SHUBHANGI SHINDE

Drama Romance Tragedy

5.0  

SHUBHANGI SHINDE

Drama Romance Tragedy

तुही मेरा...

तुही मेरा...

92 mins
2.5Kतुही मेरा...college ची बास्केटबॉल प्रॅक्टिस मॅच सुरू आहे.... सगळीकडे फक्त राघव.... राघव... 👏

राघव... राघव.... जल्लोष सुरू आहे...

बाॅल विरूद्ध टीमच्या खेळाडूच्या हातात आहे ते एकमेकांना बॉल पास करत असल्याचे भासवत होते पण बॉल काही हातातून सुटत नव्हता त्यांच्या... अचानक राघवने त्याचा गेम खेळत समोरच्या खेळाडूच्या हातून बॉल आपल्या ताब्यात घेतला आणि मग काय पहिल्याला धक्का, दुसर्याला हुलकावणी, तिसर्याच्या दोन पायांमधून बॉल पास करत परत आपल्या ताब्यात घेऊन, चौथा आणि पाचव्याला रडकुंडीला आणून फानयली he jump over the sixth player.... And it's a basket.... Wo ho ooooo....

सगळीकडे परत एकच जल्लोष सुरू झाला ... राघव ..... राघव...

मुली तर अक्षरशः त्याच्यासाठी वेड्या होत्या.... त्याची एक नजरभेट आणि स्माईल पाहण्यासाठी सतत त्याच्या अवतीभोवती असायच्या.... सगळे खेळाडू गेम चांगला झाल्याबद्दल एकमेकांची पाठ थोपटत होते... गर्दीचा जल्लोष बघून राघवने गर्दीकडे बघून एक flying kiss 😘 केल तस गर्दीतल्या मुली तर अगदी वेडावल्या...

राघव देशमुख कॉलेज टॉपर आणि बास्केटबॉल चॅम्पियन... उंच धिप्पाड, गोरापान, सरळ नाक, कर्ली ब्राऊन हेअर.. एकदम स्टायलिश लुक... एक श्रीमंत घरातील एकुलता एक मुलगा... Attitude अगदी ठासून भरलेला पण सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा आमचा राघव... दिसण्याचा गर्व नाही की श्रीमंतीचा माज नाही असा हा कॉलेजचा सर्वांचा लाडका राघव...

प्रॅक्टिस संपवून राघव आणि त्याचे मित्र कँपसच्या बाहेर पडत होते... तस त्यांच्यातल्या एकाने सगळ्यांना एका क्लास रूम बाहेर थांबवले... वाकून पाहिल तर तिथे डान्स प्रॅक्टिस सुरु होती...

अभय : Hey look.... नयना... (excited होऊन)

राघव : come on अभय... Please... आता इथे नको...

अभय : काय यार साल्या तुझ नेहमीच आहे...अरे नयना आहे ती... सगळे मुल हिच्या मागे मागे आणि तु??? तुलाच ठाउक....

राघव : ok ok आता तु परत सुरू होऊ नकोस... मी थांबतो इथे तुम्ही जा आत आणि बघा प्रॅक्टिस...

अभय आणि त्याचे बाकी मित्र पुढे गर्दीत मिसळून नयनाची प्रॅक्टिस बघत बसतात...

नयना कारखानीस.... उंच, देखणी, बोल्ड आणि ब्युटीफूल... कारखानीस जे एक बिझनेसमन आहेत त्यांची एकुलती एक मुलगी... अतिशय रागीट ... पण मनाने हळवी... हिलाही attitude ठासून भरलेला पण सगळ्यांच्या मदतीला नेहमी हजर... कथकमध्ये well trained... कॉलेजच्या मुलांच्या दिलाची धडकन...

नयना आणि तिच्या पार्टनरने चांगलाच ठेका धरला होता पण अचानक एका ठिकाणी येऊन तिच्या पार्टनरची पकड सैल झाली आणि नयना खाली पडली... तस गर्दीतून एकाचा खळखळून हसण्याचा आवाज ऐकू आला... आता पर्यंत बाहेर बसलेला राघव आत येऊन कधी प्रॅक्टिस बघायला लागला हे त्याच्या मित्रांणापण कळल नाही... आणि तो नयनाच्या पडण्यावर हसत होता... गंमत समजून तिथे उभे असलेले काही नवीन स्टुडंट तेही राघवला शामिल झाले पण अभय आणि जे लोक नयनाला चांगले ओळखत होते त्यांनी शांतच रहाण पसंत केलं कारण नयना अजून शांतच होती... अशा परिस्थितीत नयनाच शांत राहण म्हणजे वादळापूर्वीची शांतता....

नयनाने एक नजर राघवकडे पाहिल 😡 तो अजूनही पोट धरून हसत होता... तिच्या पार्टनरने तिला उठण्यासाठी मदतीचा हात दिला पण ती स्वतःहून उठली आणि उठल्याबरोबर आपल्या पार्टनरच्या एक कानशिलात लगावली... तस सगळीकडे भयाण शांतता पसरली...

नयना : (आपल्या पार्टनरला) एक महिना झाला प्रॅक्टिस सुरू आहे... लक्ष कुठे असत तुझ...???

विरेन जो नयनाचा पार्टनर आहे तिला सॉरी बोलुन परत प्रॅक्टिसला सुरूवात करतो... पण नयना आता अजूनही भडकलेलीच होती...

नयना : कितीदा सांगितले आहे प्रॅक्टिस सुरू असताना क्लासरूमच दार बंद करत जा म्हणून.... आणि ती गर्दीवर एक कटाक्ष टाकते... 😡

तिचा राग बघताच सगळेच हळूहळू तिथून सटकतात...

राघव : (त्याच्या मित्रांना) तुमच झाल असेल तर आपण निघायच का??? फालतू मध्ये टाईम वेस्ट केला... नाचता येईना आंगण वाकडे.... 😂

नयना : Hey you mind your tongue हा... 😡

तसा राघव तिला प्रत्युत्तर देणार इतक्यात राघवचे मित्र

आता यांच इथे भांडण जुंपणार हे ओळखून त्याला घेऊन बाहेर जातात...

राघव आणि नयना दोघेही कॉलेजचे टॉपर... आणि सर्वांचे रोल मॉडेल... एक दोन मार्कांच्या फरकाने कधी राघव पुढे तर कधी नयना पुढे... या दोघांच एकदिवसही पटत नाही... हे संपूर्ण कॉलेजला माहीत आहे.....

राघव आणि त्याचे मित्र आपापल्या घरी निघून गेले...

राघव : (घरी आल्यावर) hiii आई.... खूप भूक लागलीये.... (सोफ्यावर अंग टाकतच तो म्हणाला)

आई : हात पाय धुवून घे.... मी जेवायला वाढते...

राघव : नको तु असच आण खूप भूक लागलीये....

आई : कधी सुधरणार तु??? (हलकेच हसून)

आणि आई जेवणाच ताट घेऊन आली ..

राघवने ताट पुढ्यात घेतल तस आई त्याला अडवत म्हणाली, "थांब मीच भरवते तुला "

राघव : (आईच्या हातचा पहिला घास खाउन) I love you आई.... (आईला गळ्यात मिठी मारतो)

आई : नाटकी माहित आहे मला सगळ.... (आणि दोघेही हसायला लागतात...)

राघव : आई पुढच्या आठवड्यात आम्ही कॉलेजच्या स्टेट लेवलच्या स्पर्धेसाठी दिल्लीला जाणार आहोत...

आई : हमम... मी बॅग, पॅक करून ठेवीन... And All the best...

इथे नयना सुद्धा आपल्या घरी येते... घरी कुणीच नसत.... नॅनी सोडून..... नॅनी म्हणजे आपल्या नयनाला लहानपणापासून सांभाळणारी केअर टेकर... पण नयनासाठी खूप काही होती ती.... खूप जीव लावायची ती नयनाला... नयनाचे वडील बिझिनेस साठी सतत बाहेर असायचे, तीची आई समाजकार्यात आणि किटी पार्टीमध्ये व्यस्त असायची.... त्यामुळे नयनाला त्या दोघांचा सहवास फार कमीच लाभला.... त्यामुळे तीला नॅनीच फार जवळची वाटायची.... आपली सगळी सुखदुःख नयना नॅनीसोबत शेअर करायची....

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नयना आपली गाडी घेऊन कॉलेजला जाते.... कॉलेजच्या गेटवर already एक गाडी उभी असते... गाडी हटत नाही म्हणून नयना हॉर्न वाजवते पण काही केल्या गाडीवाला गाडी बाजूला घेत नाही म्हटल्यावर ती अजून चीडते आणि अजून जोरजोरात हॉर्न वाजवायला लागते.... तस तिथे राघव आणि राघवचे मित्र येतात... गाडी राघवची असते.... हे नयनाला माहित असत म्हणून ती अजून जोरात हॉर्न वाजवतच असते...

अभय : (नयनाला समजावत) अग गाडी पंक्चर झाली आहे... पंक्चरवाला आलाय आता होईल गाडी बाजूला दोन मिनिटे शांत रहा....

नयना : अशा भंगार गाड्या वापरता कशाला?? Useless... सकाळ सकाळ टाईमपास लावलाय नुसता... (चिडून)

आणि परत हॉर्न वाजवत बसते... एव्हाना तो गोंधळ ऐकून अर्ध कॉलेज तिथे जमा होत... आणि प्रिंसिपल सर पण तिथे आले...

प्रिं. सर : (गोंधळ बघून) What's going on here??? नयना please stop it.... (तशी नयना आधीच गप्प होते).. काय लावलय सकाळी सकाळी तुम्ही दोघांनी???

राघव : सर गाडी इथेच पंक्चर झाली... हे बघा इथे कोणीतरी मुद्दाम हे खिळे टाकले आहेत...

नयना : फटिचर गाडी.... (गाडीच्या बाहेर येऊन नाक मुरडत )

प्रिं. सर : (एक कटाक्ष टाकत) नयना... Please.... आणि तुम्ही सगळे इथे काय करताय जा आपापल्या कामाला लागा...

तोपर्यंत पंक्चरवाला पंक्चर रिपेअर करतो... नयना आपल्या गाडीत जाउन बसणार तोच तिच लक्ष तिच्या गाडीच्या टायरवर जात... ते पण आता पंक्चर झाल होत 😂

राघव आणि त्याचे मित्र हसायला लागतात...😂 तस प्रि. सर परत सगळ्यांना दम देऊन निघायला सांगतात... नयना आपल्या गाडीला लाथ मारून राग व्यक्त करते..😡

प्रिं. सर : नयना आणि राघव तुम्ही नंतर मला अॉफीस रुम मध्ये भेटा... (पंक्चरवाल्याला) ए बाबा वातावरण खूप तापलय तु लवकर रिपेअर कर आणि निघ 😂

राघव डोक्यावर हात मारून गाडी पार्क करायला जातो.... 🤦‍♂

थोड्यावेळाने नयना आणि राघव अॉफीस रूममध्ये येतात...

प्रिं. सर : (एक स्माईल देत) 🙂 बसा...

दोघेही समोरच्या खुर्चीत बसतात....

राघव मगाजच्या गोष्टीच स्पष्टीकरण देतच असतो... पण सर त्याला मध्येच थांबवतात...

प्रिं. सर : हे बघा पुढच्या आठवड्यात स्टेटलेवलच्या स्पर्धा सुरू होत आहेत... कॉलेजला तुमच्या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत... So दोघेही एकत्र येऊन काम करा...

नयना : हो सर.... मी निघू आता... 💃

सर पण हसतात आणि जा म्हणतात... राघव तु तुझी जबाबदारी चांगलीच संभाळशील.... लक्ष असू देत....

राघव : of course Sir... Will do our best.....

```````````````````````````

सगळे स्पर्धेसाठी दिल्लीला पोहचले... तो पर्यंत पहाट झाली होती... हवेत छान गारवा पडला होता...सोबत त्यांचे चार शिक्षक पण होते... सर्वांना त्यांच्या रूमवर जाऊन आराम करण्यास सांगितले आणि नऊ वाजता नाश्ताला भेटू असे सांगून सगळे शिक्षक पण आपापल्या रूममध्ये निघून गेले...

दोघांना मिळुन एक रूम देण्यात आली होती... राघव आणि अभय एकत्र होते.... इथे नयना सोबत दिप्ती असते... सगळे नाश्ताच्या वेळेस कँटीनमध्ये भेटतात... तिथे काही इतर कॉलेजची पण मुल असतात... अशातच काही नवीन ओळखी व काही नवीन फ्रेंडस भेटतात...

अकरा वाजता सगळे सरावासाठी कँपसमध्ये जाण्यासाठी बस मध्ये बसतात..... कँपसमध्ये सगळेच आपापल्या सरावाला लागतात... नयनाने दोन स्पर्धेत भाग घेतला होता... एक सोलो डान्स कथक आणि दुसरा कपल डान्स सेमीक्लासिकल प्लस फ्री स्टाइल.... विरेन अजून आला नव्हता म्हणून ती आधी कथकची प्रॅक्टिस करत होती... थोड्यावेळाने विरेनही तिथे आला... नयनाने थोड रेस्ट घेऊन विरेन सोबत सरावाला सुरवात केली...

सगळ्यांची प्रॅक्टिस संपून आता संध्याकाळ झाली होती... सगळे परत बस मध्ये बसून हॉटेलला पोहचले... बसची स्टेअर ऊंच असल्यामुळे चढण्या उतरण्यासाठी लाकडी खोका मध्ये ठेवण्यात आला होता... सगळी मुल पटापट उड्या टाकून खाली उतरले... दोन तीन मुली उतरल्यावर दिप्ती उतरली आणि मागोमाग नयना उतरतच होती की विरेनने हळूच तो खोका पायाने गाडीच्या खाली सरकवला.. राघवने ते पाहीले पण नयनाच लक्ष नसल्यामुळे तिचा तोल जाऊन पाय मुरगळला... आणि ती "आई.... गं... " ओरडतच खाली बसली...

मैत्रिणींनी तिला हात धरून उठवले...आणि आत हॉटेलच्या हॉलमध्ये नेले... मॅनेजरने डॉक्टर उपलब्ध करुन दिले... नयनाच्या पायाला बँडेज बांधले आणि हालचाल न करण्याची ताकीद दिली... सगळ्यांचेच चेहरे पडले...उद्या एवढी मोठी स्पर्धा आणि आज हे असं घडलं...नयना तर रडायचीच बाकी होती.... शिक्षकांनी तिला आधार देत समजूत घातली... पण राघवने जाऊन विरेनला जाब विचारला तस सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पहायला लागले... राघवने घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला... त्या दिवशी नयनाने कानाखाली मारली म्हणून विरेनने अस केल हे तो कबुल झाला... शिक्षकांनी विरेनला शिक्षा आपण आपल्या कॉलेजमध्ये जाऊ तेव्हा बघू आता उद्याच्या स्पर्धेच काय ते आधी बघू...

सगळे आपापल्या खोलीत निघून जातात.... नयनाला धड चालताही येत नव्हते... दिप्ती आणि अजून एका मैत्रिणीने खांद्याचा आधार देऊन तिला खोलीत आणले...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी सगळे स्पर्धेसाठी कँपसमध्ये दाखल झाले... नयनाला बऱ्यापैकी आराम पडला होता पायाला..... पण डान्स करण थोड कठिण होत.... त्याही परिस्थितीत ती डान्स करण्यास तयार होती कारण आता कॉलेजच्या इज्जतीचा प्रश्न होता... शिक्षकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकेल ती नयना कसली???

स्पर्धा सुरू झाली... आधी कपल डान्स होते.... नयना आणि विरेनच्या जोडीचा चौथा क्रमांक होता... पण विरेन आलाच नव्हता... तरी सुद्धा तिने तो डान्स एकटीने करायच ठरवल... शेवटी प्रयत्न करून हरलो तर चालेल पण आधीच हार पत्करायची नाही अस तिच मत होत....

Announcement झाली... नयना स्टेजवर आली आणि song play झाल... तिने नाचायला सुरुवात केली....

🎶🎶 हीरे मोती मैं ना चाहूँ,

मैं तो चाहूँ संगम तेरा

मैं तो तेरी, सैयाँ, तू है मेरा

सैयाँ सैयाँ... 🎶🎶

नयनाने ताल धरायला सुरुवात केली.... चार ओळीनंतर विरेन तिला जॉईन होणार होता... पण अचानक राघव स्टेजवर आला आणि त्याने नयनासोबत ताल धरला... नयना आधी आश्चर्यचकित झाली पण ती थांबली नाही... तिनेही नाचायला सुरूवात केली....

🎶🎶तू जो छू ले प्यार से,

आराम से मर जाऊँ

आजा चंदा बाहों में,

तुझमे ही गुम हो जाऊँ में

तेरे नम में खो जाऊँ

सैयाँ सैयाँ 🎶🎶🎶

राघवचे मित्र आणि त्यांचे शिक्षक आश्चर्याने बघत होते पण खुशही होते.... राघवही इतका छान डान्स करू शकतो हे खरच surprising होत.... दोघेही बेभान होऊन नाचत होते.... ते एकमेकांत इतके हरवले होते की आजूबाजूचे भानच उरले नव्हते त्यांना....

🎶🎶🎶 मेरे दिन खुशी से झूमें, गाऐं रतें

पल पल मुझे डुबाएँ, जाते जाते,

तुझे जीत जीत हारू, ये प्राण प्राण वारूँ,

हाए ऐसे मैं निहारूँ, तेरी आरती उतारूँ,

तेरे नाम से जुड़े हैं सारे नाते सैयाँ सैयाँ

बनके माला प्रेम की, तेरे तनपे झर झर जाऊँ

बैठूँ नैया प्रीत की, संसार से तर जाऊँ मैं, तेरे

प्यार से तर जाऊँ.......सैयाँ सैयाँ 🎶🎶🎶💃

दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून नाचत होते... 😍आसपासच्या जगाचाही विसर पडला होता त्यांना... इतकच काय तर नयना पायाच दुःखणही विसरली होती....

🎶🎶🎶 ये नरम नरम नशा है, बढ़ता जाए,

कोई प्यार से घुंघटीया देता उठाए

अब बावरा हुआ मन,

जग हो गया है रोशन

ये नई नई सुहागन,

हो गई है तेरी जोगन

कोई प्रेम की पुजारन मंदिर सजाए

सैयाँ, सैयाँ, सैयाँ, सैयाँ 💃🎶🎶🎶

सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या...🤗 अचानक लिफ्ट करताना तिच्या पायात कळ बसली... तिने ते चेहर्‍यावर जाणवू दिल नाही पण राघवने ते हेरल आणि डोळ्यांनीच तिला विश्वास दिला की मी आहे सांभाळून घ्यायला.....

🎶🎶🎶हीरे मोती मैं ना चाहू मैं तो चाहू संगम तेरा

मैं ना जानू, तू ही जाने, मैं तो तेरी, तू है मेरा

मैं ना जानू, तू ही जाने, मैं तो तेरी, तू है मेरा

मैं तो तेरी, तू है मेरा 🎶🎶🎶 💃

शेवटच्या ओळीवर त्याने तिला उचलून घेतले होते... तिने आपले दोन्ही हात वर पसरवले होते... आणि तो तिला घेऊन हळूहळू गोल फिरत होता... जसजस सुर कमी होत होता तसतस तो तिला हळूवार खाली उतरवत होता... आणि खाली उतरताच दोघेही एकमेकांच्या नजरेत परत हरवून गेले....🥰 पहिल्यांदा मनातल्या भावना नजरेत व्यक्त होत होत्या..... 🙈

शेवटी गाण संपल आणि आजुबाजूला टाळ्यांचा कडकडाट वाजायला लागला... शिट्यांवर शिट्या वाजायला लागल्या.... तसे दोघेही भानावर आले... राघवने आपली मिठी सोडली... नयना चालायला लागली पण अडखळली.... राघवने तिला बॅक स्टेज नेले आणि खुर्चीवर बसवले.....

तसे सगळेच त्यांचे मित्र, मैत्रिणी आणि शिक्षक त्यांच्या भोवती गोळा झाले...

अभय : (हात मिळवत गळा भेट करून) Great man... You did such great job... And नयना!! You're outstanding....

शिक्षक : खरच खूप छान... राघव आम्हाला माहित नव्हतं की तु यातही माहीर आहे... आणि नयना खरच अप्रतिम... पायाची दुखापत संभाळून खरच खूप छान performance दिलास....

अभय : Thank you sir. Thank you mam..

नयना : Thank you all... And special thanks to अभय....

तसा सगळा ग्रुप जोर जोरात ओरडू लागला...

ओहो हो... Woo.... oooo.....

दिप्ती : चला फायनली आता तुमची भांडण मिटणार....

नयना : (नाक उडवून) अगदीच तस नाही... 😙

अभय आणि बाकीचे डोक्यावर हात मारतात 🤦‍♂

राघव हलकेच मान डोलावून हसतो... नयना आपल्या पुढच्या performance साठी तयार व्हायला निघून जाते... जाताना हलकेच मागे वळून राघवला क्यूटशी स्माईल देते... राघवने आपल्या डोक्यात केसांवर हात फिरवला व तो पुढे निघून गेला....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे नयना तिच्या सोलो डान्स performance ची तयारी करत होती... Costume चेंज करुन एका चेअरवर बसली आणि पायात घुंगरू बांधत होती.. तेव्हा तिला जाणवल की कोणीतरी तिला चोरून बघत आहे... पण तेव्हा नेमकी दिप्ती येते... आणि ते घुंगरू पायात बांधायला मदत करते... निदान हि स्पर्धा तरी कटेंड नको करु अशी विनवणी ती नयनाला करते पण नयना तिच अजिबात ऐकत नाही... इथे स्टेजवर तिच्या नावाची announcement होते तशी नयना पुढे जाते... स्टेजवर पोझिशन घेताच गाण सुरू होत....

🎶🎶🎶कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था

जैसे मेरी सारी दुनिया मैं गीतों की रुत

और रंगों की बरखा है

खुशबू की आँधी है

महकी हुई सी अब सारी फिज़ायें हैं

बहकी हुई सी अब सारी हवाएँ हैं

खोयी हुई सी अब सारी दिशाएँ हैं

बदली हुई सी अब सारी अदाएँ हैं

जागी उमंगें हैं

धड़क रहा है दिल

साँसों में तूफाँ हैं, होठों पे नगमे हैं

आँखों में सपने हैं,

सपनों में बीते हुए सारे वो सारे लम्हें हैं 🎶🎶

दुखऱ्या पायावर जास्त जोर न देता... नयनाने व्यवस्थित ताल धरला होता... सर्वांना तर तिचीच काळजी लागली होती आणि तिचा अभिमान ही वाटत होता...

🎶🎶 जब कोई आया था, नज़रों पे छाया था

दिल में समाया था, कैसे मैं बताऊँ तुम्हें

कैसा उसे पाया था,

प्यारे से चेहरे पे बिखरी जो जुल्फें तो ऐसा लगता था

जैसे कोहरे के पीछे इक ओस मैं धुला हुआ फूल खिला है

जैसे बादल में एक चाँद छुपा है और झाँक रहा है

जैसे रात के परदे में एक सवेरा है रोशन-रोशन

आँखों में सपनों का सागर

जिसमें प्रेम सितारों की चादर जैसे झलक रही है

लहरों-लहरों बात करे तो जैसे मोती बरसे

जैसे कहीं चांदी की पायल गूंजे

जैसे कहीं शीशे के जाम गिरे और छन से टूटे

जैसे कोई छिप के सितार बजाये

जैसे कोई चांदनी रात में गाए

जैसे कोई हौले से पास बुलाये🎶🎶🎶

सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होत होता... स्टेजवर पडदा पडला आणि नयना तिथेच कोसळून पडली... पाय बऱ्यापैकी सुजला होता... मुलींनी तिला चेअरवर बसवले आणि पाणी दिले....

दिप्ती : कमाल आहे तुझी.... किती हट्टीपणा करशील... पाय बघ किती सूज आली आहे... आता सक्तीचा आराम करायचा....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे काही वेळाने बास्केटबॉल मॅच सुरू झाली... पण राघवच काही केल्या लक्ष लागत नव्हत... समोरच्या टीमचा परडा भारी पडत होता... न राहवून अभयने राघवला लक्ष केंद्रित करण्यास सांगितले... पण राघवची नजर गर्दीवर टिपली होती....

(ब्रेकच्या दरम्यान)

अभय : राघव!!! तुझी ती स्कार्फवाली इथे नाही भेटणार... ती कोणत्याच activities मध्ये नसल्याने कदाचित तिला इथे येण्याची परवानगी नाही मिळाली... 🤔

राघव : she's my lucky charm 😇

अभय : राघव please... आता सगळे होप्स तुझ्याकडूनच आहेत...

राघव अजूनही गर्दीच न्याहाळत होता आणि अचानक त्याची नजर एका ठिकाणी स्थिरावली... तिच ती नेहमी वाली पिंक स्कार्फ संपूर्ण चेहरा झाकलेला फक्त तिचे डोळेच दिसायचे... ती नेहमी राघवला चीअर करायला गर्दीत असायची पण जेव्हा जेव्हा राघवने तिला भेटण्याचा प्रयत्न केला ती तोपर्यंत गायब व्हायची...

त्या पिंक स्कार्फवालीला बघुन राघवला आता नवीन स्फूर्ती आली होती आणि तो नव्या जोशाने खेळायला लागला... आणि फायनली राघवची टीम जिंकली... सर्वजण जल्लोष साजरा करत होते पण राघवला आज त्या पिंक स्कार्फवालीला गाठायचेच होते.... तो तिच्या दिशेने स्टेडियमवर पळाला... राघवला आपल्या जवळ येताना पाहून तिने तिथुन पळ काढला... जाताना तिचा पाय अडखळला पण ती तिथून निघून जाण्यास सफल झाली...

गर्दीतून वाट काढेपर्यंत राघवला तिच्या पर्यंत पोहचण्यास विलंब झाला आणि नेहमीप्रमाणे यावेळेसही त्याचा अपेक्षा भंग झाला....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे डान्स कॉम्पिटिशनचे निकाल सुरू झाले... सगळी टीम फिंगर क्रॉस करून उत्सुकतेने वाट पाहत होती... आणि प्रथम पारितोषिक विजेते नयना, राघवची जोडी ठरली... नयनाला स्टेजवर जाण थोड कठिण होत पण राघवने तिला आधार देत स्टेजवर नेले चालताना त्याच लक्ष तिच्या त्या सूज चढलेल्या पायावर गेल.. आता तिच्या पायावर बँडेज नव्हत... त्याने एक नजर नयनावर टाकली... तिने खुणेनेच काय झाले विचारले पण राघवने नकारार्थी मान डोलावली... दोघांनीही पहिल्यांदा हसतमुखाने शेअरिंग पारितोषिक स्विकारल...

कारण यापूर्वी त्यांची आपसातच स्पर्धा असायची आज पहिल्यांदाच दोघांनी मिळून स्पर्धा जिंकली होती... सगळे खूप खुश होते... ते दोघेही स्टेजवरून उतरनारच होते की इतक्यात परीक्षकांनी त्यांना थांबवून घेतले आणि सोलो डान्स चे पारितोषिक पण जाहीर केले त्यातही बाजी नयनानेच मारली... सगळीकडे परत टाळ्यांचा कडकडाट झाला....

सगळेजण परत हॉटेलवर जायला निघाले... सगळे फोटो काढण्यात बिझी होते... पाय दुखत असल्याने नयनाला त्यांच्यासोबत जास्तवेळ उभे राहण्यास त्रास होत होता म्हणून ती दोन तीन फोटो काढून दिप्तीला घेऊन बसमध्ये बसायला गेली....

नयनाला बसची स्टेअरकेस ऊंच असल्याने चढण्यास त्रास होत होता... राघवने ते लांबूनच ते पाहिले... आणि तिथे मदत करण्यासाठी गेला...

राघव : दिप्ती!! ! तुला सर बोलावत आहेत.... (तिला तिथून कलटवण्यासाठी) 😊

दिप्ती : अरे पण.. . नयनाला बसमध्ये....

राघव : (तिच बोलन मध्येच तोडून) मी आहे इथे तु जा ना ..

नयना जरा आश्चर्यानेच बघते.... दिप्ती निघून जाते... आजूबाजूला कुणीच नाही हे बघून राघव बोलायला सुरुवात करतो...

राघव : नयना!!! जरा स्पष्टच विचारतो... (तिचा हात खांद्यावर घेऊन तिला बसमध्ये चढण्यासाठी आधार देत)

नयना : (थोडी दचकून) हममम ... काय विचारायच आहे...

राघव : मला माहीत नव्हतं की माझी जादु आधीपासूनच तुझ्यावर झाली आहे... तुच त्या गर्दीत मला चिअर करायला येतेस ना?? 😉

नयना : (चमकून तिथेच थांबते) काहीही काय?? 😙 मी कशाला ते नसते उद्योग करू?? (परत नाक मुरडत)

राघव : 🤔 मग मला सांग तुझ्या पायाच बँडेज कुठेय???

नयना : (आपली जीभ चावत) 🤦‍♂ अरे ते मी मगाशी काढुन ठेवल.... ( आपली बाजू सावरत)

राघव : (स्वतःच्या खिशातून बँडेज काढून)😎 हे मला स्टेडियमवर मिळाल.. जिथे तू पळताना अडखळलीस... .🤨

आतामात्र नयनाने नजर चोरली... 🙈 राघवने तिच संधी साधून पटकन तिला उचलून बसमध्ये चढवले..😇 आणि तीला सीटवर बसवले... नयना चक्क लाजली होती... आणि राघव तिला बघून मनात हसत होता...

इतक्यात बाकीचे सगळे पण बसमध्ये येऊन बसले... राघव नयनाच्या बाजूच्या रांगेत दोन सीट पुढे बसला... सगळे बसमध्ये धमाल मस्ती करू लागले... गाण्यांच्या भेंड्या खेळू लागले... नयना मात्र गालातल्या गालात हसत होती.. 😊 राघवही आज जाम खुश होता...

🎶🎶 बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

चाल के ख़ुशबू से जुड़ा जुड़ा जुड़ा है कहीं दूर

हादसे ये कैसे अनसुने से जैसे चूमे अंधेरों को कोई नूर

बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

सिर्फ कह जाऊं या आसमान पे लिख दूं

तेरी तारीफों में चश्में बाद्दूर

बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

चाल के ख़ुशबू से जुड़ा जुड़ा जुड़ा है दूर 🎶🎶

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बस एकदाची हॉटेलवर थांबली... सगळे आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये निघून जातात... राघव आज खूप खुश होता..

अभय : Wow dude... आज जाम खुशीत आहेस..? 😊

राघव : हो आज सगळीकडेच आपण बाजी मारली.. 👏

अभय : हमम्... तुझी स्कार्फवाली भेटली का?? 🤔

राघव : (हलकेच हसून ) हो...

अभय : मग कोण आहे ती आणि कशी दिसते?? By the way तु मला सांग तुझ नक्की काय चाललंय??

राघव : म्हणजे ??? (बेडवर आडव होत)

अभय : इथे नयना तिथे स्कार्फवाली... 🤔 नयनाचा डान्स तु रोज चोरून बघायचास माहित आहे मला... 😎 इथे तर पटत नाही अस लोकांना दाखवतो... और दिल मे कुछ कुछ नहीं बहुत कुछ है... 😉

राघव : (आश्चर्याने) 😳 जासूस!!! तु काय माझी जासूसी करतो?? (आणि त्याला उशी फेकून मारतो)

अभय : यार का इतना खयाल तो रखना पडेगा...

राघव : she's "नयना" अभय.... 🥰 पण अजून कबुल नाही झाली....

अभय : Really? 🤨 याने आग दोनो तरफ बराबर लगी है |

थोड्यावेळाने सगळे खाली रात्रीच्या जेवणासाठी जमा होतात... राघवची नजर नयनाला शोधत असते... इतक्यात भिंतीच्या आडोशाला कोणीतरी राघवला खेचून घेत... राघव दचकून बघतो तर एक अनोळखी मुलगी त्याला आपल्या जवळ खेचते आणि लगट करायला लागते....

ती जरा जास्तच बोल्ड होती... 😍 अगदीच मिनी स्कर्ट brown checks मध्ये, काळा रंगाचा अॉफ शोल्डर फूल स्लीव टॉप, कानात सिल्वर कलरचे गोल रिंगस् , मोकळे सोडलेले केस, पायात high heels चे काळे बुट, डार्क आयलायनर, आणि ओठांवर न्यूड कलरची लिपस्टिक... खरंतर तिला पाहून कोणाचीही विकेट उडेल... पण राघवला पाहिल्या पासुन तिचीच विकेट उडाली होती..🙈

ती : (अतिशय मोहक पद्धतीने ) Hiiii... मी रेणू ....

राघव : hiii .... (जरा अंतर राखून)

ती : you are very handsome 🙂

राघव थोड अंतर ठेवूनच होता पण तिच जरा अंगलट येऊ पाहात होती... त्यादोघांमध्ये एक इंचाचच अंतर होत आणि त्याच वेळेस नयनाने त्या दोघांना अस एकत्र पाहिल.. 🤦‍♂

आता काय रागाने लालबुंद झाली ना नयना 😠 पण मनातले भाव आवरत टेबल जवळ येऊन बसली... राघवने नयनाला पाहिल आणि त्या बोल्ड बयेपासून सुटका करून तोही नयनाच्या समोरच्या टेबलवर येऊन बसला...

रेणूही राघवच्या बाजूला बसण्याच्या उद्देशाने त्याच्याच टेबलजवळ येत असते... तस आधीच्या टेबलवर बसलेली नयना मध्ये पाय अडवते... रेणू अडखळते आणि त्या अडखळण्यातच बाजूलाच असलेल्या स्लाइडरवर 🛹 तिचा पाय पडतो... आणि ती स्लाईड करत पडणारच असते की राघव तिला सावरतो... तिला अस अचानक सावरताना तो एका टेबलवर पडतो... त्याच्यावर रेणू पडते... रेणू आता त्याच्या मिठीत असते.. 😍

रेणू आणि राघव आता तर एकमेकांना चिकटून असतात 😂 हे बघून नयना अजून चिडते.. 😠 राघव पटकन रेणूला दूर करतो... बाकिचे सगळे आवाचून बघत असतात... 🤓 रेणू यातही त्याच्या परत अंगलट येऊन थँक्स म्हणत निघून जाते... 🙉 राघव नयनाकडे बघतो 🤗 पण ती नाक मुरडून राघवला angry look देते... 👹तिला अस पाहून राघव मनोमनी खूश होतो.. कारण ती कबूल जरी झाली नसली तरी तीची नजर खुपकाही सांगत होती... 🤗

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसऱ्या रात्रीची परतीची ट्रेन असते... म्हणून दिवसभर मजामस्ती आणि फिरण्याचा प्लॅन ठरतो... सकाळी सगळे बसमधून फिरायला निघतात... राघवने मस्त लाल रंगाचा टी शर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक कलरचा हूडी जॅकेट घातला होता... आणि तो विंडो सीटवर बसून हेडफोन लावून गाणे ऐकत होता... त्याच्या शेजारी अभय बसुन होता...

दिप्तीला अभयकडे काम होत, म्हणून तिने नयनाला विनंती केली की तिने जाउन अभयच्या सीटवर बसावे... पण नयना नाही म्हणाली.. मग दिप्तीच उठुन अभयकडे गेली... अभयने संधीचा फायदा घेत राघवला दिप्तीच्या सीटवर बसायला पाठवले... राघवला बाजुला बसलेल बघून नयना थोडी मनोमन लाजली... 🥰

दोघेही शांतच होते... राघवला तर कळले होते... की नयना त्याला पसंत करते पण नयनाला अजून राघवच्या मनातल कळण बाकी होत... आता दोघांनाही जरा जास्तच attitude 😎 असल्यामुळे एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली कोण आणि कशी देणार हाच मोठा प्रश्न आहे..🙉

राघव : (हेडफोन बाजुला करत) पाय कसा आहे आता...

नयना : काल पेक्षा बरा आहे... 😏 (रात्रीचा राग अजून गेला नाही)

राघव : (बराच विचार केल्या नंतर) बराच राग आलेला दिसतोय 🤨

नयना : मला कशाला राग आला पाहिजे.. 😈

राघव : 😉 छान दिसतेस आज...

नयना : I am always 😏

राघव बाजूला बसल्यामुळे मनात तर लाडू फुटत आहेत पण चेहर्‍यावर भाव मात्र काहिच नसल्यासारखे... तिचा रागवलेला चेहरा पाहून राघव मनातच हसतो.... तसा बस ड्रायव्हर बसमधल्या टेप रेकॉर्डर मध्ये गाण लावतो...

🎶🎶दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके

सबको हो रही है, खबर चुपके चुपके

साँसों में बड़ी बेक़रारी, आँखों में कई रत जगे

कभी कहीं लग जये दिल तो, कहीं फिर दिल न लगे

अपन दिल मैं ज़रा थम लूँ

जादु का मैं इसे नाम दूँ

जादु कर रहा है, असर चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं ...🎶🎶

अभय नयना आणि राघवला बघून ड्रायव्हरला दाद देतो..." वाहह!! भय्याजी क्या टाइम पे गाना लगाया हे| बहौत खूब... 🤩 आणि राघवला बघून डोळा मारतो 😉

🎶🎶ऐसे भोले बन कर हैं बैठे, जैसे कोई बात नहीं

सब कुच नज़र आ रहा है, दिन है ये रात नहीं

क्या है, कुछ भी नहीं है अगर

होंठों पे है खामोशी मगर

बातें कर रहीं हैं

नज़र चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं ...

कहीं आग लगने से पहले, उठता है ऐसा धुआँ

जैसा है इधर का नज़ारा, वैसा ही उधर का समाँ

दिल में कैसी कसक सी जगी

दोनों जानिब बराबर लगी

देखो तो इधर से

उधर चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं ...🎶🎶

थोड्यावेळाने बस लाल किल्ल्याजवळ थांबते... सगळे आपले खाली उतरवून एक एक गट बनवून फिरायला लागतात... काही सेल्फी काढत बसतात तर काही अभ्यासाच्या दृष्टीने माहिती घेत असतात...

नयनाही पहाणी करत असते... राघव दुरूनच नयनावर पहाणी करत असतो... व्हाईट ट्राऊझर, अबोली रंगाचा क्रॉप टॉप, कानात खड्याचे स्टडस्, केस मेसी बन केलेले, खांद्यावर स्लींग बॅग, डोळ्यांवर गॉगल... राव नेहमीप्रमाणे आजपण ती जाम भारी वाटत होती... 😍 तो चोरून चोरून तिचेच फोटो काढत होता...

इतक्यात समोरून रेणू येताना दिसली... 😮 पळ काढायचा म्हणून तो नयना आणि गृपच्या मध्ये लपला पण रेणूने त्याला गाठलेच... 🤦‍♂

रेणू : hiii handsome...😎 मला वाटल नव्हत तु माझ्या मागे मागे इथपर्यंत येशील...

नयना राघवकडे एक नजर टाकते... 😈 आणि तिथून एकटीच दुसरीकडे निघून जाते...🚶‍♀ राघव तिला बघून तिच्या मागे जायला लागतो 🏃‍♂ पण रेणू त्याला अडवते... तो तिला काहीतरी कारण सांगून पळ काढतो...

नयना किल्ल्याच्या अशा ठिकाणी जाते जिथे कोणीच नसत... छान गार वारा सुटलेला असतो... अगदी निरव शांतता... मनाला शांती देणार वातावरण... नयना त्या नयनरम्य वातावरणात हरवून जाते...

राघवही तिथे तिच्या मागोमाग पोहचतो... नयना अजुनही स्वतःमध्येच हरवलेली असते... राघव नयनाचा हाथ धरून तिला खांब्याच्या आडोशाला आपल्या जवळ खेचतो... आता ती दोघे अगदी समोरासमोर फक्त दोन इंचाच्या अंतरावर असतात.... त्याचे हाथ तिच्या कमरेभोवती असतात...

नयना : (मनात चलबिचल सुरू असते) राघव काय करतोयस??? सोड मला....

राघव : ( तिच्या तोंडावर हात ठेवून) शुsss...

राघव हळूच तिच्या डोळ्यांवरचा गॉगल बाजूला काढतो... तिची नी त्याची नजर नजरेला भिडते... ती मागे जात खांब्याला टेकते... राघव अजून तिच्या जवळ जातो... आपला हात खांब्याला टेकून हळूच तिच्या कानाजवळ आपले ओठ नेतो... 🙈 नयना आपले डोळे गच्च मिटून घेते...

राघव : (हळूच कानात बोलतो) I.... Love.... this लाल किल्ला 😂

नयना परत रागवून त्याला दूर ढकलते आणि जायला लागते.. तसा राघव ओरडतो...

राघव : आता तरी बोल स्पष्ट... रोज स्कार्फ बांधून मलाच बघण्यासाठी येतेस ना?? स्टेडियममध्ये तुच होतीस ना??? नयना you love me 😍 ना??

नयना : (मागे वळून) नाही नाही नाही.... (आणि परत जायला लागते)

राघव : But I love 😍 you नयना... रोज चोरून तुझा डान्स बघतो मी.... तुला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून लाइक करतो मी... Now it's your turn... कबूल कर नयना....

नयना : (इतक्या सहज हो म्हणेल ती नयना कसली )🤦‍♂ no no never.... (हळूच हसते)

आणि ती पळतच बाहेर येते... मागोमाग राघवपण बाहेर येतो... .

🎶🎶पहला पहला प्यार है

पहली पहली बार है

जान के भी अन्जाना

कैसा मेरा यार है ...

उसकी नज़र, पलकों की चिलमन से मुझे देखती,

उसकी नज़र....

उसकी हया, अपनी ही चाहत का राज़ खोलति,

उसकी हया....

छुप के करे जो वफ़ा, ऐसा मेरा यार है

पहला पहला प्यार है ...

वो है निशा, वो ही मेरी ज़िंदगी का भोर है,

वो है निशा....

उसे है पता, उसकी हाथों में मेरी डोर है,

उसे है पता.....

सारे जहाँ से जुदा, ऐसा मेरा प्यार है

पहला पहला प्यार है ... 🎶🎶

आणि ती पळतच बाहेर येते... मागोमाग राघवपण बाहेर येतो...

अभय : अरे तू आहेस कुठे?? इथे सगळे तुला शोधत आहेत.. ती बघ.. ती रेणू पण शोधतेय तुला... 😌

राघव : (नयना कडे बघून) खरच... Hey... रेणु... Hii... मी इथे आहे... (मुद्दाम नयनाला चिडवण्यासाठी ) 😚

रेणु : काय यार कधीची शोधतेय तुला..

राघव : ohh sorry dear.. (उगाच मन राखण्यासाठी 😂)

रेणु राघवसोबत सेल्फी काढत बसते... पण नयनाला काहीच फरक पडत नाही हे बघून राघव मुद्दाम रेणुला घेऊन नयनाची ओळख करून द्यायला जातो...

राघव : रेणु ही नयना...

रेणु : hiii नयना... You are wonderful dancer 💃, and you looking gorgeous....

नयना : हमम.. . (फुकटच हसू चेहर्‍यावर आणत) 😊

राघव : (नयनाला चिडवण्याच्या सुरात) Ohh really.. पण तुझ्यापेक्षा छान नाही दिसत... आणि डान्स च म्हणशील तर मीच शिकवला तिला...😂

नयना : काय ??? 🙄

इतक्यात अभय तिथे येतो आणि रेणुला बाजुला घेऊन जाउन तिच्या कानात काहितरी सांगतो... आणि ती राघवला न भेटताच निघून जाते... नयना आणि तिच्या मैत्रिणी दुसरीकडे फिरायला जातात...

राघव : (अभयला) काय रे?? रेणु कुठे गेली??? काय खुसूरपुसूर चालली होती कानात?? 🙄

अभय : काही नाही मी तिला सगळ खर सांगितलं.. 😌

राघव : (प्रश्नार्थक मुद्रेने) काय??? 😳

अभय : हेच की नयना तुझी girlfriend आहे... So तु राघव पासुन थोडी लांबच रहा... 😉

राघव : 😲 आणि ती agree झाली...???

अभय : नाही ना... मग मी तिला सांगितलं की ती थोडी सायको आहे रागात काहीही करेल... Be careful 😂

राघव : आ!!! अरे सायको काहीही काय??? 😳

अभय : गप्प बस जरा... रेणु गळ्यात पडली तर चालणार आहे तुला... नयनाला jealous feel करण्यापेक्षा मनवण्याचा प्रयत्न कर... 😌

राघव : तु तर लव गुरुच झालास... 😍

सगळे दिवसभर खूप मजा मस्ती करतात... संध्याकाळी हॉटेलवर पोहोचून पॅकिंग करुन रात्रीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सगळ्याच स्पर्धेत बाजी मारल्याने कॉलेज संस्थापकांनी celebration party ठेवली होती खास करून मुलांच कौतुक करण्यासाठी... 👏आणि पार्टीची थीम होती Red and white कलर थीम...

संध्याकाळी सगळेच पार्टीला हजर होतात.. नयना आणि दिप्ती एकत्र येतात.. शाॅर्ट रेड कलरचा नेट स्लिव्हचा वन पीस, वन साईड पीनअप करून कर्ल केलेले गोल्डन हायलायटेड केस, दोन इंचाचे चेन पॅटर्न इअर रिंगस, पाणीदार डोळे, लाल चुटूक ओठ आणि पायात मॅचिंग हाइ हिल्सची सँडल... नेहमीप्रमाणे मुलांची नजर तिच्यावरच खिळलेली... पण ती मात्र राघवला शोधत होती... 🥰

पण यावेळेस राघवची चलती जास्त होती.. राघवच्या डान्सची चर्चा एव्हाना संपूर्ण कॉलेजमध्ये पसरली होती.. आज तर मुली राघवलाच घेरून होत्या...

फिकट चटणी कलरची ट्रॉउझर, पांढर्‍या रंगाचा टी शर्ट आणि त्यावर आॅफ व्हाइट कलरचा ब्लेझर, त्या ब्लेझरचे स्लिव्हज त्याने छान हाताच्या कोपरापर्यंत 3/4 केले होते.. त्या गेटअपवर तो खूपच हँडसम दिसत होता.. 😎

थोड्यावेळाने प्रिंसिपल सर स्टेजवर येउन सर्व टीमचे कौतूक करतात... विरेनला त्याच्या गैरवर्तवनुकीबद्दल एक आठवड्यासाठी कॉलेजमधून रस्टीकेट करणार असतात पण नयना आणि राघवच्या विनंतीवरून त्याला माफ करतात... थोडावेळ कौतूक समारंभ करून मुलांना पार्टी सोपवून निघुन जातात...

पार्टी छान रंगत चालली होती.. थट्टामस्करी करत सगळे enjoy करत होते.. नयना आणि राघव एकमेकांना अधून मधून नजरभेट देत होते... इतक्यात सगळीकडे अंधार पडला... आणि एक आवाज ऐकू आला... त्या आवाजाच्या दिशेने स्पॉट लाईट पडली... सगळे तिथे बघु लागले... दिप्ती ?? 😳 राघव, नयना, अभय सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात...

दिप्ती : (हातात माईक घेऊन अगदी शांतपणे) अभय!!! खास तुझ्यासाठी.... (पुढिल बोल सरिताच्य लेखणीतून)

"माहीत नाही काय झाले

मन आताशा थाऱ्यावर नाही

तुझ्याशिवाय यांस दुसरे काही सुचत नाही

तू हसलास की मी हसते

तू रुसलास की मी हिरमुसते

तुझ्या कौतुकाने मी लाजते

रात्रंदिनी तूच दिसे

ध्यानीमनी तूच वसे

स्वप्नात तू,हृदयात तू

माझ्या श्वासा श्वासात तू

बरसणाऱ्या सरीत तू

बहरणाऱ्या कळीत तू

प्रेमवेडी मला केलीस तू

सांगना रे साथ देशील का तू?"

सगळे आता वाट पहात होते की अभय काय प्रतिक्रिया देतोय.. दिप्ती अभयकडेच आतुरतेने पहात असते... अभय तिला "हो... हो... हो... माझी राणी.... म्हणताच, सगळीकडे एकच टाळ्यांचा कडकडाट होतो... 💏

सगळीकडे नुसत्या शिट्या आणि अभिनंदनाचा वर्षाव होत होता... अभय आणि दिप्ती दोघेही खुश असतात...नयना त्यांना बघून खुश होत असते.. 🤗 राघव नयनाच्या मागे जाऊन हळूच तिच्या कानात बोलतो... "बघ तिनेपण होकार दिला, तु कधी कबुल करणार " 🥰 नयना गालातल्या गालात हसायला लागते...

डिजे डान्स साठी म्युझिक सुरू करतो...

🎶🎶तुम भी हो, मैं भी हूँ पास आओ तो कह दूँ

आखिर क्यों पल में यूँ दीवाना मैं हो गया

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना 🎶🎶

सगळे डान्स करायला लागतात... राघव आणि नयना हेही डान्स करत होते पण वेगवेगळे... आणि एका क्षणाला राघव नयनाचा हाथ पकडून फ्री स्टाईल डान्स करायला लागला.. त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे गोल लिफ्ट केल...💃

🎶🎶इतनी क्यों, तुम खुबसूरत हो

के सब को हैरत हो... दुनिया में सच मुच ही रहती है

परियों से भी ज्यादा प्यारी सी लड़की कोई...

हाँ इतनी क्यों, बोलो हसीं तुम हो...

जो देखे गुम सुम हो देखो ना..

मैं भी हूँ खोया सा बहका सा मुझपे भी

छायी है दीवानगी

तुम्हीं को मैंने पूजा, तुम्हीं को चाहा पाना

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना

जो होश था, वो तो गया....

बदन की ये खुशबु, जगाने लगी जादू

तो होके बेक़ाबू, दिल खो गया 🎶🎶

राघवच आज तिला आपल्या तालावर नाचवत होता... 🙈 ती तर फक्त त्याच्या डोळ्यांत हरवली होती...😍 त्यांना अस बेभान होऊन नाचताना बघून सगळे थांबून त्यांचाच डान्स इन्जॉय करायला लागले.. आता फक्त त्या दोघांवरच स्पॉटलाईट स्थिरावली होती....🥰

🎶🎶तुम्हें जो मैंने सोचा, तुम्हें जो मैंने माना

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना

जो होश था, वो तो गया

तुम भी हो, मैं भी हूँ पास आओ तो कह दूँ

तुमने जो देखा तो क्या जाने क्या हो गया 🎶🎶

आता तर तिचीही साथ मिळाली डान्ससाठी.. ☺ तिचा डावा हात त्याच्या उजव्या हातात होता.. आणि त्याचा डावा हात तिच्या कमरेभोवती पकड धरुन होता.. मी मागच्या बाजूला झुकली आणि त्याने तिला छान मुव्ह करत स्वतःकडे ओढली.. 🤩 दोघेही विसरले होते की ते कुठे आहेत 🙈

🎶🎶जाने क्यों, रहती हूँ खोयी सी जागी ना सोयी सी

अब दिल में अरमां है साँसों में तूफां है

आँखों में ख्वाबों की है चाँदनी आ..

जाने क्यों, बहका सा ये मन है

महका सा ये तन है

चलती हूँ इतराके, इठलाके , शरमाके बलखाके

जैसे कोई रागिनी

तुम्हें जो मैंने समझा, तुम्हें जो पहचाना

तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना

जो होश था, वो तो गया 🎶🎶

डान्स संपला तेव्हा ती त्याच्या बाहुपाशात होती... दोघांचेही डोळे मिटले होते... श्वास फुलले होते.. हृदय एकाच गतीने जोर जोरात धडधडत होते .. एकमेकांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते.. दोघांनाही एकमेकांचा सुगंध संमोहित करत होता.. एकमेकांचा स्पर्श शहारून निघत होता... तो क्षण त्यांच्यासाठी तिथेच थांबला होता.... 🥰

संपूर्ण हॉल एकदम शांत झाला होता.. वेळेच भान राखून अभयने टाळ्या वाजवल्या तसे सगळेच जल्लोष करायला लागले... राघव आणि नयना भानावर आले.. नयना आता नजर चोरून गालातच लाजली... पण दुसरीकडे तिला फार ओक्वड पण वाटल.. ती गर्दीतून वाट काढत बाहेर पडते... आणि राघव मुलींच्या घोळक्यात अडकतो...

नयना पळतच बाहेर येते... बाहेर कोणीच नसत... ती एकटीच उभी असते धापा टाकत... स्वतःशीच लाजत.. ☺

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पार्टी संपवुन सगळे घरी जायला निघतात... दिप्ती आणि नयना बर्‍याच वेळ त्या गाडीजवळ उभ्या असतात... नयना खूप प्रयत्न करते पण गाडी काही केल्या स्टार्ट होत नाही..

त्यांना अस अस्वस्थ बघुन राघव आणि अभय तिथे येतात..

अभय : काय झालं?? Any Problem???

दिप्ती : अरे गाडी खराब झाली आहे...

अभय : ohhh my baby... 😔 (दिप्ती लगेच लाडिक मिठी मारते 😌)

नयना : ए बेबी वाल्या... माझी... गाडी खराब झाली आहे.. तुझ्या बेबीला काही नाही झाल.. 🙄

राघव : तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला... 🙂

नयना आधी नाहीच म्हणते पण अभय आणि दिप्तीच्या सांगण्यावरून ती तयार झाली.. नयना राघवच्या गाडीत मागे दिप्तीच्या बाजुला बसायला जाते तर अभय तिला पुढच्या सीटवर बसायला लावतो...काही अंतरावर गेल्यावर राघवने एका गार्डनशेजारी गाडी थांबवली...

नयना : काय झालं इथे का गाडी थांबवली?? 😏

राघव : चल थोड बाहेर फिरुया.. 😌

नयना : काय...?? उगाच लाडात नको येऊस 🙄

राघव : (थोड त्रासून) अग बाई त्या लव बर्डसना थोडा वेळ एकत्र घालवू देत.... किती बोरर आहेस यार तू... 🙉

नयना नाक उडवून एका बेंचवर जाउन बसते... राघव असाच उभ्या उभ्या फेरफटका मारत बसतो.... अभय आणि दिप्ती दुसर्‍या बेंचवर जाऊन बसतात....

अगदी नवीन नवीन प्रेम फुलल होत त्यांच.. त्यात ते अगदी जवळ खेटून बसणे.. हातात हात घेऊन गोड गोड गप्पा मारणे, मध्येच त्याने तिला चिडवने आणि चिडून तिने त्याला हलकेच चापटी मारने.. वर तर वर पाठ फिरवून रुसून बसने.. 🙈 थोडक्यात काय तर ट्रिपिकल प्रेमी युगुलांप्रमाणे त्यांच चालल होत... 🥰

नयनाने अगदी डोक्यावरच हात मारला.. 🤦‍♂आणि राघव नयनाचे expression बघुन हसायला लागला.. 🙊 तिने राघवला हसताना बघून पुन्हा नाक मुरडले...

छान गार वारा सुटला होता.. थंडी वाजते म्हणून अभयने अगदी सिनेमातल्या हिरोप्रमाणे स्वतःच जॅकेट काढुन दिप्तीला दिल.. त्या दोघांना बघून नयना राघवकडे बघते..

राघव : तुलापण जॅकेट हवय.. माझा कोट चालेल?? ☺

नयना : (अगदी त्रासून) काहीही... .नसता मुर्खपणा.. 🙄

राघव : (हसुन) किती unromantic आहेस गं... 🙂 माहित नाही आपल्या बाबतीत कस होणार माझ... 😂

नयना : काहीही होणार नाही आपल... नसती स्वप्न नको बघु.. 🤗 (आणि नेहमीप्रमाणे नाक उडवून चालायला लागली)

राघव : कठीण आहे रे बाबा... 🤦‍♂

राघव आणि नयना गाडीत येऊन बसतात.. राघव गाडीचा हॉर्न वाजवतो तस अभय आणि दिप्ती सुद्धा गाडीत येऊन बसतात... राघव आधी दिप्तीला घरी सोडतो, मग अभयला आणि शेवटी गाडी नयनाच्या घराजवळ येऊन थांबली.. नयना उतरून जाऊ लागली...

राघव : (हार्न वाजवून) थँक्यू म्हणायची पद्धत नाही वाटत तुमच्याकडे?? (मुद्दाम चिडवत) ☺

आणि तो गाडीतून उतरून बाहेर येतो..

नयना : (तशीच मागे फिरून गाडी जवळ येते) गाडीपण आपलीच... ड्रायव्हर पण आपलाच... मग थँक्यू कशाला हवाय?? 🙈 (आणि ती हसून परत जायला निघते)

राघव : (आधी काहीच न कळल्यामुळे शांत असतो आणि मग आश्चर्याने ) काय म्हणालीस?? आपला?? 😍

नयना : मी कुठे काय म्हटलं?? 🤗 (आणि पळतच घरी निघून जाते)

राघव : (गालात हसून) अग निदान बाय तरी म्हण... ☺

तोपर्यंत ती घरी पोहचते आणि राघव हलकेच हसून गाडी स्टार्ट करून निघून जातो...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसर्‍या दिवशी रविवार असतो... नयना नेहमीप्रमाणे अनाथ आश्रमात जाते... महिन्यातून एक रविवार ती नेहमी आश्रमात जाते.. तिथल्या मुलांना भरभरून गिफ्ट्स घेऊन जाते... दिवसभर त्यांच्याशी दंगामस्ती करून संध्याकाळी परत घरी...

ती स्वतःला त्या मुलांपैकीच एक मानायची... त्या मुलांवर आईवडिलांचे छत्र नव्हते आणि नयना सगळं काही असून पोरकी होती... तिथल्या मुलांना छान छान गोष्टी सांगणे.. त्यांचा अभ्यास घेणे.. त्यांच्या कलागुणांना वाव देणे... त्यांना डान्स शिकवणे असे एक ना अनेक गोष्टी ती आश्रमात करत असे...

आजही ती आश्रमात येताच सगळी मुल ताई ताई करत तिच्या भोवती गोळा झाली... सगळे तिला बघून खूप खुश होतात... आजपण ती नेहमी प्रमाणे खूप मज्जा करते... आश्रमाच्या संस्थापक बाईंनी तिला एक गिफ्ट आणि ग्रिटींग कार्ड दिले.. सर्व मुलांच्या वतीने त्यांनी तिला ते गिफ्ट घेऊन दिले होत...

खूप विनंती केल्यावर तिने ते गिफ्ट घेतले.. आणि उत्सुकतेने कार्ड ओपन केले.. कार्ड ओपन करताच आतला मजकुर वाचुन चटकन तिच्या डोळ्यांत पाणी आले...

"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई...तु नेहमीच अशीच हसतमुख रहा"

नयना तर विसरलीच होती की आज तिचा बर्थडे आहे...नॅनी सोडली तर तिला जवळच अस कोणीच नव्हत जे तिला बर्थडे विश करतील.... तिने सर्व मुलांना एक गच्च मिठी मारली.. तिने गिफ्ट ओपन केल तर त्यात पिंक कलरची ब्लॅक बॉरडरची साडी होती...

संस्थापक बाई म्हणाल्या मला काही जमल नाही पण मनापासून वाटल तुला छान दिसेल म्हणून घेतली.. मुलांच्या अट्टाहासामुळे नयनाने ती साडी त्यांना नेसून पण दाखवली...

तिथे त्या मुलांना भेटायला अजून एक बाई सुद्धा आल्या होत्या.. त्या मगाच पासुन नयना आणि मुलांची तिच्यासोबत असलेली गुंतवणूक बघत होत्या... तिचा वाढदिवस लक्षात घेता त्यांनी मुलांसाठी ताबडतोब केक आॅर्डर केला.. नयनाने सर्वांसोबत मिळून केक कट केला आणि प्रत्येकाला आपल्या हाताने केक भरवला...

सगळं आटपून नयना घरी जायला निघाली.. तेव्हा तिच लक्ष केक मागविणार्या बाईंकडे गेल.. तिने त्यांच्या पुढे गाडी थांबवून विचारणा केली.. तेव्हा कळाल की त्यांचा ड्रायव्हर तब्येत ठीक नसल्याने घरी निघून गेला आणि म्हणून त्या आॅटोची वाट पाहत आहेत.. नयनाने त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करत त्यांच्या घरी त्यांना सोडायला गेली...

गाडी त्यांच्या गेटवर येऊन थांबली..त्यांनी तिला कॉफीच्या निमित्ताने घरी नेले.. त्यांचा बंगला खूपच सुंदर होता.. नयना सोफ्यावर बसून होती तेवढ्यात तिथे राघव येतो... नयना राघवला तिथे बघून आश्चर्यचकित होते.. 😳

नयना : तु इथे ??? 😳

राघव : हो मी माझ्याच घरी असणार ना?? 😂

नयना : तुझ घर??? म्हणजे आन्टी ??? 🙄

आई : (कॉफी घेऊन येतात) मी राघवची आई... 🙂

नयना : (मनात) अरे यारर कुठे अडकले?? याने आन्टींना काही सांगितले तर??

आई : राघव तुम्ही दोघे ओळखता एकमेकांना??

राघव : हो आई... Actually we are.... 😉 (नयनाला नजरेने खुणावत )

नयना : (घाबरून त्याच बोलण मध्येच तोडत) we are just friends... Collage friends 😒

राघव : हो आई we are just a friends 🤗

आई : तुम्ही बोलत बसा मी आलेच ... ( आणि त्या किचनमध्ये निघून जातात)

नयना : मी निघू खूप उशीर होत आहे ...( पळ काढण्यासाठी) 😔

राघव : अग नयना ते economics चे नोट्स हवे होते ना तुला?? रेडी आहेत घेऊन जातेस का?? चल तुला देतो... ☺

आणि तो तिला स्वतःच्या बेडरुममध्ये घेऊन पण गेला... नयनाला आत सोडून तिच्या हातात एक चिठ्ठी देऊन मी दोन मिनिटांत आलो सांगत तो निघून जातो.. नयना काही बोलणार इतक्यात तो पुढे निघून जातो.. 🏃‍♂

नयना हातातली चिठ्ठी वाचत आत रूममध्ये जाते... समोरच दृश्य बघून हैराण होते.. तिथे बरेच लहान मोठे गिफ्ट ठेवले होते... चिठ्ठीत एक मजकूर होता....

Nayana this is for you 🤗

नयना पुढे जाते.. एक छोट गिफ्ट उचलते... "Happy friendship day Nayana..." gift खोलते तर त्यात सुंदर friendship band असते.. त्यावर इयर लिहील होत... नयना : अरे हे तर आपल कॉलेजच पहिल वर्ष होत... 🙂 दुसर गिफ्ट उघडते तर त्यात छोटा टेडी 🐻 असतो... तिसर गिफ्ट उघडते तर त्यात किचेन असत... कधी chain, तर कधी कानातले, कधी मोठा टेडी, तर कधी ग्रिटींग, तर कधी ड्रेस... एक दोन नव्हे तर त्यांच्या 1st year पासुन अगदी आजपर्यंतच्या सगळ्या कॉलेज डेज, तिचे बर्थडे, व्हॅलेन्टाईन्स डे ला तिच्या साठी घेतलेले सर्व गिफ्ट तिथे होते... ती खूप खुश झाली होती .. हे सगळं बघुन मन भरून आलं होतं....

राघव केक घेऊन रूममध्ये येतो.. नयना वळून राघवकडे बघते..

नयना : राघव!! हे सगळं...??

राघव : (केक टेबलवर ठेवत त्यावर कँडल लावत बसतो) अग कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून तुझ्यासाठी घेऊन ठेवल.. पण तुला देण्याची हिंमतच झाली नाही... 🙈

नयना : का?? मी काय फाडून खाणार होते तुला ?? 😲

राघव : नेहमीच नाक वाकड करत असतेस... 😂 आता पण बघ कशी नाक फुलवून आहेस....😆

नयना : (रागवून ) हमम ....

तसा राघव माचिसच्या काडीने कँडल जळवतो... आधीच रूममध्ये मंद रोषणाई करण्यात आलेली असते आता त्यावर ह्या कँडलच्या प्रकाशात ती अजूनच उजळून येते...🥰

फिकट गुलाबी रंगाची साडी त्याला काळया रंगाची चकाकणारी बॉर्डर... काळ्या चकाकीचा स्लीवलेस ब्लाऊज.. मोकळे सोडलेले केस कानात खड्याचे स्टड्स.. याव्यतिरिक्त काहीही शृंगार नव्हता पण तरीही खूपच सुंदर दिसत होती ती... राघव तिला बघतच बसला..😍 माचिसची काडी विझताना लागलेल्या चटक्यामुळे तो भानावर येतो...

राघव : नयना!!! Happy birthday to you... Happy birthday to you.... Happy birthday dear नयना...

नयना केक कट करते... राघव तिला पहिला घास भरवतो.. तोच अर्धा बाईट नयना राघवला भरवते आणि चटकन तिच्या डोळ्यांत पाणी येत...

राघव : ए वेडाबाई तु रडाव म्हणून नाही केल मी हे...

नयना : नाही रे रडत नाहीए मी... (एका बोटाने डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत) थांब मी हात धुवून आले...

ती पुढे जाते... तसा राघव मागुन तिचा पदर धरतो... नयना जरा घाबरून तिथेच थांबते... राघव हळू हळू तिच्या जवळ जातो...

नयना : (मन धडधडायला लागल) राघव काय करतोयस?? सोड मला...

राघव : (तिला स्वतःकडे वळवून तिचा हात हातात घेत) अग हात धूवायची काय गरज आहे??? (आणि तिची केक ने माखलेल्या बोटांवरचा केक ओठांनी साफ करतो) 😍 बघ झाली स्वच्छ...

नयना लाजून राघवच्या मिठीत शिरते..🥰 राघवही तिला आपल्या मिठीत सामावून घेतो... थोडा वेळ झाल्यावर मी निघू खूप उशीर झाला आहे... नयना म्हणते...

राघव ओके म्हणत तिला गाडीपर्यंत सोडायला येतो... नयना गाडीत बसून गाडी स्टार्ट करते.. तस राघव गाडीजवळ जातो...तिच्या समोर वाकून कानात हळूच बोलतो...

राघव : आजच गिफ्ट तर... न घेताच चाललीस... ( आणि तो आपले ओठ तिच्या गालावर टेकवतो) 😘

नयना आधी शॉक होते पण मग राघवची नजरभेट होताच लाजेने चूर होते.. आपलेच ओठ आपल्या दाताने चावत... लाजतच गोड स्माईल देऊन निघून जाते... घरी पोहचेपर्यंत ती लाजतच असते... गालातल्या गालात हसत असते.. 🙈

🎶🎶जादू है तेरा ही जादू, जो मेरे दिल पे छाने लगा

दीवाने मेरे ये तो बता क्या किया तूने,

मीठा सा दर्द होने लगा

ये क्या हुआ, पहले ना ऐसा होता था

मैं हूँ कहाँ, मैं जानूँ ना

कोई मुझे इतना बता दे, घर का मेरे मुझको पता दे

जादू है तेरा ही जादू...

मैंने तो, ये जाना ना, होता है क्या इंतज़ार

मेरा दिल, क्यूँ माने ना, मुझको तो हो गया है प्यार

मैं चैन से पहले रातों को सोती थी, तूने मेरी नींदें लूटीं

ये रोग क्या, तूने लगाया, दीवानापन कैसा जगाया

जादू है तेरा ही जादू...

जानेमन ओ जाने जां, क्या है इरादा बता

छूने दे इन होठों को, होठों से मेरे ज़रा

क्या खूब है, मैं भी कैसा दीवाना था,

क्यूँ इश्क़ से अंजाना था

पागल मुझे, तूने बनाया, चाहत है क्या मुझको बताया

जादू है तेरा ही जादू... 🎶🎶

घरी पोहचेपर्यंत ती लाजतच असते... गालातल्या गालात हसत असते.. 🙈

नयना घरी येते... नॅनीला सोबत घेऊन नाचायला लागते.. इतक्यात तिची नजर सोफ्यावर बसलेल्या आपल्या आईकडे जाते.. नयनाचा डान्सचा मूड खराब होतो..

न. आई : (हलकेच हसून) Happy birthday बेटा... 🙂

नयना : (थोडी रागात) नॅनीने सांगितल तेव्हा आठवल असेल ना??? 😏

नॅनी : (समजवण्याच्या सुरात) No dear.. I didn't say anything... 😔

नयना : मला माहीत आहे नॅनी... पण आई म्हणून यांना लक्षात हवा ना आजचा दिवस?? 🙄

न आई : नयना बेटा.... तस नाही.. तु गैरसमज करुन घेऊ नकोस..😔

नयना काही न ऐकता बेडरुममध्ये निघून जाते... शांतपणे बेडवर बसून असते.. नॅनी तिच्यासाठी जेवण घेऊन येते.. पण तिला भूक नसल्याने ती जेवणासाठी नकार देते.. आज दिवसभराच्या सगळ्या गोष्टी ती नॅनीला सांगते... नॅनी प्रेमाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवते आणि तिचे लाड करते...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी नेहमीप्रमाणे नयना कॉलेजला जाते.. गालातल्या गालात हसत असते.. कालचा वाढदिवस खूपच छान झाला होता.. तिला आपल्या वाढदिवसाचा इतका आनंद कधिच झाला नव्हता...

नयना आपल्याच तंद्रीत चालत असताना तिचा जिन्यावरून पाय घसरला पण क्षणात तिला राघवने सावरले..

राघव : अग लक्ष कुठे आहे तुझ ??? 🤨

नयना : (थोडी दचकून) sorry... कळलच नाही मला... 😥

राघव : ओके.. चल आता...

नयना : नाही... तु जा.. मला प्रॅक्टिस करायची आहे.. पुढच्या आठवड्यात जयपूरला स्पर्धा आहे.. 🙂

राघव : काय?? 🙄 हमम... पण तु मला उत्तर नाही दिलस अजून...

नयना : बघु .. 😉

राघव आणि नयना दोघेही आपापल्या दिशेने निघुन जातात.. नयना आज उशिरा पर्यंत सराव करत असते.. राघव बास्केटबॉल कोर्टमध्ये मित्रांसोबत खेळत असतो.. सराव करून त्याचे मित्र निघून जातात.. आता राघव एकटाच तिथे असतो.. तो सुद्धा निघण्याच्या तयारीत असतो..

इतक्यात नयना तिथे येते आणि राघवला मागून बास्केटबॉल मारते.. आणि त्याला खेळायला बोलवते. राघवला वाटल नयनाला खेळ जमणार नाही पण ती नयना होती हार थोडी मानणार आहे. दोघांनीही दोन दोन ची बरोबरी केली.. आता अजून एक डाव आणि या वेळेस बॉल राघवच्या हाती आला पण बॅक लिफ्ट होताच राघवने नयनाला आपल्या मिठीत पकडले..दोन हातात बॉल आणि मध्ये नयना.. त्याच्या स्पर्शाने ती थोडी चलबिचल झाली.. 😊

राघव : कधी बोलणार तु.. ते तीन मॅजीकल वर्डस...

नयना : बघू... 😉 (स्वतःला सोडवण्याचा वायफळ प्रयत्न करत )

राघव : बघ हा... (तिच्या कानात हळूच)

नयना : आधी नीट प्रपोज तर कर... माझ युनिव्हर्सिटी च लेटर येण्या आगोदर तर विचार करेन...

राघव : ओके... चॅलेंज एक्सेप्टेड. .. 🙂

आणि राघव तसाच नयना सोबत बॉल पास करतो...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नयना जयपूर ला पोहचते... त्यांच्या कॉलेजतर्फे अजून चार मुली रिप्रेसेंट करत होत्या.. पहिल्या दिवशी आराम करून दुसर्‍या दिवशी स्पर्धा होती..

नयनाचा नाव अनाऊंस झाल.. ती स्टेजवर पोझिशन घेऊन उभी राहिली आणि गाण सुरू झाले...

🎶🎶 प्रीत की लत मोहे ऐसी लागी

हो गई मैं मतवारी

बल-बल जाऊँ अपने पिया को

हे मैं जाऊँ वारी-वारी

मोहे सुध बुध ना रही तन मन की

ये तो जाने दुनिया सारी

बेबस और लाचार फिरूँ मैं

हारी मैं दिल हारी

हारी मैं दिल हारी

तेरे नाम से जी लूँ

तेरे नाम से मर जाऊँ

तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊँ

तूने क्या कर डाला, मर गयी मैं, मिट गयी मैं

हो जी हाँ जी

हो गयी मैं

तेरी दीवानी 🎶🎶

गाण संपल.. सगळे खूप खुश होते... डान्स खूपच छान झाला. आता सगळे निकालाची वाट पाहत होते.. यावेळेस पाच पैकी तीन पारितोषिक कॉलेजला मिळाले.. अर्थात नयनाने तर बाजी मारलीच नेहमीप्रमाणे.. सगळा कार्यक्रम संपताच नयना आणि तिच्या मैत्रिणी कँपसमधून बाहेर पडल्या.. अचानक कोणीतरी नयनाचा हात धरून तिला गाडीच्या आडोशाला खेचले.. तिच्या मैत्रिणी गप्पांच्या नादात पुढे गेल्या.. नयनाने त्याच्याकडे पाहिले आणि ती शॉकच झाली...

नयना : राघव तु इथे??? 😲

राघव : (हातातल फुलांचा गुच्छ देत) अभिनंदन... 🌹

नयना : ते सोड... तू इथे काय करतोयस???

राघव : मी इथे तुझ्यासाठी इतक लांब आलोय... त्याच तुला काही नाही... 😔

नयना : ओके.. Thank you for beautiful flowers...🙂 आता मी जाउ सगळ्या वाट बघत असतील माझी...

आणि नयना जायला निघते.. तस राघव तिचा हात धरतो..

राघव : एका अटीवर... उद्या तुझ्यासाठी सरप्राईज आहे... सो उद्या संपूर्ण दिवस आपण जयपूर फिरणार आहोत....🙂

नयाना होकार देऊन निघून जाते..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच राघव बाईक घेऊन हॉटेल बाहेर उभा असतो.. आणि तिथून नयनाला फोन करुन लवकर तयार होऊन खाली येण्यास सांगतो... ती घाईगडबडीत तयार होऊन बाहेर येते..

छान रेड कलरचा शॉर्ट टॉप, डार्क ब्लू कलरची अँकल लेन्थ जीन्स, कानात सिल्वर रिंगचे कानातले, ओठांवर फिकट रंगाची लिपस्टिक, खांद्यावर स्लींग बॅग आणि पायात व्हाईट कलरचे स्निकरस् एकदम स्टनींग लुक... 😍

राघव पण काही कमी नव्हता... ग्रे शेडचा टी शर्ट, ब्लॅक कलरची कार्गो, त्यावर डार्क नेव्ही ब्लू कलरच जॅकेट, डाव्या मनगटावर स्पोर्टी घड्याळ, पायात बूट आणि ब्राउन रंगाचा क्लासी गाॅगल... 😎 आणि फुल आॅन अटीट्युडमध्ये बाइकवर वाट बघत बसला होता..

नयना : (जांभळी देत) 😴 उगाच झोप मोड केलीस..

राघव : आधी गाडीवर बस मग बोलू.. उशीर होतोय..

येवढ बोलून राघवने हेल्मेट डोक्यावर चढवला आणि बाईक स्टार्ट करून निघाला.. आज पहिल्यांदाच ती त्याच्या बाईकवर बसली होती..

नयना!!! बाइकवर boyfriend सोबत बसली आहेस.. So be comfortable.. 😎 मला पकडून बसलीस तरी काही हरकत नाही.. (राघव नयनाला ताठ बसलेल बघून म्हणाला) 🥰

नयना : गाडी चालवण्यावर लक्ष दे तू 🤨

राघव कचकन ब्रेक दाबुन बाईक थांबवतो.. तशी नयना त्याच्या पाठिवर आदळते.. काय करतोयस..??

राघव : अग बाई कमीत कमी मित्र तरी समज.. तु अशी बसलीस तर लोक काय म्हणतील..आणि 🤦‍♂मी नाही म्हटलं की मला मिठी मारून बस पण हवेने उडून गेलीस तर माझ काय होईल हा तरी विचार कर 😆

नयना : very funny.. चल आता ( नाक उडवून) 🙈

त्याने बाईक स्टार्ट केली.. नयना मागे बसली त्याच्या खांद्यावर हात ठेवून..आणि ते पुढे निघाले..

कनक व्रिंदावनच्या आधी , जोहरी बाजारापासून जवळपास चार ते साडे चार किलोमीटर अंतर पार करून ते जलमहाल ला पोहचले.

सकाळी सहा - साडे सहाच्या सुमारास होणारा सुर्योदय जलमहालावरून खूपच सुंदर दिसतो... नाहरफोर्ट आणि जलमहाल हे सकाळच्या सूर्योदयाच्या निसर्ग रम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.. राघव नयनाला सांगु लागला...

सुर्योदयला सुरुवात झाली तस तस निसर्गाच सौंदर्य अधिकच खुलून दिसत होत.. गडद तांबडा रंग आता पिवळ्या रंघात घोळायला लागला होता.. लाल तांबूस रंगाचा सूर्य त्या जलमहालाच्या तलावात जणू स्वतःहालाच निरखत , आपलच प्रतिबिंब बघुन जसा उजळून निघाला होता.. नयना तो सुंदर नजारा डोळ्यांत साठवत होती. या क्षणी राघवला घट्ट मिठी मारुन त्याला क्षणांसाठी थँक्यू म्हणाव असा विचार नयनाच्या मनात आला पण ती मनातच हसली...

त्यानंतर दोघेही हवामहल, बिर्ला मंदिर, अलबर्ट हॉल म्युझियम, आमेर फोर्ट अशा बर्‍याच ठिकाणी फिरले... जोहरी बाजार, नेहरू बाजार आणि तिथल्या लोकल बाजारात शॉपिंग पण केली..

त्रिपोलीया बाजार बांगड्यांच्या खरीदारी साठी खूप प्रसिद्ध आहे.. तिथे राघवने छान रंगीबेरंगी बांगड्या निवडल्या आणि तिथेच स्वतः तिच्या हातात भरल्या पण नयनाने हात वर करताच त्या सरळ हाताच्या कोपरातून पार झाल्या.. 😅 दुकानदार पण बघून हसायला लागला.. नयना त्याची गंमत बघून गालातच हसत होती... ☺

राघवने डोक्यावर हात मारला.. 🤦‍♂ त्याचा उतरलेला चेहरा पाहून नयनाने स्वतःच्या मापाच्या बांगड्या निवडल्या आणि राघवला दिल्या... सोबत आपला हातही पुढे केला.. सोने पे सुहागा 🥰..

तिच्या हातात बांगड्या चढवल्यावर तिला तो बघतच बसला.. नयना त्या क्षणाला खुपच गोड दिसत होती.. 😍

🎶🎶 सजदे में यूँ ही झुकता हूँ

तुमपे ही आ के रुकता हूँ

क्या ये सबको होता है

हमको क्या लेना है सबसे

तुमसे ही सब बातें अब से

बन गए हो तुम मेरी दुआ

खुदा जाने के मैं फ़िदा हूँ

खुदा जाने मैं मिट गया

खुदा जाने ये क्यूँ हुआ है

के बन गए हो तुम मेरे खुदा

दिल कहे के आज तो छुपा लो तुम पनाहों में

के डर है तुमको खो दूंगा

दिल कहे संभल ज़रा ख़ुशी को ना नज़र लगा

के डर है मैं तो रो दूंगा

करती हूँ सौ वादे तुमसे

बांधे दिल के धागे तुमसे

ये तुम्हें न जाने क्या हुआ

खुदा जाने के... 🎶🎶

शॉपिंग करुन राघव नयनाला स्काय वाल्टस हवेलीला घेऊन आला... तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती.. खर सरप्राईज तर अजून बाकीच होत...

नयना ने राघवचा हात हातात घेतला..

नयना : राघव Thank you so much.. For this beautiful day... 🙂

राघव : picture अभी बाकी है मेरे दोस्त.. 😉

नयना आश्चर्याने काय???? म्हणून विचारते.. तस राघव तिला स्काय वाल्टसच्या आत घेऊन जातो.. तो नजारा बघून नयना खूप एक्सायटेड होते.. आणि समोरचा सुंदर नजारा बघतच बसते.. रंगीबेरंगी हॉट एअर बलून आकाशात उडत असतात... संध्याकाळ झाली असल्याने वातावरण पण छान रोमॅन्टिक वाटत होत.. तांबड्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला आभाळ... त्यात उडत असलेले रंगीबेरंगी हॉट एअर बलून, घरच्या वाटेला निघालेल्या पक्षांचा किलबिलाट... मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जात होत...

राघवने एक hot air balloon खास त्या दोघांसाठीच बुक केला होता.. छान इंद्रधुच्या रंगात न्हाऊन निघालेला..🌈 राघवने आपला हात पुढे केला तसा नयनाने तिचा हात त्याच्या हाती दिला.. त्याने आधी आपल्या ओठांनी तिच्या नाजूक हाताचे चुंबन घेतले..😘 नयना हलकेच हसली.. 🥰 मनातून तर ती जाम खूश होती.. दोघेही बलूनमध्ये उभे राहिले आणि आकाशी झेप घेतली...

अजून पूर्णपणे अंधार पडला नव्हता त्यामुळे आकाशातून निसर्गाच सौंदर्य एक वेगळाच अनुभव देत होत..🌇 पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल जयपूर, आकाशातून त्या ओल्या सांजवेळी रंगांच्या निरनिराळ्या छटांचा अनुभव देत होता...🌆 आकाशी असलेले विरळ ढघ आज फार जवळ भासत होते.. त्यामुळे त्यांना स्पर्श करण्याचा मोह सुद्धा होतो. ☁ अशीच त्यांची सैर पुढे चालली होती..

आता काही अंतर पार केल्यावर अंधार पडत आला होता.. राघवने हलकेच नयनाचे डोळे आपल्या हाताने मिटले..

नयना : राघव काय करतोयस??? हात काढ ना डोळ्यांवरचा??? किती सुंदर आहे हे सगळं ...

राघव : (हळुच कानात) थांबना दोन मिनिटं... सरप्राइज आहे... ☺

नयना : बस कर अरे... अजून किती सरप्राईज देणार आहेस..? 🤦‍♂

राघव : तुझ्यासाठी काही पण.. 🙈 (काही मिनिटांनी राघव आपला हात तिच्या डोळ्यांवरून बाजूला घेतो.. )

नयना : बघ सगळीकडे अंधार झाला.. 😔 (त्याच्याकडे वळून)

राघव तिच्या ओठांवर आपल बोट टेकवत तिला गप्प करतो आणि खुणेनेच तिला मागे वळून खाली बघायला सांगतो....

तिने मागे वळून बघताच खाली एक एक दिवे उजळायला लागले... नीट निरखून पाहिले तर " I ❤ U " अस लिहिल होत दिव्यांनी... पिवळ्या रंगाच्या दिव्यांनी I आणि U सजला होता.... तर मधला ❤ निरनिराळ्या रंगांनी सजला होता. नयना तर आवासून पाहत बसली..

राघवने हळूच मागून नयनाच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवली... आणि "I love you नयना" म्हणत गोड स्माईल दिली... आता ते दिवे एक एक करत वर उडायला लागले.. ते दिवे म्हणजे स्काय लॅटर्न होते... जे आकाशी झेप घेताना फारच सुंदर वाटतात... हे सगळं पाहून नयना भारावून गेली... तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आल... तिने मागे वळून राघवला घट्ट मिठी मारली...

नयनाच्या अनपेक्षितपणे मिठी मारल्याने राघव दोन मिनिटे स्तब्ध झाला.. नयनाच्या मिठीत आणि त्या नयनरम्य रोषणाईत तोहि आता हरवून गेला.. त्याने अलगद आपले डोळे मिटले आणि तिला आपल्या मिठीत सामावून घेतले... आता त्याचीही पकड तिच्याभोवती घट्ट झाली... 🥰 काही वेळाने दोघांनीही एकमेकांच्या नजरेत पाहील आणि आपसुकच त्यांनी आपली पकड घट्ट करत ते दिर्घ चुंबनात विलीन झाले.. 💏 आता डोळे मिटून फक्त तो क्षण अनुभवत होते..

हळू हळू हॉट एअर बलून खाली आला.. दोघेही त्या क्षणात येवढे हरवले होते की बलून सफारी संपली हे त्याच्या लक्षातही आले नाही.. थोड्या वेळाने भानावर आल्यावर नयनाने डोळे उघडून राघवकडे पाहिल आणि लगेच नजर चोरली.. आपलेच ओठ चावत पूर्ती लाजली.. 🙈 आणि परत एकदा राघवच्या मिठीत शिरली.. दोघेही हातात हात घालून बाहेर पडले..मनात खूप सार्‍या आठवणी साठवत.. प्रेमाच्या धुंद लहरीत हरवत...

🎶🎶गूँजी सी हैं सारी

जैसे बजती हो

ल़ाहेराती है माहकि

गुनगुनाती है

सब गाते है सब ही मदहोश

हम तुम क्यूँ खामोश

च्छेदो चुप हो क्यूँ गाओ

आओ ना आओ आओ ना आओ

गा गा रे गा गा रे गा रे गा मा गा

नि रे सा नि रे सा नि सा

गा गा गा रे गा गा रे गा मा पा

ढा नि ढा नि ढा पा मा गा रे मा

गा गा रे गा गा रे गा रे गा मा गा

नि रे सा नि रे सा नि सा

गा मा पा नि ढा नि ढा नि ढा

ढा पा पा सा सा सा नि ढा पा मा गा रे मा

तन मन में क्यूँ ऐसे बाहेती

ठंडी सी एक आग

साँसों में है कैसी यह

धड़कन में क्या राग

ये हुआ क्या हुमको समझाओ ना

सब गाते हैं सब ही मदहोश

हम तुम क्यूँ खामोश

दिल में जो बातें हैं होंतों पे लाओ

आओ ना आओ आओ ना आओ

अब कोई दूरी ना उलझन

बस एक इकरार

अब ना कहीं हम ना तुम हो

बस प्यार ही प्यार

सुन सको धड़कनें इतने पास आओ ना

सब गाते हैं सब ही मदहोश

हम तुम क्यूँ खामोश

अब मेरे सपनों पे तुम ही तुम छ्चाओ

आओ ना आओ आओ ना आओ 🎶🎶

तिथुन बाहेर पडले तेव्हा बराच उशीर झाला होता.. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते.. जवळच्याच रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले.. जेवण करेपर्यंत खूप उशीर झाला होता.. तिथुन माघारी नयनाच्या हॉटेलवर जायला बराच उशीर झाला असता.. रात्री अपरात्री अशा परक्या शहरात फिरण थोड रिस्की असल्यामुळे त्यांनी तिथल्याच जवळच्या हॉटेलमधे थांबण्याचा निर्णय घेतला..

तिथे त्यांनी डबल सुइट बूक केला... आणि वेटींग रुम मधल आपल सामान घेऊन आपल्या रुममध्ये गेले.. दिवसभराच्या फिरण्यामूळे जाम थकवा आला होता म्हणून जास्त टाईम पास न करता.. नयना आतल्या रुममध्ये जाउन झोपली आणि राघवने बाहेर आपले हातपाय पसरले.. 😴

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी जाग आली तेव्हा सात वाजले होते.. नयनाने शीळ घालत आपला आळस झटकला.. कालच्या दिवसभराच्या गोड आठवणी आठवुन मनाशी हसून अंघोळीसाठी बाथरुममध्ये निघून गेली.. ती बाहेर आली तरी राघव अजूनही बाहेरच्या खोलीत झोपून होता.. निघायची तयारी करावी म्हणून तीच त्याला उठवायला गेली... झोपेत असलेल्या त्याचा निरागस चेहरा पाहून तिला त्याच्या कपाळावर किस करण्याचा मोह झाला..

नयनाने हळूच त्याच्या कपाळावर किस केल पण त्याचवेळी तिच्या ओल्या केसातून त्याच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या पाण्याच्या स्पर्शाने त्याला जाग आली.. त्याने डोळे उघडले तर समोर नयना होती.. सैल पॅटर्नचा चटणी रंगाचा टॉप जो डाव्या खांद्यावरून तिच्या दंडावर उतरलेला, त्यात ती नुसतीच अंघोळ करून आल्यामुळे निखरलेल तिच रूप, ओल्याशार केसातून टपटप पडणारे पाण्याचे थेंब.. यामुळे खूप मोहक दिसत होती.. राघवने हळूच तिच्या चेहर्‍यावर आलेले ओले तिच्या कानामागे सारले.. आपला हात तिच्या मानेमागे नेत तिला आपल्या जवळ ओढत आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले...

नयना लाजूनच दूर झाली आणि मागे वळून बसली.. राघव तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत उठला आणि त्याने तिला मागून घट्ट मिठी मारली... तिच्या पाठीवरच्या ओल्या केसात आपल डोक ठेवून तिला गुदगुल्या करु लागला.. नयनाही त्याच्या स्पर्शात मंत्रमुग्ध होत होती. त्याने तिला तसच बेडवर झोपवले आणि तिच्या कपाळावर किस केले.. मग तिच्या डोळ्यांवर किस केले.. पुढे दोन मिनिटे आपले ओठ तिच्या ओठांवर क्रश केले.. 🙈

अचानक काही मनात येताच राघव तिच्यापासून दूर झाला आणि उठून जाऊ लागला.. पण नयनाने त्याला हात धरून अडवले.. राघवने मानेनेच नकार दिला आणि नयना त्याला होकार सांगत होती.. तिलाही त्याच्या स्पर्शात हरवून जायच होत.. नयनाने तसच त्याला स्वतःजवळ ओढले.. आतातर तिचीही संमती होती.. इतकावेळ तो तिला सतवत होता पण यावेळी तिनेच पुढाकार घेतला होता.. नाही म्हणत असताना त्याचाही संयम तुटला.. आणि ते दोघेही एकमेकांच्या स्पर्शात गुंतत गेले... 🥰

🎶🎶साँसों को साँसों में ढलने दो ज़रा

साँसों को साँसों में ढलने दो ज़रा

धीमी सी धड़कन को बढ़ने दो ज़रा

लम्हो की गुज़ारिश है ये पास आ जाए

हम… हम तुम…

तुम… हम तुम…

आँखों में हमको उतरने दो ज़रा

बाहों में हमको पिघलने दो ज़रा

लम्हो की गुज़ारिश है ये पास आ जाए

हम… हम तुम…

तुम… हम तुम…

साँसों को साँसों में ढलने दो ज़रा 🎶🎶

गुलाबी स्पर्शात न्हाऊन निघाल्यापासून दोघेही बराच वेळ शांतच होते.. दोघही एकमेकांच्या मिठीत पडून आपल्या हाताची बोटे एकमेकांच्या बोटांत गुरफटवत निपचित पडून होते.. राघवने नयनाच्या कपाळावर हलकेच किस करत आपला मोबाइल उचलला.. घड्याळात दहा वाजले होते.. नयनाने पण तसच आपला मोबाईल चेक केला... पंधरा मिसकॉल होते मैत्रिणींचे.. रात्री झोपमोड होऊ नये म्हणून सायलेंटवर टाकला होता मोबाईल तिने... 😲

सगळी तयारी आवरून दोघेही परतीला निघाले... राघवने नयनाला तिच्या होटेल जवळ सोडले.. दोघांनीही एकमेकांना हग केले आणि नयना जायला लागली..

राघव : (काहीतरी आठवत) नयना!!! एक मिनिट...

नयना : (इशारेनच) काय झालं??

राघव : (खिशातून envelope काढत) तुझ युनिवर्सिटीच पत्र.. मोठ्या मुश्किलीने सरांची permission घेऊन मी ते स्वतः तुला द्यायला आलो होतो..

नयना : (excited होऊन )आणि तु मला आत्ता देतोयस.. ( आणि ती envelope उघडून बघते)

राघव : तुझ सिलेक्शन झालय..

नयना : (आनंदाने) या स्पेशल कोर्ससाठी मला admission मिळाल.. I am so happy... 🤗

राघव : म्हणजे तु पुढच वर्षभर लंडनला असणार... 😞

नयना : (राघवचा उतरलेला चेहरा पाहून त्याला मिठी मारते) एकच वर्षाची तर गोष्ट आहे.. मी लवकरच परत येईन...

राघव : (हलकेच हसून आपली मिठी घट्ट करत तिला कपाळावर किस करतो ) हमम... मला खूप आठवण येईल तुझी...

नयना : Me too ... 😘 आता तु निघ... कोणी पाहील तर ????

राघव : हो ग राणी निघतो... Bye... Love you... 😘

नयना : Love you too.. 😘

राघव : काय म्हणालीस ??? परत बोल... (कान तिच्या जवळ करत)

नयना : अरे बाबा.. I love you...., I love you, I love you so much.... Bye.... 😍

राघव खूश होऊन निघून जातो..नयाना भेटल्यावर सगळ्या मैत्रिणींचा प्रश्नांचा भडीमार सुरू होतो.. नयना काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेते.. सगळे परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दोन दिवसांनी कॉलेजमध्ये आल्यावर तिला विरेन रस्त्यात अडवतो...

विरेन : Hiii नयना... 🙂

नयना : Hiii.... 🙂

विरेन : जयपूर जरा जास्तच enjoy केलस??? 😉

नयना : काय म्हणायचे आहे तुला ?? (थोडी शंका घेत)

विरेन : राघवने शर्त लावली होती तुला पटवण्याची...

नयना : just shut up 😡

विरेन : खोट वाटत असेल तर कँटीनमध्ये जाऊन बघ.. राघव आणि त्याचे मित्र तिथेच बसून गप्पा मारत आहेत...

नयना : तस काही नाही आणि तुला तर मी नंतर बघून घेईन..

विरेन : बिनधास्त... मी इथेच आहे...

नयनाला पूर्ण विश्वास असतो की विरेन खोट बोलतोय पण विरेनला धडा शिकविण्यासाठी ती मुद्दाम कँटीनमध्ये जाते. पण....

तिथे राघव, अभय आणि त्याचे मित्र थट्टा मस्करी करत असतात..

1 मित्र : शेवटी तु पैज जिंकली मित्रा...

अभय : but we are really happy for you राघव... पार्टी तो बनती है|

पण राघवच त्यांच्या गप्पांत अजिबात लक्ष नसत.. तो तर छान फक्त नयनाचाच विचार करत असतो... प्रेमात अखंड बुडालेला तो यासगळ्यांत असूनही हरवल्यासारखा होता.. पण नयना रागाने लालबुंद झाली होती.. तिने फक्त अभय आणि त्याच्या मित्राची पैजेची बोलणी ऐकली आणि राग मनात धरून बसली...

नयना : राघव!!! मला तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती.. 😡

तिच्या अशा ओरडण्याने कँटिनमधले सगळेच त्यांच्याकडे बघू लागले..

राघव : (कसलीच कल्पना नसल्याने) काय झालंय नयना??

नयना : माझ्या भावनांशी खेळताना लाज वाटली.. तु पैज लावली???

अभय : नयना तुझा काहीतरी गैरसमज होतोय? ??

नयना : just shut up... तु मध्ये पडू नकोस... राघव खर सांग पैज लागली होती की नाही???

राघव : अग हो... पण तु समजतेस तस नाहिए...

नयना : जर तस नाही तर जयपूर बद्दल बाहेर कस माहीत पडल???

राघव : (शॉक होउन ) जयपूर?? नयना इथे सीन नको... मी काहीही सांगितल नाहीए...

नयनाने रागात संपूर्ण कँटीनसमोर राघवच्या कानाखाली मारली.. तसा राघवही चिडला आणि रागाच्या भरात नको ते बोलून गेला..

राघव : हो लावली पैज कळल तुला... जा काय करायचे ते कर जा...😡

नयनाला त्याच्या अशा बोलण्याने भरुन आलं होतं पण ती रागातच बाहेर निघून गेली.. संपूर्ण कँटीन आता राघवकडे बघत होत..

राघव : (बाजूला नजर फिरवत ) काय बघताय सगळे कधी आमची भांडण पाहिली नाही का???

तसे सगळेच आपापल्या कामाला लागले.. अभय राघवला धीर देतो पण राघव त्याचा हात खांद्यावरून उडवून लावतो.. तो तसाच कँटीनमधून बाहेर पडतो... थोड्यावेळाने त्याच्या लक्षात येत की तो रागाच्या भरात आपली चुक नसतानाही ती मान्य करून बसला.. त्याने नकळत नयनाला हर्ट केले...

इथे नयना गाडीत येऊन बसते... आधी तर खूप रागात असते पण नंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटतो.. ती खूप रडत असते..

राघव नयनाला शोधत पार्किंगमध्ये येतो... गाडीत तिला रडताना बघून तो धावत तिच्या जवळ येतो... नयना त्याला जवळ येताना बघून रागात गाडी स्टार्ट करून कॉलेजच्या बाहेर निघते... राघव तिला थांबण्याचा प्रयत्न करतो पण ती निघून जाते.. मागोमाग राघवही गाडी घेऊन निघतो...

गाडी चालवता चालवता राघव तिला फोन करतो.. ती फोन कट करते.. मोकळ्या रस्त्यावर आल्यावर राघव गाडीचा वेग वाढवून नयनाच्या गाडीला ओवरटेक करत गाडी अडवतो.. दोन्ही गाड्या थांबतात.. राघव गाडीतून उतरून नयनाकडे जातो...

राघव : नयना ऐकुन तर घे माझ...

नयना : काय ऐकुन घेउ राघव??? फक्त मला पटवण्यासाठी जयपूरचा येवढा खटाटोप केलास?? मला सांग पैज नक्की कसली लागली होती मला पटवण्याची की माझ्या शरीर सुखाची...

राघव : नयना!!! (रागातच ओरडत तिच्यावर हात उचलतो पण संयम ठेवून मागे होतो) नयना त्या दिवशी जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं.. भावनेच्या जरा जास्तच आहारी गेलो आपण.. अग पण मी त्याचा बाजार नाही मांडला... (काकुळतीला येऊन तिला समजावत होता)

नयना : (रागात काही एक ऐकुन घेण्याच्या मनःस्थितीत नसते) राघव leave me alone... मला आता जाउ दे.. मला तुझ्याशी काहीही बोलायच नाही...

आणि नयना गाडी स्टार्ट करुन रीव्हर्समध्ये मागे घेत निघून जाते.. राघव बराच वेळ तिथेच बसून असतो. थोडावेळ डोक शांत झाल्यावर परत नयनाला फोन ट्राय करतो पण ती फोन कट करते.. तिला सॉरीचा मेसेज सुद्धा टाकतो पण ती काहिच रिप्लाय देत नाही..

थोड्यावेळाने फोन स्वीच आॅफ येतो... संध्याकाळी राघव नयनाच्या घरी जातो.. पण ती भेटायला सुद्धा तयार नसते.. राघव तर खंगत चालला होता.. नयना पेक्षा कितीतरी जास्त तो तिच्यावर प्रेम करत होता...

इतक्यात त्याला अभय फोन करतो.. राघव कुठे आहेस तू सकाळपासून काकू घरी वाट बघत आहेत... तु त्यांचा फोन पण रीसिव्ह नाही केलास?? त्यांना मी सांगितलं की तु माझ्या घरी आहेस...आता तू घरी जा आधी... अभय एका दमात बोलुन गेला..

हो बोलुन राघव घराच्या दिशेने वळला... राघव परत एकदा नयनाला फोन ट्राय करतो पण फोन बंद येतो..

🎶🎶 प्यार है या सज़ा, ए मेरे दिल बता

टूटता क्यूँ नहीं दर्द का सिलसिला

इस प्यार में हो कैसे कैसे इम्तिहान

ये प्यार लिखे कैसी कैसी दास्तान

या रब्बा दे दे कोई जान भी अगर

दिलबर पे हो ना, दिलबर पे हो ना कोई असर

हो या रब्बा दे दे कोई जान भी अगर

दिलबर पे हो ना, दिलबर पे हो ना कोई असर

हो हो हो प्यार है या सज़ा, ए मेरे दिल बता

टूटता क्यूँ नहीं दर्द का सिलसिला 🎶🎶

इथे नयना पण खूप रडत असते.. 😭 तिला राघवसोबत घालवलेला एकुण एक क्षण आठवत असतो.. आपण आपल सर्वस्व त्याला पण त्याने फक्त मजा म्हणून पाहिले हा गैरसमज तिला मनातून खूप त्रास देत होता...

राघवच तर गाडी चालवताना पण लक्ष नव्हत.. तो आतुन पूर्णपणे तुटला होता..😩

🎶🎶 कोई ना सुने सिसकती आँहों को

कोई ना धरे तड़पती बाहों को

आधी आधी पूरी ख्वैशें

टूटी फूटी सब फरमाइशें

कहीं शक हैं कहीं नफरत की दीवार है

कहीं जीत में भी शामिल पलपल हार हैं

या रब्बा दे दे कोई जान भी अगर

दिलबर पे हो ना, दिलबर पे हो ना कोई असर

हो या रब्बा दे दे कोई जान भी अगर

दिलबर पे हो ना, दिलबर पे हो ना कोई असर 🎶🎶

राघव आपल्याच विचारात गुंग असतो... अचानक गाडीसमोर एक मुलगी पळत आल्याने तो गोंधळतो आणि गाडीवरच नियंत्रण सुटून गाडी थोड्या अंतरावर झाडाला आदळतो.. सुदैवाने जास्त काही होत नाही.. राघव थोडक्यात बचावतो...

ती मुलगी खूप घाबरलेली होती.. धावत पळत आल्याने खूप दमल्यासारखी वाटत होती.. तिच्या अंगात त्राणच उरले नव्हते.. ती तिथल्या तिथेच बेशुद्ध पडते.. एव्हाना आसपास गर्दी होऊन अपघाताने ती बेशुद्ध पडली अस समजून लोक राघवलाच बोलायला लागतात... 😥

राघव प्रसंगावधान राखून आधी घरी बाबांना फोन करून सगळा प्रसंग सांगतो.. बाबा त्याला धीर देतात आणि मुलीला हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगतात... आणि काळजी करू नकोस आम्ही पोहचतो तिथे... बाबांच्या धीर देण्याने तो थोडा सावरतो.. लोकांच्या मदतीने त्या मुलीला गाडी घेऊन जवळच्याच हॉस्पिटलला नेतो..

थोड्यावेळाने राघवचे आईबाबा सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहचतात.. मागून पोलिसही हजर होतात.. राघव पोलिसांना बघून आधी घाबरतो पण काही प्रोब्लेम नको म्हणून राघवचे बाबाच स्वतः पोलिसांना बोलावतात...

पोलिस : आम्ही डॉक्टरांना भेटुन येतो.. मि. देशमुख...

बाबा : sure...

आई : कशी आहे ती मुलगी??

राघव : बेशुद्धच आहे..

बाबा : काळजी करू नको.. होईल सगळ नीट..

पोलिस डॉक्टरांना भेटून येतात.. ती मुलगी गाडीला धडकली नाही किंबहुना हा अपघात नाही.. ती घाबरलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडली.. तिच्या अंगावर अपघाताची कसलीही खुण नाही हे त्यांना डॉक्टरांच्या तपासणीतून कळाल.. तरीही येवढ्या रात्री अशा अवस्थेत ती का पळत होती हे कळण गरजेच आहे म्हणून ती मुलगी शुद्धीवर आल्यावर आम्ही परत चौकशीसाठी येऊ अस सांगून ते निघून गेले..

राघवने सुटकेचा निःश्वास सोडला.. ती मुलगी शुद्धीवर आल्यावर पहिले पोलिस तिला भेटतील आणि मगच तुम्हाला भेटता येईल अस डॉक्टरांनी सांगितले होते.. त्यामुळे बाहेर वाट बघण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता.. मि. देशमुखांनी म्हणजेच राघवच्या बाबांनी राघव आणि राघवच्या आईला घरी पाठवले.. आणि ते स्वतः तिथे थांबून राहिले...

सकाळी त्या मुलीला जाग आली तेव्हा डॉक्टरांनी सर्वात आधी पोलिसांना बोलावून घेतले.. तो पर्यंत राघवचे बाबा बाहेरच वाट पहात होते..

मुलीची जबानी घेतल्यानंतर त्यांनी मि. देशमुख यांना सगळं ठीक असल्याचे सांगितले आणि ते निघून गेले.. मि. देशमुख डॉक्टरांची परवानगी घेऊन त्या मुलीला भेटायला गेले..

ती मुलगी छानपैकी बेडवर पायावर पाय लांब करून फळे खात बसली होती..😀 राघवने वर्णन केल्याप्रमाणे भीतीचे कसलेच भाव तिच्या चेहर्‍यावर नव्हते.. पण तिला बघून मि. देशमुख यांना आश्चर्याचा धक्का बसला.. 😲

मि. देशमुख : मीनल!!! तु???

मीनल : अय्यो अंकल तुम्ही?? Thank God तुम्ही मला भेटलात.. पण तुम्ही इथे कसे?? आणि तुम्हाला कस कळल की I am here ?? अरे अंकल तुम्ही काही बोलत का नाही ?? कधी पासुन मीच बोलतेय ?? 🤔

हि मुलगी म्हणजे मीनल मराठे अय्यर.. ऊंच, देखणी, सरळ नाक, गोरा रंग, US ला असल्या कारणाने राहणीमान अतिशय मॉडर्न.. आणि भरपूर बडबडी... बोलण्यात थोडा पण वैविध्यपूर्ण बाज.. अर्धी मराठी आणि अर्धी साऊथ इंडियन.. आता हे कस तर मीनलची आई साऊथची आणि वडील मराठी.. आता प्रश्न पडला असेल मग आडनाव मराठे अय्यर कस?? मीनल च्या आईवडीलांच लव्ह मॅरेज.. दोन्ही कुटुंब अगदी देशस्थ..आधी लग्नाला घरुन विरोध होता मग जातीचा विषय सोडला तर नकार देण्यासारखे काही नव्हते..आणि मग नाव न बदलण्याच्या अट्टहासामुळे दोन्ही आडनाव कायम ठेवत त्यांनी असा तोडगा काढला.. ☺

मि. देशमुख : अग हो... तु थांबशील तर मी काही बोलेन ना.. 😀

मीनल : OK ok.. तुम्ही बोलाना अंकल.. 🤗

मि. देशमुख : आधी तु सांग?? तु तर उद्या येणार होतीस ना??

मीनल : (त्यांच वाक्य मधेच तोडत) ते तर तुम्हाला सरप्राइज देण्यासाठी मी दोन दिवस आधी आले.. But I got a big surprise.. 😥 Actually झाल अस की मी एअरपोर्टवर उतरून टॅक्सी पकडली.. हातात मॅप घेऊन रस्ता शोधत त्याला सांगत होते.. इतक्यात मला खूप hunger झाल.. (तिच्या या वाक्याने मि. देशमुख 🤨 काय???) I mean hungry.. मग मी रोड स्टॉल वरून फुड घेतल.. (रस्त्यावरच्या टपरीवर) So yummy food.. After one hour taxi driver became angry 😡 and half रस्त्यात सोडून गेला.. 😂 suddenly माझ stomach very दुखायला लागलं.. (तोपर्यंत मि. देशमुख यांची अवस्था 🤔🙄😥🤦‍♂🤨 अशी झाली होती 😂) मग मी near च्या public toilet मध्ये गेले.. बाहेर येऊन परत टॅक्सी पकडुन सामान गाडीत ठेवले but when taxi driver see my face पळून गेला तो.. (मि. देशमुख 🤔 का??) his a same guy... 🤦‍♂ मी त्या taxi मागे पळाले आणि suddenly एका गाडीसमोर आले.. And right now you are in front of my eyes... 🤗

मि. देशमुख : 😥 अग मग फोन करायचा ना???

मीनल : अय्यो सरप्राइज होत ना ... 😂

मि. देशमुख : (डोक्यावर हात मारून )🤦‍♂ बाई खूप छान सरप्राइज दिल...

मीनल : (परत तोंडाचा पट्टा चालू) पण तुम्हाला कस माहीत मी इथे आहे ते ???

मि. देशमुख : तु आधी घरी चल.. गाडीत सगळं सांगतो.. 🙈

हॉस्पिटलच्या formalities पूर्ण करून मि. देशमुख मीनलला घेऊन आपल्या घरी निघाले.. गाडीत बसल्यावर त्यांनी तिला ती कशी आणि कोणाच्या गाडीला धडकली इत्यंभूत सगळी माहिती दिली.. गाडीतपण तिची अशीच बडबड सुरु होती..

मि. देशमुख यांनी गाडीत बसण्याआधिच घरी मीनलबद्दल कल्पना दिली होती.. गाडी दारात येताच राघवची आई किचनमधून बाहेर येते.. आईंना बघताच मीनल त्यांना वाकून नमस्कार करते..

आई : अरे वाह!! US ला राहुन सुद्धा संस्कार जपून आहे.. छान..

बाबा : लहानपणीचा स्वभाव ही जपुन आहे.. 😂

आई : म्हणजे?? 🤨

बाबा : कळेल थोड्यावेळात... 😌

आई : असो... अग मीनल तु तय उद्या येणार होतीस ना??

मीनल : अय्यो... ते काय झालं ना आँटी... ब्ला ब्ला ब्ला... (आणि तीच पुराण सुरू झाल) 😂

बाबा : (डोक्यावर हात मारून मनात ) 🤦‍♂ आपण तोपर्यंत फ्रेश होऊन येउया..

थोड्यावेळाने राघवसुद्धा हॉलमध्ये येतो.. रात्रभर तो नयनाच्याच विचारात असतो.. त्यामुळे झोप नीट झाली नव्हती.. त्याच्या चेहऱ्यावरून कळत होत.. नाश्त्यासाठी सगळे डायनिंग टेबलवर हजर झाले.. मीनलला समोर बघून राघवला आश्चर्य वाटले.. मीनलची तर अजुनही बडबड सुरूच होती..😌 आईंनी सर्वांना नाश्ता दिला आणि त्याही सोबत बसल्या..

बाबा : अरे ही मीनल आपल्या मराठे काकांची मुलगी..

राघव : ओहह!! ती बडबडी...

मीनल : आत्ता नाही हा.. लिटिल लिटिल talking 😉

आई : हो हो ... 😂

राघव : अग पण काल तु अचानकपणे माझ्या गाडीसमोर कशी आलीस?? (राघव आत्ताच सर्वांना भेटत असल्यामुळे मीनलचा गोंधळ माहित नाही) 😌

मीनल : अरे ते actually झाल अस ---------🙈 (ते आपल पुराण A to Z (🙉🤦‍♂ राघवच्या आईबाबांची रिअॅक्शन )

राघव : (नाश्ता उरकून) ओके मी निघतो.. मला उशीर होतोय कॉलेजला.... Bye bye..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कॉलेजमध्ये आल्यापासून राघव नयनालाच शोधत असतो पण नेमकी ती कॉलेजला आलेली नसते.. राघव तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून दोन लेक्चर्सनंतर घरी येतो.. घरी येऊन बघतो तर मीनलने त्याच टि शर्ट आणि ट्रक पँट घातलेली असते.. तिचा तो अवतार बघून राघवला आधी हसू येत.. पण तिच सगळ सामान टॅक्सी मध्ये राहिल्याने तीला राघवच्या कपड्यांशिवाय पर्याय नव्हता.. कारण आईंची साडी नेसण्यापेक्षा हे जास्त आरामदायी होत... 😌

आईच्या सांगण्यावरून राघव मीनलला शॉपिंगला मॉलमध्ये घेऊन जातो.. मीनल पाच सहा कपडे सिलेक्ट करते आणि ट्रायल रुममध्ये निघून जाते.. राघव बाहेर बसून असतो.. तो मोबाईलवर त्याचे आणि नयनाचे जयपूरचे फोटो पाहत असतो.. तिथेच नयनासुद्धा नॅनीला घेऊन शॉपिंगला आलेली असते..

नयनापण ट्रायलरूमसाठी तीथे येते तर राघव आणि तिची भेट होते.. इतक्यात मीनल आतून बाहेर येते.. शार्ट जीन्स, yellow slip top..

मीनल : (राघवला कपडे दाखवत) राघव!! Look... How's this ??? Nice na...? ?🤗

नयना : रागाने लालबुंद होत एक कटाक्ष टाकते...😡 (मनात) काय निर्लज्ज माणुस आहे आज चक्क दुसरीला घेऊन फिरतोय..

नयना चा राग बघता राघवला कळाल की तिचा पारा अजून का चढला... पण मीनलची बकबक नेहमीप्रमाणे सुरू झाली आणि राघव काही बोलणार इतक्यात नयना तशीच दुसरीकडे निघून गेली.. (बिचारा राघव 🤦‍♂😂)

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राघव कॉलेजला जातो. लेक्चर्स अटेंड करुन राघव आणि त्याचे मित्र कँटीनमध्ये मजा मस्ती करत असतात.. थोड्यावेळाने तिथे मीनल येते..

राघव : मीनल!! तु इथे काय करतेस ??

मीनल : तुझ कॉलेज पहाण्यासाठी आले..

राघव : पण तुला परमिशन कशी मिळाली आत येण्याची...

मीनल : no no.. Watchmen didn't allow me.. Your principal Sir... He gave me a permission... 😌

राघव : really?? But how ?? 😲

मीनल : are you sure ??? You need a explanation ?? 🤗

अभय : हा.. आम्हाला ऐकायच आहे..

राघव नाही म्हणत असतानाही मीनल सुरू झाली..

मीनल : actually your principal Sir.. माझ्या मॉमच्या एक्स कॉलेजचे प्रोफेसर होते.. मी जेव्हा स्माॅल होते तेव्हा मॉमसोबत असताना एकदा त्यांना भेटले होते.. On that time we are staying in India.. बस मी त्यांना पाहिल आणि ओळखल.. 🤗

अभय : तुला लहानपणी पाहिलेला चेहरा अजून आठवला? ? 😲

मीनल : ईल्ले.. नो नो... तस नाही..

राघव : 🤦‍♂ राहु दे मीनल.. ते गरजेचे नाही.. Meet my friends.. अभय, प्रमोद.. ( आणि एक एक करून तो बाकीच्यांची ओळख करुन देतो )

इतक्यात नयना तिथे येते.. 😡 अभय नयनासोबत मीनलची ओळख करून देतो.. नयना काहीच रिप्लाय न देता एका टेबलवर बसते.. राघवच लक्ष नयनावरच स्थिरावलेल होत..😍 आणि नयना ती आपल्या मीनलला बघून आतून लालबुंद होत होती.. 😡 मीनलसाठी सगळे रात्री ढाब्यावर जेवणाचा प्लॅन बनवतात.. अभय नयनालाही invite करतो.. ती आधी नाही म्हणत असते पण नंतर दिप्तीसाठी तयार होते..

थोड्यावेळाने रीसेस संपते आणि सगळे पुढचे लेक्चर्स अटेंड करायला क्लासरूमध्ये जातात.. मीनलही निघतच असते.. नयना अजून तिथेच असते.. मीनल तिला library चा रस्ता विचारते.. लेक्चर्स संपेपर्यंत काही वाचत बसू तेवढाच टाइमपास असा मीनल विचार करते.. नयनाने सांगितल्याप्रमाणे मीनल दुसऱ्या मजल्यावर जात असते तर अचानक तिच्या डोक्यावर छोटा खडक लागतो..

नयना नेहमी तोंडपाठ असल्याप्रमाणे लायब्ररीचा रस्ता तर सांगते पण नंतर तिच्या लक्षात येत की तिथे दुरुस्तीच काम चालू आहे ती पळतच मीनलच्या मागे जाते पण त्याआधीच मीनलला खडक लागला होता आणि बऱ्यापैकी रक्तही येत होत..

नयनाने मीनलला घेतली बाहेर एका बेंचवर बसवले..

नयना : तु ठिक आहेस ना?? I am sorry मी सवयीप्रमाणे तुला हा रस्ता सांगितला.. मी विसरलेच होते की इथे दुरुस्तीच काम चालू आहे...

मीनल : It's okay..

नयना : चल फस्ट एड करून देते.. ( तिच्या जखमेवर रूमाल धरून )

मीनल : It's okay नयना.... All fine..

राघवला समजताच तो पळतच तिथे येतो.. त्याला वाटले की नयनाने मुद्दाम हे केले.. त्याच्यावरचा राग तिच्यावर काढला.. म्हणून राघव नयनावर भडकतो पण जास्त वाद न घालता मीनलला डॉक्टरकडे घेऊन जातो..

नयना आणि राघवचा वाढता दुरावा बघता अभयने नयनाला गाठले आणि स्पष्टच विचारले.. तेव्हा नयनाने त्याला विरेन कडून कळलेल्या गोष्टी आणि कँटीनमध्ये ऐकलेल्या मित्रांच्या गप्पा सांगितल्या..

अभय : नयना मला खर सांग तुझ राघववर खर प्रेम आहे ना??? आणि जर खरच आहे तर मग तु राघववर विश्वास न ठेवता एका परक्या व्यक्तीवर विश्वास ठेवलास.. विरेनला जयपूर बद्दल कस माहीत पडल हे मला माहीत नाही पण हा पैज मी लावली होती मित्रांसोबत राघवने नाही.. तो तर तुला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून लाइक करतो आणि जेव्हापासून त्याला कळल की तुही त्याला लाइक करतेस, त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.. नयना we are mature.. तुला खर खोट ओळखता नाही आल...जर काही प्रोब्लेम होताच तर निदान आधी त्याच्या सोबत क्लिअर करायला हवा होता सरळ सगळ्यांसमोर कानाखाली मारली..

नयना : (आपलीच चूक झाली हे कळल्यावर) शीटट.. हे मी काय केल...I'm sorry अभय....😔

अभय : Sorry मला नाही तर राघवला बोल... पण आता कठीण आहे.. (उगाच चिडवत) 😌

नयना : म्हणजे ?? 😥

अभय : राघवचा राग तुला माहीत आहे आणि आता तर काय मीनल आहे जोडीला.. 😂

नयना : तस होणार नाही.. मी आता जाउन त्याला sorry म्हणते..

नयना सुद्धा राघव आणि मीनलच्या मागोमाग जाते.. राघव जवळच्याच दवाखान्यात मीनलला घेऊन जातो.. डॉक्टर मीनलला मलमपट्टी करत बसतात.. रस्त्यात दवाखान्या जवळ राघवची बाईक बघून नयना थांबते.. गाडी बाजूला लाऊन राघव दवाखान्यातून बाहेर येण्याची वाट बघत बसते…

(आत दवाखान्यात )

मीनल : राघव I am fine.. हे तु इथे कशाला आणल ??

डॉक्टर : please keep quiet… Seat properly.. 

मीनल : अय्यो डॉक्टर… My friend is crazy little bit.. 

राघव : मीनल जरा गप्प बस.. किती बोलशील?? 

ड्रेसिंग झाल्यावर दोघेही घरी जायला निघाले.. त्यांना बाहेर येताना बघून नयना गाडीतून खाली उतरली.. राघवने नयनाला बघुन न बघितल्यासारखे केले आणि बाइकवर बसला.. मीनल मात्र नयनाला बघून थांबली..

राघव : (थोडा रागात गाडी स्टार्ट करत) मीनल चल बस… 

नयना : राघव!!! मला तुझ्याशी बोलायच आहे… 

राघव : मीनल बस लवकर आपल्याला घरी जायला उशीर होतोय… (नयनाकडे दुर्लक्ष करत)

मीनल : राघव she wants to talk with you.. 

राघव : but I’m not interested.. Let’s go मीनल..

मीनल बाइकवर राघवच्या मागे बसते.. नयना बाइक पकडून राघवकडे बघत असते.. राघव गाडीला acceletor स्टार्ट करतो… तो त्या acceletor च्या माध्यमातून च नयनाला सांगत असतो की तु बाजुला हो आम्हाला निघायच आहे.. नयनाची नजर, राघवची नजर शोधत असते पण राघव तिच्याकडे बघतसुद्धा नाही.. आणि उभ्या जागी बाईकला acceletor देत असतो… आता आवाज कर्णकर्कश होत चालला होता शेवटी नयनाने गाडीवरची पकड सैल केली आणि बाजुला झाली.. नयना दूर होताच राघव मिनलला घेऊन निघुन गेला…

नयना हतबल होऊन फक्त बघत राहिली.. मनातल्या मनात “राघव सॉरी ना.. ” म्हणत स्वतःलाच दोष देत होती.. पण येवढ्यात हार मानणारी नयना नव्हती.. आपले पाणावलेले डोळे पुसत गाडीत बसली आणि अभयला फोन केला…

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे राघव आणि मीनल घरी येतात.. घरी येताच मीनल राघववर प्रश्नांचा भडीमार सुरू करते..

मीनल : what happened राघव?? नयना मला sorry बोलली आहे.. तु का रागवतोस इतका तिच्यावर??? Just chill after all we are friends…

इतक्यात आई पण हॉलमध्ये येते.. आणि मीनलच बोलन अर्धवटच राहत…

आई : अग मीनल हे काय झालं??  हे डोक्याला बँडेज कस काय?? राघव??

राघव काहीच उत्तर देत नाही… तो मनात हाच विचार करत असतो की मी अती राग नाही ना केला.. बिचारी किती हर्ट झाली असेल… मी आज रात्रीच तिच्याशी बोलतो.. तो पर्यंत जरा तिलाही कळू देत.. मला किती त्रास झाला असेल ते..

आई : अरे बोला काहीतरी?? मी काय विचारतेय??

मीनल : nothing to worry Aunty.. ते झाल अस की मी… (राघवने तिला परत मध्येच अडवल)

राघव : आई तुमच चालू देत मी निघतो…

आणि मग मीनलची परत नेहमीप्रमाणे बडबड सुरु होते..  आईला पण कधी कधी अस वाटत उगाच प्रश्न विचारला… ‍

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रात्री आठच्या सुमारास सगळे ढाब्यावर जेवायला एकत्र येतात…ढाबा छान एका तलावाकाठी होता.. रात्रीच्या वेळी तलावाच्या काठावर बसून त्या पाण्यात पडलेल्या चंद्राच प्रतिबिंब पाहणे, तलावाच्या पाण्याला स्पर्शून गार होणार्‍या वार्याचे झुळूक अंगावर धावून येणे म्हणजे एक सुखद अनुभव..

अभय, दिप्ती, राघव, मीनल, नयना आणि अजून दोन एक मित्र.. सगळे एकच मोठा टेबल बुक करून छान जेवणाची आॅर्डर देतात.. तोपर्यंत सर्वांच्या गप्पा टप्पा सुरू असतात.. नयना सुद्धा परत एकदा मीनलची माफी मागते..

नयना : मीनल I am extremely sorry… मला खरच लक्षात नाही आलं.. 

मीनल : It’s okay 

नयना : राघव मी तुझी पण माफी मागते.. Please मला माफ कर…

वेटर : (एक गुलाबाच फूल देउन) सर ये आपके लिए दिया है| 

राघव : thank you…  पण कोणी दिल??

अभय : किसी चाहने वालेने दिया होगा… (आणि डोळा मारतो) 

मीनल : म्हणजे?? 

राघव : काही नाही ग… Complementary असेल..

थोड्यावेळाने जेवण येताच सगळे जेवण करून घेतात.. जेवताना राघव आणि नयना च लक्ष मात्र एकमेकांकडे होत.. राघव मुद्दाम अकडून दाखवत होता.. आणि नयना मात्र त्याची नजर भेट होण्यासाठी झूरत होती.. नयनाला चिडवण्यासाठी राघवने आपल्याकडच गुलाबाच फूल मीनल ला दिल.. हे बघून नयनाला राग आला पण आज काहिही झाल तरी राघवला मनवायच हे तिने ठरवल होत..

सर्वांच जेवण झाल्यावर सगळे तलावाकाठी जाऊन आपापल्या सोईनुसार बसले.. मीनल, राघव आणि त्याचे मित्र एकत्र बसले.. पाण्यात दगड काय मारतायत, मस्ती काय करतात मीनल सगळच इन्जॉय करत होती.. राघव आणि नयना मात्र शांत होते.. रात्रीचा बराच गारवा पडला होता.. नयनाने स्लिव्हलेस रेयॉन टॉप घातला होता.. त्यामुळे तीला गारवा जरा जास्त लागत होता.. हातावर हात चोळत तोंडाने फुंकर घालत ती ऊब निर्माण करत होती..

नयनाला मागचा गार्डनचा किस्सा आठवला की कशाप्रकारे अभयने आपल जॅकेट दिप्तीला दिल होत.. आणि आपण त्यावर हसलो होतो.. आता राघव आणि मी एकत्र कसतो तर त्याने नक्की आपली अवस्था ओळखून आपल जॅकेट दिल असत पण… 

राघवने नयनाची स्थिती ओळखली आणि आपल जॅकेट तिला काढून देणार इतक्यात काही कळायच्या आत मीनल ने खेचून घेत स्वतः पांघरल..  राघव परत नयनाला चिडवायच म्हणून मुद्दाम मीनलला बोलला.. मीनल अग तुलाच देत होतो जॅकेट, तुला थंडी वाजतेय ना म्हणुन… नाहितरी ईथे काही unromantic लोकांना हा फक्त मूर्खपणा वाटतो..

आता तर नयना अजूनच चिडते आणि परत ढाब्याच्या दिशेने चालू लागते.. ती जातच असते की राघव मागून येऊन तिला आडोशाला खेचून घेतो.. म्हणजे ढाब्याच्या मागच्या बाजूला.. मागच्या बाजूला जास्त प्रकाश नव्हता.. पण छान चांदण पडल होत.. आणि त्या चांदण्या प्रकाशात नयनाचा चिडलेला चेहरा त्याला अजूनच मोहक वाटत होता..

राघवमात्र एकटक तिलाच न्याहाळत होता.. नयना आपली खाली मान घालून उभी होती..

राघव : राग आला का तुला… ?? 

नयना : नजरेनेच हो म्हणून सांगत होती… 

राघव : पण मूर्खपणाच्या गोष्टी तुला आवडत नाही ना.. 

नयना : पण आता आवडायला लागल्या.. (नजर चोरून)

राघव : हो का??  मग मीच येतो ना जवळ जॅकेट कशाला हव?? (तिच्या आणखी जवळ जात)

तशी नयना हसली आणि राघवला मागे ढकलून पळू लागली… राघवने पटकन तिचा हात धरून स्वतःकडे लिफ्ट केले.. नयना धाडकन राघवर धडकली.. राघवने आपले दोन्ही हात तिच्या कमरेला विळखा घातले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढले.. नयना आता फक्त त्याच्या नजरेत पाहत होती.. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते.. अशीच नजरभेट घेत राघवने अलगद तिला अजून आपल्या जवळ घेत तिच्या ओठांवर आपले ओठ क्रश केले.. 

नयनाचे हात आता अलगदपणे त्याच्या मानेभोवती गेले.. डोळे आपोआप मिटले आणि दोघेही बराच वेळ त्या क्षणात हरवून गेले.. 

इतक्यात नॅनीने नयनाला स्वप्नातून जागे केले…  नयनाच्या लक्षात आले की ती इतका वेळ स्वप्न बघत होती.. नयना तयार होऊन गाडी घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहचली.. ब्लॅक शाइनी जंपसुट, कानात गोल रिंगा, ओठांवर फिकट लिपस्टिक, हातात क्लच आणि पायात सँडल.. ती सर्वांच्या आधी पोहचली होती..

आज ढाबा नेहमीपेक्षा जास्त आकर्षक वाटत होता.. रंगीबेरंगी मंद प्रकाश देणारी लाईट.. सुंदर रित्या सजवलेले फ्लॉवर पॉट.. आज अगदी कँडल लाईट डिनरला जशी सोय असते अगदी तशीच छबी ढाब्याची होती.. खूपच मनमोहक… 

थोड्यावेळाने सगळेच जमा झाले.. आज जास्त गर्दीही नव्हती… नयनाने स्पेशली सांगुन फक्त त्यांच्यासाठी राखीव ठेवला होता ढाबा.. तस सर्वांना अशी सुट नसते पण अभयच्या ओळखीने मॅनेज झाल.. सगळे छान गप्पा मारत बसले होते.. सोबतीला म्युझिक सुरू होतच मंद अस.. मीनलने मॅनेजरला सांगून गाण्याची थीम चेंज करवली.. आणि सर्वांना नाचण्यासाठी घेऊन गेली..

नयनाचे हात आता अलगदपणे त्याच्या मानेभोवती गेले.. डोळे आपोआप मिटले आणि दोघेही बराच वेळ त्या क्षणात हरवून गेले.. 

इतक्यात नॅनीने नयनाला स्वप्नातून जागे केले…  नयनाच्या लक्षात आले की ती इतका वेळ स्वप्न बघत होती.. नयना तयार होऊन गाडी घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहचली.. ब्लॅक शाइनी जंपसुट, कानात गोल रिंगा, ओठांवर फिकट लिपस्टिक, हातात क्लच आणि पायात सँडल.. ती सर्वांच्या आधी पोहचली होती..

आज ढाबा नेहमीपेक्षा जास्त आकर्षक वाटत होता.. रंगीबेरंगी मंद प्रकाश देणारी लाईट.. सुंदर रित्या सजवलेले फ्लॉवर पॉट.. आज अगदी कँडल लाईट डिनरला जशी सोय असते अगदी तशीच छबी ढाब्याची होती.. खूपच मनमोहक… 

थोड्यावेळाने सगळेच जमा झाले.. आज जास्त गर्दीही नव्हती… नयनाने स्पेशली सांगुन फक्त त्यांच्यासाठी राखीव ठेवला होता ढाबा.. तस सर्वांना अशी सुट नसते पण अभयच्या ओळखीने मॅनेज झाल.. सगळे छान गप्पा मारत बसले होते.. सोबतीला म्युझिक सुरू होतच मंद अस.. मीनलने मॅनेजरला सांगून गाण्याची थीम चेंज करवली.. आणि सर्वांना नाचण्यासाठी घेऊन गेली..

नयना फक्त राघवला मनवण्याची वाटच बघत होती.. ती नाचत तर होतीच पण लक्ष राघववर होत.. दिप्ती आणि अभय आपल्यातच गुंतलेले होते.. मीनल आणि राघव एकत्र डान्स करत होते… मीनल काहीतरी आठवत जरा बाहेर पडते.. राघव आपला आपल्याच मूडमध्ये होता.. नयना राघव जवळ गेली आणि बोलण्यासाठी त्याचा हात पकडून बाहेर पडत होती.. राघवने तिला तसच हात पकडून आपल्या जवळ ओढले… इतक्यात गाण चेंज झाल..

 प्यार की ये कहानी सुनो

इक लड़का था, इक लड़की थी

होती क्या है जवानी सुनो

इक लड़का था, इक लड़की थी

वो भी एक दौर था, वक़्त ही और था

जब वो थे अजनबी

दोनों तन्हाँ से थे, पर वो कहते किसे

बात जो दिल में थी

प्यार की ये कहानी… 

राघवचा राग निवळला होता हे नयनाला आता कळाल होत.. ती पण त्याच्यात रंगून त्याला छान साथ देत होती.. दोघांमधली दरी संपली होती.. दोघे आपल्याच धुंदीत गुंग होते… पण थोडी गडबड झाली.. एका टर्नला राघव जेव्हा नयनाला डाव्या हातापासून उजव्या हाताला रोल करतो तस तिच्या जागी मीनल राघवला जॉइन करते.. राघव क्षणभर गोंधळतो पण मीनल त्याला व्यवस्थित साथ देत होती..

 गुमसुम-गुमसुम रहते थे दोनों

फिर भी दिल में कहते थे दोनों

कोई सपना हम भी तो पायें

एक दिन टूटे ग़म के वो घेरे

झिलमिल-झिलमिल आये सवेरे

मौसम बदला जागी फ़िज़ायें

वो मिल गये, वो खिल गये

और प्यार हो ही गया

जो चाहा था, वो पाया तो

होश खो ही गया

प्यार की ये कहानी…

आता सगळ्या नजरा या तिघांवर टिपल्या होत्या.. नयना मीनलचे मुव्ह बघून आश्चर्यचकित झाली पण मीनललाही उत्तम डान्स करता येत होता.. नयनाचा चांगलाच तिळपापड झाला होता… मीनलला राघवच्या इतक्या जवळ बघून..

परत एका मुव्ह नंतर नयनाने राघवला जॉइन केल.. राघव तर अक्षरशः अडकून पडला होता..त्या दोघींची कॅट फाईट आता खऱ्या अर्थाने सुरू झाली..

 हौले-हौले अब वो दीवाने

गुनगुन गाये दिल के तराने

सुन-सुन झूमें सारी हवायें

धड़कन-धड़कन है बहकी-बहकी

तन-मन तन-मन चाहत है महकी

सपनें अपने जादू चलायें

फिर देखोगे, तो जानोगे

क्या है नशा प्यार का

यही सोचोगे, यही चाहोगे

संग रहेंगे सदा

प्यार की ये कहानी… 

अभयने तर डोक्यावर हात मारला की राघव गेला कामातून.. इतक्यात तिथे लाइट जाते.. राघव त्या संधीचा फायदा घेत नयनाला गालावर किस करतो.. सगळीकडे गोंधळ सुरू असतो पण जनरेटरच्या मदतीने लाइट परत सुरू होते.. लाईट येताच राघव चमकतो  कारण त्याच्या बाजूला मीनल उभी असते.. लाईट जेव्हा येते तेव्हा राघवचे ओठ मीनलच्या गालावरच टेकलेले होते आणि नेमक नयनाने पाहील..  राघव पटकन मीनल पासुन दूर झाला..

मीनल : (आनंदाने उड्या मारत) Oh my god.. (आपल्या गुडघ्यावर बसून) राघव I love you…  you know Dad ने मला यासाठीच इथे पाठवल होत.. की आपण एकमेकांना पसंत कराव म्हणून.. आणि तु मला आवडलास राघव… आणि अंकल आन्टींना पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे…

नयना : (रागाने जवळ येत)  ए hello… राघव माझा आहे.. आणि त्याच माझ्यावरच प्रेम आहे…

मीनल : आहे नाही होत.. 

आणि अस करता करता दोघींचीही भांडण सुरू झाली.. राघव मात्र दोघींकडे बघून सुन्न झाला होता.. ‍ राघव पुरता कात्रीत सापडलेल्या अवस्थेत असतो.. . राघव मीनलला समजावण्याचा प्रयत्न करतो पण मीनलसुद्धा हट्टाला पेटली होती.. शेवटी राघव निर्णय दोघींवर सोपवतो आपसात ठरवा आणि मग मला सांगा.. नयना तर रागाने लालबुंद होते.. आणि तिथून रागातच निघून जाते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी सगळे नेहमीप्रमाणे कॉलेजला हजर होतात पण आज तिथल वातावरण एकदम वेगळ होत… पोलिसांच्या दोन गाड्या आणि एक ambulance उभी होती.. राघव आणि अभय गर्दीतून वाट काढत पुढे गेले, समोर पाहिलं तर वीरेनची डेड बॉडी पडली होती.. बाजूच्या मुलांची कुजबुज कानावर आली की वीरेनने सुसाइड केल…

समोर प्रिंसिपल सर पोलिसांसोबत बोलत होते..

पोलिस : शव विच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नक्की काय घडल हे कळेल.. प्रत्यक्षदर्शी असच वाटतय की आत्महत्या आहे  पण त्याच्या चेहऱ्यावरचे वळ काही वेगळच सांगत आहेत..

अभय आणि राघव हाच विचार करत होते की नक्की काय घडल असेल.. दोघेही जाऊन क्लासरुममध्ये बसतात.. रिसेस मध्ये राघव आपल्या बुकमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवतो आणि वर्गाच्या बाहेर जाता जाता नयनाच्या डेस्कवर ते बुक ठेवून जातो.. नयना मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते.. तिच्या लक्षात येताच ती ते बुक हातात घेते आणि राघवच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत असते.. क्लासच्या बाहेर पडताच राघव इशार्याने बुक उघडून बघण्यास खूणवतो..

नयना बुक ओपन करून नोट वाचते.. "मला कॉलेजच्या मागच्या गेटवर भेट " नयना मेसेज वाचुन खूलते.. मैत्रिणींना बाय करून बॅग घेऊन निघते.. नयना कॉलेजच्या मागच्या गेटवर पोहचते तर तिथे कोणी नसत.. थोड्यावेळात राघव बाइक घेऊन तिथे येतो..

राघव : चल बस लवकर..

नयना : अरे कुठे जायचंय?? आणि हि बाईक तर अभयची आहे ना.. ??

राघव : ( डोक्यावर हेल्मेट चढवत) सांगतो... आधी तुझा स्कार्फ बांधून घे आणि बस लवकर..

नयना रेडी होउन बाइकवर बसते.. मीनलचा राघवला मेसेज येतो की ती कॉलेजला येतेय आणि तिथून दोघे लंचला जाणार आहेत... म्हणून राघव तिथून मीनल यायच्या आत पळ काढतो...

राघव नयनाला घेऊन समुद्रकिनारी फिरायला येतो.. बाईक पार्किंगमध्ये लाऊन दोघेही समुद्राच्या दिशेने येतात.. नयना थोडा लटका राग व्यक्त करते..

नयना : बोलु नको माझ्याशी... मीनलाच घेऊन यायच होत.. (त्याच्या दंडाला चापटी मारत) आणि काय रे.. तु रात्री तिला किसपण केलस.. 😡 (नाक फुलवून)

राघव : अग बाई... तु समजून किस केल.. आता ती अचानक जवळ येइल हे थोडी माहीत होतं.. ते सोड.. आपण पहिल्यांदा अस बाहेर फिरायला आलो आहोत.. आता मूड नको ना खराब करू.. 🙈

नयना : हमम (नाक उडवून चालायला लागते)

बिचारा राघव तिच्या मागोमाग तिला मनवतोय.. त्याला काय माहीत की नयना त्याची गंमत करतेय.. 😂

🎶🎶तुम्हे पता तो होगा, तुम्ही पे मे फिदा हुँ

तुम्हे है जब से चाहा, हवाओं मैं उडता हूँ

तुम्ही मेरे हर पल मैं, तुम आज मैं, तुम कल मैं

हे शोना, हे शोना, हे शोना, हे शोना

तुम्हे पता तो होगा, के मेरे दिल में क्या है

चलो कहे देती हूं , कभी नहीं जो कहा हैं

तुम्ही मेरे हर पल मैं, तुम आज मैं, तुम कल मैं

हे शोना, हे शोना, हे शोना, हे शोना

तुम जो घुस्सा भी करो तो, मुझे प्यार लगता है , जाने क्यूँ

मैं तो जो भी कहूँ, तुम्हे इकरार लगता हैं, जाने क्यूँ

छोडोभी ये अदा, पास आके जरा ,

बात दिल की कोई, केह दो ना ..

हे शोना, हे शोना, हे शोना, हे शोना 🎶🎶

राघव एका खडकावर सावलीच्या ठिकाणी समुद्राच्या दिशेने पाय लांब करून बसतो आणि नयना त्याला टेकून त्याच्या कुशीत शिरून बसते.. राघव मागून नयनाला बाहुपाशात आवळत लटकेच चिडवतो..

राघव : शेवटी आपणही वेडेपणा करायला लागलो.. कुणीतरी बोलल होत आपल्यात अस काही होणार नाही म्हणून... 😉

नयना : हो का... मग तर आज तो मुर्खपणा केलाच पाहिजे.. 🙈

अस म्हणून राघवने घातलेल्या जॅकेटला ओपन करून ती अजून राघवला घट्ट बिलगून ते जॅकेट स्वतःभोवती घेते.. म्हणजे एकाच जॅकेटमध्ये एकमेकांना बिलगून बसले.. राघव तसाच तिच्या माथ्याच चुंबन घेतो.. नयनाही अगदी लाडिक होऊन जाते..

राघव : नयना मला खरच मीनल अस काही बोलेल, अस वाटल नव्हत.. 😥

नयना : हमम ... तु तिला स्पष्ट काय ते सांगुन टाक... 😏

राघव : (नयनाला चिडवण्याच्या सुरात) पण मी काय म्हणतो नयना राहू दे ना तिलाही.. असही तु सारखी सारखी रागवत असतेस.. मग तिच्याकडे जात जाईन... उलट तिच तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझ्यावर ... 😉

नयना : काय म्हणालास ???

आणि उठून राघवला मारायला जाते पण जॅकेटमध्ये अडकून बसल्याने तिला ते जमलं नाही.. ती राघव वरच रिटर्न आदळली.. शुsss... म्हणत राघवने तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवत, वाऱ्याच्या झुळुकाने तिच्या चेहर्‍यावर उडणारे केस अलगद बाजूला सारले... एव्हाना नयनाही शांत झाली होती.. राघवचा स्पर्श तिला शहारून टाकत होता.. त्याने अलगद आपला जॅकेट सोडावला आणि उठुन परत तिला चिडवून पळू लागला..

राघव : पण काहीही म्हण... मीनल खरच खूप सॉलिड आहे.. 😉

नयना : राघव.... थांब पळतो कुठे ?? 😡

आणि तीही त्याच्या पाठी पळू लागली.. वाळूत अडकून पडणारच होती की राघवने सावरल... दोन्ही हातांनी त्याला मारु लागली.. जा तिच्याकडेच जा. .. मला नाही बोलायच तुझ्याशी..

राघव तिचे मारणारे हात पकडतो... नयना आपली थोडी चिडलेली आणि रडवेली झालेली असते.. राघव तिला मिठीत घेतो, " I LOVE YOU " नयना..., तरी ती त्याच्या छातीवर डोक ठेवून एका हाताचे मुठके मारतच असते...

राघव : नयना... (अगदी प्रेमाने) माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहित आहे की तुझही माझ्यावर खूप खूप खूप प्रेम आहे... 😍

नयना : (थोड्या रडवेल्या सुरात) तु नेहमी मला सतावतो.. 😔

राघव : गंमत केली ग थोडी, तु चिडली ना की खूप गोड दिसतेस.. (तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर उचलून) आणि तुला मनवायला अजून मजा येते... 🙈

नयना हलकेच लाजते.. मगाशी पळता पळता ते समुद्राच्या पाण्यात भिजत आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही.. त्याच तिला प्रेममय नजरेन पाहण, तिच नजर चोरून लाजण, कमरे इतपत समुद्राच्या पाण्यात भिजत, लाटांच्या सूरात मंत्रमुग्ध होऊन, गार वाऱ्याने स्पर्शून जाण काय योग जुळून आला होता... त्या निसर्गाच्या सौंदर्यात हरवत राघवने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले.. आज स्वप्न नव्हते.. आणि साक्ष देण्यास कोण हवे होते.. तिही त्याच्यात वाहवत गेली.. 💏 आणि आसमंत दरवळला त्यांच्या प्रेमाने...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संध्याकाळी राघवने नयनाला घरी सोडले आणि तो आपल्या घरी परतला... मीनल हॉलमध्ये बसून वाटतच पाहत होती.. राघवच्या आई सोबत गप्पा मारत होती... राघवला वाटल मीनल काही गोंधळ घालेल पण तस काहीच झालं नाही.. ती शांतच होती.. आईबाबा आज बाहेर कुठेतरी नातेवाईकांकडे जेवायला जाणार होते.. म्हणजे घरी आज फक्त मीनल आणि राघवच थांबणार होते..

रात्री आईबाबा गेल्यानंतर मीनल आणि राघव एकत्र जेवायला बसले.. मीनल जरा जास्तच राघवच्या मागे पुढे करत होती.. तीच हे जास्त जवळ येण राघवला अवघड फील करत होत.. राघवने सरळ तिला स्पष्ट सांगितले की त्याच आणि नयनाच एकमेकांवर खूप प्रेम आहे.. मीनलने त्याचा नाद सोडून द्यावा..

राघव : मीनल तु खूप चांगली आहेस.. तुला माझ्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल...

मीनल : (थोडी निराश होत) हमम... Actually I'm sorry... राघव मला आधी माहित असतं की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता तर.. Anyways पण मी तुझी चांगली मैत्रीण तर बणूच शकते ना...

राघव : (मीनलचा समजूतदारपणा बघून खुश होतो) Thanks मीनल.. तु माझ टेंशन हलक केलस.. आपल्यातली मैत्री कायम अशीच घट्ट राहिल.. तु खरच खुप छान आहेस...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

असेच दोन महिन्यानंतर कॉलेजच हे शेवटच वर्ष संपल.. मीनल हे न ते कारण देऊन अजूनही इथेच स्थाईक आहे.. नयना स्पेशल कोर्ससाठी आज लंडनला रवाना होणार आहे.. राघव, अभय, दिप्ती आणि मीनल नयनाला एअरपोर्टवर सोडण्यासाठी जातात..

आता हळूहळू राघवला त्याच्या वडिलांनी बिझिनेस मध्ये लक्ष देण्यासाठी अॉफीस जॉईन करायला लावले.. मीनल इथे

आपल नवीन कोर्स सुरू करते आणि मिळेल तो वेळ राघवच्या घरच्यांबरोबर घालवते.. मीनल आणि राघवची मैत्री आता अजूनच घट्ट होत जाते.. नयनाला तिच्या अभ्यासातून आणि राघवला कामाच्या व्यापातून एकमेकांना फोन करायलासुद्धा वेळ मिळत नव्हता.. ते आपले ईमेल द्वारे बोलत होते... एक दिवस नयनाला सरप्राईज द्यायच ठरवून तो मीनलला त्याबद्दल सांगतो...

बाबांना काही कारण सांगून दोन दिवसांची परवानगी मिळवतो... दुसर्‍या दिवशी सकाळीची फ्लाईट असल्याने राघव रात्रीच आॅफीसमध्ये उशीरापर्यंत थांबून सगळी कामं आटोपून घेत असतो...

राघव घरी उशिराने येतो.. आई आणि बाबा कधीच झोपी गेले असतात.. नेहमी जेवणासाठी आपली वाट बघणारी मीनलसुद्धा कुठे दिसत नव्हती.. त्याला वाटले ती झोपली असेल.. तो तसाच आपल्या रुममध्ये निघून गेला.. दार उघडून पाहिले तर समोर संपूर्ण बेडरूम मेणबत्तीच्या प्रकाशात उजळून निघाला होता.. मेणबत्तीच्या उष्णतेने विरघळलेल्या मेणातील लॅव्हेंडरचा सुगंध खोलीत दरवळला होता... त्याने समोर पाहिलं तर मीनल अजूनही काही मेणबत्त्या सजवत होती.. पण राघवची नजर एका क्षणासाठी मीनलवरच येऊन थांबली..

काळ्या रंगाची नेटची साडी त्यावर embroidery work, डाव्या खांद्यावरून खाली सोडलेला पदर, चकाकणारा गडद गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस डिप बॅकनेक ब्लाऊज त्यातून दिसणारी तीची गव्हाळ रंगाची पाठ त्या टिमटिमणार्या प्रकाशात अतिशय खुलून दिसत होती, रोल करून उजव्या खांद्यावर मोकळे सोडलेले केस, कानात मोठे आॅक्साइडचे स्टडस, एका हातात ब्लाऊजला मॅचिंग गुलाबी रंगाचा भरीव चुडा, डोळ्यांवर गडद आयलायनर, हलका मेकअप, ओठांवर नॅचरल पिंक कलरची लिपस्टिक... खूपच मादक दिसत होती आज मीनल...

मीनल राघवच्या पुढ्यात येऊन उभी राहिली तरी राघव तिलाच बघत होता... तीने चुटकी वाजवताच तो भानावर आला...

राघव : you looking gorgeous... 😍

मीनल : हमम (आणि हलकेच हसली) 🙂

राघव : पण हे सगळं काय आहे...

मीनल : आज माझा बर्थडे आहे..

राघव : खरच?? मग आधी का नाही सांगितलं आपण छान सेलिब्रेट केल असत.. आपण आताच जाऊयात बाहेर.. तु थांब मी फ्रेश होऊन येतो... (आणि तो पुढे वळतो तोच मीनल त्याचा हाथ पकडून त्याला थांबवते)

मीनल : आता नको.. आपण ईथेच सेलिब्रेट करू... बघ इथे सगळ रेडी आहे... (अस सांगत ती समोरच्या टेबलाकडे खुणवते)

समोरच्या टेबलवर शँपेनची बॉटल आणि केक सजवून ठेवला होता.. संपूर्ण टेबलवर गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्या मध्यावर pineapple Cake, दोन ग्लास आणि एक शँपेनची बॉटल... 🍾🥃🎂

राघव : ओहह वाउव... पण मी ड्रिंक्स नाही घेत.. 🤗

मीनल : आज सगळ माफ हं... माझा बर्थडे आहे ना... सो माझ्यासाठी... प्लीज... 🤗

राघव : OK but only one सीप.... 🙂

अस म्हणत दोघांनी मिळून बर्थडे सेलिब्रेट केला.. मीनलने केक कट केला आणि राघवने आपल्या हाताने तिला केक भरवला... " Happy birthday मीनु " राघव म्हणाला... मीनलने शँपेनची बॉटल ओपन केली आणि दोन ग्लास भरले..

मीनल एका घोटात संपूर्ण ग्लास संपवते.. राघव तिच्याकडे बघून अवाक होतो.. त्याला तर त्या वासानेच अवघडून जाते.. " अरे कसा रे तु?? " अस म्हणत मीनल तो भरलेला ग्लास त्याच्या तोंडाला लावून जबरदस्ती संपवायला लावते.. आणि हसायला लागते..

मीनल : खरच कठीण आहे.. मला अजूनही पटत नाहीए की तुझ्यासारखा यंग मुलगा ड्रिंक्स घेत नाही.. You are really great...

राघव : ग्रेट तर तु आहेस... एवढी मॉडर्न असशील कस वाटल नव्हत... (आणि तो हसतो)

अस करत दोघे मिळून ती एक बॉटल संपवतात..

मीनल : shall we dance???

राघव : आत्ता??? No music.. ( खुणेनेच सांगतो) आईबाबा पण झोपले असतील...

मीनल : म्युझिकची गरज नाही.. असच थोड चिलल करु....

असेच दोघे गप्पा मारत डान्स करायला लागतात.. राघवला ड्रिंक्स आता जरा चढायला लागली होती.. त्याला अधूनमधून गरगरत होते..

थोड्यावेळाने मीनल जायला निघते पण राघव तिचा पदर पकडून तिला आपल्या जवळ ओढतो... मीनल थोडी दचकते...

राघव : तु खूप छान आहेस.. I really miss you... I love you lot.. नयना....

मीनल : राघव....

राघव आपल्याला नयना समजतोय हे कळत असूनही मीनल काही बोलत नाही उलट त्याच्या मिठीत स्वतःला झोकून देते..

राघव नशेत असल्याने तो मीनलला नयनाच समजत असतो.. अचानक भोवळ येऊन राघव खाली पडतो.. पण त्याही अवस्थेत तो नयना नयनाच करत असतो...

सकाळी जेव्हा राघवला जाग येते तेव्हा त्याच डोक खूप दुखत असत, तो तसाच डोक चोळत आजूबाजूला नजर फिरवतो... मीनल त्याच्या बाजूला उपडी झोपलेली असते.. राघव तिला बघून बेडवरून उठून दूर जातो.. आसपास पाहतो तर दोघांचेही कपडे अस्ताव्यस्त पसरलेले होते...

मीनल नुकतीच आळस झटकून उठून बसते.. राघवला समोर शाॅर्टस वर बघून नजर चोरत दुसरीकडे वळते.. राघव अजूनही शॉक मध्येच आहे, एकतर डोक दुखतय, रात्री नेमक काय झालं हे सुद्धा आठवत नाही आणि मीनल??? (त्याला कळेनासं झालं होतं) तरी त्याने मीनलला विचारलच..

राघव : मीनल खर सांग रात्री नेमक काय झालं आपल्यात..

मीनल : (लाजून) तुला खरच आठवत नाही की मुद्दाम विचारतोयस???

राघव : (थोड दचकून) म्हणजे???

मीनल : राघव कालची रात्र मी कधीच नाही विसरु शकत.. रात्रभर होणारा तुझ्या प्रेमाचा वर्षाव अजूनही माझ्या अंगावर शहारे आणतोय.. तुझा तो स्पर्ष... उफफ!!! तु चक्क मला प्रपोज सुद्धा केलस.. I love you मीनल... म्हणत मला आपल्या मिठीत घेतलस.. अजून काय काय सांगू...

राघव : (रागात) shut up मीनल... मला रात्री चक्कर आली इथपर्यंत आठवतय... बस... त्या पुढे काहीही झालेले नाही...

मीनल : (राघवला घट्ट मिठी मारत) मस्करी करतोयस ना??

राघव : तीला दूर लोटत.. नाही मी मस्करी करत नाहीए... माझ फक्त आणि फक्त नयनावर प्रेम आहे...

आणि राघव बाहेर बाल्कनीत जाउन उभा राहतो.. तो हाच विचार करतो की नेमक रात्री काय झालं.. त्याच्याकडून अस घडूच शकत नाही...

मीनल मात्र रडत रडत बाहेर निघून जाते.. यासगळ्या टेंशनमध्ये त्याची फ्लाईट मीसस् होते.. सकाळी नाश्त्याला सगळे हजर होतात.. मीनल आणि राघव शांतच असतात.. राघवच तर कुठेच लक्ष नसत... तो नाश्ता अर्धवट सोडून आॅफीसला निघून जातो.. मीनलही गप गप असते.. दुपारून मीनल राघवला भेटायला त्याच्या आॅफीसमध्ये जाते.. राघव तिला भेटण्यासाठी नकार देतो.. ती हिरमसून घरी निघून जाते...

दोन दिवस असेच निघून जातात.. मीनल राघव सोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करते पण राघव नजरसुद्धा मिळवत नाही.. त्याला आता स्वतःचीच लाज वाटू लागते.. तिच्या नजरेत नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही त्याची.. एक दिवस दुपारी राघवला आॅफीसमध्ये आईचा फोन येतो..

राघव आणि राघवचे बाबा ताबडतोब घरी येतात.. तेव्हा त्यांना कळत मीनलने झोपेच्या गोळ्या खाऊन घेतल्या.. पण ती थोडक्यात बचावते... आईबाबा मीनलला असे करण्याचे कारण विचारतात.. ती काहीच बोलत नाही.. शेवटी ते विचारण्याची जबाबदारी राघववर सोपवून रूमच्या बाहेर निघून जातात..

राघव : (खाली मान घालून) I am sorry... मीनल हे सगळं माझ्यामुळे झालं.. मी तुझा दोषी आहे.. पण मी तरी कस एक्सेप्ट करू मला काहीच आठवत नाहीये..

मीनल : राघव... Don't be sorry.. Actually I'm sorry.. मी तर फक्त माझ्या आईबाबांची शेवटची इच्छा पूर्ण नाही करू शकले म्हणून हे केल...

राघव : शेवटची ईच्छा म्हणजे??? मीनल तु काय बोलतेस??

मीनल : त्या दिवशी माझे आईबाबा तुला लग्नाची मागणी घालण्यासाठी मुंबईत यायला निघाले पण एअरपोर्टवर जाण्याआधी त्यांच्या कारचा अपघात झाला आणि ते दोघेही गेले.. माझ तुझ्यासोबत लग्न व्हाव हीच त्यांची शेवटची इच्छा होती... तीच पूर्ण करण्यासाठी मी इथे आले.. तुला आणि तुझ्या घरच्यांच मन जिंकण्यासाठी प्रयत्न करत राहिले..

राघव : पण मग अंकल आन्टी बद्दल आम्हाला आधी का नाही सांगितलं???

मीनल : मला सहानुभूती नको होती राघव... मला तुला प्रेमाने जिंकायच होत.. पण बघ ना आपल सर्वस्व देऊन सुद्धा मी हरले.. नाही करू शकले तुला आपलस.. आपल्या आईवडिलांची शेवटची इच्छा पण पूर्ण नाही करू शकले.. (आणि ती रडायला लागते)

राघव : तु रडू नकोस मीनल... Please मीनल... मला खूप गिल्टी वाटतय... (तिचा हात आपल्या दोन्ही हातात घेऊन)

मीनल : I am sorry राघव... त्या रात्री मी स्वतःला सावरायला हव होत.. त्यात तुझ्या एकट्याचा दोष नाही.. काय करू सांग ना माझ लहानपणापासून तुझ्यावर प्रेम आहे.. नाही रोखू शकले स्वतःला... (त्याचा हात पकडून रडायला लागते) मॉम डॅड असते तर कधीच निघून गेले असते त्यांच्याकडे पण तेही या जगात नाही...

राघवची आई मीनलसाठी कॉफी घेऊन येत असते तेव्हा दारातूनच मीनलच राघववर प्रेम असल्याचे ऐकते.. आणि तिच्या आईवडीलांबद्दल सुद्धा त्यांना कळत.. मीनलची अशी अवस्था आपल्यामुळे झाली याच त्याला फार वाईट वाटत... राघव आपल्या आईवडीलांना सांगून मीनलसोबत लग्नाची इच्छा व्यक्त करतो.. राघवचे आईवडील हसीखुशी तयार होतात.. असही मीनलच या जगात कोणी नाही आपल्या शिवाय तिला दुसरा आधार नाही.. आपली सून म्हणून आलीच तर चांगलच आहे..

अगदी रीतसर राघव आणि मीनलच लग्न पार पडत.. राघव स्वतःला कामात व्यस्त करुन घेतो.. मीनल आता खूपच खूश असते.. राघव नवरा म्हणून मीनलची सगळी जबाबदारी पार पाडत असतो पण नयनाची जागा त्याने मीनलला दिली नव्हती.. लग्नाला दोन महिने झाले तरी राघव आणि मीनलच नवराबायकोच नात वरवरच होत.. त्या रात्रीनंतर राघव आणि मीनल शरीराने एकत्र कधीच नाही आले.. मीनलला या गोष्टीच खूप वाईट वाटत होतं.. राघव तिला सतत टाळत होता...

एक दिवस अचानक राघवच्या आईची तब्येत बिघडली.. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल.. डॉक्टरांनी अर्धांगवायूचा झटका बसल्याचे सांगितले.. चुकीची औषध घेतल्यामुळे बीपी अनकंट्रोल होउन हा झटका बसला.. त्या दरम्यान मीनलने घराची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थित सांभाळली.. राघवच्या आईची योग्य ती काळजी घेतली.. आईला त्या अवस्थेत बघून राघव मीनलच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडला..

मीनलने एक पत्नी आणि सून म्हणून सगळी जबाबदारी नीट सांभाळली आणि आपण मीनलला काहीच देऊ शकलो नाही... आता मीनल आपली पत्नी आहे.. आता तीच आपल सर्वस्व आहे.. आपल्या आयुष्यात आपण पुढे जायला हव...

मीनल आणि राघवचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला.. दोघेही एकमेकांसोबत खुश होते.. दोघांमधली दरी आता नाहीशी झाली होती..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नयनाचा दिड वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आणि ती भारतात परतली.. इथे येताच तिने अभयला फोन केला आणि राघवला सरप्राइज देण्याच कळवल पण तिला कुठे माहित होते की तीच सरप्राइज होणार आहे ते.. अभयला तर काहिच सुचत नव्हते की नयनाला नक्की काय आणि कसे सांगायचे.. तो फक्त हो म्हणतो..

आज मीनल आणि राघवच्या लग्नाचा वाढदिवस होता... एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी ठेवण्यात आली होती.. अभय नयनाला त्या पार्टीसाठी खोट कारण सांगून आमंत्रण देतो... नयना राघवला भेटणार म्हणून खूप खुश असते.. छान पीच कलरचा ड्रेस, त्यावर साजेसा दुपट्टा, कानात मोत्याचे स्टडस् , हातात मॅचिंग बांगड्या, कपाळावर नाजूक मोत्याची टिकली.. आज खास राघवची नजर तिच्यावरच खिळून राहावी म्हणून ती सतत आरश्यात स्वतःला न्याहाळत होती...

नयना हॉटेलमध्ये पोहचली तेव्हा पार्टी बऱ्यापैकी सुरू झाली होती.. हातात फुलांचा गुच्छ घेऊन ती राघवलाच शोधत होती.. त्याला भेटण्यासाठी खूपच आतूर झाली होती.. शेवटी तिला राघव दिसला तिने परत एकदा स्वतः नीट असल्याची खात्री करून घेतली आणि ती राघवच्या दिशेने निघाली...

समोर काही लोकांच्या घोळक्यात राघव गप्पा मारत उभा होता.. छान नेव्ही ब्लु कलरचा पठाणी सुट, त्यावर खड्यांचे ब्रृच, पायात मोजडी आणि त्याचा नेहमीचा चार्मिग लूक नयनाला नव्याने घायाळ करत होता.. नयना त्याच्या जवळ उभी राहिली तेव्हा तो तिच्या दिशेने पाठमोरा उभा होता...

नयनाने हाक देताच तो मागे वळला तर नयनाला बघून तो शॉकच झाला.. नयनाने राघवला सगळ्यांसमोर घट्ट मिठी मारली पण राघव?? तो तर शून्यात हरवला होता...

नयाना : (आनंदाने ओरडून) सरप्राईज... I miss you lot.... राघव... (डोळ्यात आनंदाश्रू होते) आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही... (आणि परत एकदा त्याला मिठी मारते)

इतक्यात राघवचा एक क्लाएंट राघवला बुके देऊन शुभेच्छा देतो..

क्लाएंट : Happy wedding anniversary Mr. राघव.. तुमच्या मिसेस दिसत नाही कुठे???

नयना : wedding anniversary ??? (तिच्या हातातला बुके तसाच निसटला आणि ती राघवकडे बघते)

तेवढ्यात मीनल तिथे येते.. गोल्डन रंगाची साडी, साजेसा गेटअप, गळ्यात डायमंडच मंगळसूत्र...

मीनल : (क्लाएंटला ओळखत असल्याने ) thank you Mr. साठे... Please enjoy the party..

नयनाची तर पायाखालची जमीनच सरकते.. ती फक्त आवाचून राघवकडे बघत असते.. तेवढ्यात मीनलच लक्ष नयनाकडे जात...

मीनल : अय्यो नयना what a pleasant surprise... कशी आहेस?? बर झालं राघव तु नयनाला आमंत्रण दिलस.. कधी आलीस तु नयना.. Anyways please excuse me.. काही गेस्ट माझी वाट बघत आहेत.. राघव please take care of her...

नयना : राघव (पाणावलेल्या डोळ्यांनी फक्त एवढंच बोलली)

राघव : नयना माझ आधी ऐकुन घे.. ( तिचा हात हातात घेऊन)

मीनल : (हातात हात घालून) राघव चल केक कट करूयात.. सगळे वाट बघत आहेत.. नयना राघवचा हात सोडशील please...

आणि ती स्वतःच राघव नयनाचा हात सोडवून त्याला घेऊन जाते... समोर छान तीन लेअरचा केक सजवला होता.. मीनलने राघवचा हात पकडत केक कट केला आणि पहिला घास राघवला भरवला... रागवच लक्ष नयनावर होत.. मीनलच्या खूणवन्यामुळे भानावर येऊन त्याने मीनलला घास भरवला...

नयना फक्त भरल्या डोळ्यांनी समोरच दृश्य पाहत होती.. तिला ते सहन नाही झाल आणि ती रडत रडतच हॉटेलच्या बाहेर निघून गेली.. पार्किंगमध्ये गाडीजवळ येऊन उभी राहिली.. तिथे अभय आणि दिप्ती तिला भेटले.. नयना त्यांच काहिच ऐकुन घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती.. तिने रडत रडतच गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघाली...

🎶🎶 रब्बा मेरे इश्क़ किसी को

ऐसे ना तडपाये... होय

दिल की बात रहे इस दिल में

होठों तक ना आए

तुझे याद ना मेरी आई

किसी से अब क्या कहना

दिल रोया की अँख भर आई

किसी से अब क्या कहना

तुझे हर खुशी दे दी

लबों की हँसी दे दी

जुल्फों की घटा लहराई

पैगाम वफ़ा के लाई

तूने अच्छी प्रीत निभाई

किसी से अब क्या कहना...

वो चाँद मेरे घर-आँगन

अब तो आएगा

तेरे सूने इस आँचल को

वो भर जाएगा

तेरी कर दी गोद भराई

किसी से अब क्या कहना...

ख़ता हो गयी मुझसे

कहा कुछ नहीं तुमसे

इकरार जो तुम कर पाते

तो दूर कभी ना जाते

कोई समझे ना प्रीत पराई

किसी से अब क्या कहना... 🎶🎶

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पार्टी संपवुन सगळे घरी येतात.. राघव नयनाला भेटल्यापासून फारच अस्वस्थ असतो... मीनल येऊन राघवच्या कुशीत शिरून झोपु पाहते पण राघव थकलो असल्याचे कारण सांगून झोपी जातो... मीनलला लक्षात येते की राघव नयनामूळे डिस्टर्ब आहे.. ती गप्प डाव्या कुशीवर झोपून जाते... पण राघवला मात्र झोप लागत नसते.. तो तसाच उठून बाल्कनीत जातो.. बाहेर रात्रीची निरव शांतता पसरली होती आणि त्याच्या मनात वादळ सुरू होते... बराच वेळ तो तिथेच बसून होता आणि तिथेच त्याला झोप लागली..

अशातच राघवला दिप्तीचा फोन आला.. "राघव असशील तसा सीटी हॉस्पिटलला निघून ये " राघव घाईगडबडीत हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाला..राघवने घड्याळाकडे पाहिले तर पहाटेचे पाच वाजले होते... गाडी एकदाची हॉस्पिटलला पोहचली.. समोरच अभय आणि दिप्ती उभे होते.. अभय राघवला घेऊन आतमध्ये गेला.. समोर एका बेडवर नॅनीला वेंटिलेटरवर ठेवले होते आणि बाजूला दुसऱ्या बेडवर नयना होती जखमी अवस्थेत शून्यात हरवलेली..

अभय : सकाळी चार वाजता नयनाच्या घरी चोर घुसला होता.. चाहूल लागताच नॅनीने अडवण्याचा प्रयत्न करत आरडाओरडा सुरू केला.. त्याच गडबडीत चोराने हल्ला केला.. नयनाने पण प्रतिकार केला.. तो पर्यंत वॉचमन पण आला पण चोर निसटला.. नॅनी जरा गंभीर जखमी झाली आहे.....

राघव : (नयनाच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेत) तु ठिक आहेस ना???

नयना : (राघवच्या हातून आपला हात काढून घेते ) अभय याला इथुन जायला सांग...

राघव : नयना तु अशी का वागतेस माझ्याबरोबर???

नयना : हे तु मला विचारतोस राघव???

राघव : नयना अग....

इतक्यात पोलिस येतात...

पोलिस : आम्ही सगळी शहानिशा करून लवकरात लवकर यासर्वांचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो.. पण मला एक सांगा मिस नयना.. येवढ्या सकाळी नॅनी तुमच्या रूममध्ये काय करत होती आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही नुकत्याच बाहेरून आलात.. नेमक कळल नाही आम्हाला...

नयना : actually मी रोज पहाटे चार वाजता उठते.. तिथून वॉकला जाउन आल्यावर डान्स प्रॅक्टिस करते.. सकाळी मी नेहमीप्रमाणे वाकला निघाले होते माझा इअरफोन नेमका घरी राहिला म्हणून नॅनीला फोन करून सांगून तो गेटवर मागवला.. इअरफोन आणण्यासाठी नॅनी माझ्या रूममध्ये गेली.. ती बराच वेळ झाला तरी आली नाही म्हणून मीच आत गेले तर नॅनी जखमी होऊन पडली होती मी तिला बघायला गेले तर मागून माझ्यावर हल्ला चढवला... मी त्याला प्रतिकार करून आरडाओरडा सुरू केला वॉचमन येताच चोराने पळ काढला...

पोलिस : बरं... मला सांगा तुम्ही जेव्हा रुममध्ये प्रवेश केला तेव्हा तिथली नेमकी परिस्थिती काय होती???

नयना : (काहिसा विचार करून) मी आत गेले तेव्हा बेडरूम अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत होत.. आणि नॅनी बेडवर पडून होती..

पोलिस : (एक फोन अटेंड करुन) मिस नयना आमची माणसं परत एकदा तुमच्या घरी जाऊन पडताळणी करून आले.. तुमचे wardrobe बंद स्थितीत आढळले.. जर ती व्यक्ती चोर होती आणि चोरी करण्याच्या उद्देशाने आली होती तर मग घरात बाकीच्या वस्तू जागच्या जागीच आहेत.. कारण पैसे आणि दागिने हे कपाटातच आधी शोधले जातात पण तुमच कपाट बंद होत.. ते उघडून पाहिले तर सगळ्या गोष्टी जागच्या जागी आढळून आल्या.. आणि चोराने नॅनीवर हल्ला केल्यानंतर पळ काढायचा सोडून तिथे दबा धरुन का बसला?? Anyways आम्ही ते बघूच.. काही गरज लागली तर आम्ही परत येऊ..

नयना : thank you Sir..

पोलिस : (परत काहीतरी आठवून) मिस नयना.... तुमच कुणासोबत वैयक्तिक वैर आहे का??

नयना : नाही.. मी तर दोनच दिवसांपूर्वी लंडनहून आले आहे..

पोलिस : ठीक आहे... (आपल्या हातातील वस्तू पुढे करत) हे नॅनीच्या हातात सापडले.. हे ब्रेसलेट ओळखता तुम्ही???

राघव, अभय आणि दिप्तीपण ते बघत बसतात.. ब्रेसलेट बघून राघव थोडा चमकतो..

नयना : नाही सर हे माझ नाही...

पोलिस : ओके.. थँक्यू... आम्ही बघतो काय ते... पण प्लीज तुमच्या वडीलांना सांगुन उगाच आमच्यावर दबाव टाकू नका. आम्हाला आमची ड्युटी व्यवस्थित कळते.. आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडू... येतो आम्ही...

नयना : sure Sir.. Thank you...

पोलिस निघून गेल्यावर दिप्ती अभयला जबरदस्ती बाहेर घेऊन जाते, राघव नयनाला वेळ मिळावा म्हणून... राघव शांतच बसून असतो..

नयनाला तहान लागते म्हणून ती पाणी घेण्यासाठी बाजुच्या टेबल जवळ वळते पण हाताला मार लागल्याने तिला तो ग्लास पाण्याने भरन अवघड जात होत.. अभयच्या लक्षात येताच तो उठून पाण्याचा ग्लास भरतो आणि नयनाला

देतो.. नयना रागातच नजर दुसरीकडे वळवते...

राघव परत एकदा प्रयत्न करतो.. पण नयना बघतसुद्धा नाही.. राघवपण हट्टी आहे त्याने तो ग्लास तसाच तिच्या समोर धरून उभा राहिला... शेवटी नयनाने आपला हात पुढे केला पण हाताला पट्टी बांधली असल्याने तिला तो ग्लास पकडता येत नव्हता हे लक्षात येताच राघवने तिला पाणी पाजले..

नयना : थँक्यू... (नजर वर न करताच म्हणाली)

राघव अजूनही निशब्दच होता, नयना परत शुन्यात हरवली.. खर तर राघवला समोर बघुन कंठ दाटून आला होता.. डोळ्यात पाणी साठून आल होत पण तिने आवरतं घेतल.. विषयाला सुरूवात करावी म्हणून राघवने सहज विचारले ...

राघव : सुधीर कसा आहे???

नयना : (आश्चर्याने) कोण?? कोण सुधीर??

राघव : अशी काय करतेस तुझा बॉयफ्रेंड...

नयना : Are you out of mind राघव?? डोक ठिकाण्यावर आहे ना तुझ??

राघव : तुच पहिला ईमेल केला होतास मला.. मला सुधीर भेटला आहे.. बाबांनी माझ्यासाठी सिलेक्ट केला आहे.. And we are happy together..

नयना : (चिडून) Just shut up राघव... मी असा कोणताही ईमेल नाही केला.. उलट तुच मीनलसोबत लग्न करून सुद्धा कालपर्यंत माझ्याशी अगदी नॉर्मल बोलत होतास.. साध मला कळूसुद्धा दिल नाहीस की तु लग्न केलस...

राघव : (अजून चिडून) मी तुला माझ्या आणि मीनलच्या लग्नाची पूर्ण कल्पना दिली होती.. तुझा जेव्हा ईमेल आला सुधीरबद्दल सांगण्यासाठी मी त्याच वेळी तुला ताबडतोब फोन सुद्धा केला... पण तुझा नंबर बंद येत होता... आणि मी आमच्या लग्नानंतर तुला कोणताच संपर्क नाही केला...

नयना : खोट बोलतोयस तू...

राघव : मी खोट बोलत नाहीए...

नयना : माझा ईमेल आयडी ब्लॉक झाला आहे अस म्हणत तुच मला नवीन आयडी फॉरवर्ड केलास... आणि रोज माझ्याशी संपर्क ठेवून आहेस... आपले टायमिंग पण मॅच होत नव्हत..तिथे दिवस तर इथे रात्र.. मी फोन करायची तर तु what's app वर रिप्लाय देत होतास... मी थकलो म्हणून झोपून गेलो सॉरी अन्ड आॅल.. मी पण जास्त ओवर रियाक्ट नाही केल कारण रोज एक तरी ईमेल येतच होता.. शिवाय तुझे गिफ्टही अधून मधून मिळत होते.. असे रोमँटिक सरप्राईज तुच देउ शकतोस माझा राग घालवण्यासाठी..मी चिडली की एक बुके नेहमी हजर असायचा दुसऱ्या दिवशी...

राघव : एक.. एक.. एक मिनिट माझा आयडी अजूनही तोच आहे.. इथे मीनलने जीव देण्याचा प्रयत्न केला माझ्यासाठी... तु तिथे मजेत होतीस आणि मी इथे तुझ्यासाठी झुरत होतो... तरी लग्नानंतर मी मीनलला अंतर देऊन होतो पण तिने तर सगळ्यांना सामावून घेतलं.. आईची काळजी घेतली... तु तुझा पर्याय निवडला होतास... मग मी तुझ्यासाठी मीनलला का अंतर देऊ ?? त्या बिचारीची काय चूक त्यात??? मग मीही नव्याने आयुष्याची सुरुवात केली...

नयना आपल्या मोबाईल मधले ईमेल त्याला दाखवते..

राघवसुद्धा आपल्या मोबाईल मधून सर्व ईमेल तिला दाखवतो.. दोघांचही म्हणण बरोबर असत.. पण मग नयनासोबत ईमेलद्वारे कोण बोलत होत.. ?? आणि सुधीर बद्दल राघवला ईमेल कोणी केला??

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता राघवच्या डोक्यात विचारचक्र फिरायला सुरूवात झाली... तो तडक गाडी स्टार्ट करुन घरी जायला निघतो.. तो हाच विचार करत असतो की नेमका आमच्यात गैरसमज कोणी पसरवला?? आणि का?? मीनल एकटीने एवढा प्लान करेल अस वाटत नाही... तर मग मीनलच ब्रेसलेट नॅनीच्या हातात कस आल?? आता जर माझ आणि मीनलच लग्न झालच आहे तर मग नयनावर ती हल्ला का करेल?? आणि मीनल??? स्वतःच्या आब्रूबद्दल अस खोट सांगून लग्न करण?? It's impossible... कोणतीही मुलगी येवढ्या खालच्या थराला कशी जाऊ शकते???

या सगळ्या विचारातच राघव घरी पोहचला.. तो घरी आला तेव्हा सातच वाजले होते.. मीनल अजूनही झोपली असेल या विचाराने तो सरळ बेडरूममध्ये गेला.. पण मीनल तिथे नव्हती.. त्याने तिला घरभर शोधले पण ती घरी नव्हती... त्याला आठवल सकाळी जेव्हा दिप्तीचा फोन आला तेव्हा तो बाल्कनीतच चेअरवर झोपला होता आणि तो हॉस्पिटलला निघाला तेव्हा मीनल बेडवर नव्हती... म्हणजे मीनलने खरच नयनावर हल्ला केला??? शक्य नाही... पण मग ही गेली कुठे??? तो परत जाउन बेडरूममध्ये बसतो तर मीनल बाथरूममधून नुकतीच शॉवर घेऊन बाहेर पडते...

मीनल : Good morning... 🙂 कशी आहे नयना आता??

राघव : (आश्चर्याने) तुला कस माहीत??

मीनल : अरे अभयचा फोन आला होता... त्यानेच सांगितले...

राघव : (मनात) हि तर अगदी नॉर्मल वाटतेय...

मीनल : काय झालं?? कसला विचार करतोयस???

राघव मीनलच्या जवळ जातो तस मीनल लगेच रोमँटिक मूडमध्ये आपले दोन्ही हात राघवच्या खांद्यावर ठेवून त्याला किस करायला जाते तर राघव तिला अडवतो...

राघव : मीनल!! काल तुझ्या हातात एक ब्रेसलेट होत.. आता हातात दिसत नाही तुझ्या..?? कुठे पडल का???

मीनल : (थोड दचकून) अ?? हा... काल पार्टीत कदाचित पडल असेल...

राघव : (संशयाने) पार्टीत पडल की नयनाच्या घरी??

मीनल : काय बोलतोयस राघव?? नयनाच्या घरी कस पडेल?? (थोडी घाबरलेल्या अवस्थेत) आणि सेम डिझाइनच ब्रेसलेट इतर कुणाकडे असू शकत नाही का??

राघव पुढे काही बोलणार इतक्यात मीनल आईला औषध द्यायची वेळ झाली सांगून निघून जाते... थोड्यावेळाने राघवसुद्धा आईच्या रुमजवळ जातो... त्याला मीनल फोनवर बोलत असल्याचे लक्षात येउन तो तिथेच दाराच्या आडोशाला उभ राहुन तिच बोलन ऐकु लागला...

मीनल : हि म्हातारी जितके दिवस झोपून राहिल तितकेच बर आहे.. नाहितर हिचा एकदाचा बंदोबस्त करावाच लागेल... काल पासून हि परत बोलायला लागली आहे हे घरी घरी अजून कोणाला माहीत नाही म्हणून ठिक आहे.. पण सतत हिच्यावर पाळत ठेवणे अवघड जाईल मला..

राघव हे सगळं ऐकून शॉक होउन जातो.. तो सरळ आत शिरतो आणि तिच्या हातातला मोबाईल फोन घेऊन आपल्या कानाला लावतो...

पलीकडून : मीनल मी यात तुझी काहिच मदत नाही करू शकत... तु काकूंसोबत अस नाही करायला पाहिजे होत...

तुझ ऐकून मी पण उगाच फसलो यासगळ्यात...

राघव : तुला तर मी नंतर बघतो... तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती... (अतीशय रागात फोन कट करून मोबाईल फेकून देतो)

राघवच अस अचानक येण्याने मीनलला चांगलाच घाम फुटतो... राघवचा राग बघता तिची बोलतीच बंद होते.. राघव रागातच तिचा हात पकडून फरफटत तिला आईच्या रूममधून बाहेर घेऊन येतो... तिच्या कानशिलात लगावणार इतक्यात दारावरची बेल वाजली...

मीनलने धावत जाऊन दार उघडते... आणि ती आणखीनच घाबरते...

सरप्राइज..... कशी आहेस मीनल बेटा... ??

मीनलच्या आईबाबांना बघून राघव अजूनच शॉक होतो..

मी. बाबा : काय झालं तुम्ही दोघे अस का बघताय?? मीनू सरप्राइज आवडल नाही का??

मी. आई : (थोड चमकून) मीनू तुझ्या गळ्यात मंगळसूत्र??

राघव : (सगळ्या गोष्टी लक्षात येउन) मीनल तु आतातरी सांगतेस की मी सांगू... ??

मीनल : (अगदीच कापर्या आवाजात) ते म.. मम्मा...

तसा राघव मीनलच्या एक सणसणीत कानाखाली मारतो तशी ती खाली पडते... मीनलची आई तिला जाउन संभाळते आणि राघववर भडकते...

मी. आई : राघव!!! काय करतोयस हे... तुझी हिंमत कशी झाली मीनूवर हात उचलण्याची...

राघव : माझी बायको आहे ती... पण आता मला त्याही गोष्टीची लाज वाटत आहे...

मी. बाबा : बायको??? हे नक्की काय चाललंय दोघांपैकी एकाने तरी स्पष्ट सांगा...

राघव : (मीनलला दोन्ही हातांनी पकडून अतिशय रागात विचारतो) बोल मीनल बोल.. काय केलस माझ्या आईसोबत..?? कस मला फसवलस?? आजही नयनाच्या जिवावर तुच उठली होतीस ना??? तुच हल्ला केलास ना तिच्यावर??? एवढा मोठा दगा देताना जराही लाज नाही वाटली का ग तुला???

मीनल : (राघवला ढकलून) नाही वाटली लाज मला... मी काहीच गैर केले नाही.. मी फक्त माझ प्रेम मिळवण्यासाठी हे सगळं केल... लहानपणापासून फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केल मी राघव... काय चुकलं माझ...??

राघव : (तिच्या परत एक कानशिलात लगावून) काय चुकलं म्हणून विचारतेस??? अग अस फसवून कुणाच प्रेम मिळत नसत... आणि तु तर लोकांच्या जीवावर उठलीस.. माझ्या आईच्या जीवावर उठलीस??

मी. आई : राघव??? (प्रश्नार्थक नजरेने)

राघव : काकू आईला अर्धांगवायूचा झटका बसला तो पण हिच्याचमूळे....

मीनल : हो... मीच त्याच्या नेहमीच्या गोळ्या बदलल्या ज्यामुळे त्यांचा बीपी अनकंट्रोल होऊन हा झटका बसला...

राघव : पण आईसोबत अस का केलस?? लग्न झाल होत ना आपल??

मीनल : त्यादिवशी आईंनी मला माझ्या आईबाबांसोबत विडिओ चॅट करताना पाहिल.. त्या लगेच तुला फोन करून सांगायला गेल्या मी कसतरी त्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याकाही एकत नव्हत्या.. त्यांना बीपीचा त्रास व्हायला लागला तेव्हा मी त्यांना चुकीच्या गोळ्या दिल्या...

मीनलच्या आईने एक लगावून दिली मीनलला तशी मीनल परत रडायला लागली...

राघव : काकू हिने जिवंतपणी तुम्हा दोघांना पण मारल... काय मीनल हे पण सांगतेस ना?? आणि आता नयनाच्या जीवावर उठली आहे....

मीनल : नाही नाही मी नयनावर हल्ला नाही केला...

राघव : खोट बोलु नकोस मीनल...

मीनल : नाही मी खर सांगतेय... मी नयनावर हल्ला नाही केला...

मीनलच्या आईने एक लगावून दिली मीनलला तशी मीनल परत रडायला लागली...

राघव : काकू हिने जिवंतपणी तुम्हा दोघांना पण मारल... काय मीनल हे पण सांगतेस ना?? आणि आता नयनाच्या जीवावर उठली आहे....

मीनल : नाही नाही मी नयनावर हल्ला नाही केला...

राघव : खोट बोलु नकोस मीनल...

मीनल : नाही मी खर सांगतेय... मी नयनावर हल्ला नाही केला...

राघव : तुझ खर रुप समोर आल आहे मीनल आतातरी खोट बोलु नकोस.. नयनाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही.. (अतिशय रागात)

मीनल : नाही मी खर सांगतेय मी नयनावर हल्ला नाही केला.. मान्य आहे मला की मी तुम्हा दोघांना वेगळ केल.. मी माझ्या सर्वतोपरी प्रयत्न केला की तु कधीतरी माझा स्विकार करशील पण नाही.. त्या रात्री माझ्या बर्थडेच्या वेळी मी तुला माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी अतिशय मादक गेटअप केला तुला तो आवडला सुद्धा काही क्षण माझ्यात हरवून सुद्धा गेलास..पण तु तर जाम प्रामाणिक निघालास..डान्स करता करता शँपेन तुला चांगलीच चढली होती.. मी जायला निघाले तर नयना समजून तु मला जवळ ओढत आपल्या मिठीत घेतले.. असा ना तसा तुझ्या स्पर्शाने मी मोहरून निघाले... पण त्याही अवस्थेत तु नयना नयनाच करत होतास... तुला भोवळ येऊन तु खाली पडलास.. तुला उठवून बेडवर झोपवले आणि तुला शँपेनमध्ये गुंगीचे औषध दिले.. तु तोही ग्लास नयनाच्या नावाचा जप करत संपवलास...

सकाळी तु उठायच्या आधी सगळा बेडरूम अस्ताव्यस्त पसरवला.. आपले कपडे सहज रूममध्ये भिरकावून दिले.. आणि निवांत तुझ्याबाजूला झोपून तुझ्या उठण्याची वाट बघत होते... तु उठल्याबरोबर अगदी माझ्या प्लानिंगप्रमाणे झाले.. तु मला आपल्या बेडवर त्या अवस्थेत बघून आधिच घाबरलास.. रात्रीच तुला काहिच आठवत नव्हत त्यामुळे मी जेकाही सांगेन त्यावर तुला विश्वास ठेवन भाग होत....

पण तिथेही थोड फिस्कटल तुला गिल्टी फिल तर झाल होत पण तरी तु माझा स्विकार करत नव्हतास.. मग मी दोन दिवसांनी मुद्दाम झोपेच्या गोळ्या घेतल्या त्याही अगदी प्रमाणात... पण नुसत हे तुझ्यासाठी पुरेस नव्हत.. मला तुला पूर्णपणे इमोशनल करून घ्यावे लागणार होते.. म्हणून मग मी, ही माझ्या आईबाबांची शेवटची इच्छा, ते आता या जगात नाही अस सांगुन, मी किती एकटी पडलेय अस सगळ दाखवून तुला आपलस केल...

मीनलच हे बोलण पूर्ण होणार इतक्यात तिच्या वडिलांनीही तिच्या कानशिलात लगावली..

मी बाबा : काय कमी पडली होती आमच्या पालनात की तु असे पांग फेडलेस???

राघव : पण आईसोबत का केलस अस?? तेव्हा तर आपल लग्न झालं होतं ना??

मीनल : त्यादिवशी मी आईबाबांसोबत स्काईपवर विडिओ चॅट करत होते तेव्हा आन्टींनी बघितल आणि त्यांना माहीत पडल की माझे आईबाबा जिवंत आहेत.. मी पटकन लॅपटॉप बंद केला आणि आन्टींना समजवायला गेले तर त्या माझ काहीच ऐकून घेत नव्हत्या सारख राघवला खर सांगितल पाहिजे म्हणून बोलत होत्या.. त्यातच त्यांना बीपीचा त्रास झाला मी घाबरून चुकीच्या गोळ्या दिल्या आणि मग तो अटॅक येउन त्या अंथरुणाला खिळल्या.. मी त्यांची किती काळजी घेते हे दाखवून परत तुझी सहानुभूती मिळवली... त्याआधीच नयनाविषयी तुझ्या मनात गैरसमज पसरवला...

राघव : (अजून चिडून) मुद्दाम दिल्यास तु चुकीच्या गोळ्या..

मीनल : (राघवचे पाय धरून) राघव मला माफ कर.. मी चुकले रे.. पण माझ तुझ्यावर खरच खूप प्रेम आहे..

राघव : (मीनलला दूर ढकलून) तुझ्या माफी मागण्याने सगळं नीट होणार आहे का...??? माझी आई बरी होणार आहे का?? तिने त्या आजारपणात वर्षभर काढलेला त्रास कमी होणार आहे का?? तु फक्त माझा आपल्या पद्धतीने वापर करून घेतलास... खर तर तुला पोलिसात दिल पाहिजे पण त्याआधी मला इतर कुणाचातरी हिशोब चुकता करायचा आहे.. काका काकू तुम्ही हिला घेऊन जा उगाच माझ्या हातून हिच्या जिवाच काही बरवाईट व्हायच...

मी बाबा : आमच्यासाठी ही ईथेच मेली...

मी आई : थोडीतरी लाज शरम बाकी असेल तर आता इथून निघून जा कायमची...

मी बाबा : (राघवला हात जोडून) कोणत्या तोंडाने तुमची माफी मागू ...

राघव : (त्यांचे जोडलेले हात धरून) अहो काका तुम्ही कशाला माफी मागताय?? तुमचा यात काहीच दोष नाही..

मीनलची आई तिला हात धरून घराबाहेर काढते... मीनलचे आईबाबासुद्धा निघून जातात... राघव आपल्या बाबांना बोलावून घडलेला प्रकार सांगतो.. आईची काळजी घ्यायला सांगून तो रागारागातच घराबाहेर पडतो...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मीनल घरातून निघून एका शांत ठिकाणी बसली होती.. इतक्यात तिचा फोन वाजला..

मीनल : हॅलो!!

पलीकडून : तुझी आणि माझी अडसर एकच आहे. नयना!!

मीनल : कोण बोलतंय???

पलीकडून : तु हो बोल आपण एकत्र हा विषय संपवून टाकू..

मीनल : just shut up... कोण आहेस तू??

पलीकडून : ते जास्त महत्वाचं नाही.. हव तर मला well whisher समज..

दोघांच बराच वेळ बोलन होत..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नयनाला सायंकाळी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात येतो.. राघव नयनाला भेटायला तिच्या घरी येतो.. नयना आणि अभय छान थट्टा मस्करी करत गप्पा मारत असतात.. म्हणजे नयना अपसेट असते पण अभय काहीना काही विषय काढून तिला हसवत असतो..

इतक्यात तिथे राघव येतो त्या दोघांना अस हसताना बघून तो जाम चिडतो आणि जाऊन अभयची कॉलर पकडतो.. नयनाला तर आधी काही कळलच नाही.. नयना राघवला अडवण्याचा प्रयत्न करते..पण राघव काही एक ऐकत नसतो..

राघव : तुला मी माझा खास यार समजत होतो.. तु असा वागशील अस मला वाटल नव्हत... (आणि तो अभयला मारू लागला)

अभय : (राघवचा हात सोडवत) राघव माझ ऐकून घे...

नयना : राघव सोड त्याला... काय झालंय तुला?? तु अभयवर हात उचललास???

राघव : तुला माहीत नाही याने काय केलय ते...

आणि राघव परत अभयची कॉलर टाईट पकडून त्याला जाब विचारायला लागतो... इतक्यात राघववर मागून सुरीने वार होतात.. दुसरा वार होणारच असतो की मीनल तिथे येते आणि वार करणाऱ्याला दूर ढकलते.. ती व्यक्ती परत उठून हल्ला करायला जाते पण राघव चलाखीने त्या व्यक्तीला पकडतो.. अभयसुद्धा राघवची मदत करत त्या व्यक्तीच्या हातातला सुरा काढून घेतो.. आणि त्याच्या तोंडावर असलेला मास्क काढतो.. त्या व्यक्तीला पाहताच सगळेच शॉक होतात.. नयनाला तर काय बोलावे हेच कळत नव्हते...

त्याचवेळेस घरात पोलिसांनी प्रवेश केला.. आणि त्यांनी त्या व्यक्तीला अटक केली...

पोलिस : विरेनचा खून आणि नॅनी व नयनावर प्राणघातक हल्ला करण्याच्या गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत मिस. दिप्ती!!! नॅनी शुद्धीवर आल्या... त्यांच्याकडूनच कळल...

सगळेच दिप्तीकडे आश्चर्याने बघत असतात.. अभय आणि नयना दिप्तीला अस करण्याच कारण विचारतात...

पोलिस : सांगा मिस. दिप्ती विरेनला का मारल..??

दिप्ती : राघव आणि नयना मध्ये विरेनने गैरसमज पसरवला होता त्याचा जाब त्याला अभयने विचारला असता त्याने अभयला धक्का बुक्की केली... त्या दोघांची तिथे माझ्या समोर हातापायी झाली.. मला विरेनचा खूप राग आला.. रात्री ढाब्यावर जेवन करून आम्ही सगळे आपापल्या घरी आलो पण सकाळची विरेनची हरकत मला स्वस्थ बसू देत नव्हती.. मी विरेनला पहाटे फोन करून कॉलेजच्या टेरेसवर बोलावल.. तो आधीपासूनच तिथे माझी वाट पाहत टेरेसच्या कट्ट्यावर बसून होता.. बेसावध असताना दिला त्याला ढकलून... माझ्या अभयवर हात उचलण्याची हिंमतच कशी झाली त्याची... म्हणून विषयच संपवून टाकला...

सगळेच शॉक होउन तिच बोलन ऐकत होते...

पोलिस : नॅनी आणि नयनावर हल्ला का केला??

दिप्ती : नॅनीतर चूकून मध्ये आली.. हल्ला तर नयनासाठी होता..

नयना : (अचंबित होऊन) दिप्ती???

दिप्ती : हो खर तर मला तुलाच मारायची होती...

नयना : अग पण का?? मी काय बिघडवल तुझ ???

दिप्ती : Because of अभय... (नयना आणि राघव अभयकडे बघतात.)

राघव तर आधिच अभयवर चिडला आहे..

दिप्ती : अभयला नयना आवडते.. (रागात अभयकडे नजर रोखून) आधी राघव आणि नयना एकत्र आले म्हणून तो गप्प बसला पण जेव्हा मीनल आणि राघवच लग्न झालं त्यानंतर तो नयनाच्या जास्त संपर्कात राहिला... त्यात मीनलची साथ मिळाली...

नयना : तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल दिप्ती... अग अभयने कालपर्यंत मला सादा फोन सुद्धा नाही केला ग... तु काय बोलतेस??

राघव : दिप्ती बरोबर बोलतेय नयना... तुझ्या सोबत ईमेलवर अभय बोलत होता.. नवीन ईमेल आयडी बनवून..

मीनल : मीच सांगितल होत त्याला.. अभयला नयना आवडते हे मी ढाब्यावरच ओळखले होते.. म्हणून मग मीच त्याला नयनासोबत बोलायला प्रोत्साहन दिलं.. नयनाला पाठवण्यात येणार्‍या प्रत्येक गिफ्टच बिल माझ्या अकाउंट मधून जात होत.. राघव खूप रोमँटिक आहे.. नयनाला संशय येऊ नये म्हणून हे सर्व रोमँटिक प्लॅन करन गरजेच होत.. आणि त्यावेळेस मी राघवला आपलस केल...

दिप्ती : मला संशय आधीपासूनच होता पण राघवच्या लग्नाच्या anniversary च्या दिवशी जेव्हा नयना रडत रडत घरी गेली, त्यानंतर मी मीनल आणि अभयच बोलन ऐकल, नयनाने अचानक मुंबईत येऊन यादोघांचा प्लान फिसकटला... खर तर मला मीनलचा राग आधी आला तिची हिंमतच कशी झाली अभयवर ओरडून बोलण्याची..पण खर मूळ नयना होती तिलाच जर संपवल तर अभय आणि मी एकत्र येऊ आणि इथे मीनल सोबत पण कायमच प्रश्न मिटेल.. म्हणून सकाळी मी गुपचूप घरात शिरले.. तेवढ्यात समोरुन नॅनी आली आणि तिने मला पाहिल, ती आरडाओरडा करणार या भीतीने तिच्यावर मी हल्ला केला.. ती बेशुद्ध पडली तेव्हा नयना आत येताना दिसली आज काही करून नयनाचा विषय संपवायचाच म्हणून मी तिथेच लपून बसले पण नशीबाने नयना वाचली..

अभय : तुझ्या संशयी स्वभावाला कंटाळलो होतो मी.. राघव मीनलसोबत सेटल झाला होता.. मला परत नयनाकडे आशेची किरण दिसली.. म्हणून तेवढच मी नयनासोबत ईमेलवर आपल मन रमवत होतो.. राघवनंतर नयनासाठी जवळचा मित्र मीच होतो..

राघव : (रागात अभयच्या अंगावर धावून जातो) मित्र या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला???

राघवला अभयवर धावून जाताना बघून पोलिसांचा हात सोडवून धावत जाऊन राघवर चाकूने हल्ला करते पण मीनल मध्ये येते.. चाकू मीनलच्या पोटात खोलवर शिरल्याने भरपूर प्रमाणात रक्तप्रवाह सुरू होतो.. राघव मीनलला सावरतो पण त्या गोंधळात त्याचा हात जखमी होतो.. अभय आणि पोलिस दिप्तीला मागून पकडतात आणि दूर करतात.. अभय पोलिसांना दिप्तीला घेऊन जायला सांगतो.. राघव मीनलला उचलून गाडीत घेऊन हॉस्पिटलला निघतो.. सोबत नयना आणि अभय सुद्धा जातात...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर मीनलला ICU मध्ये ठेवण्यात आले.. तिची प्रकृती फारच नाजूक होती.. राघव तिला भेटण्यासाठी गेला.. मीनल बेशुद्धावस्थेत होती.. राघव तिथेच बाजूला बसून होता.. थोड्यावेळाने मीनल शुद्धीवर आली... तोंडावर आॅक्सिजन लावला होता तिला नीट बोलताही येत नव्हत.. राघवने तिचा हात हातात घेत तिला धीर दिला.. मीनलच्या नजरेत पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता.. तिने आपल्या हातात राघवचची चार बोटे घट्ट पकडली आणि शेवटचा श्वास घेतला...

राघव डोळे पुसत बाहेर पडला.. दारात नयना सर्व पाहत होती.. राघव बाहेर येऊन ऐका सीटवर बसला.. नयनाही बाजुला येऊन बसली.. तिने राघवच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो नयनाच्या गळ्यात पडून रडायला लागला.. मीनल कशीही वागली असली तरी तिने शेवटपर्यंत त्याला भरभरून फक्त आणि फक्त प्रेमच दिल...

समोरुन नर्स येते राघवच्या हाताची मलमपट्टी करायला.. नयना नर्सला खुणेनेच सांगते की तुम्ही राहु देत मी करते.. आणि नयना स्वतः राघवचा हात हातात घेऊन मलमपट्टी करायला लागते.. नयना राघवचा हात हातात घेते.. राघव शांत बसून असतो.. डेटॉलमध्ये भिजवलेल्या कॉटनने आधी जखमे भोवती पुसत असते.. झोंबल्यामूळे स स् स् असा राघवने आवाज करताच नयनाने हळूवारपणे फुंकर घालताच त्याला बरे वाटले.. क्रिम लावून नयनाने हलकेच पट्टी बांधली.. त्याचे दोन्ही हात हातात घेऊन आपल्या ढोपरावर बसून त्याला मिठी मारली.. अभय त्या दोघांना एकत्र बघून निघून जातो...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दोन महिन्यानंतर नयना कृझवर New year साजरा करतेय...छान रात्रीच्या वेळी मोकळ्या आकाशाखाली.. संथ अशा निळ्या समुद्रावर, पाच मजली इमारत असलेली महाकाय अशी कृझ लांबून त्या विशाल महासागरात छोट्याश्या टिमटिमणार्या ताराप्रमाणे भासत होती...

कृझच्या सर्वात वरच्या मजल्यावर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास झगमगाट केली होती.. सगळीकडे सौम्य मेणबत्तीचा प्रकाश उजाळला होता, सोबत सौम्य असा रंगीबेरंगी लाईट चमकू लागली होती.. कृझवर छान पार्टी रंगत आली होती... शॉर्ट डार्क लवेंडर कलरचा वनपीस, सोबत हाइ हिल्स, कानात लांब चैनचे स्टड्स, केसांचा मेसी बन, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक... खुपच सुंदर दिसत होती नयना नेहमीप्रमाणे... की कोणीही घायाळ होईल...

New year celebration चा countdown सुरू झाला.. सर्वांच लक्ष त्या कृझवरच्या मोठ्या घडाळाकडे लागल होत.. 10..., 9..., 8..., 7..., 6..., जस जसा countdown पुढे चालत होता तसतशी लोकांची उत्सुकता वाढली होती.. एक वेगळाच जोश अंगात संचारला होता.. 5..., 4..., 3..., 2..., 1... आणि 12 च्या ठोक्याला संपूर्ण कृझची लाईट गेली.. दोन सेकंदाने नवीन झगमगासकट वेगळीच रोषणाई सुरू झाली.. नवीन उमेद घेऊन नवीन वर्ष आले सर्वांच्या मनात नवीन जोष जागवत. सगळेच एकमेकांना गळाभेट देत नविन वर्षाच्या शुभेच्छा देऊ लागले..

अचानक वरच्या मजल्यावरची सगळी झगमगाट बंद झाली फक्त मेणबत्तींचा प्रकाश सौम्य अस डिम लाईट चमकत होते.. एका ठिकाणी स्पॉट लाइट सोडली आणि छान रोमॅन्टिक गाण सुरू झाल.. नयनाने वळून पाहिले तर तिथे राघव होता..

🎶🎶 जब जब तेरे पास में आया इक सुकून मिला

जिसे मैं था भूलता आया वो वजुद मिला

जब आए मौसम ग़म के तुझे याद किया

जब सहमे तनहापन से तुझे याद किया

दिल, संभल जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू

दिल, यही रुक जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू

ऐसा क्यों कर हुआ, जानू ना मैं जानू ना

दिल, संभल जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू

दिल, यही रुक जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू 🎶

राघवने नयनाचा हात पकडून स्वतःकडे लिफ्ट केल.. ती येउन राघववर धडकली.. राघवने हळूच तिची हनुवटी वर उचलली तशी त्या रोषणाईत तिच रुप अजूनच उजळून निघाले.. त्याने हलकेच तिच्या चेहऱ्यावरून आपल बोट फिरवल आणि तिला डान्ससाठी आव्हान दिलं.. दो लवबर्डस् जब एकदूजे मे खो जाते हे तो उनके लिए पूरी कायनात भी रूक जाती है | काहीसा असाच नजारा होता तिथे...

🎶जिस राह पे, है घर तेरा अक्सर वहां से हा में हु गुजरा

शायद यही दिल मे रहा तू मुझको मिल जाये क्या पता

क्या है ये सिलसिला, जानू ना मैं जानू ना

दिल, संभल जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू

दिल, यही रुक जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू

कुछ भी नहीं,जब दरमियाँ फिर क्यों है दिल तेरे खवाब बुनता

चाहा की दे तुझको भुला पर ये भी मुमकिन हो ना सका

क्या है ये मामला, जानू न मैं जानू ना

दिल, संभल जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू

दिल, यही रुक जा जरा फिर मोहब्बत करने चला है तू

दिल, संभल जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू 🎶🎶

दोघेही बेभान होऊन आज नाचले.. गाण संपताच राघवने आपल्या हातात असलेली रिंग नयनाच्या बोटात घातली.. आणि परत मगाजचची लाइटची झगमगाट परत एकदा सुरू झाली.. दोघांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला.. नयनाने आसपास पाहिले खूपच लाजली होती आज ती.. तिने समोर पाहिलं तर तिचे आईवडील आणि राघवचे आईवडिलही प्रेक्षकांमध्ये शामिल होत टाळ्या वाजवून त्यांच अभिनंदन करत होते..

नयना आपल्या आईवडिलांना तिथे बघून आश्चर्यचकित झाली.. तिने राघवकडे पाहिले.. तो नुसताच मिश्किल हसत होता..

नयनाच्या आईवडिलांना राघवनेच मनवून नयनासाठी मागणी घातली आणि आजच्या दिवशी सरप्राइज engagement प्लान केला.. शेवटी तो राघव आहे रोमँटिक असा सरप्राइज प्लान करणार नाही तर कस चालेल.. ☺

राघव नयनाचा हात पकडून तिला कृझवर एका कोपऱ्यात घेऊन गेला.. जिथून उघड्यावर पडलेल्या समुद्राचा नयनरम्य असा नजारा स्पष्ट दिसत होता.. आकाशात फटाक्यांची आतिषबाजी डोळ्यांचे पारणे फेडत होती.. राघवने अलगद मागून नयनाला मिठी मारली आणि हलकेच तिच्या गालावर किस केला.. तिनेही मग लाडिकपणे राघवच्या गालावर छोटीशी किस टेकवली..

नयनाला स्वतःकडे वळवून राघवने परत तिला नजरेनेच आकाशाकडे पाहण्यास खूणवले.. त्या फटाक्यांच्या आतिषबाजीत हार्ट शेप उजळत होता.. नयनाने राघवला घट्ट मिठी मारली.. त्या मिठीत राघव आज खऱ्या अर्थाने सुखावला... नयनाने राघवच्या नजरेत पाहिल तस राघवने तिच्या कमरेभोवतीचा आपल्या हाताचा विळखा अजून घट्ट करत तिला आपल्या जवळ ओढले आणि नयना आता फक्त त्याच्या नजरेत पाहत होती.. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते.. अशीच नजरभेट घेत राघवने अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ क्रश केले.. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले एकमेकांत हरवून गेले... 🥰


समाप्त..Rate this content
Log in

Similar marathi story from Drama