Sangita Tathod

Comedy Romance

4  

Sangita Tathod

Comedy Romance

पावसातील प्रेम

पावसातील प्रेम

10 mins
374


लग्नाचा सिझन संपत आला होता .पण तरीही जुलै महिन्यात काही लग्न सुरूच होती .जुलै च्या पहिल्या आठवड्यात तर बऱ्याच लग्नाच्या तारखा होत्या .त्यामुळे पार्लरमध्ये कस्टमरची चांगलीच गर्दी असायची .त्यातच पार्लरच्या मालकीण सरोज ताई अचानक आजारी पडल्या .त्यामुळे तिथे काम करणाऱ्या सई वर कामाचा बराच ताण पडला होता .

सई फक्त पैशांसाठी तिथे काम करीत नव्हती .तर तिला पार्लरची आवड होती .त्यातच पुढे तिला करीयर करायचे होते . सरोज ताईच्या फेमस पार्लरमध्ये तिला ट्रेन व्हायचे होते .त्यासाठी ती तिथे अनुभव घ्यायला आली होती .हिच वेळ होती सईला ,सरोज ताईंच्या मनात जागा तयार करण्याची .ती अगदी मनापासून काम करीत होती .कुणाला तक्रारीला जागाच ठेवत नव्हती . अगदी गोड बोलुन ,हसत खेळत सर्व काम करीत होती .प्लकिंग ,फेशियल ,वॅक्ससिंग ,हेअर ट्रीटमेंट

अगदी सर्व सर्व एकटी करीत होती .त्यात नवरीच्या लग्नाच्या येणाऱ्या मेक अपच्या ऑर्डर्स ही नीट घेत होती .घरी निघायला तिला उशीर होत होता . नेहमी तीन ला बंद होणारे पार्लर आताशा पाच वाजेपर्यंत चालत होते .आज तर साडे सहा झाले होते .सईची मान आणि पाठ अकडून गेली होती . थोडे रिलॅक्स होण्यासाठी ती ,दोन मिनिटं डोळे मिटून आराम खुर्चीत बसली .उठून दोन घोट पाणी पिले .सर्व आवरा सावर करून निघायला पावणे सात झाले .लॉक करून चाबी ,पर्स मध्ये टाकली . बाहेर येऊन बघते तर, आकाशात काळे ढग जमा झाले होते .कधीही पावसाला सुरुवात होऊ शकेल

असे वातावरण होते .सईला पावसात भिजायला आवडायचे .पण आज खूप थकल्यामुळे तिला नको वाटत होते . 'पाऊस सुरू होण्याआधी घरी पोहोचलो पाहिजे .' असा विचार करीत सईने तिची प्लेझर गाडी सुरू केली .साठ च्या स्पीड ने गाडी चालवू लागली . पण तिच्या गाडीचा वेग ,पावसाच्या वेगापेक्षा कमी

पडला .धावत येऊन पावसाच्या सरींनी तिलागाठलेच .कुठे उभे राहायला जागा मिळते का ?

याचा शोध घेत असतानाच तिला ,एक छोटेशे टिनाच्या शेडचे हॉटेल दिसले. पावसाचा जोर वाढल्याने ,समोरचे काहीच दिसत नव्हते .गाडी चालविणे सुध्दा मुश्किल झाले होते .सई त्या गरज म्हणून सई टिनाच्या शेड जवळ थांबली .

पटकन गाडी पार्क केली .चाबी काढली .पर्स उचलून ,धावतच आडोशाला आली .या दोन तीन मिनिटांत ती चिंब चिंब भिजली होती .अक्षरशः अंगावरील कपड्याममधून पाणी झिरपत होते . तिने तसेच कपडे पिळले .केस ओल्याच दुपट्ट्याने

पुसून काढले .कुठे बसायला जागा मिळते का ? म्हणून इकडे तिकडे बघु लागली .जागा तशी ऐसपैस होती .वरून टिन , आजूबाजूने टिनाने पॅक केलेली होती .समोरचा भाग मात्र मोकळा होता .सईने विचार केला ,इथे समोर गेट नाही की दार नाही हा रात्री कसा बंद करत असेल ?हे सर्व ?की असेच उघडे ठेवून जात असेल ?या मालकाचे सामान कोणी चोरत तर नसेल ?जाऊ द्या आपल्याला काय ?पाऊस थांबे पर्यन्त इथे रहायचे ?मळकट पांढऱ्या रंगाच्या पाच सहा खुर्च्या ,दूर दूर ठेवलेल्या होत्या ,त्यातील एक खुर्ची तिने जरा कोपऱ्यात नेली .त्यावर बसली. बाहेर चांगलाच अंधार पडला होता .समोरचेही दिसत नव्हते .टिनावर पावसाचा जोरदार आवाज येत होता .

त्या आवाजामुळे बाहेरचे आवाज बंद झाले होते . टपरीवर सुरू असलेला ,स्टोव्ह चा आवाज पावसाच्या आवाजाने ऐकू येत नव्हता .तिथे काम करणारे दोघे नवरा बायको उगाच इकडे तिकडे फेऱ्या मारत होती . बायको इकडचे समान तिकडे उचलून ठेवत होती . सई रीलक्स बसुन फक्त ,पावसाचा आवाज ऐकत निरीक्षण करीत होती .लगेच तिथे आसरा घेणाऱ्यांची गर्दी वाढू लागली .पटापट गाड्या पार्क करून लोक आत येत होती . अवघ्या तीन चार मिनिटात दहा

बारा लोकांची गर्दी तिथे जमा झाली .सई अगदी बारकाईने त्यांचे निरीक्षण करीत होती .तशीही तिला माणसे वाचायची सवयच होती .दोन कॉलेज कुमार धडपडत आले .गाडी पार्क करताना तोल गेला .पायावर गाडी पडली .आई गं करत कशीतरी गाडी पार्क केली .आत आले, "सम्या तुझ्यामुळे गाडी पडली ,नीट उतरता नाही येत का तुला ?"

"मी काही नाही केले तूच घाई केली ."

"जरा आरामात उतरला ,असता तर - - ! मला

लागले नसते ना ?पायावरच पाडली गाडी ,बर झालं माझ्या पायावर पडली गाडी .सरळ खाली पडली

असती तर - -?"

"काही होत नाही .तुला तुझ्या पायापेक्षा त्या गाडीची

जास्त काळजी - -? "

"तुला काय माहीत ? पप्पाला किती विनवण्या कराव्या लागल्या ,तेव्हा कुठे भेटली ही बाईक .

नशीब आई माझ्या बाजूने होती म्हणून ?नाहींतर चालवावी ,लागली असती ती ,मुलींसारखी

स्कुटी नाहीतर आमची जुनी खटारा प्लेझर . मुलांना लाज वाटते अशा ,गाड्या चालवायला ."

"तुला मिळाली तरी बाईक ,आमचे नशीब कधी खुलते

काय माहीत - - ? तुझा पाय दुखत असेल बसुन घे ,तू"

ते दिघे मित्र सईच्या जवळ असलेल्या खुर्चीवर येऊन बसले .सईला हसूच आले . 'या पोरांचा जीव केवढा ,- - -! ही चालवतात अवजड बाईक .कमाल आहे- - - ! .पाय फॅक्चर झाला असता तर

- - ?केवढ्याला पडले असते ? काय तर म्हणे मुलींसारखी स्कुटी चालवायला लाज वाटते . त्यात लाज वाटण्यासारखे आहे काय ? काही एक एकाचे विचार असतात नाही - - - !' सई मनाशी विचार करीत होती .

लगेच एक जोडपे तिथे आश्रयाला आले .लग्नाला पाच सात वर्षे झाली असतील त्यांच्या .येणाऱ्या स्त्रीने अंगावरील साडीचा पदर पिळला ,कसे तरी अंग पुसले .चिंब भिजलेले अंग ,कसे पुसले जाणार ? तो ,तिचा नवरा तिच्या मागे येऊन उभा राहिला . तो जरा रागानेच तिच्याशी बोलु लागला . "माहेरी गेली की ,काय होते तुला काय माहिती ?

किती वेळचा मागे लागलो होतो तुझ्या ,चल लवकर, चल लवकर .पण तू आहेस की - - ? लवकर निघत

नव्हती ."तो

"अहो ,किती दिवसांनी गेली होती .आईशी नीट बोलु

पण दिले नाही तुम्ही - - ! किती घाई करीत होता ."

ती "दहा मिनिटे आधी निघाली असती तर ,आता आपण

घरी असतो ."तो

तिला समजले तो जरा चिडला आहे ,तशी ती लाडात येऊन म्हणाली ,

"अहो ,लवकर निघालो असतो तर ,असे तुमच्या सोबत पावसात ,भिजायला मिळाले असते का ?"

ती तिच्या त्या लडिवाळ बोलण्याने तो घायाल ,होणार तर नवल - -?

सई त्यांचे संभाषण ऐकून गालातल्या गालात हसली .'ही बाई नक्कीच नवऱ्याला बोटावर फिरवत

असेल .नवराही तिच्या हो ला हो म्हणणारा असेल .' फटफट फटफट आवाज करत एक स्टायलिश बाईक तिथे येऊन धडकली .त्या मुसळधार पावसापेक्षाही त्या बाईकचा आवाज जोरात होता .सर्वांच्या नजरा

त्या आवाजाच्या दिशेने वळल्या .एक तरुण त्यावरून उतरून आत आला .त्या हँडसम तरुणाला सर्व बघतच राहिले . केसांवरील झिरपणारे पाणी त्याने हाताने बाहेर काढले .सर्वत्र नजर फिरविली .कुठे बसायला जागा मिळते का पाहू लागला .सईच्या बाजूची खुर्ची रिकामी होती .तो त्या खुर्चीकडे येवू लागला .सईला उगीच धडधड वाटू लागले .त्याच्या

रुबाबदार रुपामुळे ती चमकली .त्याच्याकडे पहावेसे वाटत असुनही पाहू शकत नव्हती .तो येऊन तिच्या शेजारील खुर्चीत बसला .तशी सई आणखी सावरून बसली .त्याने स्वतःला ठिक केले. कम्फर्टेबल होऊन बसला . तो सई कडे बघू लागला .सई पण अधुन मधून त्याच्याकडे बघत होती .कोणीच बोलत नव्हते . दोघांची नजरा नजर झाली की ,नजर चोरत होते .

'स्वतःला जास्तच हँडसम समजतो की काय ?

समोर एक यंग गर्ल बसली असल्यावरही बोलत नाही. स्वतःहून बोलायला काय जाते याचे ?तसा हँडसम आहे .आईने विचारले आहेच कसा मुलगा हवा तुला ? मी सांगेल अगदी या समोर बसलेल्या तरुणा सारखाच

हवा मला आणि हाच असला तर - - - !

हॅट ,काहीही काय विचार करते मी - - - !हा कसा

असेल - - ? आत्ताच तर कुठे पाहिले याला .कोण आहे ?कुठला आहे ?काहीच माहिती नाही .मी पण बावळटच आहे .'सईचे असे मनात विचार सुरू असतानाच एक म्हातारे जोडपे तिथे आले .अगदीच

गरीब दिसत होते .आजीची फाटकी नऊवारी ,आबाजीचे मळकट धोतर .हातात एक फटाकीशी पिशवी .चेहऱ्यावर थकलेले भाव . येऊन सई जवळच्या खुर्ची शेजारी ,खालीच बसले. आणखी चार पाच लोक आले .त्यांच्या बोलण्या वरून ते बांधकाम मजूर असावेत असे वाटत होते .नुकताच कोणाच्या घरावर स्लॅब टाकुन आले असावेत . त्यांच्या जोरजोरात बोलण्याने मात्र सर्वांची करमणुक होत होती .तो तरुण मात्र वैतागला होता .

"काय माणसं असतात .इतक्या जोरात हसी मजाक

करायची काय गरज - - ?' तो

"असं मनमोकळेपणे हसायला पण नशीब लागते .

नहीतर काही लोकांना तर हासातही येत नसते ."

सई जरा नाकातल्या नाकात बोलली.तसे त्याने कान

टवकारले .

"काही म्हणाला का मला "तो

"नाही काही नाही ."सई

"मला हसता येतं .पण असं फिदीफिदी दात काढता

नाही येत ."तो जरा चिडून म्हणाला .

"मला काय करायचे ?तुम्ही कसेही हसा ."सई

तो आणखी चिडला .सई गालात हसते हे ,बघुन

त्याला रागही आला .सईच्या लक्षात आले ,तशी

ती म्हणाली ,

"तुम्ही कसेही हसा ,गालात हसा ,जोरात हसा ,

मोकळेपणे हसा नहीतर कोणाला हसा . कसेही हसा ,फक्त हसत रहा .हँडसम माणुस हसला की आणखी हँडसम दिसतो ."सई

सईच्या बोलण्याने तो खुलला .जरा मोकळा होऊन सईकडे तोंड वळवून बसला .सई तो काय बोलतो याची गंमत पाहू लागली .ओठाशी आलेले शब्द तो बोलु शकत नव्हता .

"हँडसम आहे तसाच सज्जन ही दिसतो .मुलींशी बोलायची प्रॅक्टिस नाही वाटते .

एखादा दुसरा लफंगा असता तर ,आतापर्यंत

इम्प्रेशन मारण्यासाठी काय काय नाही बोलला असता ? पण मस्त आहे .आवडला मला .आजकाल अशी मुलं असतात कुठे ?"

सईला तिच्या विचारांचे नवल ही वाटले आणि लाजही वाटली .आपण मनात भलतेच विचार का आणत

आहोत ?

तो अधुन मधून तिच्याकडे बघत होता .ती त्याला

हसून गोड स्माईल देत होती .शेवटी एकदाचे उघडले

तोंड त्याने ,

"मी अथर्व ,तू .?"

"मी सई ."

"माझे फर्निचरचे शॉप आहे .रिंग रोड ला ."

"हो का ? म्हणजे तुम्ही बिझनेस मॅन ."

"हो ,तू ."

"मला पार्लर ची आवड आहे ,लवकरच माझे स्वतःचे

पार्लर सुरू करणार आहे ."

"आपल्या दोघांच्या आवडी सेम सेम .मलाही दुसऱ्यांची गुलामगिरी करायला नाही आवडत .

म्हणजे नोकरी हो ."

"मलाही तसच वाटते .जे करायचे ते अगदी स्वतःचे .

जिथे आपले निर्णय आपण घ्यायला स्वतंत्र असलो

पाहिजे ."

"करेक्ट ,माझंही मत असंच आहे ."

दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या .बाहेर पाऊस त्याच्या

मस्तीत धुवांधार कोसळत होता .इकडे अथर्व आणि

सईचे हस्याचे फवारे बरसत होते .कोणीतरी हॉटेल

मालकाला विचारले ,

" पाऊस काही इतक्यात थांबेल असे वाटत नाही .

तुम्ही मस्त भजे बनविता का .?" कोणीतरी

"बनवितो ,पण सर्व घेणार असतील तर - - !एकट्या

साठी भट्टी पेटवायला नाही पुरत ."हॉटेल मालक

मग सर्वांच्या संमतीने भजी बनविणे सुरू झाले .

पावसाच्या आवाजात स्टोव्ह चा आवाज ,तिथे जमा

असलेल्या लोकांचे आवाज आणि सई आणि अथर्व

यांचे हसणे - - ! सर्व आवाजांचा गोपाळ कालाच झाला होता जणू - - ! फक्त म्हातारे जोडपे तेवढे

चूप होते .ते भिरभिरत्या नजरेने आणि कमजोर कानांना सहन होईल तेवढे ऐकत होते .

गरमा गरम भज्यांच्या कागदी प्लेट्स सर्वासमोर

आल्या .सईला भजे आवडली .एका मागोमाग ती

संपवू लागली .तशीही आज बरीच दमली असल्याने

तिला भूक लागली होतीच .अथर्वने अजून एकही

घास घेतला नव्हता .त्याकडे बघून सई म्हणाली,

"संपवा ना .गार होतील ."

"हो .जास्त गरम मी नाही खाऊ शकत ."

अथर्व ने एक घास घेतला आणि त्याला जोराचा

ठसका लगला .तशी सई उठली .पर्स मधील बॉटलचे

पाणी त्याला दिले .दोन घोट पिऊन त्याचा ठसका

थांबला .त्याच्या डोळ्यात आलेले पाणी सईने हळूच

आपल्या नाजुक बोटांनी पुसले .त्याला बरे वाटल्यावर . तो भजे खाऊ लागला .अथर्वला ही ते आवडले .

"आणखी एक प्लेट मागवायचे का ?"अथर्व

"हो चालेल " सई

गपागप दोघांनी दोन प्लेट भजी संपविली .त्यावर

एक कट चहा झाला .हॉटेल मालक पैसे मागायला

आला .सईचे पैसे अथर्व देवू लागला तसा तिने स्पष्ट

नकार दिला .सईने स्वतः चे पैसे स्वतःच दिले .मग

त्या म्हाताऱ्या जोडप्याला पैसे मागितले .आजीने एक ,फाटकी विस रुपयांची नोटकाढून दिली .तसा मालक म्हणाला,

"आजी पन्नास रुपये झाले दोघांचे ."

"अरे बाबा ,दया कर ,इतकेच आहे ,माझ्या पाशी ."

आजी

"मग आधी नाही समजले का ?एकच प्लेट घ्यायची

होती ."मालक

सईने पर्स मधून पन्नास रुपये काढले आणि हॉटेल

मालकाला दिले .ते बघून आजीने आशीर्वाद दिला

"तुमची दोघांची जोडी सदा खुश राहो .सुखाने

संसार करा ."

अथर्व म्हणाला ,"सुंदर मुलींचे मनही तितकेच सुंदर

असते ,हे आज तुझ्याकडे बघुन कळले ."

आजीचे आणि अथर्व चे शब्द ऐकून सई मनातून

खुश झाली .धो धो कोसळणारा पाऊस आता बराच

शांत झाला होता .धो धो वरून ,तो रिमझिम वर

आला होता .हळूहळू एक एक जण तिथून बाहेर पडत

होते .सर्वात शेवटी सई आणि अथर्व निघाले .अगदी

बारीकसा पाऊस सुरू होता .सईने गाडीची चाबी

काढली .बटण स्टार्ट करून बघितले .सुरू होत

नव्हती .शेवटी अथर्व मदतीला आला .त्याने मेन स्टँड

वर गाडी उभी केली .किक मारून सुरू केली .

अथर्वच्या डोळ्यात बघत सई म्हणाली ,

"थँक्स "सई

"एक विचारू ,राग तर नाही येणार ना ."अथर्व

"विचार ना "सई

"मघाशी आजीने,बोललेले शब्द खरे करू या का ?

आपण "अथर्व

सई उगाच भाव खात म्हणाली ,"काय ते - - ?"

"आपली दोघांची जोडी सदा खुश राहो .मी अजून

अन मॅरीड आहे .करशील का माझ्याशी लग्न ."

अथर्व

आकाशातुन पडणाऱ्या जलधारांना साक्षीला ठेऊन

सईने अथर्वला

"हो " म्हटले

तसा अथर्व जोरात ओरडला

"आय लव्ह यू सई ."

सई लाजली .तिने गाडी स्टार्ट केली .

"अगं थांब .तुझा मोबाईल नंबर तर देऊन जा .कुठे शोधू मी तुला ?"अथर्व

सईने ,अथर्वला तिचा नंबर दिला .तो त्याने त्याच्या

मोबाईल मध्ये आणि मनात नेहमी साठी सेव्ह करून

ठेवला .आज वर्षा राणीने सईला ,तिचा जीवनसाथी

मिळवून दिला होता .



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy