Mangesh Ambekar

Drama Tragedy Others

4.8  

Mangesh Ambekar

Drama Tragedy Others

पुण्यमृदा

पुण्यमृदा

26 mins
1.5K


"अरे ओ बाबूमोशाय, इतनी जलदी जलदी में कहा जा रहे हो" चाळीतल्या जिन्यापाशी उभ्या असलेल्या मीराने वरच्या जिन्यावरून घाईघाईत खाली येत असलेल्या अर्णबकडे विचारपूस केली. मीराची हाक ऐकून अर्णबचा वेग तिच्याजवळ येऊन थोडा मंदावला. 


नुकतीच मलमली तारुण्यात आलेली वीस वर्षाची मीरा एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरातली मुलगी. नाके-डोळी सुंदर आणि सावळीशी ही तरुणी, साधारण तिच्याच वयाच्या एका गोऱ्यागोमट्या, टपोऱ्या डोळ्याच्या बंगाली अर्णबच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. अर्णब मीराच्या प्रेमाला ओळखून होता, त्यालाही ती आवडायची पण तो तिच्या प्रेमात कधीच गुंतलेला नव्हता. 


अर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिकायला आला होता. त्याचा मामा एक खूप सुंदर मूर्तिकार होता. मामा एका मूर्तिकारखान्यावर काम करत आणि सोबत अर्णबला घेऊन जात.


"अरे किचु ना, बस थोडा काम से जा रहा हूँ| तुमि आसचे ?"


एवढं बोलुन अर्णब पुढे दोन पायऱ्या उतरू लागला तितक्यात मीरा बोलली



"हो, पण जायचं कुठय?.......अरे रुको तो सही" 



"अरे बाबा, यही नजदीक ही है, लेकीन छोडो तुम वहा आ नहीं सकोगी, रहने दो|" या अर्णबच्या बोलण्यावर मीरा लगेच पेटून उठली .



"अरे व्वा! अशी कोणती जागा आहे जिथे तू बंगाली जावू शकतो आणि ही मराठी लेक जावू नाही शकत? .... सांग तर जरा" आणि मीरा त्याच्या मागे मागे जिना उतरत त्याला म्हणाली.



" नही बता सकता तुम्हे, अब छोडो बाबा मुझे" अर्णब काढता पाय घेत चाळीच्या बाहेर पडला खरा पण मीरा त्याचा काही पिच्छा सोडायला तय्यार नव्हती. 'तुम वहा आ नहीं सकोगी' या वाक्याने तिची उत्कंठा अजून वाढली आणि तिने शेवटी अर्णबचा हात पकडून त्याला थांबवल.



"सांग कुठे चालला नाही तर मी जावूच देणार नाही"



मीराच्या हट्टापुढे अर्णब आता पुरता बुचकाळ्यात पडला आणि अखेरीस त्याला सांगण्याशिवाय काही मार्ग राहिला नाही.



"अरे बाबा, छोडो छोडो बताता हूँ" अर्णब मीराचा हात झटकत, "मैं वेश्यालय जा रहा हूँ" बिचकत बिचकत अर्णब बोलला आणि अर्णबच्या या वाक्यावर मीरा अक्षरशः उडालीच.



"पागल झालास का? काय बोलतोय तू तुला तरी कळतंय का?" 



"सच्ची सच्ची बाबा, मैं उधरही जा रहा हूँ'" अर्णबच उत्तर पूर्ण होतं ना होतं तोस्तोवर मीराने त्याच्या समोर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.



"पण का? क्या काम है तुम्हारा वहा? तू असा असशील असं अजिबात नव्हतं वाटलं मला...छे.....छे..." मीराने पार त्याच्या इज्जतीचे धिंढवडेच काढले. पण तो आपल्या चेहऱ्यावरच हसू कायम ठेवत मिश्कीलपणे पुढे उत्तरला, "अरे हर बार मामा वहा जाते है, लेकीन इस बार वो बिमार हे इसलीये मुझे जाना पड रहा है।" अर्णबच्या या प्रतिक्रियावर मीरा संतापली आणि नाक मुरडत...."शी ...तुम भी वैसे और तुम्हारे मामाभी, और ये बताने में भी शर्म नहीं तुमको." 



अर्णब मीराचा राग पाहून आपली चेष्टेला विराम देत, निमूटपणे मीराची समजुत काढण्यास पुढे सरसावला. "मीरा सुनो तो....जो तुम सोच रही हो वैसा कुछ नही है, मैं तो वहा से सिर्फ मिट्टी लाने जा रहा हूँ "



"मिट्टी!.... ते कश्यासाठी.... हां...हं... बरोबर आहे म्हणा....लोकं पण तिथे माती खायलाच जातात, तू तर ती घरी आणुन खात असशील. बावळट मेले." मीराची भयंकर चिडली होती. वेश्यालय बद्दलची चिड तिच्या डोळ्यात दिसत होती. अर्णबला कळुन चुकले होते की आपली मस्करीची चांगलीच फसगत झालीये त्याला मीराला कसं समजावं ते कळेना.



"अरे ना बाबा, तुम जरा पुरी बात तो सूनलो मेरी."



"क्या बात सूनलो, काही वाटतं का तुला" 



"फिर तुम शुरू हो गयी। बैठो यहापे जरा, तुम्हे सब बताता हूँ।" अर्णब ने तिला एकदाच शांत करत बाजुच्या कट्ट्यावर बसण्यास सांगितले आणि व्यवस्थित समजावून सांगण्यास सुरवात केली.



पुण्यमृदा-(भाग-दोन)


"मैं वहा सिर्फ और सिर्फ मिट्टी ही लाने के लिए जा रहा हूँ। दुर्गा माता की मुरत बनाने के लिए, चार चिजे बहुत जरुरी होती है। गंगा तट की मिट्टी, गाय का गोबर, गौमूत्र और वेश्यालय की मिट्टी जिसे पुण्यमाटी माना जाता है। इन चार चिजो बैगर मूरत बनती ही नहीं| इसलिए वेश्यालय जाके भीक मांगणी पडती है। और जब तक वेश्या मान न जाये तब तक मिट्टी लाने गये पुजारी या मूर्तिकार को वेश्या के ईजाजत का इंतजार करना पडता है। बस इतनीसी ही बात हे और इसबार मामा की तबियत पाच दिन से ठीक नहीं हे इसलिए मुझे जाना पड रहा है।" अर्णबने भडभड एकदाच बोलून टाकलं आणि मीराच्या प्रश्न मंजुषेतून बाहेर पडत सुटकेचा उसासा सोडला.



"अरे बापरे, असं असतं का हे. दुर्गा मातेच्या मूर्ती बद्दल असं काही माहितीच नव्हतं. पण मी काय म्हणते गंगेची माती, गाईचं शेण आणि गोमुत्र हे समजू शकत की ते पवित्र आहे पण वेशेच्या दारातली माती ती कशी पुण्य ते नाही कळलं." मीराचे प्रश्न संपायच नाव घेत नव्हते. अर्णबकडेही मीराच्या या प्रश्नांवर दाताखाली जिभ आणत डोक्याला हाथ लावला कारण या प्रश्नाचं उत्तर तर त्यालाही नव्हतं.



"उडी बाबा....ओ तो अमि एमानकी इ जानी ना , मुझे भी नही पता, मामा को जरूर मालूम होगा, उन्हे पुछ कर बताता हू तुम्हे, लेकीन मुझे अब देरी हो रही हैं क्या मैं जा सकता हूँ।" एवढं बोलून अर्णबने मीराची रजा घेतली आणि मातीसाठी भरभर निघाला. 



"अच्छा जा जा, पण आल्यावर मामाला विचारून सांग मला" मीराने अर्णबला जाता जाता मोठ्याने सांगून घरी गेली. 



अर्णब पत्ता विचारत एकदाच त्या कुंटनखाण्याच्या चिंचोळ्या बोळीत पोहचला. तो पहिल्यांदाच तिथे गेला होता. चहोबाजूला झगमगीत आखूड कपडे घातलेल्या, तोंडावर एकदम भडक शृंगार करून नटून-थटून रस्त्यावर उभ्या असलेल्या गणिका अर्णबला त्यांच्याकडे येण्याआठी बोलवत होत्या. अर्णबला फार अवगडल्यासारखं झालं होत, त्याला नेमका चालल्यामुळे घाम फुटला होता की तिथल्या निर्धास्त गणिकांच्या वागणुकीला बघून घाम फुटला होता हे उमजेना. कारण मामा त्याला सांगत होता की, 'तू नको जावू,तुला नाही जमणार' तरीदेखील मामाच्या निर्णयाला डोळेझाक करत फक्त अल्लड, उत्स्फूर्त तारुण्याच्या सुप्त इच्छेपोटी अर्णब इथे येवून पोहचला होता.




त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तो कसाबसा मामाने सांगितल्यानुसार जोहराबाईच्या कुंटनखान्यात पोहचला. ओसरीवर चार-पाच गणिका ग्राहकांच्या शोधात बसलेल्या होत्या. 



"ए चिकने, कहासे आया रे तू, आता है क्या" अर्णबला पाहून त्यातली एक गणिका म्हणाली.



"म....म.....म.....मैं" अर्णबची पार बोबडी वळाली.



"ए ये बकरे की तरहा मे...मे.क्या कर रहा, ढंग से बोल जो बोलना हे" 



"आप गलत समज रहे हो, मैं तो यहा दुर्गा माता के लिए मिट्टी लेने आया हूँ"



"अच्छा....तू मत बता मुझे.....खूब जानती तुम जैसो को। फटाफट बोल किसने भेजा है और किससे मिलना है।"



अजून काही ऐकण्याच्या आत अर्णबने तिला मामाच्या नावाचा दाखला देत माती घेऊन जाण्यासाठी विनंती केली. त्या वेश्येने त्याला थोडं थांबायचं सांगून जोहराबाईची परवानगी घेन्यास आत गेली. जाताजाता दहा-पंधरा मिनिटे वाट बघावी लागेल असं सांगून गेली.



अर्णबला तात्काळत ठेवून पाच-दहा मिनिटे होऊन गेली होती. त्याची भिरभिरणारी नजर कावरीबावरी होऊन तिथल्या सर्व गोष्टीचा पहिल्या अनुभवाची साक्ष देत होतं. अशातच त्याची नजर एका खिडकीवर येवून थबकली आणि खिडकीच्या फटीतून त्याला काही हालचाल होतांना दिसली तसा तो नजर रोखुन उत्सुकते पोटी थोडा जवळ जाऊन बघु लागला आणि त्या कोवळ्या अल्लड तारुण्याला कुंटनखान्याच वास्तव आणि बिभस्त दर्शन घडलं. पुढची चार-पाच मिनटं त्याचे डोळे ते त्या दृष्यावर पूर्ण एकवटली. त्याचं संपूर्णअंग शहारलं. ते उत्सुक तारुण्य त्या दृष्याच्या मोहात अडकलं होत. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर हात पडला आणि तसा अर्णब एकदम दचकला. त्याच्या तंद्रीतून एखाद्या चोरट्या सारखा भानावर आला. जसा की त्याची चोरी पकडल्या गेली. त्याने डोळे घट्ट मिटले.



"ओ हिरो.......बात हो गयी जोहराजानसे, मिट्टी ले जाने को कहा हैं....मिट्टी लो और फुटो यहा से.....और हा माता का प्रसाद ले आना।" आतुन परवानगी घेऊन आलेल्या गणिकाने त्याला सांगितले.



तिचा खणखणीत आवाज ऐकताच घामाघूम झालेला अर्णब अंगणात माती घेण्याच्या कामास लागला. त्याने भरभर माती भरली आणि त्या गणिकेचा निरोप घेत तिथुन काढता पाय घेतला. 



अर्णब घरी आला तसा फार अस्वस्थ होता. मामाने त्याला बघुन त्याला विचारपूस केली. अर्नबने लागलीच चेहऱ्यावर 'काहीच झाले नाही' असा आविर्भाव आणत विषय बदलला . मामाला त्याने सकाळी मीराने विचारलेला प्रश्नांत गुंतवले. 



वेशेच्या दारातली मातीच कशी पुण्य यावर मामाने खूप सुंदर प्रकारे त्याला समजावलं. अर्णब त्या उत्तरात खूप विचारमग्न झाला आणि त्याने मामा सांगितलं की तो ह्यापुढे आयुष्यात कधीच परत वेश्यालयात पाऊल नाही ठेवणार. त्याचा निर्धार पाहून मामाला पण कळून चुकलं की काहीतरी गडबड झाली खरी पण त्याने बोलणं टाळलं. 



स्वतःच्या अल्लड उत्सुकतेचा किळसवाणा प्रकार पाहून अर्णब स्वतःच शिकार झाला होता आणि त्याचा निर्धार त्याची साक्ष देत होता. तरी त्याच्या समोरून त्याने पाहिलेला तो किळसवाणा प्रसंग काहीकेल्या जात नव्हता. अखेर कवळ्या मनाला आज गालबोट लागलं.


== पुण्यमृदा-(तीन)




दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा आपल्या खोलीच्या बाल्कनीत केस विंचरत रेलिंगजवळ उभी होती. रेडिओवर मंद आवाज वाजत असलेलं कुठलंतरी गाणं ती गुणगुणत होती तितक्यात तिला हातात दुधाची बॉटल घेऊन चाळीकडे येणारा अर्णब दिसला. ती लागलीच धापा टाकत जिने उतरून त्याच्याकडे गेली आणि त्याच्यापुढे दोन्ही आडवे करत त्याला थांबवून त्याला कालबद्दल विचारपूस करू लागली.



"ओ बाबूमोशायssss मग खाल्ली का माती, कधी आला तिकडून?" मीराला बोलतांना धाप लागली.



मीराने अगदी सहज केलेल्या या प्रश्नावर अर्णब एकदम आवाक झाला. 'हिला काही कळलं तर नाही ना' या अविर्भावात त्याने मीराला लागलीच प्रतिप्रश्न केला. मनात पाप असलं की साधे सरळ बोलणे सुध्दा प्रश्न वाटू लागतात. 



"बोलेतो...... क्या बोलना चाह रही हो मीरा तुम?" अर्णबने भुवया उंचावत तिला विचारलं.



"अरे तू माती आणायला गेला होतास ना,मग आणली का माती?"



"अच्छा मिट्टी......हा लाई ना" एक हलकासा सुस्कारा सोडत अर्णब बोलला.



"अच्छा मी तुला मामांना प्रश्न विचारायला सांगितला होता, वेशेच्या दारातलीच माती का मूर्तीसाठी? विचारला का तू?" कालच्या पडलेल्या प्रश्नांची आठवण करून देत मीरा बोलली. 



"हा मैने घर आते ही पुछा था, और बडा ही खूब जवाब दिया उन्होने."



मामांनी जे काही उत्तर सांगितलं होत ते तश्याच्यातसे अर्णबने मीराला सांगितलं. ते उत्तर मीरा फ़ार पटलं पण ती त्या उत्तराच्या फार विचारात पडली. 



"अब मैं कभी नही जाऊगा वहा" मीरा विचारांच्या गराड्यात अडकलेली असतांनाच अर्णब मध्येच चुकून पुटपुटला खरा पण मीरा समोर बोलून खूप मोठी चूक केली याचा पश्चयताप झाला. 



"का? तुला काय झालं? तू माप ओलांडल की काय?" मीराच्या बेधडक प्रश्नांनी अर्णबला धडकी भरली. 



"क्या....कुछ भी तो नही?" अर्णब फार गडबडून गेला. त्याची अस्वस्थता आणि कावरीबावरी नजर पाहून मीराला संदेह आला. तिने त्याला परत भुवया वरखाली करत नजरेनेच प्रश्न केला.



"सही मे कुछ नही बाबा.....लेकीन बडी गंदी जगह हैं, वो लोग आतेजाते किसीं आदमी को नही छोडते, पुछ पुछ कर हैराण कर दिया." 



"अच्छाssss ये बात है....अले..ले..ले परेशान कर दिया कमिनीयोने मेरे भोलेभाले बाबू को" मीरा लाडात येऊन अर्णबचा भांग मोडत बोलली. मीराला आपलं उत्तर एकदाचं पटलं बघून अर्णबला पण हायसं वाटलं. दोघेही संध्याकाळची भेटायची वेळ ठरवून चालते झाले. 


क्रमशः




Rate this content
Log in

Similar marathi story from Drama