मला आई व्हायचंय
मला आई व्हायचंय


तसा तर मी माधवीचा प्रोफेसर. पण माधवी मला माझ्या मुलगी सारखी होती. स्वभावाने प्रेमळ,नेहमी हसत बोलणारी, सर्वाना आपलंस करणारी. मलाच नाही तर माझ्या बायकोला सुद्धा ती आवडायची. मेहनती होती फार. आपल्या कुटुंबांला सोडून राहत होती पण दर महिन्याला पैसे पाटवायची. मला मुलं नव्हत पण माधवी आम्हा दोघांची काळजी घ्यायची. माधवी आमच्या घरातल्या सर्व कार्यक्रमात असायची. मुळात ती आमच्या कुटुंबांचा भाग झाली होती. पण आम्हाला मुल नाही आणि होणारही नाही हे तिला माहित होत. ती माझ्या बायकोची म्हणजे रेवाची चांगली मैत्रीण झाली होती. माधवीला पैशाची गरज होती. ती कामं शोधत होती. मी आणि रेवाने एक निर्णय घेतला होता. IVF TREATMENT बद्दल. दुसऱ्या दिवशी अचानक माधवी घरी आली ते ही सकाळी. मला ती आली त्याबद्दल काही वाटल नाही पण इतक्या सकाळी ती येत नाही. तिला आत बोलवून आम्ही तिला नाश्ता विचारला. तिला
बहुतेक रेवा बरोबर बोलायच होत म्हणून मी आवरून निघालो. रेवाला माहित होत माधवीला अडचण होती ते. पण माधवीने सगळं खरं सांगायचं ठरवलं.
माधवी Pregnant असते. खरं तर ते मुलं तीच नसत. एका Couple ने IVF Treatment साठी तिला बोलावले असते. ती त्यासाठी होकार देेेेेते आणि पैसे आईला पाठवते पण आईला काही सांगत नाही. गेल्या 2 महिन्या पासून हे चालू आहे आणि मला वेळ नाही भेटला हे सगळं सांगायला. रेवा हे ऐकून थोडी गप्प बसली पण नंतर हसत म्हणाली "इतका काय् त्यात, तू कोणाच्या तरी घरी आनंद घेऊन येणार आहेस".जास्त विचार नको करूस आहे मि. रेवाचं हे बोलण ऐकून माधवीला आधार मिळाला. झाले 9 महिने संपले. आणि माधवीने एका गोड मुलीला जन्म दिला. थोडे दिवस माधवीला त्रास झाला पण सगळं चांगल झालं. त्या नंतर रेवा ने आणि सुमीत ने ठरवले माधवी ला IVF बद्दल् विचारायच. माधवीवर दुसरी वेळ होती. पण ती घाबरली नाही. तिने ह्या वेळेलासुद्धा होकार दिला. आणि काही महिन्यात तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
रेवा आणि सुमितच्या आयुष्यातला खूप मोलाचा क्षण होता तो माधवीचे आभार मानले आणि तिला घरी घेऊन आले. काही दिवसात माधवी घरी आली आणि विचार करू लागली "आई होणं सोप्प नसत आणि ते सर्वांच्या नशिबात नसतं."