लोकल कल्ला
लोकल कल्ला
लोणावळा - पुणे लोकल ने बरेच लोक प्रवास करतात... त्यातल्याच एका लेडीज डब्यात एका ग्रुप ची फार धमाल चालू असते... दोघी लोणावळ्याहून तर एक मळवली हून... तर चौघी कामशेत... पुन्हा दोघी वडगाव... आणि चार - पाच जनी तळेगाव हून... पारंपरिक पद्धतीने सगळे सण साजरे करतात...गणपती... नवरात्री वेळी तर गाणी ... भोंडल्याची गाणी... बरीच मस्ती चालते... चांगलं चुंगल एकमेकांना खाऊ घालतात.
नवरात्रात खजुराचे लाडू... शेंगदाणा कूट चे लाडू... केळी चे वेफर्स... फळ... असा बराच फरक... काही ना काही मेनू त्यांचा रोज असायचा.
नवमीला उपवास सोडून झाल्यावर स्मिता ने रव्याचे शुद्ध तूपातले लाडू घेऊन आली... लाडू इतके छान होते... दिसायला.. आणि चवीला सुद्धा... जराही चावावा लागला नाही... तोंडात टाकला की विरघळून जावं इतका सॉफ्ट...
सगळ्यांच्या जिभेला इतका टेस्ट आली होती... तोंड भरभरून कौतुक केलं तीच...
रोशनी ने विचारल.. " स्मिते खर खर सांग... कुणी केले लाडू..."
" अग सासूने केले... "
" काय... स्वयंपाक करायला सात वाजेपर्यंत तुझी वाट बघता... कधी लेट झालं तर आठच्या लोकल ची वाट पाहणाऱ्या सासूला... साधा स्वयंपाक करायला होत नाही... आणि एवढे छान लाडू करता येतं..." जयश्री म्हणाली...
" अग म्हणजे त्यांना मसाल्याच्या भाज्या चांगल्या करतात त्या...कच्चा मसाला वगेरे वाटून... " पण भाकरी.. चपाती नाही जमत... " स्मिता ने नेहमी प्रमाणे सासूची बाजू सांभाळून घेत बोलली...
" का.. का नाही येत... तुझ्या आईची शिकवण काढता येते त्यांना... आणि त्यांना नाही का शिकवलं... त्यांच्या आईने... " रोशनी म्हणाली...
" रोशनी... " डोळे मोठे करून स्मिता ने दटाव ल...
"आणि त्या कोकणातल्या माहेर आहे त्यांचं... इकडच्या नाहीत त्या... त्यात लहानपणी लग्न झालं... एकत्र कुटुंब... मग सगळं किचन त्यांच्या सासूनेच सांभाळलं.... मग काही करावं नाही लागलं... आणि त्यातल्या त्यात हे सोवळ्यातले माणसं... मग काय... ह्या भात माशे.. झिंगे.. पापलेट.. खाऊन बटलेल्या.. त्यामुळे कधी करून नाही दिल... त्यामुळे त्यांना नाही जमतं आपल्या सारखं स्वयंपाक... " स्मिता.
" बर ते जाऊ दे.... कसे बनवलेत ते सांग ना... " जयश्री.
" रवा नेहमी प्रमाणे साजूक तूप घालून भाजून घेतला... आणि मग तो थंड केला.... त्यांनतर खोबरं खवून घेतलं... ओला नारळ... ते ही त्या सोबत थोड मिक्स करून परतून घेतल मंद आचेवर .. आणि दुसऱ्या पातेल्यात साखर ठेऊन थोड पाणी घालून उकळून घेतलं... नंतर मग दोन तीन चमचे दूध टाक ल...एकतरी पाक झाला की उतरून ठेवल... त्यात रव्याच मिश्रण आणि सुका मेवा घालून पाच दहा मिनिटं च्या गॅप ने सारखं हलवत ठेवलं... मिश्रण कोमट झाल की ... रव्यासोबत सगळ पुन्हा एकदा सगळ मिक्स केलं आणि हातानं थोड तूप लावून लाडू वळले..." स्मिता.
" वाउ.. मस्त... दिफरन्ट रेसिपी आहे ना...जयश्री.
" हो ना... इतके चवदार लाडू पहिल्यांदा खाल्ले मी..." रोशनी.
" पण मला वाटलं तू केले असशील.. तुझ्या हाताला टेस्ट मस्त आहे ..." सीमा.
" नाही ग... हे प्रत्येक गोष्टीत ओला नारळ अॅड् करणं ह्या कोकणातल्या रेसिपी आहे... इकडे तर दाण्याचा कूट... किंवा मुगाची डाळ... नाहीतर बटाटा... एवढंच टाकतात..." स्मिता.
" ए पण खरंच भारी आहे.. मी ट्राय करून बघेन... नाही जमले तर मला करून देशील ह्या दिवाळी ला... मी सगळं सामान घेऊन येते... फक्त सासू ला विचारून प्रमाण सांग... " रोशनी.
" अग ह्या प्रेविअस जनरेशन च काही प्रमाण नसतं... सगळं अंदाजे.. हो ना ग स्मिता..." सीमा.
" हो...
" हो.. मला पण बेसनाचे लाडू आवडतात खूप... पण त्याही पेक्षा हे खरंच खूप टेस्टी झालेत..." जयश्री.
" अरे खरंच मला .. तुला विचारायचं राहूनच गेलं... की कसे करतेस तू बेसनाचे लाडू... " स्मिता.
" अग जास्त काही अवघड नाहीये... रवाळ हरबऱ्याची डाळ दळून आणायची... बेसन पीठ गावरान तुपात चांगलं भाजून घ्यायचं... मंद आचेवर... पण जळायच नाही याची काळजी घ्यावी लागते... आणि थोडा रवा पण भाजून घ्यायचं...छान सुगंध आला की त्यावर थोड दूध शिंपडून थंड व्हायला बाजूला ठेवायचं.. सगळं थंड करून घेऊन पिठीसाखर घालून थोडे काजू बदाम जाडे भरडे कुटून बारीक तुकडे करायचे... थोड वेलची पावडर... जायफळ पूड घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं... आणि थोडे छोट्या आकाराचे लाडू वळायचे... झाले ... खूप सोपं आहे...आणि थोड भारी शेप पाहिजे असेल तर मोदकाच्या साच्यात थोड तूप लावून ते सारण भरून साच्यातून काढायचं... तो मोदक शे प पण मुल आवडीने खातात... " जयश्री.
" पण बेसन पीठ कधी कधी तोंडामध्ये वरच्या बाजूला चिकटत.. " स्मिता.
" बेसन पीठ खमंग भाजून घ्यायचं... नाही चिकटत... आणि थोडा रवा असला की दाणेदार ही होतात लाडू... तर कडक् होत नाहीत... काही लोक लाडू वळत नाही म्हणून पाणी वापरतात... पण ते लाडू नंतर वास येतो ... त्यामुळे शक्य होईल तेवढं गावरान तुपात बनवून घ्यायचं... " जयश्री.
" म्हणजे सासू बाई तांदळाचे पीठ चे पण तसेच करता लाडू... आत्ता बेसनाचे बोललीस तसे... " स्मिता.
" म्हणजे ग कसे..?"
" तांदूळ तीन दिवस भिजत घालायचे...रोज सकाळी याचे पाणी बदल त राहायचं... आणि परत नवीन पाण्यात भिजत ठेवायच...तीन दिवसांनंतर ते वाळवायचं... आणि वाळल्यावर लालसर होईपर्यंत भाजायाचं...त्यांनंतर त्याचे पीठ करून आणायच..."
" अच्छा... म्हणजे मोदकाच्या खिशी साठी बनवतो तशी पिठी बनवून घ्यायची का..." जयश्री.
" हो... अगदी तसच...खसखस भाजून त्याची पूड क रायची..तूप तापवून त्यात तांदळाचे पीठ भाजायच...दुसऱ्या पॅनमध्ये ओलं खोबरं भाजून घ्यायच...एका भांड्यात एकतारी पाक तयार करायचा...त्या पाकात तांदळाचे पीठ... खोबरं... खसखस पूड आणि वेलची पावडर मिक्स करून एकत्र करून घ्यायच... आणि जरा वाळल्यावर लाडू वलायचे..." स्मिता.
" वाव.. ऐकूनच पाणी आल तोंडाला... मी पण ह्यावेळी बेसनाचे आणि तांदळाचे पीठ चे लाडू बनवणार आहे... आमचे ते पारंपरिक रव्याचे लाडू खाऊन कंटाळा आलंय... प्रत्येक दिवाळीला तेच असतात... " रोशनी.
" ए पण भारी असतात बर का.. म्हणजे आमच्या घरी पण बनवतो आम्ही दिवाळीला पण इतके भारी होत नाही... त्यात आमच्या ह्यांना साजूक तूप आवडत नाही तर डालडा यूज करावं लागतं..". सीमा.
" का ग... चांगलं असतं गावरान तूप शरीराला..." जयश्री.
" अग नाही का
हींना नाही आवडत... स्मेल वगेरे येतो म्हणतात...' रोशनी.
" तुम्ही कसे करतात ग रव्याचे लाडू... " जयश्री.
" काही नाही ग.. आपली जुनीच रेसिपी... आमची फॅमिली मोठी आहे ना... सगळ्यांना द्यावं लागतं मग घरात मुलांपूर्ते साजूक तुपात बनवायचे आणि बाकी सगळे डालडा यूज करून ... " रोशनी.
" अग पण साजूक तुपात उलट मऊसर होतात... " स्मिता.
" पाच सहा किलोच्या आसपास लाडू वळायचे... मग सासूबाई म्हणतात की इतक्या सगळ्यांना द्यायचं असतं... मग एवढ्याने नाही होत... आणि साजूक तूप परवडत पण नाही...'
" त्यात काय .. जिथे ८-१० लाडू द्यायचे .. तिथे २ द्यायचे... " सीमा.
" नाही ग... मग बोलतात आत्येसासू वगेरे.... माझ्या सासूला... की सुनेच्या ताब्यात गेल्यापासून तुझ लक्ष नाही आमच्याकडे वगेरे वगेरे... इतका खर्च होतो दिवाळीत .. पण त्यांना जरा ही समाधान नसतं त्यात.. नेहमी खोच ट सारख्या बोलतात... मग सासू म्हणते जसं आधीपासून चाललय तसच चालु दे..."
" पण यात तुमची दमछाक होते ना... पूर्वी बायका घरी असायच्या... त्यांना वेळ असायचा.. आता त स नाही राहील... घरात पण इतकं करायचं.. बाहेर पण .. त्यांनी थोड समजून घ्यायला पाहिजे... त्यातल्या त्यात तीनच दिवस दिवाळीची सुट्टी आहे..." स्मिता.
" हो ना... आम्हाला आहे शुक्रवार ते मंगळवार... पण त्यामुळे माहेरी नाही जाता येणार..." रोशनी.
" भाऊबीजेला आदल्या दिवशी जायचं.. त्यात काय... आणि दुसऱ्या दिवशी यायचं.. ओवळण वगेरे झाल्यावर.. ' जयश्री.
" आमच्या इकडे आम्ही दोघी सूना भाऊबीजेला सायंकाळी जातो... आणि ह्यावेळी तर दुसऱ्या दिवशी लगेचच ऑफिस आहे... त्यामुळे जाऊन काही उपयोग होणार नाही..." रोशनी.
" कमाल आहे... "
" जाऊ दे... मी शुक्रवारी सायंकाळी येते तुझ्या घरी.. मला लाडू च सारण करून द्यायला सांग ... मग घरी येऊन मी अन माझी जावं.. आम्ही दोघी वळु लाडू... ह्यावेळी घरच्या पुरते तरी थोडे टेस्टी लाडू बनवते... पाहुणे मंडळी ना नेहमीप्रमाणे ... " रोशनी.
" नक्की बनंव... आपण इतकी दिवसभर मेहनत करतो ती आपल्या मुलांसाठी... घरच्यांसाठी च ना... मग लोकांना काय घाबरायच..." स्मिता
" ए स्मिते...अजून काय काय बनवतात ग दिवाळीच्या फराळात तुझ्या सासूबाई..." रोशनी.
" जास्त काही नाही... त्यांना जे आवडत तेच त्यांना छान येत..." स्मिता च्या ह्या बोलण्यावर सगळ्या खळखळून हसू लागल्या...
तितक्यात नेटक्याच लोकल मध्ये एक आजीबाई चढल्या... बसायला जागा नव्हती... मग रोशनी ने तिची बॅग सीमा कडे दिली आणि आजीबईना बसायला जागा करून दिली...
" ए ह्यावेळी दिवाळी ला आपण काहीतरी स्पेशल डिश करू... घरचे पण खुश म्हणजे...काय..." रोशनी तिची मोठ्ठी स्मयिल देत भुवया उंचावत सगळ्यांकडे बघू लागली...
" पण थोडी कमी मेहनत लागेल असच काहीतरी करु..." जयश्री.
" पण काय करायचं... चिवडा शेव चकली.. करंजी... अनारसे .. लाडू... शंकरपाळी... सगळच करतो की आपण..." सीमा.
सगळ्या विचार करू लागल्या... तितक्यात आजीबाई बोलल्या... ए मुलींनो... मी सांगू का ..."
" हो.. हो सांगा.. " रोशनी सगळ्यांकडे बघू न एक्साईट होऊन बोलली...
" पाकातले गुलाबाचे चिरोटे येतात का तुम्हाला..." आजीबाई.
" नाही हो... कधी बनवून नाही बघितल... " सीमा.
" खारे चिरोटे बनवतो... क्रची... पण पकतले कसे... बनवायचे..." स्मिता.
" मी सांगते बघा... खूप सोपे असतात... आणि चवदार पण..." आज्जीबाई.
" अय्या हो का... सांगा सांगा... माझा स्टॉप येईल मग ऐकायचं राहून जाईल..." जयश्री.
" मैदा.. बेकिंग पावडर... चवीपुरं त मीठ एकत्र करून त्याला गरम तूपाच मोहन घालायचं... आणि त्यात थोडा गुलाबी रंग मिक्स करून दूध घालून कणीक भिजव तो तस गोळा भिजवून ठेवायचं... बाजूला थोड तूप फेसून कॉर्न फ्लोअर घालून साठा करून ठेवायचा....
मग त्या पिठाच्या पोळ्या लाटून ठेवायच्या... पण अगदी पातळ लाटून घ्यायच्या... पोळ्या लाटून झाल्या की तो बनवलेलं साठा पोळीवर पसरून गुंडाळी करून ठेवायची... अस..प्रत्येक पोळीवर साठा पसरून त्या आधीची पोळी ची गुंडाळी त्या साठा पसरलेल्या पोळीवर ठेवून गुंडाळी करायची... पुन्हा तिसरी पोळी... साठा. .. आधीची गुंडाळी... पुन्हा त्यावर गुंडाळी..."
" आजी ते गुंडाळी .. म्हणजे..." सीमा.
" अग रोल करायचं... तुम्ही सांगा मी तिला नंतर समजावे न..." रोशनी.
" तर अशा सात आठ गुंडाळल्या झाल्या की... ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं...नंतर त्याचे काप करायचे... आणि थोडी पिठी घालून चिरोटे हलक्या हाताने लाटायच... कढईत तूप तापल की एक एक करून चिरोटे तळून घ्यायचे... पण कढईत टाकल की थोडा दबायच चिरोटा...आणि विणकाम ची सुई ने पाकळ्या मोकळ्या करायच्या...आणि तूप बाजूला उडवायचे पाकल्यांमधून... तळल्यावर अगदी गुलाबाच्या फुला सारखं आकार दिसतो...
सगळे चिरोटे तळून झाले की साखरेचा घट्ट पाक करायचं... प्रत्येक चिरोट्यवर थोडा थोडा पाक घालायचा... आणि शोभेसाठी बदाम पिस्ते चे काप ठेवायचे.. पाक गरम असतानाच चिरोट्यावर पाक आणि बदाम पिस्ते चे काप ठेवायचे म्हणजे चिरोटे पाक आणि सुखमेबा एकजीव होतात... "
" अय्यो अज्जी... किती भारी... ऐकूनच पाणी आल तोंडाला..." स्मिता.
"थोडे अवघडच आहे पण करायला हरकत नाही... पण पाडव्याच्या आधी करूया... म्हणजे पाडव्याला मस्त गिफ्ट पण भेटेल... " रोशनी डोळा मारत बोलली...
सगळ्या खळखळून हसू लागल्या... आजी ही त्यासोबत हसू लागल्या...
" अशाच हसत राहा पोरीनो... छान वाटलं होतं ऐकुन की आजच्या पोरी सुद्धा घरच्यांच्या सुखाचा... आनंदाचा अजून ही विचार करतात.. ते ही नोकरी वगेरे सांभाळून... खरच कौतुक वाटत पोरी हो तुमचं... सदा सुखी राहा... चला... माझं स्टेशन आल... "
" थॅन्क्स आजी इतक्या छान रेसिपी साठी... आम्ही नक्की करून बघू..." स्मिता
" हो आजी... शेवटी घरात आनंद तर आमची ही सकाळ छान जाते... दिवस प्रसन्न जातो... म्हणून ही सगळी मेहनत... स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी थोडी मेहनत तर करायलाच पाहिजे... चला मी पण उतरते य... या माझ्या मागे हळूहळू... नाहीतर लोकल थांबली की चढणार्यांची गर्दी होते... नंतर मुली उतरू नाही देत... " रोशनी
"हो.. हो.. चल लवकर... बकबुड..." जयश्री तिच्या मागे आजींना घेऊन येत बोलली...
अशाच गप्पा मारत प्रत्येकीच स्टेशन आल आणि एक एक करून उतरून गेल्या..