ती डायरी अशी पण
ती डायरी अशी पण


जीव कासावीस झाला होता. Diary गेली कुठे असेल किंवा कोणी घेतली असेल? अनेक विचार मनात आले आणि तितक्यात आठवलं की अभी आला होता काल घरी. आणि Diary सुध्दा टेबलावर होती. मी लिहिता लिहिता उठली होती आणि dairy तिथे राहिली. सगळं संपल अस वाटलं पण थोडा वेळ विचार करून त्याला फोन लावला. "Hello" बोलल्यावर दोघेही शांत झालो. मन धडधड करत होत आणि तेवढ्यात अभी म्हणाला ' अरे बोल, काय झाल'? डोळे पुसून त्याची विचारपुस केली आणि तु माझ्या घरून कोणती वही घेऊन गेलास का? असे म्हणाली. पण "हो" किंवा "नाही" ह्यात उत्तर न देता तो म्हणाला, आम्हा कोणालाच माहित नव्हतं की तु इतकी दुखी आहेस. आम्हाला प्रत्येकाला वाटायचं की" तुझी लाईफ बेस्ट आहे तुला कसल टेंशन नाही आणि तुझा आयुष्य तु बिंदासपणे जगतेस". पण ही diary वाचुन कळलं की "दिसत तस नसत म्हणून जग फसत". आणि त्यात अस सुद्धा लिहिले की "I love you Abhi".
हे काय आहे?? त्याने हे विचारल्यावर मी इतकेच म्हणाले की , आपल्या ओठावर असलेलं हसू आणि मनात असलेलं दुःख हे आपल्या diary ला माहित असतं. आणि उद्या डायरी दे मला हे बोलून फोन ठेवला. आणि खोली आवरली.