Sangita Tathod

Inspirational

4  

Sangita Tathod

Inspirational

थँक्यू सर

थँक्यू सर

3 mins
419


    राधा आठव्या वर्गात शिकत होती. तेव्हाची

गोष्ट आहे. राधाची दुपारची शाळा होती . गणिताची

तासिका सुरू होती . गणित हा राधाचा आवडता

विषय होता. सर पण खूप , छान सोप्या पद्धतीने

गणित समजावून सांगत होते . सर शिकवीत

होते . सर्व मुली , शांतपणे शिकत होत्या . दोन

गणित समजावून होत नाही , तोच सरांना

मोठ्या सरांचे बोलावणे आले . 


"पुढली उदाहरणे तुम्ही सोडवून ठेवा . "असे म्हणून

सर मोठ्या सरांना भेटायला गेले . मुली गणित

सोडावीत होत्या . पण एका समीकरनावर सर्व

मुली आडून बसल्या . ते समीकरण सोडविणे

कुणाला जमत नव्हतं. राधाने डोके लढविले .

त्याचे उत्तर काढले . उत्तर बरोबर होते . ती

लगेच म्हणाली ,


 ' मला जमले. माझे उत्तर बरोबर आले ."


"मुली म्हणाल्या

आम्हालाही सांग ना , कसे केले ते."


लगेच राधा उठली . तिने फळ्यावर गणित

 समजावून सांगितले . तेवढ्यात सर आले . बाहेर

 उभे राहून.राधाचे शिकविणे बघत होते. पण राधाचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते . मुली पण शांतपणे

ऐकत होत्या . तेवढ्यात एक मुलगी ओरडली,


"सर आले "


राधाने बाहेर बघितले . सर आत आले .


राधा खाली मान घालून उभी राहिली .


"सॉरी सर ."म्हणून ती तिच्या जागेवर जाऊ लागली.

तसे सर तिला म्हणाले ,


"खूप छान शिकवत आहेस . कॅन्टीन्यू कर ."


राधा शिकवीत होती . सर तिच्याकडे कौतुकाने

बघत होते. राधा सरांची आवडती विद्यार्थिनी

होती . आठवी , नववी चे दोन वर्षे निघून गेले .

आता दहावीचे वर्ष आले होते . सर्व मुलींनी

मॅथ्यस , सायन्स आणि इंग्लिशची शिकवणी

लावली होती. पण राधाच्या घरी थोडा आर्थिक

प्रॉब्लेम असल्याने , तिने फक्त इंग्लिशची शिकवणी

लावली . गणित विषय तिला तिचे बाबा शिकवीत होते . त्यामुळे तिला शिकवणीची गरज भासली

नाही .


   इंग्लिशच्या शिकवणीला राधाला , मॅथस्च्या

सरांच्या घरासमोरून जावे लागत असे . एक

दिवस राधा इंग्लिशच्या शिकवणीला सायकल 

 वरून जात होती. मॅथ्च्या सरांनी तिला आवाज

देऊन थांबविले . राधा सायकल पकडून सरांच्या

समोर उभी राहिली . सर तिला म्हणाले,


"तू , शिकवणीला का येत नाहीस ?"


"माझे बाबा न, गणित घरी , शिकवीत असतात,

म्हणून येत नाही."


"अग , पण बाबांना ऑफिसची खूप काम असतात.

त्यांना कशाला त्रास देतेस . मी आहे ना _ _ _ !.

उद्या पासून येत जा . "


"पण सर _ _. !"


"माझ्या फी ची काळजी करू नको . मला पैशा पेक्षा

तुझ्या सारख्या हुशार , जिज्ञासू आणि बुद्धिमान

मुलीला शिकविण्याचां अंनंद जास्त महत्वाचा

वाटतो ."

 


संध्याकाळी , राधा शाळेतून घरी आली . तिने 

तिच्या बाबांना सरांचे आणि तिचे बोलणे सांगितले.

बाबा विचार करून म्हणाले ,


"सर , जर तुला स्वतःहून बोलावीत आहेत ,तर

तू उद्यापासून जा , सरांकडे . नाही गेलीस तर

त्यांना वाईट वाटेल . ते अगदी मनापासून तुला

बोलावीत आहेत. आपण जसे जमेल तसे , त्यांचे

पैसे देऊ ."


बाबांची परमिशन मिळाल्याने राधा सरांकडे

गणित शिकायला जाऊ लागली .तिने मन लावून

अभ्यास केला . सर्व सराव पेपर ती मन लावून

सोडावीत होती . बोर्डाची परीक्षा आली . राधाचे

सर्व पेपर खूप चांगले गेले . विशेषतः गणिताचा

पेपर तिचा खूपच छान गेला . आता रिझल्टचा

दिवस उगवला . राधाला उत्तम मार्क्स मिळाले .

गणितामध्ये तर तिला दिडशे पैकी एकशे 

सत्तेचाळीस मार्क्स मिळाले. सरांना जेव्हा राधाचा

रिझल्ट कळला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला .

सरांनी दिलेला आपुलकीची साथ राधा कधीच

विसरणार नाही.


स्टोरी मिरर ने . सरांबद्दल लिहिण्याची संधी दिली

तर राधा स्टोरी मिरर ला आणि सरांना थँक्यू सर म्हणेलच _


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational