हो मीच तो राक्षस
हो मीच तो राक्षस
मी एक कैदी. 1 महिना झाले मी जेल मध्ये आहे अजून आरोप सिध्द झाला नाही. आपला भारतीय कायदा सांगतो शंभर आरोपी सुटले तरी चालतील पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा मिळता कामा नये. जेलमध्ये आल्यावर एक समजल कि इथे निर्दोष खूप माणस आहेत पण त्याची निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यत ते आरोपीच जीवन जगणार. आणि मी खून केलेत, गुन्हा मान्य केला तरी मला इच्छा असून फाशी लवकर मिळत नाही.
आज शेवट होईलच अस वाटतय.
कोर्टात
तीन खून केल्यानंतर मन उदास होत. मी गुन्हा कबूल केला पण का केला हे बोलण्याची हिंमतच गेली होती. पोलीसांनी खूप मारल पण तोंड बोलतच नव्हत. मन हरवल होत त्या तीन हत्येनंतर. कोर्टात हो आणि नाही हे दोनच शब्द तोंडात होते.
न्यायाधीशः तुमच्यावर तीन खून केल्याचा आरोप शेवटी सिध्द झालाय तरी तुम्हाला याविषायी काय बोलायच आहे का? तुम्ही तुमचा गुन्हा आधीच मान्य केलाय. पण कोर्टाच्या प्रोसीजरनुसार आज तो पुराव्यासहीत सिध्द झालाय. तुम्ही फक्त गुन्हा कबूल करुन शांत बसला. ते तीन्ही तुमचेच मित्र तरी तुम्ही त्यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. अस का केलत ? तुमच्या घट्ट मैत्रीत अस काय झाल की हे भयानक कृत्य तुम्ही केल. सर्वात मोठी गोष्ट ही आहे कि तुम्ही पूर्ण शुद्धीत असताना एवढा मोठा अपराध केला. तुमच मागच रेकॉर्ड एका संयमी, सभ्य, हुशार चांगल्या पुरुषाच असताना तुम्ही हे कृत्य का केल ? तुम्ही असच शांत बसलात काही बदल होणार नाही. पण तुमच्या चुकीच्या शिक्षा तुमच्या आई बाबांना आयुष्यभर भेटत राहील.
मी मनात विचार केला आज आपला शेवटचा दिवस. आपण खूनी म्हणून मरणार. आणि याची शिक्षा आपल्या आई बाबांना सहन करावी लागणार. त्यांच आयुष्य आपल्यामुळे त्रासात जाणार. अटक झाल्यापासून खूप वेळा आई बाबा भेटायला आले जेलमध्ये मी एकदा पण भेटलो नव्हतो, बोललो पण नव्हतो. आज पण बोलालो नाही तर आई बाबांनी दिलेले संस्कार हरतील. त्याची स्वप्न तुटलीच आहेत माझ्याबद्दलची. मी मरेन फासावर लटकून पण आई बाबा क्षणाक्षणाला विचार करुन मरत राहतील कि आपल्या पोराने अस का केल. मी मनाशी ठरवल आता मी बोलाणारच. सर्व कोर्ट शांत झाल. फक्त पंख्यांचा आवाज. कोर्टात सर्वांचे डोळे माझ्या बोलण्याकडेच.
मीः हो मीच मारल माझ्या मित्रांना. मी एका वेळी ११ खून केले. ३ खूनाची शिक्षा मिळेल. पण बाकीच्या ८ जणांची काय चूक होती. ३ माझे मित्र, ६ जण म्हणजे त्यांचे आई वडील, २ माझे आई बाबा.
विजय, अभिजीत, सागर माझे जीवाभावाचे मित्र आमची ओळख आमच्या सोसायटीतच झाली. कॉलेजच्या वयापासून आम्ही मित्र. कॉलेज वेगळी पण मैत्री जन्मापासून एकत्र असल्यासारखीच. कॉलेज संपल. नोकऱ्या सुरु झाल्या आमच्या. नोकरी सुरु झाल्यापासून आमच भेटण बंदच झाल. रविवारी सुट्टी असली तरी कुंटुबाला वेळ. सुट्टीला पण सर्व कामात बिझी. मैत्री फक्त whatsapp च्या ग्रुप पुरतीच राहिली ते पण बोअर होत. एक दिवस अभिजीतने फिरण्याचा बेत ठरवला. सर्वांनी होकार पण दिला. कारण सर्वांना एकमेकांना भेटायची इच्छा. अभिजीतने त्यांची गाडी काढली आणि सर्वांना घेऊन तो अलिबागच्या त्याच्या घरी गेलो. दोन दिवसाचा बेत. सर्वांनी ऑफिसमध्ये खोटी कारण सांगून दांड्या मारल्या. सगळे खूप खूश होते.
दुपारी आम्ही अभिजीतच्या घरी पोहचलो. घर एकदम वाड्यासारख आणि घरातून पूर्ण समुद्र दर्शन. दुपारी जेवून सर्वांनी डुलक्या मारल्या. संध्याकाळी बीच वर खूप खेळलो.खूप मज्जा केली.
अविस्मरणीय शेवटची संध्याकाळ.
सध्याकाळ झाली आम्ही बीचवरच होतो. अभिजीत थोड्यावेळात जाऊन येतो बोलला आणि डायरेक्ट अर्ध्या तासाने बिअरच्या बाटल्यांचा बॉक्स आणि खायला sea food घेऊनच आला. तिघांनी सुरवात केली प्यायला. मला कोणी काही बोलत नाही कारण सर्वजण मला विनवण्या करुन थकलेत पण मी पित नाही. पण त्यांच्या समाधानासाठी मी पण एका ग्लासमध्ये कोल्ड्रींगस घेतो. ते पण खूश मी पण खूश. आज काय झाल होत तिघांना कळलच नाही. बाटल्यावर बाटल्या संपवत होते. थोड्या वेळाने अभिजीतने पांढऱ्या पिशवीच पाकिट काढल. मला शक आलाच होता. मी विचारल
मीः अभि हे काय?
अभिजीतः काय नाय रे. गंमत आहे.
मीः काय पण असो आधी फेकून दे.
अभिजीतः तु गप्प. स्वतः मज्जा करत नाही आणि दुसऱ्याला पण करु देत नाही.
आमच्या दोघातल वातावरण एका पांढऱ्या पुडीमुळे तापल. दोघांचे वाद झाले, शिवीगाळ झाली आणि मी लगेच निघायच ठरवल. कुणी आडवल नाही कारण पिण्यात गुंग झाली पोर. विसरली मैत्री. मी रुमवर जाऊन कपडे भरले फ्रेश झालो. निघण्याच्या तयारीत होतो तोच बाहेरुन आवाज आला.
मी लांबून पाहिल तर अभिजीत विजय सागर एका मुलीसोबत वाद घालत होता. आणि अचानक तिने अभिजीतच्या खानाखाली वाजवली. कानाखाली बसल्यावर अभिजीत आणि हे दोघ त्या पोरीला मारु लागले. मी तसाच धावत त्यांच्याजवळ गेलो तेव्हा कळल ती वैश्या होती. वाद का चालु होता मला कल्पना नव्हती.
मी तिघांना लांब सारुन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.मी एकटाच शुध्दीत होतो. म्हणून नाईलाजाने मलाच तिघांना सांभाळायच होत. मी मागची भांडण विसरुन तिघांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांचा वाद संपत नव्हताच. ती मुलगीपण शांत बसत नव्हती. शिवीगाळ चालूच होती तिची. अचानक तीने अभिजीतला पायतली चप्पल फेकून मारली. अभिजीतच डोक एका सेकंदात गरम झाल. सागर आणि विजने तीला मारत मारत पकडल आणि अभिजीत तिचे कपडे फाडू लागला. मी मध्ये येऊन आडवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तिघांची ताकद त्या दारुमुळे डबल झाली होती. मी एवढच म्हणत होतो अभि शांत हो पोलीस केस होईल. अभिजीत मघाशची भांडण विसरला नव्हता.
अभिजीतः तू जाणार होतास ना. निघ. हीची चरबी आज उतरवतोच.
त्याने मला ढकलल. मला काही सुचत नव्हत. मी जवळचा दगड घेणून अभिला मारला. तो अभिला लागून विजयच्या डोक्याला लागला. तरी त्यांनी मुलीला सोडल नव्हत.
आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली
मुलगी जीवाच्मीया आकांताने ओरडत होते. आणि हे तिघ तिच तोंड दाबून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते.
मी परिस्थिती बघूनच वेडा झालो होतो. बाजूला असलेला लाकडी बांबू घेऊन मी तिघांना मारायला सुरवात केली. माझ मारण संपल नव्हत. तिघ मार खाऊन बेशुद्ध झाली. तरी मी मारतच होतो. बांबू तुटला. मी बाजूचा दगड घेऊन तिघांच्या डोक्यात दोन वेळा मारला.ती मुलगी हे पाहून घाबरुन पळून गेली.
माझ्यात एक राक्षस तयार झाला होता.
न थांबणारा न विचार करणारा बलाढ्य राक्षस.
या राक्षसाला जन्म देणारा
मी दररोज वाचणारा पेपर ज्यात दररोज 4 वर्षापासून ३० वर्षापर्यतच्या मुलींवर होणारे अत्याचार. विनयभंग, ॲसिड हल्ला, चाकू हल्ले.
या आरोप्यांना भयानक शिक्षा व्हावी ही मनातली तीव्र इच्छा.
आणि आज तर हे सर्व माझ्यासमोर होत होत. आणि स्वइच्छेने या राक्षसाला जन्म देणारा मीच.
या राक्षसाला मित्र माहीत ना, भावना नाहीत. फक्त मनात भरलेला संताप.
मला एवढच दिसत होत चक्क तीन लांडगे व्यसन, वासना, राग यांच्या नशेत बडून एका हरिणीची शिकार करुन तिला फाडून तडपवून खाणार. मी मनुष्य बनून खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण परिस्थितीने मला राक्षस बनायला भाग पाडल.
मी तीन लांडग्यांना ठेचून मारल. मेल्यानंतरही परत जगू नये म्हणून मारत राहिलो. शरीर थकेपर्यत मी तिघांना मारल.
आज मी राक्षस बनून क्रुर लांडग्यांना फाडल होत.
शांत झाल्यावर मी माणसात आलो. समोर पाहिल तर रक्ताच्या मातीत. बिन मुंडीचे तीन धड पडले होते. मला जाणीव झाली ते माझेच मित्र. समोर पडलेल्या रक्तात भिजलेल्या दगडाने,तुटलेल्या बांबूने, आणि माझ्या हाततल्या जखमांनी, माझ्या कपड्यावरच्या रक्ताच्या डांगानी मला सांगितल की हे मीच केलय. हो हे मीच केल जवळच्या पोलीस ठाण्यात मी माझ्यातल्या राक्षसाला पोलीसांच्या स्वाधीन केल.
शांत बसलेल्या कोर्टात माझ्या बोलण्यानंतर वादळासारखी कुझबुझ सुरु झाली.
न्यायाधीशांनी परत एक आठवड्याची तारीख देऊन त्या मुलीचा शोध घेण्याचा आदेश पोलीसांना दिला.
मी फक्त आई बाबांच्या डोळ्यातूनहणारे निशब्द अश्रु पाहिले. मनाला समाधान होत. आता त्यांच्या कपाळावर प्रश्नांच्या घड्या नव्हत्या.
पुढच्या आठवड्यातच ती मुलगी मिळाली. तीच्या सांगण्यानुसार मीच आरोपी हे परत सिध्द झाल.
न्यायाधीशः तुझ्यावरचा आरोप हा सिध्द झालाय. तु परिस्थितीजन्य हे पाऊल उचलल पण तुझ्या एका पाऊलाने तीन बळी गेलेच. तुला सोडल तर समाजावर याचा भयानक परिणाम होईल. तुला जर वरच्या कोर्टात जायच असेल तर तू जाऊ शकतोस. तुला काय बोलायच असेल तर बोलू शकतोस.
मीः नको मला माफी नकोच. मी गुन्हा केलाय मी आरोपी आहे. मला शिक्षा झालीच पाहिजे. पण माझी शेवटची एक इच्छा आहे.
न्यायाधीशः बोल काय आहे ती?
मीः मला फाशीची शिक्षा व्हावी आणि तीही लवकरात लवकर.
न्यायाधीशांनी माझी इच्छा पूर्ण केली.
आज माझा शेवटचा दिवस.
एक लेडी ऑफिसर रात्री ३ वाजता मला न्यायला आल्या.
लेडीज ऑफिसरः कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला ४ वाजून २३ मिनटांनी फाशी द्याच ठरलय तर तुमची शेवटची इच्छा काय आहे?
मनोमनी रडलो आणि बौललो
मीः ठीक आहे. माझ शरीर माझ्या आई बाबांची भेटवस्तू आहे, मी र्निव्यसनी असून सुदृढ शरीराचा आहे. मी व्यायाम करतो, योगा करतो म्हणून माझे शरीराचे सर्व भाग चांगले आहे. माझी ही इच्छा आहे कि मी मेल्यानंतर लगेचच माझ्या शरीरातल गरम रक्त, हदय, फुफुसे, किडनी, डोळे आणि अजून उपयुक्त भाग दान करावेत.बाकीचे राहिलेल शरीर कोणत्याही मासाहारी प्राण्याला खाद्यासाठी द्यावेत.
लेडीज ऑफिसरने हो बोलल्या.
पण फाशीनंतर माझ शरीर आईबाबांना देण्यात आल.
हिंदु संस्कृतीनुसार माझ्या शरीराच दहन झाल. पण माझ्या पिंडाला कावळा गाय दोघ शिवले नाहीत.
मी अजून भटकतोय.
माझ्या गुन्ह्याची हीच शिक्षा ठरली कि माझी शेवटची इच्छाही पूर्ण झाली नाही.