Nilesh Bamne

Romance

3.4  

Nilesh Bamne

Romance

स्वप्न

स्वप्न

5 mins
301


  रविवारचा दिवस होता. आमच्या घरातील खिडकीजवळच्या सोप्यावर बसून चहा पित-पित मी वर्तमानपत्र वाचत होतो इतक्यात माझी नजर खिडकीतून समोरच्या घरातील दारात उभ्या असणाऱ्या तरूणीवर स्थिरावली आणि क्षणभर मी अचंबितच झालो. एक सारखी दिसणारी सात मानसे या जागात असतात यावर त्या दिवशी पहिल्यांदा माझा विश्वास बसला आणि हृदयात कोणत्यातरी कप्प्यात दडवलेली प्रतिभाची प्रतिमा पुन्हा डोळ्यायासमोर उभी राहिली. आता प्रतिभा दोन गोंडस मुलांची आई झाली असली तरी आजही तिचं हसणं, तिचा निरागसपणा, तिचा साधा – भोळा स्वभाव आणि मनमोकळा बोलणं नुसत आठवल तरी माझं मन कासाविस होत. माझ्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या पण मला वाटत प्रतिभा एकमेव होती जीच माझ्यावर मनापासून प्रेम होत. तिचं माझ्यावरील प्रेम माझ्या घरच्यांपासूनही लपलेल नव्हत. मला वाटत मी तिच्या स्वप्नातील राजकुमार होतो पण ती माझ्या स्वप्नातील परी मात्र कधीच नव्हती. ती फक्त माझ्यावर प्रेम करीत राहिली पण तिने माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा कधीच केली नाही. आजही ती मला भेटली की माझ्या जवळ तितक्याच प्रेमाने बोलते. तिच्या डोळ्यात मला कोठेही मी तिच्या प्रेमाचा स्वीकार न केल्या बद्दलचा राग दिसत नाही. पण इतरही काही आहेत ज्यांच माझ्यावर प्रेम होत पण मी त्यांच प्रेम नाकारल होत त्यांच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा राग दिसतो. माझ्यावर मनापासून प्रेम करणारी प्रतिभा एकमेव होती याची मला आज खात्री पटलेली आहे. तिने आमच्यातील प्रेमाच्या नात्याचा नाही म्हणता येणार पण मैत्रिच्या नात्याचा नेहमीच आदर राखला आणि आजही राखत आहे. तिच्यामुळेच आपल्यावरही कोणीतरी जीवापाड प्रेम करीत होत हे माहीत असणं हे ही पुरेस आहे माझ्यासाठी एकाकी जीवन जगण्यास बळ मिळायला.

    तिच माझ्यावर प्रेम आहे की नाही हे पाहण्यासाठी मी माझ्या स्वभावा विरूद्ध जाऊन नाही म्हणता येणार पण माझा जो स्वभाव जगाला माहीत नाही असा धाडसी स्वभाव अवलंबला होता. एकदा मी माझी बहीण, तिचा भाऊ आणि आमचे इतर मित्र एका हॉटेलात गेलो होतो थंडा प्यायला, तेंव्हा माझी आणि प्रतिभाची नुकतीच ओळख झाली होती. तिला कोणता थंडा आवडतो हे मी चक्क तिला तिच्या हातावर हात ठेऊन विचारलं बर विचारल्यावर हात लागेच उचललाही नाही मला वाटल होत ती हात हालवेल पण तिनेही हात अजिबात हालवला नाही. कदाचित तेंव्हाच आमचं अव्यक्त प्रेम व्यक्त झालं होत. त्यानंतर आंम्ही जेंव्हा जेंव्हा भेटलो तेंव्हा तिच्या बोलण्यातून मला तिच माझ्यावरील प्रेम जाणवायचं. मी सोडून इतर सर्वांनाच ती माझ्यासाठी योग्य वाटत होती. पण तिच्यापूर्वी अनेकींच्या प्रेमात पडलेल्या मला ती फारकाळ तिच्या प्रेमाच्या मोहपाशात गुंतवून ठेवू शकणार नव्हती हे सत्य तिला जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा तिने मला जाब विचारला नाही तर लग्न करून मोकळी झाली.

     मला वाटत तिला मला कायमचं गमवायचं नव्हतं. माझ्या हृदयातील तिची जागा तिला तशीच अबादीत ठेवायची होती आणि मी समोर आल्यावर माझ्याकडे पाहात प्रेमाने हसायचं होत. तेंव्हा आता सारखे मोबाईल नव्हते नाहीतर आमच्याही रात्रीचे दिवस झाले असते, एखादया बेसावध क्षणी तिने माझ्यावरील प्रेम माझ्याजवळ व्यक्त केलं असत तर कदाचित मी तिला नकार देऊ शकलो नसतो.तिचा गोरा हात त्या हातावर मेहंदी काढण्यासाठी मी कित्येकदा हातात घेतला होता माझ्याशी गप्पा मारताना माझ्या कानावर पडणारा तिचा गोड आवाज आजही माझ्या कानात घुमतो.

         आज त्या समोरच्या दारात प्रतिभाचं प्रतिबिंब पाहून मी अचंबित झालो होतो. माझ्या हृदयावरील खपल्या पुन्हा बाजुला झाल्या होत्या आणि प्रेमाच्या जखमा ओल्या झाल्या होत्या. त्या मुलीला कळत नव्हत की मी असा डोळे फाडून तिच्याकडे का पाहातोय. खरं म्हणजे ते मलाही कळत नव्हत. प्रतिभा कोकणातील आणि ती मुलगी पुण्यातील होती. दोघींच दिसण जरी सारखं असल तरी दोघींच्या रंगात मात्र अंतर होत प्रतिभा पिठासारखी गोरी होती आणि ती तरुणी सावली होती. दोघी दिसायला तर सारख्या होत्या पण दोघींचा आवाजही हुबेहुब सारखा होता याच मला व्यक्तीश : कमालीच आश्चर्य वाटत होत. माझ्या आयुष्यात ज्या तरुणी येऊन गेल्या आहेत त्यांच्या व्यतीरिक्त इतर कोणाच्याही आठवणीत मी हल्ली रमत नाही. प्रतिभा आणि त्या तरुणीत आणखीनही काही गोष्टी समान होत्या. प्रतिभा आणि माझ्या वयात फार अंतर नव्हत पण त्या तरुणीच्या आणि माझ्या वयात बरच अंतर होत इतक की ते ओलांडण शक्य नव्हत कोणत्याच अर्थान ! तरीही कुतुहल म्हणून मी जवळ- जवळ दहा – बारा दिवस त्या तरुणीला पाहात राहिलो माझ्या डोळ्यांवर प्रतिभाच्या प्रतिमेचा चष्मा चढवून. प्रतिभा जशी पाहिल्याच नजरेत माझ्या प्रेमात पडली होती तशी ही तरुणी पडली असेल का ? हा प्रश्न मला सतावत होता. का कोणास जाणे मला तिच्या नजरेतही माझ्यासाठी असंख्य प्रश्न दिसत होते. प्रतिभा ला मला मिळविणे सहज शक्य होते पण या तरूणीसाठी माझ्याशी बोलणंही अशक्य होत.

     माझं कोणाच्या प्रेमात वैगरे पडणं कधीच थांबल होत. आज तर सुंदर तरुणींच्या चेहऱ्या पेक्षा त्यामागे टडलेल्या भाव –भावना जाणून घेण्यात मला अधिक रस असतो. माझ्या मनात न राहून विचार येत होता आता जर मला प्रतिभा भेटली तर मी तिला म्हणेन चल तुला तुझं प्रतिबिंब दाखवतो. मला नराहून स्वत:ला त्या तरुणीसमोर उलगडून ठेवाव असं वाटत होत पण मी स्वत:ला सावरल. प्रतिभालाही मला ओळखण कधी जमल नव्हत कारण तिला कधी त्याची गरजच वाटली नव्हती म्हणा ! अथवा तिची तितकी बौधिक क्षमताच नव्हती. माझ्यावरील तिच्या

प्रेमाचा मी गैरफायदा घेऊ शकलो असतो पण तो माझा स्वभाव नव्हता. मी आजही कित्येकींच्या हृदयावर राज्य करीत होतो. ती तरुणी दारात रांगोळी काढत असताना आपणही आपल्या दारात रांगोळी काढून तिच लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावं अस माझ्यात दडलेला चित्रकार सारखा मला उसळी मारून सांगत होता पण मी स्वत:ला सावरल. त्या घरात मी नव्याने राहायला आल्यामुळे तिथे कोणालाच माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. ती व्हावी अशी माझी इच्छाही नव्हती. कारण माझी ओळख हे एकच निमित्त पुरेस होत कोणालाही माझ्याशी ओळख नसतानाही बोलायला. मी एक घमेंडी आणि माणूसघाण्या व्यक्ती आहे हे इतरांच्या नजरेत पाहायला का कोणास जाणे मला हल्ली खूप आवडते.

     त्या तरुणीच्या नजरेतही माझी प्रतिमा स्त्री - लंपट अशी झाली असावी. आता जेंव्हा जेंव्हा ती माझ्या समोर येते तिच्याकडे पाहण्याचा मोह मला टाळता येत नाही. ज्या- ज्या गोष्टींमुळे मी प्रतिभापासून दूर राहिलो त्या सर्व गोष्टी हिच्याकडे होत्या पण प्रतिभाच्या डोळयात माझ्याबद्दल जे प्रेम होते ते प्रेम मला तिच्या डोळ्यात कधीच दिसणार नव्हते. प्रतिभा आणि तिच्या रंगातील अंतर माझ्यासाठी अतंर नव्हतच मुळी पण मी जेंव्हा प्रतिभाच्या प्रेमात पडलो होतो तो मी आणि आताचा मी यात खूप अंतर आहे आताचा मी कदाचित आता प्रतिभालाही आवडणार नाही. प्रतिभाला पाहिल्यावर मी पूर्वी उत्साही व्हायचो तसा आता होत नाही. मला वाटत माझ्या हृदयातील भावनाच गोठल्या होत्या ज्यांना ह्या तरूणीने नकळत उब दिली ज्यामुळे माझ्या मनात नवीन प्रेमाचे अंकूर फुटू लागले. त्याला आणखी एक कारण होत प्रतिभा अशिक्षित होती आणि ही तरूणी उच्चशिक्षित होती. प्रतिभाच अशिक्षित असणं हे एकमेव कारण होत मी तिच्या प्रेमाचा स्वीकार न करण्याला कारण माझी आई अशिक्षित होती. तिच्या अशिक्षित असण्याची किंमत मी मोजली होती, ती जर सुशिक्षित असती तर कदाचित माझ्या असण्याची दखल जगाने अगोदरच घेतली असती. प्रतिभाच्या वाट्याला सामान्य गृहीणीच जीवन जगणचं होत पण मला सामान्य माणसाचं जीवन जगण मान्य नव्हत. आपल्या जाण्याची दखल जगाने घ्यावी असंच मला नेहमी वाटत आलं. श्रीमंत होण माझं स्वप्न नव्हतं. पण श्रीमंतानाही लाजवेल इतक मोठ मला व्हायचं होत. प्रतिभाच्या स्वप्नात मी होतो पण माझ्या स्वप्नात मात्र जग होत माझ्याकडे अपेक्षेने पाहणारं...ज्या जगात प्रतिभाच काय कोणासाठीही आता जागा शिल्लक नव्हती....



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance