SHUBHANGI SHINDE

Romance

4.7  

SHUBHANGI SHINDE

Romance

का कळेना!!!

का कळेना!!!

45 mins
10.1K


रिसेप्शनने मिटींग सुरू असताना urgent call म्हणून मेघाला फोन लाइन transfer केली….

रिसेप्शन : मेघा Mam…. This is urgent call for you….

मेघा : OK… Please transfer….

(पलीकडून आवाज येतो)

Hello….. ताई???, ताई… मी… रेवतीशी आता register marriage करतोय…. मी… तुला न सांगता लग्न करुच शकत नव्हतो म्हणून आधी तुला सांगितलं… मन हलकं झाल ताई…. (समोरून प्रमोद भराभरा बोलुन गेला)

तिने फक्त OK म्हणून फोन ठेवून दिला….

मेघा…… एक passionate Interior designer….. या कामाची तिला प्रचंड आवड…. प्रत्येक घर ती फार आपुलकीने सजवायची…. जिव ओतून घराला घरपण द्यायची…. डोळ्यांचे पारणे फेडणारे डिझाइन तयार करायची…..

मेघा आज खूप बिझी होती…. आज फायनल डिझाइन क्लायंटला सादर करायच होत तिला….. आणि ते क्लायंटला नक्की पसंत पडणार याची खात्री होती तिला…. तिच कामच तस होत की क्लायंटला नेमक काय हवय हे तिला कळल की बस्स काम फत्ते….

पण प्रमोदचा फोन आल्यापासून थोडी अस्वस्थ झाली होती…. पण तरीही क्लायंटला तिने व्यवस्थित सादरीकरण केल…. आणि as usual …. क्लायंट खुश झाले…. मेघाने बाकी डिटेल्स आपल्या असिस्टंटला सादर करायला सांगितले आणि ती थेट घरी निघून आली ….

प्रमोद मेघाचा लहान भाऊ… आईवडील कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे दोघंच एकमेकांचा आधार होते…. मेरीट वर अभ्यास करून आज प्रमोद मोठ्या पदावर कार्यरत आहे… कॉलेजमध्ये त्याला रेवती भेटली आणि तिथूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले…. मेघाला त्याने रेवतीवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले होते…. मेघालाही रेवती पसंत होती…. पण हे असं अचानक register marriage??

डोक भणभणायला लागल विचार करून….. तिने कॉफी बनवली आणि मस्त सोफ्यावर बसून एक एक घोट घेत मन शांत करत होती….. इतक्यात दारावरची बेल वाजली…..

मेघाने दार उघडले समोर प्रमोद आणि रेवती उभे…. दोघांच्या गळ्यात फुलांचा हार आणि रेवतीच्या गळ्यातील मंगळसूत्र सगळ सांगुन जात होत की खरोखरच यांनी लग्न केले…..

मेघाने दोघांनाही आत येण्यास मज्जाव केला आणि ती तडक आत निघून गेली…..आतुन गाडीची चावी घेऊन आली …..

मेघा : चला. ….

प्रमोद : ताई???? (प्रश्नार्थक मुद्रेने) कुठे ?????

मेघा : रेवतीच्या घरी…

प्रमोद : अगं पण????

मेघा : सगळं आत्ताच सांगू???? चल आधी…. हि घे चावी…. गाडी स्टार्ट कर…..

प्रमोद : OK

मेघा : रेवती घरी अजून काही माहित नसेलच तुमच्या लग्नाबद्दल ??

रेवती : नाही ताई, पण मला खूप भीती वाटतेय … .

मेघा : लग्न करताना नाही वाटली???? मग आता का घाबरतेस????

प्रमोद : ताई नको ना…. खुप राडा होईल….

मेघा : काय घाई होती लग्नाची…. आपण रीतसर मागणी घातली असती….. हे Direct register marriage करायची काय गरज होती???

प्रमोद : मीही तेच बोलत होतो तिला .. .. पण ही ऐकायलाच तयार नव्हती….. जिव द्यायला निघाली होती…. .

मेघा : कसल्या गं तुम्ही सुशिक्षित मुली??? आपल्या प्रेमावर विश्वास नव्हता की स्वतःवर????

रेवती : नाही ताई…. तस नाही…. पण आमच्या घरी Love marriage ला परवानगी नाही आणि प्रमोदचे आईवडीलही नाही म्हणजे तो अनाथ आहे….. म्हणून पण परवानगी नाही….

मेघा : मी बघते काय ते….. ते हार काढून गाडीतच ठेवा…. आणि रेवती तु ते मंगळसूत्रही बाजुला काढुन ठेव…..

(अनाथ हा शब्द ऐकून तर तिचा पाराच चढला पण तस तिने दाखवले नाही….. गाडी रेवतीच्या घरासमोर येऊन थांबली)

घर कसला सुंदर असा बंगला होता तो…..

मेघा : प्रमोद गाडीतल्या दोन बॅग सोबत घे….

प्रमोद : काय आहे यात????

मेघा : चल आधी…. मग कळेल….

तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात…. मेघा एक दीर्घ श्वास घेऊन… दारावरची बेल वाजवणार …. त्याआधीच आतून दार उघडते….. तिघेही आश्चर्य व्यक्त करतात…. रेवतीच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते… घरातून रेवतीचे आईबाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते…. रेवतीला बघून तीची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली…. आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले…. तोपर्यंत मेघा आणि प्रमोद शांतच होते… पाहुणे निघून जाताच….

(रे) आई : रेवती तुला सांगितलं होतं ना…. आज घरी पाहुणे येणार आहेत म्हणून….. आज तरी घरी थांबायचे होते….

(रे) बाबा : जाऊ दे ग लहान आहे अजून ती…..

(रे) आई : लहान??? आता तिच्यासाठीच पाहुणे बोलावले होते ना????

रेवती : म्हणजे????

एव्हाना मेघाला घरच्यांच्या बोलण्यावरून अंदाज आला होता की ते पाहुणे रेवतीला पसंत करण्यासाठी आले होते…..

रेवतीला मध्येच थांबवत मेघाने स्वतःची आणि प्रमोदची ओळख करून दिली…..

मेघा : सर मी मेघा….. मेघा सबनीस आणि हा माझा लहान भाऊ प्रमोद…. MBA केल आहे याने……. आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे…. आज मी याच्यासाठी रेवतीला मागणी घालायला आले आहे….

(रेवती आणि प्रमोद एकमेकांना आश्चर्याने बघतात…. आपली ताई आपल्याला यासाठी इथे घेऊन आली याची अपेक्षाच नव्हती त्यांना…. )

इतक्यात रेवतीचा मोठा भाऊ विक्रम आत येतो जो पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेलेला असतो…..

विक्रम : Sorry…. पण ते शक्य नाही…. रेवूच लग्न आम्ही आत्ताच माझ्या मित्रासोबत पक्क केलं आहे…. So….. तुम्ही निघालात तरी चालेल…..

मेघा : (शांतपणे रेवतीच्या बाबांना) सर…. रेवती आणि प्रमोद एकमेकांना पसंत करतात…. प्रेम आहे त्यांच एकमेकांवर…..

रेवतीचे आईबाबा आणि विक्रम रेवतीकडे बघतात, रेवतीची खाली झुकलेली मान त्यांना सर्वकाही सांगून जाते…..

(रे) बाबा : (काहीसा विचार करून ) मग तुमच्या आईवडीलांना माहित आहे का हे…. कि तुम्ही परस्पर ठरवुन आलात…. का सबनीसांच्या मुलांना आगाऊपणा करण्याची सवयच आहे……

मेघा : (तरीही शांतपणे) नाही आम्हा सबनीसांच्या मुलांना मूळात आगाऊपणा जमतच नाही…. आमचे आईबाबा नाही म्हणून मी प्रमोदची मोठी बहीण या नात्याने माझ हे कर्तव्य समजून इथे आली आहे…..

(रे) बाबा : I am sorry….. वाईट वाटले ऐकून की तुमच्यावर आईबाबांच छत्र नाही… ते असते तर एकवेळ आम्ही विचार केला असता…. पण आता हे लग्न शक्य नाही… .

मेघा : अहो पण का???? हल्ली आईबाबा स्वतः एकटा राहणारा मुलगा शोधतात…. आपल्या मुलीला सासूसासरे यांचा त्रास नको म्हणून….. मग काय हरकत आहे???

(रे) आई : मुलांना वेगळ केल की ते आपलीच मनमानी करतात…. घर संसार याच त्यांना काहीही पडलेल नसत… घरात मोठी माणसे असली की दोघांतले वाद विकोपाला जात नाही….. त्यांची चूक त्यांना वेळीच उमगली की संसाराचा गाडा सुरळीत पार पडतो….. ते उमगण्यासाठीच घरी मोठी माणसे हवीच…

विक्रम : अशी मुलं प्रेम तर करतात पण family bonding काय असते हे न कळल्याने नात टिकवू शकत नाही….

मेघा : (विक्रमच बोलन मध्येच थांबवत) एक मिनिट Mr. ……? Whatever your name is….. Family bonding आम्हाला चांगलीच कळते…. पंधरा वर्षे झाली आईबाबा कार अपघातात जाऊन…. आमचा प्रमोद फक्त दहा वर्षाचा होता… तेव्हा पासून आम्हीच एकमेकांचा आधार आहोत….

लग्न न जमवण्यासाठी कोणतीही शुल्लक कारणं देऊ नका….

प्रमोद : ताई आपण निघूया इथुन…. अजून अपमान नको आणि स्पष्टीकरण तर त्याहूनही नको….

मुळात रेवती यासगळ्यांत काहीही बोलत नाही याचा राग प्रमोदला येतो…..प्रमोद मेघाचा हात धरून निघायला लागतो….

मेघा : (तशीच मागे वळून) आमच्या आईवडिलांनी फार चांगलेच संस्कार आमच्यावर केलेत म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो आणि आमची family bonding इतकी चांगली आहे की रेवतीशी register marriage करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले…. तरी की, ” ताई…. मी रेवतीशी register marriage करतोय”… But unfortunately तुमच्यात ती bonding नाही….. तुमची बहिण पळून जाऊन लग्न करते इथेच तिचा तुमच्या वरचा विश्वास कळतो…. रेवती आज माझ्या भावाची बायको आहे पण तिने पळुन लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आईवडिलांपासून तिची ताटातूट नको म्हणून मी इथे आले होते….. हे आमच्या आईवडिलांचे संस्कारच आहेत ज्यांनी मला आधी रेवतीचा आणि तिच्या घरच्यांचा विचार करायला भाग पाडलं……. येतो आम्ही……

(मेघा आणि प्रमोद निघून जातात)


इथे रेवतीही रडत रडत रुममध्ये निघून जाते….. रेवतीचे आईबाबा स्वतःकडे हतबल होऊन बघत बसतात…. रेवतीची आई तिच्या रूममध्ये जाते….. रेवती बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसाढसा रडत असते… आई तिच्या डोक्यावर हळूवार कुरवाळते….. रेवती रागाने आईचा हात दूर लोटते….. आई तिला समजावण्याच्या प्रयत्नात परत तिला हाक मारत कुरवाळते…. तशी ती रागात उठून बसते…. आई शिखाच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येतेय…. चुकीच तर शिखा वागली होती…. मनमानी पण तिच करत होती….. अजूनही शिखामूळे बाकीच्यांना का गृहीत धरताय तुम्ही….. आई तिला आपल्या जवळ घेते….. रेवती परत आपल्या आईच्या कुशीत ढसाढसा रडायला लागते…..

इतक्यात विक्रम आत येतो….. आई रेवतीला गप्प राहण्यास सांगते…. रेवू आता तो विषय नको…. विक्रम रेवतीच्या बाजूला येऊन बसतो…

विक्रम : मी ऐकलय सगळं…., खरोखरचं…..शिखामूळे आपण सगळ्यांनाच गृहीत धरायला लागलोय….

रेवती : भाई मला तस म्हणायच नव्हत. ..

(रे) आई : विक्रम please…. रेवूला खरचं तस म्हणायच नव्हत …

(रेवतीचे बाबाही तिथे येतात)

(रे) बाबा : विक्रम मला तरी वाटतं प्रमोद आणि मेघा खरचं चांगली माणसं आहेत… आणि आता या दोघांनी लग्न केलच आहे….मग आता आपण उगाच विषय ताणायला नको…. मेघा हुशार आहे आणि समजूतदार सुद्धा…. आपली रेवू सुखी राहील…. रोहनच्या बाबांशी मी बोलेन…. समजवीन त्यांना……

विक्रम : हमम्…… मी बोलतो रोहनशी…..

रेवती : भाई…… I am sorry….

विक्रम : यात तुझी काहिच चूक नाही….

(आणि विक्रम निघून जातो…..)

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रमोद आॅफीसला जायला निघतो….. मेघा आपल्याच विचारात गुंग असते…… प्रमोद तिच्याजवळ जातो ….. गुडघ्यावर बसून…. मेघाला समजावतो……

प्रमोद : ताई…. अग कशाला वाईट वाटुन घेतेस…. होईल सगळ नीट ……

मेघा : I am sorry….. तुमचा संसार सुरू होण्यापूर्वीच मी…. , माझ्यामुळे हे काय होऊन बसल….

प्रमोद : ताई. .. काहीही झालेले नाही…. तु रडण थांबव आधी….

मेघा : नाही बेटा… मला माझी जबाबदारी नीट पाळता नाही आली… मी परत त्यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करेन ….. हव तर पाय धरेन मी त्यांचे…..

(इतक्यात दारावर रेवती आणि तिचे आईवडील येतात )

(रे ) बाबा : त्याची काही एक गरज नाहीये… . बेटा आम्हाला माफ कर पण तिसर्‍या एका व्यक्तीमुळे आम्ही तुम्हाला गृहीत धरायला नको होत…. आम्ही आत येऊ शकतो????

मेघा : (आपले अश्रू पुसत ) या ना सर…. Please…. बसा तुम्ही मी पाणी आणते…

(रे) आई : नको मेघा…. राहू दे…. तु बस आधी….. मेघा…. कालच्या प्रकाराबद्दल आम्ही तुम्हा दोघांचीही माफी मागतो…..

प्रमोद : अहो माफी कशाला?? कालचा विषय कालवरच सोडून देऊया….

(रे) बाबा : मग लग्नाची तयारी करायला हवी…. काय आहे की यांनी register केल पण आपल्याही पद्धतीने होउन जाऊ देत लग्न….

मेघा : अगदी माझ्या मनातलं म्हणालात सर ….

(रे) आई : अग सर काय म्हणतेस बाबा म्हण त्यांना आणि मला आई…..

मेघा खूप खुश होते….. प्रमोद आणि रेवती दोघेही आनंदाने बहरून जातात….. पुढची सविस्तर चर्चा करण्यासाठी मेघा आणि प्रमोदला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण देऊन रेवती व तिचे आईवडील निघून जातात…..

प्रमोद : Love you diiiii….. Thank you so much being a part of my life….

आणि तो तिला घेऊन आनंदाने नाचायला लागतो……

नंतर दोघेही आपापल्या कामाला निघून जातात….

आज मेघाला एका क्लायंटच्या आॅफीसमध्ये मीटिंगला जायचे असते…. अस तर त्या क्लायंटचे बरेचसे प्रोजेक्ट मेघाने पूर्ण केले होते पण यावेळेस त्याच्या नवीन घराच डिझाइन होत ज्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते… After all त्याला ते घर त्याच्या होणार्‍या बायकोला गिफ्ट करायच होत…. हा क्लायंट म्हणजे विक्रमचा मित्र रोहन देशमुख…. मेघाला हे अजूनतरी माहित नसत …. आज पहिल्यांदाच दोघांची ओळख होणार असते…..

मेघा : (केबीनच दार नॉक करून) May I come in….

रोहन : Ohhh… Miss. मेघा… Please come in…

मेघाला बघताच रोहन खुर्चीवरून उठून उभा राहतो…. तिला एक क्षण पहातच बसतो….

हलका गुलाबी रंगाचा चुडीदार सुट… हातात त्याच कोंम्बीनेशनच्या बांगड्या…. गळ्यात नाजुक सोन्याची चेन…. मोकळे सोडलेले लांब केस…. ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि माथ्यावर मोतीची टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती…..

मेघा : Hello Mr. रोहन…. मी मेघा… आज पहिल्यांदाच आपली भेट होतेय….

रोहन : इतके दिवस हा item कुठे होता यारर…. ( अगदी हळू आवाजात )

मेघा : Excuse me!! काही म्हणालात???? ( मेघाने त्याच बोलण बरोबर ऐकल पण ignore करत ती कामाविषयी बोलू लागली )

रोहन : काम तर होतच राहतील…. By the way आज संध्याकाळी बाहेर कॉफीसाठी भेटूया….

मेघा : (जरा दचकून) I am sorry but मला काही कामं आहेत…. तुम्ही हे डिझाइन फायनल करा ना… कॉफी काय होतच राहील….

डिझाइन बघताना रोहनच लक्ष डिझाइनवर कमी मेघावर जास्त होत…. मेघाने ते बरोबर हेरल…. तिने लवकरात लवकर मिटींग संपवली आणि तिथून बाहेर निघाली….

ती जरा घाईतच निघाली आणि तिचा एकाला धक्का लागून पाय घसरला पण समोरच्या व्यक्तिने प्रसंगावधान राखून तिला पकडले…. दोघांचीही नजरभेट झाली आणि ती चमकून स्वतःला सावरत मागे झाली… तो विक्रम होता… ती फक्त thank you म्हणून निघून जाते ….. आणि विक्रम रोहनच्या केबीनमध्ये जातो….

रोहन : Hiii…. विक्रम… आज सकाळीच येण केलस…

विक्रम : रोहन तुझ्याशी थोड बोलायच होत….

रोहन : हा बोल ना… तु येवढा अपसेट का आहेस… is everything okay????

विक्रम : रेवतीशी तुझ लग्न नाही होऊ शकत…. I am sorry for that….. I hope you can understand… याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम नाही होणार….

(आणि तो रेवती व प्रमोदबद्दल सांगतो)

रोहन : बसस् काय यारर… It’s okay….

Actually रोहनला रेवतीशी काही घेणदेण नव्हत…. रेवती सोबत लग्न करून त्याला विक्रमकडून आपला business वाढवून घ्यायचा होता…. पण आता रोहनला business पेक्षा मेघामध्ये जास्त interest वाटत होता….. म्हणून लग्न तुटण्याच वाईट त्याला वाटत नव्हतं….. रोहन… स्मार्ट, हुशार आणि एक श्रीमंत मुलगा पण तो थोडा स्त्री लंपट होता… आज ही मुलगी तर उद्या दुसरी…. विक्रमची आणि त्याची भेट एका conference दरम्यान होते…. त्याच्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तो चांगलाच परीचयाचा होऊन जातो…. विक्रम स्वतःहून रेवतीच्या लग्नाचा प्रस्ताव रोहनसमोर मांडतो….. रोहनचा मूळचा स्वभाव फार वेगळा असतो….

रात्रीच्या जेवणासाठी मेघा आणि प्रमोद रेवतीच्या घरी येतात…. प्रमोद आणि रेवतीच लग्न destination wedding अस ठरवत… रेवतीचे बाबा लग्न गोव्याला त्यांच्या आजोळी करण्याचा प्रस्ताव मांडतात… पंधरा दिवसांनी साखरपुडा आणि एक महिन्यानंतर लग्न असा मुहूर्त काढुन सगळा कार्यक्रम ठरवतात….. सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवणाला सुरुवात करतात… पण विक्रम जेवणाला उपस्थित नसतो… मेघा त्याबद्दल बाबांना विचारते… इतक्यात विक्रम आणि रोहन येतात….. रात्री घरी पाहुणे येणार असल्याचे विक्रमला माहित असते पण तो विसरतो… आणि रोहनचा राग गेला आहे हे बघण्यासाठी त्याला रात्रीच्या जेवणाच आमंत्रण देत घरी घेऊन येतो….

आई त्या दोघांना सुद्धा पान वाढते… मेघाला बघून रोहन मनातून भलताच खुश होतो…. जेवताना त्याच लक्ष फक्त मेघावर होत….. मेघानेही ते ओळखल होत…. तिने लवकर जेवण आटोपून प्रमोदला घेऊन सर्वांचा निरोप घेतला……

आता प्रोजेक्टच्या बहाण्याने रोहन रोज मेघाशी जवळीक साधू लागला…. मेघा वारंवार त्याला टाळत होती… लग्नाच्या शॉपिंगमध्ये पण तो येवू लागला…. मेघाला राग तर खूप आला होता पण तो रेवतीच्या भावाचा मित्र आहे म्हणून ती काहीच बोलत नव्हती….रेवतीचा भाऊ शॉपिंगला नसला तरी रोहन आवर्जून हजर असायचा….

असच चालू असताना साखरपुड्याचा दिवस उजाडला….

साखरपुड्यासाठी एक हॉल ठरवण्यात आला होता… मेघा आणि प्रमोद गाडीतून खाली उतरतात…. विक्रम स्वागताला उभाच असतो…. त्याची नजर मेघावर पडताच तो तिच्यात हरवून जातो…. जांभूळ रंगाची पैठणी अगदी चापून चोपून नेसलेली… कानात सोन्याचे झुंमके…. गळ्यात सोन्याचा नाजुक हार…. हातात कंगण… आणि पफ काढून एका बाजूला मोकळे सोडलेले केस…. माथ्यावर नाजूक चंद्रकोर….लाल रंगात भिजलेले नाजुक ओठ…. यात भर म्हणजे तिच्या गालावर पडणारी खळी… आज तिच्या रुपाने विक्रम पूर्ता घायाळ झाला होता….. याआधी त्याने तिला अस कधी पाहिल नव्हत…. कारण तो लग्नाच्या संवादात कधी नव्हताच…. पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली…..

मेघा आणि प्रमोद आत प्रवेश करतात…. हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागते…. रेवतीचे आईवडील मेघाची पाहुण्यांना ओळख करून देत असतात…. विक्रम तिथेच आसपास असतो…. गर्दीतून चोर नजरेने मेघाला बघत असतो….

काहीवेळाने रेवती तयार होऊन येते…. दोन्ही उत्सव मुर्ती स्टेजवर हजर असतात…. साखरपुडा व्यवस्थित पार पडतो…. अगदी पारंपरिक पद्धतीने…. रेवती आणि प्रमोद एकमेकांना अंगठी घालतात…. तसा वरून त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो… दोघेही खूप खुश असतात….

पण हल्लीच्या मुलांची नाचगाण्याची हौस…. मग काय हॉलमध्ये मंद दिव्यांच्या रोषणाईत छान रोमॅन्टिक गाण वाजू लागले….

प्रमोद आणि रेवती दोघेही हातात हात घेऊन कपल डान्स करु लागले…..

“जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये

तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज

ना कोई हैं, ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा

तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज”

लांबूनच मेघा त्या दोघांना पाहत असते… त्या दोघांना अस खुश बघून आईबाबाही सुखावतात…. आता हळूहळू इतर बाकीचे पण जोडीने नाचायला येउ लागले…. इतका वेळ गैरहजर असलेला रोहन आत्ताच हॉलमध्ये आलाय…. सर्वांना डान्स करताना बघून हाही मेघाला जबरदस्ती घेऊन गेला….

अचानक साउंडवाल्याने म्युझिक आणि तिथली रोषणाई बदलली….. त्या डान्सफ्लोरची थीम अजूनच रोमँटिक झाली… रोहनने आपला उजवा हात मेघाच्या कमरेत तर त्याच्या डाव्या हातात मेघाचा हात घेतला… तिला थोड आपल्या जवळ ओढल आणि गाण्याच्या तालावर तिच्या नजरेला नजर लावून नाचू लागला…..

आँखों की गुस्ताखियाँ

माफ़ हों

ओ आँखों की गुस्ताखियाँ

माफ़ हों

एक टुक तुम्हें देखती हैं

जो बात कहना चाहे ज़ुबान तुमसे वो ये कहती हैं

आँखों की शर्मोहाया

माफ़ हो

तुम्हें देखके झुकती हैं

उठी आँखें जो बात ना कह सकीं

झुकी आँखें वो कहती हैं

मेघाला हे अजिबात आवडत नाही पण लोकांसमोर उगाच तमाशा नको आणि येवढा छान कार्यक्रम सुरू असताना गालबोट नको म्हणून तीही त्या सोबत नाचत होती…. यासगळ्यात विक्रम तिलाच बघत होता… अधूनमधून तिनेही ते पाहील होत ….. म्हणजे आँखों की गुस्ताखियाँ तिघांचीही सुरूच होती…..

साखरपुढ्याचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला…. लव बर्डस म्हणजे प्रमोद आणि रेवती खूप खुश होते….

दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा रोहनच्या नवीन घरी जाते…. आपल्या प्रोजेक्टची काम कुठपर्यंत आली आहेत हे पाहायला… तिने बनवलेले डिझाइन हे प्रॉपर वर्क होत की नाही याकडे ती जातीचे लक्ष देते…. काही वेळाने तिथे रोहन येतो…. रोहन तिला मागून येऊन मिठी मारतो… मेघा तडक मागे फिरून रोहनच्या कानशिलात लगावते….. रोहन स्तब्ध होऊन जातो.. .. आसपास बघतो तर तिथे त्या दोघांशिवाय कोणी नसत….. मेघा तिथुन निघून जात असते…..

रोहन : मेघा…. . Is anything wrong with me…. माझ्यात काही कमी आहे का??? आजवर खूप मुली पाहिल्या… “Good looking” .. “श्रीमंत” मुलगा म्हटलं तर लगेच भाळतात…. तु पहिली आहेस जी मला ignore करतेस….

मेघा : रोहन…. मी एक साधी सरळ मुलगी आहे… माझ जगण्याच way of thinking वेगळ आहे… मी तुझ्या टाईपची नाहीए… And you are not my first choice…. हृदयातून जी भावना एका जोडीदारासाठी येते ती तुझ्यासाठी नाही येत…. So please stay of it…

रोहन : All right…. कमीत कमी माझी चांगली मैत्रीण तर बनशिल ??? याररर मी मित्र म्हणून येवढा वाईट नाहीए…. तुझ straight forward उत्तर मला आवडल….

मेघा : (काहीशी हसून) OK…

रोहन : चला मघ…. घराच काम कुठपर्यंत आल ते दाखवा…..

दोघेही हसून पुढच्या कामाला सुरुवात करतात…..

रेवतीच्या घरी लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे…. दोन दिवसांनी गोव्याला जायच आहे त्याचीच तयारी सुरू आहे….

आई : विक्रम… अरे तु दियाला फोन केलास का??? पोहचली का ती गोव्याला????

विक्रम : आई कशाला काळजी करतेस…. पोहचेल ती…. Wedding planner आहे ती… तीला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे….

आई : धांदरट आहे नुसती…. पण तुम्हाला तीच हवी होती…

बाबा : अगं तुझ्या भावाचीच मुलगी ना ती…. आपल्या विक्रमसाठी तिचच नाव सुचवत होतीस तू…..

आई : हो… पण त्यांना करियर महत्वाच होत तेव्हा…. काय दिवे लावले…. Wedding planner बनुन…. दहा पैकी चारच लग्न नीट पार पडले….

विक्रम : अग पण उरलेल्या सहा मधली दोन लग्न cancelled झाली त्यात तिचा काय दोष…. आणि बाकी चारचे नवरा नवरी पळून गेले….

आई : हिनेच पळवून लावले. …

बाबा : अग उलट हिने दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणले. ..

(सगळे हसतात)

आई : हो हो….. रेवू तो फोन ठेव आता… . तयारी कर ……

सगळे दोन दिवसांनी गोव्याला येऊन पोहोचले…. संध्याकाळी मेघा आणि प्रमोद सुद्धा तिथे पोहचले…. संध्याकाळच्या मावळतीला तांबडा शुभ्र आकाश… न्हाऊन निघाला होता…. तांबूस चांदण्या प्रकाशात खळखळणारा समुद्राच्या लाटा मन प्रसन्न करत होत्या…. गार वाऱ्याची झुळूक अंग मोहरत होती…. आणि अशा निसर्ग रम्य ठिकाणी रेवतीच्या बाबांच आजोळ होत….. रेवती आणि प्रमोदच wedding destination……

रेवती मेघाला त्यांची खोली दाखवला घेऊन जाते…. बाबा दियाला मेघाची ओळख करून देण्यासाठी घेऊन येतात

मेघाला बघताच दिया जोरात ओरडते…..

दिया : (आनंदाने नाचून) आ…. Ohh my God … मेघा….

मेघा : दिया…. (आश्चर्याने) what a pleasant Surprise ….

दिया : Uncle… मेघा माझी कॉलेज फ्रेंड आहे….

आई : (त्याचवेळी मेघाला जेवणासाठी बोलवायला येतात) दिया तुझ कॉलेज तर पुण्यात होत…

मेघा : आई आम्ही special course दरम्यान एकत्र होतो…

आई : चला सगळे जेवायला…. काय आमची wedding planner सगळीकडे मलाच लक्ष द्यावे लागत आहे ….

(दिया आणि बाबा एकमेकांना बघून हसतात. . .)

सगळे जेवणाच्या पंगतीत बसतात…. आणि थोड्या फार गप्पा पण जमतात…..

मेघा : दिया…. तु आणि wedding planner??? Finally तुला तुझा goal मिळाला तर….

दिया : हमम्…. ए आत्तू…. जरा तो पापड दे ना…. (आईच लक्ष दुसरीकडे केंद्रीत करत) मेघा जेवणानंतर रात्री तयार रहा….

मेघा : (गोंधळून) कशाला??? आणि तु इतक्या हळू का बोलतेस???

आई : मी सांगते ना ती इतक्या हळू का बोलतेय…. (दियाचा प्लान ओळखून) अग ही भटकी तुलाही भटकायला घेऊन जाणार…. काय गं बरोबर ना???

दिया : You are the best आत्तू… तुच मला बरोबर ओळखते ….. (थोडीशी चिडवत… आपल्या आत्याला मीठी मारते)

आई : हममम्…. चल आता मस्का नको मारूस…. लवकर जा नी लवकर या…. .

मेघा : येवढ्या रात्री कुठे जायचं????

दिया : Night lights बघायला…. (full excited ) गोव्यात आल्यावर जर त्याची “Night life” नाही बघितली तर गोवा पाहिलाच नाही अस होइल…..

बाबा : हि काय तुम्हाला सोडायची नाही…. जा पोरांनो फिरून या…. नंतर लग्नाची तयारी सुरू झाली की वेळ नाही मिळणार…..

रेवती : ये हुई ना बात…. I love you दिया… तु खरी मैफिलची जान आहेस….

रोहन : (नुकताच येतो) एक जान इधर भी है |

बाबा : अरे रोहन्या तु कुठे राहीला होतास???

दिया : हे कोण ध्यान म्हणायचं????

विक्रम : friend आहे माझा…. रोहन नाव आहे त्याच…

रोहन : Hiiii मेघा…. Hello… Everyone….

आई रोहनलापण जेवण्याचा आग्रह करते पण तो जेवण बाहेरच करून आल्याच सांगत फ्रेश होण्यासाठी जातो….

इथे दिया आणि रेवती तयार होऊन बाहेर सर्वांची वाट बघत असतात…. लगेचच तिथे रोहन आणि प्रमोद हे दोघेही येतात … अजून विक्रम आणि मेघा यायचे बाकी होते….

रेवती : काय करुया?? bikes नी जायच की four wheeler???

प्रमोद : ladies first.. तुम्ही सांगाल तस….

रोहनही हो मध्ये हो करतो इतक्यात समोरून मेघा आणि विक्रम येतात…. मेघाने छान गडद निळ्या रंगाचा वन पीस घातला होता आणि विक्रम जिन्स टी-शर्ट आणि ब्राउन लेदरचा जॅकेट…. विक्रमही दिसायला एकदम हँडसम…… अगदी सिनेमातल्या हिरोसारखा…..

दिया : (हळूच रेवतीच्या कानात कुजबुजते ) जोडी छान वाटते ना ही???

रेवती : तु please…. आता यांच्या बाबतीत नको ना सुरू करु…. भाई माहित आहे ना तुला ?? सोड तू…. चल आता… .

रोहन : मी drive करतो… Come on let’s go….

दिया : let’s rock…. Yuuuu huuuu….

सगळ्यात पुढच्या सीटवर विक्रम आणि रोहन… मागे दिया आणि मेघा…. रेवती आणि प्रमोद bike ने निघतात…..

सगळे एका ओपन पब जवळ येतात….

आत entry करताच….. आपल्याला थिरकायला लावणार म्युझिक, वेगळ्याच विश्वात नेणारी रोषणाई होती… Dance floor वर पण वेगळीच अशी ढिंच्याक रोषणाई बदलत होती… सगळेच मस्त enjoy करत होते…. बीचवर टेंट रिझर्व्ह करून सगळे तिथे बसले….

रोहन आणि दियाने मस्त सर्वांसाठी काजू भेळ, prawns fry आणि सहा बिअर ओर्डर केल्या… आणि मग ते दोघेही जागेवर येऊन बसले….

दिया : प्रमोद आणि रेवती आज की पार्टी तुम्हारे नाम….

(सगळे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात)

प्रमोद : Thanks दिया….

इतक्यात starters and drinks टेबलवर हजर होतात…

सगळे गप्पा मारत ड्रिंक्सची मजा घेत होते….

दिया : मेघा आज सब माफ हे |

मेघा : A…. please… हा… No Hard drinks…

रेवती : Only one time दी…

रोहन : प्रमोद तु तरी सांग…

प्रमोद : no comment please…. मला यात नका पाडू…

विक्रम उठून जातो…

रोहन : आता ह्याला काय झालं???? (विक्रमला जाताना पाहून)

दिया : Only one sip मेघा… नाही आवडली तर नको घेऊ .. But try न करता नाही नको बोलू… गोवा आये हो तो let’s enjoy!!

सगळेच आग्रह करायला लागतात , तस मेघा OK म्हणून दोन घोट पिते, पण ते काही तिला जमत नाही…

मेघा : ईईई… (विचित्र तोंड करत) याकक् किती बेकार आहे… सगळी तोंडाची चव बिघडवली….

आणि मेघा फ्रेश होण्यासाठी निघून जाते…

मेघा जातच असते इतक्यात समोरून येणार्‍या एका मद्यधुंद व्यक्तिचा धक्का वेटरला लागतो आणि त्याच्या हातातील ड्रिंक्सची प्लेट मेघावर पडणार त्याच क्षणाला विक्रम तिला तिच्या हाताला धरून बाजुला ओढतो… मेघा स्वतःला सावरते….

विक्रम : Are you OK ???

मेघा : Yaaa. . … I am fine…..

(दोन मिनिटे कुणीच कुणाशी बोलत नव्हत… )

विक्रम : निघूया…?? सगळे वाट बघत असतील… .

मेघा : Hmmm.. . (हलकेच मान डोलवत)

विक्रम : मेघा हे तुझ्यासाठी… (दुसऱ्या हातात असलेल soft drink पुढे करत).. It’s just soft drink no alcohol… तु Hard drinks घेत नाही म्हणून आणली तुझ्यासाठी….

मेघा : Thank you (मिश्किल हसत)

(आणि दोघेही आपल्या जागेवर येऊन बसतात…. )

दिया : ए चला ना नाचूया…. जाम भारी म्युझिक सुरू आहे…


मेघा आणि विक्रम सोडून बाकीचे डान्स फ्लोअरवर जातात…. हे दोघे बसूनच इन्जॉय करत होते…. स्वभाव एकसारखा जुळत असल्याने रोहन आणि दिया चांगलेच जवळ यायला लागले होते. ….

पहाटे चार वाजता सगळे घरी जायला निघतात… यावेळेस दिया आणि रोहन बाईक ने निघतात… विक्रम स्वतः गाडी चालवतो.. .रेवती मस्त प्रमोदच्या खांद्यावर डोक ठेवून मागच्या सीटवर झोपी जाते…. खिडकीतून येणाऱ्या गार वार्‍यामुळे प्रमोदही तिच्या डोक्यावर डोक ठेवून झोपून जातो… .

पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर गाडीच्या वेगात गार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करत होती… दोघेही शांतच… मेघा गाडीतला म्युझिक सिस्टिम चालू करते नकळत गियर बदलताना विक्रमच्या हाताला मेघाचा स्पर्श होतो दोघेही शाहारतात…. विक्रम sorry बोलुन समोरचा मिरर ठीक करतो… मेघाही मनात चलबिचल झाल्याने खिडकीतून बाहेर न्याहाळत बसते…. विक्रम अधून मधून तिलाच बघत असतो….

गाडी एकदाची दारावर येउन थांबते…. मेघा… रेवती आणि प्रमोदला उठवून घरी आल्याच सांगते…. तसे ते दोघेही जांभळी देत आपाआपल्या खोलीत निघून जातात…. दिया आणि रोहन आले नाही म्हणून मेघा आणि विक्रम तिथेच गाडीजवळ त्यांची वाट बघत असतात…. .

विक्रम : खूप उशीर झालेला आहे…. तु जाऊन झोपू शकतेस…. मी थांबतो इथे त्यांची वाट बघत… .

मेघा : It’s ok… थांबते मी पण…. तेवढीच तुम्हाला कंपनी…

विक्रम : (हळूच गोड स्माईल देत) okkk…

दोघांच्याही छान गप्पा रंगतात….

गप्पांमध्ये सहा कधी वाजले कळतच नाही दोघांना ….

इतक्यात बाबा morning walk साठी बाहेर पडतात…..

बाबा : काय रे लवकर उठलात… (त्यांनी दोघांच्या कपड्यांवरुन आधीच ओळखल की हे अजून घरात गेलेले नाही)

विक्रम : नाही…. दिया आणि रोहन अजून आले नाही ना…. त्यांचीच वाट बघतोय….

बाबा : ते तर कधीच येऊन झोपले… ती काय त्यांची बाईक….. (आणि ते निघून जातात)

मेघा आणि विक्रम आश्चर्याने बघत गालातल्या गालात हसतात….

विक्रम : (मेघाला जाताना अडवून) मेघा!!….. तुझी कंपनी खरच चांगली वाटली…. Thanks…..

मेघा हसून पुढे जाते…. विक्रमच्या या एका वाक्याने ती वेगळीच आनंदून जाते…..

आज रेवती आणि प्रमोद ची मेहंदी आहे….. दिया जरी धांदरट वाटत असली तरी तिने तीची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली…. सकाळी मेहंदी होती रात्री असाच नाचगाण्याचा कार्यक्रम ठरला होता…. रेवतीच्या चेहर्‍यावर प्रमोदच्या प्रेमाने आधीच रंग भरला होता…. आता मेघाच्याही सजण्या सवरण्यात हलकासा बदल झाला होता…. आपल्याला कोणीतरी नोटीस करतं या विचाराने ती स्वतःकडे जास्त कटाक्ष टाकत होती…. आता तीची नजर विक्रमलाच आधी शोधत होती….

मेहंदीच्या कार्यक्रमात पुरूष मंडळींच काहीच काम नसल्याने त्यांना वेगळी सोय केलेली होती…. त्यांच्या मस्त गप्पा टप्पा सुरू होत्या… विक्रम Laptop वर त्याचे काही मेल चेक करत होता….

हवेची एक झुळूक त्याला स्पर्श करून गेली तो पुन्हा रात्रीसारखा शहारला.. .. त्याने त्या वाऱ्याच्या दिशेने पाहिलं तर …..

आबोली रंगाची घागरा चोली… त्यावर जाळीदार आणि नाजूक मोती असलेली ओढणी पांघरलेली …. त्यातुन तीची नाजूक कंबर लपाछपी करत नजरेस पडत होती…. त्याने लगेच नजर चोरली पण मन काही थांबत नव्हत….न राहवून त्याने परत तिला पाहिल…. त्याच कमरेवर ती सोनसाखळी अजून आकर्षक वाटत होती…. गोर्‍या हातावर काढलेली ती नक्षीदार मेहंदी…. पायात घुंगरूनी भरलेले पैजण…. कानात खड्यांचे झुंमके….. ओठांवर हलकीशी लिपस्टिक…. आणि तिच तीची गालावरची खळी….आज तो परत तिच्या सौंदर्यावर भूलला होता …. तिला येताना पाहतच बसला….

ती येतच होती की खाली पडलेल्या काचेच्या तुकड्यावर तिचा पाय पडला… .आई गं म्हणत ती ओरडली…. तसा विक्रम भानावर येत तिच्याकडे धावला पण आधीच तिथे रोहन पोहचला…. रोहनने लगेच तिच्या पायात रुतलेला काचेचा तुकडा काढला आणि आपल्या किशातला रूमाल तिच्या जखमेवर बांधला…. काय मेघा खाली बघून चालायच ना??? दिया घेऊन जा नीट हिला आता आराम कर थोडा ….. रोहन म्हणाला…..

विक्रम अजूनही तिला न्याहाळत होता…. न बोलुन दोघांचीही नजर खूप काही सांगून जात होती….

हा हा म्हणता लग्न फार व्यवस्थित पार पडल…. लग्नानंतर पाचसहा दिवस तिथेच राहून उरलेल्या विधी पूर्ण करून रेवती आणि प्रमोद direct हनिमूनला जाणार होते….. त्यांच्या जवळच्या मित्रांनीच तसा पॅकेज त्यांना गिफ्ट दिला होता…..

मेघाला काही कामामुळे लवकर निघाव लागल…. तिने पॅकिंग केली आणि एअरपोर्टसाठी कॅब बुक केली…. कॅब येताच सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली…..


पंधरा मिनिटांनी आणखी एक कॅब आली….. मेघाला एअरपोर्टवर नेण्यासाठी… तो कॅब ड्रायव्हर विक्रमला भेटतो आणि सांगतो… दियाही तिथेच असते…. विक्रम आणि दिया काळजीत पडतात…. विक्रम बाइक घेऊन मेघाला शोधायला निघतो…. घरी सगळे घाबरतील म्हणून दिया आणि रोहन इतक्यात कोणाला काही सांगत नाही….

विक्रम बाइक घेऊन थेट एअरपोर्टच्या दिशेने निघतो… अधून मधून तिला फोनवर contact करण्याचा प्रयत्न करत असतो…. पण तिचा फोन बंद येतो… या पंधरा मिनिटांत नक्की काय झालंय काहीच कळायला मार्ग नव्हता… एअरपोर्टवर पोहचण्यासाठी लागणारा तासाभराच अंतर विक्रमने अर्ध्या तासात पार केला होता…. इथे रोहन आणि दिया सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते….

विक्रम एअरपोर्टवर सर्वत्र चौकशी करतो पण मेघाचा काहीच पत्ता लागत नाही…. सतत रोहन आणि दियाला सुद्धा संपर्कात ठेउन असतो…. विक्रमच्या मनात मेघाबद्दल भीती वाटायला लागते….. दुपारपासून मेघाला शोधता शोधता रात्रीचे नऊ वाजतात…. इथे घरी सगळे विक्रम कुठे गेला म्हणून विचार करतात तस रोहन काहीतरी काम सांगुन वेळ मारून नेतो…. दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडतच होता…. आज आत्ता अचानक पावसाने जोर धरला होता …..

एका चहाच्या टपरीवर येऊन विक्रम थांबला…. तिथे पण मेघाचा मोबाईल मधला फोटो दाखवत तिची चौकशी करू लागला…. पावसात तो पूर्णपणे भिजला होता… गार वाऱ्याची थंडी घालवण्यासाठी तो तिथेच थांबून चहा पीत बसला….. पावसाचा जोर वाढत होता…. म्हणून टपरीवालाही घरी जाण्याच्या घाईत होता…. सहज विक्रमला आठवले की त्याच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मित्राकडे Location tracking device आहे…. आहे म्हणजे त्या device च काम सुरू आहे… विक्रमने त्याची मदत घेण्याच ठरवल पण तो अशा ठिकाणी होता जिथे मोबाईलला रेंजच नव्हती…. तो परत घराच्या दिशेने मेन रोडवरून निघाला…..

थंडीने आता त्यालाही कापरी भरली होती पण तरीही मेघाला शोधण्याची वेगळीच ओढ लागली होती…. भर पावसात बाईक वेगाने चालवणं शक्य नव्हतं म्हणुन तो normal गतीने चालला होता…. आसपास नजर फिरवत होता की कुठेतरी मेघा दिसेल… असच जाता जाता रस्त्याच्या कडेला कोणीतरी पडलेल त्याला दिसल…. त्याने बाईक थांबवली आणि तिथे जायला लागला…. एकीकडे मेंदू पुढे जाण्यास नकार देत होत कारण येवढ्या पावसात अशा सामसूम ठिकाणी कोण का येईल…. कुणी लुटारू टोळी असली तर???? पण दुसरीकडे मन म्हणतं होत की न जाणो मेघाला अशी मदत लागली तर कोणीतरी करावी कदाचित आपली पुण्याई तिच्या कामी येईल…

विक्रम जवळ जाऊन बघतो तर ती एक स्त्री असते हे त्याच्या लक्षात येत… ती अक्षरशः चिखलात माखलेली होती…. ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नसतो…. आणखी जवळ जाऊन तिला सरळ करताच तो चमकतो…. कारण ती मेघा असते….. एक क्षण त्याला खूप आनंद होतो पण तिची अवस्था बघता तो थोडा काळजीत पडतो…. तिला उचलून बाईकवर बसवतो पण तिची शुद्धच हरपल्यामुळे थोड कठिण होत…. तो स्वतःचा शर्ट काढतो त्याला दोरी सारख पीळ घालतो आधी तिला बाईकवर बसवून स्वतः पूढे बसतो आणि त्या शर्टने तिला आपल्या पाठीवर घट्ट बांधून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहघण्याचा प्रयत्न करतो….

धो धो पावसामुळे रस्ता सुद्धा नीट दिसत नव्हता…. इतक्यात विक्रमचा फोन वाजू लागला पावसात रिंगटोन तर ऐकू येत नव्हती पण vibration मूळे कळाल….. गाडी थांबवून तो फोन रिसीव्ह करतो…. गावाच्या जवळपास आल्यामुळे मोबाईलने रेंज पकडली होती….

रोहन : Hello….. विक्रम??? कुठेस तु??? काही पत्ता लागला का मेघाचा आणि पावसात कुठेस??? काळजी करत आहेत सगळे…. आत्ता कुठे तुझा फोन लागलाय….

विक्रम : Relax…. मेघा भेटली पण तिची कंडीशन खूप खराब आहे…. मी नंतर सविस्तर सांगतो…. आम्हाला घरी पोहचायला बराच वेळ लागेल आणि पावसाचा जोर बघता सगळच कठीण आहे….

रोहन : okk मला सांग सध्या तुम्ही कुठे आहात???

विक्रम त्याला तो उभा असलेल्या गावच्या ठिकाणाच नाव सांगतो…. अनायसे त्या गावी रोहनचा डॉक्टर मित्र राहत असतो…. तो विक्रमला तिथे जाण्याच सुचवतो…. आणि स्वतः त्या मित्राला विक्रम मेघाच्या येण्याची कल्पना देऊन ठेवतो….. मेघाची हालत बघता या पावसात दुसरा कोणताच पर्याय नसल्याने विक्रम रोहनच्या डॉक्टर मित्राकडे जातो…. डॉक्टर दारातच त्यांची वाट बघत असतो…. विक्रमला येताना बघून तोही धावत त्याच्याजवळ जातो आणि मेघाला सावरतो… दोघे मिळून मेघाला आत घेऊन येतात…. डॉक्टरच्या दोन मजली घराची care taker बाजूलाच राहत असते… तिच्या मदतीने मेघाचे ओले कपडे बदलून मेघाला आतल्या खोलीत बेडवर झोपवतात….

डॉक्टर : विक्रम…. मी तिला injection दिल आहे… तिला लवकरच बर वाटेल… तिला आराम करु देत… बाकी सगळं normal ahe…. देवाच्या कृपेने तिच्या सोबत काहीही वाईट घडलेल नाहीए… So calm down…

विक्रम : Thank you so much doctor…. देवासारखे भेटलात….

डॉक्टर : आता तुही चेंज करुन घे… त्या कपाटात माझे काही कपडे आहेत ते घे… तुही खूप भिजलायस…. By the way… मला हॉस्पिटलला निघायला हवं माझी night shift आहे… सकाळी भेटू …

येवढ बोलून डॉक्टर निघून जातो…. विक्रम कपडे बदलून येतो…. आणि मेघाचा हात हातात घेऊन तिचा निरागस चेहरा न्याहाळत तिथेच तिच्या उशाजवळ बसतो….

मेघाचा हात हातात घेऊन तिचा निरागस चेहरा न्याहाळत तिथेच तिच्या उशाजवळ बसतो…. शरिर थकल्यामुळे त्यालाही झोप लागते…. तो तिथेच मेघाचा हात हातात घेऊन बसल्या बसल्या झोपून जातो…..

इथे रोहन, दियाला मेघा सापडल्याच सांगतो….. घरी सगळे काळजीत पडतील म्हणून ते दोघे घरी काहीच सांगत नाही…. मेघा आणि विक्रम घरी आल्यावर सगळं खरं सांगायचं अस ते दोघे ठरवतात….

सकाळी विक्रमला जाग येते तेव्हा अजूनही अंधार पडलेला असतो…. तो घड्याळात पाहतो तर आठ वाजलेले असतात… तो खिडकी उघडून बघतो तर सर्वत्र पावसामुळे अंधार पडलेला असतो…. बाहेर अजूनही धो धो पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणी भरलेल असत….

विक्रम मागे वळून बघतो तर मेघा अजूनही झोपेत असते… तो तिलाच एकटक न्याहाळत असतो… इतक्यात मेघाला जाग येते…. आसपास नजर फिरवते तर सगळच अनोळखी असतं …. विक्रम तिच्या जवळ जाऊन बसतो…. त्याला बघताच तिचा जीव भांड्यात पडतो….

विक्रम : कशी आहेस मेघा??? तुला बरं वाटतंय ना???

(तशी मेघा विक्रमच्या गळ्यात पडून रडायला लागते, तिच्या मिठीत येताच विक्रमलाही वाटल की आपण आलिंगन द्याव… पण त्याने फक्त तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला…)

विक्रम : मेघा… शांत हो… मी आहे ना इथे… Hmm… Please calm down…. (तिच्या डोक्यावरुन हळूवार कुरवाळत)

मेघा : (अजूनही प्रचंड घाबरलेली विक्रमच्या मिठीत) रडतच होती…

विक्रम : (विक्रमही काही वेळ तीला मोकळ होउ देतो)

मेघा….ए मेघा…. ए वेडाबाई….. मी आलोय ना…. काळजी करू नको…. शांत हो आधी…. तु थांब मी तुझ्यासाठी first class coffee घेऊन येतो….

एव्हाना तिच्या लक्षात येत की ती नकळत विक्रमच्या मिठीत विसावली… .

मेघा : (विक्रमच्या मिठीतून स्वतःला सावरत नजर चोरते…..) I am sorry…

विक्रम : It’s okay… मी coffee घेऊन येतो….

मेघा उठून फ्रेश व्हायला जाते पण पायात चमक भरल्याने तिला चालता येत नव्हते…. इतक्यात विक्रम कॉफी घेऊन येतो…..

विक्रम : काय झालं?? (तिला धडपडताना बघून)

मेघा : कदाचित पायात चमक भरली आहे…

विक्रम : हममम् बस इथे… कॉफी घे आधी….

मेघा : Thanks…

विक्रम : Thanks काय त्यात…. कॉफीच तर आहे….

मेघा : कॉफीसाठी नाही…. Thanks for everything….

(दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात… काही सेकंदात भानावर येऊन )

विक्रम : बघू कुठे पाय मुरगळला ते….

मेघा : आपण कुठे आहोत??? आणि तु मला कस शोधलस???

(मग विक्रम कालपासून ते आत्तापर्यंतचा सगळा घटनाक्रम मेघाला सांगतो… )

मेघा : माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला…

विक्रम : बरं ते जाऊ दे…. काल नक्की काय झालं???

मेघा : काल कॅबमध्ये बसल्यावर काही अंतरानंतर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला…. मी त्याला गाडी थांबवायला सांगितली…. माझा विरोध बघून त्याने कसलासा स्प्रे माझ्या तोंडावर मारला…. त्यानंतर काय झालं मला आठवत नाही…. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी एका पडीक खंडरमध्ये होते….अंधार पडत आला होता… आसपास फक्त झाडी होती…. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण रस्ता काहीच कळत नव्हता…. माझा फोन, माझ सामान काहिच जवळ नव्हत… एका ठिकाणी सात ते आठ जंगली श्वापद होती मला बघताच माझ्या अंगावर धावून आली…. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळत सुटले… एका दगडावर ठेच लागून पडले… कदाचित त्यातच माझा पाय मुरगळला असावा…. पण जीव वाचवण्याच्या नादात त्यावेळी कळल नाही…. त्यातच पाऊससुद्धा सुरू झाला… मी नक्की कुठच्या दिशेने चालले आहे हे पण माहित नव्हतं…. मी पूर्णपणे घाबरले होते…. धावून धावून पूर्ण थकले होते…. भर पावसात माझा अवतार बघून मेन रोडवर कोणी गाडीही थांबवत नव्हत…. त्यातच मला कधी ग्लानी आली माहित नाही…. आता जाग आली तेव्हा तुम्ही समोर दिसलात आणि जिवात जीव आला….

विक्रम : तुम्ही नाही तु म्हणं… तुम्ही पेक्षा तु जास्त जवळच वाटत….

मेघा त्याला बघत बसते….

विक्रम : (तिच्या डोळ्यासमोर टिचकी मारून) कुठे हरवलीस…. ??

मेघा : काही नाही (स्वतःशीच लाजते)

विक्रम : बाहेर जागोजागी पाणी भरले आहे सगळे रस्ते बंद आहेत… मगाशी डॉक्टरचा पण फोन येऊन गेला… तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे पावसामुळे तोही अडकला आहे….

अरे….. मी बोलत काय बसलोय?? किचनमध्ये आपल्या खाण्याचा बंदोबस्त करतो… तु आराम कर….

(आणि तो किचनमध्ये निघून जातो)

थोड्यावेळाने मेघाही तिथे येते…. विक्रम खाण्यासाठी काय बणवता येइल किंवा आता काय available आहे ते बघत असतो…. मेघा किचनच्या दारातूनच बघत असते…. रोहनने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर unmarried आहे म्हणजे घरात काही उपलब्ध असणं कठीण होत …. तो फ्रीज उघडून बघतो तर त्यात ब्रेडच पॅकेट आणि अंडे, जॅम, बटर हेच थोड्याफार प्रमाणात होत… ओट्यावर बास्केटमध्ये चार पाच मॅगीचे पॅकेट होते…. काल दुपारपासून उपाशी त्यामुळे भूक तर खूप लागली होती…. मस्तपैकी अंडाब्रेड खाण्याचा बेत केला आणि तयारीला लागला…. मेघा लांबूनच हसत होती…. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून तो तिला आधी ओरडू लागला….

विक्रम : ( काळजीपोटी थोडस रागात ) मेघा….. तुला आराम कर सांगितले होते ना….??

मेघा : मी आता बरी आहे… आण ते.. मी ओमलेट बनवते…

विक्रम : का?? माझ्या हातच खाल्याने पोट बिघडणार नाहीए. …

मेघा : काय माहीत मला थोडीच त्याचा अनुभव आहे. . (विक्रमला चिडवत)

विक्रम : हो का?? ( ओमलेट बनवता बनवता) मग आज खाऊनच बघ…

मेघा : हो मग.. खावाच लागेल… दुसरा पर्याय नाही ना (लटकेच गोड हसत)

दोघेही टेबलवर नाश्ता करायला बसतात

मेघा : छान झालाय पण… मीठ टाकायचे राहून गेले…

विक्रम : खरचं?? बघू… (आणि तो ओमलेट पाव खाऊन बघतो) काहीही……. बरोबर आहे सगळं…

मेघा : हो…. बरोबरच आहे सगळ (उगाच विक्रमला चिडवत)

दोघेही हसत खेळत नाश्ता संपवतात…. विक्रम सगळ आवरून ठेवतो…. मेघा बाहेरचा अंदाजा घेण्यासाठी बाल्कनीत जाते…. पावसाची सर तिच्या अंगावर येते…. गार वाऱ्याची झुळूक मनाला भुरळ घालून जाते… आपले दोन्ही हात पसरवून ती त्या पावसाचा आनंद घेत असते… तिला भिजताना बघुन विक्रम तिला आत ओढतो… अडखळल्यामुळे तोल जाऊन ती विक्रमवर पडते, विक्रम बाजूच्या सोफ्याचा आधार घेत तिला सावरतो…

त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध तिला भुरळ पाडतो… दोघाची नजरभेट होते…. या नजरभेटीत दोघेही हरवून जातात… Land-line वर फोन वाजल्यामूळे दोघे भानावर येतात… विक्रम मेघाला सावरून सोफ्यावर बसवत फोन उचलतो… रोहनचा फोन असतो…. रोहनला हालहवाल सांगून विक्रम फोन ठेवून देतो… अशीच गप्पांमध्ये संध्याकाळ कधी होते कळतच नाही…. मेघा कॉफी घेऊन येते…. विक्रम मोबाईल Bluetooth ला कनेक्ट करुन गाणी लावतो…. बाहेर पडणारा पाऊस.. गार वारा.. आणि रेडिओवरील रोमँटिक गाणे… आहाहा काय योग जुळून आला होता…. रेडीओवाले पण अशा पावसात खूप छान गाणी लावतात…


सावन बरसे तरसे दिल क्‌यूं ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा है ये प्यार नहीं तो क्‌या है
देखो कैसा बेकरार है भरे बाज़ार में
यार एक यार के इंतज़ार में
सावन बरसे तरसे …

दोघांनाही अशा वातावरणात अशा प्रकारची गाणी ऐकायला खूप आवडतात हे दोघांनाही आज माहीत झाल होत…


रिमझिम रिमझिम, रुमझुम रुमझुम
भीगी भीगी रुत में, तुम हम, हम तुम
चलते हैं, चलते हैं

एका मागून एक गाणं वाजत होत आणि अचानक एक नवीन गाण सुरू झाले… मेघा गाण्याचा आवाज वाढवण्यासाठी उठते.. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिच्या गालावरची केसाची बट उडत असते… अशा वातावरणात अशी सुंदर गाणी ऐकल्यावर कोणाचाही मूड बदलेल… तसच काहीस दोघांचही झाल होत… एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेम भावना उफाळून येत होत्या…. आणि अशात गाणं कानावर पडत

भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में

ऐसी बरसातों में, कैसा लगता है

ऐसा लगता है, तुम बन के बादल

मेरे बदन को भीगों के मुझे छेड़ रहे हो

मेघा डोळे बंद करून हे गाणं अनुभवत असते… मंत्रमुग्ध असतानाच डोळे उघडते… अगदी समोर विक्रम उभा असतो… मेघा वळून खिडकीजवळ पाऊस न्याहाळते… मुरगळलेल्या पायामूळे धडपडणार तोच विक्रम तिला दोन्ही हातांनी धरतो…


बरखा से बचा लूँ, तुझे सीने से लगा लूँ, आ छुपा लूँ
दिलने पुकारा देखो, रुत का इशारा देखो
उफ़ ये नजारा देखो, कैसा लगता है
ऐसा लगता है, कुछ हो जायेगा
मस्त पवन के ये झोंके सैय्य़ा देख रहे हो

मेघाला आपल्या दिशेने वळवतो…. मेघा हळूच त्याच्या मिठीत शिरते…. तोही तिला अलगद आपल्या मिठीत सामावून घेतो… त्या गाण्याच्या तालात असेच हरवून जातात…. त्याच्या ह्रृदयाची धडधड वाढायला लागते जी तिला स्पष्ट ऐकू येऊ लागते… त्याच्या स्पर्शाने तिच्याही अंगावर शहारे आले होते… पण जगातली सर्वात सुरक्षित जागा हीच आहे याची खात्री तिला होती… प्रेम कितीही उफाळून आल असल तरी प्रणयाची सीमारेषा त्यांनी ओलांडली नव्हती…. दोघेही असेच नंतर सोफ्यावर बसून होते… ती त्याच्या मिठीत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत कधीच झोपी गेली होती…..

सकाळपर्यंत पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता… रस्त्यावरच पाणीही कमी झाल होत… आता घरी निघायला हरकत नाही या विचाराने डॉक्टरचा निरोप घेऊन दोघे बाईकने निघतात… मेघा अजूनही गालातल्या गालात लाजत असते…. आज घरी जाऊन आईबाबांना सांगून मेघाला आपल्या पास्ट बद्दल सगळं खर सांगून प्रपोज करायच विक्रमने ठरवल होत…. मेघाही खूप खुश होती…. तिनेही आपल्या भावना विक्रमला सांगण्याच ठरवल होत….

गाडी एकदाची विक्रमच्या आजोळी येऊन थांबते…. सकाळीच रोहन आणि दियाने मागच्या दोन दिवसाचा सारांश घरी आईबाबांना आणि रेवती, प्रमोदला सांगितला होता…. सगळे वाटच बघत होते… मेघा आणि विक्रम घरात येतच होते…. इतक्यात समोरून शिखा येते… आल्या आल्या विक्रमला मिठीमारून ओठांवर हलकेच किस करते….. तिच्या येण्याने विक्रमला धक्काच बसतो… तो स्तब्ध होऊन जातो…

मेघा त्यादोघांना अशाप्रकारे एकत्र बघून तिथेच थांबते.. बाकीचे मेघा जवळ जाऊन ती ठीक असल्याची विचारपूस करून मेघाची शिखा सोबत ओळख करून देतात….

शिखा : Hiiii मेघा…. मी शिखा…. विक्रमची बायको…

मेघा फक्त बघत बसते…. प्रमोद येऊन मेघाला मिठी मारतो.. .

प्रमोद : दी!! कशी आहेस?? चल तु.. आधी आत चल…

प्रमोद मेघाला हात पकडून आत घेऊन जातो… पण मेघाची नजर विक्रमवरच स्थिरावते… इथे शिखा अजूनही विक्रमचा दंड घट्ट धरून आहे…. पण विक्रम मात्र मेघालाच पाहतोय…

सगळे आत निघून जाताच विक्रम शिखाला दूर लोटतो… .

विक्रम : का आली आहेस परत??

शिखा : (लाडात येऊन) अस नको बोलू ना… (मागून येऊन मिठी मारून) मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय…

विक्रम : Really??? आज दहा वर्षानंतर कळल तुला?? सगळकाही तुझ्या मनासारख घडत होतं तरी निघुन गेलीस… प्रेम करत होतो आपण एकमेकांवर… मग माझा विचार न करताच निघून गेलीस….

शिखा : I am sorry…. मूर्खपणा केला मी…. नितीनच्या खोट्या प्रेमाने भुरळ घातली होती मला… पण आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीए….

विक्रम सरळ खोलीत निघून जातो… इथे आई बाबा सगळेच मेघाच्या अवतीभोवती आहेत…

आई : (मेघाच्या डोक्यावर वात्सल्याचा हात फिरवत) मेघा आता जास्त विचार करू नकोस… आराम कर… मी सर्वांसाठी पानं वाढायला घेते… जेवन करून घ्या सगळे…

बाबा : आणि आता मेघाला जास्त कोणी प्रश्न विचारू नका…

रेवती : आई मी पण येते ग मदतीला… (आणि रेवती किचनमध्ये निघून जाते)

दिया : मेघा….

बाबा : दिया तु विक्रमला बोलावतेस का जेवायला???

दिया : हो आलेच मी….

शिखा : (मेघा जवळ येऊन) काय ग मेघा… Any Problem?? तु नेहमीच अशी गप्प असतेस का??? (शिखाला अजून काहीही सारांश माहीत नाही…. )

बाबा : मेघा बेटे जा तू….. फ्रेश होऊन ये जा….

(आणि मेघा जाते) शिखा…मेघा आत्ताच आली आहे… जा आवरून ये… नंतर निवांत गप्पा मारा…

शिखा : OK… I don’t mind…

बाबा : रोहन…. पोलिसांना काही माहिती हाती लागली??

रोहन : नाही अजून… त्यांचा तपास सुरू आहे….

सगळे जेवायला बसतात…. आणि त्यांच्या गप्पा टप्पा सुरू होतात… मेघाच्या अगदी समोरच्या खुर्चीवर शिखा बसते… विक्रमही येतो… त्याच्यासाठी शिखाच्या जवळची खुर्ची रिकामी असते तो नाइलाजाने तिथे बसतो… शिखा सारखी विक्रमच्या मागे… हे वाढू का? ते वाढू का?? असच सुरू होत…. विक्रममात्र तिला avoid करत होता…. मेघाच जेवणात अजिबात लक्ष नव्हत…. विक्रमचीही काहीशी तीच परिस्थिती होती… बाबांनी हे बरोबर हेरल पण आता शांतच रहाण पसंत केल….

मेघा : आईबाबा उद्या मला निघायला हवं. …म्हणजे इथले सगळे functions संपले आहेत.. आता पुढची तयारी करायला मला जाव लागेल….

आई : अग पण काय घाई आहे…. उद्या रेवती आणि प्रमोद हनीमूनला फिरायला जाणार आहेत… तु एकटी घरी कशी रहणार त्यापेक्षा पाच दिवसांनी आमच्या सोबतच नीघ.. ..

मेघा : नको आई तिथे खूप काम खोळंबली आहेत…. मला जाव लागेल…. (कंठ दाटून )

शिखा : Mom म्हणतायत तर रहा ना… अजून आपली नीट ओळखही झाली नाहीए…. विक्रम तुच सांग ना आता…

आई : हो विक्रम तुच सांग… तुझ नक्की ऐकेल….

विक्रम : (मेघाला सगळं सविस्तर सांगता येईल या विचाराने) थांब ना मेघा…. Please… (जीवाच्या आकांताने)

मेघा : (डोळ्यातील अश्रूंचा बांध आवरता न आल्याने) जेवन अर्धवट सोडून जाते… )

दिया : मेघा. … अग….

तिला तस जाताना बघून विक्रमही बैचेन होउन उठुन जातो….

आई : अरे सोन्या आता तुला काय झालं ??

बाबा : जाऊ देत… थकले असतील दोघे…. तुम्ही जेवा सगळे….

दिया : (रेवतीच्या कानात हळूच कुजबूजते) यावेळेला मी जोडी जुळवायच्या आधीच जोडी जमली की काय ??

रेवती : Shut up दिया… It’s not possible… But … जर अस असेल then it’s very difficult to भाई…. (काळजी करत)

दिया : हममम् (काहीसा विचार करत) मी जाऊन बघते मेघाला …

दिया मेघाला भेटायला जाते तेव्हा ती गच्चीवर एकटीच विचारात गुंग असते…. (दिया मागून येऊन तिला घाबरवत)

दिया : काय ग कुठे हरवलीस??? आल्यापासून बघतेय…..

मेघा : ना…. काही खास नाही….

इतक्यात रेवती आणि रोहनही तिथे येतात….

रोहन : मला कोणी सांगेल हे शिखाच काय मॅटर आहे….

दिया : ए डफ्फर मॅटर काय?? काहीही???

रोहन : अरे म्हणजे विक्रमच लग्न झालं आहे हे कधी बोलला नाही तो…. आणि ही आज एकदम इथे उगवली म्हणून विचारलं…..

रेवती : मी सांगते…. Actually… शिखा आणि भाई एकाच कॉलेजमध्ये होते…. भाई last year आणि शिखा first year ला असताना त्यांची ओळख झाली… तिथेच भाईने तिला प्रपोज केलं आणि शिखाच कॉलेज संपल्यावर दोघांनी लग्न केलं…. बाकी त्यांची लव स्टोरी डिटेलमध्ये सांगण्यात मला अजिबात interest नाही… कारण ते खरच प्रेम होतं अस मला नाही वाटत… शिखा आपल्या आजी आजोबांकडे वाढली… Her parents was separated… तरी लग्न सगळयांच्या सहमतीने झाले होते…. सगळकाही हिच्या मनासारखच केल होत…. Catholic wedding, Europe tour, येवढच काय तर लग्नानंतर वेगळ घर आणि वेगळा संसार सुद्धा… दिवसभर फक्त शॉपिंग, फिरण आणि पार्टी, रात्री उशिरा घरी यायच… हेच lifestyle….. नवीनच लग्न झाले आहे जबाबदारी सांभाळायला थोडा वेळ लागेल… म्हणून भाई सगळं ignore करत होता….

एक दिवस अचानक शिखा चक्कर येऊन पडली… डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर कळलं…. की, she’s pregnant… भाई तर जाम खुश झाला होता…. तिला कुठे ठेवू, नी कुठे नको अस झाल होत, त्याने घरी कळवल्यावर आई सुद्धा भाईकडे रहायला गेली…. specially शिखाची काळजी घेण्यासाठी….

दोन चार दिवस सगळं ठीक होत…. पण. ..

शिखाच्या मनात वेगळच चालू होत…. आजी आजोबांकडे थोडे दिवस रहायला जाते सांगून हि मैत्रिणीकडे रहायला गेली…आजी आजोबा घरी आले होते शिखाच अभिनंदन करायला तेव्हा कळाल की ती खोट बोलून दुसरीकडेच कुठे गेली पण कुठे गेली आणि खोट बोलायची काय गरज होती हे ती आल्यावर सविस्तर कळल…. मैत्रीण आणि तिच्या boyfriend ची मदत घेतली, म्हणजे मैत्रिणीच्या boyfriend ला नवरा म्हणून खोटी सही करायला लावली आणि abortion करुन आली….

शिखाला बाळ नको होत… तिला तीची नेहमीची लाईफस्टाईल गमवायची नव्हती… भाईच आणि तिच खूप जोरदार भांडण झालं…. रागाच्या भरात भाईने तिला कानशिलात लगावली… पण नंतर अजून एक संधी द्यावी असा विचार करून तीची समजूतही घातली… पण शिखा…. हट्टी होती… .गेली आठवड्याभराने नोट लिहून….

Dear विक्रम,

मी जात आहे कायमची मला शोधण्याचा प्रयत्न करु नको… मला हवी असलेली lifestyle, माझ स्वातंत्र्य जगायला….So good bye…

शिखा….

त्या दिवशी जी गेली ती आज दहा वर्षांनी परत आलीए…. भाई खूप प्रेम करतो तिच्यावर…. आताही मनात आलं तर कदाचित तिला माफही करेल… शिखा भाईची निवड होती…. तिच्या बाबतीत सगळे निर्णय भाईच घेईल… म्हणून बाबाही शांत आहेत त्यांनी सर्व निर्णय भाईवर सोपवले आहेत…. त्याचा आनंद हाच आमचा आनंद….

इतक्यात शिखा तिथे येते…

शिखा : Hiiii… any secret meeting???? मी आल्यावर अगदी गप्प झालात सगळे….

रोहन : हो… मग काय?? (तिला चिडवत)

रेवती : (अगदी त्रासून) मी निघते… मला उद्याची packing करायची आहे….

दिया : रोहन आपण पण निघूया…. येतोस ना (आवाज वाढवून हलकेच रागात)

रोहन : हो हो.. . येतो ना …..

मेघाही जायला निघते तर शिखा तिला अडवते…..

शिखा : मेघा…. यार तु तरी बोल माझ्याशी…. बाकीच्यांचा राग मी समजू शकते पण…. It’s okay… Forget it…

तु काय करतेस ?? I mean professionally काय करतेस????

मेघा : Interior design करते मी….

शिखा : फक्त येवढच ना…

मेघा : घराला घरपण देते…. तुला नाही कळणार… मला आराम करायचा आहे येते मी….

शिखा : okkk…..

आणि मेघा निघून जाते….

रात्री सगळं आवरून सगळे आपाआपल्या खोलीत निघून जातात…. इथे शिखा विक्रमला मनवण्याठी पूर्ण तयारी करत असते… थोड्यावेळाने विक्रम खोलीत येतो…. दार उघडून बघतो तर संपूर्ण खोलीत मंद असा सुगंध दरवळत होता…. चहूबाजूंनी रंगबेरंगी candles प्रकाशत होत्या…. बेडवर छान गुलाबाच्या पाकळ्या सजवल्या होत्या…. आणि समोर शिखा होती…. गडद लाल रंगाचा शॉर्ट टू पीस गाऊन… केसांचा बांधलेला मेसी बन…. त्यातून चेहर्‍यावर दोन्ही बाजूंनी गालावर ओघळणारी केसांची शीर हलकेच उडत होती…. गडद रंगाची लिपस्टिक तिच सौदर्य खुलवत होती…. एकेकाळी याच सौंदर्याच्या प्रेमात पडला होता विक्रम…..

शिखाने विक्रम आत येताच मागून दाराला कडी लावली…. आपल्या मादक चालीत त्याच्या जवळ गेली… पटकन त्याच्या मिठीत शिरून बिलगली…. तो अजूनही स्तब्ध होता… त्याच्या शर्टाची कॉलर बाजूला करुन त्याचा मानेवर किस करायला जाणार तोच विक्रम तिला दूर करतो…. आणि बाहेर जाण्यासाठी दार उघडायला लागतो पण शिखा त्याला मागून घट्ट मिठी मारते…. तिच्या लाडिक सुरात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते….. पण विक्रम तिचे दोन्ही हात झटकून बाहेर निघून जातो…..

विक्रम बीचवर फिरत असताना त्याला काही अंतरावर मेघा दिसते…. वाळूत बसून छान निखळणारा समुद्राचा आवाज… आणि सुसाट वाहणाऱ्या वार्‍याचा गारवा यात आपल्याच विचारात गुंग होती…. तिच्या बाजुला काही अंतरावर रोहन आणि दिया गप्पा मारत बसले होते…

विक्रम हळूच जाऊन तिच्या बाजूला बसतो…. तोही एकटक त्या समुद्राच्या खळखळणार्‍या लाटांकडे पाहात असतो…. मेघा आणि विक्रमला एकांत मिळावा या हेतूने दिया आणि रोहन त्यांना सोडून फेरफटका मारायला निघून जातात…. विक्रम मेघाकडे वळुन बघतो…. ती शांत डोळे मिटून असते…

तो तिला बराच वेळ बघत होता…. मेघा तसच स्वतःला वाळूवर झोकून देते आणि डोळे उघडून निळाशार आकाशात चांदणे पहात बसते…. दोघेही शांतच… बोलायचं तर खूप काही आहे पण सुरूवात कुठून करावी इथेच सगळं अडल होत…..

विक्रम कुठे निघून गेला हे पाहायसाठी घरातून निघालेली शिखा त्याला शोधत शोधत बीचवर आली…. आणि लांबूनच तिने विक्रम आणि मेघाला एकत्र पाहिले….

विक्रम : मेघा मला तुला काही सांगायचे आहे….

मेघा : (उठून उभे रहण्याच्या तयारीत) मला माहीत आहे… रेवती कडून सगळं कळलय मला….

विक्रम : तु काहीच बोलणार नाही त्यावर….

मेघा : माझ्या बोलण्याने काय होणार आहे…. तुझी बायको परत आली आहे.. .. सगळ विसरून माफ कर तिला… After all तुझ प्रेम आहे तिच्यावर…. नव्याने संसार सुरू करा….

विक्रम : मेघा… आणि तु ???

मेघा : माझ काय विक्रम?? मी आली तशी जाणार….

विक्रम : (आश्चर्याने बघत बसतो… काहिच बोलत नाही)

मेघा : निघूया … उशिर झाला आहे खूप…

दोघेही घरी यायला निघतात…. समोर शिखा वाटच बघत असते…. त्या दोघांना एकत्र बघून रागाने लालबुंद होऊन खोलीत निघून जाते…. इथे मेघाही शांतपणे निघून जाते…. विक्रमचे बाबा लांबूनच सगळं पाहत असतात…. विक्रम तिथेच सोफ्यावर पाय पसरून, डोक्यावर हात ठेवून झोपून जातो….

सकाळी उठतो तेव्हा बाबा समोरच बसलेले असतात…. आई त्याला चहा आणून देते….

बाबा : विक्रम नात्यांमध्ये कधी संशय येऊ देऊ नये…. दोन दगडांवर पाय ठेवून चालण्यापेक्षा एकच काय तो निर्णय घ्यावा नेहमी… बाकी तुझा निर्णय तुच घ्यायचा आहे….

विक्रम : बाबा…. (एवढच काय ते बोलतो आणि बाबा उठून जातात)

रोहन : (नुकताच येतो ) अरे तु अजून ईथेच??? आवर लवकर प्रमोद आणि रेवती ला एअरपोर्टवर सोडायला जायच आहे…. आम्ही कधीपासून तयार आहोत…

विक्रम : आलोच तयार होऊन….

शिखा : ए मी पण येणार आहे….

दिया : आता हि कशाला?? ? (हळूच कुजबुजत)

शिखा : काही म्हणालीस का???

रोहन : नाही म्हणजे.. गाडीत जागा होणार नाही ना…. म्हणून (टेर खेचत)

शिखा : very funny (तोंड वाकडं करून)

रेवती आणि प्रमोद तयार होऊन येतात… देवघरात नमस्कार करून आई बाबांच्या पाया पडून निरोप घेतात…. विक्रमही तयार होऊन येतो…. इतक्यात रोहनचा मोबाईल वाजतो…

रोहन : Hello….

पोलिस : Hello…. Mr. रोहन… मेघा मॅडमच ज्याने अपहरण केल होत तो पकडला गेलाय…

रोहन : Great…., Sir…. पण काही कळल का त्याने अस का केल किंवा कुणाच्या सांगण्यावरून केल…

पोलिस : Actually हि सराईत चोरांची टोळी आहे… Functions च्या ठिकाणाची माहिती ठेवून असतात हे लोक… त्या कॅब एजंसीच्या माणसाला पण पकडले आहे आम्ही… तो एजंट ह्या टोळीला बुकिंगची माहिती पुरवायचा .. आणि ओरिजिनल कॅबवाल्या ऐवजी या टोळीची कॅब यायची….

रोहन : Ohhh my God…. हे तर जाम serious आहे…

पोलिस : हो… ह्यांचा मुख्य हेतू फक्त ऐवज लंपास करण्याचा होता… but don’t worry…. आता ते आमच्या ताब्यात आहेत…. I am sorry… पण त्याच्याकडून काहीच सामान हाती लागल नाही… हे चोर सगळं सामान ताबडतोब विकून टाकतात….

रोहन : It’s okay sir… सामानाच काही नाही… ते लोक पकडले गेले हे महत्त्वाचं…. Thank you… Thank you so much…..

पोलिस : My pleasure…. ( फोन ठेवून देतात)

रोहन फोन ठेवून सगळं संभाषण बाकीच्यांना सांगतो….

आई : देवच पावला बाई…. चला पोरांनो निघा आता खूप उशीर होतोय….

सगळे गाडीत बसतात…. रोहन पुढे ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला दिया… त्यांच्या मागे रेवती आणि प्रमोद… आणि सर्वात शेवटी मेघा, मध्ये विक्रम आणि त्याच्या बाजूला शिखा…. शिखा अगदी विक्रमला खेटून बसली होती… मेघाने आपल लक्ष खिडकीबाहेर ठेवणंच योग्य समजल….

एअरपोर्टवर पोहचल्यावर प्रमोद आणि रेवतीला निरोप घेऊन बाकीचे कॉफी शॉपमध्ये बसले कारण बाहेर नुकताच पाऊस सुरू झाला होता…. दिया, रोहन आणि मेघा एका टेबलवर बसले… विक्रम शिखाला घेऊन मुद्दाम दुसऱ्या टेबलवर बसतो… कारण मेघाच्या रात्रीच्या उत्तराने त्याचा इगो थोडा दुखावला होता… शिखा सोबत बघून किंवा त्याने तिला avoid केल तर ती चिडेल त्याच्याशी भांडेल अस विक्रमला वाटत होतं….

इथे कॉफी पीत असताना अचानक कुणीतरी मेघाला उत्साहाने हाक मारत… शिखा, विक्रम, रोहन, दिया सगळेच बघायला लागतात…

प्रितम : मेघा…?? मेघा सबनीस???

मेघा : प्रितम… Hiiii …. कसा आहेस आणि इथे कसा???

प्रितम : मी बसू का ईथे की उभ्यानेच उत्तरे देऊ…. (अगदी गमतीशीर माणूस)

मेघा : नाही म्हटलं तर नाही बसणार का???

दिया : तु already बसलायस.. ..

मेघा : कॉफी?? (प्रितमला आग्रहाने विचारते)

प्रितम : नेहमी प्रमाणे माझ्या choice ची…. या पावसातली..

मेघा : Cold coffee with ice cream??? Right???

प्रितम : तुला अजूनही माझी choice चांगली माहित आहे…

अशाच गमतीशीर खूप गप्पा रंगतात तिथे… विक्रम काहिसा मेघाच्या मित्रावर चिडलेला असतो कारण आधीच मेघा कालपासून दुर्लक्ष करत होती आणि आता या प्रितमच्या गप्पांमध्ये रंगली आहे….

विक्रम : (रागात) निघायचे का?? तुमच्या गप्पा संपल्या असतील तर???

प्रितम : I am sorry…. मी तुमचा बराच वेळ घेतला…. पण तुम्ही सगळे आज संध्याकाळी माझ्या बर्थडे पार्टीला येताय… Okkk. .. मी पत्ता पाठवतो what’s app वर.. .. You all are invited…. (प्रितम आणि मेघा फोन नंबर exchange करतात)

शिखा : (विक्रमला मध्येच अडवून) हो आम्ही नक्की येऊ….

सगळे बील पे करून निघतात… यावेळेस रोहन विक्रमला ड्राइव्ह करायला सांगतो…. शिखा त्याच्या बाजूला…. मधल्या सीटवर मेघा आणि सगळ्यात शेवटी रोहन आणि दिया….

शिखा : प्रितम छान मुलगा आहे नाही???

रोहन : हो…. एकदम jolly माणुस आहे…

दिया : हो ना असा गप्पा मारत होता जसा कित्येक वर्षांपासून आम्हाला ओळखतोय….

शिखा : मेघा आणि त्याची जोडी छान दिसेल… हो ना??

विक्रम कच् करून गाडीचा ब्रेक दाबतो…. आणि मिरर मधून मेघाला बघतो… मेघाही आश्चर्याने शिखाला बघते…..

शिखा : काय झालं??? येवढा कचकन ब्रेक लावलास???

विक्रम : काही नाही… दगड आढवा आला… (उगाच कारण देत)

विक्रम परत गाडी स्टार्ट करतो. … पण गाडी काही स्टार्ट होत नाही… तो परत दोन तीन वेळा सेल्फ मारतो पण नाही गाडी काही केल्या सुरू होत नाही…. म्हणून बाहेर पडून गाडी चेक करतो…. पण काही उपयोग होत नाही…. विक्रम पावसात भिजत असतो…. घर अजून वीस मिनिटाच्या अंतरावर असत म्हणून सगळे चालतच जाण्याचा विचार करतात…

दिया : Wow….. What a romantic climate….

रोहन : मग काय विचार आहे ??? (हलकेच हसून)

विक्रम : तिथे चहाची टपरी आहे… थोडा वेळ थांबूया तिथे…

रोहन : (टपरीवर) दादा सगळ्यांसाठी तंदूर चहा ….

दिया : एक नंबर चहा मिळतो इथे … त्यातल्या त्यात तंदुरी चहा तर क्लास आहे….

शिखा : Really ???

थोड्यावेळाने लाल मातीच्या छोट्या मटका आकाराच्या भांड्यात चहा हजर होतो… ते छोटस भांड दोन्ही हातांच्या ओंजळीत धरायच…. त्या भांड्याचा गार हाताला होणारा ऊबदार स्पर्श आणि वाफाळलेल्या चहाच सुगंध घेत, या कुडकुडणार्या गारव्यात, फूरर्र फूरर्र करत एक एक घोट करत चहा प्यायची मजा फार वेगळीच असते…

मेघा : खरचं खूप मस्त आहे चहा. …

शिखा : हो खरंच…. Owesome आहे….

रोहन : (त्या पावसात आपल्या गुडघ्यावर बसून तेच चहाच छोट मठक पुढे करून) दिया…. या चहाच्या सुगंधाप्रमाणे तुही माझ्या आयुष्यात दरवळत राहशील?? सगळ्यांच्या जोड्या जुळवता, जुळवता आज आपली जोडी जुळवून घेशील???

शिखा : How romantic… (अगदी लाडिक होऊन)

दिया : (आनंदाने) डफ्फर… मगाशी हेच माझ्या मनात होत… I love you yaarrr. …

रोहन खुश होऊन तिला उचलून घेतो… दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात…. वरुन पडणारा पाऊस आणि हवेतील गारवा याला आता नवीन ऊबेची गरज होती… दोघांचेही ओठ आता एकमेकांत गुंतलेले होते…. एकमेकांच्या श्वासात श्वास गुरफटत चालले होते…. थरथरणारं अंग नव्या जोमाने बहरायला लागल होत …. आणि टपरीवर एक गाण वाजत होत …

प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो

ऐतबार किसका है, इंतज़ार किसका है

अभी न हुआ तो फिर, कभी नहीं,कभी नहीं

प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो

विक्रम आणि मेघा समोरासमोर फक्त एकमेकांना पाहत बसले आहेत….

थोड्यावेळाने घरी पोहचल्यावर…

दिया : आत्तु….. ए आत्तु…. आम्ही आलो ग…

आई : (सगळ्यांना भिजलेले बघून ) लहान आहात का रे ?? अस पावसात भिजायला ??

रोहन : अहो गाडी बंद पडली.. . मग चालतच आलो…

बाबा : फोन करायचा ना… दुसरी गाडी पाठवली असती….

शिखा : उलट बर झालं गाडी बंद पडली ते… काय छान पाऊस पडतोय… मुड फ्रेश झाला. ..

आई : हममम् (जरा रागातच मान मुरडली)

सगळे आपापल्या खोलीत निघून जातात…. थोड्यावेळाने विक्रम शॉवर घेऊन बाहेर येतो नी तसाच खिडकीतून बाहेर न्याहाळत राहतो…. शिखा त्याचे ओले केस पाहून टॉवेलने पुसायला जाते….. विक्रम त्याच्या आणि मेघाच्या याच पावसातल्या आठवणीत रमलेला असतो त्याला भानच नसते की सोबत शिखा आहे…..

विक्रम : (त्या रात्रीतली मेघाने मारलेली मिठी आठवत शांत डोळे मिटून) I love you …. Please अशीच माझ्या मिठीत रहा…. हे क्षण असेच राहू देत ….

शिखा : Thank you विक्रम … याच शब्दांसाठी कान आतुरले होते माझे …. (त्याची मिठी अजून घट्ट आवळून)

विक्रम शिखाचा आवाज ऐकताच भानावर येतो, तिच्या पासून दूर होत बेडवर जाऊन झोपतो…

शिखा : काय झालय विक्रम???

विक्रम परत काहीही न बोलता बाहेर निघून जातो…. मागच्या अंगणात पाऊस न्याहाळत मेघा उभी असते…. तोही यिथे जाऊन उभा राहतो….

विक्रम : का आलीस माझ्या आयुष्यात??? मी माझ्या लाईफमध्ये समाधानी होतो…. का मला नव्याने प्रेम करायला भाग पाडलस…. का???…. बोल ना?? (मनात वादळ आहे काहीच कळायला मार्ग नाही हा त्याचाच राग आहे)

मेघा फक्त डोळ्यात पाहतेय, नक्की काय आणि कसं उत्तर द्याव हेच कळत नाहिए….

विक्रम : एकट्याने छान जगत होतो मी… मला तुझ्या प्रेमात पाडून, मला इथे एकट्यालाच झुरत ठेवलेस… याची शिक्षा मी एकट्याने का भोगावी..??

आणि मेघाला दोन्ही हातांनी घट्ट धरून तिला स्वतःकडे ओढतो…

मेघा : It’s hurting विक्रम…. (विक्रमच्या बोलण्याने आधीच डोळे पाणावले आहे… मनातल्या भावना व्यक्त करताना मनात एक भिती पण आहे)

विक्रम : Hurting??? मी पण hurt होतोय तुला दूर जाताना पाहून… प्रेमात झुरत राहण्याची शिक्षा मी एकटाच का भोगू???? ती शिक्षा तुलाही मिळायला हवी…..

येवढ बोलुन विक्रम मेघाला अजून जवळ ओढतो… आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवतो…. मेघा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते पण तो असफल ठरतो… आज त्या ओढीत परत एकदा दोघेही हरवून गेले… आता तिच्याही नकळत त्यांची मिठी घट्ट होत चालली होती… संपूर्ण वेळ त्यांच्यासाठी इथेच थांबली होती… काही वेळाने भानावर येऊन दोघेही वेगळे होतात…. इतक्यात…..

आई : (आतून आवाज देत) विक्रम ???? विक्रम लवकर ये…. रोहन??… रोहन???

आईच्या हाकेला ऐकून सगळे जमा होतात… समोर शिखा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडली होती आई तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या…. रोहन गाडी काढ.. (विक्रम म्हणाला )….तिला अस पाहून सगळेच घाबरतात…. विक्रम तिला उचलून गाडीत नेतो…. गाडी थेट हॉस्पिटलला रवाना होते…. मागोमाग दिया आणि मेघा सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल होतात…..

डॉक्टरांची तातडीने हालचाल सुरू होते… रोहनचा डॉक्टर मित्र तिथेच असल्याने उपचारात जोर धरला जातो…. विक्रम आणि बाकीचे सगळे डॉक्टरांना विचारणा करतात…. शिखा कसल्याशा जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास येते.. आणि तिला ताबडतोब मुंबईला शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात… विक्रमच्या तर पायाखालची जमीनच सरकते… शिखाला मानसिक आधाराची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात…. विक्रम सगळी परिस्थिती घरी सांगतो आणि सगळे मुंबईला रवाना होतात….

विक्रम शिखाच्या आई वडिलांना बोलावून घेतो… ते वेगळे झाले असले तरी मुलीसाठी पहिल्यांदा एकत्र आले होते….शिखा अजूनही विक्रमची बायको होती… तिने जरी पूर्वी तिची कर्तव्ये नाकारली असली तरी शिखाच्या आजी आजोबांना दिलेल वचन विक्रम कसा विसरणार होता…”आमच्या नातीला आईवडीलांचा सहवास नाही लाभला…तुम्ही प्रेमाने लग्न केले आहे… शिखा थोडी अल्लड आहे पण तु समजदार आहेस… तु तिला अतंर देऊ नकोस वचन दे आम्हाला….” आज ते या जगात नाही… असते तर त्यांना माझ्या मनाची घालमेल नक्कीच कळली असती….

एक महिना झाला शिखा आता हळूहळू पूर्वपदावर येत होती…. घरी तिची खूप काळजी घेतली जात होती…. विक्रमही तिला कसलीच कमी पडू देत नव्हता….. नवरा म्हणून असलेली सगळी कर्तव्ये तो चोख पार पाडत होता…. पण मनात मेघाची आठवण अजूनही कायम होती….

इथे मेघाने सर्व आठवणी मनातच दडवून आपल्या पूर्वायुष्याला सुरुवात केली होती…. विक्रमच्या आठवणीचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःला कामात व्यस्त करुन घेतले होते… यातच मेघाला मोठा contract मिळाला US च्या कंपनीचा… त्यामुळे ती सहा महिन्यांसाठी US ला स्थाईक झाली होती….. रेवती आणि प्रमोद यांचा संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता…..

आज सहा महिन्यांनंतर मेघा परत येतेय…. प्रमोद आणि रेवती दोघेही तिला आणायला एअरपोर्टवर गेले होते…. मेघा दोघांनाही बघून खूप खुश होते….

प्रमोद : दी…. आज घरी surprise party आहे… तुझ्यासाठी……

मेघा : Ohhh Wow…. अरे पण याची काय गरज होती…

रेवती : छोटासा get together आहे… दी….

मेघा : okkk….

मेघा घरी आल्यावर पाहते तर अगदी पार्टी वातावरणात घर सजवल होत… रोहन आणि दिया आधीच हजर असतात… दोघांना भेटून तिला फार बरं वाटतं…. मेघा फ्रेश होण्यासाठी रुम मध्ये जाते… बाहेर आल्यावर पाहते तर आई, बाबा आणि विक्रम बसलेले असतात…. बाजुला रोहन आणि दिया सुद्धा उभे असतात… विक्रमला बघताच जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या… नकळत डोळे भरून आले… पण कोणालाही तस जाणवू न देता ती आई बाबांना वाकून नमस्कार करते ….

मेघा : कसे आहात आई बाबा?

आई : आम्ही सगळे मस्त आहोत… आज खास तुझ्यासाठी आलो आहोत…

मेघा हलकेच हसून प्रतिसाद देते…. विक्रम अजूनही शांत बसून आहे… दोघांचीही नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही….

बाबा : मेघा तुझी हरकत नसेल तर हा!!! आम्हाला तु सून म्हणून पसंत आहेस…. आज आम्ही तुला लग्नाची मागणी घालतो आहोत….

विक्रम आणि मेघा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो….

प्रमोद : (मेघाचा हात हातात घेऊन ) दी…. हेच सरप्राईज होत तुझ्यासाठी….

आई : मेघा आज तुमच्या दोघांसाठी आम्ही हा सरप्राइज प्लान केला…. शिखा आता या जगात नाही… दोन महिने झाले…. पण जाण्याआधी तिने तुम्हा दोघांविषयी मला सांगितले….. येवढच नाही तर तिने तुझीही माफी मागितली… ती ज्या आजाराने ग्रस्त होती त्याविषयी तिला आधीपासूनच माहित होते… पण जाण्यापूर्वी तिच्याबद्दल कोणाच्याही मनात सल राहू नये म्हणून तिने सर्वांची मने जिंकण्यासाठी नव्याने सुरुवात केली…. आणि आपले शेवटचे क्षण आनंदाने घालवण्यासाठी ती इथे आली होती… तिला माहीत होतं की विक्रमच तिच्यावर खूप प्रेम होत आणि त्यामुळे तो तिला नक्की माफ करेल…. तुम्हा दोघांना एकत्र बघून तिला त्याच वेळी खात्री पटली होती आणि म्हणून काही दिवस सोबत राहून ती परत जाणार होती पण त्याआधीच तिच्या आजाराबद्दल आपल्याला कळल…. तिने विक्रमची देखील माफी मागितली की शेवटच्या क्षणीही स्वार्थ साधला म्हणून… हे सगळं तिने मला त्या वेळेस सांगितलं जेव्हा ती ventilator वर शेवटचे श्वास घेत होती….

विक्रम : आई??? मग मला का नाही सांगितलं इतके दिवस….

आई : तुम्ही तरी कुठे आम्हाला काही सांगितल….आणि जर सांगितलं असतं तर आजचा सुखद धक्का कसा अनुभवला असता….

बाबा : आता झाल गेल सोडून देऊया…. आता तुम्हाला जास्त वाट बघायला न लावता… आज, आत्ता , इथे तुमची Ring ceremony पण करूनच टाकू आपण काय ??

(आणि सगळे हसायला लागतात….)

मेघा एकदम लाजते… आता तिची नजरभेट व्हावी म्हणून विक्रमही उत्सुक आहे….

दिया आणि रेवती… मेघाला तयार करण्यासाठी घेऊन जातात….पण विक्रमला आधी एकट्यात तिला भेटायचे होते… तो तिची तयार होण्याची वाटच पहात खोली बाहेर उभा होता … रेवती आणि दिया बाहेर आल्यावर विक्रम आत जातो….

हिरवीगार पेशवाई सिल्क साडी नेसून, केसात आबोली आणि मोगऱ्याचा गजरा माळला होता तिने … समोरच्या खुर्चीत खाली मान घालून बसली होती मेघा … विक्रम तिच्या जवळ जातो.. आपल्या गुडघ्यावर बसतो…. उजव्या हाताच्या दोन बोटांनी तीची हनुवटी अलगद वर उचलतो…पापण्या अजूनही झुकलेल्या, त्या पापण्यांवर गुलाबी रंगाचा आय शॅडो, काळ्या रंगाचा आयलायनर, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक, नाकात नाजूक नथ, माथ्यावर छोटीशी बिंदी… आणि त्या बिंदीचा डूल बरोबर कपाळावर लावलेल्या चंद्रकोरीच्या मध्यावर होता… तिला पाहून विक्रम पूर्ता घायाळ झाला….

विक्रम : आज त्या चंद्राची चांदणीही फिकी पडली माझ्या मेघा समोर…. एकदा नजर उचलून बघ तरी माझ्याकडे….

मेघा नजर उचलून विक्रमकडे बघते…. डोळे पूर्ण पाणावलेले होते…. आज अश्रूंचा बांध फुटला होता…. विक्रमने तिला आपल्या मिठीत सामावून घेतले आणि तिचे मन मोकळे करु दिले….

विक्रम : (काही वेळाने) ए वेडाबाई बस कर आता….. नाहीतर माझा शर्ट ओला होईल….

मेघा : (हलकेच चापटी मारत हसायला लागते) काय रे….?

आणि विक्रम तिला अजून घट्ट मिठी मारत तिच्या माथ्यावर हलकेच किस करतो…. विक्रम मेघा हातात हात घालून बाहेर येतात… त्या दोघांना एकत्र बघून सगळे खूप खुश होतात…. Ring ceremony छान पार पडते… रेवती आणि दिया दोघांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत असतात आणि रोहन म्युझिक सिस्टिम चालू करतो….

एक मी एक तू…शब्द मी गीत तू…

आकाश तू..आभास तू…

साऱ्यात तू…

ध्यास मी श्वास तू…स्पर्श मी मोहर तू….

स्वप्नात तू सत्यात तू…

साऱ्यात तू…

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे…

उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे…

बंध जुळती हे प्रीतीचे…

गोड नाते हे जन्मांतरीचे…



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance