पारावरच्या गप्पा
पारावरच्या गप्पा
दिवस कामधंद्याचे असले तरी पारावार गर्दी होतीच
मुका सदा ,आफाट बाबूराव , फेकुचन्द अच्छे दिनवाले
बेरकी नाना पहेलवान , रिकाम टेकडे हा-या - ना-या
त्याच्या नुसत्या उचापती चालू होत्या रोजच्याप्रमाणे
पाटलाचा किसना लगबगीन जाताना पाहून
नानाने आवाज दिलाच अरे ये किसना कुठ निघाला ?
चाल्लो म्हसनात यतु का। च्यायला नस्त्या चांभार चौकशा
काम ना धंदा हरी गोविंदा किसना बड़बड़ला ,सगळीकडे हशा पिकला
ह्यांचा रोजचाच खेळ कुणी दुर्लक्ष करत कुणी रागावत
एवढ्यात आफाट बाबूराव बोलता झाला मंडळी कालची
बातमी ऐकली का , कोण्ती कोण्ती गलका झाला
आर सांगतो सांगतो परदेसातल काळ धन येणार है म्हैंन
हैत तिच्यायाला मला वाटल काय सांगतो नव सगळे हसु लागले
आर खरच सांगतो अणि आता सगळ्याला ३० लाख मिळणार हाय म्हणे
मुडदा बसीवला त्या भामट्यांचा ७ सालापासून बघतोय उलट आपलेच चोरते ते
खर हाय गड्यानो महगाई वाढली खत बियाँने अन्य पैस नाय पोर घरी बसले
त्या पावसान बी तोंड काळ केल तर तर तू लैच शेती करते जिव लावन फेकचन्द गरजला
तुला र काय झाल भडकायला अरे सायबान जे केल ते सत्त्तर सालात झाल नव्हत
खर है गड्या एवढ भू तान नांगर फिरविल्यागत कधीच झाल नव्हत हा-या बोलला
सगळे म्हणाले अक्सी बरोबर बोलला गड्या - ना-या म्हणाला ,जावु दया ना राव आपल्याला क्या त्याच
काढ़ा बीड़ी कुणाजवळ आसन तर हे असच चलायच बाबानो आपल्या कष्टअच् लवकर मिळत नाय म्हन अच्छे दिन डोम्ब्लांच