एक आठवण नदीचा पूर
एक आठवण नदीचा पूर
एक आठवण - - नदीचा पूर
बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. पाऊसवेड्या पंकजाला असा रिमझिम पाऊस खूप आवडतं होता.
त्या सरसर पडणाऱ्या सरींकडे बघतांना पंकजाला ,मनातून आनंदी तरंग उठत होते. खिडकीतून दिसणाऱ्या ,त्या एकसारख्या रिमझिम पावसाकडे ती बघत होती .त्या जलधारांच्या जमिनीवर पडणाऱ्या ,सरींचा मधुर
संगीतमय नाद ऐकण्यात ती तल्लीन झाली होती. मधेच मेघ ,एखादा आलाप काढून ,त्या संगिताला
सूर जोडत होता .पावसाचा मनमुरादपणे आनन्द घेण्यासाठी तिच्याही तोंडून सूर निघून गेले ,
प्यार हुआ इकरार हुआ प्यार से फिर क्यू डरता है दिल
तो पर्यंत तिने गॅसवर ठेवलेल्या चहाला उकळी आली होती . पंकजाचे सुरेल गाणे ऐकून पाहून पंकजाच्या घरमालकीन म्हणाल्या ,
"आज ,सजनाची भेट होणार आहे ,पंकजाची कळी
खुललेली दिसते .चालु दे ,चालू दे ,तुझं ,"
असे म्हणून त्या गलातल्या गालात हसल्या . पंकजा उगाच लाजली आणि सचिनच्या आठवणीने आणखी सुखावली . नवीन लग्न झालेली पंकजा ,सचिनच्या तिच्या प्रियतमाच्या आठवणीत रमणारच ना - - ! त्यात तिचा आणि त्याचा हा पहिला पावसाळा ,दोघेही असे दूरदूर मग काय - -! भेटीची ओढ ही असणारच - !आज सचिन भेटणार या विचारानेच ती सुखावली आणि मस्त कडक बनलेला आल्याचा वाफाळलेला चहा घोट घोट पित पावसाकडे बघू लागली .आता जर सचिन इथे असता तर - - !चहा पिऊन त्याने ,झक्कास चहा झाला म्हणून एक पापा घेतला असता .त्याच्याच
विचारात ती आज प्रत्येक काम करत होती . त्याला आवडते म्हणून भेंडीची मसाला भाजी केली . स्वतःसाठी दोन चार पोळ्या बनविल्या .त्यातील एक पोळी पोटात टाकली आणि ऑफिस साठी तयार होण्यास ,ड्रेस शोधू लागली तर - - ! पुन्हा सचिन आठवला .त्याला आवडतो तो ,स्काय ब्लू कलरचा ,ड्रेस घातला . आता बाहेर पडणारा पाऊस पूर्णतः थाम्बला होता .पण मनाने मात्र ती ,सचिन सोबत पावसात भिजत होती .जातांना काकूंना म्हणाली ,
"येते काकू ."
"पंकजा या पावसात असा लाईट कलरचा ड्रेस - - !"
काकू (घरमालकिन )
"काकू सचिनला आवडतो ना ,हा ड्रेस म्हणून ."
पंकजा सहज बोलुन गेली . तशा काकु ,हसल्या आणि पंकजा लाजून ऑफिस साठी निघून गेली शनिवारचा ,हाफ डे करून आज पंकजा ,तिच्या घरी म्हणजे सासरी जाणार होती .पावसाची रिमझिम आता थांबली होती . पण आभाळ गच्च भरून होते . पंकजा आणि सचिनचे लग्न होऊन ,उनेपुरे सहा महिने झाले होते . अगदी पाहून पारखून
केलेले ,त्यांचे अर्रेंज मॅरेज होते सचिन हा त्याचा आईवडीलांना एकुलता एक मुलगा होता .गावात शेती होती सचिन गावातील ,एका सहकारी बँकेत कॅशिअर होता सोबत वडीलोपार्जित शेती सुध्दा सांभाळत होता .तर पंकजा , गावापासून जरा दूर असलेल्या शहरात एल .आय .सि.ऑफिस मध्ये जॉबला होती .पंकजाला किंवा सचिनला एकत्र
राहने शक्य नव्हते .म्हणून सचिन गावी राहून त्याचा जॉब करत होता ,तर पंकजा शहरात राहून तिचा जॉब करत होती . शनिवार रविवारला दोघे सोबत येत होती .मधे जर एखादी सुट्टी आली तर दोघांनाही खूप आनंद होत असे .अशा सुट्ट्यांची ते वाटच बघत असायचे . पंकजाच्या ,ट्रान्स्फरच्या प्रयत्नात ते होते .पण तो पर्यंत हा सात दिवसांचा दुरावा त्यांना सहन करणे भाग होते . पंकजा ऑफिस मध्ये पोहचली .तिच्या रुटीन कामांना सुरुवात केली .पटापट ती काम उरकू लागली .बाहेर पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली .पाऊसवेड्या पंकजाने हातातील काम बाजूला केले आणि अन बाहेर पावसाकडे पाहू,लागली . तिच्या तोंडून निघून गेले
टीप टीप बरसा ,पाणी
पाणी मे आग लगाई
बाजुला उभी असलेली स्वाती म्हणाली ,
"ही आग आता जास्त वेळ , राहणार नाही .बाहेर
आग विझवणारा आला आहे ."
"काय ?
"सचिन उभा आहे बाहेर .जा निघ लवकर .नाहीतरी
ऑफिस ची वेळ संपत आली आहेच ."
"अगं ,पण हे काम - -?"
"डोन्ट वरी ,मी करून घेईल ."
"थँक्स ,स्वाती ,खरचं गं ,मैत्रीण असावी तर अशी .
अगदी तुझ्यासारखी ."
पंकजाला मधेच थांबवित ,स्वाती म्हणाली,
"पुरे कर माझी तारीफ ,बिचारा सचिन ,तुझ्या
भेटीसाठी आसुसला असेल .जा पटकन दर्शन दे त्याला ." पंकजा बाहेर आली तर ,थोडासा भिजलेला
सचिन तिला दिसला .ती धावतच त्याच्याकडे गेली .त्याच्या केसातून पाण्याचे ओघळ निघत होते .चेहरा पावसाच्या पाण्याने ओला झाला होता .अंगातील शर्ट होते ओले झाले होते .काय मस्त दिसत होता सचिन - - ! समोरा समोर आल्यावर दोघांनाही वाटत होते की ,घट्ट मिठीत यावे ,पण - -
"काय रे ,आलास तर कॉल का नाही केला - -?."
"मुद्दाम नाही केला .मला बघायचे होते ,की तुला
माझ्या येण्याची चाहूल लागते की ,नाही - -?"
पंकजाने उगीच डोळे बारीक केले ,
"चल ,नाटकी ,कुठला .- ?चल मी ,बॅग भरलीच आहे ,तू थोडे काही खाऊन घे ,लगेच आपण
गावी जाण्यास निघू ."
"नाही ,आईचे फर्मान आहे ,उद्या हरतालिका आहे . माझ्या पहिल्या सुनेला ,पहिल्या हरतालिकेसाठी नवी कोरी साडी आण .त्यामुळे आधी आपण मार्केटला जाऊ ,तिकडेच खाऊ ,मग घरी जाऊ ."
"जशी आपली आज्ञा "म्हणत पंकजा ,सचिनच्या बाईक वर मागे बसली .अगदी त्याला चिपकुन. खरे तर तिला ,नवी साडी घेण्यापेक्षा ,त्याच्या सोबत ,बोलायची ,त्याचा स्पर्श अनुभवायची जास्त ओढ लागली होती .पण सासूबाईची आज्ञा कशी मोडणार ?दोघेही मार्केटला गेले .पाऊस पूर्णतः थांबला होता .पण त्याचा मंद सुगंध सर्वत्र दरवळत होता . रस्त्यावर साचलेल्या पावसातील ,खड्डयातून गाडी कढताना सचिनची दमछाक होत होती ,तर जागोजागी उडणारे तुषार पाहून पंकजाला मजा वाटत होती .तिने एका शॉप मधुन एक साडी , खरेदी केली ,त्यानंतर दोघांनी मस्त मसाला दोसा
खाल्ला .अधुन मधुन पावसाच्या सरींवर सारी सुरूच होत्या . ऊन सावलीचा ,लपाछपीचा खेळहीसुरू होता . एकमेकांच्या सहवासात असलेले सचिन आणि पंकजा भलतेच आनंदी होते . पंकजाला साडी खरेदीपेक्षा सचिनचा त्या
पावसातील सहवास जास्त प्रिय वाटत होता. आज दोघांची प्रेमाची गाडी मस्तच धावत होती . सर्व आटोपून दोघे घरी आले .आल्या आल्या सचिनने ,पंकजाला घट्ट मिठीत घेतले .सात दिवसांचा विरह त्याला घालवायचा होता . टक टक आवाज आल्यावर दोघे भानावर आले . वाऱ्याने ,त्यांना डिस्टर्ब केले होते .पावसांच्या सरींसोबत ,हवा सुद्धा सुरू होती .
लगेच सचिनने ,पंकजाला ,निघायची तयारी करायला सांगितले .जातांना तिने काकुला आवाज दिला. काकु बाहेर आल्या आणि म्हणाल्या,
"अगं ,किती उशीर केला निघायला ? उद्या सकाळी जा ना - ! आभाळ ही गच्च आहे.केव्हाही पावसाला सुरुवात होऊ शकते ."
"नाही काकु ,एवढ्यात नाही येत पाऊस .निघतो आम्ही ."पंकजा
"सांभाळून जा बरं ."काकू
सचिनने ,बाईकला किक मारली आणि पंकजा हळूच त्याला अगदी चिपकुन बसली दोन प्रेमी जीवांच्या प्रेमाच्या गाडीला कोणताही आवाज ऐकू येत नव्हता ती गाडी तिच्याच मस्तीत सुसाट वेगाने धावत होती शहरातील ट्रॅफीक पासुन त्यांना दूर एकांतात घेऊन जात होती .जसे जसे शहर मागे पडत गेले तसा तसा हवेत गारवा जाणवू लागला .
दोघांच्या अंगावरील ओलसर कपड्यांमुळे तो अधिकच जाणवत होता .आजूबाजूला असलेली हिरवळ ,आकाशातील डोकावणारा इंद्रधनुष्य,सांजवेळी पक्षांची घरट्यात ,परतण्यासाठी चाललेली लगबग ,नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे , अगदी स्वच्छ झालेला ,डांबरी रस्ता .पंकजाच्या सोबतीला असलेली ,सचिनची प्रेमळ साथ .आणखी काय
हवे ? एखाद्या रोमँटिक मुव्ही ला लाजवेल असा सिन होता.एक कमी होती ,एका रोमँटिक गाण्याची .
मावळतीचा सूर्य प्रेमी युगलाच्या ,गुजगोष्टी ऐकत, त्याच्या घराकडे परत निघाला होता . आता अंधार बराच दाटला होता. पांकजा ,पहिल्यांदा अशी रात्रीच्या वेळी ,सचिन सोबत गावी जात होती . त्यांचे गाव आता अगदीं जवळ आले होते .बस्स
नदी ओलांडली की गाव होते .नदी जवळ असलेली दाट झाडी ,त्यातुन ऐकु येणारी ,रातकिड्यांची किरकीर ,अगदीच
निर्मनुष्य असणारा ,रस्ता .स्वतःचा आवाज स्वतःला ऐकू यावा अशी भयाण शांतता ,वरून नुकतीच सुरू झालेली पावसाची रिमझिम झडी .या भयाण ,वातावरणात पंकजाला थोडी भिती वाटली . नदी जवळ आली तसा ,हवेतील गारठा आणखी वाढला .नेहमी ऐकू येणारा नदीचा खळखळनारा मधुर सूर आज ,बदललेला जाणवत होता .जणू
तो काहीतरी धोक्याची सूचना देत होता .ऐकूनच मनात कापरे भरले होते .जवळ गेल्यावर तर ,त्या आवाजातील दहशत आणखी वाढली होती . खूप जोराने पाणी वाहण्याचा आवाज येत होता . सचिनने गाडी थांबविली .पंकजा गाडीवरून
उतरली .समोरचे दृश्य पाहून हादरली .नदी दुथडी भरून वाहत होती .तिने रौद्र रूप धारण केले होते .नदीच्या पुलावरून चार पाच फुट पाणी वाहत असावे .अंधारात फारसा अंदाज येत नव्हता .पण पुढे जाणे शक्य नाही ,हे पंकजा आणि सचिनने ओळखले होते .बराच वेळ दोघे नदीच्या काठावर बारीकशा झडीत उभे होते .रात्रीचे आठ वाजले
असतील .त्या दोघांशिवाय तिथे कोणीच नव्हते .आता समोर जाणे तर शक्यच नव्हते .पावसाचा जोर आणखी वाढल्यामुळे मागे फिरणे सुध्दा शक्य नव्हते .त्यामुळे त्यांनी रात्रभर कुठे राहता येईल का ?याचा शोध घेणे सुरू केले . मागे नजर गेली . पण कुठेच काही आसरा दिसत नव्हता . तितक्यात मोबाईल वाजला ,सचिनच्या बाबांचा कॉल होत .
"सचिन ,नदीला पाणी खूप चढले आहे .तू पाण्यात गाडी टाकु नकोस
"इतके बोलणे होत नाही तोच मोबाईल ची रेंज गेली .सचिनला आठवले की , इथून जवळच ,नदीवर कोल्हापुरी बंधारा आहे .तिथे एक चौकीदार राहत होता .तिथे रात्रभर आपण राहू शकतो .त्याने गाडी त्या दिशेने नेली .एका रूमच्या छोट्याशा घरासमोर गाडी थांबली .तोपर्यंत दोघेही त्या पावसात चिंब भिजले होते .सचिनने बाहेरून आवाज दिला .बऱ्याच वेळाने एका आजीने दार उघडले .
"आजी नदीला पूर आहे .आम्ही दोघे आजची रात्र इथे राहू शकतो का ?" सचिन
"ही काय धर्मशाळा दिसली काय ?कोणाला राहता नाई येत इथे ."आजी
"आजी राहू द्या ना ."पंकजा
"काही लफडं करून आले असाल दोघ .तरणे दिसता .मा पोरगा बी ,घरी नाई .कुठं बी जा ." आजी
"नाही हो आजी ,आमचं काही लफडं नाही .आम्ही नवरा ,बायको आहोत .हे पहा माझ्या गळ्यात मंगळसूत्र सुध्दा आहे . "पंकजा
"असे काये मणी लय भेटतात बाजारात ." आजी
आजी त्यांना घरात घ्यायला तयारच नव्हती . सचिनने त्याच्या आजोबांची ,वडिलांची ओळख दिली त्यानंतर आजीने त्यांना घरात घेतले .पंकजा जवळ तिच्या बॅग मध्ये ,तिचे सुके कपडे होते .तिने चेंज करून घेतले .सचिनने शर्ट काढून सुकवायला ठेवला .आजीने दोघांना जेवणाचे विचारले .त्यांनी नकार दिला .मग आजीने त्यांच्या साठी बिन दुधाचा
काळा चहा बनविला .त्या दोघांना एक फाटकी गोधडी दिली .
"आमच्या घरी जास्त अंथरून नाहीत .रात यावरच काढा ." असे म्हणून आजी तिच्या खाटेवर झोपली .
पुढच्या दहा मिनिटात ती घोरायला लागली . पंकजाने गोधडी खाली अंथरली .पावसामुळे खालची जमीन चांगलीच गार पडली होती .
"तू झोप थोडावेळ ,मला झोप नाही ."पंकजा
"नाही ,तू अंग टाक ,मी बसतो ."सचिन त्या दोघांचे तू ,मी ,तू ,मी चे लाडाचे बोलणे ऐकून आजी जागी झाली .
"पडा ,गुमान .झोपू द्या मला ,दोघ नवरा ,बायको आहा ना .मग पडा एका गोदधीवर ."आजीने दटावले .तसे दोघे हसण्याचा आवाज ,दाबत शांत झाले .एकमेकांशी खुणेच्या भाषेने बोलु लागले . बोलता बोलता ,तोंडावर हात ठेवून हसू लागले . पंकजाने ,हळूच,तिच्या ओढणीने सचिनचे केस पुसून काढले .बराच वेळ ती सचिनच्या केसांमधुन
हात फिरवत होती .नंतर पेंगायला लागली .तिथेच आडवी झाली .खालची ओलसर ,गार जमीन , तिला काहीच जाणवत नव्हती .तिला व्यवस्थित झोपता यावे ,म्हणून सचिन उठून बसला .तिचे डोके हळूच त्याच्या मांडीवर घेतले .भिंतीला
टेकून बसला .त्याचाही काही वेळात डोळा लागला . सकाळी पक्षांच्या आवाजाने जाग आली . पंकजा उठली .सचिनचा असे ,भिंतीला टेकून झोपलेले बघुन तिला ,खूप वाईट वाटले .बाजूला आजी ,कुठे दिसते का बघू लागली .तर आजी
चुल पेटवून बसली होती .चुलीवर चहा शिजत होता सचिनला ही जाग आली.
"या दोघंही ,तुमचा ,चा ठेवते .या चूळ भरून ." आजी
चहा पिऊन दोघांनी निघायची तयारी केली. जातांना आजीच्या पाया पडले .नदीचा पूर ओसरला होता . आकाश एकदम स्वच्छ झाले होते .पडून गेलेल्या पावसाचा मंद सुगंध ,आजूबाजूच्या परिसरात दरवळत होता .रानटी फुले मस्त वाऱ्यावर डोलत होती .फुलपाखरे ,त्यावर भिरभिरत होती पंकजा हे सर्व नजरेत साठवत होती. पावसातील
ती रात्र आणि तो नदीचा पूर ,ती कधीच विसरू शकणार नव्हती.