ड्रिंक फ्रेंड भाग 2
ड्रिंक फ्रेंड भाग 2
रेखाला झोपाळ्यावर बेशुद्ध बघून शालू घाबरली...
झोपाळ्याचा दाणकन आवाज झाला...
तशी स्वयंपाक घरातून शालू ची नजर गार्डन मध्ये पडली... आणि ती हातातली कामं टाकून बाहेर पळाली...
" गजा भाऊ... लवकर ये..." शालू
" आलो ताईसाहेब..." गजा
गजा धावतच तिला मदतीला आला...
" मॅडम ला आत घेऊ लाग... बहुतेक चक्कर आलीय..." शालू
" होय ताईसाहेब..." गजा
दोघं मिळून रेखाला आत घेऊन आले... आणि बेडरूम मध्ये झोपवलं....
शालू ने डॉक्टरांना कॉल केला... तोपर्यंत गजा ने लिंबूपाणी पण बनवून आणलं.... शालू सतत रेखाला उठवण्याचा प्रयत्न करत होती...
डॉक्टरांनी तपासले... आणि इंजेक्शन दिले... एक चिठ्ठी लिहून दिली आणि औषध आणायला सांगितले...
शालू ने प्रिस्क्रीपशन गजा कडे देऊन औषध आणायला सांगितले...
डॉक्टरांना निरोप दिला...
काही वेळातच डोअर बेल वाजली...
गजा आला असेल ह्या विचाराने शालू घाईने दरवाजा उघडला... बघते तर पोलीस दरवाजात उभे... ती थोडी घाबरली...
" मी इन्स्पेक्टर शिंदे... आणि हे सहकारी... ह्या कॉन्स्टेबल पवार... आणि हे कॉन्स्टेबल सानप...." इन्स्पेक्टर शिंदे
" बर...काय...." शालू.
"रेखा सबनीस इथेच राहतात का...?" तीच बोलण मध्येच तोडत शिंदे म्हणाले....
" हो... पण का... चौकशी... मॅडम ची..." शालू.
" तुम्ही कोण... ? " इन्स्पेक्टर शिंदे
" मी शालू... त्यांची केअर टेकर... आणि पर्सनल असिस्टंट..." शालू
" बर... तुम्ही ही इथेच राहतात का...?" इन्स्पेक्टर शिंदे
" हो तिकडे सर्वेंट कोटर मध्ये... " शालू ने खिडकीतून बाहेर बोट करून दाखवत म्हणाली...
" पण साहेब... कसली चौकशी...? शालू.
" खूनाच्या चौकशी संदर्भात आलोय..." इन्स्पेक्टर शिंदे
" ख.. खून... पण आमच्या मॅडम चा काय संबंध.. " शालू घाबरतच म्हणाली.
" ते शोधन आमचं काम आहे... मॅडम कुठंय तुमच्या...?" इन्स्पेक्टर शिंदे
" त्या आत आहेत ... त्यांना अचानक बागेत चक्कर आली तर त्यांना आत झोपवले... डॉक्टर आताच येऊन गेले... मला वाटलं गजा भाऊ आला असेल... मॅडम ची औषध घेऊन..." शालू
" गजाभाऊ कोण..."इन्स्पेक्टर शिंदे
" घरकामासाठी आहे इथे बऱ्याच वर्षांपासून... मी येण्याच्या आधी पासून..." शालू.
" तुम्ही कधीपासून आहात इथे..." इन्स्पेक्टर शिंदे
" बारा वर्ष झाले सर.. " शालू.
तितक्यात गजा औषध घेऊन हजर झाला...
" हेच का गजभाऊ... " इन्स्पेक्टर शिंदे
" हो..." शालू.
गाजाभाऊ पोलीस बघून थोड घाबरला...
" तू ही इथेच राहतोस का...?"इन्स्पेक्टर शिंदे
" नाही साहेब ... इथून तीन चार किलोमीटर वर तांबडे वस्तीवर राहतो... " तो थरथरू लागला...
" घाबरु नकोस... फक्त विचारेन तेवढं सांग..." इन्स्पेक्टर शिंदे
" होय साहेब..." गजा
" किती वर्ष झाली इथे... "इन्स्पेक्टर शिंदे
" तीस एक वर्ष झाले असतील साहेब... गावाहून आल्यापासून इथच कामाला आहे... इथच लग्न पोरबळ.. त्यांचं शिक्षण झालं..." गजा.
" बर... जा तू आत... " इन्स्पेक्टर शिंदे
" तुमच्या मॅडम ला औषध द्या... आणि आम्ही आलोय सांगा..." इन्स्पेक्टर शिंदे शालू कडे बघत म्हणाले.
शालू ने प्रिस्क्रिपशन नुसार गोळ्या चेक करून घेतल्या.... आणि बेडरूम मध्ये गेली... तिच्या मागोमाग कॉन्स्टेबल पवार सुद्धा गेली... पण ती बाहेरच उभी राहिली दोघींचं बोलण ऐकत...
" तिने थोड पाणी रेखाच्या चेहऱ्यावर शिंपडल...
ती शुद्धीवर आली..." शालू... मी .. मी तर बागेत..."
" हो... तुम्हाला चक्कर आली होती... उठू नका ... आराम करा..." शालू.
" नाही ... मी... मी ठीक आहे.... " रेखा
" बर हे लिंबूपाणी तरी घ्या... तुम्ही चहा पण घेतला नाही... तसाच होता बाहेर टी पोय वर..." शालू.
तिने ग्लास घेतला... आणि तिला थोडी तरतरी आली...
" मॅडम... बाहेर पोलीस आलेत..." शालू.
" पोलिस.. ? का .." रेखा.
" काही कल्पना नाही... " शालू.
" मी बघते... तू चाहापण्याच बघ त्यांच्या.. आणि ऑफिस मध्ये सांग की आजच्या मीटिंग कॅन्सल करा... आज मॅडम येणार नाही...." रेखा.
" ओके मॅडम..." शालू.
ती उठून बाहेर आली... पोलिस उभे राहिले...
" गूड मॉर्निंग सर...बसा... कशा संदर्भात..."रेखा.
" अकोल्याचे नामंकित व्यावसायिक... आकाश इनामदार यांचा खून झाला आहे..." इन्स्पेक्टर शिंदे
" हो... मी वाचली बातमी..." रेखा.
शालू सगळ्यासाठी चहा पाणी घेऊन आली...
" त्यांच्या फोन कॉल्स मध्ये तुमचाही नंबर आहे... आणि मेसेज लिस्ट मध्ये सुद्धा... म्हणून चौकशी साठी आलो..."इन्स्पेक्टर शिंदे.
रेखा ने त्यांना चहा दिला... स्वतः ही घेतला....
" हो... कालच त्यांच्यासोबत एक मीटिंग होती... त्यासाठी स्काय लार्क मध्ये ... रात्री डिनर ला सोबत होते...." रेखा.
" आणि त्यानंतर....?" इन्स्पेक्टर शिंदे
" त्यांनतर मी माझ्या कार ने घरी आले... मी हॉटेलवर सोडवते विचारल... तर त्यांनी नकार दिला... ते कॅब करून जाणार होते..." रेखा
" तुम्हाला कुणावर संशय...?"इन्स्पेक्टर शिंदे
" नाही साहेब... ते खूप उमदे व्यक्तीमत्व होते... माझी दुसरीच भेट होती... तरीही आपलेपण वाटत होत... " रेखा.
" पहिल्यांदा कधी भेटलेलात...." इन्स्पेक्टर शिंदे
" अकरा महिन्यापूर्वी... त्यांच्याच अकोल्याच्या ऑफिसमध्ये..." रेखा.
" मॅडम... विचारल्याशिवाय शहराबाहेर जाऊ नका..." इन्स्पेक्टर शिंदे
" नक्कीच सर... मी पूर्ण सहकार्य करेन... कारण माझी ही इच्छा आहे की तुम्ही मिस्टर आकाश च्या खुन्याला लवकरात लवकर पकडाव..." रेखा
" तुम्हाला कुणावर संशय....?" इन्स्पेक्टर शिंदे
" पर्सन ली इतकं ओळखत नाही त्यामुळे सांगू शकत नाही सर..." रेखा
" ठीके... येतो आम्ही ... गरज पडल्यास पुन्हा येऊ..."इन्स्पेक्टर शिंदे
" ओके सर..." रेखा
ते तिघेही जायला निघाले... तितक्यात इन्स्पेक्टर शिंदे मागे वळून विचारल...
" तुमचे तसे काही प्रेमसंबंध...?"इन्स्पेक्टर शिंदे.
" ओह... कमोन सर... एक दोन भेटीत कधीही होत नाही... " रेखा.
" तुमच्याकडे बघून वाटत की तुम्ही त्यांच्यात भावनिक गुंतागुंत होती..." इन्स्पेक्टर शिंदे.
" हो... पण तशी अटतच्मेंत माझ्या सगळ्या स्टाफ सोबत आहे सर... तुम्ही हव् तर ऑफिस मध्ये चौकशी करू शकतात... " रेखा
" ती आम्ही करूच... आज केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद..."इन्स्पेक्टर शिंदे
" वेलकम सर... आमचं प्रत्येक नागरिकच कर्तव्य आहे ते...." रेखा.
रेखा सोफ्यावर बसली... तिला आकाश सोबतचे सगळेच क्षण डोळ्यांसमोरून तरळत गेले...
तिचे डोळे पाणावले... तिने कॉल केला...
" हॅलो सामी..."
" येस मोनॅको..." समोरून आवाज आला...
" घरी येशील..." रेखा
" हो... काही प्रोब्लेम...? आवाज थोडा नरम वाटतोय..."
" हो... आल्यावर सांगते सगळ..." रेखा
" बर...आलोच अर्धा तासात...."
ती पुन्हा तिच्या विचारांत हरवून गेली...
पोलिस स्टेशन मध्ये कॉन्स्टेबल पवार रेखाच्या बद्दल सगळी माहिती घेऊन शिंदेच्या केबिन मध्ये गेली...
" जय हिंद सर..." कॉन्स्टेबल पवार.
" बोला मॅडम..." इन्स्पेक्टर शिंदे
" सर ही फाईल... रेखा सबनीस..."कॉन्स्टेबल पवार
शिंदे फाईल मध्ये डोकावतात...
" सर...रेखा... वय वर्षे बत्तीस...भाऊ आणि वहिनी सोडून कुणीही नाही तीच....गरीब घरची सोज्वळ मुलगी म्हणून वयाच्या अठराव्या वर्षी ... सासू सासर्यानी स्वखुशीने आपल्या मुलासाठी लग्न करून आणलेली...तीच महाविद्याल यीन शिक्षण देखील त्यांनीच केलं... लग्नानंतर दोन वर्ष मुलगा न्यूयॉर्क ला गेला... तिथेच सेटल झाला... तिथेच लग्न ही केलं... बिचारी रेखाच मन तुटलं... तिचा डिव्होर्स झालेला... पण सबनीस कुटुंबांनी मुलगी म्हणून तिला दत्तक घेतले... आणि त्यांची रेडीमेड कपड्यांची फॅक्टरी आहे... सगळं बिझिनेस... प्रॉपर्टी... सासुसासऱ्यानी तिचे नावे केली...
अकरा महिन्यापूर्वी ती आकाश इनामदार यांना भेटली होती... ऑफिस च्या कामासंदर्भात... ही त्यांची ऑफिस ची सीसीटीव्ही रिपोर्ट... त्यानंतर कालच भेटली... ती खरं बोलत होती सर..."
" मॅडम... लगेच निष्कर्ष काढून चालणार नाही... मर्डर वेपन मिळालेलं नाही... इन्फेक्ट मर्डर कसा झाला त्याच निदान पोस्ट मोर्तम रिपोर्ट मिळाल्यावरच कळेल... आपली एक चूक सुद्धा महागात पडू शकते... हायप्रोफाइल केस आहे... वरून जास्त प्रेशर आहे आपल्याला... चांगली पाळत ठेवा रेखा मॅडम वर..." इन्स्पेक्टर शिंदे
" ओके सर..." कॉन्स्टेबल पवार.
आणि ती सलुट करून बाहेर गेली...
इन्स्पेक्टर शिंदे विचारात पडले... त्यांना सॅम ची आठवण झाली...त्यांनी मोबाईल वरून एक कॉल केला...
" सॅम... कुठंय..."इन्स्पेक्टर शिंदे
" घरीच आहे सर... "
" कधी भेटशील... महत्वाचं काम आहे..?" इन्स्पेक्टर शिंदे
" आता रेखा ने बोलवले होते...तीच महत्वाचं काम आहे... तिच्याशी बोलून लगेच येतो..."
" ओके.. आय विल बी वेटींग फॉर यू..." इन्स्पेक्टर शिंदे
" थँक यू सर..."
सॅम... समीर... रेखाचा ड्रिंक फ्रेंड... वयाने समीर सहा सात वर्षे लहान पण रेखाचा बेस्ट फ्रेंड... आणि जेव्हा काहीच क्लू मिळत नाही तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे ची एकमेव आशा...
क्रमशः
