प्रेमात सगळं काही माफ असतं
प्रेमात सगळं काही माफ असतं


आज जवळजवळ 3 वर्ष झाली आणि ते दोघेही परत भेटले. तो तिच्या भल्यामोठ्या घरासमोरून जातं होता. बाहेर पाटी लावली होती. आयपीएस मंजुळा जाधव. तो पाहतच राहिला त्या पाटीकडे आणि तेवड्यात ती बाहेर आली. दोघेही एकमेकांना पाहतच उभे होते. त्याला बघितल्यावर ती भूतकाळात अडकली. ती त्यांच्या समोरच्या फ्लॅटमध्ये काम करत होती. रोज दोघं भेटायचे, बोलायचे, गप्पा मारायचे. पण नकळत तिच्यावर प्रेम करु लागला. ती खूप मेहनती, प्रामाणिकपणे काम करायची, सगळ्यांना आपलस करायची. पण तिला तिच्या कामाची लाज वाटत नव्हती. रोज दोघे भेटायचे. पण त्याने आज तिला प्रपोज करायचे ठरवले. त्याने तिला उत्तर विचारलं. आणि ती तिच्या भूतकाळात अडकली.
जर खरं सांगितलं तर मी त्याला गमावून बसेल. पण ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. काही दिवसांनी त्याने तिला उत्तर विचारलं. तिने त्याला खरं सांगितलं. ती लहान असताना तिची आत्या तिला नराधम वस्तीत घेऊन आली होती. रोज वेगवेगळे माणसं भेटायची आणि ते घाव सोसल्यासारखे सोसायची ती. पण मला कळलं तेव्हाच मी तिथून पळ काढला. पण मी खरं सांगते मला तू आवडतोस. त्याला धक्का बसला आणि तो तिथून निघून गेला.
त्याने आईला सांगितलं. त्याने तिला आपल नातं विसरून जायला सांगितलं आणि आज 3 वर्षांनी दोघेही भेटले. तो त्याच्या आईला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आला. तिने त्यांंना न बघताच बसायला सांंगितलं आणि अचानक तिने वर बघितलं. त्यांना बघितल्यावर ती मनातून हसली. त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि सगळं विसरून जायला सांगितलं.