Sangita Tathod

Inspirational

3  

Sangita Tathod

Inspirational

मनु आणि तिचे बाबा

मनु आणि तिचे बाबा

5 mins
253


टण टण टण टण टण टण टण असा घंटेचा आवाजझाला.आतापर्यंत शांत असणारी शाळा ,एकच गलका करत मैदानावर अली.कोणी पाच पाच ,सहा सहा चे ग्रुप पटापट तयार झाले.वर्गातून बाहेर येतांनाचा आवाज क्षणार्धात शांत झाला. स्टील, पितळ, अल्युमिनियम च्या डब्यातील तसेच काहींच्या कापडात बांधुन आणलेली सर्व जिन्नस पटापट बाहेर निघाली.डब्ब्यातील अमृततुल्य पदार्थाची वाटावाटी झाली.गप्पा करता करता पदार्थ कधी पोटात जाऊ लागले कळलेच नाही.

त्याच एका गटात मनु जेवत होती.चौथीत असलेल्या मनूच्या डब्ब्यातील भाजी आज सर्व मैत्रिणींना आवडली होती. "आजची भाजी, माझ्या बाबांनी केली." मनूच्या या वाक्यावर सर्वांचा हशा पिकला. मनूच्या मनात मात्र बाबांविषयीचा आदर आणि अभिमान आणखीच वाढला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी - -

"बाबा ,बाबा शेजारची ताई घरी नाही. काल तिने माझी वेणी घालुन दिली होती आज कोण घालणार वेणी? शाळेत काय अशीच जाऊ मी?." मनू रडवेल्या स्वरात बाबांना म्हणाली.

"मनु ,कशाला रडतेस ?चाल ये इकडे ,मी घालतो तुझी वेणी" बाबा म्हणाले

"बाबा ,तुम्हाला वेणी घालता येते!" मनू आश्चर्याने म्हणाली.

"प्रयत्न करतो.'बाबा म्हणाले.

मनुजवळ दुसरा पर्याय नसल्याने ती कंगवा आणि रिबीन घेऊन बाबाजवळ बसली. बाबा हळूहळू केस विंचरत तिची वेणी घालु लागलें. मनूच्या सुचना सुरू होत्या. बाबा चांगली वेणी घाला बरं,नाहीतर मैत्रिणी हसतील. रिबीन बरोबर बांधा बरं ,नाहीतर सुटेल.

मनूची वेणी होत नाही तोच कल्पू तिला शाळेसाठी बोलवायला आली. मनूच्या मनात वेणीबद्दल शंका होती म्हणुन ती आरशात बघितले. तिची शंका निरर्थक ठरते. बाबांनी वेणी उत्तम घातलेली होती. ती बाबांवर मनातुन खुश होते. 

 खुशी खुशीत दप्तर उचलते आणि कल्पू सोबत शाळेसाठी निघते. आज शनिवार असल्याने मनूची शाळा सकाळी होती. मनूच्या बाबांनी तिची वेणी घालुन दिली ,हे कल्पूने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले असते. 

 मधल्या सुट्टीत ,कल्पू सर्व मैत्रिणींना ही गोष्टी सांगतो. सरला, उमा,गीता रत्ना - - सर्वजणी मनूच्या बाबांचे कौतुक करतात.आमच्या आईपेक्षाही तुझ्या बाबांनी तुझी वेणी छान घातली म्हणुन प्रत्येक मैत्रीण वेणीला हात लावते. मनुही एक वेणी मागे एक पुढे ठेवत तोऱ्यात चालते. बाबांनी घातलेली वेणी बाप लेकीतली वीण मात्र अधिक घट्ट करते.बाप लेकीच्या सहवासाची दोन दिवस भर्रकन निघुन जातात. मनूची आई जेव्हा मामाकडे जायला निघाली तेव्हा खरे तर दोघीही मायलेकींच्या डोळ्यात पाणी तरळलं

 होत. पण आईचा नाईलाज होता. मनूला सोबत घेऊन जावं तर तिची शाळा दोन महिने पडली 

 असती. घरी ठेवावं तर बाप लेकीचं कोण करेल ?शेवटी खुप विचार करून छोट्या भावाला सोबत घेऊनआईने एकटीने जायचा निर्णय घेतला.

 मनुजवळ राहायला तिच्या बाबांची आजी आली होती. असे मनुचे आणि तिच्या बाबांचे अनेक किस्से!।मनु लिहायला बसली तर एक कादंबरी कमी पडेल .मनूच्या बाबांना काय येत नव्हतं?  फाटलेला कपडा हाताने इतका सुबकतेने शिवत की ,जणू शिलाई मशीनवर शिवला आहे . स्वयंपाकात तरबेज , खेळात तरबेज , प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा ,कामात चोख ! असं कोणतच।काम नव्हतं की ,मला जमत 

 नाही असं ते म्हनायचे. तर असे हे मनुचे बाबा . तिचे पाहिले गुरू झाले . शाळेचा बराचसा अभ्यास ते मनुला  शिकवीत. पण फक्त शालेय शिक्षण म्हणजे खरं शिक्षण नसते . जीवनातील संस्कारक्षम

 धडे शिकणे म्हणजे शिक्षण , ते अनुभवातून प्रत्यक्ष कृतीतून शिकल्या जात असते .  कसे शिकल्या जाते ते या प्रसंगावरून कळेल _ _


 एकदा मनुच्या मावशीकडे एक फंक्शन होते. मावशी नागपूरला राहत होती. सर्व मावशीकडील फंक्शन संपवून , परतीसाठी नागपूर स्टेशन वर आले होते. त्यावेळी ट्रेनचे ऑनलाईन लोकेशन कळत नव्हते . म्हणून ट्रेनच्य्या वेळेवर हजर झाले होते. पण स्टेशन वर आल्यावर कळले की ट्रेन दोन तास लेट आहे . सर्वजण नाराज होऊन बसून होते . गप्पा झाल्या . अंताक्षरी खेळून झाली , पण टाईम काही कटत नव्हता . शेवटी बोअर होऊन सर्व बसून होते. तोच मनुला एक ओंगळ कपड्यातील भिकारीन दिसली . ती

 डस्ट बिन मधे काहीतरी शोधत होती. तिच्या हाताला एक ब्रेड लागला . तिने तो बाहेर काढला.

 थोडा पुसुन काढला आणि तोंडात टाकला. आणि बकबक खाऊ लागली . तिने पुन्हा डस्टबिन मधे हाय घातला . यावेळी तिला बिस्किट्स सापडले . ते पण ती बकाबक खाऊ लागली. ते किळसवाणे दृश्य पाहून मनुच्या तोंडून निघून गेले ,

 "शी... काय बाई आहे! "


 मनुचे बाबा पण , त्या बाईचे निरीक्षण करीत होते.  त्यांनी ओळखले की , त्या बाई ला खूप भूक लागली

 आहे . त्यांनी लगेच बॅग मधील साजूक तूपाचे लाडू काढले , आणि त्या बाईच्या हातात दिले . तिने 

 डब्बा उघडला . बाबा कडे पाहिले . " हे लाडू , माझ्या साठी आहेत का ?"  असे खुणेनेच विचारले .

 बाबा म्हणाले , "हो , हे तुझ्यासाठी आहेत. "

 तिने एक लाडू काढला , आणि खाल्ला . लगेच ३ / ४ लाडू तिने फस्त केले . त्यानंतर तिची पोटातील भूक शांत झाली असावी . तिने बाबाकडे अश्रूभरल्या नजरेने पाहिले. तिचे पोट भरलेले पहिल्यावर बाबाचे मन समाधानी झाले. तिने डब्यातील लाडू स्वतःच्या पिशवीत काढून घेतले . डबा परत केला .काहीही न बोलता , ती बाबांना आशीर्वाद देऊन निघुन गेली . 

 भुकेलेल्या अन्न देणे हा संस्कार मनूच्या मनावर बिंबवल्या गेला. तो तिच्या बाबांच्या प्रत्यक्ष कृतीतून. 

 तर असे हे मनूचे बाबा तिचे गुरू. त्यांच्या सहवासात ती कितीतरी गोष्टी शिकली. जीवनाचे प्रत्यक्ष

 अनुभव तिला जवळून अनुभवता आले. त्यातून ती , खूप काही शिकली. बाबा सोबत नसतांना

 तिला हेच अनुभव कामी आले. मग न डगमगता ती जीवनाची एक एक पायरी चढत राहिली.

 त्यामागे तिच्या बाबांची शिकवण तिला बक्कळ मानसिक बळ देत होती...

 आणि अजूनही देत आहे. 

…...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational