Nilesh Bamne

Others

2.2  

Nilesh Bamne

Others

माझी कथा

माझी कथा

47 mins
1.7K


    धो धो पाऊस कोसळत होता विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत होता विजांच्या प्रकाशात काही झोपड्या रात्रीच्या अंधारातही उजळून निघत होत्या. त्यातील एका झोपडीत नवरा - बायको छातीतून गळणारे पाणी छोट्या छोट्या भांड्यात जमा करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचा तो प्रयत्न थकल्यावर ते डोक्याला हात लावून गप्प बसले. त्यांचा समोरच कुडाच्या भिंतीला लागून असणाऱ्या मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात एकाच लोखंडी खाटेवर चार पोरं म्हणजे तीन मुलगे आणि एक मुलगी वेडेवाकडे झोपले होते त्यांच्यावर एक प्लास्टिक बांधल्यामुळे त्यांच्यावर पाणी पडत नव्हते त्यामुळे ते गाढ झोपले होते पण अचानक त्या प्लास्टिक मधील पाणी खूपच जमा झाले आणि ते प्लास्टिक एका बाजूला कलंडले आणि त्या प्लास्टिकमधील पाणी धो धो करत त्यांच्या अंगावर पडले आणि आकाश कोसळल्यासारखे ते झोपेतून जागे झाले. क्षणभर त्यांना कळत नव्हते नक्की काय झाले आहे त्यांच्या आईने त्यांना अंग पुसायला टॉवेल दिला सर्व उगडे झाले आणि केस पुसून आईने जवळच पेटवलेल्या चुलीजवळ जाऊन उबेला बसले आईने चुलीवर चहा ठेवला तो झाल्यावर सर्वांनी काळ्या चहात बटर बुडवून खाल्ले त्यावेळी एक रुपयाला सोळा बटर मिळत त्यामुळे चहा बटर हे गणित व्यवस्थित जुळलेलं होतं.


एव्हाना पाऊस थांबला होता आणि सकाळही झाली होती.सर्व अंघोळ करून तयार झाले. शाळेचे कपडे परिधान करून शाळेत गेले. त्यांचे बाबाही तयार होऊन त्यांच्या धंद्यांवर गेले आणि आई सर्व झाडलोट करून स्वयंपाक करायच्या तयारीला लागली. इतक्यात शेजारच्या बायका आल्या आणि घरात रात्री पाणी वैगरे आलं का याची चौकशी करू लागल्या सगळ्या सम दुःखी होत्या, नात्यातील होत्या आणि कोकणातील आजूबाजूच्या गावातील होत्या. त्यामुळे एकमेकींना शाब्दिक आधार देत होत्या. सर्वांचे नवरे दारुडे होते. रात्री कामावरून येताना सगळेच ढकलत यायचे. त्यातले काही भांडण झाल्यावर बायकोला मारायचे काही बायकोचा मार खायचे ! पण गरज पडल्यावर मात्र सगळे एकत्र यायचे ! एकमेकात भांडण व्हायची पण लगेच मिटायचीही ! आई वडिलांची भांडणे झाली तरी एक गोष्ट मात्र चांगली होती त्या भांडणाची सावली कधी ते त्यांच्या मुलांवर पडून देत नसत. ती चार मुलं आणि आजूबाजूची सर्वच मुलं अभ्यासात खूप हुशार होती. बहुतेक मुलांच्या नावात शेवटचे अक्षर श होते.मुलांच्या तुलनेत मुली कमी होत्या. पण सर्वजण कोकणातील असल्यामुळे येथे मुलींचे लाड जास्त होते.


त्या झोपडीतील चार मुलांपैकी मोठा मुलगा म्हणजे मी होतो निलेश बामणे...सध्याचा एक कवी, लेखक आणि पत्रकार...त्यासोबत एका मासिकाचा संपादक ! येथे वर्णन केलेली झोडपट्टी म्हणजे मुंबईतील गोरेगांव पूर्वेकडील संतोष नगर, श्रीकृष्ण नगर येथील झोडपट्टी आज त्या झोपडपट्टीच्या जागी तेवीस माळ्याची एस आर ए ची उंच इमारत उभी आहे त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून जेव्हा मी भूतकाळात पाहतो तेव्हा माझे मन भरून येते. पण डोळ्यात अश्रू येत नाहीत कारण मी आता पूर्वीसारखा हलवा राहिलो नाही. खरं तर येथे मला माझी गोष्ट सांगायची आहे पण माझ्या गोष्टीत अनेक पात्र आहेत त्या पात्रांचीही एक - एक वेगळी गोष्ट आहे. आज मला पाहिल्यावर कोणाला स्वप्नातही वाटत नाही की माझा भूतकाळ इतका खडतर असेल .मला तो कोणाला सांगायला आवडती नाही. पण माझ्या भूतकाळातच घडलाय खरं तर माझ्यातील एक संवेदनशील माणूस नाहीतर मी ही एक भोगात गुंतलेला सामान्य माणूस असतो...मी आज जसा आहे तसा का आहे ? याची उत्तरे माझ्या भूतकाळात दडलेली आहेत...मी आज जसा लोकांना वाटतो तसा मी कधीच नव्हतो...घमेंडी, माणुसघाण्या आणि एकळकोंड्या ! माझ्यातील उत्साहाचा झरा त्या झोपडपट्टीतच आटला कोठेतरी !


      मी लहानाचा मोठा मुंबईतील या झोपडपट्टीत झालो पण माझा जन्म मात्र मुंबईत झाला नव्हता. माझ्या भावंडांचा जन्म मुंबईत झाला होता पण माझा जन्म कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील देगांव या गावी झाला. माझे आई - बाबा त्या एकाच गावचे ! जेव्हा माझा जन्म झाला तेंव्हा मी अतिशय नाजूक होतो माझ्या अंगावर दाट केस होते मी जगेन का याबद्दल लोकांना शंका होती. माझ्या आईने तेव्हा माझ्या अंगावरील केस काढून टाकण्यासाठी चण्याच्या डाळीचे वगैरे प्रयोग केल्याचे ती सांगते आज माझ्या अंगावर दाट केस नाहीत पण ते असावेत याची खात्री पटते.मी तीन चार वर्षाचा असे पर्यत गावी असायचो. एक दिवस आई नदीवर कपडे धुण्यासाठी निघाली असता मी हट्टाने तिच्या सोबत गेलो. पण तिची नजर चुकवून मी नदीच्या प्रवाहात गेलो आणि वाहत असताना नदीवर कपडे धुणाऱ्या तरुणींनी मला पाहिले आणि वाचवले ! हे मला हल्लीच कधीतरी आईने सांगितले पण मला पाण्याची भीती का वाटते हे कोडे तेव्हा मला उलगडले. तेथील शाळेत मी काही दिवस गेलो होतो. या दरम्यान माझ्या धाकट्या भावाला पोलोओ झाला आणि आम्ही कायमचा मुंबईचा रस्ता धरला त्यांनतर माझ्या लहान भवाचा गणेशचा जन्म झाला आणि आम्ही या श्रीकृष्ण नगर मधील झोपडपट्टीत राहायला आल्यावर माझ्या बहिणीचा म्हणजे रुपालीचा जन्म झाला.


आमच्या घराण्यात तेंव्हा एकच लहान मुलगी होती त्यामुळे त्यांना मुलगी हवी होती. जिथे लोकांना मुलांचा हव्यास असतो तेथे त्यांना मुलीचा हव्यास होता. फक्त मुलगी हवी म्हणूंन त्यानी मुलांना जन्म दिला. या बाबतीत मला माझ्या घराण्याचा खूप अभिमान वाटतो कारण आमच्या घराण्यात मुलींचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो नाहीतर आजही समाजात मुलगा पाहिजे म्हणून मुलींचा गर्भातच जीव घेतला जातो...आमच्या घराण्याला विचारांची बैठक ही परंपरेने आली होती. माझे बाबा शालेय जीवनात खूप हुशार होते. शाळेत असेपर्यत त्यांनी पहिला नंबर त्यांनी कधी सोडला नाही पण गावी सातवी पर्यत शाळा असल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले त्यात आमचे आजोबा वारले ते मिल कामगार होते. त्यांना एकच व्यसन होतं बिडी ओढण्याचे पण ते बिडीही अर्धी मोडून ओढायचे त्यांची सर्व कमाई गावी घर बांधण्यात, माझ्या आत्याची लग्न आणि त्यांच्या आजारपणात खर्ची पडले. त्यांतर माझे बाबा मुंबईला आले सोळा - सतराव्या वर्षी ! मुंबईतील तीस चाळीस हॉटेलात एक दोन दिवस नोकरी केल्यावर ते दादरला एका लिंबाच्या व्यापाऱ्याकडे स्थिरावले. त्यानंतर त्यांचा माझ्या आईशी विवाह झाला. या दरम्यान ते दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते.


माझी आई अशिक्षित होती. ती तिच्या लहानपणी शाळेत गेली असता शिक्षकांनी एकदा मारले म्हणून तिने हट्टाने शाळेचे तोंड पाहिले नाही पण आमच्या शिक्षणा बाबत ती फारच आग्रही होती. पुढे प्रौढ शिक्षण घेऊन ती थोडं लिहायला वाचायला शिकली होती पण ते तितकंच ! पण माझ्या बाबांना वाचनाची प्रचंड आवड होती. फक्त रस्त्यावरील वाचून ते इंग्रजी लिहायला वाचायला शिकले. त्यांचं अक्षर बघून तर मला त्यांचाही हेवा वाटायचा ते उत्तम चित्रकार होते. मी लहान असताना ते मला सुंदर रिक्षाचे चित्र काढून द्यायचे ! मला वाचायची आणि चित्रकलेची जी गोडी लागली ती कदाचित त्यांच्यामुळे पण मी कवी कसा झालो याचे उत्तर सापडत नव्हते तर नंतर कळले ! आमच्या घरात माझे चुलत आजोबा नवीन नवीन भजने गीत स्वतः तयार करून सादर करत त्यावेळी त्यामुळे त्यांचं आजूबाजूच्या गावात खूप नाव होते. माझ्या आजोबांच्या दोन बायका होत्या पहिली बायको एका मुलीला जन्म देऊन वारली. त्यानंतर आमच्या आजीने तिचा सांभाळ केला पण आमच्या घरात सावत्र हा शब्द कधीच उच्चरला गेला नाही. सावत्र वगैरे असं काही नसतं काही कोत्या मनाच्या लोकांनी नात्यात घुसडलेली ही भेसळ आहे. आमच्या आईच्या घरीही तसेच चित्र होते. जुनी माणसे खरंच मनाने खूप निर्मळ होती. पण दुर्दैवाने आताची माणसे तशी नाहीत. माझी आजी ज्या गावची त्या गावात स्वयंभू शंकराचे देवस्थान आहे. माझी आजी थोडी रागीट होती पण स्वाभिमानी होती. तिच्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त स्वाभिमानी माझी आई आहे...


आमची आई आमच्या शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होती म्हणूनच तिने आमच्यासाठी गुरुकुल विद्यालय या खाजगी शाळेत प्रवेश घेतला होता तिला काय माहीत पुढे जाऊन नियतीचे फासे कसे उलटे पडणार होते. मी सहावीत जाईपर्यत आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बरी होती. सहावीत माझा वर्गात तिसरा नंबर आला होता पण मी सातविला गेलो आणि अचानक बाबांनी त्यांचा लिंबाचा व्यवसाय बंद केला आणि आमच्याच विभागात धंदा करण्याचा निर्णय घेतला त्यात त्यांचे दारूचे व्यसन बळावले आमच्या शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्चही वाढला होता. त्या काळात त्यांनी अनेक उद्योग केले ज्यात मी मोठा मुलगा म्हणून माझीच फरफड होत होती. कधी नारळाचा, तर कधी कांदा लसणाचा तरी कधी बुर्जी पाव असे एक ना अनेक उद्योग केले. एका ताडीच्या दुकाना बाहेर चणे विकण्याचा धंदाही मी केला त्यापूर्वीही आम्ही भावंडांनी घरात अनेक छोटी छोटी कामे केली होती. या दरम्यान घराची डागडुजी करण्यासाठी आईने तिचे दागिने विकून टाकले. शाळेच्या फी भरण्यासाठी कित्येकदा फंडातून पैसे उचलले या दरम्यान विजेचे बिल न भरल्यामुळे वीज कापून गेली त्यावेळी नातेवाईकांनी केलेली लबाडी मला आजही विसरता येत नाही. जेव्हा कोणताच मार्ग उरला नाही तेव्हा माझ्या आईने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.


तिच्या पगारात आमचं घर कसंतरी चालू लागलं पण घरासाठी कष्ट करणाऱ्या माझ्या आईवर दारूच्या नशेत बाबा तिच्या चारित्र्यावर संशय घायचे ते ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात जायची आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विवाह संस्थेवरचा माझा विश्वास उडायला सुरुवात झाली होती. आजूबाजूच्या जवळ जवळ सर्वच घरात हीच परिस्थिती होती. मी अभ्यासात हुशार असतानाही मला त्याकडे दुर्लक्ष करावं लागतं होतं. दहावीच्या परीक्षेला जायला माझ्याकडे साधे नवीन कपडेही नव्हते. माझ्या आग्रहाखातर एक जोड कपडे बाबांनी घेऊन दिले मला आजही आठवते परीक्षेला जाण्यासाठी घरी बसलाही पैसे नव्हते तेव्हा आमच्या शेजारणीने चार रुपये दिले होते. त्याही परस्थिती अभ्यास करून मी दहावीला त्रेसष्ट टक्के मिळवून पास झालो. पण तेव्हा पेढे वाटायलाही आमच्याकडे पैसे नव्हते. माझा बाबा मला म्हणाले, तू आता काम कर !तुझ्या आईला झेपत नाही ! सगळे शाळेत जातात त्यांच्या खण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे ! मी तेव्हाही होकार भरला पण मला काय वाटतं ! मला काय करायचंय ? मला काय व्हायचंय ? हे विचारणारा कोणीच नव्हता. वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या बाबांनी आमच्या कुटुंबाचा भार माझ्या खांद्यावर टाकण्याचा विचार केला. कारण त्याच वयात त्यांनीही तो पेलला होता. पण तो पेलताना त्यांची स्वप्ने नव्हती पण त्यांनी माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली होती. माझी सर्व स्वप्ने त्यांच्या स्वप्नांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. मी पण कुटूंबातील मोठा मुलगा म्हणून तो त्याग हसत हसत केला. माझ्या स्वप्नाची माती झालेली पाहून आतल्या आत कुडत झगडत जीवन जगता जगता जगता माझ्यातील मी कधी मेला ते कळलंच नाही. हळूहळू मी सर्वांपासून दूर जाऊ लागलो आणि एक क्षण आला जेव्हा मी स्वतःला एकटा समजू लागलो. माझ्याकडे आज सर्व काही होत, सर्व नाती होती, पद , प्रतिष्ठा, मानसन्मान तरीही मी स्वतःला एकटा समजत होतो.


      माझा दहावीचा निकाल लागला आणि माझ्यासाठी माझ्या बाबांनी कामाची शोधा शोध सुरू केली तेव्हा एका लोके आडनावाच्या इसमाने त्याच्याच बाजूच्या नव्याने सुरू झालेल्या अभियांत्रिकी कारखान्यात माझ्या कामासाठी विचारणा केली. मी बाबांसोबत त्या कारखान्यात गेलो. त्या कारखान्याच्या मालकाने माझी मार्कशीट पाहून मला कामावर ठेऊन घेतले. त्यावेळी त्या कारखान्यात त्यावेळी जावळे आडनावाचे एक गृहस्थ टर्नर म्हणून काम करत होते. त्या कारखान्यात सोने- चांदी वजन करायचे बुलीयचे तराजू आणि वजने तयार होत होती. त्यावेळी त्या कारखान्यात अभियांत्रिकी कारखान्यात असणाऱ्या जवळ - जवळ सर्व मशिन्स होत्या उदा. कटिंग, ड्रीलिंग, शिपिंग, टर्निंग, ग्रांडिंग, टॅपिंग, इन्ग्रेविंग, पंचिंग ही सर्व कामे करणाऱ्या ! त्यावेळी त्या मशिन्स पाहून मला खरं तर घाम फुटला होता पण त्यावेळी येथे आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल या आशेने मी तेथे कामाला राहिलो. तेव्हा मला तिथे तीस रुपये रोज ठरला होता. मी तेथे झाडू मारून कामाला सुरुवात केली. त्यावेळी माझे बाबाही धंदा बंद करून नोकरीला लागले होते. आई घरीच होती. माझ्या आयुष्यात मी हाताळले सर्वात पहिली मशीन होती कटिंग मशीन त्या मशीनवर पाटे कापण्यात मी पटाईत झालो.


त्यानंतर मी रात्र महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला. पण का कोणास जाणे माझं मन अभ्यासात पूर्वीसारखं रमत नव्हतं. म्हणजे माझ्या आमच्या कुटुंबावर पैशा अभावी जे अपमान सहन करण्याचे प्रसंग आले होते ते मला स्वस्थ बसू देत नव्हते त्यावेळी मी कमालीचा नास्तिक आणि विज्ञानवादी होतो त्यामुळे मी खूप मेहनत करून मोठा माणूस होईन वगैरे फिल्मी विचार माझ्या डोक्यात होते. पण प्रत्यक्षात तसे काही झाले की नाही हे मला अजूनही कळत नाही. आमची मुख्य कंपनी गिरगावला होती आणि मी गोरेगावच्या कारखान्यात होतो. मी कारखान्यात सर्वांच्या अगोदर जात असे त्यामुळे कारखान्याची चावी माझ्या हातात दिली. टेलिफोन उचलण्याचे कामही माझ्याकडे आले , चहा लिहिणे, चलन सही करून देणे ही कामेही माझ्याकडे असली म्हणजे कारखाना उगडण्यापासून ते बंद करण्यापर्यंतची वरची सर्व कामे मला करावी लागत. त्या कारखान्यात नंतर जुन्या कारखान्यातून एक जाधव आडनावाचे इसम आमच्या ह्या कारखान्यात कामाला आले ते प्रचंड हुशार होते. त्या क्षेत्रातील सर्वात हुशार माणूस म्हणता येईल.


त्यांनतर त्या क्षेत्रातील बऱ्याच हुशार कारागिरांसोबत मी मदतनीस म्हणून काम करत होतो. बारावीला मी दोन विषयात मी नापास झालो त्या वर्षी म्हणजे १९९७ ला त्या दोन विषयात सत्तर टक्के विद्यार्थी नापास झाले होते. पण मी नापास होण्याला मला अभ्यास करायला वेळ मिळाला नव्हता किंवा माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. पुढे ऑक्टोबरला मी त्या दोन्ही विषयात पास झालो. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी खूप अट्टहास केला पण ते शक्य झालं नाही. आणि एक क्षण असा आला की मला वाटू लागलं की फक्त ती कागदी डिग्री घेऊन काही उपयोग नाही कारण त्या डिग्रीमुळे मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आता आपल्याकडे आहे. पुढे मी त्या कारखान्यातील कामाकडे लक्ष केंद्रित केले आणि एका एका यंत्रावर स्वार झालो. या दरम्यान मला वाचनाची गोडी लागली कारण जाधव आणि जावळे रोज कारखान्यात येताना वर्तमानपत्र आणत आणि मी ही त्यावेळी आमच्या बसमध्ये वर्तमान पत्र वाचणारा मी एकटाच होतो. मी तेव्हापासून म्हणजे १९९७ पासून ते आज २०२१ पर्यत सकाळ पेपर वाचतोय ! जावळे नावाकाळ वाचायचे आणि जाधव लोकसत्ता दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर ते झोपायचे आणि मी पेपर वाचत बसायचो ! मला वाचनाची आणि लिहिण्याची गोडी तर होतीच पण ती गोडी या कारखान्यात आणखी वाढली. त्या व्यतिरिक्त मी इतर मिळेल ते साहित्य वाचायचो त्या वाचण्याला कोणत्याच विषयाचे बंधन नव्हते. २००० साली मी लिहिलेल्या दोन प्रेमकथा "नवाकाळ" या दैनिकात प्रकाशित झाल्या.


२००१ साली सकाळचे युवा सकाळ हे खास युवकांसाठीचे दैनिक सुरू झाले होते. त्या दैनिकात माझे वेगवेगळ्या विषयावरील पत्रे, मतं आणि लेख प्रकाशित होऊ लागले आणि माझ्यातील पत्रकार खऱ्या अर्थाने जागा झाला त्यांनतर मी मालाड टाइम्स या स्थानिक हिंदी साप्ताहिक वृत्तपत्रात शिकाऊ पत्रकार म्हणून काम केले त्या साप्ताहिकाचे संपादक राजेश शिर्के हे माझे पत्रकारितेतील गुरू त्यांच्यामुळेच मला पत्रकारितेचे धडे मिळाले. त्यामुळे पुढे वृत्त मानस या दैनिकात माझे अनेक लेख प्रकाशित झाले. वेगवेगळ्या दिवाळी अंकात माझ्या कथा लेख आणि कविता प्रकाशित होऊ लागल्या. सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशनचे सुभाष कुदळे आणि विनोद पितळे याच्या सहकार्याने माझा 2009 साली कवितेचा कवी आणि २०१० साली प्रतिभा हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मे २०११ ला माझ्या साहित्य उपेक्षितांचे या मासिकाचा जन्म झाला. नवीन लेखकांना संधी देण्याच्या उद्देशाने ! माझा लिखाणाचा प्रवास एका नोंदणीकृत मासिकाचा संपादक होईपर्यत पोहोचला होता. त्या मासिकाचा पसारा मला फार काही वाढवता आला नाही पण दखल घेण्याजोगे काही अंक नक्कीच प्रकाशित होत राहिले. त्यात मला माझे दुसरे गुरू आणि मार्गदर्शक डॉ. शांताराम कारंडे यांचे सहकार्य लाभले आणि आजही लाभत आहे.


आता लिखाणाच वाचनाचं माध्यम बदललं अनेक वेबसाईट आल्या अँप आले आणि मी डिजिटल मीडियाच्या प्रेमात पडलो आणि फेसबुक व्हाट्स अँप यावर मी रमू लागलो. हातातला कागद पेन नाहीसा झाला आता मोबाईलच्या स्क्रीनवर बोटातून शब्द उतरू लागले. माझ्या शब्दांना किंमत आली माझ्या लिखाणाची दखल घेतली जाऊ लागली. माझ्या विचारांना महत्व आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक मित्र आणि मार्गदर्शक भेटले. पण मी त्याही क्षेत्रात फार काही नेत्रदीपक असं काही करू शकलो नाही असं मला स्वतःला वाटतं कारण मी त्या क्षेत्रात अजून बरच काही करू शकलो असतो पण माझी आर्थिक परिस्थिती नाही पण आर्थिक जबाबदारी आडवी येत होती. माझं कुटुंबातील मोठेपण मला आयुष्याच्या या वळणावरही आडवं येत होतं. माझा उपयोग अनेकांना होत होता मला मानसन्मान मिळत होता पण आर्थिक बाजू मात्र माझी स्वतःची लंगडी झाली होती. मला खूप वाटायचं म्हणजे वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं पण स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मला आजही झगडावं लागतंय ! आजही मी एकटाच त्या कारखान्यात घाम गळतोय ! त्या कारखान्यातील सर्व कामगार कारखाना सोडून गेले आहेत. मी आहे म्हणून कारखाना सुरू आहे. त्या कारखान्याची आर्थिक स्थिती बरी नाही म्हणजे सारं टुकू टुकू चाललंय ! म्हणजे मी चालवतोय !


मला माझे बाबा आणि भाऊ नवीन उद्योग सुरू कर म्हणून मागे लागले आहेत. म्हणजे आता ते सगळे बऱ्यापैकी पैसेवाले झाले आहेत मी बारावी झालो त्यानंतर माझे बाबा आध्यात्मिक मार्गाला लागले त्यांनी दारू सोडून दिली. त्यानंतर माझा धाकटा अपंग भाऊ त्याला मी कर्ज काढून तेव्हा संगणक शिकविले तो त्यात पटाईत झाला. तो स्वतःच्या पायावर उभा राहावा म्हणून मी त्याला बी. कॉम पर्यत शिकविले. आणि दोन कॉम्पुटर च्या मदतीने त्याने कॉम्प्युटर क्लास सुरू केला मी त्याच कॉम्प्युटरवर सारं काही शिकलो. वाटलं नव्हतं कधी आपण स्वतःच कॉम्प्युटर घेऊ पण झालं. माझा लहान भाऊ तो ही बारावी झाल्यावर एल आय सीत डी.ओ. कडे कामाला राहिला. बहीण १२ वी होताच तिचा प्रेमविवाह करून दिला. मधल्या काळात आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आम्ही चारचाकी घेऊ शकतो इतकी मजबूत झाली. पण त्यात माझे योगदान नव्हते याची मला स्वतःला आज खंत वाटते. एका कुडाच्या झोपडीतून आम्ही टॉवरमध्ये राहायला आलो. याचा खूप आनंद होतो. मधल्या काळात लहान भावाचा प्रेमविवाह झाला. त्याला दोन मुलं झाली बहिणीला दोन मुलं झाली आई बाबांना चार नातवंड मिळाली. आता लहान भाऊ वेगळा राहतो म्हणजे जागेची समस्या ! तरीही आम्ही दोघे म्हणजे मी आणि माझा धाकटा भाऊ अविवाहित आहोत याच शल्य आई बाबांना आहेच ! माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया येऊनही मी अविवाहित का आहे? हे जगाला न उलगडलेले कोडे आहे.


माझ्या धाकट्या भावाला गावी असताना पोलिओ झाला आणि आईने त्या रागात कायमची मुंबई जवळ केली. त्यांनंतर आमचं कोकणातील गावी जण जवळ जवळ बंद झालं लहान असताना काकाच्या लग्नाला गेलो होतो त्या नंतर एक - दोनदा त्यामळे मला गावी कोणी चेहऱ्याने ओळखत नव्हते. मी आठवीत असताना आमची वेडसर झालेली आजी आमच्या झोडीत राहायला आली. म्हणजे काकानेच मुंबईला आमच्याकडे धाडली होती. तेव्हा आमची आई कामाला होती त्यामुळे तिला सांभाळता सांभाळता आमची दमछाक व्हायची त्यावेळी आम्ही तिला त्रास देतो अशी अफवा कोणी पसरवली होती देव जाणे पुढे कधीतरी एकजण पचकला तेव्हा मला कळले. एके दिवशी ती आमच्या झोपडपट्टीत रस्ता चुकली तेव्हा तिचा फोटो नव्हे तिला केबलवर लाईव्ह दाखविले होते. त्यावेळी आमच्याकडे टी. व्ही. होता पण केबल नव्हता. त्यावेळी आमच्या विभागात आम्ही एकटेच बामणे होतो त्यामुळे शोधण्याची काही गरज नव्हती. आणि आमचे बाबा विभागात त्यावेळी नारळवाले म्हणून प्रसिद्धीस आले होते. मी ही बसायचो बऱ्याचदा नारळ विकायला त्यामुळे खराब नारळ कसा ओळखायचा, नारळ कसा फोडायचा आणि नारळातील खोबर अक्क कसं काढायचं याच कसब मी शिकलो होतो. एक - दोन वर्षांनी आजी गावी गेली आणि तिथेच अचानक वारली. ती जर मानसिकदृष्टया सदृढ असती तर फार बरं झालं असतं. तिचा प्रेमळ सहवास आम्हाला लाभला असता. पण माझ्या आईची आई तिचे प्रेम आम्हाला भरभरून लाभले.ती गेली तेव्हा मी माझी आजी ही कविता लिहिली होती. तिचे सारे आयुष्य काबाड कष्ट करण्यात गेले तरीही शेवटी तिच्या वाट्याला सुख का आले नाही ? हे कोडे मला आजही उलगडले नाही आमच्या झोडपट्टीत बाथरूमची व्यवस्था जवळ नसल्यामुळे तिला तिच्या शेवटच्या काळातही मनात असतानाही आमच्या जवळ ठेवता आले नाही. ती गेली त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही एस आर ए च्या टॉवर मध्ये राहायला गेलो. आजी कशी असावी याच ती जिवंत उदाहरण होती. ती फक्त नावाने लक्ष्मी नव्हती तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी होती. आमची गरिबी तिने पहिली होती आणि श्रीमंतीही पहिली.पतवंडे ही पहिली. माझ्या आईवर तिचे खूप प्रेम होते. त्या धक्क्यातून सावरायला आईला एक वर्ष गेला. आम्ही नवीन घरात आलो आणि चार वर्षे भाड्याच्या घरात राहण्याच्या त्रासातून मुक्त झालो. नवीन घरात राहायला आल्याव आम्ही गावी जुनं घर पाडून नवीन घर बांधायला घेतले. त्या घराच्या गृहप्रवेशाच्या वेळी मी गावी गेलो. तेव्हा गावातील लोकांशी आई बाबांना माझी ओळख करून द्यावी लागत होती. यापूर्वी मी गावी गेलो होतो तो २००४ साली माझ्या लहान बहिणीच्या लग्नाला. तेव्हा मी पंचवीस वर्षाचा होतो. माझ्यासोबत माझे स्वाध्याही मित्रही होते . त्या स्वाध्यायी मित्रांच्या सहवासात आल्यामुळेच मी मांसाहार सोडला होता. २६ जुलैला मुंबई तुंबापुरी झाली आणि २८ जुलैला मी मामा झालो म्हणजे माझ्या भाच्याचा वेदांतचा जन्म झाला. त्याच्याच नावाने पुढे माझ्या धाकट्या भावाने आणि मी वेदांत कॉम्पुटर नावाने कॉम्पुटर क्लास सुरू केला जो आजही सुरू आहे. आज क्लासचा पसारा वाढवला नाही पण संगणका संबंधीच्या कामाचा पसारा भावाने खूप वाढवला , नाव झालं पण पैसा त्या मानाने नाही मिळवता आला. आमच्या घरातील प्रत्येकाच्या हातून अगदी नकळत समाजउपयोगी कामे आम्ही गरीब असतानाही होत होती आणि होत आहेत आजही. माझी बहिण आज आरोग्य सेविका आहे, लहान भाऊ विमा क्षेत्रात आहे धाकटा भाऊ संगणक क्षेत्रात आहे अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्याने प्रसंगी मोफत संगणक शिकविले आहे. मी पत्रकारिता क्षेत्रात आणि आमचे बाबा आता गॅस - शेगडी दुरुस्ती संबंधी कामे स्वस्तात करून लोकांची आजही सेवा करत आहेत. आज त्यांना समाजात खूप मानसन्मान आहे तो त्यांनी स्वतः कमावला आहे. मी शिक्षण सोडले त्या काळात माझे बाबा काडसिद्धेश्वर महाराज यांच्या सानिध्यात आले आणि त्यांनी दारू सोडली आणि ते आध्यात्मिक झाले. संगत मनुष्याचे आयुष्य बदलते जगण्याला एक नवीन अर्थ देते. त्यामळे मी संगत करताना फार जागरूक असतो. म्हणूनच मला मोजके मित्र आहेत. माझा एकही मित्र दारू पित नाही. माझ्या आयुष्यात माझा खरा मित्र एकच होता तो म्हणजे विजय ! माझा एकमेव मित्र ! त्या व्यतिरिक्त माझे मित्र माझे भाऊच होते. विजय एकमेव मित्र होता ज्याच्या घरी मी जेवलो होतो. त्याची आई माझे खूप लाड करायची ! तो मुंबई सोडून नालासोफाऱ्याला गेला आणि आम्ही शरीराने दुरावलो. पुढे त्याच लग्न झालं तो संसारात रमला. आणि मी माझ्या कवितेत रमलो. विजय एक अजब रसायन होतं. आमच्या वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी ! आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा पण थोडासा लाजाळू माझी आणि त्याची मैत्री नक्की कशी झाली मला आठवतही नाही. पुढे तो विज्ञान शाखेत गेला वनस्पती शास्त्रांत काहीतरी शिकला आणि पुढे फार्मा कंपनीत स्थिरावला आमच्यात आजही फोन होतो पण कामासाठी ! आम्ही सहावीत असताना आमच्या वर्गातील नीलम नावाच्या मुलीला त्याच्या नावाने एका वात्रट मुलाने चिट्टी लिहिली आणि हा तिचा भाऊ झाला. तिच नीलम मी जेव्हा तिसरीत सरकारी शाळेत शिकत होतो तेव्हां माझ्या वर्गात होती. दिसायला एखाद्या बहुलीसारखी ! मी ही तेव्हा बहुलाच होतो पण सुकड्या बाहुला ! एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही डबा खात होतो. नीलम त्यावेळी आमच्या वर्गाची वर्ग प्रमुख होती. तिने डबा खाल्ला आणि माझी पाण्याची बाटली पिऊन रिकामी केली. त्यात तिच्यासोबत तिचे आणखी मित्रही होते. मला या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि मी तसाच दप्तर उचलून एकटाच घरी गेलो. मला अचानक घरी आल्याच पाहून आईला आश्चर्य वाटले. आई मला पुन्हा शाळेत घेऊन गेली आणि त्यावेळी आमच्या वर्ग शिक्षिका असणाऱ्या कांबळे बाईंकडे तिने नीलमची तक्रार केली . योगायोगाने त्या बाईंच्या मुलाच नावही निलेश होतं. त्यांनी नीलमला विचारले असता तिने आपला गुन्हा ताबडतोब कबूल केला. मग बाईंनी तिच्या नाजूक हातावर छडीने फटके मारले ती रडून रडून लाल झाली. शाळा सुटल्यावर कळले की तिची आई आणि माझी आई ओळखीच्या होत्या. पुढच्या वर्षी चौथीला मी गुरुकुल विद्यालय या तेव्हा नव्याने सुरू झालेल्या शाळेत प्रवेश घेतला आणि वर्गात पाऊल ठेवतो तर काय ? त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका बाबांच्या ओळखीच्या होत्या आणि योगायोगाने निलनीलमनेही त्याच शाळेत प्रवेश घेतला होता. त्या प्रसंगा नंतर मी शाळेत शक्यतो मुलींपासून लांबच राहू लागलो होतो. ती अभ्यासात तर हुशार होतीच पण खेळातही हुशार होती. मी अभ्यासात आणि चित्रकलेत हुशार होतो. माझा चित्रकलेचा छंद पुढे बरेच वर्ष मी लहान मुलांना चित्रे काढून देऊन जोपासला पण नंतर माझ्यातील चित्रकार जगण्याच्या धावपळीत कोठे हरवला ते माझं मलाच कळलं नाही. नीलमला माझी म्हणजे मी काढलेली चित्रे आवडत त्यामुळे आमच्यात अभ्यासात स्पर्धा होती पण पुढे जाऊन मी मागे पडलो ती पदवीधर झाली तेव्हा मी कारखान्यात हात काळे करत होतो. तरीही त्यांनंतरच्या काळात आमच्यात मैत्री वाढली इतकी की आमचे मित्र आमच्या नात्याबद्दल संशय घेऊ लागले. पण तिच्या धडाडी स्वभावाचा मला आदर वाटे आणि सौंदर्याचा हेवा ! तिच्याबद्दल माझ्या मनात तशा भावना कधीच नव्हत्या पण माझी पहिली मैत्रीण म्हणता येईल तिला. पण काही वर्षांपूर्वी तिच्या आईने आत्महत्या केली. ती गोष्ट मात्र माझ्या हृदयाला चटका लावून गेली त्यानंतर तिच्या आयुष्यात तिच्या कुटुंबात बऱ्याच गोष्टी घडल्या त्याचा मी साक्षीदार नव्हतो. त्या नंतर ती मला कधीच भेटली नाही. माझ्या शाळेतील मोजून पाच सहा मित्र तेवढेच आज माझ्या संपर्कात आहेत ते ही व्हाट्स अँपवर ! ते त्यांच्या आयुष्यात रंगलेले मी माझ्या आयुष्यात गुणलेलो ! माझं त्यांच्यावर प्रेम आहे नाही हा प्रश्नच नाही पण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. पण मीच हळू स्वतःला जगापासून अलिप्त करून घेतलं कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना पटतील अशी माझ्याकडे नाहीत. माझ्या शाळेतील आठवणी खूपच प्रेरणादायी होत्या. मी सहावीत असताना आमच्या वर्गशिक्षिका सावंत मॅडम होत्या. पाचवा तास त्या घेत होत्या मी दरवाजा जवळच्या पहिल्या बेंचवर बसलो होतो वर्गाबाहेरील दुसऱ्या सरांनी मला बाहेर बोलावलं म्हणून मी मॅडमला न विचारता बाहेर गेलो खरं तर हे चकीच होतं पण झाली चुकी ! मी माघारी आल्यावर मॅडमनी मला विचारून बाहेर न गेल्यामुळे हातावर दोन फटके मारले ! माझ्या शालेय जीवनात मी खाल्लेला तो पहिला आणि शेवटचा मार होता. तो मार माझ्या इतका जिव्हारी लागला की पुढचे दोन तास मी रडून काढले शेवटच्या तासाला त्या मॅडम पुन्हा आल्या तेंव्हा त्यांनी मला रडताना पाहून पुढे बोलावलं आणि स्वतःच्या हातातील रुमालाने माझे डोळे पुसून मला गप्प केलं. त्यावेळी आम्हाला हिंदीला एक शिक्षक होते ते ज्याला प्रश्नच उत्तर बरोबर येईल ते त्याला उत्तर चकल्या विद्यार्थ्यांच्या कानाखाली मारायला सांगत. एकदा त्यांनी एक प्रश्न विचारला मुलींपासून सुरुवात केली. शेवटचा नंबर माझा होता अक्का वर्ग उभा राहिला जर मी त्या प्रश्नाच उत्तर दिलं नसत तर अक्का वर्ग वाचला असता पण मी उत्तर दिलं आणि वर्गातील सर्व मुलांना माझा मार खावा लागला मुलींना सरांनी पट्टीने मारले पण माझ्यावर त्याचा राग एकानेही धरला नाही विजयलाही मला तेव्हा मारावे लागले होते. असे अनेक प्रसंग आले जेंव्हा मी माझी हुशारी सिद्ध केली. पण दुर्दैवाने माझी हुशारी जगाने मान्य करूनही दुर्दैवाने माझ्या खाजगी आयुष्यात मी स्वतःला यशस्वी सिद्ध करू शकलो नाही. कारण भौतिक जगाची यशाची परिभाषा खूपच वेगळी आहे. मला वाटलं होतं मी माझ्या बुद्धीच्या जोरावर फार मोठा कोणीतरी होईन पण माझ्या नशिबाने मला साथ काही दिली नाही. त्यामुळे आज मी खात्रीने सांगू शकतो की नशीब नावाची एक अजब गोष्ट या जगात असते.माझ्या हुशारिचा उपयोग करून घेणारे सर्वच आज त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत मग ते यश माझ्या वाट्याला का आले नाही. या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध शेवटी मी घेतला माझ्या परीने. पण ती उत्तरे थोडी विचित्र,अगम्य, अनाकलनीय आणि कल्पनातीत होती.

माझी वयाची पस्तीस वर्षे झोपडपट्टीत गेली पण ते झोपडपट्टीतील आयुष्य खूप सुंदर आनंदाने गेली सोबत काही काळ गरिबी असतानाही ! मला आजही आठवते आमची झोपडी कुडाच्या काठीने शेण आणि माती मिसळून तयार केलेली होती वर कलकाचे बांबू त्यावर लोखंडी पत्रे आणि प्लास्टिक होते खाली जमीन मातीची शेणाने सारवलेली. मी स्वतःही कित्येकदा जमीन शेणाने सारवलीही होती आणि वलंयही केली होती. त्यावेळी तेथे लाईट नव्हती सर्वांकडे चिमणीचे दिवे होते काही कार्यक्रम असेल तर लोक गॅसबत्ती भाड्याने आणत त्यावेळी त्याचा प्रकाशही खूप जास्त वाटे मी चिमणीच्या प्रकाशात केलेला पाठीवरचा अभ्यास मला आजही आठवतो. त्यावेळी आमच्या झोपडीच्या आजूबाजूला खूप फुलझाडे होती. केळीची झाडे होती. एक दोन पेरू बदाम आंबे आणि वडाची झाडे होती. थोड्या अंतरावर जंगल होतं त्या जंगलातून एक नाला वाहत होता. त्या नाल्यातच एक विहीर होती. त्यावेळी आमच्या झोपडीत दिवसा ढवल्याही साप - विंचू येत. जवळ असणाऱ्या जंगलात आम्ही प्रातविधीला जायचो आणि तेथील झाडांवर झोपाळे खेळत राहायचो ! आणि मोठं मोठ्या दगडांवर चढून बसायचो मी तर कित्येकदा त्या दगडांवर बसून इंग्रजीचे शब्द पाठ करायचो ! त्या जंगलातील मोकळ्या जागेत आम्ही तासनतास क्रिकेट, गोट्या, कबडी, खो खो , लंगडी खेळायचो आणि पतंगही उडवायचो ! पावसाळ्यात पत्ते खेळायचो अगदी भिकारी - भिकारी पासून रमी पर्यत. पावसाळ्यात छत्री हा प्रकार आम्हाला माहीत नव्हता. पावसात भिजायचं चिखलात खेळायचं आणि नाल्यावर जाऊन पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डबक्यात मस्त डुंबायच ! त्यावेळी आम्ही आमच्या घरापासून दूर असणाऱ्या विहिरीवर पाणी भरायला जायचो तेव्हा आमच्या सोबत मुलीही असायचा आजच्या भाषेत ती विहीर म्हणजे आमचा लव्हर्स स्पॉट होता. आणि दुसरा लव्हर स्पॉट पावसाळ्यात तो नाला व्हायचा ! जेथे आम्ही चादरी धुवायला घेऊन जायचो आणि दिवसभर दगडावर बसून राहायचो ! कधी - कधी तेथेच दगडाच्या खपरित लपलेले खेकडे पकडून आणायचो आणि चुलीवर त्याचा रस्सा करून पार्टी करायचो ! त्यावेळी आम्ही गरीब असतानाही सर्वार्थाने सुखी होतो. प्रसंगी भंगार विकुनही आम्ही एक किलो तांदूळ आणून भात करून मसाला आणि मिठासोबत चवीने खाल्ला होता. पण त्यावेळी त्या भाताचा सुखाने खाल्लेला घास पुन्हा खायला मिळाला नाही. त्यावेळी आम्ही जंगलात जाऊन करवंदे आणि चिंच तोडून आणायचो ! त्यामुळेच कदाचित मला आंबट खायची सवय लागली की लिंबू मी संत्री सारखा सोलून खायचो ! एके दिवशी मी माझ्या मित्रांसोबत माझ्या एका मित्राच्या गावी म्हणजे ओझरला पिकनिकला गेलो होतो त्याच्या घरासमोर एक लिंबाचे झाड होते. मी म्हणालो, मी हा लिंबू सोलून खाईन ! पण माझ्या मित्रांना ते खोटे वाटले. पण मी लिंबू खाल्ल्यावर सर्वांनी तोंडात बोटे घातली. त्याच वेळी मी पहिल्यांदा ओजरच्या गणपतीचे, लेण्याद्रीच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि शिवनेरी किल्ल्यावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. आम्ही माघारी येताना ड्रायव्हरचा गाडी चालवताना डोळा लागला. पण नशीब आमचा मित्र सहदेव जागा होता. नाहीतर त्या दिवशी आमचा निकाल लागला असता.

आमच्या विभागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं आयुष्य खऱ्या अर्थाने कोणी बदलले असेल तर ते कास्प प्लॅन या संस्थेने त्यांनी आमच्या अंधारमय झोपडीत विजेचा प्रकाश आणला, ज्ञानाचा प्रकाश आणला, प्रौढ साक्षरतेचा प्रकाश आणला इतकंच काय घरं पक्की व्हावी म्हणून साहित्यही दिले. आमचे घर पक्के होण्यासाठी तेव्हा आईच मंगळसूत्र विकावे लागले होते. पुढे आम्ही आमच्या स्व: खर्चाने दुमजली छान घर बांधले पण काही वर्षातच ते एस.आर. ए. त गेलं आणि आम्ही टॉवरमध्ये राहायला आलो. मधल्या काळात आम्हाला काही वर्षे भाड्याच्या घरात राहावे लागले. स्वतःच्या हक्काच्या घरात राहणाऱ्यांसाठी भाड्याच्या घरात राहणं ही खरं तर शिक्षाच असते. आमच्या पूर्वीच्या झोपडपट्टीत कसा मोकळा श्वास होता. नेमकी त्यावेळीच ज्योतिषी भाषेत सांगायचे तर माझी शनीची महादशा सुरू होती त्यात शनीची अंतर्दशा होती आणि शनीची साडेसाती सुरू होती. असं म्हणतात की शनीच्या साडेसातीत माणसाला स्वतःच्या घरापासून दूर राहावे लागते, चप्पल लवकर झिजतात, लोकांचे खरे चेहरे समोर येतात, प्रसंगी आत्महत्येचे विचार मनात येतात, चारी बाजूने आर्थिक कुचंबना होते, पायपीट करावी लागते, अपमान सहन करावा लागतो, समाजातील आपल्या पत प्रतिष्ठेला धक्का लागतो. नवीन शारीरिक व्याधी निर्माण होतात खास करून त्वचारोगाशी संबंधित ! साडेसातीत मला हे सर्व अनुभव अनुभवता आले दुर्दैवाने ! याच काळात मी स्वतःला स्वतःच अनेक प्रश्न विचारले. कित्येकदा तर मला वाटले माझे आयुष्य निर्थक वाया गेले. कवी लेखक पत्रकार म्हणून मी केलेले कार्य कोठे गिणतीतच नाही मला त्या प्रसिद्धीचा काडीचाही उपयोग झाला नाही उलट त्या सगळ्यांच्या नादात मी स्वतःच आर्थिक नुकसान करून घेतलं असं मला वाटतं. मी ते सगळं करण्यात आयुष्य अक्षरशः वाया घालविले असे माझ्या कुटुंबातील लोकांसह बहुतांश लोकांचं असच मत आहे. त्याकाळातच माझा दैवी शक्तींवरचा विश्वास वाढला कोठेतरी नास्तिकतेतून माझा प्रवास आस्तिकतेकडे सुरू झाला. साडेसाती संपल्या संपल्या आम्ही आमच्या टॉवरमधील नवीन घरात राहायला गेलो ती तारीख होती ८ एप्रिल २००१६ आणि आश्चर्य म्हणजे आमच्या जुन्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला होता आणि या घराचा दरवाजाही उत्तर दिशेलाच आहे. या नवीन घरात राहायला आलो आणि मन शांत झालं. आता तेथे राहायला येऊन पाच वर्षे पूर्ण झाली या घरात राहायला आल्यावर माझ्या भाच्याचा आणि पुतण्याला जन्म झाला. मी पुन्हा मामा आणि काका झालो. माझे आर्थिक उत्पन्न पुन्हा सुरळीत झाले पण त्यापूर्वीच्या आयुष्याने घेतलेल्या खडतर परीक्षांच्या झळा स्वस्थ बसू देत नव्हत्या म्हणून मला अगोदरच आवड असणाऱ्या ज्योतिष या विषयाचा मी ऑनलाईन अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला माझ्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली.

मी इतका हुशार असूनही आयुष्यात यशस्वी का झालो नाही ? हा प्रश्न माझ्या घरच्यांना सतत सतावत होता पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते म्हणून त्यांनी एका तंत्रमंत्र विषयाचा जाणकार असणाऱ्या व्यक्तीकडे सहज विचारणा केली असता ती व्यक्ती म्हणाली , माझ्यावर वशीकरण मंत्राचा प्रयोग झालेला आहे. म्हणजे सध्या मी ज्या कंपनीत काम करतो ती सोडून जाऊ नये म्हणून ! ती कंपनी सोडण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला पण तो फसला मला पुन्हा पुन्हा नाईलाजाने का होईना त्याच कंपनीत कामाला जावे लागत होते आजही मी तिथे माझ्या सोयीने काम करत होतो पण माझ्या कामाच्या तुलनेत मला मिळणारा मोबदला खूपच कमी होता इतका कमी की तो इतरांना सांगायलाही मलाच लाज वाटावी ! पण तरीही मी ते काम धरून होतो माझ्यावर हा प्रयोग करणाऱ्यांची त्याने सांगितलेली नावे होती संगिता, रमेश आणि सिताराम ! त्याने पुढे जाऊन हे ही सांगितले मी जोपर्यंत त्या कंपनीत आहे तोपर्यंतच ती कंपनी चालेल. मी इतका मनापासून काम करत होतो. तरीही माझाच उपयोग करून घेतला. म्हणा किंवा हा प्रयोग फक्त माझ्यावर केलेला नसेलही पण सगळे काम सोडून गेल्यावरही मी एकट्याने ती कंपनी सावरली पण त्या बदल्यात मला काय मिळालं फक्त आणि फक्त बोलणी ! माझ्या कामाची किंमत खूप जास्त होती पण त्याची किंमत मला मिळत नव्हती. मान मिळत होता पण पैसे मिळत नव्हते. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला पूर्वी घडून गेलेल्या सर्व गोष्टींचे संदर्भ मला लागले आणि मी सावध झालो. पण तरीही या अशा गोष्टी असतात यावर माझा विश्वास बसत नव्हता म्हणून मी आता त्या गोष्टीची पुन्हा परीक्षा घेणार होतो. ज्या दिवशी मला या सगळ्या गोष्टी कळल्या त्याच दिवशी माझ्यावरील त्या वशिकरण मंत्राची शक्ती नष्ट झाली. कारण हे मंत्र तुमच्या नकळत तुमच्या मनाला वशीभूत करत असतात एकदा का तुमच्या मनाची शक्ती वाढली की त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आता त्या मालकाच्याच मनात कंपनी बंद करायचा विचार येऊ लागला आहे. कारण त्यांनतर मी माझ्यातील शक्ती जागृत केल्या. मला स्वतःला भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल अगोदरच लागते. मी सहज बोलून गेलेल्या गोष्टी खऱ्या होतात. कोणत्याही वशीकरण शक्तीने मला तिथे गुंतवून ठेवले नव्हते मी गुंतून पडलो होतो. माझ्या पायगुणाने ती कंपनी चालत होती आणि आता बंदही पडेल. माझ्याबद्दल अनेक गूढ गोष्टी कोणालाच माहीत नाहीत. माझ्याकडून उसने घेतलेले पैसे भल्या भल्याना परत द्यायला जमत नाही. माझ्या संपर्कात येणाऱ्या करोडपती माणसालाही माझी गरज पडते पण तो माझ्या कामी येत नाही. मला माझ्या आयुष्यात कधीही उपाशी राहण्याची वेळ आली नाही. ही माझ्यावर देवाची कृपा असल्याचे लक्षण आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणालाही माफ केले नाही ! माझ्या बाबतीत चुकणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळतेच ! मी चुकलो तर मला मिळते म्हणून मला चुकण्याचा अधिकार नाही हे मला पक्क माहीत होतं. म्हणूनच मी प्रत्येकाला माझ्या बाबतीत चुकण्याची संधी देतो. माझ्या आयुष्यात घडलेल्या छोट्यात छोटी गोष्ट का घडली हा प्रश्न मी स्वतःला विचारतो ! मी माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासून कित्येक अपघातातून वाचलो ! ते योगायोगाने झालं नव्हतं. माझ्या आयुष्यात काहीच विनाकारण घडलं नव्हतं प्रत्येक घटना घडण्यामागे एक विशिष्ट कारण होतं. माझ्या आयुष्यात कोणीही विनाकारण आलं नव्हतं आणि विनाकारण गेलं नव्हतं. त्यामुळेच मी कधीच कोणाच्यातच गुंतून पडलो नाही. मी माझ्या आयुष्यात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा दोष इतरांना देतो पण ते विनाकारण असत कारण सामान्य माणसे मोहातून बाहेर पडत नाहीत. मी असामान्य आहे हे खरंतर मला त्यांना सांगायचे नसते. ते माझ्या नात्यात गुंतले आहेत पण मी नाही मी ज्या दृष्टीने जगाकडे पाहतो त्याच दृष्टीने माझ्या कुटुंबातील व्यक्तींकडे पाहतो. जगाला माझं वागणं हा वेडेपणा वाटतो पण मी सहज बोलून गेलो तरी ते तत्वज्ञान असते. कित्येकांना वाटत राहते की त्यांनी मला फसवले पण खरंतर त्यांनी स्वतःलाच फसवलेले असते. लवकरच मी बेचाळीस वर्षाचा होणार आहे आणि माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे. मला उत्सुकता आहे त्या वळणाची !

आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींसाठी सतत माणूस दुसऱ्यांना दोष देत असतो. मी ही देत होतो पण जेव्हा मला गूढ गोष्टी कळू लागल्या तेव्हा माझे अज्ञान दूर झाले. प्रत्येक व्यक्ती ही स्वतः आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी स्वतःच कारणीभूत असते. प्रत्येकाच्या वाट्याला येणारे दुःख हे त्याच्याच कर्माचे फळ असते या जन्मीचे अथवा गतजन्मीचे ! आपल्याला सर्व सुखे मिळाली म्हणजे आपण पुण्यवान आहोत हा भ्रम आहे या भ्रमामुळेच माणूस पापाच्या गर्तेत अधिक रुतत जातो आणि त्याला कळतही नाही. मी लहान असताना माझ्यावर कधीच उपाशी राहण्याची वेळ आली नाही घरात अन्नाचा कणही नसताना कोणाकडून उसने तांदूळ घेऊन कधी भंगार विकून कधी लोकांची छोटी मोठी कामे करून का होईना पोटाची सोय झाली अंगावर कपड्याचा विचार करता मला एक चड्डी पुरेशी होती कारण इतर वेळी मी उगडाच असायचो ! पण माझ्या त्या उगड्या पिळदार देहावर किती जणांच्या वासनरुपी नजरा पडल्या होत्या देव जाणे ! त्या अशुभ नजरांनी माझ्या साडेसातीत मुहूर्त रूप धारण केले आणि मी त्वचाविकाराने ग्रासलो गेलो इतका की मला उघडं राहण्याची लाज वाटू लागली बरा झालो की पुन्हा माझ्या उगड्या देहावर कोणाची तरी अशुभ दृष्टी पडते आणि पुन्हा तेच चक्र सुरू होते. त्यावरील उपाय आता मला सापडला मी उगड राहता कामा नये. पण सवय ! ती हुक्की मला येतेच !! आणि त्यासोबत त्याचे परिणामही !!! कोणी आपल्यावर जादूटोणा केला म्हणून आपण दुःखी होत असतो. आपले कर्म, आपले गत जन्मीचे कर्म, आपल्या आई वडिलांचे कर्म हेच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरत असतात. वास्तवात आपण ज्याचं दुःख करावं अशी कोणतीही गोष्ट या जगात अस्तित्वातच नाही. दुःख हे मोहामुळे निर्माण होते. जिथे मोह नाही तिथे दुःख नाही. मला प्रसिद्धीचा मोह निर्माण झाला त्याच्यामुळे माझ्या वाट्याला आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी न होण्याचे दुःख आले. आपल्या दुःखाचे जन्मदाते आपणच असतो. माझे लग्न झाले नाही म्हणजे मी ते करत नाही त्यामुळे मी दुःखी नाही कारण मला ते नको आहेत पण त्यासाठी विनाकारण जग दुःखी आहे. लग्न ही काही आयुष्यातील अंतीम गोष्ट नाही . या जगात म्हणजे निसर्गात आशा अनंत गोष्टी आहेत ज्यातून मनुष्याला आनंद मिळू शकतो. पण मनुष्य आनंद कशात शोधतो ? तर आयुष्याचा जोडीदार, मुलबाळ आणि संपत्तीत...जी प्रत्यक्षात त्याची कधी नसतेच.

आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींसाठी सतत माणूस दुसऱ्यांना दोष देत असतो. मी ही देत होतो पण जेव्हा मला गूढ गोष्टी कळू लागल्या तेव्हा माझे अज्ञान दूर झाले. प्रत्येक व्यक्ती ही स्वतः आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी स्वतःच कारणीभूत असते. प्रत्येकाच्या वाट्याला येणारे दुःख हे त्याच्याच कर्माचे फळ असते या जन्मीचे अथवा गतजन्मीचे ! आपल्याला सर्व सुखे मिळाली म्हणजे आपण पुण्यवान आहोत हा भ्रम आहे या भ्रमामुळेच माणूस पापाच्या गर्तेत अधिक रुतत जातो आणि त्याला कळतही नाही. मी लहान असताना माझ्यावर कधीच उपाशी राहण्याची वेळ आली नाही घरात अन्नाचा कणही नसताना कोणाकडून उसने तांदूळ घेऊन कधी भंगार विकून कधी लोकांची छोटी मोठी कामे करून का होईना पोटाची सोय झाली अंगावर कपड्याचा विचार करता मला एक चड्डी पुरेशी होती कारण इतर वेळी मी उगडाच असायचो ! पण माझ्या त्या उगड्या पिळदार देहावर किती जणांच्या वासनरुपी नजरा पडल्या होत्या देव जाणे ! त्या अशुभ नजरांनी माझ्या साडेसातीत मुहूर्त रूप धारण केले आणि मी त्वचाविकाराने ग्रासलो गेलो इतका की मला उघडं राहण्याची लाज वाटू लागली बरा झालो की पुन्हा माझ्या उगड्या देहावर कोणाची तरी अशुभ दृष्टी पडते आणि पुन्हा तेच चक्र सुरू होते. त्यावरील उपाय आता मला सापडला मी उगड राहता कामा नये. पण सवय ! ती हुक्की मला येतेच !! आणि त्यासोबत त्याचे परिणामही !!! कोणी आपल्यावर जादूटोणा केला म्हणून आपण दुःखी होत असतो. आपले कर्म, आपले गत जन्मीचे कर्म, आपल्या आई वडिलांचे कर्म हेच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरत असतात. वास्तवात आपण ज्याचं दुःख करावं अशी कोणतीही गोष्ट या जगात अस्तित्वातच नाही. दुःख हे मोहामुळे निर्माण होते. जिथे मोह नाही तिथे दुःख नाही. मला प्रसिद्धीचा मोह निर्माण झाला त्याच्यामुळे माझ्या वाट्याला आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी न होण्याचे दुःख आले. आपल्या दुःखाचे जन्मदाते आपणच असतो. माझे लग्न झाले नाही म्हणजे मी ते करत नाही त्यामुळे मी दुःखी नाही कारण मला ते नको आहेत पण त्यासाठी विनाकारण जग दुःखी आहे. लग्न ही काही आयुष्यातील अंतीम गोष्ट नाही . या जगात म्हणजे निसर्गात आशा अनंत गोष्टी आहेत ज्यातून मनुष्याला आनंद मिळू शकतो. पण मनुष्य आनंद कशात शोधतो ? तर आयुष्याचा जोडीदार, मुलबाळ आणि संपत्तीत...जी प्रत्यक्षात त्याची कधी नसतेच.


माझ्या भावाच्या कॉम्प्युटर क्लासमध्ये एक व्यक्ती यायची खूप हुशार होती साठीत त्या व्यक्तीने आपले सर्व दात काढून लाखभर रुपयाचे नवीन दात लावून घेण्याचा निर्णय घेतला होता. मी लेखक वगैरे आहे हे त्या व्यक्तीला माहीत होते पण मला अध्यात्मिक ज्ञानही आहे याची त्या व्यक्तीला कल्पना नव्हती तशी ती कल्पना माझ्याकडे पाहून कोणाला येत नाही त्या व्यक्तीने मला प्रश्न केला तुझं लग्न झालंय ? मी नाही ! म्हंटल्यावर ती व्यक्ती म्हणाली , करून टाकायचं ! आयुष्यात कोणी तरी साथ द्यायला हवेच ! त्यावर मी सहज म्हणालो, कोणीही कोणाला आयुष्यभर साथ देऊ शकत नाही एक क्षण असा येतोच जेव्हा नवरा किंवा बायको एकटे असतात. त्यामुळे आयुष्यभर साथ द्यायला कोणीतरी हवं म्हणून लग्न करायला हवं हे मला पटत नाही त्या ऐवजी आपली शारीरिक गरज ती ही सापेक्ष आहे ती भागविण्यासाठी लग्न करायला हवं असं तुम्ही म्हणालात तर ते मी मान्य करेन ! माझं हे म्हणणं त्या व्यक्तीला बहुदा मान्य नसावे ! पण त्यानंतर काही महिन्यातच त्या व्यक्तीने आपले सर्व दात काढून लासखभर रुपये खर्च करून नवीन दात लावून घेतले आणि अचानक हार्ट अटॅक येऊन स्वर्गवासी झाला. आता तो त्याच्या बायकोला साथ देऊ शकत होता ? तर नाही ! त्याला काय माहीत माझ्या आयुष्यात डझनभर स्त्रिया आल्या होत्या. त्यांचे माझ्यावर प्रेम होते पण मी त्यांच्यापैकी एकीतही गुंतून पडलो नाही. त्यांच्यापैकी एकीनेही मला माझ्याशी लग्न करतोस का म्हणून विचारणा केली नाही. कारण ते नियतीला मान्य नव्हते. मी स्वतः स्त्रिला पुरुषपेक्षा वेगळं मानत नाही. त्या सगळ्या आजही माझा आदर करतात कारण मी त्यांना दुःख दिलं नव्हतं ! त्यांनी त्यांच्या आयुष्यातील भौतिक आनंद शोधला होता. मी त्यांच्या आनंदात आनंदी होतो कारण मी माझ्या आनंदात आनंदी होतो. माझ्याकडे स्त्रिया आकर्षित होतात . मी ही त्यांच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो पण कोणा एकीत गुंतून राहणे मला जमत नाही. माझ्या आयुष्यात एक तरुणी आली. जेव्हा मी स्तब्ध झालो. ती तरुणी पहिल्यादा माझ्या आयुष्यात वयाच्या पंचविसाव्या वर्षी आली होती. पण माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम भावना वयाच्या पस्तिशीत निर्माण झाल्या. पुढे मी तिच्या प्रेमात मी बुडालो. इतका की मी दुसऱ्या कोणा तरुणीकडे पाहायचे सोडून दिले. ज्या क्षणी मी तिला पहिल्यांदा पाहिले तेंव्हाच माझ्या मनात तिच्याशी विवाहाचा विचार आला होता पण तेव्हा माझ्यासोबत एक तरुणी होती मी तिच्याशी विवाह करण्याच्या मनस्थितीत होतो पण त्यांनतर माझ्या असयुष्यातील एकेक करून सर्व तरुणी निघून गेल्या आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया बंद झाल्या. आजही स्त्रिया माझ्यावर मोहित होतात पण त्या माझ्या संपर्कात येत नाही. माझं मन मला सांगत की तिचं आणि माझं गतजन्मीचे काहीतरी नाते आहे ज्या नात्याचा काहीतरी हिशोब बाकी आहे जो पूर्ण करण्यासाठी ती माझ्या आयुष्यात आलेली आहे.

आमच्या कंपनीतील कारागीर जाधव आणि मी आमच्यात अनेक विषयांवर चर्चा व्हायची एकदा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक सत्य घटना कथन केली होती त्यांचे वडील वारले त्याच दिवशी त्यांच्या शेतात नांगर बांधला होता. पुढे जाऊन कोणीतरी त्यांच्यावर तंत्र प्रयोग केला आणि ते वेड्यासारखे करू लागले दिवसभर ठीक असायचे पण रात्र झाल्यावर वेड्यासारखे करायचे अंगावरील कपडे वगैरे फाडून टाकायचे मुंबईतील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणून उपचार सुरू झाले त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. दिवस भर ठीक असायचे पण रात्री वेडे व्हायचे ! हे सर्व विचित्र होतं. तेथील मोठे डॉक्टर देवधर्म मानणारे होते ते त्यांच्या नातेवाईकांना म्हणाले, " तुम्ही बाहेरच काही आहे का ते पहा ! शेवटी त्यांनी मंत्रिकाकडे पाहिले असते त्याने रात्री बारा वाजता त्याच्या अंगावरून काही वस्तू काढायला सांगितल्या त्याला त्या डॉक्टरने खास परवानगी दिली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते ठणठणीत बरे झाले. बर झाल्यावर ते गावी गेले असते गावातील एक तंत्रिकाने त्यांना रात्री पडवीत झोपायला सांगितले त्या दिवशी घरातील कोणालाही बाहेर पडायला नाही सांगितले आणि सकाळी चारच्या अगोदर तो मांत्रिक उठला त्याने स्वतः विहिरीवरून पाण्याच्या हंडा भरून आणला आणि त्याला अंघोळ घातली आणि त्यानंतर त्याला कधीही भूतबाधा झाली नाही. पण त्याच्या घराण्यातील ती व्यक्ती शेवटी मधमाश्या चावून वारली. मी लहान असताना म्हणजे नऊ वर्षाचा असताना आमच्या शेजाऱ्यांनी मुलगी माझी बाळ मैत्रीण ! विजया मी आणि ती एकाच शाळेत जायचो ती माझ्याहून सहा महिन्यांनी लहान होती. त्यावेळी आम्ही सरकारी शाळेत होतो त्या शाळेच्या समोर एक बाथरूम होते त्यात काही बायकांनी जाळून घेऊन आत्महत्या केलेल्या होत्या त्यातील काही बाथरुमचे दरवाजे आतून बंद असायचे पण आत कोणी नसायचे. तिथेच कोठेतरी ती झपाटली आणि ती वेड्यासारखी करू लागली दिवसभर उगडी इकडून तिकडे फिरायची काही खायची नाही तिची परिस्थिती इतकी वाईट झाली की तिच्याकडे पाहवत नव्हते. अनेक तांत्रिक मांत्रिकाने दाखविले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी माझे बाबा म्हणाले , एकदा माझ्या मामाकडे घेऊन जाऊ या ! ते काही तांत्रिक मांत्रिक नव्हते तर शिवभक्त होते. त्यांच्या गावी गावी शंकराचे स्वयंभू शंकराचे मंदिर आहे . त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी कांदा लसूनही खायचे सोडले होते ते अखंड शिव भक्तीत रममाण होते त्यांचे दादरला एक शिव मंदिर होते. आम्ही लहान असताना आम्हाला काही त्रास झाला तर ते इबुत द्यायचे ती लावली की आम्ही बरे व्हायचो ! बाबा तिला घेऊन त्यांच्याकडे गेले त्यांनी तिला मंदिरात घेतले आणि मंदिराचे दरवाजे बंद केले तर ती दरवाज्याच्या फटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांनी लगेच शंकरा समोरील इबुत ( अंगारा ) घेऊन तो तिच्या कपाळी लावला आणि तिला घरी घेऊन जायला सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती दुकानात जाऊन बटर विकत घेऊन आली त्या नंतर तिला कधीच कोणती भूत बाधा झाली नाही. पण पुढे जाऊन तिचा भाऊ मात्र मानसिक रुग्ण झाला. त्याला भूत बाधा नव्हती. तो नायर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना जी लोक त्याला भेटायला यायची त्यांची जुनी लपडी म्हणजे अनैतिक संबंध तो सांगायचा ! मी त्याला भेटायला गेलो नाही हे बरं झालं नाहीतर माझी अनेक गुपिते त्याला माहित होती. लग्न झाल्यावर तो सुधारेल या भाबड्या आशेने त्याच्या आईने त्याचे लग्न लावून दिले त्याला अपघाताने एक मुलगी झाली पण त्याला येणारे वेडाचे झटके कमी झाले नाहीत. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली. आमच्या विभागातील एका स्त्रीने नवऱ्याच्या त्रासाला वैतागून रात्री अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली होती त्या रस्त्याने जाताना ती रात्री अपरात्री बऱ्याच लोकांना दिसायची ! आमच्या शेजारच्या घरात एक भैयानी नव्याने राहायला आली होती त्या रस्त्याने जाताना ती झपाटली आणि दुपारच्या वेळी ती अंग झाडू लागली तिला सावरायला आजूबाजूची माणसे गेल्यावर ती मराठी बोलू लागली या विषयाची माहिती असणाऱ्या आमच्या शेजाऱ्याने तिला घट्ट पकडून तू कोण आहेस विचारले असता तिने तिचे नाव घेतले आणि तिला सोडायला काय घेशील विचारले असता मला सुका जवला आणि चपाती हवी अशी ती म्हणाली, त्यावर लगेच एका बाईने जवला आणि चपाती बनवून आणला आणि तिला तो खायला दिला. त्या खाल्ल्यावर तिने तिला सोडले. त्या भैयानीला मराठीचा म ही माहीत नव्हता ती शद्ध मराठी कशी बोलली हे माझ्यासमोर अजूनही कोणतेही विज्ञान सिद्ध करू शकलेले नाहीं. या जगात जश्या चांगल्या गोष्टी आहेत तश्या वाईट गोष्टीही आहेत. अंधार दूर करण्यासाठी जसा प्रकाश लागतो तसच विश्वातील या वाईट शक्तींचा अंधार दूर करण्यासाठी अध्यात्माचा म्हणा अथवा भक्तीचा प्रकाश लागतो.

मला सर्वात जास्त कोणाचा राग येतो तर तो दारू पिणाऱ्यांचा कारण कलियुगात दारूचं आहे जी माणसाला दानव करते. दारूचं आहे जी माणसाला आध्यात्मापासून दूर घेऊन जाते आणि त्याला भौतिक गोष्टींच्या मोहात गुंतवून ठेवते. एका दारुड्याच्या बायकोचे त्याच्याच लहान भावासोबत लपड होत म्हणून तो दारू पिऊन पिऊन मेला आणि तो मेल्यावर त्याचा भाव वेड्यासारखा करायला लागला म्हणून त्याच लग्न लावून दिल तर त्याच्या बायकोच लग्नापूर्वी दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते ज्याच्याशी तिचे प्रेम संबंध होते त्याच्या बायकोचे एका तरुण मुलाशी अनैतिक संबंध होते. या सगळ्यांशी दारूचा संबंध होता. आमचे बाबाच नव्हे तर जे जे दारू प्यायचे त्या सगळ्यांचे जीवन नरक झाले होते. त्यातील जे सावरले त्यांचे आयुष्य घडले. त्यामुळे मी लहानपणीच आयुष्यात कधीही दारूला आणि तिला जवळ करणाऱ्याला जवळ करायचे नाही हे मनाशी पक्के ठरविले होते.

आज आमची बोटे मोबाईलच्या स्क्रीनवर ठोकून ठोकून बोथट झाली आणि कदाचित बुद्धीही ! आज आमचे डोळे आत गेलेत, डोळ्याखाली काळी वर्तुळे आली आहेत. आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा चढला आहे. जेव्हा आयुष्यात मोबाईल, टी. व्ही. नव्हता तेव्हा आयुष्यात किती आंनद होतो. बालपण तर विचारायलाच नको ! तेव्हा आम्ही शाळेत जायचो शाळेतून आल्यावर एखादा तास अभ्यास करायचो आणि अंधार पडेपर्यत मातीत खेळायचो ! वीज आल्यावर तर रात्रीही कबड्डी खेळायचो ! पतंगीला कंदील बांधून उडवायचो. तेव्हा आमच्या खेळण्याची साधने फार विचित्र होती आता ती सारी स्वप्नवत आहेत. असमच्या लहानपणी आम्ही माचीसचे पत्ते खेळायचो म्हणजे तेव्हा माचीसचा बॉक्स फाडून त्याचे दोन वेगवेगळी चित्र असलेले पत्ते तयार व्हायचे एकाने पत्ता टाकला त्यावर दुसऱ्याने तो पत्ता टाकला तर ती दोन्ही पत्ते त्याचे मी खेळायचे बंद केले तेंव्हा माझ्याकडे दोन हजार पत्ते होते. त्या पत्त्यावरून आठवलं ते पत्ते मिळविण्यासाठी आम्ही अक्षरशः आमच्या झोपडपट्टीची कचरा टाकण्याची जी जागा होती तिथे ते पत्ते शोधायला जातो अक्षरशः कचरा वेचणाऱ्या मुलांसारखे माझी एक दूरची जवळ राहणारी मावशी होती. तिने आमच्या पडत्या काळात आम्हाला वेळोवेळी मदत केली होती. तिची मुलगी माझी मैत्रीण होती म्हणजे ती माझ्याहून पाच तीन वर्षांनी लहान होती मी हुशार असल्यामुळे तिचा अभ्यास घेत असे मी तिला नेहमी चित्र काढून देत असे निबंध भाषणे लिहून देत असे त्यात तिला बक्षिसेही मिळत पुढे ती कराटेत ब्लॅक बेल्ट झाली. आजही ती कराटे क्लास चालवते त्यासोबत माझी मावशी आणि आता तीही राजकारणात सक्रिय झाले आहेत. आमच्या सोसायटीत चित्रकार म्हणून मी प्रसिद्ध होतो कारण शाळा सोडल्या नंतरही चार पाच वर्षे मी आजूबाजूच्या मुलांना रात्री बारा - बारा वाजेपर्यत जागून चित्रे काढून देत असे. माझ्या दडलेला चित्रकार आणि चावटपणा यांचे मिश्रण झाल्यावर मी एका अर्ध नग्न स्त्रीचे चित्र रेखाटले आणि रंगविलेही ! तेव्हा मी आता सारखा आधुनिक विचाराचा नव्हतो नाहीतर नक्कीच मित्रांना दाखविले असते पण नंतर ते ठेवायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला आणि मी हृदयावर दगड ठेऊन ते चित्र फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकले.

तो कचऱ्याचा डबा त्या कचऱ्याच्या ढिगावर मोकळा झाला आणि नेमक्या त्या ढिगात ती माचीसचे पत्ते शोधायला गेली तिला ते चित्राचे तुकडे भेटले तिने ते जोडले नशीब आता मी प्रत्येक कवितेखाली न चुकता माझे नाव लिहितो तसे चित्राखाली लिहीत नव्हतो. मी बरा चित्रकार होतो म्हणूनच माझ्या शेजारणीने मी रेखाटलेला साईबाबा पूजेला लावला होता. ते जोडलेले चित्र ती तडक ती माझ्याकडे घेऊन आली आणि मला विचारलं हे चित्र तूच काढलं होतंस ना ? आता मी कसं हा म्हणणार होतो. मी आत्मविश्वासाने खोटं बोललो ते मला आजही जमत ते तिला खरं वाटलं असावं असं मला तेंव्हा वाटलं होतं पण आज माझ्यातील माणसे वाचणारा लेखक मला हे खात्रीने सांगतोय की तिला शंभर टक्के खात्री होती ते चित्र मीच काढलं होतं त्यांनतर तसा प्रयोग मी कधी केला नाही म्हणण्यापेक्षा त्यानंतर माझ्यातील चित्रकार हळूहळू मेला म्हणजे मी तो मारला. एक वेळ होती रंग विकत घ्यायला पैसे नव्हते एका वेळेला समोर कागदाचा ठीक होता रंगाचा पसारा होता पण माझ्यात चित्रकार राहिला नव्हता हल्लीच माझ्या पुतनीसाठी एक चित्र काढण्याचा प्रयत्न केला होता चित्र काढलेही पण ती मजा आली नाही . आता चित्र काढायला पूर्वी सारखा सराईतपणे हात वळत नाही. एक वेळ होती जेंव्हा मी चित्रकार होण्याची स्वप्ने पहिली होती. अशाच गप्पा मारताना माझ्या त्याच मावशीने मला विचारले होते निलेश तू मोठा होऊन कोण होणार आणि तेव्हा माझ्या तोंडून नकळत बाहेर पडून गेलं होतं " लेखक " माझ्या तोंडून अचानक माझ्याही नकळत बाहेर पडतात ती खरी होण्याची सुरुवात तेव्हाच झाली होती. पुढे तो अनुभव माझ्या संपर्कातील अनेकांना आला. मी निबंध उत्तम लिहायचो पण तेव्हा माझं अवांतर वाचन फार नव्हतं. कवितेचीही मला विशेष गोडी नव्हती. त्यावेळी माझ्यावर इंग्रजीचे भूत होते म्हणजे किरणांच्या पुड्या बांधून आलेल्या इंग्रजी पेपरवर जे काही लिहिलेले असायचे ते मी वाचून काढायचो मी कमवायला लागल्यावर जर कोणते पुस्तक विकत घेण्याचा माझ्या मनात विचार आला असेल तर ते इंग्लिश स्पिकिंग कोर्सचे ! आता मी इंग्रजी वाचत नाही त्यामुळे आयत्या वेळी मला इंग्रजीचे बरेचसे शब्द आठवत नाहीत नाहीतर पूर्वी मी मराठी बोलताना एक शब्द मराठी आणि एक इंग्रजी असायचा ! त्यावरून एकदा एक विनोद झाला होता. मी माझ्या अशिक्षित आईलाही कधी कधी मॉम बोलवत असे एकदा आमच्या घरी एक अशिक्षित बाई बसली होती नेमका तेव्हा मी बाहेरून आलो आणि आईला म्हणालो, मॉम मला जरा पाणी दे ! लगेच त्या बाईचे कान आणि डोळे मोठे झाले. तिने नक्कीच मी आईला मॉम बोलतो हे गावभर सांगितले असेल त्यानंतर ते बंद झालं. माझ्या शाळेत माझी अत्यंत हुशार, साधा - भोळा आणि सभ्य अशी प्रतिमा होती पण प्रत्यक्षात मी जमदग्नी होतो. कित्येकदा तर मी माझ्याहून वयाने मोठ्या असणाऱ्या मुलांशीही मारामारी केली होती. पण पुढे ते माझे मित्र झाले. माझ्याशी शत्रुत्व करणं कोणालाही परवडत नाही. माझ्या शत्रूंचा माझ्यापुढे टिकाव लागत नाही. एक वेळ येतेच जेव्हा माझ्या शत्रूंना माझ्या पायाशी यावे लागते. पत्ते हा आमच्या खेळाचा भाग होता. म्हणजे अक्षरशः आम्ही झुगार खेळायचो असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. शाळेतून आल्यावर दुपारी तेव्हा आमची आई कामाला जायची तर कधी आमच्या घरात तर कधी जेथे सावली असेल तेथे आम्ही गोट्या सोडा बोटलचे बिल्ले लावून तीन पत्ता खेळायचो ! बऱ्याचदा त्यात मी जिंकायचो ! गणपतीत आमच्या सोसायटीत तेव्हा फक्त माझ्या मित्राकडे गणपती यायचा ! आम्ही बामणे मराठा असूनही संपूर्ण कोकणात फक्त आमच्याकडेच गणपती येत नसावा. एकाने आणला पण पुढे त्याला काही त्रास झाल्यावर बंद केला आमच्या आईकडे ती सुर्वे खानदानी मराठा त्यांच्याकडे गणपती येतो पण माझ्या आयुष्यात मी एकदाही कोकणातील गणपतीला उपस्थित नव्हतो. तर तेव्हा तो गणपती आम्ही सात दिवस जगवायचो ! जोडपत्ता आणि मेंडीकोट खेळून जोडपत्ता २५ पैशाचा डाव असायचा आणि मेंदीकोट वर प

आणि मेंडीकोट खेळताना पार्ले बिस्कीटचे पुडे डावावर असायचे. डाव संपला की चहा बिस्किटची पार्टी व्हायची ! आता योगायोगाने टॉवरमध्येही माझा तो मित्र आमच्याच शेजारच्या घरात राहायला आला. मी जेथे वास्तव्यात असतो तिथे जवळ देऊळ असतेच आमच्या घराजवळ संतोषी मातेचे मंदिर होते. मधल्या काळात जिथे भाड्याने राहायला गेलेलो तेथे शंकराचे मंदीर होते. आता आमच्या इमारती जवळ गणपतीचे मंदीर आहे. पण माझा गावच्या घराजवळ मंदीर नाही म्हणूनच कदाचित मी आमच्या गावातील घरात फार वास्तव्यास राहू शकलो नाही मी ज्या इंडस्ट्रीत कमला जातो त्याच्या बाहेरही शंकराचे आणि हनुमानाचे मंदीर आहे . मी जिथे शिकवू पत्रकार म्हणून ज्या साप्ताहिकात होतो त्या वर्तमानपत्राचे कार्यालयच कोडीयार मातेच्या मंदिरात होते. तसे असले तरी मी नेहमीच निर्गुण निराकार देवाचा भक्त होतो आणि आहे. आमच्या गावी टेकडीवर एक स्वयंभू शिवपिंड असलेलं मंदीर आहे. मला नेहमीच त्या मंदिराचं विशेष आकर्षण वाटतं ! का ? हे कोडे अजूनही उलगडत नाही. मला धार्मिक गोष्टीचे लहानपणापासून विशेष आकर्षण होते. माझ्या हाती कोणतेही धार्मिक पुस्तक अपघाताने हातात आल्यास ते मी एका झटक्यातच वाचून काढतो त्यात स्वामी विवेकानंद यांचे "कर्मयोग " हे विशेष पुस्तक आहे जे मला विशेष आवडायचे. रामायण महाभारत ते तर जवळ जवळ तोंडपाठ आहे. मला आश्चर्य वाटते की आजचे बरेच कीर्तनकार कित्येक पौराणिक कथांचे चुकीचे संदर्भ देतात. आणि लोकं टाळ्या वाजवतात त्याला कारण त्यांचे अज्ञान बहुसंख्य कीर्तकार वारंवार वांझोट्या बाईचा उल्लेख करताना दिसतात ते मला खूप खटकत. वांझोटी असणं हा काही गुन्हा नाही आणि जर तिच्या वांझोटीपणाला नवरा कारणीभूत असेल तर त्यावर भाष्य करीत नाहीत. मुलांचं सुख हे ही भौतिक सुख आहे. खरं अध्यात्म तेच आहे जे तुम्हाला सर्व भौतिक सुखांचा त्याग करायला शिकविते.

आता म्हणजे कोरोना संकट येण्यापूर्वीच मी ज्योतिष शास्त्राचा ऑनलाईन अभ्यास केला. खरं तर माझा हा अभ्यास फार पूर्वीच सुरू झाला होता पण मला दिशा सापडत नव्हती. डॉ.ज्योती जोशी यांच्याकडून मी ज्योतिष शास्त्राचे धडे घेतले. तीन परीक्षाही पास झालो . पण मला व्यक्तीशः ज्योतिषी होण्यात रस नव्हता पण आपल्याला अनेक गूढ शास्त्रांपैकी एक असणाऱ्या ज्योतिष शास्त्राचे जुजबी ज्ञान असावे ही अपेक्षा होती. आमच्या गुरू डॉ. ज्योती ज्योशी यांनी ज्योतिष शास्त्र शिकविण्याची सुरुवातच या वाक्याने केली होती की भविष्य कोणालाही बदलता येत नाही. मलाही असे वाटते की ज्योतिष शास्त्र हा भविष्य दाखविणारा फक्त एक आरसा आहे. ज्योतिष शास्त्राचा पसारा इतका मोठा आहे की तो अजूनही मनुष्याच्या आवाक्याबाहेरचा आहे म्हणूनच अजूनही मोठ्यात मोठ्या ज्योतिष्याला सर्वांचेच अचूक भविष्य कथन करणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्यानी त्या शास्त्रावर डोळसपणे विश्वास ठेवायला हवा ! कोणीतरी सांगतोय म्हणून त्यावर आंधळा विश्वास ठेवू नये. कोणालाच कोणाचे भविष्य बदलता येत नाही. स्वतः ईश्वरही तुमच्या भविष्यात ढवळाढवळ करत नाही. त्यामुळे भविष्य बदलण्याचा प्रयत्न हा मूर्खपणा ठरतो. तुमचं भविष्य ही एक पूर्वनियोजित गोष्ट असते जसे की वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर एका सिडीत जसा एखादा चित्रपट साठवलेला असतो. माझ्या आईवडिलांनी साधारणतः १२ वर्षांपूर्वी माझ्या लग्नासाठी माझी जन्मपत्रिका बनवून घेतली होती. ती पत्रिका हाताने तयार केलेली होती मी ज्योतिष शस्त्राचा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले त्या पत्रिकेत एक अतिशय महत्वाचा ग्रह म्हणजे लग्नेशच चुकीच्या घरात मांडला होता. माझे लग्न जुळत नाही म्हणून अनेक भटजींनी ती पत्रिका पहिली असेल पण एकही भटजीच्या मनात ती पत्रिका बरोबर आहे का हे तपासून पाहावे असे वाटले नाही. तीन चार वर्षांपूर्वी आमच्या गावच्या भटजींने तीच चूक केली. साधारणतः माझ्या पत्रिकेतील तूळ ही रसिक रास पाहून माझ्या वडिलांना विचारले तुमच्या मुलाचे कोठे बाहेर लपडे आहे का ? म्हणजे मी दिसायला बरा आहे इतका की कोणी माझ्या प्रेमात पडू शकते म्हणून असेल पण ते ठामपणे म्हणाले नाहीत की तुमचा मुलगा स्त्रीलंपट आहे. याचा अर्थ ते ठामपणे सांगावे इतकेही त्यांना ज्योतिष शास्त्राचे ज्ञान नव्हते. मग काय ? ही शांती करा आणि ती शांती करा ! जे ग्रह करोडो लोकांचं भविष्य ठरवितात ते कोणी एका तुच्छ माणसाने शांती केली म्हणून आपल्या कार्यात बदल करणार आहेत का ? तर नाही. माझे लग्न होत नाही असे माझ्या जवळच्या व्यक्तींना वाटते पण वास्तव हे आहे की मलाच लग्न करायचे नाही आणि केले तर ते कोणत्या परिस्थितीत करायचे हे माझे अगोदरच ठरले होते. मी ब्रम्हदेव जरी वरून खाली आले आणि त्यांनी जरी मला माझे विचार बदलायला सांगितले तरी मी ते बदलत नाही त्यामुळेच मोठं मोठे विद्वानही याच्याशी वाद घालून काही उपयोग होणार नाही म्हणत माझा नाद सोडून देतात. मुळात आपल्या धर्मात लग्न केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही ह

लग्न केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हा फालतू विचार नंतर कोणी तरी स्वार्थापोटी घुसडलेला आहे माझ्या जे वाचनात आले त्याप्रमाणे पूर्वीच्या ऋषींचे असे मत होते की प्रत्येक पुरुषाने लग्न करण्याची गरज नाही. खरं तर खूप भडजी कित्येकांना एक प्रश्न नेहमी विचारतात तुमच्या घरात कोणी बिनलग्नाचा वारला होता का कोणी निरवंशी होऊन वारला होता का ? असा कोणी ना कोणी प्रत्येक घराण्यात असतोच ! त्या अविवाहित आणि निरवंशी लोकांना विनाकारण बदनाम केले जाते आणि त्यांच्या नावाने शांती करून पैसे उखळले जातात. मागच्या पिढीने पाप कर्म करून कमावलेला पैसा जर पुढच्या पिढीकडे आला असेल त्या सोबत काही दोषही येतात. कारण पापाच्या पैशाचे तुम्ही भागीदार होता तसे पापाचेही भागीदार होता यालाच कदाचित ज्योतिष शास्त्रात पितृदोष म्हणत असावेत. पितृदोषा बाबत असे म्हटले जाते की तो एकाच्या कुंडलीत जरी असेल तर त्याच्या घराण्यातील सर्वांच्या कुंडलीत असतो. माझ्या पत्रिकेत मंगळ दोष आहे. त्यामुळेच कदाचित माझ्या आयुष्यात डझनभर तरुणी येऊनही माझा विवाह झाला नाही. असं ही म्हणता येईल की त्यातील एकही मला तिच्यात फार गुंतवून ठेऊ शकली नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा लेखक होण्याचा कोणताच विचार माझ्या मनात नसताना मावशीने विचारल्यावर मी असं कसं म्हणून गेलो की मला लेखक व्हायचे आहे त्याचे उत्तर मला माझ्या जन्म कुंडलीत सापडले माझ्या सप्तमात व्ययेश बुध आहे त्यामुळेच माझ्या शब्दांना तलावारीसारखी धार आहे. माझ्या शब्दांनी खूप लोक घायाळ होतात. म्हणूनच मी मौनव्रत धारण करतो ! मला मौन पाहून बोलायला सांगणे हा कित्येकांचा गाढवपणा ठरतो कारण मी नेहमी सत्याचीच बाजू घेतो. माझे बोलणे खोडून काढणे भल्या भल्याना शक्य होत नाही. खूप बारीक बारीक गोष्टींचे माझे निरीक्षण सुरू असते त्यामुळे वेळ पडल्यावर मी कोणाचीही पिसे काढतो. त्यामुळे शहाणी लोक शक्यतो माझ्यापासून लांबच राहतात. माझ्या लग्नात हर्षल आणि चंद्र आहे त्यामुळेच माझ्यात अचाट कल्पनाशक्ती आणि संशोधक वृत्ती निर्माण झाली आहे त्यामुळेच मी कथा लेखक झालो. हर्षल मुळेच माझा स्वभाव किंचित विक्षिप्त आणि रागीट झाला आहे. मला अन्याय सहन होत नाही मग तो कोणी कोणावर का करत असे ना ! मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले खूप प्रयत्न करूनही मला माझे शिक्षण पूर्ण करता आले नाही. याचा दोष मी माझ्या आई - वडिलांना देतो पण वास्तवात हा दोष माझ्या कुंडलीत पंचम स्थानी असलेल्या केतुचा आहे पण त्याच केतूने मला ज्योतिष शास्त्राचे ज्ञान सहज मिळून दिले माझ्या विवाहात होणाऱ्या विलंबाला हा केतूही मंगला इतकाच कारणीभूत आहे. माझा जन्म राहूच्या महादशेत झाला होता म्हणूनच त्या काळात मला त्या काळात माझ्या हाताला यश होतं. माझ्या आयुष्यात बऱ्याच स्त्रिया होत्या. प्रत्येक धंद्यात मला फायदा व्हायचा ! माझी राहूची महादशा संपली आणि गुरुची महादशा सुरू झाली. आणि अचानक माझ्यातील भोगी माणूस अदृश्य झाला. पूर्वी मी रोज मच्छी खायचो ! गुरूच्या महादशेत मी शाकाहारी झालो. कविता , कथा लेख लिहू लागलो माझ्या आयुष्यातून अचानक स्त्रिया निघून जाऊ लागल्या. मी लिहिलेला प्रत्येक शब्द प्रकाशित होऊ लागला याच काळात माझे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले. वर्तमानपत्रात सतत माझे छायाचित्रे छापून येत होती. दिवाळी अंकात प्रत्येक वर्षी माझ्या कथा प्रकाशित होत होत्या. मला मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळत होती. पण पैसा मिळत नव्हता. पण माझ्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या मी माझ्याच मस्तीत मस्त होतो. माझ्या जन्म कुंडलीत कर्म स्थानात म्हणजे चतुर्थ स्थानात कर्केचा म्हणजे उच्चीचा गुरु आहे. त्यामुळेच माझा निवास हा नेहमी मंदिराजवळ असतो. माझे कार्यालय माझ्या घराजवळ आहे. आणि त्यामुळेच मला लहानपणापासून अन्न, वस्त्र आणि निवारा मिळतच आला आणि पुढेही मिळेल. माझा लग्नेश शुक्र षष्ठात आहे त्यामुळेच माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या पण त्यातील एकही टिकली नाही. त्यामुळेच माझे शत्रू माझ्यासमोर टिकाव धरू शकत नाहीत. येथे या शुक्रामुळेच माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाची घटना घडणार आहे. या शुक्रामुळेच आणि द्वितीय स्थानी असलेल्या नेपच्यून मुळेच मी कवी झालो आणि माझ्यात अंतरस्फूर्ती निर्माण होऊन मला भविष्याचे आभास होत असतात. माझ्या सप्तमात रवी मंगळ बुध असल्यामुळे आम्हा तीन भावांचा योग होताच ! माझ्या बहिणीचा जन्म हा माझ्या आयुष्यात घडणाऱ्या एका महत्त्वाच्या घटनेची पायाभरणी होती.


तिथून आणखी एक भाकीत होते पण मी ते येथे स्पष्ट करू शकत नाही. गुरुची महादशा संपल्यावर शनीची महादशा सुरू झाली खरं तर शनी मला भाग्यकारक ग्रह पण ! एखाद्या ग्रहाच्या महादशेत त्याच ग्रहाची अंतर्दशा अशुभ असते. माझी शनीची साडेसातीही सुरू होती. साडेसाती सुरू झाली आणि मी हातातील काम सोडून बसलो. मला खुप पायपीठ करूनही यश मिळत नव्हते. जिथे जिथे पैसे गुंतवले तिथे तिथे नुकसान झाले. जी माणसे वेळेला उपयोगी पडतील असे वाटले होते ती प्रत्यक्षात उपयोगी पडली नाहीत. भाड्याच्या घरात राहावे लागले. अक्कल शून्य लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागली. प्रतिष्ठा कमी झाली.मान सन्मान कमी झाला. याच काळात लिखाण सोडून देण्याचे विचार मनात बळावू लागले. जगाचा खरा रंग दिसला. नंतर केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळाला नाही. साडेसतीची शेवटची अडीच वर्षे तर खूपच कष्टात गेली. पण अन्न वस्त्र निवारा यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण माझ्या कुटूंबाची आर्थिक स्थिती उत्तम होती. या काळात माझे माझ्या तब्बेतिकडेच नव्हे तर दिसण्याकडेही दुर्लक्ष झाले त्याच काळात मी त्वचाविकारानेही ग्रासलो माझा गोरा चेहरा काळा पडला. मी वैराग्यासारखा वागू बोलू लागलो. आणि जेंव्हा साडेसाती संपली तेव्हा हक्काच्या घरात राहायला गेलो. मी स्वतःबद्दल नवीन विचार करायला लागलो.मी जुन्याच कामावर रुजू झालो आता माझा आर्थिक प्रश्न सुटला. मी पुन्हा लिहायला लागलो. लिखाणाला यश मिळू लागलं ! माझा काळवंटलेला चेहरा गोरा झाला ! त्या काळात मला भेटलेली लोक विचारतात तू इतका गोरा कसा झालास तेव्हा मला हसू येत.त्या साडेसातीत मी माणूस म्हणून अधिक समृद्ध झालो होतो. जीवनातील नश्वरता लक्षात आली. आणि आयुष्यातील सर्वात मोठा मंत्र मला मिळाला होता. तो म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा कारण पुढचा जन्म मिळेल पण तो या जन्मापेक्षा वेगळा असेल. या जगात ज्याचं दुःख करत बसावं असं कारण अस्तित्वात नाही. आणि आत्महत्या करण्याला काही कारणच नाही. आत्महत्या करण्यापेक्षा जगासाठी आपण मेलोय असे समजून जीवन जगायला सुरुवात केल्यास अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे सापडतात...मी माझ्या लहानपणी नास्तिक होतो. आजही मी आस्तिक असल्यासारखा वागत नाही म्हणजे मी कधीच कोणाकडे सत्यनारायणाच्या पूजेला जात नाही, भांडाऱ्यात जेवत नाही, घरातील देवांची पूजा करत नाही, कधीही परीक्षेला जाताना देवाच्या पाया पडून गेलो नव्हतो, मला नेहमी वाटायचं की मी माझ्या बुद्धीच्या जोरावर खूप कष्ट करून मी मोठा माणूस होईन, माझे भाग्य मी घडवेन पण मी माझं भाग्य घडवू शकलो नाही म्हणून भावंडांचं भाग्य घडविण्याचा अट्टहास केला. पण सारी मेहनत वाया गेली ते त्यांच्या नशिबाच्या वाटेनेच गेले. मी माझं नशीब बदलाचा अट्टहास करून पाहिला पण त्यात मला यश आलं नाही कारण माझ्या यशस्वी होण्याची वेळ आता येणार होती...

मी पहिलीत जेव्हा गोरेगाव पूर्वेच्या पहाडी शाळेत होतो. तेव्हा आता सारखी गोरेगाव स्टेशनवरून संतोष नगरला यायला बस सेवा होती पण बसने येण्यापेक्षा आम्ही आरे मधुन चालत यायचो तेव्हा आरेत आता पेक्षा जास्त हिरवळ होती. आणि भर उन्हातही अरेच्या रस्त्याला गार हवा असायची आजही आहे पण आता गाड्या खूपच जास्त असतात . आरे रोडच्या आजूबाजूला तेंव्हा शेतीही व्हायची आमच्या संतोष नगरला तर बैलाने शेती नांगरताना मी बऱ्याचदा पाहिले आहे. तर तेव्हा त्या रस्त्यातील शेतात बुजगावणे म्हणून एक बाईचा सुंदर पुतळा उभा केला होता मी तो पुतळा रोज चालताना पायचो पण काही महिन्यांनी तो पुतळा दिसेनासा झाला. मी रस्त्याने चलताना मी रोज त्या जागेवर आलो की त्या बाईची आठवण यायची त्या पुतल्यातील स्त्रीच रूप खूपच आकर्षक होतं. त्यावेळी मला एक प्रश्न सारखा सतावत होता ती स्त्री कोठे अदृश्य झाली. पुढे माझी शाळा बदलली आणि मी त्या बाईला विसरलो पण तरीही कधीकधी ती बाई मला आठवायची ! आणि मी अस्वस्थ व्हायचो. आरे गार्डन म्हणजे छोटा काश्मीर आमच्या घरापासून चालत दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर मे महिन्यात तर आम्ही तेथे दुपारी झोपायला जायचो दहावीचा अभ्यास मी त्याच गार्डन मध्ये केला. प्रेमी युगलांकडे पहात. दहावी वरून आठवलं दहावीत असताना आमच्या वर्गातील पाच सहा मुलं - मुली एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एकदा असाच प्रकार घडला होता आमच्या दहावीच्या वर्गाच्या रिझल्टवर शाळेची सरकारी ग्रँड ठरणार होती त्यामुळे आमच्या वर्गावर मुख्याध्यापकांचेही विशेष लक्ष होते. इतकेच नव्हे तर आमचा वर्ग स्टाफ रूमला लागूनच ठेवला होता आणि मध्ये दोन खिडक्या होत्या कोणीही शिक्षक जराही शंका आली की खिडकी उघडून डोकावून पाहात. सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यत आम्ही शाळेतच गाडलेले असायचो त्यात या काही मुला मुलींच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण शिक्षकांना लागली कुणकुण म्हणजे ते कोण विद्यार्थी आहेत यांची शिक्षकांना पक्की खात्री होती. एक दिवस अचानक दोन तीन सर मॅडम वर्गात आले आणि त्यांनी मुला मुलींचे हात खांद्यापर्यत तपासले ज्या मुला- मुलींच्या हातावर पेनाने इंग्रजी अक्षरे कोरलेले नावे लिहिलेली भेटली त्या सर्वांना स्टाफ रूममध्ये नेवून धुतला. कोणाच्या पालकांना बोलावले नाही हे नशीब पण तरीही त्यांची प्रेमाची आग काही निवाली नव्हती. शाळेच्या गच्चीत वर्गाच्या मागे अभ्यास करण्याच्या नावाखाली हातात हात घेऊन बसायचे. दहावी झाल्यावर त्यातील बऱ्याच मुलींची लग्ने झाली. त्यात काही हुशार मुलीही होत्या त्यांच्या भविष्याची राख रांगोळी झाली. त्यातील एकाही मुला- मुलीची

प्रेमकथा यशस्वी झाली नाही. आता त्या मुली म्हाताऱ्या झाल्यासारख्या दितात. मला वाटतं त्या शरीराने नाही तर मनाने म्हाताऱ्या झाल्या आहेत. काही परिस्थितीमुळे म्हाताऱ्या झाल्या आहेत. दखल घेण्याजोगे आयुष्य एकीचेही घडले नाही. पण माझ्या वर्गातील बरीच मुले पुढे राजकारणात सक्रीय झाली. बाकी कलेच्या क्षेत्रात कोणी मोठा झाला नाही त्यातल्या त्यात मी लेखक झालो !पण मी लेखक होईन असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मी अविवाहित का राहिलो हे कोडे त्यांना उलगडत नाही. कारण ते मला जसा ओळखत होते तसा मी नव्हतो. शिक्षण संपल्यावरही नीलम मला भेटायची कधी कधी बसमध्ये मग आम्ही एकाच सीटवर बसून गप्पा मारत प्रवास करायचो ! पण मला तिच्या सोबत पाहून माझ्यावर लाईन मारणाऱ्या मुली खूप जलायच्या. पण एकदा निलमने माझा पोपट केला होता. आम्ही असेच बसमध्ये एकाच सीटवर बसून प्रवास करत होतो ती खिडकीवर बसली होती आमच्या पुढे मागे मला ओळखणाऱ्या तरुणी बसल्या होत्या . तेव्हा नीलम कोणत्यातरी ट्रॅव्हल्लिंग कँपणीत कामाला होती. तशी नीलम भयंकर शिस्तप्रिय मला हातातील कागदावर लिहिण्याची सवय म्हणजे कविता वगैरे पण चुकलं की तो कागद खिडकीतून बाहेर फेकायचा ! आम्ही नेहमी सारख्या गप्पा मारत होतो मी हातात असणारा कागद चुरगळला तो पाहून नीलम म्हणाली, कागद बाहेर फेकू नको हा ! आणि स्वच्छतेवर लेक्चर देऊ लागली त्यावर पुढच्या मागच्या मुली हसायला लागल्या मी ही शेवटी लेखक प्रसंगावधान राखत मी म्हणालो, मी कागद बाहेर टाकताच नाही खिशात ठेवतो आणि खाली उतरल्यावर कचराकुंडीत टाकतो. तिला काय माहीत माझ्या या सवयीमुळे मी माझी तिकीटही चुरगळुन खिडकीच्या बाहेर टाकली आहे आणि उतरल्यावर दंड भरला आहे. पण त्यांनतर माझी ती सवय मोडली ती कायमचीच !


Rate this content
Log in