत.


काही महिने गेले.


एक दिवस मला अर्जुनचा मला फोन आला.

अर्जुनः बाबा मी बाप झालोय मला मुलगा झालाय.

मीः अरे वा अभिनंदन. आशा कशी आहे ?

अर्जुनः दोघेही सुरक्षित आहेत. डिलीव्हरी घरीच सासुबाईंनी केली.

मीः काय ? मला कोणीच काही बोलल नाही. आम्ही उद्या येतो भेटायला.

अर्जुनः बर बर. आईला पण आणा.

मीः हो. काळजी घ्या.


आम्ही पण बाळाला पाहण्यासाठी आतुर झालो होतो.

आजचा दिवस कसा संपेल अस झाल होत.


बाळाच्या आठवणीत आम्ही दोघ वेळ ढकलत होतो.

रात्री जेवून आम्ही गाढ झोपलो.

रात्री ११ वाजता माझा फोन वाजला.


मीः बोला.

अर्जुन घाबरत.

अर्जुनः बाबा तुम्ही इकडे या. आपल्याला फसवलय. आपल्या पोरी जीवंत आहेत. तुम्ही आत्ता निघा. माळरानावर भेटा.

आणि

अर्जुनची जोरात किंकाळी आली, मी काही बोलाताच फोन कट झाला.

मी परत फोन केला फोन पण लागत नव्हता.

आशाचा फोन स्वीच अॉफ झाला होता.

आम्ही घाबारलो माळरानात का बोलावल असेल अर्जुनने याच प्रश्नात आम्ही गुंतलो.

मी आशाच्या घरात सर्वांना फोन लावले सर्वांचे फोन बंद होते.

काही तरी गडबड झाली होती.

मी कल्पनाला काही न बोलताच बँग पँक केली.

तिने विचारपूस केली. पण मी सांगितल जवळचा मित्र वारलाय मी उद्यापर्यत येतो.

कार मधून बसून निघालो,

आशाच घर आपल्या घरापासून ३ तासाच्या अंतरावर होत.

रात्रीचे १२ वाजले होते.

कल्पना जाऊन देत नव्हतीच. पण मी तिच काही ऐकल नाही.

भयानक अशी ती काळी रात्र होती.

जोरात पाऊस पडत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता.

कुत्रे जोर जोरात रडत होते.

अमावस्येमुळे चंद्र लपून होता.

जोरादार अशी हवा सुटली होती.

कडकडीत अशी थंडी वाजत होती.

भीतीने अंग थरथरत होते.

मनात अनेक प्रश्न घर करुन होते.

माझ्या मुलाला काय झाल नसेल ना ?

माझ्या दोन्ही नाती भेटतील का ?

आपल्याला कोणी फसवलय ?

मी लवकर जाता याव म्हणून एका शॉर्टकटमध्ये घुसलो.

आणि

अचानक गाडीपुढे काय तरी आल आणि पावसामुळे मला ते दिसल नाही,

मी दचकलो.

कार बंद पडली. पुढच काहीच दिसत नव्हत.

काचेवर रक्त उडल होत आणि आर्धी मांजर गाडीच्या काचेवर तडपडत होती.

मी कार मधून बाहेर पडलो.

कसाबसा स्वतःला सावरल.

त्या मांजरीच्या पायाला पकडून बाजूला फेकल. पावसामुळे काच साफ झाली.

मी ते रक्त बघूनच घामाघूम झालो होतो.

तसाच गाडीत बसून मी पुढे निघालो.

रस्त्याला कोणी नव्हत.

आजूबाजूला फक्त उजाड अशी जमीनच होती.

पाऊस थांबला होता.

रातकिड्याचा आवाज वाढू लागला होता.

आयुष्यात अस कधी झाल नव्हत.

मी आशाच्या घरी ३.३० ला पोहचलो.

दरवाजा वाजवला कोणी उघडत नव्हत.

काहीतरी अघटीत झाल्यासारख वाटत होत. मी तिथून हालणार तोच आतून आवाज आला.

कोणीतरी आत होत.

मी खिडकी ढकलून पाहिल तर अंधारात कोणतरी तळमळत होत.

मी मागच्या दरवाज्यावर जोरात लाथ मारली.

तसा दरवाजाची आतली कडी निघाली.

आत सगळीकडे अंधार होता.

मी पुढे गेलो आणि लाईटची बटण दाबून लाईट लावली.

पाहिल तर अर्जुनचे हात पाय तोंड बांधले होते.

मीः काय झाल अर्जुन ? तुला कोणी बांधल ?

अर्जुनः माझी बायको येडी झालीय. ती तिन्ही पोरांचा आज बळी देणार आहे.

मीः काय?

अर्जुनः तुही प्रश्न विचारत बसू नको मी माळरानात जातो. तुम्ही गावतल्या पोलीस चौकीत जाऊन पोलीसांना आणा.

बाबाः नको.

अर्जुनः ऐका बाबा. सासरची सगळी माणस यात सामील आहेत. आपली मदत फक्त इथले पोलीसच करतील.

मीः सांभाळून जा.

मी पोलीस स्टेशनला पोहचून विनवण्या करुन पोलीसांना घेऊन माळरानात पोहचलो.


अर्जुनचे सासूसासरे, मेव्हणा त्याची बायको, आशा आणि एक मांत्रिकबुवा.

एक मोठ अग्नीकुंड करुन बसले होते.

लिंबाच रिंगण घातल होत.

मोठमोठ्याने मांत्रिकाचा मंत्रजप चालू होता.

दुसरीकडे लक्ष जाताच माझ्या पायाखालची जमीन सरकली.


अर्जुनच धड बिनामुंडीच रक्ताच्या थारोळ्यात पडल होत

पोलीस ओरडताच

आमच्या समोर आशाने माझ्या दोन्ही नातींना अग्नी कुंडात जीवंत फेकल. आणि नातवाला फेकणार तोच पोलीसांनी सर्वांना पकडल.

दोन्ही पोरींना बाहेर काढेपर्यत १००% भाजल्या होत्या.

लहान पोरींची जळलेली प्रेत, अर्जुनच उघड्या डोळ्याची मुंडी

ते विखूरलेल रक्त, अस भयंकर वातारण बघून मी चक्कर येऊन पडलो.



मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो.

समोर पोलीस उभे होते.

मी रडायला लागलो. मी ते विचित्र चित्र आठवून घाबरलो होतो.

पोलीसः तुम्ही शांत व्हा.

मी अजून जोर जोरात रडायला लागलो.

मीः साहेब काय झाल हे. माझ्या समोर सगळ झाल आणि मी काहीच करु शकलो नाही.

त्यांनी एक लहान गोंडस मूल माझ्या हातात दिल. आणि मला घरी पाठवल.


घरी आल्यावर मी कल्पनाला सर्व सांगितल तिला मोठा धक्का बसला. पण मला पण जास्त काही माहिती नव्हती.


पोराच्या अशा जाण्याने कल्पना कोमात गेली.

पोलीसांनी काही दिवसांनी अर्जुनच प्रेत आम्हाला दिल.


मी सर्व अंतिम संस्कार केले.


हळू हळू आम्ही सगळ विसरुन तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित केल.


परत एक दिवस पोलीस आले. आणि आमची पूर्ण चर्चा त्या विषयावर परत चालू झाली.


पोलीसः हे खूप मोठ प्रकरण होत. म्हणून तपासाला वेळ लागला.


मीः म्हणजे ?


पोलीसः तुम्ही स्वतःला सांभाळा. शांत व्हा. मी सर्व सविस्तर माहिती सांगतो.


तुमच्या मुलाचे सासरे कैलासरावांची मी चौकशी केल्यावर


आम्ही त्या माळरानाच खोदकाम केल.

तेव्हा आम्हांला चार स्रीयांचे सांगाडे सापडले.

त्यातल्या तीन गर्भवती स्रीयांची गळा चिरुन हत्या झाली होती.

आणि

एका स्रीच्या डोक्यात धारदार हत्यार मारल होत. आम्ही सर्व चौकशी केल्यानंतर भरपूर गोष्टी उघड झाल्या.


कैलासरावांचे वडील दत्ताजी हे काळ्या जादूचे अभ्यासक होते.

ते कार्ला नावाच्या एका देवीची पूजा करायचे.

त्यांना काळ्या जादूत सर्वशक्तीमान बनायच होत म्हणून त्यांनी स्वतःलाच अग्नीत विलीन केल.

ते गेल्यानंतर त्यांनी लिहलेल्या संग्रहात माळरानात तीन सोन्याने भरलेली गाडगी आहेत आणि ती कैलासला भेटावी अशी त्यांची इच्छा होती.

पण ती मिळवण्यासाठी कार्लादेवीला त्यांच्या तीन परतुंडाचा अग्नीत बळी द्यावा लागेल अस लिहल होत.

ह्या नरबळीनंतर पूर्ण कुटुंबावर कार्लादेवीची कृपादृष्टी होईल

धनलाभ होईल आणि काळ्या जादूने पूर्ण कुटुंबाच समाजात वर्चस्व वाढेल.

कैलासरावांना दोन मुली आणि एक मुलगा.

मूल मोठी झाल्यावर त्यांनी त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी प्रयत्न सुरु केले.

कारण तीन नातूंचा बळी देवून त्यांना श्रीमंतीची भूक लागली होती.

तीन्ही मुलांनी कैलासरावांना एक एक बाळ द्याच ठरवल होत. गरीबीतल्या संकटांनी ते कंटाळले होते.

त्यांच्या कुटुंबाच्या वागणुकीमुळे कोणीही गावात त्यांचाशी नीट बोलत नव्हत, त्यांचा आदर करत नव्हत.

कैलासरावांची मोठी मुलगी निशा प्रेमविवाह करुन पहिलीच घरातून पळून गेली. तिला खूप शोधली पण ती सापडली नाही.

कैलासरावांचा मुलगा विलासच लग्न झाल पण त्याला मूल बाळ होत नव्हत, विलासमध्ये दोष होता.


नंतर

आशाच अर्जुनशी लग्न झाल पण तिलाही मूलबाळ होत नव्हत.

घरात पूर्ण निराशा पसरली होती.


या सर्व गोष्टीमुळे कैलासराव नाराज होते.

नंतर त्यांनी कार्लादेवीची पूजा करणाऱ्या एका मांत्रिकाला शोधल.

त्याला सर्व अडचणी सांगितल्या.

कार्लादेवी तुमच्या घरावर नाराज झाली आहे. तिला खूश करण्यासाठी तीन गर्भवती स्रीयाचा बळी देऊन त्यांच्या रक्तानी कार्ला देवीला अभिषेक घालावा लागेल, १०,००० रक्कम मला दान द्यावी लागेल तरच यातून तुम्हाला मार्ग मिळेल. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर भेटतील.


मांत्रिकांच ऐकल्यावर खूप विचार करुन कैलासराव आणि त्यांच्या कुटुंबाने मिळून १०,००० त्या मांत्रिकाला दिले.

बाहेरच्या गावतल्या हॉस्पिटलमधून तीन गर्भवतींना फसवून माळरानात आणून तीन गर्भवतींचे गळे चिरुन त्यांची हत्या केली.

मांत्रिकाच्या मदतीने त्यांच रक्त कार्लादेवीवर चढवून तिला रक्ताचा अभिषेक घातला.


हे कांड झाल्यावर तिन्ही स्रीयांच शव माळरानातच गाडण्यात आले.


या तीन स्रीयांना मारताच दुसऱ्या दिवशी

पळून गेलेली निशा रडत परत आली नवऱ्याने तिला सोडल होत.

निशा पण काळ्या विद्येचा अभ्यास करत होती.

तीन गर्भवतीच्या बळीमुळेच हे सर्व घडल असाव अस सर्वांना वाटत होत.

तेव्हाच घरातल्यांच्या डोक्यात एक कल्पना आली, त्यांनी आशाला दोन दिवस माहेरी बोलवून घेतल.


आशापण माहेरी आल्यावर सांगण्यात आल की तु इथेच राहा. तुझ्याजागी निशा तुझ्या घरी जाईल. तीन पोर जन्माला घालील नंतर आपण त्यांचा बळी देऊन श्रीमंत होऊ.


पण आशा ही या अंधश्रध्देविरोधात होती. तुमच्या कुंटुंबात आल्यावर तिच्या ज्ञानात भर पडली. ती पूर्णपणे तिच्या कुटुंबाच्या विरोधात गेली. घरात झालेल्या स्रींयाच्या मृत्यूच तांडव कळाल्यावर ती पोलीस स्टेशनला स्वतःच्या कुटुंबाविरोधात चालली होती. पण तिच्याही डोक्यात धारधार खुरप मारुन तिची हत्या केली. तिच्या शरीराचे तुकडे करुन माळरानात गाडल गेल.

सर्वांनी मिळून आशाची हत्या केली ते


चौथ माळरानात तुकडे तुकड्याच सापडलेल प्रेत तुमची सुन आशाच होत.



मीः काय ? पण हे कस शक्य आहे. आशा तर आमच्या सोबतच होती.


पोलीसः तुमची सून आशा आणि निशा ह्या जुळ्या बहिणी आहेत.

आशाला मूल होणार नव्हत.

आणि सर्व गोष्टी मूलप्राप्तीसाठी होत्या.

म्हणून आशाला मारुन निशाला तुमच्याकडे पाठवण्यात आल.

निशाने दोन्ही मूलींना जन्म देऊन घरातून स्वतः गायब करुन विलासकडे पाठवले होते.


या सर्वांवर काय बोलाव हेच मला सुचत नव्हत मी ओक्साबोक्सी रडायला लागलो.


पोलीसः तुम्ही स्वतःला सांभाळा. आणि तुमच्या नातूची काळजी घ्या.आम्ही सर्वांना पकडलय आता. त्यांच्यावर कडक कारवाई होईल.

तुमच्या सुनेच शव आणल आहे त्यावर विधीवत अंत्य संस्कार करा.


एका गाठोड्यात भरलेल्या कंकालाकडे बघून मी आशाची आठवण काढून रडत होतो.

नंतर तिच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले.


हळू हळू सगळ ठीक होत गेल.

कल्पना पण शुध्दीत आली.


अक्षर शांतपणे सगळ ऐकत रडत होता.


अक्षरः म्हणजे माझी आई एवढी वाईट होती का ?


मीः म्हणून मी तुला काय सांगत नव्हतो. तु शांत हो. रडू नकोस. तुला पप्पा मम्मी नाहीत पण आम्ही आहोत. तुला आम्ही मरता मरता वाचवल. तुच अर्जुनची आमच्याजवळ असलेली आठवण.


अक्षरः आजोबा मला माफ करा.


मीः अरे नको माफी मागूस हे तुला कळायला हवच होत. जोपर्यत वाईट कळणार नाही तोपर्यत वाईट आणि चांगल्यातला फरकच कळणार नाही.


अक्षरः आजोबा आपण माझ्या आईला भेटूया का ?


मीः नाही भेटू शकत.


अक्षरः का ?


मीः तुझ्या आईला पोलीसांनी पकडल्यावर जेलमध्येच तीने आत्महत्या केली.



अक्षरने मला मिठी मारली. आणि तो रडू लागला.


(या कथेतून एकच कळेल कि देवावर श्रध्दा ठेवा अंधश्रध्दा नको. अमरत्व, श्रीमंती, मूलबाळ हे बळी देऊन होत नाहीत. या जगात फक्त एकच गोष्ट अमर आहे तो म्हणजे निसर्ग श्रीमंती ही पैशांची नसून मनाची असावी. कोरोनासारख्या महामारीने दाखवून दिल की पैशाने जवळची माणस विकत घेता येत नाहीत. आणि मूल बाळ नसल म्हणून कमीपणा न मानता मोठ्या मनाने एखाद्या अनाथ मूलाच निस्वार्थी मनाने संगोपन कराव. असपण आपली स्वतःची वाढवलेली मूल आयुष्यभर आपल्यासोबतच राहतील, आपल्यासारखच वागतील, आपल्याला सांभाळतील याची काही खात्री नाही.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror