Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Abasaheb Mhaske

Inspirational

0  

Abasaheb Mhaske

Inspirational

मनःपूर्वक अभिनंदन !

मनःपूर्वक अभिनंदन !

1 min
2.6K


आदरणीय गुरुवर्य , आमचे मार्गदर्शक आमचे आजोळचे , जिवाभावाचे स्नेही डॉ जिगे सर ह्यांना साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला हे कळल्यावर मनाला खूप खूप आनंद झाला. अजूनही अशा काही संस्था आहेत ज्या खरोखर प्रामाणिकपणे विधायक मार्गाने पुरस्कार देतात यावर विश्वास बसतो . नाहीतर ह्या क्षेत्रात बाजार बुणग्यांची काय कमी आहे.  

      भाषा , साहित्य आणि संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य स्तरावरील संस्था उभारून त्या संस्थेच्या मार्फत भूमिजन साहित्य चळवळ सक्रिय करण्यासाठी पदरमोड करणारे आमचे गुरुवर्य आदरणीय डॉ सर्जेराव जिगे सरांना  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्या बददल आम्हा सर्व भूमीजनांना मित्र परिवार आणि आप्तेष्ट ह्यांना मनस्वी आनंद झाला आहे . या भावनांना व्यक्त करताना शब्द तोकडे पडावे अशा शब्दातीत भावना आम्हा सर्व मित्र परिवाराच्या झाल्या आहेत. पुरस्कार हा कुठलाही असो त्यातून कार्याचा गौरव होणे , कुणी दखल घेणे हे बाब अभिमानास्पद असते . गावपातळीवर भूमिजन चळवळ वृध्दींगत करताना सरानी घेतलेली मेहनत, संघटन कौशल्याच्या जोरावर प्रतिकूल परिस्थतीत ही हि चळवळ महाराष्टभर पसरविली त्याचे आम्ही जिवंत साक्षिदार आहोत .  

ग्रामीण भागातील अनेक नवोदितांना हक्काच व्यासपीठ मिळवून दिले . वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम ते न थकता घर संसार नोकरी सांभाळत करताना आम्हाला थक्क व्हाल होत . कार्यक्रमांचं आयोजन , तो उत्साह ,तो हसतमुख चेहरा आम्हाला सतत प्रेरणादायी ठरत आला आहे . इथे या प्रसंगी आवर्जून सांगावेसे वाटते की , त्यांच्या तालमीत मोठे झालेले प्रा एकनाथ शिंदे  सारखे असंख्य कवी लेखक ह्यांना एकत्र आणून भूमिजन चळवळीस खतपाणी घालण्याचे काम ते अविरतपने करीत आहेत. त्यांच्या कार्यतत्पर सेवेला सलाम , आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार २०१९ मिळल्याबद्ल मनःपूर्वक अभिनंदन !

 , असतील डोळे पुसणारे तर

          रडण्यालाही अर्थ आहे 

   नसतील रडणारे तर

         मरणही व्यर्थ आहे 


Rate this content
Log in