Sangita Tathod

Crime

4  

Sangita Tathod

Crime

नागपंचमी ते रक्षाबंधन

नागपंचमी ते रक्षाबंधन

33 mins
323


  नुकताच पावसाचा शिडकावा पडून गेला

होता . त्या रीमझिम सरींनी वृक्ष, वेली

ओल्याचिंब झाल्या होत्या . शेतातील नवी 

कोवळी रोप या पावसाचा मनसोक्त

आनंद घेत होती . कधी उन तर कधी सावलीचा

लपाछपीचा खेळ बघून त्यात रमत होती .

त्या खेळात सहभागी होऊन वाऱ्यावर डोलत

होती .मनासारखा पाऊस झाल्याने शेतकरी राजा 

खूष होता . ओंकार रावांच्याच्या घरात सुद्धा , आनंदाचे

वातावरण होते . त्याची नात सुषमा दहावीच्या

परीक्षेत ब्यांनव टक्के मार्क्स मिळवून शाळेत

प्रथम आली होती . आबा सुषमावर खूष होते .

आपल्या घराण्यातील तू पहिली अशी आहेस

की, जिने शाळेत पहिली येऊन आपल्या

घराण्याचे नाव काढले . सुषमा आणि आबांचे

छान जमायचे . सुषमा एक दिवस आबांना

म्हणाली ,


सुषमा : " आबा , खूप दिवस झाले, रजनी 

आत्याची भेट नाही . "


आबा : " अग अस काय बोलतेस , आत्ताच तर

तुझा रिझल्ट लागला होता, तेव्हा तुझे अभिनंदन

करायला आली होती की , लाडकी आत्या."


सुषमा : " त्याला दोन चार महिने झाले . मला

आत्याची खूप आठवण येतेय ."


आबा : " मग फोन करून, तिच्याशी बोल. 

नाहीतर ते एकमेकींना दिसतात तो कॉल कर . 

काय म्हणतात ग , त्याला ?"


सुषमा : " व्हिडिओ कॉल."


आबा: " हा _ _ व्हिडिओ कॉल करून . तुझ्या

आत्याशी बोल ."


आबा : " आबा , मला आत्याला भेटायचे आहे ."


आजोबा , नातीचे बोलणे ऐकून तिथे सुषमाची

आजी आली . ती हसत हसत म्हणाली,


आजी : " अहो _ _ सुषमा इतके म्हणतेय तर,

बोलावून घ्या ना लेकीला ."


आजोबा : " काही नको , पोरगी, तिच्या घरी

सुखात आहे ना , राहू दे. उगाच नेहमी नेहमी

माहेरी आल्याने , आपल्या पण घरात वाद नको

अन् तिच्याही घरात वाद नको ."


आजी : " वाद कशाला होतील ? पोरीबाळींचा

हक्क असतो म

माहेरावर . उदया सुषमा सासरी गेली

तर माहेर विसरणार थोडीच आहे ? तिचेही हे

माहेर हक्काचे असेल . तसेच रजनीचे पण आहे ."


आजोबा : " तिचा हक्क मी नाकारत नाही , पण

_ _ ."


आजी : " पण काय ?"


आजोबा : " पण इतक्यात रजनीचे आणि तिच्या

भावाचे फारसे पटत नाही . काहीतरी कारणावरून

त्यांची सारखी कुरबुर सुरू असते ."


आजी : " बहीण भाऊच ती . थोडीफार तू तू

मैं मैं _ _ होणारच . बारीसारीक गोष्टीवरून

रक्ताचे नाते , थोडीच तुटणार आहे ?"


आजोबा : " पहा तुझी इच्छा असेल तर , पंचमीला 

रजनीला बोलावून घे ."


आजोबांनी रजनी आत्याला बोलावून घे , म्हणताच

सुषमाने लगेच आत्याला कॉल केला . तिने तो

रिसिव्ह केला .


सुषमा : " हॅलो आत्तू कशी आहेस ?"


रजनी : " मी मस्त आहे ग , तिकडे सर्व कसे

आहेत ?"


सुषमा : " आम्ही सर्व मजेत आहोत . आत्ता

तुझीच आठवण काढत होतो ."


रजनी : " माझी आठवण ? "


सुषमा : " आजीने तुला नागपंचमीला बोलावले."


रजनी : " हो का ?"


सुषमा : " चार दिवसांनी पंचमी आहे . तू जरूर

ये ."


रजनी : " नाही ग , जमणार नाही . शेतीची कामं

आहेत ."


सुषमा : " ते काही नाही आत्तु _ _ ! तू यायलाच

पाहिजे ."


रजनी : " अग खरंच नाही जमत बेटा ."


सुषमा : " आत्तु प्लिज ये ना ग _ _ .. अस काय

करतेस . तुझे गाव जवळ असल्याने तुला

बोलावते . मी जर बारावी नंतर कुठे लांब

शिकायला गेली तर , तुला थोडीच बोलणार

आहे ."


रजनी : " ठिक आहे, सुषमा , बघते . आजीकडे

दे फोन ."


सुषमा ;" हो देते , पण तू नक्की यायचं, बर का ? "


रजनी : " हो बाई मी नक्की येईल ."


सुषमाने आजीकडे मोबाईल दिला . ती निघून

गेली .


आजी : " हॅलो _ _ ."


रजनी : " काय ग आई कशी आहेस ?"


आजी : " फक्त फोनवरच विचारते का ? भेटीला

नाही येणार का ?"


रजनी : " सुषमा बोलावते म्हणून येते . तशी

माझी फारशी इच्छा नाही . पण सुषमाचा

आग्रह आहे , म्हणून येते ."


आजी : " माझा जीवात जीव आहे , तोवर येत

जा . मी गेल्यावर मग , भावजयने बोलावले

तरच  यायचे. माय बाप असेपर्यंत मान

पान बघायचा नसतो . आठवण आली , काही

अडचण आली , की लेकीसाठी माहेर हे

हक्काचे असते ."


रजनी : " बर आई , येते मी ."


रजनीने येतो म्हटले . तिच्या येते या ,शब्दानेच

आईचा जीव सुखावून गेला . माय लेकीच 

नात असतेच तस .. लेक जवळ असते , तेव्हा

माय तिला जरा काही चुकले की, रागावते .

 पण ती जेव्हा सासरी जाते , तेव्हा.तिच्या 

भेटीसाठी कासावीस होते . लेक येणार म्हणून

सुषमाची आजी सुरेखा बाई मनातून खूष झाली .

पण तिकडे सुषमाच्या आईचे म्हणजेच पुष्पाचे 

तोंड फुगले . हे आजोबांच्या आणि आजीच्या

लक्षात आले . लगेच आजोबा म्हणाले,


आजोबा : " बघ , रजनी येणार , हे ऐकूनच

सुनबाईचे बघ कसे तोंड फुगले ."


आजी : " जाऊ द्या तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका .

हे घर आपलेही आहे . आपल्या घरी हक्काने

आपल्या लेकीला बोलवायचा आपल्याला

हक्क आहे ." 


आजोबा : " तुझ म्हणणं बरोबर आहे . मी फक्त

रजनीच्या मुलाची फर्स्ट इ्यरची दिड लाख फी

भरली म्हणून समीर , किती चिडला होता ."


आजी : " जाऊ द्या , मागच्या गोष्टी आता अखडून

काढू नका ."


सुरेखा बाईंनी नको असलेला कटू विषय लगेच

बंद केला . पण मनातील विचारांना थांबविणे 

शक्य आहे का ? ते तर सतत सुरूच राहतात .

जरा काही , आवाज झाला की , मनात खळबळ

होते अन्  नको असलेले पुन्हा जसेच्या तसे

आठवते . आता हेच बघा ना , मागील दोन

वर्षापूर्वी घडलेली घटना सुरेखा बाईंच्या नजरें

समोर जशीच्या तशी उभी राहिली _ _ _ 


रजनीचा मुलगा , बारावी झाला होता . त्याचा

एका चांगल्या इंजीनिरिंग कॉलेजला नंबर 

लागला होता . पण त्याची फी भरायला 

रजनीकडे पुरेसे पैसे नव्हते . ती लगेच तिच्या बाबांकडे म्हणजेच ओंकाररावांकडे पैसे 

 मागायला आली .


रजनी : " बाबा यशच्या एडमिशन करीता 

मला. दिढ लाख रुपये हवे आहेत . काहीही

करून तुम्ही मला द्या . मी जमेल तसे लवकरात

लवकर परत करेल . पण बाबा नाही म्हणू

नका .,"


ओंकरराव : " काही व्यवस्था होते काय , ते

बघतो ."


तिथे जवळच उभा असलेला रजनीचा भाऊ

सुधीर रागाने म्हणाला ,


सुधीर : " आता पेरणीचे दिवस आहेत . शेत

पेरायला पैसे लागतात . तुला कोठून देणार

पैसे ?"


रजनी : " अरे , सुधीर यशच्या शिक्षणाचा प्रश्न

आहे म्हणून _ _ _ . नाहीतर मी मागितले नसते .

आणि मी लगेच परत करेल ना _ _ , तुमचे 

पैसे ."


सुधीर : " कशी परत फेड करशील ? अजून

पर्यंत  दाजींच्या आजारपणात घेतलेले 

पन्नास हजार परत केले नाहीस . दिढ लाख

कसे परत करशील ?"


रजनी : " कसे परत करायचे ते माझे मी बघून

घेईल . पण आता माझ्या यश साठी मला मदत

करा ."


सुधीर : " ते काही नाही . आधी मागचे पन्नास

हजार परत कर. मग हवे तर दोन लाख रुपये

घेऊन जा ."


रजनी : " माझ्या कडे पन्नास हजार रुपये असते,

तर मी परत केले असते . पण मागच्या वर्षी

तुझ्या दाजींच्या आजारपणात खूप खर्च झाला .

माझ्याकडे खरचं पैसे नाहीत ."


सुधीर : "तुझ्याकडे पैसे नसतील तर , यशला

शिकवू नको . पण आम्हाला त्रास देऊ नको ."


ओंकरराव : " सुधीर तू , असे कसे काय बोलू

शकतोस ? यश तुझा भाचा आहे . त्याच्या

शिक्षणाला मदत केली तर , बिघडते काय ?"


सुधीर : " यशच्या शिक्षणाला मदत करायला

हरकत नाही . पण ताईचे आता हे , नेहमीचेच

होऊन बसले . कधी आजारपणात मदत करा,

कधी पेरणी करीता पैसे द्या , तर कधी तिच्या

घरातील किराणा सामान भरून द्यावं . आम्हाला

आमचा संसार आहे की नाही ? "


रजनी : " तुमच्या समोर हात पसरवायला मला

तरी कुठे बरं वाटते ? पण या दोन वर्षात आमच्या

पुढे परिस्थितीत अशी आली , तर त्याला मी

तरी काय करू ?"


ओंकारराव : " जावईबुवा मोठ्या अपघातातून

वाचले , हेच देवाचे उपकार आहेत . त्यांच्या

दवाखान्यात तिचे दोन चार लाख तरी गेले

असतील . त्यामुळे तिला आपल्या समोर हात

पसरावे लागत आहेत ."


रजनी : " हो ना _ _ त्यात दोन वर्षापासून पीकपाणी

पण बरोबर होऊन राहील नाही ."


सुधीर : " हे तुझ नेहमीच रडगाण आहे ताई . मला

सांगू नको . मी तुला एक रुपयाची पण मदत

करणार नाही ."


सुधीरच्या या बोलण्यामुळे ओंकार राव खूप

संतापले . ते सुधीर वर हात उगारत म्हणाले ,


" खबरदार पुन्हा असं बोललास तर _ _ अजून

पूर्ण जमीन माझ्या नावावर आहे . माझी लेक

म्हणून रजनीचा पण त्यात वाटा आहे . तू जर

जास्त नखरे करशील तर , तिचा अर्धा हिस्सा

मी तिला देईल ."


रजनीची आई मध्ये पडत म्हणाली,


"भरल्या संसारात असे वाद करू नका . मी

तुमच्या पाया पडते . बाप लेक भांडू नका ."


रजनी : " बाबा , माझ्यामुळे तुमच्यात वाद होत

असतील तर मला नको तुमची कोणतीच मदत .

मी दुसरीकडे काही व्यवस्था होते का ? ते बघते ."


ओंकारराव : " त्याची काही गरज नाही . तू

दिढ लाख रुपये घेऊन जा ."


सुधीर : " म्हणजे तुम्ही माझे , ऐकणार नाही तर !"

मी इकडे शेतात मर मर करून पैसे कमवायचे

आणि तुम्ही ते , तसेच ताईला देऊन टाकायचे ."


ओंकारराव : " हे बघ , सुधीर तिची अडचण आहे,

म्हणून तिला मदत करतोय ."


सुधीर : " तिच्या अडचणी कधीच संपणार नाहीत .

मग काय आयुष्यभर _ _ ! तिला भिक टाकायची ?"


ओंकारराव : " तोंड संभाळून बोल . जर तुला

भाऊ असता तर , त्याचा इस्टेट मध्ये हिस्सा

पडलाच असता ना _ _ ! असे समज की रजनी

माझी दुसरा मुलगा आहे . मी तिला तिचा हिस्सा

देतोय ."


रजनी : " नाही बाबा , मला हिस्सा वगैरे नको ."


ओंकारराव : " तुला जरी हिस्सा नको असेल , तरी

हा तुझा नालायक भाऊ , निती सोडून वागत

असेल तर , मला तुला हिस्सा देण्याचा विचार

करावा लागेल ."


सुधीर : " तुम्हाला वाटेल ते करा ."


ओंकारराव : " मला जे योग्य वाटेल ते मी करेल.

मला काही कुणाची भीती न्हाई ."


सुधीर तेथून पाय आपटत निघून गेला . त्यानंतर

ओंकाररावांनी रजनीला तिच्या मुलाच्या एडमिशन

करीता दिढ लाख रुपये दिले . बाबांनी आपले 

ऐकले नाही म्हणून सुधीर चांगलाच नाराज झाला .

तेव्हा पासून बाप , लेकांचे लहान सहान कारणां

वरून वाद होऊ लागले . वाद झाले की , 

ओंकारराव रजनीला हिस्सा देण्याच्या गोष्टी

 करीत . ते ऐकून सुधीरचा पारा चढत असे .

रजनीला. जेव्हा ही , गोष्ट कळली., तेव्हा तिने

सुधीरला समजावून सांगितले , की मी तुझ्या

कडून कोणताही हिस्सा घेणार नाही . तू उगाच

बाबांशी वाद घालू नको . घरातील शांती भंग

करू नको . तिकडे सुधिरची बायको त्याचे

कान भारत असे , की तुम्हाला गाफील ठेवून

मामांजी आणि रजनी ताई आपल्या वावराचे

खरंच दोन हिस्से पाडतील . तुम्ही सावध रहा .

आपल्या जमिनीतील एक तुकडाही ताईला

मिळायला नको . सुधीरला बायकोचे म्हणणे

 पटायचे . ती अधून मधून आगीत तेल ओतत होतीच . भरीस भर म्हणजे ओंकाररावांनी 

रजनीला सुधिरचा नकार असल्यावरही दिढ 

लाख रुपये दिले होते . त्यामुळे सुधीरने रजनीशी

बोलणेच सोडले होते . ती माहेरी आली की.,

तो. तिच्याशी एक शब्दही बोलत नसे . हे बघून

रजनीला वाईट वाटायचे . ती आईला म्हणायची

की ,. सुधीरला माझे इथे येणे आवडत नसेल

तर , मी माहेर बंदच करते . बोलल्या प्रमाणे

रजनीने माहेर येणे बंद केले होते . आली तरी

थोडा वेळ थांबायची आणि लगेच निघून जायची .

पण आता लाडक्या भाचीचा आग्रह ती मोडू

 शकत नव्हती. त्यामुळे . रजनीने तिच्या आईला

, मी नागपंचमीला येतेय असा , निरोप पाठविला .

रजनी खूप दिवसांनी येणार म्हणून , 

बाई खूष झाल्या . ती येणार असल्याची बातमी

सुधीरच्या कानावर गेली . तो त्याच . रात्री मुद्दाम

ओंकाररावांना म्हणाला ,


सुधीर : " आता काय लाडाची लेक येणार आहे

तर , बाबा देतील पैशाच्या गड्ड्या काढून ."


   आई :" रजनी पैसे मागायला येत नाही .तिला

सुषमाने आग्रहाने बोलावले म्हणून येत आहे ."


ओंकारराव : " आपल्याकडे खोऱ्याने पैसा नाही.

की आपण रजनीला गड्डया काढून देऊ . तिला

गरज होती . तेव्हाच पैसा दिला ."


सुधीर : * हो , पण. तो. देऊन आता दोन वर्ष

झाली . तिने तो परत नाही केला ना._._ !"


ओंकारराव : " करेल ."


सुधीर : " मला आत्ताच पाहिजे . माझी हिरो होंडा

जुनी झाली . सारखी बिघडत राहते . "


ओंकारराव : " यावर्षीचे पिकं आले की , घे ."


सुधीर : " ताईकडे आपले दिढ लाख रुपये आहेत .

ते मागून घ्या आणि मला नवी गाडी घेऊन द्या ."


ओंकार रावांनी सुधीरला नकार दिला . झाले

यावरून त्या दोघांची शाब्दिक चकमक सुरू

झाली . सुरेखा बाईंनी ती कशीबशी मिटवली .


नागपंचमी दोन दिवसांवर आली . सुरेखा बाईना

रजनी येण्याचा आनंद होता . पण दोघा बहीण

भवांचे काही भांडण तर होणार नाही , ही धास्ती

सुद्धा होती . पण जे होईल त्याला सामोरे जाऊ

असा विचार  करून सुरेखाबाई रजनीला 

आवडणारे पुरीचे बेसन लाडू करायला बसल्या .


तोच सुधीर आला . आईला बेसन लाडू करतांना

बघून म्हणाला ,


" अरे व्वा , ताईच्या आवडीचे लाडू करतेस."


सुरेखा बाईं : " हो रजनी नागपंचमीला येत आहे ."


सुधीर : " मला सांगायचे असते . मी सर्व सामान 

आणून दिले असते ."


सुरेखा बाई : " घरात सर्व सामान होतेच बाहेरून

आनायची काही गरज नव्हती ."


सुधीर : " बर ठीक आहे, कर तू लाडू ."


सुधीर निघून गेला . तो जाताच ओंकारराव हळूच

सुरेखा बाईच्या कानात म्हणाले ,


" आज सुधीर खूष दिसतो . रजनीचे नाव घेतले

तरी चिडला नाही ."


सुरेखा बाई : " कितीही झाले तरी, बहीण भावाचे

रक्ताचे नाते आहे . थोड्याफार कुरबुरीने काहीही

फरक पडत नसतो . तुम्ही बघाच रजनी आली

की कसा गोड बोलेले तिच्याशी ."


ओंकार राव : " मला तरी दुसरे काय हवे आहे ?

दोन्ही बहीण भावांनी आनंदात राहावे नि सुख

दुःखात एकमेकांना मदत करावी . हेच पुरे आहे ."



दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता रजनी

माहेरी आली . ती येताच सुषमामाने तिला घट्ट

मिठी मारली . तिला हात पाय धुवायला पाणी 

दिले . प्यायला पाणी दिले . सुरेखा बाईंनी 

लेकीच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरविला .

सुधीरच्या बायकोने खोटे हसू आणून रजनीचे

स्वागत केले . चहाचा कप , तिच्या हाती दिला .

माय , लेकींनी सुख दुःखच्या गप्पा केल्या . 

सुषमा तर सारखी अत्याच्या मागे पुढे करत होती .

दुपारी शेतावरून सुधीर घरी आला . रजनीला

बघून त्याच्या डोक्यावर आठ्या पडल्या . पण

थोड्याच वेळात , सुधिरच्या मनात काय आले

कुणास ठाऊक ? तो रजनीला म्हणाला ,


सुधीर : " केव्हा आलीस ताई ?"


रजनी : " सकाळीच आली ."


सुधीर : " जेवलीस का ?"


रजनी : " नाही रे."


सुधीर : " खूप उशीर झाला . जेवून घ्यायचे असते .

भूक लागली असेल ना _ _!"


रजनी : " तुझी सुषमा इतकी गोड आहे की ,

तिच्याशी बोलताना तहान भूक हरवून जाते ."


सुधीर : " पक्की आत्यावर गेली आहे ."


दोघा बहीण भावातील नाते , सुधारत असल्याचे

बघून ओंकार राव आणि सुरेखा बाईंना छान

वाटते . सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले . खूप

दिवसानंतर आज घर हसत होते . दुसऱ्या दिवशी

नागपंचमी होती . सुरेखा बाईंनी पूजेचे सामान

विकत घेतले होते . लाह्या फुटाणे , त्या एका

डब्यात भारत होत्या . तोच बाहेरून चार पाच

बायकांचा घोळका आत आला . त्यांच्या हसण्या

खिदळण्याच्या आवाजावरून त्या रजनीच्या

मैत्रिणी आहेत हे सुरेखा बाईंनी ओळखले . 

अंजू , कमला , गीता , अबोली सर्वच आल्या

 होत्या. त्या येताच त्यांना बसायला रजनीने  

चटई अंथरली .


रजनी : " बसा ग , बरं झाले तुम्ही सर्वजणी

सोबतच आल्या ."


अंजू ,: " आम्ही तर नेहमी भेटतो ग . पण तूच

अशी आहेस की, तुझी फारशी भेट होत नाही ."


रजनी : " अग , संसाराचा व्याप असा वाढला

की कुठे जायला फुरसत मिळत नाही ."


गीता : " संसाराचा व्याप काय फक्त तुला एकटिला

आहे ? आम्हाला संसार नाही का ,?"


अंजू : " हो ना _ _ जेव्हा बघावं तेव्हा रजनीला

घाई असते . कधी निवांतपणे चार आठ दिवस

माहेरी राहत नाही ."


अबोली : " तेच सांगायला आम्ही आलो आहोत .

उदया नागपंचमी आहे . आपण पहिल्या सारखे

रानातील कडुनिंबाला झोके . बांधून मस्त खेळू.


मी माहेरी सुधीर मुळे राहत नाही . आम्हा दोघा

बहीण भावाचे फारसे पटत नाही. हे तुम्हाला

कसे सांगू . असे रजनी मनांत म्हणाली . पण 

मनातील दुःख मनात ठेवत ती म्हणाली ,


" आता आली आहे ना , तर मस्त मज्ज्जा करू ."


" पण तुम्ही आता सोळा वर्षांच्या नाही , याचे

भान ठेवून खेळा." सुरेखा बाईं सर्वांसाठी चहा

घेऊन येत म्हणाल्या .


खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणीची गप्पांची छान

मैफिल जमली .शेवटी आभाळ भरून आले, तेव्हा

त्या जाण्यास निघाल्या . जाण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी

बरोबर एक वाजता , साखऱ्या विहिरी जवळच्या

माळरानात सर्वांनी भेटायचे ठरविले . सर्व मैत्रिणी

निघून गेल्यावर रजनीला ते लग्ना आधीचे दिवस

आठवले . काय मज्जा यायची तेव्हा _ _ ! 

श्रावण आला की , सोबत विविध सण घेऊन

येत येतो . पावसाच्या सरी जश्या तप्त धरेला

तृप्त करतात . तसेच श्रावणातील सण , कामाने

पिचलेल्या देहाला मानसीक शांती देतात .

तसेच दोन दिवस माहेरी आल्याने संसाराच्या

दुःखाचा काही काळ विसर पडतो .


रजनीने यावर्षी नागपंचमीच्या सणाचा मनसोक्त

आनंद लुटण्याचा निश्चय केला होता . ती पंचमीला

सकाळी लवकर उठली . सुधीरच्या बायकोला

तिने प्रत्येक कामात मदत केली . घरी पाटावर

चंदनाच्या उटीने नगोबाचे चित्र रेखाटले . त्याला देव्हाऱ्यात

ठेवून मनोभावे त्याची पूजा केली . लाह्या 

फुटण्याचा नैवेद्य दाखवला . सुरेखा बाईंनी

आंबूस घाऱ्या आणि लाडूचा बेत केला होता .

सुधीर सोबत तिने जेवण केले . सुधीर सुद्धा

त्याच्या बायकोला रजनीला आग्रहाने वाढायला

सांगत होता . रजनी आज नेहमी पेक्षा जास्तच

जेवली होती . जेवण झाल्यावर तिला झोपेची 

गुंगी येऊ लागली . डोळे भारी पडत होते . थोडा

वेळ आराम करावा असे , तिच्या मनात आले .

ती जाऊन पडणार तोच , तिच्या मैत्रिणी तिला

बोलवायला आल्या . मैत्रिणीचा घोळका दिसताच

रजनीची झोप पळाली. तरीही तिने तोंडावर पाणी

मारले . तोंडावर थोडीशी पावडर लावली . साडी

आणि केस ठिक केले.


अंजू : " अग चल ग , रजनी पटकन ."

कमला : " चल उरक पटकन . पाऊस आला तर

आपला खेळ होणार नाही . "


अंजू : " आज आभाळ स्वच्छ आहे . पाऊस 

येईल असे वाटत नाही ."


कमला : " श्रावण महिना सुरू आहे , स्वच्छ

आभाळात केव्हा काळे ढग जमा होतील हे

सांगता येत नाही . लवकर निघायला हवे ."


अंजू : " चल ग , रजनी ."


रजनी : " हो हो , आलेच ." केस ठिक करत

रजनी म्हणाली .


अबोली : " मेक अप करायची काही गरज नाही.

तू सुंदरच आहेस ."



.

गीता : " आणि तुला बघायला काही दाजी येणार

नाहीत . जशी आहेस तशीच चल ."


गीताच्या बोलण्याने सर्वजणी हसायला लागल्या .


रजनी येते ग आई , असे म्हणत निघाली.


सुधीर : " ताई पायवाट निसरडी आहे , जरा

सांभाळून जाशील ."


" माझी काळजी करू नको . मला महेरातील

सर्व पायवाटा माहिती आहेत . " असे म्हणत 

रजनी निघाली . गावाला लागून असलेल्या

साखऱ्या विहिरी जवळच्या मळ्यात नागपंचमी

निमित्ताने कडुनिंबाच्या झाडाला . मोठली 

झुले बांधली होती . त्यावर बऱ्याच जणी 

झोके घेत होत्या . माहेरी आलेल्या लेकींची

तिथे वर्दळ होती . एकमेकिंना सुख दुःख

वाटून घेत सर्वजणी . झोके घेत होत्या . रानाचा

हिरवा गारवा अन् मैत्रीचा जिव्हाळा यामुळे 

संसाराचा व्याप विसरून रजनी आज 

श्रावणाच्या सरीप्रमाणे मनसोक्त बरसणार

होती . तिचा उत्साह बघून , तिचे वय हळूच

मागे सरले अन् मनातील इंद्रधनू सप्तरंग घेऊन

खुलले . त्या इंद्रधनुच्या झुल्यावर , ती बसली .


मन गात होते

मन डोलत होते

मन रमत होते

मन रडत होते

कडू, गोड

 आठवणीच्या

झुल्यावर मनसोक्त 

मन ,झुलत होते 


रजनी झोक्यावर बसली गीता तिला झोके देत

होती . आणखी उंच झोका दे , आणखी उंच

झोका जाऊ दे , असे म्हणून ती मुक्तपणे हसत

होती . आता मला झोका खेळू दे , असे म्हणून

अंजू झोक्यावर बसली . रजनी तिला झोके देत

होती . काही वेळाने पुन्हा रजनी झोक्यावर

बसली . तिला सर्वजणी आळीपाळीने झोके 

देत होती . रजनीला आज झोका सोडावा वाटतच

नव्हता . सर्वजणी थकल्या. पण रजनी अजूनही

उत्साही वाटत होती . नागपंचमीची गाणे गात

ती झुलत होती . 


  संध्याकाळचे चार वाजत आले असतील .

निरभ्र आकाशात अचानक शामल मेघांनी गर्दी

केली . हळूहळू काळया ढगांचा अंधार दाटू

लागला . सर्वजणी घरी निघायला लागल्या .

तरीही रजनी मात्र , झोके घेत होती . गीताने

तिला आवाज दिला . 


गीता : " रजनी बस झाले झोके खेळणे . चल

घरी जाऊ . पाऊस सुरू होण्याआधी घरी 

पोहचायला हवे . " 


रजनी : " अग , थांब थोडावेळ , इतक्यात नाही

येत पाऊस ."


गीता : " असं काय करते रजनी ? सर्वजणी निघाल्या

पण आपण दोघीच इथे आहोत ."


रजनी : " तुला जायचे असेल तर , तू जा . मी

नाही येत . "


गीता : " मी खरचं निघून जाईल बर ."


रजनी : " अग जा की _ _ पाऊस सुरू झाला तर ,

मी येईल धावत .तू नको काळजी करू . या 

गारगार वाऱ्यात झोके खेळायला खूप मज्जा

येत आहे ."


गीता : " अग , तू पण चल ना _ _ !"


रजनी : " गीता जा तू , मी येते मागून."


    नाईलाजाने गीता निघून गेली . रजनी लहान

मुलासारखे मस्त झोके घेत होती . आकाशातून

सरसर पावसाच्या सरी बरसू लागल्या . तरीही

तिचे झुलणे सुरूच होते . बघता बघता , सरसर

सरींनी मुसळधार पावसाचे रूप घेतले . श्रावणात

पाऊस हा उन , सावलीचा लपंडाव खेळत असतो.

पण आज का कुणास ठाउक त्याला मुसळधार

बरसायची इच्छा झाली . तो मुसळधार बरसत

होता अन् रजनीच्या झोक्याचा वेग हळूहळू कमी

झाला होता _


रात्र बरीच झाली . तरी रजनी घरी आली नाही .

म्हणून ओंकारराव काळजीत पडले . ते 

बायकोला म्हणाले ,

.

" रजनीने आता पर्यंत घरी यायला हवे होते ."


सुरेखा बाईं : " पाऊस सुरू आहे ना _ _ तर 

कुठेतरी थांबली असेल ."


ओंकार राव : " सुषमा जरा छत्री घेऊन जा

आणि ती कुणाकडे. थांबली असेल तर बघून

ये . तिला फोन करून विचारावे तर, तिने मोबाईल

घरी ठेवला आहे ."


सुषमा बॅटरी आणि छत्री सोबत घेऊन आत्याला

शोधायला गेली . रजनीच्या सर्व मैत्रिणीकडे ती

जाऊन आली . पण रजनी कुणाकडेच नव्हती .

सुषमा घरी परत आली . आत्या कुठेच दिसली

नसल्याचे तिने आजी आजोबांना सांगितले .


आता मात्र ओंकाररावांच्या पायाखालची जमीन 

सरकू लागली . त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू 

लागले . तोच सुधीर आला. त्याला बघताच 

ओंकाररावांच्या जीवात जीव आला . ते त्याला

म्हणाले ,


"सुधीर रात्रीचे अकरा वाजत आले . रजनी

अजूनही घरी आलेली नाही . "


" बाहेर पाऊस सुरू आहे . थांबली असेल 

कुणाकडे ."


" सगळीकडे शोध घेतला तिच्या सर्व मैत्रिणींना

फोन करून झाले , पण तिचा कुठेच पत्ता नाही ."


" थांबा मी बघून येतो ." असे म्हणत पायात चप्पल

घालत सुधीर रजनीला शोधायला निघाला .


तो परत येईपर्यंत ओंकाररावांच्या घरातच फेऱ्या

मारणे सुरू होते . तो उदास चेहरा करून परत

आला. तेव्हा तर ओंकार राव मटकन खाली

 बसले . सुधीर आणि सुषमाने सगळीकडे फोन

करणे सुरू केले . रजनी कुठेच नाही , हे कळताच

ओंकाररावांचा जीव घाबरला . सुरेखाबाई तर

रडायलाच लागल्या . हळूहळू रजनी गायब

झाल्याची बातमी शेजारी पसरली . बाहेर 

पावसाने पुन्हा जोर धरला होता . त्या पावसातही

शेजारचे कुणी अंगावर घोंगडे घेऊन, तर कुणी

 छत्री घेऊन रजनीची चौकशी करायला येत होते .

रजनी कुठे गेली होती ? किती वाजता गेली

होती ? तिच्या सोबत कोण कोण होते ? ही सर्व

प्रश्न भेटायला येणारे विचारीत होते . त्या प्रश्नांनी

ओंकारराव आणखीच , अस्वस्थ होत होते .


शेजारी राहणारे थोडा वेळ थांबून निघून गेले .

पण घरातील लोकांना ती रात्र बेचैन करीत होती .

सुधीरला त्याच्या आई वडिलांची अवस्था 

बघवत नव्हती . सुषमा सुद्धा आत्याच्या काळजीने

चिंताग्रस्त झाली होती . सुधीर हातात टॉर्च घेऊन

दोन तीन वेळा , गावात चक्कर मारून आला

होता . रजनीच्या मैत्रिणींचे कॉल वर कॉल्स 

सुरू होते . पण कोठूनही काहीही खबर मिळत

नव्हती . पावसाचा जोर आता बऱ्या पैकी कमी

झाला होता . पण घरावर रजनीच्या काळजीचे

मेघ जमा झाले होते . ती भयाण रात्र सर्वांनी

जागून काढली . सकाळी सकाळी सर्वांचा डोळा

लागला असावा . पण झोपेतही सर्वाच्या मनात

रजनीचे विचार येत असावेत . 


रात्री उशीरा झोपल्यावरही सुरेखा बाईंना सकाळी

लवकर जाग आली . त्या उठून बसल्या . बाहेर

पावसाची रिपरिप सुरू होती . त्यांनी तोंड धुवून

गुळणा केला . एरव्ही त्यांना उठल्या उठल्या चहाची

तलफ येत असे . पण आज त्यांचे चहा पिण्यास

मन होत नव्हते . पण फक्त बसून काय करावे ?

म्हणून त्या उठल्या आणि चुलीपाशी गेल्या . चुलीत

तुराटीच्या काड्या मोडून टाकत नाही , तोच 



दारावर टकटक आवाज आला . रजनी आली

असेल ,असा विचार करून सुरेखा बाईंनी दार

उघडले . समोर शेजारचा शिवा उभा होता . तो

लगेच म्हणाला,


 " काकी सुधीर भाऊ उठले नाही का ?"


शिवाच्या आवाजाने घरातील सगळेच जागे झाले .

 शिवा , सुधिरच्या कानात काहीतरी कुजबुजला.

सुधीर लगेच चुळ भरून , त्याच्या सोबत गेला .

काय झाले असेल ? याचा अंदाज न आल्याने

सर्वांचे चेहरे काळजीत पडले . हळूहळू त्यांच्या

घरापुढे बरीच लोकं जमा होऊ लागली . सगळे

दबक्या आवाजत बोलत होते .पण कुणीच काही

सांगत नव्हते . थोड्याच वेळात , पोलिसांची

गाडी दारात उभी राहिली . त्यांनी ओंकार

रावांना काही जुजबी प्रश्न विचारले . आणि ते

निघून गेले . पोलिस निघून जाताच , सुधीर धाय

मोकुन रडू लागला . 


". आपली रजनी आता या जगात राहिली नाही ."


सुधीरचे काळीज चिरून टाकणारे शब्द , ऐकून

सुरेखा बाईंची दातखिळी बसली . जमलेल्या

बायकांनी त्यांच्या तोंडावर पाण्याच्या झापड

मारून त्यांना शुध्दीवर आणले . ओंकाररावांना

दरदरून घाम फुटला . अंगातील कपडे ओलेचिंब

झाले . आजूबाजूला बायका , माणसांची कुजबुज

सुरू झाली . मला तर पहाटेच रजनी पाण्यावर

तरंगताना दिसली होती . भीतीने तशीच , धावत

घरात आली . माझ्या बी कानावर बातमी आली

होती . पण ओंकार काकांना कसे सांगावे हेच

कळत नव्हते . कुणी म्हणाले की , रजनीने

नाल्याच्या पुरात उडी मारून जीव दिला , तर 

कुणी म्हणत होते की , तिला कुणीतरी ढकलून

दिले . दहा तोंड दहा गोष्टी बोलत होते . नेमके

काय झाले ? हे कुणालाच माहिती नव्हते .

या बातमीने गावावर अवकळा पसरली. पावसाने

अजून जोर धरला होता . त्या पावसात कुणी

भिजत तर , कुणी छत्री घेऊन , चिखल तुडवत

ओंकाररावांच्या घरी येत होते . त्यातच रजनीचा

नवरा नरेश पावसात भिजत आला . आल्या आल्या

त्याने हंबरडा फोडला .


" माझी रजनी ग , मला सोडून कुठे गेलीस ग ?

मला सोबत घेऊन जायचे होते . माझ्या आजार

पणात किती सेवा केलीस माझी . आता अशी

मला एकट्याला सोडून का निघून गेलीस ?"


संध्याकाळ पर्यंत पोस्टमार्टम होऊन रजनीची

डेड बॉडी घरी आली . तेव्हा सर्व गाव रडले .

पुढे ती डेड बॉडी तिच्या गावी नेण्यात आली.

आणि तिथे भर पावसात त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले . भरून आलेले आभाळ रिते

होत होते . श्रावण महिन्यात सहसा विजा चमकत

नसतात . पण अचानक विजांचा तांडव सुरू झाला .

विजांचा तांडव काहीतरी सांगत 

होता . अचानक एक वीज चमकली . तिने 

सरणावर , निपचित पडलेल्या रजनीच्या

चेहऱ्यावर लख्ख उजेड पाडला . त्या उजेडात

सुधीरला रजनीच्या  रक्त गोठल्याचा मानेभोवती

गोल राऊंड दिसला . ते बघून सुधीर दचकला.

रजनीचा खुन तर झाला नसेल ? ही शंका त्याच्या

मनात येऊन गेली . पण त्या पावसात आणि

दुःखी वातावरणात असे काही बोलण्याची सोय

नव्हती . मनातील दुःख मनात ठेवत , तो मूकपणे

अश्रू ढाळत होता . रजनीवर अंतिम संस्कार

करून तो घरी आला . अंघोळ करून फ्रेश झाला .

तोवर रात्रीचे दहा वाजले होते . त्याच्या बायकोने

ताट वाढून आणले . अन्नाचा अपमान नको म्हणून

दोन घास खाऊन त्याने ताट बाजूला सारले. 


  रजनीचा अचानक झालेल्या मृत्यूने ओंकारराव

आणि सुरेखा बाईंवर आभाळ कोसळले . त्यात

चौकशी करीता पोलिसांच्या सारख्या चकरा सुरू

होत्या . त्यांच्या चौकशीचे चक्र सुरू झाले की

त्या वृद्ध जोडप्याचा जीव कासावीस होत असे .

 या चार पाच दिवसांत गावात फक्त एकच चर्चा सुरू होती की , रजनीचा खून झाला की तिने आत्महत्या केली ? या चर्चेला मात्र उधाण आले होते .एक दिवस पोलिस घरी आले आणि सुधीरला रजनीच्या खुनाचा संशयित आरोपी म्हणून त्याला पकडून घेऊन गेले .


सुधीर टाहो फोडून सांगत होता की , 

"रजनीचा खून मी केलेला नाही . मी माझ्या सख्या मोठ्या बहिणीचा खून का करू ? "


पोलिस : " आम्ही केलेल्या चौकशीत असे दिसून

आले आहे की , तुझे वडील रजनीला नेहमी

पैशांची मदत करीत असत . तुला ते अजिबात

आवडत नसे . त्यावरून तुमचे नेहमी वाद सुद्धा

होत . तुमचे वाद इतके विकोपाला गेले होते की ,

रजनीने माहेरी येणे बंद केले होते ."


सुधीर ; " आमच्यात पैशांच्या कारणावरून वाद

जरूर होते . पण याचा अर्थ असा नाही की , मी

ताईचा खून करेल ."


पोलिस : " जास्तीची बकबक करू नको . चल

पोलिस कोठडीची हवा खाल्ली की , सगळं खर

खोट बाहेर येईल ."


सुधीर : " बाबा , तुम्ही तरी काही बोला ."


ओंकारराव काहीही न बोलता आत निघून गेले .

त्यांच्या या वागण्याचा अर्थ न कळण्या इतका

सुधीर लहान नव्हता . पोलिसांना चला म्हणून

तो त्यांच्या सोबत निघाला . सुधीरला पोलीस

घेऊन जात होते , तोच त्याची बायको पुष्पा

समोर आली . पोलिसांना गयावया करत म्हणाली,


" भाऊ त्यांना असे पकडून नेऊ नका . मला माझ्या

नवऱ्यावर भरोसा आहे . ते असा गुन्हा सात

जन्मातही करणार नाहीत . "


पोलिस : " ताई तुम्ही आमच्या कामात अडथळा

आणू नका . आम्हाला आमचे काम करू द्या ."


सुधीर पोलिसांच्या गाडीत बसून निघून गेला .


पुष्पा तिच्या सासऱ्याकडे वळत म्हणाली ,


" मामांजी , तुमचा लेक असे वाईट कृत्य करेल

का हो ?"


ओंकारराव काहीही बोलले नाहीत . पण त्यांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहत होते . पुष्पाने

त्यांची मनःस्थिती समजून घेतली . ती काहीही

न बोलता स्वयंपाक घरात निघून गेली . चूल 

पेटवून तिने सर्वांचा चहा करायला गंजात 

पाणी ठेवले . पाण्याला उकळी आली . त्या

पाण्याच्या वाफेकडे बघत , तिने मनात विचार

केला , आपल्या मनातील दुःखाची अशी झरझर

वाफ झाली तर, किती बरे होईल . पण पाण्याचे

वाफेत रूपांतर व्हायला आधी आगीचे चटके

सहन करावे लागतात . मग हिच वाफ . ढग बनून

उंच आकाशात जाते , आणि पावसाच्या सरींच्या

रुपात पुन्हा गारवा घेऊन येते . मी पण कितीही

त्रास झाला तरी , माझ्या नवऱ्यावरील खोटा

आळ , दूर करील आणि आमच्या संसारात पुन्हा

गारवा आणेल . रंजना ताई तर , पुन्हा येणार

नाहीत . पण त्यांचा खून झाला असेल , तर त्यांच्या

खुन्याला शोधून काढेल .



पुष्पाने रजनीच्या मारेकाऱ्याला शोधून काढण्याचा मनाशी चंग बांधला . तिच्या डोक्यात लगेच

विचारांचे चक्र सुरू झाले . आता उशीर करून

चालणार नाही . लगेच हालचाल केली पाहिजे .

असा विचार करून , ती भराभर कामाला लागली .

घरातील काम संपवून , डोक्यावर पदर घेऊन

बाहेर पडली . त्या दिवशी रजनी सोबत असलेल्या

तिच्या मैत्रिणींच्या घरी गेली . कुणी तिच्याशी

तुटक बोलले . तर कुणी उगाच पोलिसांची

झंझट मागे लागेल , म्हणून तिच्याशी बोलायचे

टाळले. अंजूने मात्र तिला घरात घेतले . 

आस्थेने घरातील सर्वांची चौकशी केली . रजनीच्या

दुःखद बातमीने तिच्या डोळ्यांत पाणी आले .


अंजू : " वहिनी रजनीच्या बाबत असे , व्हायला

नको होते ."


पुष्पा : " जे घडले ते खूप वाईट झाले . सुषमा

तर स्वतःलाच दोष देते . सारखी म्हणत असते

की , मी आत्याला माहेरी येण्याचा फोर्स केला

नसता तर , असे काही घडले नसते . ती तर

सारखी माझी आत्या मला सोडून का गेली ?

असे म्हणून रडत असते ."


अंजू : " सुषमा फक्त निमित्त झाली . कदाचित

रजनीच्या नशिबात असेच मरण असेल ."


पुष्पा : " हो , पण ताईच्या खुनाच्या अरोपातील,

संशयीत आरोपी म्हणून सुषमाच्या बाबाला

पोलिसांनी धरून नेले ."


अंजू ,: " काय सांगताय काय वहिनी तुम्ही ???

दादाने रजनीला , कधी एक चापट मारल्याचे

आम्ही कधी पाहिले नाही . तो तिचा खून करणे

शक्यच नाही . "


पुष्पा : " इतक्यात , दोघा बहीण भावांचे जरा

बिनसले होते . पण ती दोघे पुन्हा बोलायला

सुद्धा लागली होती _ _ ! "


अंजू : " बहीण भावाचे भांडण म्हणजे पाण्यावरचा

बुडबुडा असतो . थोडा वेळ राहतो आणि पुन्हा

पाण्यात एकरूप होतो ."


पुष्पा : " पण हे पोलिसांना नाही कळणार _ _ 

त्यांना वाटले की , बहीण भावाचे पटत नव्हते,

म्हणजे रजनी ताईचा खून यांनीच केला आहे ."


अंजू : " वहिनी आता काय होईल ग ?"


पुष्पा : " मी गप्प थोडीच बसणार आहे ? मला

सांग की, तुम्ही त्या दिवशी ,झोके खेळायला

गेल्या होत्या , त्यावेळी रजनी ताईचा मूड कसा

होता ?"


अंजू : " रजनी एकदम खुश होती . आमच्या पेक्षा

खूप उत्साही वाटत होती . छान गाणी म्हणत

होती . सर्वांना झोके देत होती . ती पण उंच उंच

झोके घेत होती . तिचे उंच झोके बघून माझ्याच

मनात धडकी भरली होती ."


पुष्पा : " मग पुढे काय झाले ?"


अंजू : " अचानक आभाळ भरून आले . आम्ही

सर्वजणी भराभर घरी जाण्यास निघालो . रजनीला

सुद्धा घरी चल म्हणू लागलो . पण ती आम्हाला

म्हणाली की , तुम्ही निघा , मी पाऊस सुरू झाला

तरी एकटी येईल . मला आणखी झोके खेलावेसे

वाटतात . शेवटी गीता तिच्या करीता थांबली होती .

पण ती पण थोड्या वेळाने निघून आली ."


पुष्पा : "इतक्या पावसात रजनी ताई एकट्याच

कशा काय थांबल्या असतील ?"


अंजू : " तेच तर कोडे आहे ? आम्ही तिला खूप

विनवण्या केल्या की , चल घरी , पावसाने जोर

धरला तर , तुला इथून निघणे मिश्किल होईल .

पण तिने आमचे अजिबात ऐकले नाही . ती

झोक्यावरून उतरायला तयार नव्हती . शेवटी

आम्ही निघून आलो . घरी पोहचत नाही , तोच

जोराचा पाऊस सुरू झाला . रजनी घरी आली

की नाही हे , विचारावे तर , तिचा मोबाईल नंबर

पण कुणाकडेच नव्हता ."


पुष्पा : " रजनी ताईला नक्कीच कुणीतरी भेटले

असेल ."


अंजू : " तेव्हा सुधीर दादा कुठे होता ?"


पुष्पा : " तेव्हा ते ,बंडू भाऊजींकडे होते . पाऊस

कमी झाल्यावर घरी आले . आल्या आल्या रजनी

ताईंना शोधायला गेले . "


अंजू : " त्या रात्री रजनीला गावात येताना कुणीही

बघितले नाही ."


पुष्पा : "रजनी ताई गावात आल्याचं नाही , तर कुणी

बघेल तरी कसे ? आणि तेव्हा पाऊस पण खूप

जोराचा सुरू होता ."


अंजू : " रजनी गावात आली नाही , पण तिला

माळरानावर कुणीतरी भेटले असेल . "


पुष्पा : " हो , कुणीतरी रजीनाला तिकडेच भेटले

असेल ?"


अंजू : " पण कोण भेटले असेल ? ती तर फारशी

कुणाशी संबंध ठेवत नव्हती . नेहमी तिच्या कामात

असायची ."


पुष्पा : " बर अंजू येते मी. गरज पडली तर ,

आपण दोघी तुम्ही झोके खेळले होते , तिथे जाऊन

येऊ ."


अंजू : " वहिनी तुम्ही केव्हाही बोलवा , मी येईल .

रक्षाबंधन पर्यंत मी इथेच आहे ."


   पुष्पा घरी निघून आली . रजनीच्या खूनाच्या

संशयीत आरोपी म्हणून सुधीरला पकडून नेल्याने

ओंकारराव बेचैन झाले होते . ते कुणाशी बोलत

नव्हते . एकटे राहत होते . गावात दिढ लाखांसाठी

सुधीरने रजनीला मारले , ही चर्चा सुरू होती ., त्यामुळे ओंकाररावांच्या घरातील कुणीही बाहेर

पडत नव्हते . पुष्पाला तिच्या नवऱ्याची म्हणजेच

सुधीरची काळजी लागून राहिली होती . ती सुधीरला

भेटायला गेली . तेव्हा तिने , त्याला ठणकावून

विचारले की , तुम्हाला आपल्या सूषमाची शपथ

आहे , तुम्ही माझ्याशी खरे बोला . तेव्हा सुधीर

डोळ्यात पाणी आणून म्हणाला,


" पुष्पा , माझ्या मेहनतीचे पैसे बाबा रजनीला

द्यायचे . मी प्रत्येक गोष्टीत कटकसर करायचो .

स्वतःसाठी कोणतीही वस्तू घेत नव्हतो आणि

बाबा रजनी मागेल तेव्हा तिला पैसे देत . ही

गोष्ट मला अजिबात आवडत नसे . पण तरीही

माझा रजनी मध्ये जीव होताच . मी तुझ्या डोक्यावर

हात ठेवून सांगतो , की मी रजनीला मारले नाही ."


पुष्पा : " माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे .

आता रजनीला कुणी मारले , हे मी शोधून काढते ."


सुधीर : " म्हणजे तू काय करणार आहेस ,? उगाच

करायला जाशील एक आणि घडेल भलतेच ."


पुष्पा : " मी तुम्हाला असे ,अपराध्याच्या पिंजऱ्यात

उभे नाही बघू शकत ."


पुष्पा मनात काहीतरी निर्धार करून , गावी परत

आली . दुपारचे तीन वाजले होते . ती आल्या

आल्या सरळ अंजूकडे गेली . अंजू घरी एकटीच

होती . अंजुने पुष्पाला पाणी दिले . पुष्पाचा चेहरा

रडवेला दिसत होता . अंजुने काय झाले ?

विचारताच पुष्पाच्या मनाचा बांध सुटला . ती

अंजूच्या गळ्यात पडून तिने हंबरडा फोडला .

अंजुने तिला थोपटले . जेव्हा पुष्पाचे मन रिते झाले .

तेव्हा अंजू म्हणाली ,


अंजू : " काय झाले वहिनी ?"


पुष्पा : " आज ह्यांना भेटायला तालुक्याच्या गावी

गेली होती . त्यांना मी असे पोलीस कोठडीत बघू

शकत नाही . "


अंजू : " मग काय करायचे ठरविले वहिनी तू ?"


पुष्पा : " आपण आत्ताच त्या , जागेवर जायचे का ?

जिथे रजनी सोबत तुम्ही झोके खेळले होते ?"


अंजू : " आत्ता _ _ !"


पुष्पा : " हो , आत्ताच ."


अंजू : " पण तिथे जाऊन काय फायदा ? पोलिसांनी

खूप शोधले पण त्यांना काहीही पुरावा भेटला नाही .

उलट सुधीर दादाचे पैशाचे पाकीट तिथे सापडले .

म्हणूनच तर , सुधीर दादाला पकडून नेले ना .

त्याचे अन् रजनीचे भंडण होत होते ."


पुष्पा : "बोलण्यात वेळ घालवू नको . अंधार 

पडेपर्यंत आपण घरी परत आलो पाहिजे ."


पुष्पा आणि अंजू माळरानावर गेल्या . तिथे दोन चार कडूनिंबाची खूप मोठी झाड होती . वर्षांनुवर्षे

नागपंचमीला याच झाडांना झोके बांधून , सासरी

गेलेल्या लेकी , इथे जमून सुख दुःखाचा . गोष्टी

करीत असत . या रानाच्या एका बाजूला एक नाला

वाहत असतो . ज्याला फक्त पावसाळ्यात पाणी

असते . एरव्ही तो कोरडा पडलेला असतो .

जोराचा पाऊस पडला की , त्या नाल्याला पुर

सुद्धा येतो .

   अंजुने पुष्पाला रजनी , ज्या झोक्यावर

बसली होती तो , झोका दाखविला . दोघींनी

त्याच्या आजूबाजूला काही सापडते का ? याचा

शोध घेतला . पण तिथे कोणतीही संशयित वस्तू

सापडली नाही . अंजुला मात्र रजनी झोक्यावर

बसून मनमुराद झोके घेत असल्याचे भास होत

होते . ती पुष्पाला घरी चला असा घोषा लावत

होती . माळरानावर काहीही सापडले नाही .

तेव्हा पुष्पा नाल्याकडे जाण्यास निघाली .

अंजू सुद्धा नाईलाजाने तिच्या मागे चालू लागली .

अचानक आभाळ भरून आले आणि क्षणात

जोरदार पाऊस सुरू झाला . पुष्पा घाबरली नाही .

ती निर्धाराने पावसात भिजत पुढे जात होती .

सोबतीला अंजू होतीच . नाल्याच्या काठावर

त्या दोघींचा पुन्हा शोध सुरू झाला . बराच वेळ

शोधून काही सापडले नाही . आता पावसाचा

जोर आणखी वाढला होता . नाल्याचे पाणी

अचानक वाढू लागले . त्या पाण्यात एक वस्तू

तरंगताना पुष्पाला दिसली. पुष्पाने लगेच , त्या

पाण्यात उडी घेतली . तिला पोहणे येत असल्याने

पाण्यात पोहून तिने , ती वस्तू हातात घेत , पुन्हा

काठावर परत आली . अंजू पुष्पाच्या या धाडसा

कडे बघतच राहिली . अंजूला तिने ती वस्तू 

दाखविली . लगेच दोघी घरी परत आल्या. तेव्हा

त्या पूर्णपणे भिजल्या होत्या . अंजू भावाच्या घरी

परत गेली . पुष्पा तिच्या घरी आली . सापडलेली

वस्तू तिने कपाटात ठेवून दिली . लगेच ओले कपडे

बदलून घेतले . आज तिने मुद्दाम ओंकाररावांच्या

आवडीचे पिठलं भाकरी आणि हिरव्या मिरचीचा

ठेचा बनविला होता . जेवण आटोपली . पुष्पा

काम आटोपून ओंकाररावांच्या जवळ गेली . ते

ओसरीत एका खुर्चीवर शून्यात नजर लावून 

बसले होते . सुरेखा बाईं त्यांच्या बाजूला खाली

चटईवर बसल्या होत्या . पुष्पा त्यांच्या जवळ

जाऊन बसली . आणि जरा दबक्या आवाजात

म्हणाली _ _ 


पुष्पा : " मामांजी , जरा बोलायचे होते ."


ओंकारराव : " आता काही बोलून फायदा आहे

का ? आधीच जर नवऱ्याला जरा समजावले

 , तर बहीण भावाचे भांडण असे विकोपाला

गेले नसते ."


पुष्पा : " मामांजी पाण्यात काठी मारल्याने पाण्याचा

प्रवाह कधी तुटतो का ? तसेच बहीण भावाचे नाते

असते . काठी मारल्याने ते तुटल्या सारखे वाटते

पण पुन्हा तो प्रवाह एकच होतो. "


ओंकारराव : " सर्व कळते तर मग , आधीच नाही

का सावरायला पाहिजे . ते जाऊ दे . मुद्द्याचे

काय ते बोल ."


पुष्पा : " मला तुम्हाला काहीतरी दाखायचे आहे ."



ओंकारराव : " काय दाखवायचे ते पटकन दाखव ."


पुष्पाने एक महागडी घड्याळ , त्याच्या समोर

ठेवली . ती घड्याळ बघताच ओंकारराव म्हणाले,


ओंकारराव : " ही घड्याळ तुला कुठे सापडली ?

तुला रजनीच्या बॅग मध्ये तर , सापडली नाही?"


पुष्पा : " मी कशाला ताईच्या बॅगला हात लावू ?"


ओंकारराव : " मग कुठे सापडली ही घड्याळ ?"


पुष्पा : " माळराना जवळच्या नाल्यात ."


ओंकारराव : " तू तिकडे कशाला गेली होती ?"


पुष्पा : " मी तिकडे कशाला गेली होती ? हे

महत्वाचे नाही मामांजी _ _ ! ही घड्याळ कुणाची

आहे ते सांगा ?"


ओंकारराव : " जावईबापूंची आहे ती घड्याळ ."


पुष्पा : " मामांजी नीट बघा ,त्यांचीच आहे का ?"


ओंकाराव : " हो ."


सुरेखा बाई : " तुम्ही कसे काय ओळखता की,

हे जावई बापूंचे घड्याळ आहे ?"


ओंकारराव : " अधिक महिन्यात त्यांचा खूप

हट्ट होता, की मला असे घड्याळ पाहिजे . मग

मिच त्यांना घेऊन दिले होते . तुम्हाला कुणालाही

न सांगता ."


पुष्पा : " हे , तर खूप महागडे घड्याळ आहे ."


ओंकारराव त्यावर काहीही बोलले नाही .


पुष्पा मात्र जे समजायची ते , समजली .


ओंकारराव ओसरीत फेऱ्या मारत होते . काही

 वेळाने ते पुष्पाला म्हणाले ,


ओंकारराव : " सुनबाई , हे घड्याळ आपण उद्या

पोलिसांना दाखवू ? "


पुष्पा : " त्यापेक्षा आपण जावई बापूंना विचारले

तर _ _ !"


ओंकारराव : " हे घड्याळ तुला सापडले आहे , हे

जर त्यांना कळले तर , ते सावध होतील. त्यापेक्षा

आपण पोलिसांनाकडे हे घड्याळ देऊ. जी

काही चौकशी करायची ते पोलिस करतील."


पुष्पा : " तुम्ही म्हणता , ते बरोबर आहे मामांजी."


   दुसऱ्या दिवशी , ओंकारराव आणि पुष्पा

पोलिस स्टेशनमध्ये गेले . तिथे ओंकाररावांच्या

ओळखीचे पोलीस इन्स्पेक्टर पितळे होते .

त्यांना ते भेटले . पुष्पाने ते घड्याळ इन्स्पेक्टर

पितळे यांना दाखविले . त्यांनी ते घड्याळ 

ठेवून घेतले . ओंकाररावांना म्हणाले की तुम्ही

निश्चिंतपणे घरी जा . या घड्याळामुळे आता

आमच्या तपासाला एक दिशा मिळाली आहे .

काही गरज पाडली तर , तुम्हाला बोलावून घेऊ .



  पुष्पाने दिलेला घड्याळ हा महत्त्वाचा पुरावा

ठरू शकतो . असा विचार करून इन्स्पेक्टर

पितळे यांनी तो घड्याळ व्यवस्थित ठेवला .

लगेच ते , रजनीच्या नवऱ्याकडे म्हणजेच

 नरेशकडे गेले . अचानक पोलीस घरी आल्याने

नरेश गडबडला . त्याने एक खुर्ची इन्स्पेक्टर

पितळे यांना बसायला दिली . या खोलीत किंवा

खोलीच्या आजूबाजूला कुणीही थांबायचे नाही .

अशी घरातील इतर सदस्यांना तंबी दिली .

खोलीचे दार आतून बंद करून घेतले .

 इन्स्पेक्टर त्यांच्या पोलिसी नजरेने घर न्याहाळत होते . त्यांच्या त्या नजरेने नरेशच्या मनात धडकी भरली . 


पितळे : " घर तस् ठिक ठाक आहे तुमचे ."


नरेश : " हो साहेब ."


पितळे : " तुमच्या मिसेसनी छान सजवलेले

दिसते ."


नरेश : " हो साहेब , रजनीला सर्व नीटनेटके हवे

असायचे ."


पितळे : " महागड्या वस्तूंचा शौक होता का त्यांना ?"


नरेश : " नाही हो , रजनी तशी काटकसरी होती .

वायफळ खर्च केलेला तिला आवडत नसे ."


पितळे : " मग , किमती वस्तू वापरायचा तुम्हाला

शौक होता का ?"


नरेश : " नाही साहेब , आम्ही गरीब माणस .

आम्हाला कसली शौक ?"


पितळे : " काही लोकांना सवय असते . आपले

शौक दुसऱ्याच्या पैशांनी पूर्ण करायची ."


नरेश काहीही बोलला नाही . त्याचे गप्प बसने

इन्स्पेक्टर पितळे यांना समजले . ते पुढे म्हणाले,


पितळे : " बरं , ते जाऊ द्या . तुमचे सासरे ओंकार

राव भेटले होते ."


नरेश : " आ _ _ केव्हा भेटले होते ?"


पितळे : " केव्हा भेटले होते, ते फारसे महत्त्वाचे

नाही . त्यांचा एक निरोप घेऊन आलो आहे ."


नरेश : " त्यांनी तुम्हाला कशाला त्रास दिला ?

मला फोन केला असता तर, मीच त्यांच्या भेटीला

गेलो असतो ."


पितळे : " विषय जरा नाजूक आहे . जावई

माणसाला दिलेली गिफ्ट परत कशी मागावी ?

हा त्यांना सांकोच पडला . म्हणून त्यांनी मला

तुमच्या कडून एक वस्तू घेऊन यायला सांगितले ."


नरेश : " काय मागितले त्यांनी ."


पितळे : " तसे पाहिले तर, हा तुमचा घरागुती

मॅटर आहे . पण सहज सेवा भाव म्हणून मी

त्यांचे काम करतोय ."


नरेश : " काय म्हणायचे आहे तुम्हाला ?"


पितळे ,: " अधिक महिन्याचे गिफ्ट म्हणून तुमच्या

सासर्यांनी तुम्हाला एक घड्याळ दिली होती . ती

त्यांची त्यांना परत हवी आहे ."


नरेश : " पण जावयाला दिलेली गिफ्ट कधी, कुणी

परत घेते का ? आमचे सासरे पण अजब आहेत .

त्या घड्याळाचे त्यांना आता काय करायचे ?"


पितळे : " ओंकारराव घड्याळ चुलीत घालतील .

आपल्याला काय त्याचे . त्यांनी मागितली तर

, आपण देऊन टाकायची . चला आणा ती

घड्याळ . मला जास्त वेळ इथेच थांबायला वेळ

नाही . द्या लवकर ."


नरेश ,: " साहेब , तुम्ही कशाला टेन्शन घेता ?

मी घड्याळ सासरे बुवांकडे पोहचवून देईल ."


पितळे लगेच नरेशची कॉलर पकडून म्हणतात ,


 " ती घड्याळ घरात असेल तर तू देशील ना _ _ !"


नरेश : " साहेब , ती घड्याळ माझ्या कडून हरवली ."


पितळे : " कुठे हरवली ?"


नरेश : " मी खामगवला बी बियाणे आणायला

गेलो होतो ना _ ! बहुतेक तिकडेच हरवली असेल ."


पितळे : " किती दिवस झाले घड्याळ हरवायला ?"


नरेश : " झाले असतील दोन महिने ."


पितळे : " मग पोलीस कंपलेंट नाही केलीस का ?"


नरेश : " नाही ."


पितळे : " इतक्या महागड्या घड्याळ हरविले 

असल्याची कमलेंट करायला हवी होती ."


नरेश : " नाही केली ."


पितळे त्यांच्या खिशातून घड्याळ काढून नरेशच्या

डोळ्यासमोर धरतात .


पितळे : " हिच आहे का ? ती घड्याळ ?"


नरेश : " अशीच होती . "


पितळे : " जरा नीट बघा . हिच होती ."


पितळे आवाज चढवून बोलले .


नरेश : " साहेब एकसारख्या घड्याळी खूप असतात ."


पितळे : " हे घड्याळीचे बील . ही तुमचीच घड्याळ

आहे . याची मी खात्री करून आलोय ."


नरेश जरा वरमला .


नरेश : " हो , साहेब , ही माझी घड्याळ असू शकते ."


पितळे : " ही तुझीच घड्याळ आहे . आता बऱ्या

बोलाणे कबूल कर की , रजनीचा खून . झाला 

नेमकी त्याच ठिकाणी तुझी घड्याळ कशी काय

सापडली _ _ ?"


नरेश : "साहेब, माझी घड्याळ हरवली होती .

ती नेमकी त्याच ठिकाणी कशी काय गेली , हे

मी कसे सांगू शकेल ?"


पितळे : " तू म्हणतोस की , तुझी घड्याळ

हरवून एक महिना झाला . बरोबर ना ."


नरेश : " हो साहेब एक महिना झाला असेल ."


पितळे : " आता सांग , तुझ्या बायकोचा खून

होऊन किती दिवस झाले ? "


नरेश : " जेमतेम आठच दिवस झाले साहेब ."


पितळे : " मग रजनी सोबतचा तुझा हा फोटो,

केव्हाच आहे ?"


पितळे मोबाईल मधील एक फोटो नरेशला

दाखवत म्हणाले .


नरेश : " आठवत नाही साहेब . रजनी बाहेर

कुठेही फिरायला गेली की, आमच्या दोघांची

सेल्फी घेत असे ."


पितळे : " तुला आठवत नसेल तर , मी आठवण

करून देतो . हा फोटो श्रावणातील पहिल्या

सोमवारचा आहे . तुम्ही दोघे सिध्देश्वर मंदिरात

दर्शनाला गेले होते ."


नरेश : " हो साहेब आठवले . हा त्याच मंदिरातील

फोटो आहे ."


पितळे : " जरा निरखून बघ . या फोटोत तुझ्या

हातात , हिच घड्याळ दिसत आहे . पहा जरा

झूम करून पहा ."


नरेशला आता भर पावसात घाम फुटला होता .


तो मटकन खाली बसला .


पितळे : " आता बऱ्या बोलणे कबूल कर , त्या

मुसळधार पावसात नेमके काय घडले होते ?

तुझ्या विरोधात मला एक ठोस पुरावा सापडला आहे . आणखी पुरावे गोळा करायला वेळ लागणार

नाही ."


नरेश :" साहेब जरा पाणी मिळेल का ?"


 इन्स्पेक्टर पितळे त्याला पाणी देतात . तो

गटागटा पाणी पितो आणि भराभर बोलायला

लागतो _ _ 


नरेश : " माझे सासरे ओंकारराव माझ्या पेक्षा जरा

श्रीमंत आहेत . त्यांचा त्यांच्या लेकिवर म्हणजेच

रजनीवर खूप जीव होता . तशी रजनी खूप गुणाची

होती . पण जरा स्वाभिमानी होती . आमच्या

प्रत्येक अडचणीच्या वेळी माझे सासरे मला

थोडीफार आर्थिक मदत करीत असत . ते पाच

दहा हजार रुपये आम्ही त्यांना काही काळाने

परत करायचो . मी रजनीला म्हणायचो की ,

पाच दहा हजर रुपये , परत केले नाही तर , तुझ्या

वडिलांना काहीच फरक पडणार नाही . पण ती

म्हणायची त्यांचे कष्टाचे पैसे आहेत . ते आपण

परत करायला हवेत . मला तिचे म्हणणे अजिबात

पटायचे नाही . पण नाईलाज होता . म्हणून मी

त्यांचे पैसे परत करायचो ."


नरेश मधेच बोलायचा थांबला .


पितळे : " चल पुढे सांग ."


नरेश : " मागच्या वर्षी आम्ही , त्यांच्या कडून दिढ

लाख रुपये घेतले होते . इतकी मोठी रक्कम 

परत करणे शक्य नव्हते . रजनीचे आणि तिच्या

भावाचे त्यावरून नेहमी खटके उडत . त्यांच्यात

काही दिवस अबोला सुद्धा होता . मी याच गोष्टीचा

फायदा घेत , सासरे बुवांना पाच दहा हजार 

नेहमी मागत होतो . एक दिवस रजनी मला

 म्हणाली की, आपण मुलाचे शिक्षण करून इतके

पैसे एकावेळी जमा करू शकत नाही .. बाबांचे

पैसे किती दिवस ठेवायचे ? त्यावर मी म्हणालो

की , काय घाई आहे ? जेव्हा आपल्या कडे

येतील तेव्हा देऊ . पण ती म्हणाली की , मी

माझ्या कडेचे काही सोन्याचे दागिने मोडते आणि

काही जवळचे पैसे टाकून , बाबांचे पैसे परत

करते . मी नाही म्हणालो . पण ती ऐकायला

तयार नव्हती . घरात ती स्वतःही खूप काटकसरीने खर्च करायची आणि मलाही पै पै चा हिशोब मागायची . मी तिच्या कांजुषणाला कंटाळलो होतो . अरे माणूस आहे मी , जरा काही हौस मौज करावी की नाही __ ! पण रजनीचे सारखे मागे टूमन असायचे की माझ्या बाबांचे पैसे परत करा .शेवटी मनात नसतांनाही, मी तिचे म्हणणे कबूल केले . ती खूप खुश झाली . पण मी आतून चिडलो . आणि _ _ "



पितळे : " आणि काय केले तू ?"


नरेश : " आणि मी तिचा काटा काढायचा ठरविले .

त्यात माझी जुनी मैत्रीण मला मागच्या वर्षी भेटली.

तिच्या आणि माझ्या नेहमी भेटी होत . ती तिच्या

नवऱ्याला फरकती घेऊन माहेरी रहायला आली

होती . ती नर्स आहे . त्यामुळे पैशाचा झरा आहे .

 रजनीचा डाव खतम करून , मला तिच्याशी

लग्न करायचे होते . आणि रजनीच्या खुनाचा

आरोप तिच्या भावावर आणायचा होता ."


पितळे : " तर अशी चाल होती का ,तुझी ?"


नरेश : " हो , म्हणून मी सुषमाचा रजनीला फोन

आला , तेव्हा मी तिला म्हणालो की, तू बिनधास्त

माहेरी जा . मी . सर्व सोने मोडून , पैशांचा बंदोबस्त

करून ठेवतो . आणि स्वतः दिढ लाख रुपये

घेऊन येतो . ती या गोष्टीला तयार झाली . मला

आधीच माहिती होते की , रजनीला नागपंचमीला

झोके खेळायला खूप आवडतात . त्या दिवशी

सकाळीच मी तिला कॉल केला होता. आणि

सांगितले होते की, यावर्षी मी तुझ्या सोबत

झोके खेळणार . तुझ्या सर्व मैत्रिणी झोके खेळून

गेल्या तरी तू माझी तिथेच वाट बघ . मी येईल.

आपण झोके खेळू . मग दोघे मिळून घरी जाऊ

आणि बाबांचे दिढ लाख रुपये परत करू .

दादाला सरप्राइज देऊ. रजनी खूष होती . ठरल्या

प्रमाणे मी गेलो . तिला पैसे दाखविले . पाऊस

सुरू झाला होता . अंधार दाटून आला होता . ती

दोन चार झोके खेळली आणि घरी जाऊ म्हणाली .

मी तिला म्हणालो इतकी काय घाई आहे ? 

 पावसाचा जोर वाढला होता . आणि त्या रानात

आम्ही दोघेच होतो . मी लगेच खिशातून नायलॉन

दोरी काढली . तिचा गळा आवळला . ती बेसावध

होती . त्यामुळे प्रतिकार करू शकली नाही .

मी पूर्ण ताकदीने तिचा गळा दोरीने अवळला .

 तिने थोडीच झटपट करून , जीव सोडला . 

तिच्या ओरडण्याचा आवाज पावसामुळे 

कुणाला ऐकू जाणे शक्य नव्हते . मी

तिची डेड बॉडी तिथेच सोडून जाणार होती .

तिच्या डेड बॉडी जवळ मी , मुद्दाम सुधिरचे 

पैशांचे पाकीट ठेवले होते . पण लगेच जवळ असलेल्या नाल्याला पूर आल्याचे मला जाणवले . मी 

रजनीची डेड बॉडी नाल्यात टाकून दिली . आणि

तसाच घरी आलो . त्यात माझा घड्याळ केव्हा

तिथे पडला , हे माझ्या लक्षात आले नाही .

मला वाटले होते की , रजनीची डेड बॉडी सकाळ

पर्यंत दूर कुठेतरी वाहत जाईल . आणि तिने

आत्महत्या केली असा सगळ्यांचा गैरसमज होईल .

पण तिची डेड बॉडी एका झुडपात अडकली ."



पितळे : " आणि तू तिथेच फसला . तुझा घड्याळ

सुद्धा कुठेतरी पडून होता आणि नेमकी पुष्पा

त्या माळरानात गेली , तेव्हा नेमका तिला तो

घड्याळ दिसला . पाण्यात वाहत होता . तो

पुष्पाने ताब्यात घेतला ."


नरेश : " पण , मी तर घड्याळ , तिथे जाऊन 

खूप शोधला होता . मला सापडला नाही . नेमका

पुष्पाच्या हाती कसा काय लागला ?"


पितळे : " तू सुधीरला रजनीच्या खुनाच्या केस

मध्ये अडकवून स्वतः निर्दोष सुटणार होता. हे

कदाचित रजनीला आवडले नसेल . तिचा आत्मा

त्या जागेत भटकत असेल . तिनेच तो घड्याळ

पुष्पाला दाखविला असेल. हाहा हा हा _ _ .


नरेश माझा तुझ्यावर दाट संशय होता . पुरावा

मी कोठूनही शोधून आणला असताच . तुझे सर्व

बोलणे रेकॉर्ड झाले आहे . चल पोलीस स्टेशनला ."


दोन दिवसांनी , सुधीर सुटला . तो दिवस 

रक्षाबंधनचा होता . सुटून आल्यावर सुधीरने

आधी रजनीच्या फोटोला नमस्कार केला . आणि

म्हणाला ,


" ताई , मला माफ कर .मी तुझी परिस्थिती जाणून

न घेता , तुझ्यावर चुकीचे आरोप केले होते . तू

जिवंत असताना मी तुझी किंमत केली नाही .

तुझ्याविना माझा राखीचा हात आता . सुना सुना

वाटेल ."


तेवढ्यात आकाशात वीज चमकली . त्या प्रकाशात

सुधीरला रजनीचा चेहरा दिसला . आकाशात

ढग जमा झाले आणि मुसळधार पावसाला

सुरुवात झाली _





Rate this content
Log in

Similar marathi story from Crime