Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Mangesh Ambekar

Others


4  

Mangesh Ambekar

Others


खुळखुळा

खुळखुळा

9 mins 991 9 mins 991

"हुश्शsssश्श संपला बुवा आजचा दिवस कसाबसा. आता मस्त दोन महिने सुट्टी. उद्याचा दिवस फक्त आराम आणि परवा सकाळीच भुर्रर्र. कधी एकदाचा मृणालला भेटतो असं झालय. बस फक्त हा पाऊस थांबायला हवा बाबा. वीट आणलाय नुसता याने. दिवाळी आली तोंडावर पण याचा थांबायचा काही नेम नाही. " सलग पंधरा-सोळा तास काम करून, आहे त्या कपड्यात बिछान्यावर नुकताच पहुडलेल्या निखिलच्या डोक्यात घरी जायचे वेध घोंघावत होते.  


तेवढ्यात त्याचं मोबाईलकडे लक्ष गेलं. बॅटरी कधीचीच डिस्चार्ज होत आली होती. त्याने बिछान्याबाजूचा चार्जर एका हाताने चाचपडला आणि मोबाईल चार्जिंगला लावला तितक्यात मोबाईल खणखणला. "निखिल, अरे मृणालला अचानक दुखू लागलंय, आम्ही आता तिला हॉस्पिटलला घेऊन जातोय." तिकडून फोनवर धीरगंभीर आवाजात सासऱ्यांनी घाईघाईत निरोप दिला.


"बाबा, का काय झालं, मी तासाभरा पूर्वी तर बोललो तिच्याशी. त्यावेळी सगळं ठीक होतं....आणि आता हे.... काय झालंय काय नेमकं?" 


"माहीत नाही, पण तिला पोटात त्रास होतोय. तू काळजी करू नको. डॉक्टरांना भेटल्या नंतर कळवतो. पोहचलोच बघ." बाबांनी वाक्य आवरतं घेत, मृणालच्या हट्टापाई केलेला फोन अखेर ठेवला. 


निखिल पुरता गांगरून गेला. काय करावं ते सुचेना. या थकलेल्या देही आणि या धोधो बरसणाऱ्या अवकाळी रात्री निघावं? का थांबावं? या द्विधा मनस्थितीत तो क्षणभर विसावला. गोंधळलेल्या मनी त्याला, मृणालला दिलेला शब्द आठवला आणि त्वरित कामाचा शीण झटकत ताडकन बिछान्यावरचा उठला. एका बॅगेत कसेबसे कपडे कोंबले, तोंडावर पाणी मारले, मोबाईल घेतला, कारची चावी घेतली आणि सरळ दरवाज्याला कुलूप लावून बाहेर पडला.


घनदाट काळ्या मेघांनी भरलेल्या त्या काळोख रात्री निखिल निघाला तर खरा, पण त्यापुढे होता तो दहा तासांचा खडतर एकाकी प्रवास, बेफाम पाऊस, थकलेल शरीर आणि डोळ्यांत एकवटलेली प्रचंड झोप. या सर्व त्रासाचा त्याला क्षणिकही विचार भेडसावत नव्हता, कारण त्यासमोर होता फक्त मृणालचा चेहरा, तिला दिलेला शब्द आणि त्यांनी भोगलेले, साजरे केलेले ते बारा वर्ष. निखिल समोर भुतकाळ झरझर वाहु लागला.


लग्न होऊन एक तप उलटून गेला होता. दोघांचा संसार अगदी व्यवस्थित चालू होता. फक्त या सुखी संसारात कमी होती ती एका आपत्याची. मृणाल आणि निखिलने बाळ होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त केले होते. पण गर्भ राहतच नव्हता. दुसऱ्यांदा झालेल्या miscarriage नंतर डॉक्टरांनी निर्वाळा दिला होता की गर्भाशयात असलेल्या कमतरतेमुळे गर्भधारणा होऊ शकत नाही आणि यानंतरही जर गर्भधारणा झाली तर मृणालच्या जीवाला धोका होऊ शकतो. ह्या निर्वाळ्याने मृणाल पार खचली होती. पण तिने बाळाची आस सोडली नव्हती. तिने निखिल पुढे खूप हट्ट केला. निखिललाही मूल हवं होतं, पण त्याक्षणी येणाऱ्या आपत्यापेक्षाही मृणाल त्याला जास्त प्रिय होती. त्याकरणावरून दोघात बऱ्याच कुरबुरी झाल्या आणि कित्येक महिने अबोला राहिला. 


"दर डिलिव्हरीला आपल्या हातात येता येता सगळं निसटून जातं,  आणि ह्यावेळी जे डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर तर मी तुझ्या बाबतीत कुठलीच रिस्क घेऊ शकतं नाही." निखिल आपल्या विचारांवर ठाम होता. 


"मला काहीच नाही होणार सगळं ठीक होईल बघ."


"अगं, बाळाचं सुख उपभोगण्यासाठी जर तू सोबतच नसेल तर त्या जगण्यात काय अर्थ मृणाल. त्यापेक्षा आता कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. आपण त्याचा विचार करू."


"निखिल ही शेवटीची वेळ, त्यानंतर तू जे म्हणशील ते होईल. पण प्लिज यावेळी माझ्यासाठी हा लास्ट चान्स....." मृणाल हट्टालाच पेटली होती. 


"नाही मला अजिबात नाही पटत, असो... हे दरवेळेस बघण्यापेक्षा आता मी देवाला साकडं घालतो की कोणाच्याही ऐवजी मलाच...." निखिल पुढे काही बोलणार इतक्यात मृणालने त्याच्या तोंडावर एकदम हात ठेवला आणि त्याला घट्ट मिठी मारली. 


"मला आणि बाळाला काही होणार नाही, यावेळी मी पूर्ण काळजी घेईल. फक्त यावेळी तू माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये रहा." शेवटी मृणालने हट्ट करून त्याला शेवटची संधी घेण्यासाठी मनवले. निखिलच्या फिरस्ती कामामुळे दोन्ही डिलिव्हरीच्या वेळी तिच्यासोबत असणं शक्य होऊ शकले नव्हते. 


"तू आपलं सगळं वदवून घेतेस, तुला समजावणं कठीण... ठीक आहे यावेळी तब्बल दोन महिने रजा टाकतो कामाला." मिठीत घेतलेल्या मृणालच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवत निखिल मृणालच्या जिद्दीपुढे विरघळला. 


पुढे मृणालने स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सात महिने व्यवस्थित पार पाडले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला योग्य ते मार्गदर्शन पुरवले. निखिल आणि घरच्यांनी तिचा पदोपदी सांभाळ केला. आठवा महिना अर्ध्यावरच संपला होता. 


"बाबा, कशी आहे मृणाल, भेटले का डॉक्टर."


"हो भेटले, पण डॉक्टरांनी अजून काही सांगितलं नाही. सध्या ऑपरेशन थेटर मध्ये नेलं आहे. होईल सगळं ठीक तू काळजी करू नकोस."


"ठीक आहे मी निघालोय, सकाळ पर्यंत पोहचतो."


"अरे, कशाला घाई करतोस. इतक्या पावसात आणि इतक्या रात्री निघायची काही गरज नाही. आम्ही आहोत ना इकडे."


"काही प्रॉब्लेम नाही."


"निखिल ऐक माझं, निघाला असेल, नसेल तरी माघारी फिर. उद्या सकाळी निघ. रस्ताही फार खराब आहे रे."


"तुम्ही काळजी करू नका. पोहचतो मी."


"ठीक पण सावकाश ये."


निखिलने हो म्हणूस्तोवर मोबाईल आपोआप बंद झाला. 


"शे....बॅटरी डिस्चार्ज...गडबडीत चार्जेरही राहिला." निखिल त्रागा करत स्वतःच स्वतःला दोष देत बडबडला. 
Rate this content
Log in