ससा
ससा
प्रातिभा आाणि विजयचा नुकताच विवाह झाला होता. विजयला विवाह करण्यात तसा फारसा रस नव्हता पण घरच्यांच्या आग्रहाखातर नाईलाजानं त्याला तस करावं लागलं होत. प्रातिभाचीही विवाहाबाबत फारशी काही स्वप्ने बहुदा नसावित. प्रातिभा आाणि विजय दोघांचेही शिक्षण जवळ - जवळ सारखेच झाले होते. अर्थांत बारावी पर्यंत ! दोघांच्या वयात मात्र सात - आठ वर्षाचे अंतर होते . अर्थांत जीवनातील अनुभवाने विजय तिच्यापेक्षा बराच पुढे होता. प्रातिभा दिसायला तशी बऱ्यापैकी सुंदर होती . कदाचित ! विजयच्या अपेक्षेपेक्षा थोडी उजवी असेलही ! विजय छोटा - मोटा व्यावसाय करुन महिन्याला दहा – बारा हजार तरी सहज कमावित होता. त्यामुळे त्यांना आर्थिक आडचणी वगैरे नव्हत्या. विजयची विवाह केला तर प्रेमविवाह करण्याची इच्छा होती . प्रातिभाशी विवाह केल्यामुळे त्याची ती इच्छा अर्धंवट राहिली होती . प्रातिभा आाणि विजय दोघांनाही एकमेकांच्या आवडी - निवडी माहीत नव्हत्या आाणि त्या जाणून घेण्याची इच्छाही नव्हती. दोघांच्या विवाहाला जवळ - जवळ तीन माहिने झाले तरी विजय तिच्याशी कामापुरताच संवाद साधत होता. मोकळया वेळात विजय पुस्तकात अथवा टी .व्ही. त डोक खुपसून बसत होता. प्रातिभानेही त्याची फारशी दखल घेतली नाही. कारण तो अबोल आाणि अभ्यासू आहे अस कोणीतरी त्यांच्या विवाहापूर्वीच सांगितलेलं होत. त्यामुळे त्या दोघांचं जीवन आतिशय संथ गतीने चालल होत. नवीन विवाह झालेली जोडपी एकमेकांसोबत फोनवर तासन - तास गप्पा मारतात पण येथे दोघांकड़ेही मोबाईल असतानाही तस काही होत नव्हतं . विजय शुध्द शाकाहारी आाणि निर्व्यसनी होता. त्यामुळे खाण्यापिण्याबाबतही त्याची काही तक्रार नसायची, ताटात जे वाढल जाईल ते तो निमूटपणे खायचा ! फक्त घरी असल्यावर त्याला चार - पाच वेळा चहा लागायचा ! झोपण्यासाठी अंथरुनही कधी - कधी तो स्वत:च घालत असे, सकाळी अलाराम लावून उटे आाणि स्वत:ची सगळी कामे आटपली की प्रातिभाला डबा करायला उठवित असे. प्रातिभालाही त्याची आता सवय झाली होती .विजय आाणि प्रातिभा त्या घरात एखादया यंत्राप्रमाणे वावरत होते, प्रातिभाने जर विजयकडे पैसे मागितले तर कश्याला पाहिजेत हे ही तो विचारत नसे . इतका साधा-भोळा नवरा पण त्यालाही काही विचारण्याची हिंमत प्रातिभाच्याने होत नव्हती . प्रातिभाला वाटत होते आपल्या नवऱ्याला काम आाणि दाम या व्यतिरिक्त कश्यात फारसा रस नसावा. कधी - कधी तर त्याच्या पुरुषत्वाबद्दलही तिच्या मनात शंका येत होती. पण आपल्या वाटण्याची दखल घ्यावी असेही तिला कधी वाटले नाही . आपला विवाह झालाय यातच सध्या ती समाधान मानत होती. विजय घरी नसतांना प्रातिभाला एकटीला कंटाळा येत असे म्हणून तिने लहान मुलांसाठी शिकवणी सुरु करण्याचा निर्णय घेतला. विजयने तिच्या या उपक्रमाला विरोध केला नाही . प्रातिभा कधी माहेरी जाते म्हटली तरीही तो तिला कधीच नाही म्हणत नसे. आाणि माघारी कधी येणार म्हणून विचारणाही करत नसे. प्रतिभाला प्रश्न पडे माझ्या गैरहजेरीत घरातील सर्व कामे अर्थात स्वयंपाक करण्यापासून ते भांडी घसण्यापर्यंतची आणि झाडू मारण्यापासून ते कपडे
धुण्यापर्यंतची सारी कामे तो करतो पण तरीही त्याचा अहंकार त्याच्या चेहऱ्यावर नसतो. कदाचित मी त्याच्या जीवनातं त्याच्या जगण्याचा भाग असल्याची त्याने दखलच घेतली नाही. एका दिवशी रात्री टी.व्ही. पाहत असताना काहीतरी बिघाड होऊन वीज गेली. प्रतिभाला वाटलं आता रात्र अंधारात काढावी लागणार पण तस काहीही झाल नाही. विजयने स्वतःच इलेकट्रीशनची भूमिका बजावली.
प्रतिभाची आपल्या नवऱ्याशी रोज नव्याने ओळख होत होती. एके दिवशी प्रतिभा शिकवणी घेत असताना एक लहान मुलगा प्रतिभाला म्हणाला,’' बाई मला पोपटाचे चित्र काढून द्या ना ! त्यावर प्रतिभाने नाईलाजास्तव नकार दिला. तेथून काही अंतरावर बसलेल्या विजयने त्या मुलाला वही घेऊन आपल्याकडे बोलावलं आणि त्याच्या वहीवर छान - छान पोपटाचे चित्र रेखाटून दिले. आपला नवरा उत्तम चित्रकारही आहे हे तिला नव्याने कळले होते. तो तिच्यापेक्षाही उत्तम शिक्षक आहे हे ही प्रातिभाच्या लवकरच लक्षात आले. तो सर्वच विषयात पारंगत आहे म्हणूनच कदाचित मी त्याला त्याच्या लायक वाटत नाही. टी. व्ही.वर एखादा प्रेमपट लागला तर तो मन लावून पाहतो, विनोदावर मनमुराद हसतो पण माझ्याबरोबर एक शब्दही बोलायला त्याची जीभ मोठया मुश्किलीने वळते. विजय प्रतिभाबरोबर कधीच कोठे बाजारात वगैरे जात नसे. त्या दिवशी प्रतिभाने हिंमत करून विजयला आपल्याबरोबर बाजारात खरेदीला येण्याचा आग्रह केला, तिच्या प्रेमळ आग्रहाला तो विरोधही करु शकला नाही . घरातून बाहेर पडताच विजयला अनेक जण ओळखीचे भेटले, ज्यात दुकानदारांपासून ते पुढाऱ्यांपर्यंतच्या लोकांचा समावेश होता. विजयने प्रतिभाबरोबर त्यांची ओळख करून दिली त्यातील फारस कोणी तिला ओळखत नव्हत. विजयच्या पत्नीला समाजात किती मान आहे हे तेंव्हा प्रतिभाच्या पहिल्यांदा लक्षात आल. आपला नवरा उत्तम वक्ता आाणि राजकारणी आहे. हे सत्य तिलाही पचवायला जड जात होत. रस्त्यात भेटणाऱ्या शेकडो लोकांना सलाम - नमस्ते करत त्यांचा पाहुणचार घेत चालताना प्रतिभाला नकोस वाटू लागल होत. यापुढे विजयबरोबर बाजारात न येण्याचा निर्णय तिने मनोमन घेऊनही टाकला. नवरा म्हणून प्रतिभाला विजय चारचौघांसारखा साधा-भोळा वाटला होता. पण प्रत्यक्षात तसा तो नव्हता. त्याच्यात जितके गुण होते ते सर्वं गुण कोणा एका व्यक्तीत असणे जवळ - जवळ अशक्य ! म्हणूनच कदाचित त्याच्या प्रेमात पडण्याची हिंमत कोणी केली नसावी ! अनेक मुलींना लग्नासाठी त्याने का नकार दिला होता ? हे ही प्रतिभाच्या लक्षात आले होते. मी फक्त त्याची पत्नी झाले, जोडीदार झाले नाही ! हा विचार प्रतिभाला कासाविस करत होता. त्या रात्री हिंमत करुन प्रातिभाने विजयला प्रश्न केला. '' माझ काही चुकलय का ? त्यावर विजय म्हणाला,’ हो ! चुकलच तुझं ! तू मझ्याशी विवाह केलास ! माझ्या पुरुषत्वाबद्दल शंका घेतलीस पण पत्नी या नात्याने जाब विचारण्याचे धाडस केले नाहीस, मला तुझ्यातील ही गोगलगाय आवडली नाही. मला हवी होती डरकाळ्या फोडणारी वाघीण ! पण तू मात्र शेळी निघालीस त्यामुळे मलाच ससा व्हावं लागल तुझ्यावरील प्रेमापोटी...