STORYMIRROR

AKSHAY KUMBHAR

Drama Tragedy Inspirational

3  

AKSHAY KUMBHAR

Drama Tragedy Inspirational

समाधान

समाधान

5 mins
234


दुकानाचा दरवाजा उघडला. दुकानात झाडू मारून देवपूजा केली. आणि आता ग्राहकाची वाट पाहायला लागलो. माझं दुकान म्हणजेच माझं छत्र माझं अस्तित्व. माझं दुकान म्हणजे शोभेच्या वस्तूंचा भंडार. त्या विकून जे काय भेटेल त्यावर माझा गुजारा होतो. तसं मी मीडिअम श्रीमंत आहे बर का ?

पण समाधान नाही जीवाला. सकाळी उठला कि धावपळ सुरु लोकल ची वाट बघायची नंतर धक्के खात आपल्या स्थानकावर पोहचायचं. दुकानात जायचं, नवीन आलेलं सामान, ग्राहक, इतर बिल अशी भरपूर काम मला असतात. स्वतःला जेवायला पण वेळ मिळत नाही कधी कधी. रात्री दिवसभरचा हिशोब करून मी निघतो. माझं घर एका टोकाला आणि दुकान दुसऱ्या टोकाला. पण आयुष्यात सगळं करावंच लागत.


तो दिवस मी कधीच विसरणार नाही ज्याने मला समाधान काय असत ते शिकवलं.

एक फॉरेनर माझ्या दुकानात आला. तसं मन मी लाडू फुटा. सर्व मालाच्या किंमती मनात दुपटीने वाढल्या. पण मला एक टेन्शन आलं होत त्याची भाषा मला कळणार नाही माझी भाषा त्याला कळणार नाही. आता कस होणार. तो आला आणि हसत हसत हाय बोलून सर्व दुकान बघू लागला. आज पर्यंत माझ्या दुकानात येऊन कुणीच एवढं बारकाईने वस्तू पहिल्या नाही तेवढ्या बारकाईने तो वस्तू पाहत होता. आर्धा तास तो सर्व वस्तू पाहून मला एका वस्तूकडे बोट करून बोलला.

फॉरेनर: Pack this bro.

मला एवढं इंग्लिश कळत नाही पण त्याने वस्तू पॅक करायला सांगितली. तस मी त्याच बॉक्स आणून पॅक करून त्याच्या समोर ठेवली

फॉरेनर: how much ?

आता मला काय बोलतोय ते कळलं नाही. मी त्याच्याकडे बघून बोललो

मी: व्हॉट सर ?

त्याला बरोबर कळलं मला काही इंग्लिश कळत नाही

फॉरेनर त्या वस्तूकडे बोट दाखवून बोलला

फॉरेनर: money

आता एवढं समजायला मी काय वेडा नव्हतो लगेच डोक्यात पैशाचा हिशोब सुरु झाला त्याची जी किंमत त्याला दुप्पट ते तिप्पट वाढवून सांगायची.

मी लगेच बोललो

मी: 500 rupees.

एवढं इंग्लिश येत मला

जी वस्तू मी १०० ला विकतो त्याला मी पाच पटीने विकत होतो.

त्याने पण काही न बोलता पाकिटाऊन पैसे काढून मला दिले आणि तो thank you बोलून निघाला.

पैसे काढताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि त्याने १०० पाच नोटा नाही तर १०० च्या ३ आणि ५०० च्या २ असे १३०० शे रुपये चुकून मला दिले. आणि हे मला कळलं पण मी गप्प बसलो. मी मनातल्या मनात खुश झालो. चला एकाला येडा बनवला. माझ्या मनात स्वार्थ आला. तो जाताना मी त्याला बोलू शकलो असतो पण मी गप्प बसलो.

दिवस संपला. हिशोब करुन मी घरी निघालो.

घरी गेलो जेवलो. आणि झोपायचा प्रयत्न करायला लागलो. पण मला काय झोप लागेना. सारखा त्या फॉरेनरचा विचार येऊ लागला. काहीच समजत नव्हतं काय चाललाय. दररोज झोप लागते पण आज काय झोप लागेनाच. मी विचार केला उद्या तो येल. त्याला ते पैसे परत देऊ. मग डोळा लागला.

दुसरा दिवस उजाडला. मी पूर्ण दिवस त्याची वाट पहिली पण तो काय आला नाही. काहीच सुचत नव्हतं. इथे माझे १० रुपये कुणाकडे राहिले तर मला कसतरी होत हा तर ८०० च्या वर मला चुकून देऊन गेला.

मी विचार केला उद्या येल तो आणि घरी आलो. परत झोप लागत नव्हती.

असं पाच दिवस झालं मला काय करावं कळतच नव्हतं.

सहाव्या दिवशी मी एक युक्ती करायचं ठरवलं. माझ्या दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरातून फोटो घेऊन मी THE TIMES OF INDIA च्या पेपर मध्ये छापला. त्यात माझा मोबाईल नं. आणि नाव दिल आणि फोटोखाली एक संदेश लिहला. I AM SEARCHING YOU हे मी माझ्या मित्राच्या इंग्लिश हायस्कुल च्या मुलाकडून लिहून घेतलं होत.

एक आठवड्याने मला त्याचा फोन आला.

फॉरेनर:

WHO ARE YOU ?

मला काहीच कळत नव्हतं काय बोलावं. मी लगेच बोललो.

मी: सर आय एम मनी पर्सन

फॉरेनर: HI Brother (तो हसत हसत म्हणाला)

मी: Meet u

मला काय बोलायचं कळत नव्हतं पण १० वी च येतंय ते सगळं बोलून दाखवत होतो.

फॉरेनर: Yes . i will come in next week at your shop . bye

मला काहीच समजलं नाही. एकच कळत तो come म्हणजे येणारच.

मी खुश झालो आणि दररोज त्याची वाट बघू लागलो. आज येल उद्या येल. असं करत एक आठवडा निघून गेला तरी तो आला नव्हता.

मी त्या दिवशी आलेल्या फोन वर फोन केला. तिकडून एक बाई बोलली

फोन: नमस्ते सर. this is ताज हॉटेल how may i help You ?

मला काहीच कळलं नाही. पण ताज हॉटेल शब्द कळला.

मी मराठीतच बोललो

मी: म्याडम तिथं कुणी फॉरेनर आहे का?

माझं नशीब थोर ती बाई मराठी निघाली.

बाई: सर मी इथे खूप फॉरेनर्स आहेत. तुम्हाला कुणाशी बोलायचं आहे.

आता काय बोलू.

मी: त्यांचा पेपर मध्ये फोटो आला होता ना ते the times of india मध्ये.

बाई: अरे हा ते केनी सर. तुम्ही दिलेला का तो फोटो. I am searching You

मी: हो

बाई: तुम्ही खरंच हुशार आहात. अहो पण ते सर आजच गेले.

मी उदास होऊन फोन ठेवला आणि बसलो.

तेवढ्यात ते सर समोर येऊन उभे राहिले. त्यांच्यासोबत अजून एक माणूस आला होता.

मी: केनी सर.

केनी सर: Hi Bro

मला काहीच कळलं नाही. त्यांनी त्या माणसाला त्याच्या भाषेत काय तरी सांगितलं. आणि तो भारतीय माणूस चक्क माझाशी मराठीत बोलला.

मराठी माणूस: माझं नाव राहुल आहे. मी या सरांसोबत काम करतो. सर विचारतायत तुम्ही फोन करुन का भेटायला बोलावलं

मी त्या दिवशी घडलेलं सर्व राहुल सरांना सांगितलं.

राहुल सर: अरे हे सर अब्जो पती आहेत. तू ८०० रुपयांसाठी त्यांना बोलावलं.

मी: सर ते ८०० रुपये माझी झोप घेऊन गेले त्याच काय ?

राहुल सर : म्हणजे ?

मी: काय नाही.

मी सरळ माझ्या पाकिटातून ८०० रुपये काढून केनी सरांना दिले. आणि बोललो.

मीः Gift ५००. You give १३००.

माझ्या एवढ्याच बोलण्यात सगळं केंनी सरांना समजलं.

केनी सर: You are honest . please take it .

केनी सरानी अजून ५००० काढून मला दिले.

केनी सर: this is gift from me. nice to meet you.

एवढंच बोलून ते निघून गेले. ८०० रुपये द्याला गेलो आणि देवाने ५००० अजून दिले पण हे पैशाने झोप हरवणार नव्हती. कारण ५००० सोबत झोप आली होती. मी त्यांनी दिलेले ५००० रुपये २०० रुपये च्या हिशोबाने रस्त्यावरच्या घाम गाळून काम करणाऱ्या २५ लोकांना वाटले. मला खूप मोठं समाधान मिळाल.

सर्वाना ही गोष्ट जेव्हा मी सांगतो तेव्हा सगळे मला मुर्खात काढतात. पण सर्वाना एक गोष्ट माहित नाही मी त्या ५००० रुपयात काय काय कमावलं

१) केनी सर हा रशियन माणूस असून भारताच्या नौदल विभागासाठी मदतीचं काम करतो. त्याच्या नजरेत १०० % भारताची माझ्या वागण्यामुळे चांगली छाप पडली.

२) ज्या लोकांना मी पैसे वाटले ते दिवसाला एका वेळेचं जेवणासाठी भटकणारी मंडळी होती. त्यांची मन मी जिंकली.

३) आणि माझ्या मनाला मी स्वतः चांगला असल्याची पावती दिली.

४) सुखाची झोप विकत घेतली.

५) मी एकही माझी स्वतःची कवडी खर्च न करता २५ जणांचं एका वेळेच्या जेवणाचं सुख कमावलं.


एका अब्जाधीश माणसाने मनाच्या श्रीमंतीने समाधान मिळवायला शिकवलं. मला १०० चे १००० भेटले तरी २०० ते ३०० रुपयात मी समाधानी राहील पाहिजे आणि बाकीच्या ७०० ते ८०० रुपयात इतरांना समाधानी केलं पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama