वकील
वकील


आज त्या कुटुंबाला रडताना बघून खूप वाईट वाटतं होत पण पोटापाण्यासाी करावं लागतं.डॉक्टर, इंजिनिअर होण सोप्पं पण वलिक नको रे बाबा.. मान्य आहे की मी त्यांच्या विरोधात साक्ष देत होतो."सत्यमेव जयते" ही हेडलाईन आहे आमच्या कामाची आणि आम्ही त्याच्या विरोधात काम करतो. इतक्या केसेस लढल्या पण आज लाज वाटतं होती मला.मुल शाळेत सांगायची " माझे पप्पा वकील"आहेत.पण आज ह्या वकिलाला स्वतःची लाज वाटतं होती.ज्या मुलीचा रेप करून तिला मारून टाकले त्या हमारखोराला आज मी पुन्हा एकदा संधी दिली रेप करण्यासाठी.
एका मुलीचं आयुष्य काय असत हे नाही माहीत पण त्या मुलीला जिवंतपणा आणि मेल्यावरसुद्धा सहन करावे लागतं. आज जो गुन्हा मी केला आहे त्याची शिक्षा"मरण"नाही पण माझ्या कुटुंबाला आणि त्या मुलीच्या आई वडिलांना अभिमान वाटेल असं काही करेल.डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्या मुलीचा देह आठवला.बोलता न येणारे शब्द डायरी मध्ये लिहिले
दोष नव्हता तुझा
अन् तु चुकली पण नव्हती
हरामखोराच्या जाळ्यात
तु मात्र फसली होती
नशेत तुझ्या देहाचा आनंद घेत होते
तेव्हाही तु सहन केले इतके
जीव तुझा गेला आणि
तेव्हा ते उठले
हजारो पेटल्या मेणबत्या
तरी ती काळोखात होती
नराधम फाशी घेणार तेव्हा
आत्म्याला तिच्या शांती भेटली होती
गुन्हा ह्या वकीलाने सुद्धा केला
पण देहाबरोबर नाही
शिक्षा मला पण होईल
तेव्हाही ते नराधम थांबणार नाही