Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Mangesh Ambekar

Tragedy Others

3  

Mangesh Ambekar

Tragedy Others

मनोमिलन

मनोमिलन

7 mins
1.0K


"भाजीपाला आणला, किराणा आणला, तुझी गोळ्या-औषधं आणली, दळणही आणलं अजून काही राहिलं असेल तर आत्ताच सांग. मी उद्या गावी गेल्यावर हे कार्ट तुला काही एक आणून देणार नाहीए. नेहमी नुसतं इकडंतिकडं हुंदडत बसतं आणि काम सांगितलं की लागलीच अभ्यासाच नाव पुढे. चार-पाच दिवस तू माझ्याशिवाय कसं निभावशील.... ते देव जाणे."

"तुम्ही काळजी नका करू होईल ऍडजस्ट, तुम्ही जाऊन या गावी निवांत....... तसं स्वारी गावी जाणार म्हणून जाम खुष दिसते, एकदम नव्या नवरीला माहेरची ओढ असते तशी"

"मग असणारच मुळी, तब्बल दहा वर्षांनी जातोय गावी, अण्णा गेले आणि एकदाची नाळ तुटली ती कायमचीच. इतकी वर्ष दुबईत होतो म्हणून जाऊ नाही शकलो आणि मुंबईत आल्यापासून नवीन घर, याची नवीन शाळा, नवीन ऑफिस या सगळ्या नवनव्या जुळवाजुळवीत चार-पाच महिने उलटलेत, पण गावाला जाणं झालं नाही. आता कित्येक वर्षाने नशिबानं खडकेश्वरच्या पूजेचा पण मान आलाय त्यामुळे....जाना तो बनता है यार"

"हो, तेही खरचं.... तुमच्यासोबत मलाही यायची खूप इच्छा होती हो......खूप वर्ष झालीत सुभद्रा काकींना भेटून......अरुची परीक्षा नसती, तर मी पण आलेच असते."

"तुला तर सांगतोय चल सोबत, ते कार्ट काय नशिब पाझळणार ते आपल्याला माहीत आहे." सदाशिवच्या या वाक्यावर इतकावेळ पुस्तकात डोकं खुपसलेल्या अरुणने शेवटी बापाकडे डोळे वटारून पाहिलं आणि सदाशिव म्युट मोडवर गेला. आईने मुलांसमोर केलेला बापाचा उध्दार बघूनबघून, थोडाका होईना पण आईचा गुण अरुणला लागला असावा.

पहाटे गावाला निघायच्या हुरहुरीत रात्री दुर्लक्षित असं अर्धवट जेवणं करून, सदा पहाटे चारचा अलार्म लावून शांत झोपण्याच्या असा अशांत प्रयन्त करू लागला. गावाला जायची अस्वस्थता त्याच्या झोपेचं खोबरं करून गेली. या बेचैनीने चारचा अलार्म कधी एकदाचा वाजतो म्हणून चारदा उठून उठून घड्याळाकडे पाहिलं. चार वाजेपर्यंतची जायची सदाशिवची लगबग पाहण्याजोगी होती.

आणि एकदाचा अलार्म वाजला......

एरव्ही आवरायला तासनतास लावणारा सदा.... वीस मिनिटात आवरून आणि बायकोचा झोपाळू निरोप घेऊन घराबाहेरही पडला. शेवटी आपल्या गावाची ओढ सगळ्यांना हात उंचावून बोलवत असतेचं.....फक्त आपण प्रपंच आणि कामाच्या ढिगाऱ्यातून डोकं वर करून पाहायचं विसरतो.

कारमध्ये 'थोडी आपल्या जमान्याची गाणी लावूयात' म्हणत सदू मस्तपैकी आपली आवडती गाणी कारच्या काचा उंचावून मोठमोठ्याने चिरकत, गुणगुणत निघाला. त्यादिवशी सदाचं मन सर्व जुन्या आठवणींत विरघळून गेलं होतं. चार तासांचा एकटेपणा जुन्या आठवणीत कधी संपला ते कळलंच नाही. एकदाचा गावचा हिरवागार रस्ता दिसायला लागला तसं त्याचं मन ही हिरवंगार झालं.

सलग....न थांबता.... चार तासाच्या प्रवासाअंती सदाने एकदाचा घरासमोर येऊन हॅन्डब्रेक उचलला. अंगणात आलेल्या कारजवळ लुडबुणारी चिल्लरपार्टी सोडता, सुभद्राकाकी तिचा मुलगा विजय आणि सून तेही तेवढ्याच आतुरतेने सदूची वाट पाहत होती.

"तू तर आम्हाला विसरूनच गेला बाबा....फार मोठा झालास" असा नेहमीप्रमाणे नावडतीचा खोचक सूर न लावता काकीने त्याला आणि त्याने काकीला घट्ट मिठी मारली. चाळीशी उलटलेल्या सदाचा गोड पापा वयाची सत्तरी उलटलेल्या काकीने थरथरत घेतला. "कसं सुकलंया म्हव लेकरू" म्हणतं सदाच्या चेहऱ्यावरून आपले कापरे हात फिरवत स्वतःच्या डोक्यावर नेऊन मुडपली.

इतक्या वर्षांनी आलेल्या सदाचा त्या चार-पाच दिवसात यथेच्छ पाहुणचार झाला. सदा अगदी नव्याने आपलं जुनं आयुष्य जगाला..... गावच्या बोचऱ्या थंडीत उबदार गोधडीत मस्त पहुडणं....आळसावत आरामशीर उठणं....अंगणातल्या कोवळ्या कडुनिंबचा दातून तोंडात टाकून बंबातलं पाणी तापूस्तोवर दात घासत बसणं, विहिरीजवळच्या कठड्यावर आंघोळ आटपून काकींच्या हातचा सुंठ-गुळाचा कडक फक्कड चहा फुरक्या मारतं पिणं......रात्रीच्या शिळ्या भाकऱ्या, तेल-तिखट-मीठ, लोणच्यासोबत चवीनं न्याहरी हादडणं....शेतात हुंदडून कुठं बोरं तोडून खा...कुठं उसाचा चोथा कर.......कुठं ज्वारी बाजरी हुरडा भाजून खा.....तर कुठं हरभऱ्याचे घाटे शेकोटीवर भाजून खा. सदाची इतकीवर्ष राहून गेलेली खादाडी खऱ्या मेव्यांवर तुटून पडली होती. दुपारच्या जेवणात काकींच्या हातची चुलीवरचा झणझणीत रस्सासोबत चुरलेली भाकरी....काकीन आपल्या पुरचुंडीतून चुना, काथ, सोपं-सुपारी काढून बनवलेलं नागिलीच साधं पान.....त्यानंतर दुपारची झाडाखालची एक मनसोक्त पडी..... काका, मामा, मावश्या, शाळा, शिक्षक, जुन्या मित्रमंडळीच्या भेटीगाठी......संध्याकाळी देवाळतलं भजन,


Rate this content
Log in