गरीब कुटुंब
गरीब कुटुंब


सकाळी क्लासमधून घरी येताना रस्त्याच्या कडेला अनेक कुटुंब होते. मनात सहज एक विचार आला की, इतक्या पावसात हे कसे झोपत असतील. कित्येक ठिकाणी पाणी साचलं आहे आणि हे कुटुंब असेच कसे राहू शकतात. पण आपण काही करू शकत नाही. पण ते कोणीच दुःखी नव्हते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणि आपली परिस्थिती गरीब असून कोणाला लाज वाटत नव्हती.
त्या माणसांनी एक शिकवलं, परिस्थिती गरीब असली म्हणुन सतत दुःखी राहण्यापेक्षा चेहऱ्यावर हसू ठेवा. कोणी तरी आपल्या हसूकडे बघून हे विचारेल की "परिस्थिती गरीब आहे पण त्यातून तुम्ही हसवायला शिकवता". यातून मला एक कविता सुचली.
हसतानासुद्धा चेहऱ्यावर
सुरकुत्या पडतात
परिस्थितीमुळे मुले हट्ट
करायचे सोडतात
लाज नाही गरीबीची
पण उद्या हेच हसू असेल का
चेहऱ्यावर म्हणून प्रश्न पडतात
टोपल्यात चपाती 1 असते
आणि खायला 3 डोकी असतात
प्रत्येकाने आनंद वाटून घेतल्यावर
कोण उपाशी राहतात
पण उद्या हेच हसू असेल का
चेहऱ्यावर म्हणून प्रश्न पडतात