Mangesh Ambekar

Comedy Others

4.7  

Mangesh Ambekar

Comedy Others

एक कथा

एक कथा

13 mins
1.5K


आपण सगळेच निरनिराळी स्वप्न उराशी बाळगून लहानाचे मोठे होतं असतो. उत्कृष्टतेच्या ओढीत आपल्याकडे असलेल्या आणि नसलेल्या वस्तू, वास्तू आणि परिस्थितीला उत्तोमोत्तमात परिवर्तित करण्याच्या प्रयत्नात हवी ती मेहनत करतो आणि मग आपण पेरलेल्या या अपार कष्टच्या झाडाला हळूहळू फळ लागायला सुरवात होते. त्यांनतर पुढे कधीकधी तर फळं न तोडताही ते आपसूकच आपल्या झोळीत पडायला लागतात. आता त्यापुढे उरी ईच्छा उरते ती फक्त म्हणजे, उरलेल्या आयुष्यात कमावलेल्या फळांचा आस्वाद निरंतर घेत राहावा एवढीच. 


साधारणतः सर्वसामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करत गरिबीतून मार्ग काढत-काढत पुढे कशीबशी श्रीमंती गाठतो आणि एकदा काय ती उंची गाठली की त्यांनतर शक्यतोकरून उरलेल्या आयुष्यात त्याचा टिकवून-टिकवून आनंद उपभोगतो. पण कमावलेलं हे सर्व क्षणात त्यागून पुन्हा नवी सुरवात करणं म्हणजे अवघडच. कारण सरत्या वयानुसार आता पुन्हा पूर्वश्रम करणे थोडं कठीणच. बरं त्यातल्यात्यात ते श्रम जर स्वतःसाठी न करता इतरांसाठी करावं लागतं असेल तर त्याचा विचारचं करवत नाही. पण अशीही काही माणसं आहेत की जे आयुष्यभर कष्टकरून आपण गाठलेली उंची लोकहितासाठी क्षणार्धात त्यागून, समाजाकल्याणासाठी नव्याने भरारी घेतात.


Rate this content
Log in