Nilesh Bamne

Romance

2.6  

Nilesh Bamne

Romance

वर्तुळ...

वर्तुळ...

19 mins
33.6K


सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो,' मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! ' ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात...

कविता: ( त्याच्याकडे पहात) हा ! बोला ना ! बऱ्याच दिवसापासून मला जाणवतंय कि तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे !

विजय: ( किंचित सावरत कविताचा हात हातात घेत ) कविता ! आय लव्ह यु !

कविता : त्यात काय सांगायचं ? मला माहीत आहे कि तुमचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे म्हणूनच तर आपण एकत्र आहोत आपले विचार जुळतात आपण एकत्र काम करतोय ! माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे ! आणि ते कायम तसेच राहणार आहे !

विजय : आता मी तुला जे सांगणार त्यानंतर कदाचित ते प्रेम तसेच राहणार नाही ! याचीच मला भीती वाटतेय !

कविता: ( विनोदाने ) अहो ! जग घाबरते तुम्हाला आणि तुम्ही काय घाबरताय ? जे काही सांगायचे आहे ते एकदाचे सांगून टाका म्हणजे तुमचे आणि माझे मनही हलके होईल !

विजय : (स्वतःला सावरत ) मी पुरुष म्हणून कसा आहे ?

कविता : सर ! हा काही प्रश्न झाला तुम्ही पुरुष म्हणून कसे आहात हे साऱ्या जगाला माहीत आहे मी वयाच्या आठराव्या वर्षापासून तुम्हाला पाहतेय ! तुमच्यासोबत काम करतेय ! पण पुरुषात असणारा एकही दुर्गुण मला तुमच्यात कधी दिसला नाही.

विजय : कदाचित! तू माझ्याकडे फक्त चांगल्याच नजरेने पाहतेस म्हणून असेल. बरेच दिवस झाले तुला सांगेन म्हणतोय पण माझं माझ्याच मनाशी काही पक्के होत नव्हते ते आज झाले म्हणून तुझ्याशी बोलायची हिंमत करतोय !

कविताः बोला ना सर !

विजय : स्वतःला सावरत तिला म्हणाला, मी प्रेमात पडलोय !

कविता : ( जोर जोरात हसत ) सर ! यात काय नवीन आहे गेली आठ वर्षे मी पाहतेय तुम्ही कशा ना कशाच्या प्रेमात पडतच असता, बर ! आता कशाच्या प्रेमात पडला आहात ?

विजय : आता मी तुझ्या प्रेमात पडलो आहे !

कविता : सर ! तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहातच पण माझ्यामुळे तुम्ही नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात ते मला कळत नाही !

विजय : कविता! तू कधी कोणाच्या प्रेमात पडलीस ? कविता : ( त्यावर चटकन ) हो ! तुमच्या प्रेमात पडली कारण तुमच्या तोडीचा कोणी पुरुषच नव्हता जवळपास प्रेमात पडायला ?

विजय : ( किंचित सावरत ) मी विनोद नाही करत, मी खरंच प्रेमात पडलोय !

कविता : बर ! सांगा तुम्ही आता कशाच्या प्रेमात पडला आहात ? कोणती कथा आवडली जिच्यावर एखादा चित्रपट बनवावासा वाटतोय कि कविता ध्वनिमुद्रित करावीशी वाटतेय ?

विजय : ( रागावून ) तू कधी तरी आपल्या कामातून बाहेर पडून विचार करणार आहेस का ?

कविता : सर ! तुम्ही त्याचेच तर मला पैसे देता !

विजय : कविता आजही तुला वाटत का कि मी फक्त तुला माझ्याकडे काम करणारी एक स्त्री म्हणूनच पाहतो ?

कविता : नाही ! मला तस नव्हतं म्हणायच ! बरं सांगा आता तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला आहात ? त्यावर विजय म्हणाला , ते जाऊदे आता ! आता ते सांगण्याची माझी इच्छा नाही !

विजय आणि कविता चालत चालत एक फेरी पूर्ण करून पुन्हा आपल्या कार्यालयात येतात चहा पित पित कविता आणि विजयांच्या पुन्हा गप्पा सुरु होतात.

कविता : सर ! शेवटी तुम्ही मला सांगितलेच नाही की तुम्ही यावेळी नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात ?

विजय : तुला काय वाटत मी कशाच्या प्रेमात पडलो असेन ?

कविता : मगाशी तुम्ही विनोदाने म्हणालात कि तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात पण तुम्ही माझ्या प्रेमात का पडाल ? प्रेमात पडायला तुम्ही माझ्यासारखी सामान्य मुलगी का निवडाल ? सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या वयात किती अंतर आहे ? ते अंतराच सोडापण तुम्ही माझ्या प्रेमात पडालच का ? माझ्यात आहेच काय असे जे तुम्हाला माझ्या प्रेमात पाडेल ? तुमच्या आजूबाजूला नव्हे अगदी जवळ स्वप्नातील पऱ्या फिरत असतात, ,त्यातील कित्येकांच्या नजरेत मला तुमच्याबद्दल ओलावा दिसतो. तो का दिसतो हे मलानाही सांगता येणार पण त्यातील कोणीही हसत- हसत तुमच्या प्रेमात पडेल. पण सर ! तुम्ही कमालीचे सभ्य आहात, त्यानांही तुमच्या सभ्यपणाचे कौतुक वाटते. तुम्हाला जर खरंच कोणाच्या प्रेमात पडायचं असत तर तुम्ही माझी वाटच कशाला पाहिली असती ?

विजय : कविता तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस तेव्हा माझे आयुष्य अशा वळणावर होत कि तेथून मला मागे वळून पाहणे शक्यच नव्हते त्यामुळे तू माझ्यासोबत फक्त माझ्या यशापयशाचा प्रवास केलास. तुला सतत माझ्यातला फक्त एक चांगला, सुसंस्कृतआणि सभ्य माणूसच दिसत राहिला. तू माझ्यातील चांगल्या माणसाच्या प्रेमात पडलीस म्हणूनच मी तुला जेव्हा म्हणालो की माझे तुझ्यावर प्रेम आहे तुला त्याचे काहीच वाटले नाही पण हेच वाक्य माझ्या तोंडून ऐकण्याच्या आशेत कित्येक जणी वाट पहातबसल्या होत्या पण मी नाही म्हणालो त्यांना कधीच ! त्या आजही मला शिव्या देत असतील ! माझ्यातील चंचल पुरुष जो तुला माहीत नाही तो कधीच कोणा एकीच्या प्रेमात पडला नाही, सतत फुलपाखरासारखा या फुलावरून त्या फुलावर उडत राहिला एखाद्याफुलपाखराप्रमाणे ! माझ्या प्रेमाचे आयुष्यही प्रत्येक वेळेला अल्पच ठरले पण तरीही ते फुलपाखरू आपली छाप त्या फुलांवर सोडतच असे. त्यांना हि आज जर मी म्हणालो , माझे तुमच्यावर प्रेम आहे तर त्याही आज तू जशी प्रतिक्रिया दिलीस त्यांचीही प्रतिक्रियात्याहून काही वेगळी असणार नाही. आजही त्या माझ्यावर तितकेच प्रेम करतात कारण मी वेगळा होतो इतर पुरुषांपेक्षा ! मला माझ्या आयुष्यात कोणा स्त्रीच्या मागे लागण्याची गरज कधीच भासली नव्हती . आजही भासत नाही कारण त्या सतत माझ्याआजूबाजूला असतातच पण मी त्यांच्या सोबत नसतो , मी त्यांचा असतो पण त्या माझ्या नसतात कारण त्या माझ्या मनात नसतात. माझं प्रेमात पडणं हे फक्त प्रेमात पडणं असत .आज जशी लोक समोरच्याकडे काय आहे ? त्याच्यासोबतचे आपले नाते काय आहे ?कसे असेल ? अथवा आपल्या प्रेमाचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे सार अभ्यासून प्रेमात पडतात, कित्येक आपल्यावर वर्षानुवर्षे प्रेम करत असतात पण याला काय वाटेल ? त्याला काय वाटेल ? त्याचा परिणाम काय होईल ? असे अनेक विचार करूनआपले प्रेम व्यक्त करणे टाळतात आणि मग आयुष्यभर मनात नसणाऱ्या व्यक्तीसोबत जीवन पुढे रेटत राहतात . मला ते तस करणं नको होत हे माझ्या मनाशी पक्क होत . आयुष्यातील एक क्षणही कोणा स्त्रिला द्यायचा झाला तर तीच तुझ्यावर प्रेम असायला हवंत्याला अपवाद फक्त तू होतीस कारण मी प्रेमात पडायचं सोडल्यावर म्हण अथवा माझं प्रेमात पडणं थांबल्यावर तू माझ्या आयुष्यात आली होतीस. पण तरीही तू माझ्या प्रेमात पडलीच होतीस म्हणून मला सोडून जाण्याचा विचार तुझ्या मनातही कधी आला नाही,आता मी विचार करतो मी तुझ्या शिवाय आता कसा जगू शकेन मला आता सवय झालेय तुझ्या असण्याची आजूबाजूला ! तशी कोणी कोणाला आयुष्यभर सोबत करत नाही हे सत्य मला माहित आहे पण जोपर्यत आपण या जगात आहोत तो पर्यंत आपली सोबतअसावी असे वाटणे मला नाही वाटत चुकीचे आहे.

कविता : सर ! तुम्ही प्रेमाचा इतका विचार करत असाल असं मला कधीच वाटलं नव्हतं, मग कधीच प्रेमात पडून तुम्ही संसारात रमला का नाहीत ?

कविता आज मी तुझ्यासमोर माझा प्रेमाचा प्रवास उलगडणार आह. तो कान देऊन ऐक म्हणजे तुलाही कळेल प्रेम ही जगातील सर्वात विचित्र गोष्ट आहे. कविता : सर सांगा ना ! मला मनापासून ऐकायला आवडेल !

विजय : कविता तुला काय वाटत मी प्रेमात वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा पडलो असेन ?

कविता: असेल सोळाव्या वर्षी कारण म्हणतात ना सोळावं वरीस धोक्याचं !

विजय: असं काही नसत माणूस पहिल्यांदा प्रेमात वयाच्या नवव्या वर्षीही पडू शकतो !

कविता : सर तुम्ही वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडलात ?

विजय : हो ! मी वयाच्या नवव्या वर्षी माझ्यात वर्गात शिकणाऱ्या एक मुलीच्या काय बाहुलीच्या प्रेमात पडलो होतो तिचा तो बाहुलीचा चेहरा मला आजही आठवतो. टोकाचा द्वेष हेच टोकाच्या प्रेमात रूपांतरित होत असत हे खरं आहे. तिच्या बद्दल माझ्या मनातटोकाचा द्वेष होता आणि आता टोकाच प्रेम आहे.

कविता : ते कसं काय ? सांगा सर ! लवकर !

विजय : अंग इतकी उतावली कशाला होतेस आता कोठे मी माझ्या हृद्यावरील प्रेमाच्या जखमेवरील खपली काढायला सुरुवात केली आहे अशा अनेक जखमा आता तुला दिसणार आहेत.

कविता : मला आवडेल त्या जखमांची वेदना अनुभवायला तुमच्यासोबत ...

कविता : त्या मुलीचे नाव काय होते ?

विजय : त्या मुलीचे नाव विजया होते आमच्या नावातील पहिले अक्षर सारखे होते हे एकच कारण होते मी तिच्या प्रेमात पडायला असे नाही तो फक्त योगायोग होता . मी कित्येकदा तिच्यासाठी हातावर व्ही कोरत असे पण तो माझा नसे तिचा असे पण हे तिला कधीकळत नसे ! तो व्ही आजही माझ्या हातावर आहे ! तो सतत माझ्या सोबत राहणार ! ती अतिशय सुंदर आहे ! इतकी सुंदर कि तिची तुलना परीशी होऊ शकते पण तरीही मला तिच्याबद्दल कधीही शारीरिक आकर्षण वाटले नाही . प्रेमाच्या नावावर तिचे लग्न होई पर्यतआमच्यातील फक्त मैत्रीच फुलत राहिली मी तिच्या प्रेमात होतो पण तिच्याशी लग्न करून तिला आपली आयुष्यभराची सोबतीनं करावं असं कधी वाटलं नाही . ते जर वाटलं असत तर आज माझ्या आयुष्याचं चित्र वेगळं असत पण ते तसही नव्हतं माझ्या आयुष्यातएकाच वेळी अनेक स्त्रिया आल्या होत्या त्यामुळे मला स्त्रियांबद्दल टोकाचं आकर्षण कधी वाटलंच नाही माझ्या सतत सोबत असणाऱ्या दोन चार मुली सोडल्या तर इतर कोणाची मी फार दखल कधीच घेतली नाही . माझ्यात एक रसिक माणूस ठासून भरला होता पणतू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा तो रसिक अरसिक झालेला होता . त्यामुळे तुला माझा प्रेमळ स्वभाव कधीच कळला नाही. ते जाऊ दे ! हा ! विजया आणि माझी अपूर्ण प्रेम कथा अगोदर पूर्ण करतो...

कविता : ती खरोखरच दिसायला इतकी सुंदर होती की कोणी ही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पाडाव ? विजय : आमच्या वर्गातील माझा जिवलग मित्र सोडला तर वर्गातील सर्व मुलं तिच्यामागे वेडी होती पण तिच्याशी बोलण्याची हिमत करणे म्हणजे वाघाच्याजबड्यात हात टाकण्यासारखे होते. मला ते कस जमायचं याच आजही सर्वाना आश्चर्य वाटते मला कसलं जमायचं मला वाटत तिच्याही मनात माझ्याबद्दल ओलावा होता . कधी स्पष्ट बोलली नाही इतकच ! कितीही धाडसी असली तरी शेवटी ती मुलगीच आपलं प्रेमपहिल्यांदा व्यक्त करणे तिलाही जडच जात असावे आणि मला वाटत तिलाही मला गमवायचे नव्हते ! मी कमालीचा भोळा आणि ती कमालीची धाडसी हाती...

कविता : पण सर तुम्ही नवव्या वर्षी विजयाच्या प्रेमात कसे पडलात ते सांगितले नाहीत ?

विजय : सांगतो ! मी तिसरीत एक नवीन सरकारी शाळेत प्रवेश घेतला होता मी पूर्वी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्या बाबांच्या ओळखीच्या होत्या त्यामुळे त्या शाळेत माझी वट हाती या नवीन शाळेत मी ही बाहुल्यासारखाच जात असेतेव्हा विजया आमच्या वर्गाची वर्गप्रमुख होती कारण ती सुंदर, हुशार आणि धाडसी होती . एक दिवस ती तिची पाण्याची बाटली घरी विसरली होती तिने दुपारचा डबा खाल्ल्यावर तिने माझी बाटली माझ्याकडून हिसकावून घेतली आणि पाणी पिऊन रिकामी केली . मीतेव्हा अतिशय नाजूक होतो एखाद्या राजकुमारासारखा ! मी तिला काहीच म्हणालो नाही शाळेची पिशवी उचलली आणि रंगात तडक घरी गेलो . मला रडत घरी आल्याच पाहून आई मला पुन्हा शाळेत घेऊन गेली आणि बाईंकडे विजयाची तक्रार केली बाईनी तिलाविचारले असता ती हो म्हणाली, काहीच खोट बोलली नाही मला वाटत तिचा तो खरेपणा मला आवडला आणि मी तो आयुष्यभर जपला पुढेही जपणार ! बाईनी तिला हातावर पट्टीने चार फटाके मारले ती शाळा सुटेपर्यत अखंड रडत होती. रडून तिचा टमाटो झालाहोता आज तिचा तो चेहरा आठवून मला हसायला येत पण ! तिला

रडताना पाहून मला इतकं वाईट वाटलं कि यापुढे आपल्यामुळे कोणा स्त्रीच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये हे मनाशी पक्क झालं. शाळा सुटल्यावर कळलं तिची आई आणि माझी आई यांच्यात बऱ्यापैकी मैत्री होती त्यांनतर मी नवीन शाळेत प्रवेश घेतला त्याचशाळेत तिनेही प्रवेश घेतला होता आम्ही दोघेही हुशार असल्यामुळे आमच्यात स्पर्धा नाही म्हणता येणार पण आमचे लक्ष असायचे एकमेकांच्या प्रगतीकड ! पुढे शाळा संपली तिचे कॉलेज संपले. आम्ही कामाला लागलो तरी भेटत राहिलो,बोलत राहिलो , प्रेम करतराहिलो पण प्रेमात पडलो नाही . मला तिच्या शरीराचं आकर्षण कधीच वाटलं नाही कारण मी फक्त तिच्यावरच मनापासून प्रेम केलं होत. त्यांनतर त्यादरम्यान ज्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या त्यांच्या बाबतीत माझं प्रेम टोकाचं आणि वेडेपणाच होत...

कविता : सर तुम्ही कोणावर टोकाचं प्रेम करू शकता खरं नाही वाटत.

विजय : मी काही आकाशातून पडलो नाही , इतर पुरुषांत दडलेला असतो तसा एक चंचल पुरुष माझ्यातही दडलेला होता तुला खरं नाही वाटणार पण फक्त मुलीशी बोलता यावं म्हणून मी आमच्या घरातील पाण्याने भरलेले हांडे रिकामे करून विहिरीवर पाणी भरायलाजायचो आणि तास - दोन तासांनी परत यायचो ! तोपर्यत मुलींना विहिरीतून पाणी काढून हांडे भरून द्यायाचा उद्योग करायचो. पण तिचा एक हंडा भरल्यावर ती कोणी का असेना ती गोड हसायची ! ते हसण इतकं निरागस असायच की आजच्या काही मुलींना हसतानापाहून त्यांची कीव येते.

कविता : खूप मजा येतेय ऐकायला हं सर ! पुढे सांगा विजय : नववीत असताना मी भक्ती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो तिला फक्त पाहण्यासाठी हि कित्येकांना तप करायला लागायचे . तिच्यासाठी तप करणाऱ्या मजनू पैकी मी हि एक होतो . पुढे कधीतरी तीमला भेटण्यासाठी तो करू लागली ही गोष्ट निराळी ! तिच्यासाठी मी तुला खरं नाही वाटणार की पावसाळ्यात दर रविवारी मी घरातील चादरी पावसाळी ओढ्यावर चक्क धुवायला घेऊन जायचो !

कविता: जोर जोरात हसत सर ! खरचं तुम्ही चादरी धुतळ्या आहेत प्रेमासाठी ! मग ! तिला कधी बोलला का नाहीत कि तुमचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून ?

विजय : मला आता वाटतय मी चूकच केली पण प्रेमात पडल्यानंतरही मी माझी सामाजिक जाणीव माझा चांगुलपणा कधीच सोडला नाही . माझी वासना कधीच माझ्या मेंदूवर हावी होत नाही ! ती खूप हुशार हाती ती समाजात खूप मानाची जागा मिळवेल अशी मलाखात्री वाटत होती पण दुर्दैवाने तसे झाले नाही ती रमली सर्वसामान्य स्रीयांसारखी संसारात ती खूप सुंदर, लिहायची ,बोलायची आणि गायची म्हणून मी कविता लिहू लागलो माझी पहिली कविता मी तिच्यावरच लिहिली जी कधीच प्रकाशित झाली नाही. पण त्यांनतरमी कविता लिहता लिहता कधी साहित्यिक झालो ते माझे मला कळलेच नाही. तिला ज्या जागी उभं राहताना मला पाहण अपेक्षित होत त्या जागी आता मी उभा होतो. आता कदाचित ! मी तिला मोठा वाटत असेन पण मोठं होण्यासाठीच बीज तिने माझ्यात पेरलं होतत्या बिजाच आज वटवृक्ष झालं. त्याशिवाय फक्त एकदा पाहण्यासाठी मी उन्हात तासनतास उभा राहिलो होतो. तिचा हसरा उत्साही चेहरा मला नुसता आठवला तरी मला खूप आनंद होतो. माझ्या समोर वही धरून जर कधी तिने माझी सही मागितली तर तो माझ्याआयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल...

कविता : सर तुम्हीही जगावेगळे आहात आणि तुमचे प्रेमात पडनेही जगावेगळे आहे.

विजय : जगावेगळे असे काही नाही ! पण माझी प्रेमाची व्याख्याच जरा वेगळी आह. मला ते नाटकी प्रेम नाही आवडत. प्रेमात पडायचं चुम्मा चाटी करायची आणि मग लग्न करताना पत्रिका जुळवून पाहायची ! मूर्खांचा बाजार सारा ! प्रेमात पडणं कस स्वैर असायलाहवं ! वादळासारखं ! जे कोणतेच बंधन जुमानत नसेल ना वयाचं, ना धर्मच, ना समाजाचं, ना संस्कृतीच, कारण या जगात फक्त प्रेमच अमर आहे बाकी सारे नश्वर आहे.

कविता : सर ! तुम्ही किती भारी बोलता प्रेमावर ! प्रेमावर तुम्ही नक्कीच प्रवचन देऊ शकता . सर मला एक सांगा हे लग्नानंतर नवरे मुलींची नावे बदलतात त्या बाबतीत तुमचे काय मत आहे , मी शाळेत असल्यापासून लग्नानंतर मुलींची नावे बदलण्याच्या विरोधातआहे कारण त्यामुळे मला आवडलेली नावे त्या नावांची ओळख बदलणार असते. लग्नानंतर एखादी बायको नवऱ्याला म्हणाली , 'तू तुझे नाव बदल तर तो बायकोच बदलेल . आज शिकलेल्या मुली कसे काय अगदी सहज आपले नाव बदलून घेतात देव जाणे ! प्रश्नपुरुषांचा नाहीच स्त्रियांच्या मूर्खपणाचा आहे.

कविता : सर तुमचे विचार फारच भयानक आहेत ! तुम्ही जगापेक्षा वेगळा विचार करता वेगळा विचार मांडता आणि वेगळा विचार जगता. बरं भक्ती नंतर तुमच्या आयुष्यात कोण आली भक्ती नंतर नाही त्याच वेळी माझ्या आयुष्यात एक मुलगी होती लोक तिलामाझी किव्हा मला तिची सावली म्हणायचे भक्तीलाही आमच्या नात्याबद्दल शंका होती ते ही एक कारण असावं ती सरळ माझ्या आयुष्यात आली नाही. एकदा भक्तीने तिला म्हणजे रश्मीला सरळ माझ्याबद्दल विचारल्यावर ती तिला म्हणाली होती त्याच्या भानगडीतपडू नकोस त्याला तुझे सारे लपडे माहीत आहेत. रश्मी खरंच माझी सावली होती कारण या जगात मी लिहलेले गलिच्छ फक्त तिलाच वाचता येते आजही !

कविता : सर ! मलाही वाचता येते !

विजय : तिला मी न लिहलेलेही वाचता यायचे इतकी आमची मैत्री घट्ट होती . लोकांना ते प्रेम वाटायचे ! तीच प्रेमात पडणं स्वैर होत आजही स्वैर आहे...

कविता : मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तशी कोणी तुमच्या आयुष्यात आलेली पाहिली नाही ?

विजय : तू असामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग आहेस त्या सामान्य तरुणांच्या आयुष्याचा भाग होत्या. त्या तरुणांच्या जगण्याची काय मरण्याचीही जग दखल घेणार नव्हतं, आताचा मी तसा नाही ! आज जग माझ्या एका वाक्याचीही दखल घेत.

कविता : पण सर ! त्या सर्वजणी तुमच्यातील सामान्य मांसावरच प्रेम करत होत्या ना ! त्यांची कोठे तुमच्याकडून असामान्य होण्याची अपेक्षा होती ?

विजय : मी सामान्य माणसाचं सुखासमाधानाच जीवन जगावं हि त्याचीच त्या प्रमेश्वराचीच इच्छा नव्हती म्हणूनच माझे सुखासमाधानात चालले आयुष्य त्याने अचानक समस्यांच्या दरीत नेऊन ढकलले त्या दरीत जगण्यासाठी धडपडताना मला जे अनुभव आलेते अनुभव फारच भयानक होत इतकेे भयानक होते की मला त्यांनीं माझ्या सर्व नात्यांचा अगदी जवळच्या नात्यांचाही नव्याने विचार करायला भाग पाडलं . तेव्हा प्रेमाच्या नात्याबाबत माझ्या मनात एक मोठं प्रश्नचिन्हच निर्माण झालं होत. तुला किंवा कोणत्याहीसामान्य माणसाला जस दिसत तस जग नसत जग हे फार विचित्र भावभावनांचा चक्रव्यूह आहे. सामान्य माणसांचा त्या चक्रव्यूहात नेहमीच बळी जात असतो. नात्यांचा गुंता आणि नात्याचं ओझं काय असत हे तुला नाही कळणार ! मी माणसाचे बदलणारे सारे रंगपाहिले आहेत म्हणूनच मला भविष्याची चाहूल लागते. मी फार दूरचा विचार करतो मी सहज बोलून गेलेल्या घटना प्रत्यक्षात घडतात. माझा जन्म फक्त जगण्यासाठी झाला नाही म्हणून मला ईश्वराने कित्येकदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले आहे. लोक उगाचमाझ्या प्रेमात पडत नाहीत. मी जेव्हा जेव्हा स्वतःला त्या शक्तींपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो माझ्या वाट्याला अपयशच येते. मी इतरांसाठी केलेल्या कामात मला कधीच अपयश येत नाही. पण माझ्या स्वार्थासाठी मी काहीही करायला गेलो की त्यात माझेअपयश ठरलेले असते. आजही तू बघतेयस मी आता पर्यंत मिळविलेल्या यशाचा कोणाला फायदा झाला ? ईश्वर मला नेहमी सूचना देत असतो तुझा जन्म असामान्य जीवन जगण्यासाठी झालेला आहे त्यामुळे सामान्य असं तुझ्या आयुष्यात काहीच घडणार नाही.मला वाटत मला काहीतरी असाधारण काम करायचं आहे ज्यात मला तिची मदत लागेल पण ती कोण याचे संकेत मला आता मिळू लागले आहेत...

कविता : हे काय सर ! तुम्ही आता अध्यात्मिक गुरू सारखे बोलायला लागलात ! असं कधी काही असत का ? तुमच्या बाबतीत जे काही झालं तो फक्त एक योगायोग असू शकेल !

विजय : हो योगायोग असेल ना पण योगायोग एकदाच घडतो वारंवार घडत नाही.

कविता : योगायोगाच सोडा ! मला सांगा त्यानंतर तुमच्या आयुष्यात कोण आलं होत ?

विजय : त्यांनतर माझ्या आयुष्यात मोहिनी आली होती . तिने खरंच मला मोहिनी घातली होती दिसायला अतिशय सुंदर माझ्या एका मित्राची बहीण होती ती ! कधी बोलली नाही पण मला माहीत होत तीच माझ्यावर जीवापाड प्रेम होत! तिला वाटायच मीतिच्यावरील माझं प्रेम व्यक्त करीन पण मी नाही केलं कारण ती अशिक्षित होती तीच अशिक्षित असन हे एकमेव कारण होत मी तिच्या प्रेमाचा स्वीकार न करण्याला ! माझी आई अशिक्षित असण्याची किंमत मी मोजली होती . स्वतःचे विचार नसणाऱ्याकोणाच्यातरी विचारांचे ओझे वाहणाऱ्या कोणाचे तरी आयुष्यभर फक्त होऊन राहण्याची इच्छा बाळगणाऱ्या बावळट ! स्वतःची अशी कोणतीच स्वप्ने नसणाऱ्या फक्त भांडी घसण्यात, जेवण करण्यात आणि जमलं तर शिवणकाम विणकाम करणाऱ्या स्त्रिया माझ्याडोक्यात जातात. मोहिनी माझ्यासाठी माझ्या आईला आवडली होती कारण शेवटी ती तिचच प्रतिबिंब होती मला माझ्या आई- बहिणी सारखी बायको नको होती, तरीही जर ती मला म्हणाली असती कि माझे तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तरमी तिच्याशी लग्न केले असते पण तिने हिंमत नाही केली कारण तिला मला गमवायच नव्हतं माझ्या नजरेतील तिची जागा तिला गमवायची नव्हती आजही ती माझी चांगली मैत्रीण आहे , पूर्वीसारखीच माझ्याशी प्रेमाने बोलते वागते एक चांगला पुरुष म्हणून माझाआदर करते . पण तीच भविष्य तेच होत जे मी पाहिलं होत ती संसारात रमली होती पण तरीही दुसऱ्याची भांडी धुणं काही सुटलेलं नव्हतं फक्त हिंमत करून तिने माझ्यावरील तिचे प्रेम व्यक्त केले असते तर तिचे भविष्य बदलले असते पण ते नियतीला मान्य नसावं.

कविता : अकल्पित आहे सारे ! पुढे ?

विजय : त्यांनतर माझ्या आयुष्यात पूजा नावाची एक मुलगी आली सर्व बाबतीत मोकळी होती. तिला जगाची फिकिरच नव्हती माझ्या हातात हात घालून बिनधास्त फिरायची, बोलायची तिच्या हातावर मेहंदीपण मलाच काढायला सांगायची , तिचे अतीमोकळेपणाने वागणे लोकांना खटकायचे पण मला ते आवडायचे कारण ती इतर मुलींसारखी सभ्यपणाचा आव आणत नव्हती, आजच्या काही मुली उगाच आपण किती सभ्य आहोत हे दाखविण्यासाठी उगाच लाजत मुरडत असतात ती तशी नव्हती तिचा चेहरानिर्मल होता, मनात एक आणि डोळ्यात एक असं तीच नव्हतं म्हणूनच मला ती मनापासून आवडली होती . मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिच्याजवळ आपलं प्रेम व्यक्त करायचं मी मनाशी पक्क केलच होत आणि मी एका कामासाठी महिनाभर बाहेर गेलो परत आलोतर तिच्या लग्नाची पत्रिका हातात होती त्यांनतर एक दिवस ती मला तिच्या नावऱ्यासोबत भेटली पूर्वीसारखीच पण ! अतिशय समान्य पुरुषासोबत तिने लग्न केलं होत त्यांनतर एकदा पुन्हा भेटली तेव्हा तिचा उत्साह ओसरला होता किंचित थकली होती आम्हीएकत्र आलो असतो तर तिच्या स्वप्नांना पंख लाभले असते पण ते नियतीला मान्य नव्हते किंवा तिने आपल्या आई वडिलांच्या निर्णयासमोर मान तुकवली म्हणून तिचा बळी गेला.

विजया, भक्ती, रश्मी, मोहिनी आणि पूजा यांनी माझे तेव्हाचे आयुष्य व्यापलेले होते त्यांच्या व्यतिरिक्त अजून अनेक तरुणी या ना त्या कारणाने त्याकाळात माझ्या संपर्कात आल्या होत्या पण त्यातील एक ही मला फार काळ आपल्या प्रेमात पाडून ठेऊ शकली नाहीकारण त्या माझ्या आयुष्याला व्यापलेल्या या पाचजणींपेक्षा वेगळया नव्हत्या..

कविता : पुढे ?

विजय : त्या नंतर माझ्यातील लेखक कवी मोठा होत गेला . माझ्यातील समाजसेवक जागू लागला, सामाजिक समस्या मला भेडसावू लागल्या, प्रेमाची जागा हळूहळू करुणेने घेतली आणि सौंदर्य कवडी मोल असत हे माझ्या लक्षात आले माझा प्रेमातील रस आटतगेला आणि हळू हळू स्त्री हा माझ्यासाठी फक्त अभ्यासाचा विषय झाला. स्त्री - पुरुष भेद माझ्या मनातील धूसर होत गेला. लैगिंक भावनांच्या पलीकडे मी विचार करू लागलो म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो नव्हतो ! मी पूर्वीचा तो असतो तर कधीच आपल्यातीलवयाच्या अंतराचा विचार न करता तुझ्या प्रेमात पडलो असतो. आज सकाळी मी तुला जे तीन शब्द म्हणालो ते माझ्या तोंडून ऐकण्यासाठी कित्येकांचे प्राण कानात आले होते आणि तू ते हसण्यावारी नेलंस !

कविता : स्वतःला सावरत म्हणाली, म्हणजे सर ! तुम्ही खरंच माझ्या प्रेमात पडला आहात ?

विजय : हो ! मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आहे, मला तुझी आता सवय झाली आहे मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तुला तुझी हक्काची जागा द्यायची आहे.

कविता : सर ! तुमच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांमध्ये मी सर्वात लहान पण सौंदर्यात गुणात त्यांच्या जवळपास जाणारीही नाही असे असताना तुम्ही माझ्या प्रेमात का पडलात मी तरुण आहे म्हणून ! तुमचे जर माझ्यावर प्रेम होतेच तर तुम्ही ते अगोदर व्यक्त काकेले नाही.

विजय : मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू लग्न का केले नाहीस ?

कविता : मी अजून तरुण आहे कधीही लग्न करू शकते ! पण तुम्हाला जर आता लग्न करून तुमच्या या संपत्तीला वारस हवा असेल तर मी कशाला माझ्याच वयाची कोणीही सुंदर श्रीमंत तरुणी तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल ?

विजय : मला माझ्या संपत्तीला वारस नको आहे फक्त माझ्यासोबत माझं हक्काचं माणूस असावं अस मला वाटत होत म्हणून मी तुला विचारलं !

मला वाटत होत कि तुझंही माझ्यावर प्रेम आह. माझे प्रेम मला नाही मिळाले पण तुझे प्रेम जर मी आहे तर ते तुला मिळायलाच हवे असा विचार मी केला !

कविता : म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम मला मिळावं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करून माझ्यावर उपकार करणार ! पण तुमचे माझ्यावर मनापासून प्रेम आहे हे नाही बोलणार !

विजय : बर ! मी कबुल करतो की माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच मी इतकी वर्षे लग्न नाही केले. पण मला तुझ्यावर लादायचे नव्हते. तू माझ्याहून तेरा चौदा वर्षांनी लहान तू लग्न करून स्वतःहून गेली असतीस तर मी स्वतःला सावरलं असत पण तू हीलग्नाचा विचार करीत नव्हतीस.

कविता : सर ! मी काय यातना भोगतेय तुम्हाला काय सांगू ? त्या जर मी भोगत नसते तर अठराव्या वर्षीच मी तुमच्यावरील माझे प्रेम व्यक्त करून झाले असते, मी तुमच्या कविता वाचून कधीच तुमच्या प्रेमात पडले होते, त्यासाठी मला तुम्ही यशस्वी होण्याची वाटपाहण्याची गरज नव्हती. मला खात्री आहे आजही मुली तुमच्या प्रेमात पडतात मी स्वतः च्या डोळ्यांनी पाहिले आहे . सर ! पण मी तुमच्या कामाची नाही. माझ्याशी लग्न करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. कधी सांगितले नाही पण आज सांगते वैद्यकीय शास्त्रप्रमाणे मी आई होऊ शकत नाही... म्हणूनच मी तुमच्याशीच काय कोणाशीच लग्नाचा विचार करू शकत नाही.

विजय : कविता ! आज मला तुझा खरंच खूप राग आला आहे तुझ्या आयुष्यातील इतकं मोठं दुःख तू माझ्यापासून लपवून ठेवलस. तुझी आई जर मला भेटली नसती आणि तुझे हे सत्य सांगितले नसते की तू माझ्या प्रेमात आहेस पण तुझ्यात असणाऱ्या शाररिककमतरतेमुळे तू ते व्यक्त करीत नाहीस तर मी आयुष्यभर भ्रमातच राहिलो असतो की तुला माझ्यात रस नव्हता आणि तू आयुष्यभर झुरत राहिली असतीस . आता तू व्यक्त झाली आहेस म्हणून सांगतो माझं तुझ्यावर प्रेम होत पण ते तसच होत जस माझं इतरमुलींवर होत . तुझ्या शरीराचं आकर्षण मला कधीच नव्हतं तू इतर कोणाशी लग्न केलं असतस तरी माझं तुझ्यावरील प्रेम कमी झालं नसत. पण तुझं माझ्यावर प्रेम होत ते प्रेम व्यक्त करण्याची तुझ्यात हिंमत होती पण नियतीने तुझी हिंमत काढून घेतली कारण तूमाझी व्हावीस आणि आपण दोघांनीं मिळून त्याला अपेक्षित असणारे महान कार्य आपण करावे म्हणून ! लग्न करून पोर काढायला करोडो लोक पडलेत तू मी त्या करोडो लोकांपेक्षा वेगळे आहोत या जगात काहीतरी वेगळे करण्यासाठी आपला जन्म झालाआहे...आता समजलं कित्येक सुंदर मुली माझ्या प्रेमात पडल्या असतानाही मी त्यांच्यात का गुंतलो नाही कारण मी त्यांच्यात गुंतण्यासाठी माझा जन्मच झाला नव्हता आणि तुझा जन्म माझ्यासाठी झाला होता...या जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नसतेप्रत्येक गोष्ट होण्यामागे एक निश्चित कारण असते . हे ज्याला कळते तो साऱ्या मोहातून मुक्त होतो . तू हे दुःख कवटाळून बसली होतीस ते तुझ्या नजरेत दुःख होत पण माझ्या नजरेत ती शुल्लक गोष्ट होती कारण या जगात आपले असे काहीच नसते आपली होणारीआपत्येही आपली नसतात ती त्यांचे भोग भोगायला जन्माला आलेली असतात. प्रेम जगण्यासाठी एक सुंदर कारण असत पण ते जगणं नसतं !

कविता : सर ! मग आपण लग्न कशाला करायचं ?

विजय: कविता तुझं बरोबर आहे , खरं म्हणजे आता आपण लग्न न करताही एकत्र राहू शकतो. पण समाज ! ज्या समाजात राहून आपल्याला कार्य करायचं आहे त्या समाजात जर आपल्याला प्रतिष्ठतेने काम करायचे असेल तर आपल्याला मनात नसतानाहीस्वतःला लग्न नावाच्या बंधनात गुंतवून घ्यावेच लागेल आज पर्यंत माझी मदतनीस म्हणून तुला मिळालेला मान आणि माझी पत्नी म्हणून मिळणारा मान अधिकार फार वेगळे आहेत. आपले लग्न होताच आपले जग बदलेल कारण आपला जन्म जगालाबदलण्यासाठी झाला आहे.

कविता : तुमच्या सोबत राहणे माझे स्वप्न होते, तुमचे होऊन राहणे हे माझे ध्येय होते आणि मी तुमची न होणे हे माझ्या नियतीला मान्य नव्हते.

विजय : मी आयुष्यभर घडणाऱ्या घटनांचा अभ्यास केला तेव्हा मला जाणवलं की वर्तमानात घडणारी प्रत्येक घटना भविष्याशी संबंधित असते, आपण उगाच घडणाऱ्या घटनांसाठी स्वतःला अथवा इतरांना जबाबदार धरत असतो हे जग स्वयंचलित आहे हे ज्ञानएकदा प्राप्त झाले की माणूस मुक्त होतो बंदनातून...

कविता : सर ! मला वाटत होत माझं आयुष्य निर्थक आहे पण तुम्ही माझ्या आयुष्याला नवीन अर्थ दिलात

विजय : मी काही केलं नाही नियतीने अर्धवर्तुळ असणाऱ्या आपल्या दोघांना एकत्र आणलं आणि आपलं अपूर्णत्व पूर्ण करून एक वर्तुळ तयार केलं जगाच्या कल्याणासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance