Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Abasaheb Mhaske

Romance


1.9  

Abasaheb Mhaske

Romance


आठवत का ग तुला ? तो शाळेचा ...

आठवत का ग तुला ? तो शाळेचा ...

1 min 23.8K 1 min 23.8K

आठवत का गं तुला ? तो शाळेचा पहिला दिवस नि तुझा तो पहिला-वाहिला स्पर्श...

मी प्रचंड घाबरलेलो ...अन तू रागात वर्गाबाहेर गेलीस बडबडंत तेंव्हा ... 

आजही आठवतात तुझे ते शब्द ,अन भेट ती आपुली अपघातानेच झालेली ...

प्रेमाची सुरुवात कधी अन केव्हा? तिरस्काराची जागा प्रेमाने कशी ग घेतली ? 

आठवत का ग तुला ? सर्व काही... ते मंतरलेले दिवस.. तुझा शेवटचा निरोप  

तुझ्या मैत्रिणी कायम मला प्रतिस्पर्धी म्हणून पाण्यात पहायच्या पण तू मात्र ..

एकांतात गाठून आपुलकीनं चौकशी करायचिस , गुपचूप नोट्स पुढे सरकवायचीस 

नाही म्हटलं तरी थोडी अनिच्छेनेच, अवघडल्यागत तू त्यांच्यात वागायचीस ...

हिंदीच्या सरांनी तू वर्गात पहिली आलीस म्हणून केलेलं अभिनंदन .. अन तो 

टाळ्यांचा कडकडाट .. नंतरचा माझा अव्व्ल क्रमांक घोषित केल्याचा आनंदही तेवढाच 

मला मात्र जिंकून हरल्यागतच फिलिंग .. तुझ्या मैत्रिणी नाराज पण तू मात्र खुश होतीस 

गावभर आपुल्या प्रेमाची चर्चा सुरु झाली नि तुझ्या घरच्यांनी तुझ्यावर पाळत ठेवली...

आठवत का ग तुला ? एके दिवशी झिम्माड पाऊस, धो- धो कोसळत होता ...

तू अन मी  नखशिखांत चिंब - चिंब झालेलो .. अबोल होऊन चालत होतो अन ..

अचानक वीज कडाडली तशी तू घाबरून जवळ येऊन मला बिलगली होती... 

तुझा तो स्पर्श , मनीचा हर्ष .. मी मात्र कितीतरीवेळ तुला न्याहाळत , नंतर सावरलो होतो ..  


Rate this content
Log in

More marathi story from Abasaheb Mhaske

Similar marathi story from Romance