SHUBHANGI SHINDE

Romance Tragedy Others

5.0  

SHUBHANGI SHINDE

Romance Tragedy Others

सावर रे.....

सावर रे.....

39 mins
2.1K


समारंभ संपवून कबीर बाहेर पडला…. गार्डने गाडीच दार उघडून दिल… कबीर गाडीत बसला तसा रेवाने मेसेज दिला की आपल्याला तडक हॉस्पिटलला जायच आहे…. आणि कबीरचा फोन त्याला परत दिला…. कबीर फोन घेऊन चेक करतो…


कबीर : हॉस्पिटलला का??? (फोन बघुन) वीस miss calls??? रेवा????


रेवा : सर मलासुद्धा नक्की माहीत नाही… पण दिपक सरांनी ताबडतोब हॉस्पिटलला येण्यास सांगितले..


कबीर : मग मला आधी का नाही सांगितलं????


रेवा : सर मी सांगणारच होते पण तुमच नाव announced झाल आणि तुम्ही speech देण्यासाठी स्टेजवर गेलात…. दिपक सरांना परिस्थिती कळली तेव्हा तेच म्हणाले की नंतर सांग म्हणून…


कबीर : हममम् (काहीच बोलत नाही)


गाडी एकदाची हॉस्पिटल जवळ येऊन थांबते… त्यांना रिसीव्ह करायला already काही लोक उभे असतात… ते त्यांना ICU वॉर्ड मध्ये घेऊन जातात…. बाहेर कबीरची आई बसलेली असते… कबीर तिच्या जवळ जातो तसा आई एकदम हंमबरडाच फोडते….


आई : (रडत कबीरच्या खांद्यावर डोक ठेवून) कबीर!!! आपली दी… बघ ना.. अरे.. काय झालं…???


कबीर : आई… शांत हो… मी आलोय ना… काहीही होणार नाही आपल्या दीला….


आईला शांत करून रेवाला तीची काळजी घेण्यास सांगतो … आणि दिपकला नक्की काय घडलय हे विचारतो….


दिपक : तु फोन उचलत नव्हतास… म्हणून आईने मला कॉल केला…. नेहा ने आत्महत्येचा प्रयत्न केला….


कबीर : काय ?? पण का?? दी अस का करेल???


दिपक : तिच्याजवळ ही चिठ्ठी सापडली… त्यात तिने अस लिहीले आहे की प्रेमात मला दगा मिळाला आहे… त्याने प्रेमाच खोट नाटक केलं आणि मी त्याच्या प्रेमात सर्वस्व हरवून बसले… मला आता जगायच नाहीए…


कबीर : (अतिशय रागात) कोण आहे तो हरामखोर?? जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात असू देत मी त्याला शोधून काढेण….


इतक्यात डॉक्टर बाहेर येतात…. आणि नेहा ठिक असल्याचे सांगतात…. फक्त आत्ता तिला आराम करु देत, तिला त्रास होईल असे कोणतेही प्रश्न विचारू नका… तिची मानसिक परिस्थिती ठीक नाही आहे…. so please take care of her…. येवढ बोलुन ते निघून जातात….. कबीर दाराच्या काचेतून आत पाहतो तर नेहा शांत बेडवर पडलेली असते….


डिस्चार्ज मिळून घरी आल्यावर कबीरने आईला आणि नेहाला त्याच्या आत्याकडे दुबईला पाठवले… जेणेकरून हवापालटही होईल आणि नेहा तिच्या जुन्या आठवणीतून दूर राहिल….


दोन महिन्यानंतर…. दिपकच्या मोठ्या भावाची लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती… कबीरही तिथे आला होता… दिपक सोडून पार्टीत कोणीच त्याच्या ओळखीचे नव्हते…


कबीर पार्टी न्याहाळत असतो… ब्लॅक पॅण्ट, हलका क्रीम कलरचा शर्ट, हातात Rollex watch, Tom Cruise स्टाइलचा हेअर कट आणि हातात ड्रिंक्सचा ग्लास… अगदी साऊथच्या अल्लू अर्जुन सारखा हँडसम…. पार्टीत बर्‍याच मुली त्याच्यावर फिदा झाल्या होत्या…. हातातल ड्रिंक्सच ग्लास संपला म्हणून तो काउंटरवर गेला आणि दुसरा ग्लास उचलला त्याच वेळी अजून एक हात तोच ग्लास पकडून होता… नजर गेली तर नाजूक असा हात गोरापान दूधाच्या मलाईसारखा मुलायम… लाल नेलपेंट नखांवर चढवलेली, हातात खड्यांच्या कडा…. त्याची नजर आता त्याच हाताच्या बोटांवरून थेट वर चढत गेली…. स्लिव्हलेस आॅफव्हाईट कुर्ता त्याला सोनेरी रंगाची मोत्याची डिझाइन…. पाठीवर रोल केलेले मोकळे केस आणि कानाला फोन…. ती एकीकडे फोनवर बोलत होती आणि दुसऱ्या हाताने ते ज्यूसच ग्लास पकडून होती… कबीर तिची एक झलक पाहण्यात इतका हरवला की त्याच्याही लक्षात नाही आले की ते दोघेही एकच ग्लास पकडून आहेत… फोनवर बोलता बोलता ती मागे वळली तशी त्याची प्रतिक्षा संपली.. उभट चेहरा, लांब सडक नाक, काळेभोर पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजुक ओठ…


तिने कानाला लावलेला फोन बाजूला केला आणि कबीरला पाहिल… तो ज्यूसचा ग्लास तसाच सोडून तोंड वाकडं करून निघून गेली… इतक्यात दिपकने येऊन कबीरच्या खांद्यावर हात ठेवत त्याला भानावर आणले….


दिपक : काय मित्रा कुठे हरवला???


कबीर : (भानावर येत) कुठे काय?? काही नाही…


दिपक : पाहिल मी…. काया!!! काया देशमुख… दादाच्या खास मित्राची बहीण…


कबीर : हममम…


दिपक : पण आपली डाळ नाही शिजणार….


कबीर : म्हणजे???


दिपक : तिला बिझनेसमन नाही आवडत…


कबीर : (हसून आश्चर्याने) ये क्या बात हुई???


दिपक : अरे पण तु इथे ज्युस काउंटरवर काय करतोयस??? आपली स्पेशल सोय तिकडे आहे… एक एक लार्ज हो जाए??


आणि ते दोघे बार काउंटरवर जातात… इथे काया पार्टीत जाम बोअर झाली आहे.. ती सतत तिच्या दादाला इथुन लवकर निघण्याचा आग्रह करतेय… कायाचा दादा राजेश देशमुख आणि दिपकचा भाऊ… बिझिनेस पार्टनर आहेत शिवाय चांगले मित्र सुद्धा आहेत… काही वेळाने दिपक आणि कबीर सुद्धा तिथे येतात… कबीरची ओळख करून दिल्यावर त्यांच्या सहज बिझिनेसच्या गप्पा सुरू होतात तशी काया वैतागून निघून जाते….


काया आज सकाळी जरा घाईतच निघत असते कारण आज तिच्या पेंटिंगच exhibition होत… तिने दादालाही आठवणीने उपस्थित राहण्यास सांगितले पण नेहमीप्रमाणे तो त्याच्या फोनमध्ये व्यस्त होता… ड्रायव्हरला सुचना देऊन ती exhibition center ला निघाली… अर्ध्या रस्त्यावर येऊन गाडी अचानक धक्के खाउ लागली… ड्रायव्हरने खाली उतरून गाडी चेक केली..


ड्रायव्हर : मॅडम गाडीचा गॅसकीट उडाला आहे…


काया : काय??? काय उडालाय?? (काहीच न कळल्यामुळे)


ड्रायव्हर : गाडी गॅरेजमध्ये न्यावी लागेल….


काया : Ohh no…. shittt…. ( रागात गाडीला लाथ मारून)


थोडा विचार करून कॅब बुक करते… पण कॅब यायला पण पंधरा मिनिटे लागणार होती… त्यामुळे ती अजूनच चिडते… तेवढ्यात एक काळी स्कोडा गाडी बाजूला येऊन थांबते… त्या गाडीतून दिपक बाहेर पडतो….


दिपक : Good morning Kaya…. इथे काय करतेस ??? (मुद्दाम चिडवत)


काया : (आणखी चिडून) morning walk करतेय… दिसतय ना??…. गाडी बिघडली आहे माझी आणि मला urgently… Exhibition center ला जायच आहे…


दिपक : Just chill…. हव तर मी सोडतो… On the way च आहे….


काया काहीच ओपशन नसल्याने त्याच्या गाडीत बसते… गाडीत ड्रायव्हर सीटवर कबीर बसलेला असतो… तो तिला hii करतो पण ती इग्नोर करते…


दिपक : कसल exhibition आहे.. ??


काया : paintings च…


दिपक : Ohhh really… आम्ही पण येतो…


कबीर : आपल्याला मीटिंगला जायचे आहे… हा फालतू टाईम पास नको… माहित नाही ते चित्र विचित्र रेघोट्या ओढलेले त्या कागदाला काय म्हणून लोक न्याहाळत असतात कोण जाणे….


काया : (आता तिला जरा जास्तच राग येतो) तुम्हाला नाही कळणार ते….


थोड्याच वेळात ते लोक सेंटरला पोहचतात… कबीर नाही म्हणत असतानाही दिपक त्याला आत घेऊन जातो आणि एक एक करत पेंटींग पहात असतात… एव्हाना बऱ्यापैकी गर्दी जमलेली असते… ते दोघ एका पेंटिंग जवळ येऊन थांबतात… काया पण तिथे येते…. दिपक त्या पेंटिंगची तारीफ करत असतो तसा कबीर एक एक नुक्स काढायला लागतो…. काहीही हे काय रेघोट्या मारल्या आहेत आणि लोक हे लाखो रुपये खर्च देऊन विकत घेतात…. तुला सांगतो जर कोणी खरच हुशार असेल तर या अशा रंगोट्या विकत घेणार नाही…. दिपक कबीरला शांत करतो कारण त्याला माहित असत की ह्या कायाच्या पेंटिंग आहेत….


काया : (रागात जाऊन कबीरला मागे खेचत) Hey Mr.. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जाऊ शकता… दिपक तुझ्या फ्रेंडला इथुन घेऊन जा….


दिपक : okkk we are going….


इतक्यात तिचा मॅनेजर तिथे येतो…. आणि तिच्या सर्व paintings विकल्या गेल्याच सांगतो… काया खूप खुश होते…. जवळपास पन्नास लाखाला तिच्या paintings विकल्या जातात पण खरेदी करणार्‍या माणसाने त्याच नाव गुप्त ठेवलेले असते …. मॅनेजरने दिलेला पन्नास लाखांचा चेक ती मोठ्या अटीट्युड ने कबीरला दाखवते… आणि परत नाक उडवून तिथुन निघून जाते…. कबीर तिला बघून मनोमन हसतो….


इथे बिझिनेस प्रपोजलमूळे राजेश आणि कबीरची ओळख वाढत चालली होती… अशाच एका बिझिनेस प्रॉफिटमूळे राजेशने त्याला आणि दिपकला घरी जेवणाचे आमंत्रण दिले… ठरल्याप्रमाणे दोघेही राजेशच्या घरी आले… दारावर बेल वाजली तर कायाने दार उघडले…. समोर कबीरला बघून तिला रागच आला पण मागून राजेश आला आणि त्यानेच त्यांना आमंत्रण दिलंय हे सांगितल्यावर ती तिचा राग तात्पुरता आवरते… कबीर आत येतो तसा काया मागून त्याला चिडवते हे कबीरच्या लक्षात येऊन तो मागे वळतो तस ती काहीच नसल्याच भासवते…


काही औपचारिक गप्पांनतर ते चौघे जेवायला बसतात… आज कबीरची चांगलीच खोड मोडायची अस ठरवून काया मेडला काही सुचना देते…


राजेश : चला सुरूवात करुया….


कबीर : हो… (आणि समोर असलेल सुप प्यायला लागतो)


तसा त्याला ठसका लागतो… (अती तिखट असल्यामुळे)


राजेश : Are you okk????


काया : (प्लान वर्क झाला म्हणून खूश आणि कबीरला चिडवून) तिखट जमत नाही वाटतं….


कबीर समजून गेला की कायानेच हे केल आहे पण तो काही न बोलता गप्पपणे सूप पीत राहतो… सूप खूपच तिखट होत… नाका तोडांतून पूर्ता धूर निघत होता… कबीरचे डोळे लाल झाले होते आणि डोळ्यातुन पाणी येत होत…


काया आधी तर मनोमन खूप खुश होती पण आता कबीरची अवस्था पाहून घाबरली होती कारण दादाला जर कळल तर आपली खेर नाही हे तिला माहीत होतं… एक बाउल सूप संपवल्यावर कबीरचा संयम तुटला आणि त्याने wash basin चा रस्ता विचारला त्याला राजेशने दिशा दाखवताच तो पळत सुटला… बेसिनमध्ये जाऊन त्याने गार पाण्याचे थबके तोंडावर मारले… फ्रिजच गार पाणी गटा गटा प्यायला…. तोंडाची नुसती आग आग झाली होती…. काय कराव काहीच सुचत नव्हतं… खिशातला रुमाल काढून त्याच्यात तोंड दाबल…. पण सगळ व्यर्थ…. बर्फाचा तुकडा तोंडात कोंबला आणि डोळे मिटून ती आग शांत होण्याची वाट पाहू लागला….


त्याची गंमत पाहण्यासाठी त्याच्या मागोमाग आलेली काया आता त्याची तडफड बघून कासावीस झाली होती पण तस न दाखवता तिने गुळाचा खडा त्याच्यासमोर धरला… त्याने तिच्याकडे पाहिलं… तिने पुढे केलेल्या हाताला धरून तिला स्वतःकडे ओढल आणि काही कळायच्या आत आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले… तिने स्वतःला सोडवण्याचा अतोनात प्रयत्न केला पण पुढची दोन मिनिटे तरी तिला ते जमल नाही…. काही क्षणाने त्याने तिला सोडल आणि त्या हातातला गुळाचा खडा आपल्या ओठांनीच तिच्या तळहातावरुन उचलून खाल्ला…. 


कायाने रागाच्या भरात त्याच हाताने त्याच्या गालावर आपली पाच बोटे उमटवली….तसा तो कायाच्या अजून जवळ जाऊ लागला… आता काया थोडी चलबिचल झाली…. आता हा काय करणार या विचाराने ती आपल पाऊल मागे टाकत असते… तसा तो आणखी जवळ जाऊ लागला…. तसा मागून राजेशचा आवाज ऐकू आला…. तसे ते दोघेही परत जागेवर येऊन बसतात…


राजेश : कबीर…. Any problem???


कबीर : काही नाही…. सूप खरच खूप छान आहे…. आवडला मला… (कायाकडे बघून गोड हसत)


काया : (रागात ) घ्याना अजून थोड सूप….


कबीर : नाही नाही ठीक आहे… माझ पोट भरल…. (घाबरून)


जेवण झाल्यावर दिपक आणि कबीर घरी जातात…. काया सुद्धा थोड्यावेळाने झोपायला जाते… पण तिला सारख बैचेन वाटत असत… न राहवून सारखा मगाजचा किसचा प्रसंग आठवत असतो… त्याचा तो स्पर्श, त्याच्या परफ्यूमचा मंद सुवास तिला बैचेन करत असतो… मोठ्या मुश्किलीने तिला शांत झोप लागते…. 


रात्री अचानक तिला जाग येते…. शरीर पूर्ण घामाघूम झालं होतं ती अस्वस्थ होऊन उठून बसते…. घड्याळात बघते तर बारा वाजायला दहा मिनिटे बाकी असतात… घश्याला कोरड पडल्यामुळे ती पाणी प्यायला जाते पण टेबलावरच्या जग मध्ये पाणी संपले होते म्हणून ती उठून किचनमध्ये जाते… फ्रिजमधली पाण्याची बाटली घेऊन तहान भागवते…. परत रुममध्ये जाण्यासाठी मागे वळते तर समोर कबीर उभा असतो….


काया : (एकदम दचकून) तु इथे आणि या वेळेस???


कबीर : (मिश्किल हसत) सुप खूपच तिखट होत… म्हणून परत तोंड गोड करायला आलोय…. आता तुला नाही सोडणार….


काया : (थोडी घाबरून) हे बघ मी दादाला बोलावीन…. तु जा इथुन…


कबीर : बोलव…. तो गार झोपला आहे… (परत हसून तो कायाच्या जवळ जातो… )


काया त्याला तिथून जाण्यासाठी सांगत असते पण तो अजूनच तिच्या जवळ जातो… आपला उजवा हात तिच्या कमरे भोवती घेऊन तिला स्वतःच्या जवळ ओढतो… कायाच्या चेहर्‍यावरून घामाची धार ओघळून मानेवर उतरते… ती आता पूर्ती घाबरते… तो तिला अजून आपल्या जवळ ओढून आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवायला जातो तशी ती दादा…. दादा… म्हणून जोर जोरात हाक मारु लागते…. आणि….. आणि…. घाबरतच झोपेतून उठते…. आपण स्वप्न बघत होतो हे तिच्या लक्षात येत…. डोळे चोळत घड्याळ बघते तर घड्याळात बारा वाजलेले असतात…


Happy birthday to you… 

Happy birthday to you… 

Happy birthday… happy birthday… 

Happy birthday to you….


काया : दादा…. (अगदी लाडिक)


राजेश : Happy birthday काऊ…. (कायाला मिठी मारून)


काया : Thank you…. दा…. (समोर सजवून ठेवलेले गिफ्ट पाहून) आsss… हे सर्व माझ्यासाठी?? Love you भाई… Thank you….


राजेश : You’re welcome बच्चा… झोप आता सकाळी उघडून बघ सगळे गिफ्ट्स…. ( आणि तो दार लावून जातो)


काया एक मस्तपैकी आळस देते आणि आपण स्वप्न पाहत होतो हा विचार करून मनोमन हसते… समोर लहान मोठे गिफ्ट्स सजवून ठेवले होते त्यावर एक नजर फिरवते… अचानक तिची नजर एका ठिकाणी येऊन थांबते… समोर एक गडद लाल रंगाच गुलाब असत सोबत छोटस ग्रिटींग… त्यावर एक मजकूर लिहीलेला असतो….


A beautiful rose for a beautiful woman…

Happy birthday Kaya….


रोझ आणि कार्ड बघून ती खूप खुश होते… ते फूल आणि कार्ड असच हृदयाला कवटाळून ती बेडवर पडते… कोणी दिल असेल हे??? याचाच विचार करत झोपी जाते…


सकाळी अगदी हॅपी हॅपी मूड मध्ये ती उठते… छान तयार होऊन आरशात स्वतःलाच न्याहाळत असते…आणि स्वतःशीच बोलते…. “Happy birthday Princess…” स्वतःलाच आरशात बघून flying kiss देते…


बाहेर हॉलमध्ये येते तिथे एक गुलाबांच्या फुलांचा गुच्छ आणि एक मोठ चॉकलेट ठेवलेल असत…. पुन्हा एक मेसेज….


Again a beautiful roses for a beautiful Princess…. 

तुझ्यातला या चॉकलेट सारखा गोडवा या फूलांप्रमाणे बहरत राहो….


काया या सगळ्या सरप्राइज ने खूप खुश होऊन जाते… पण दिवसभर बर्थडे सेलिब्रेट करायला कोणच नसत… दादा आॅफीसमध्ये बिझी… संध्याकाळी पार्टी आणि पार्टीत गेस्ट कोण तर दादाचे बिझिनेस फ्रेंडस… How borring…


आपल्या कॉलेज फ्रेंडसना घेऊन मुवी आणि शॉपिंगला जाते… संध्याकाळी घरी आल्यावर दादा तिला तयार होण्यास सांगतो… आज बर्थडे बाहेर सेलिब्रेट करु अस सांगून तिला तयार होण्यास सांगतो… काया सुद्धा जास्त आढेवेढे न घेता छान तयार होऊन येते…


लेमन कलरचा ओफ शोल्डर लॉंग प्रिंसेस गाउन… पीनप करून मोकळे सोडलेले केस… कानात हिर्याचे स्टडस्…. हातात साजेसा wrestle… अगदी परी सारखी दिसत होती ती… राजेश तिला एका ठिकाणी घेऊन येतो… गाडी पार्क करण्याच्या बहाण्याने तिला एकटीलाच आत जाण्यास सांगतो… डोअर कीपर दार उघडून देतो तशी ती आत जाते… सगळीकडे धुकट असा प्रकाश असतो… ती आसपास नजर फिरवते… सगळीकडे तिच्या exhibition वाल्या पेंटिंग्ज लावलेल्या असतात… ती हॉलच्या मध्यावर येऊन थांबते… तिथे तीच पोर्ट्रेट असत… ती मनोमन विचार करते की माझ इतक सुंदर चित्र कोणी काढल… त्या चित्रात तिचा तोच फर्स्ट लुक होता जो पाहून कबीर घायाळ झाला होता…. 


ती मागे वळून बघते तर समोर कबीर उभा असतो… तिचा हात हातात घेत…. तुझ्या कलेची कोणी बोली लावावी हे मला नाही पटत म्हणून मीच ती सगळी ठेवून घेतली… तुला त्या दिवशी पार्टीत पाहिल आणि तिथेच माझी विकेट पडली…. त्या दिवसापासून तुला हुबेहुब या चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करतोय बघ जमलाय का?? 


I love you काया…. I love you so much… आणि सगळीकडे प्रकाश होतो.. सगळे टाळ्या वाजवायला लागतात… राजेश कायाला सांगतो की हा सगळा सरप्राइज प्लान कबीरचा होता… त्याच तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याला तुझ्याशी लग्न करायच आहे…


कबीर कायाला त्याने आणलेला डायमंड सेट तिला गिफ्ट देतो… तस गर्दीतून आवाज येतो अरे असा हातात काय देतो तिच्या गळ्यात माळ…


सगळे त्याला चीअर करायला लागतात… तो नेकलेस एका हातात घेतो दुसऱ्या हाताने तिच्या मानेवर हात फिरवत तिचे केस बाजूला करत नेकलेस तिच्या गळ्यात घालतो… त्याच्या स्पर्शाने ती शहारून जाते…


काया लाजेने चूर होते.. एक नजर कबीरकडे बघते आणि नजर चोरत दूर पळायला बघते तस कबीर तिच्यासाठी गाणं गातो….


सुनो ना संगेमरमर….

कि ये मीनारें …..

कुछ भी नहीं है आगे तुम्हारे 

आज से दिल पे मेरे राज तुम्हारा 

ताज तुम्हारा…..

सुनो ना संगेमरमर 

कि ये मीनारें 

कुछ भी नहीं है आगे तुम्हारे 

आज से दिल पे मेरे राज तुम्हारा 

ताज तुम्हारा


काया पळत जाऊन कबीरला बिलगते…. दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावतात…


इथे बर्थडे पार्टी संपवुन काही दिवसांच्या आतच कबीरच्या इच्छेनुसार ते दोघे रजिस्टर मॅरेज करतात… आज कायाला सगळं खर सांगून टाकू असे दिपक कबीरला सुचवतो पण कबीर टाळाटाळ करतो… कबीरला कोणाचातरी फोन येतो आणि तो तडक काहीही न सांगता निघून जातो… जाताना दिपकला कायाची काळजी घेण्यास सांगतो….


कबीरची फ्लाईट दुबईत लँड होते… कबीरच्या आईनेच त्याला अर्जंट बोलावून घेतलं होतं… कारण प्रश्न नेहाचा होता… नेहाला एका मुलाने मागणी घातली होती… मागच्या जीव देण्याच्या प्रसंगानंतर सगळेच तिची आधीपेक्षा जास्त काळजी घेत होते…


इथे येऊन सगळयांना भेटून कबीरला खूप बर वाटत… नेहाला म्हणजे आपल्या लाडक्या दी ला एवढ खुश बघून तो अजूनच सुखावतो…


दी तुला आनंदी बघुन मला खूप…. खूप…. खूप बर वाटतय…. I am so much happy for you….


Who’s the lucky guy??? I’m so excited to meet him…..


नेहा : ते बघ आलेच (अस म्हणत नेहा पुढे जाते)


कबीर नेहाच्या दिशेने वळतो…. समोरच्या व्यक्तीला बघून त्याला शॉकच लागतो…. राजेश!!!!


राजेश पण कबीरला इथे बघून आश्चर्यचकित होतो….


नेहा दोघांची एकमेकांना ओळख करून देत सांगते की … कबीर राजेश मला दुबईत त्याच्या बिझिनेस टूअरवर असताना कॅफेमध्ये भेटला… आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि हा तेव्हापासून माझ्यावर प्रेम करतोय पण त्याने कधी सांगितलं नाही मला कारण त्यावेळी माझ दुसऱ्या कोणावर प्रेम होत… त्याच मुलाने मला दगा दिला…. पण राजेशने मला या दुःखातून सावरायला मदत केली आणि कालच लग्नाला मागणी घातली… आणि म्हणूनच तुला आईने लगबगीने बोलावून घेतलं…. पण तुम्ही दोघे एकमेकांना कसे ओळखता????


कबीर : (अजूनही शॉकमध्ये. . काय बोलाव काहीच सुचत नाही)


राजेश : नेहा ते आपण नंतर बोलु… कबीर थकून आला आहे .. त्याला आराम करु देत…. (कबीरचा चेहरा ओळखुन)


राजेश कबीरला घेऊन टेरेसवर जातो….


कबीर त्याची हात जोडून माफी मागतो… राजेश माझा गैरसमज झाला… नेहा दीला दगा देणारा तुच आहे असं समजून एक भाऊ म्हणून होणारा त्रास तुला देण्यासाठी आलो होतो….


राजेश : काय??? म्हणजे तु कायाला???


कबीर : नाही नाही…. मी कायाला फसवल नाही किंवा काही त्रासही दिला नाही… फक्त खर काय ते लपवून ठेवल… पण प्रेम मात्र खर केल… तिला मागणी घालताना व्यक्त केलेल्या एकुण एक भावना खऱ्या होत्या … दी ला झालेल्या त्रासाची शिक्षा मला तिला द्यावीशी नाही वाटली…. कारण त्यात तिचा काहीच दोष नव्हता…. म्हणून मी नंतर माझा निर्णय बदलला…


राजेश : (मोठ्या समजुतीने) जे झालं ते झाल… हे आता आपल्या दोघांतच ठेव… कोणाला काही सांगायची गरज नाही….


कबीर मनातून समाधान व्यक्त करतो…. आणि नात्यात कोणतही गुपीत असू नये म्हणून कायाला विश्वासात घेऊन सगळं खर सांगण्याचा निर्णय घेतो….


---------------------------------------------------------------------


राजेश आणि कबीरची सगळी फॅमिली भारतात परतात…. घरी आल्यावर तो थेट कायाला भेटायला आपल्या फ्लॅटवर जातो आणि दिपकला पण बोलावून घेतो… दिपक आधीच तिथे हजर होतो… काया मात्र कुठेच दिसत नाही… कबीर दुबईत माहित पडलेल सगळं सत्य दिपकला सांगतो आणि काया कुठे आहे अशी विचारणा करतो…


दिपक : कबीर खूप उशीर झाला रे….


कबीर : (मनात धडकी भरत) म्हणजे???


दिपक : माहीत नाही पण तिला हे सगळं कसं कळाल?? ? तु गेल्यावर तिने मला सगळं विचारलं… मी तिच्यापुढे काहीच बोलू शकलो नाही… तुला जाब विचारण्यासाठी ती रागात इथुन निघाली… तु इथे नाही म्हटल्यावर मग भावाच्या घरी जाण्यासाठी निघाली…. आणि…. .


कबीर : आणि काय?? दिपक !!! (खूप टेंशनमध्ये)


दिपक : she got an accident कबीर…


कबीर : नाही…. हे नाही होऊ शकत…. (जबरदस्त शॉक लागून) तु तिला का नाही थांबवलस??…. आणि आम्हाला का नाही सांगितलं??? आता कुठे आहे ती???


दिपक : तीची गाडी नदीत सापडली… पण तिचा काहिच पता नाही लागला… मी फोन केला होता राजेशला पण तो इथे नव्हताच… आणि तुझाही काहीच ठाव नव्हता….


कबीरला दिपकच काहीच बोलन ऐकू येत नव्हत…. तो तसाच ढोपरावर खाली कोसळला… आणि जोर जोरात कायाच नाव घेऊन रडू लागला….


-------------------------------------------------------------------------




बघता बघता दिड वर्ष सरून गेल… कायाचा काहिच पता लागत नव्हता… कबीर कायाच्या आठवणीत नुसता झुरत चालला होता… गर्दीत असूनही नसल्यासारखा होता… तिच्या आठवणी विसरण्यासाठी कामात झोकून दिलं होतं त्याने स्वतःला पण रिकामी घर त्याला खायला उठत होत… राजेश आणि नेहानेही आपल्या सोबत राहण्यासाठी खूप समजावल… पण स्वतःला शिक्षा म्हणून तो एकटा राहत होता… खर तर त्याला आता एकांत हवा होता… दिवसभर अॉफीस आणि संध्याकाळी कायाचे स्केचेस काढण्यात मग्न असायचा…



एकेदिवशी आॅफीसच्या नवीन प्रोजेक्टमुळे निघायला त्याला उशीर झाला… अस पण घरी वाट बघणार कोण आहे म्हणून तोही कामात व्यस्त झाला… बाहेर जोरदार पाऊस पडत होता… जागोजागी पाणी भरत होत… आॅफीसचा अर्धा स्टाफ आधीच निघून गेला होता… फक्त प्रोजेक्टशी निगडित लोक आणि इतर काही स्टाफ अॉफीसमध्ये थांबून होते… पाऊस इतका जोरदार होता की आॉफीसचा एक मजला पूर्ण पाण्याखाली गेला… बरेच लोक अडकून पडले होते…


रेवाही आॅफीसमध्ये थांबून होती… काम संपवून सगळे निवांत झाले… इकडे कबीर केबीनमध्ये येऊन चेअरवर मागे टेकून डोळे मिटून शांत पडतो… इतक्यात रेवा आत येते…. आणि कबीरच्या केसात आपला हात फिरवते… (मनातून रेवाला कबीर खूप आवडत असतो)


कबीर : (दचकून) काय करतेस???


रेवा : कॉफी आणली होती तुमच्यासाठी… तुम्ही थकला असाल ना खूप…????


कबीर : बर केलस कॉफी आणलीस…


रेवा : बाहेर पाऊस किती छान पडतोय ना… अगदी रोमँटिक… (आपल्या हातातील कॉफीचा घोट घेत)


कबीर : (रोमँटिक शब्द ऐकून भरून आल्यामुळे) तुझ झालं असेल तर तु जाऊ शकते…


रेवा : (त्याचा मूड ठीक करण्यासाठी) सर… या पावसात गाणी ऐकायला आवडतात का तुम्हाला??? थांबा मी रेडिओ लावते…


बोलता बोलता तिने तिथल्या म्युझिक सिस्टिममध्ये रेडिओ आॅन केला.. FM वर छान छान गाणी सुरू होती.. कबीरने वैतागून रेडीओ बंद करण्यास सांगितला.. इतक्यात आतिफ असलमच गाण वाजू लागल… कलियुग चित्रपटातल… रेवाला ते गाणं चालू ठेवत खंबीर तिला बाहेर जाण्यास सांगतो… आणि आपल पाकिट बाहेर काढून त्यातल्या कायाच्या फोटोला न्याहाळत तो त्या गाण्यात हरवून जातो ….


आ…. आ….

जुदा होके भी, तू मुझमें कहीं बाकी है

पलकों में बनके आंसू, तू चली आती है

जुदा होके भी..


वैसे जिंदा हूँ मैं ज़िन्दगी, बिन तेरे मैं

दर्द ही दर्द बाकी रहा है सीने में

सांस लेना भर ही यहाँ जीना नहीं है


अब तो आदत सी है मुझको ऐसे जीने में

जुदा होके भी, तू मुझमें कहीं बाकी है


पलकों में बनके आंसू, तू चली आती है

जुदा होके भी..


गाण ऐकता ऐकता कधी झोप लागते कळतच नाही त्याला… सकाळी जाग येते तेव्हा लक्षात येत की काल तो इथेच झोपून गेला.


हात पाय ताणून एक आळस झटकून तो फ्रेश होण्यासाठी जातो… आणि परत आपल्या केबीनमध्ये येतो… केबिनच्या मोठ्या काचेतून बाहेरची परिस्थिती पाहत असतो… पाऊस बऱ्यापैकी थांबला होता… जमलेले पाणी ओसरत चालले होते…


रेवाही आता निघण्याच्या तयारीत होती… निघण्या आधी कबीरला भेटायला आली…




रेवा : (दार उघडून आत येत) Good morning Sir… Your morning coffee is here…


कबीर : (अजूनही बाहेरच्या वातावरणात मग्न) हममम्


रेवा डेस्कवर कॉफी कप ठेवतच असते तोच तिची नजर कबीरच्या पर्स मधल्या फोटोवर जाते…


रेवा : Ohh my god…. हि तर मधू आहे… सर तुम्ही ओळखता हिला… I am her biggest fan… She’s owsom…


कबीर : (मागे वळून) काय बोलतेस रेवा?? आणि कोणाबद्दल???


रेवा : तुमच्या पर्समध्ये मधूचा फोटो आहे मी त्याबद्दल बोलतेय…


कबीर : (थोडा गंभीर होत) मधू??? (एक नजर रेवावर टाकत) ही तर काया आहे….


रेवा : कोण काया?? I am sure हि मधूच आहे…. Wait I will show you…


अस म्हणून रेवाने आपला मोबाइल काढला आणि Face book application आॅन केल… आणि कबीरला काहीतरी दाखवु लागली…


रेवा : हो… मधूच आहे ही हे काय… बघा ना…


कबीर : (अंधारात आशेची किरण सापडल्याप्रमाणे रेवाच्या हातातला मोबाईल घेतो… आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो… ) काया!!!!….. (नाव घेताना कंठ दाटून आला होता…. डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते)


रेवा : (अजून पुढे सांगू लागली ) सर पंधरा दिवसांनी कॅलिफोर्नियात Art festival आहे …. मधूचा मोठा फॅन क्लब आहे त्यांनीच या इवेंटबद्दल FB वर पोस्ट टाकली आहे… मधूचा स्पेशल शो आहे तिथे… As a guest म्हणून…. काय सुंदर guitar वाजवते ती… Outstanding…. जादू आहे तिच्या बोटांत…. Social media मुळे फार कमी वेळात नावारुपाला आली आहे ती… मी पण तिला फॉलो करते…


कबीर : (तिला बघून मनात विचार करत) हि मधू नाही माझी कायाच आहे… मी येतोय काया …. आता तुला कुठेच जाऊ देणार नाही….


रेवा कबीरला भानावर आणते तस कबीर तिला त्याची तिथे जाण्याची अर्जंट व्यवस्था करायला सांगतो.. त्याप्रमाणे रेवा त्याची फ्लाईटची टिकीट आणि हॉटेल बुकिंग करण्याच्या तयारीला लागते.. ती केबिनमधून बाहेर पडणार तोच कबीर तिला गळ्यात भेटून थँक्स म्हणतो… ती नजरेनेच रिस्पॉन्स देत निघून जाते….


कबीर आज भलताच खुश होतो… त्याच्या पुढे आता कायाच काया त्याला दिसत होती… सगळी तयारी करून कबीर एकदाचा तिथे पोहचला… हॉटेलवर न जाता त्याने आपल सामान ड्रायव्हर मार्फत हॉटेलवर पोचत केल आणि स्वतः डायरेक्ट कँपसमध्ये गेला जिथे काया अर्थात मधूचा म्युझिक गृप असतो….


ब्लू जीन्स, क्रीम कलरचा टी शर्ट, त्यावर ब्राऊन लेदर चा जॅकेट… डोळ्यांवर गॉगल… हातात स्पोर्ट्स वाॅच… पायात गम बुट… एकदम stunning look… कँपसमधल्या मुली तर त्याच्यावरच नजर ठेवून होत्या… पण कबीरची नजर तर कायाला शोधत होती… इतक्यात त्याला guitar ची धून ऐकायला येते….


पहला नशा, पहला खुमार 

नया प्यार हैं नया इंतज़ार 

करलूँ मैं क्या अपना हाल

ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार

तू ही बता


(उड़ता ही फिरूँ इन हवाओं में कहीं

या मैं झूल जाऊँ, इन घटाओं में कहीं ) – २

एक करलूँ आसमान और ज़मीन 

अब यारो क्या करूँ क्या नहीं 

पहला नशा, पहला खुमार …


Guitar ची धून ऐकताच सगळे तिथे जमा व्हायला लागतात. कबीरसुद्धा त्याच दिशेने जातो…कँपसच्या मध्यावर गोल चौथरा असतो… तिथे समोर एका चेअरवर बसून काया guitar वाजवताना त्याला दिसते… तो डोळ्यांवरचा गॉगल काढत तिलाच बघत बसतो… आसपासचे लोक धक्का मारून पुढे जातात तरी तो तिला बघण्यात गुंग असतो… आज कितीतरी महिन्यांनी तो तिला पाहत असतो… तितकीच सुंदर… तितकीच गोड… तितकेच निरागस भाव तिच्या चेहर्‍यावर त्याला दिसतात…


गाण संपताच सगळे टाळ्या वाजवून तीच कौतुक करतात.. आजची तिची प्रॅक्टिस संपलेली असते.. हळूहळू गर्दी ओसरल्यावर कबीर आनंदाच्या भरात तिला “काया” हाक मारत तिच्या समोर उभा रहातो… तिची नी त्याची नजरभेट होते… पण तिच्यासाठी कबीर अनोळखी असतो….. सॉरी…. I am not काया… My name is मधू…. पण कबीर मानायला तयार नसतो त्यामुळे तीचे आसपासचे फ्रेंडस त्याला पकडून दूर करतात… आणि तिथून हटकतात… तो तिच्या नजरेत नजर घालून बघत असतो…. न जाणो त्याच्या नजरेने तिच्या मनात काय भरल… तिने तिच्या फ्रेंडसना त्याला मोकळ सोडण्यास सांगितले आणि ती तिथून निघून जाऊ लागली… कबीर आपल जॅकेट सावरत तिच्या पाठमोर्‍या आकृतीला डोळ्यात साठवत होता….


कबीर हॉटेलवर जाऊन फ्रेश झा़ला आणि बेडवर निवांत पडला…. आपल्या कायाला आठवत… तिचाच विचार करत झोपी गेला… रोज तिला भेटण्यासाठी कँपसमध्ये जात होता… आर्ट फेस्टिवल पुढचे पाच दिवस चालणार होत… काया कडून काहिच रिस्पॉन्स येत नाही म्हणून कबीर थोडा अपसेट असतो… पण मनातील इच्छा शक्ती मजबूत असते… आज फेस्टिवलमध्ये होणार्‍या पेंटिंग स्पर्धेत तो भाग घेतो…


तो पेंटिंग काढत असताना एव्हाना त्याच्या भोवती बरीच गर्दी जमा होते… त्याने कायाला पहिल्या भेटीत जस पाहिल होत… तिच जे सौंदर्य बघून तो घायाळ झाला होता आणि प्रपोज मारताना पण जे पेंटिंग त्याने तिला दाखवल होत… आज परत तेच हुबेहुब उतरवल होत त्याने… कायाच पेंटिंग बघून तिचे चाहते आणखी गोळा झाले… गर्दी आणि लोकांना आकर्षित होताना बघून तीही उत्सुकतेने तिथे गेली… पेंटींग बघून ती आवासून उभी राहिली… कबीरला वाटल निदान हि पेंटिंग बघून तरी ती चलबिचल होईल पण नाही… कायाने अर्थात मधूने पेंटिंगच कौतुक करत त्याला मिठी मारली आणि तिथून निघून तिच्या फँनस् च्या घोळक्यात बिझी झाली….. पण तिने मारलेल्या मिठीने कबीर शहारून गेला.. पण ज्यासाठी येवढ केल तिला त्यातल काहीच कळल नाही… तरीही तिच्या थोडथोडक्या प्रतिसादामुळे त्याला थोडा का होईना पण आनंद मिळत होता… तिला घोळक्यात बघताना त्याच्या मनात एक गाण वाजत होत आणि तो त्या गर्दीत तिलाच न्याहाळत होता…


जिसे ज़िन्दगी ढूंढ रही है…क्या ये वो मक़ाम मेरा है..

यहाँ चैन से बस रुक जाऊं

क्यूं दिल ये मुझे कहता है

जज़्बात नये से मिले हैं

जाने क्या असर ये हुआ है

इक आस मिली फिर मुझको

जो क़ुबूल किसी ने किया है


किसी शायर की ग़ज़ल

जो दे रूह को सुकूं के पल

कोई मुझको यूँ मिला है

जैसे बंजारे को घर

नए मौसम की सहर

या सर्द में दोपहर

कोई मुझको यूँ मिला है

जैसे बंजारे को घर




संध्याकाळ झाली होती… कबीर कँपसच्या बाहेर गार्डनला लागुन असलेल्या एका बेंचवर बसला होता… समोर मोकळा रस्ता… त्या दिवसाचा इवेंट संपल्यामुळे रस्त्यावर रहदारी कमी होती.. मावळतीला येणाऱ्या सूर्याचा तांबडा प्रकाश…. मोकळ आभाळ आणि गार अशी मंद हवेची झुळूक मनाला तजेला देत होती… कबीर बेंचवर बसून आपल्या पर्स मधल्या कायाच्या फोटोला न्याहाळत होता… त्याची मान खाली झुकलेली होती… अचानक गार वारा सुटला… तो बसला होता त्या बेंच शेजारी मोठ झाड होत… लाल, पिवळ्या फुलांनी बहरलेल… वाऱ्याच्या लहरींचा स्पर्श होताच त्याची फुल गळुन पडत…


कबीरला कोणीतरी आपल्या जवळ असल्याचा भास झाला त्याने बाजूला पाहिल तर शेजारी काया बसली होती.. त्याची तिची नजरभेट होताच गोड हसली ती…


काया : Hiiii (हलकेच हात हलवून)


कबीर : Hiii…( जीव तुटत होता त्याचा कारण आपलीच व्यक्ती अनोळखी असल्याप्रमाणे ओळख देत होती)


काया : Nice painting… ( बोलायला सुरुवात करावी म्हणून )


कबीर : Thanks (हलकेच हसून)


थोड्यावेळ कोणीच काही बोलत नाही… तिला अस जवळ बघून मन भरुन आलं होतं… वाटत होतं की तिला आत्ता आपल्या मिठीत घ्याव आणि मन मोकळं करावं…


काया : Friends??? (काहीसा विचार करून)


कबीर : (हलकेच हसून) हममम् ( आपले अश्रूंना आवरत घालत)


काया : (हात मिळवणी करत) That’s good… I am मधू..


कबीर : कबीर… (स्वतःची नव्याने ओळख करून देत)


काया : कॉफी??? माझ्या घरी…. तुझी हरकत नसेल तर …


कबीर : (तेच तर हव होत त्याला हे confirm करण्यासाठी की कायाच आहे…. मनाला आवर घालत अतिशय नॉर्मल) Are you sure?? I mean तुझ्या घरी अस अनोळखी व्यक्तीने येण???


काया : No problem…


दोघेही एकत्र उठले… तिने आपली guitar आपल्या पाठीवर चढवली आणि पाउल पुढे टाकणार तोच ती अडखळली आणि तिचा तोल गेला… कबीरच्या हे लक्षात येताच त्याने तिला सावरल…. तिचा हात त्याच्या हातात होता दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले…. गार वाऱ्याने त्या मोहरलेल्या वृक्षाला गदागदा हलवले आणि आपल्या फुलांचा वर्षाव करायला भाग पाडले… तांबडा पिवळा प्रकाश… दोन जीवांची भेट आणि वरून होणारा फुलांचा वर्षाव छान सांगड घातली होती आज निसर्गाने….


काही वेळाने भानावर येऊन दोघेही तिथुन निघाले… घरी पोहचल्यावर तिने तिच्याकडच्या चावीने दार उघडले… समोरच तिचे बाबा अर्थात मधूचे बाबा पेपर वाचत बसले होते…


मधू : Hiii Dad….


बाबा : Hii… बेटा…


मधू : (ओळख करुन देत) कबीर… meet my Dad… And Dad his कबीर…


बाबा : Hello… Please be seated…


मधू : (कँपसमधून कबीरने काढलेल पेंटिंग दाखवत) हे बघा… Nice na … कबीरने काढल…


बाबा : (आश्चर्य करत) वाहह!!! Beautiful….


कबीर त्यांना थँक्यू म्हणत तिच घर बघत असतो… मधू त्यांना तिथेच सोडून आत जरा फ्रेश होण्यासाठी निघून जाते… इथल्या तिथल्या गप्पा झाल्यावर काही वेळाने डोअर बेल वाजते… मधू जाऊन दार उघडते… आणि दारात आलेल्या व्यक्तीला आत घेऊन येते…


मधू : Look Dad… Who’s here??? (सोबतच कबीरलाही ओळख करून देत) कबीर… Meet my husband दिपक…


दिपकला इथे बघून कबीरला आश्चर्याचा धक्काच बसला आणि मधूने करून दिलेल्या ओळखीनंतर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते…. दिपकही कबीरला बघून दोन मिनिटे शांतच होतो…


दिपक : मधू!!! कॉफी आणशिल please…


मधू : sure…, कबीर!!! One more coffee for you ??


कबीर : हो…. (रागातच दिपकवर नजर टाकत)


दिपक कबीरला बाहेर बाल्कनीत घेऊन जातो….


कबीर : (अतिशय रागात) दिपक!! ! तु इथे??? आणि कायाचा husband ???? काय आहे हे सगळं….


दिपक : (हसून) ती accident च्या आधी तुझी काया होती आणि आता ती माझी मधू आहे… (दिपक आज वेगळाच वागत होता) त्या दिवशी तु दुबईला रवाना झाल्यावर मी कायाला तुझ खर रुप सांगितल तेव्हा ती रागातच गाडी घेऊन तुला जाब विचारायला निघाली आणि रस्त्यात तिची डॉक्टरच्या गाडीला धडक लागली… डॉक्टर म्हणजे मधूचे बाबा…. गाडी ब्रीजवर अडकून पडली होती… डॉक्टरांनी तिला गाडीतून बाहेर काढले आणि गाडी नदीत कोसळली… कायाच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे तिची स्मृती हरवली… ओपरेशन नंतरही तिला काहिच आठवत नव्हते… त्या अपघातात डॉक्टरांची एकुलती एक मुलगी मधू गेली… कायाची कोणतीच ओळख पटत नसल्याने त्यांनी तिला मधू नाव दिले आणि ते इथे आले… डॉक्टर एका पेशंटच्या ओपरेशनसाठी भारतात आले होते परतीच्या वेळेवर त्यांची मुलगी गाडी चालवत होती.. गाडीवरच नियंत्रण सुटून कायाच्या गाडीला धडक बसली… त्यांच स्वतःच हॉस्पिटल असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले नाही…


सहा महिन्याआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला तीची माहिती मिळाली… मी तडक इथे निघून आलो… इथे आल्यावर कळल कि तिला तर काहिच आठवत नाही…. (आणि हसायला लागला)


कबीर : पण तुला अस वागायची काय गरज होती…???


दिपक : Relax कबीर… मला काया आधीपासूनच पसंत होती… मी दादाला सांगून तिला लग्नाची मागणी पण घातली… पण तिने मला झिडकारला… नेहाने जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा मी त्या गोष्टीचा फायदा घेत तुला तिच्या भावाच खोट नाव सांगितल… आणि तुला नेहाला झालेल्या त्रासाचा सुड घेण्यासाठी उत्तेजित केल… मला माहीत होतं तु तुझ्या दी साठी काहीही करू शकतोस… मी त्याचाच फायदा घेतला… पण तु तर खरोखरच तिच्या प्रेमात पडलास आणि माझा प्लान फसला…. म्हणून मीच तिला हा तुझा प्लान होता अस सांगितल… तुझ्यावर प्रेम केल्याचा खूप राग आला तिला… खूप त्रास झाला बिचारीला हे सगळं ऐकून आणि मला बर वाटल तिला अस तडफडताना बघून….


कबीरला दिपकच्या खोटेपणाचा आणि अशा विक्षिप्त विचारांचा खूप राग आला… त्याने दिपकची कॉलर पकडली आणि….. मधू आली कॉफी घेऊन… तिला बघताच कबीर गप्प बसला….


मधू :(त्या दोघांना अस बघून… तिला जाणवलं की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालय) Hey guys any problem??? काय झालं आहे कबीर तु दिपकची कॉलर का पकडली… Are you guys fighting….????


दिपक : हो अग… (मधूचा काळजीत पडलेला चेहरा बघून) अग मधू कबीर माझा फ्रेंड आहे आपल लग्न झालं तेव्हा तो इथे नव्हता ना म्हणुन रागावलाय… बस इतकच….


मधू : ओहहहह…. म्हणजे याला आपली लव्हस्टोरी नक्कीच माहित असणार…. कबीर सांगशील ना मला??


कायाच्या या बोलण्यावर कबीरला काहिच सुचेनासे झाले… त्याला आता हे असह्य झाल होत… दिपक कायाच्या अती जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता.. पण कायाने स्वतःला त्याच्यापासून दूरच ठेवल होत… कबीरला तिथे थांबण मुश्किल झाल होत… मनाचा आवंढा गिळत तो तिथुन निघाला…. तिच्या घरापासून दूर थोड्या निर्जन स्थळी आल्यावर त्याच्या मनाचा बांध फुटला आणि ढसाढसा रडू लागला…..



कैसे बताये क्यूँ तुझको चाहे, यारा बता न पाएं

बातें दिलों की, देखो जो बाकी, आँखें तुझे समझाए

तू जाने ना…

मिलके भी हम न मिले तुमसे न जाने क्यूँ

मीलों के है फासले तुमसे न जाने क्यूँ

अनजाने है सिलसिले तुमसे न जाने क्यूँ

सपने है पलकों तले तुमसे न जाने क्यूँ


निगाहों में देखो मेरी जो है बस गया

वो है मिलाता तुमसे हुबहू

जाने तेरी आँखें थी या बातें थी वजह

हुए तुम जो दिल की आरजू

तुम पास हो के भी

तुम आस हो के भी

एहसास हो के भी अपने नहीं

ऐसे हैं हमको गिले तुमसे न जाने क्यूँ

मीलों के है फासले…



कबीर हॉटेलवर न जाता तिथेच एका बेंचवर बसून असतो… थोड्यावेळाने हॉटेलवर निघून जातो…. दिड दोन तासानंतर त्याच्या मोबाइलवर मेसेज येतो.. त्याला अशीही झोप लागत नसते… तो फोन चेक करतो….. कायाचा मेसेज असतो… तो खूश होतो….


“Hiiiii Kabir… Can you join me tomorrow for festival… Deepak doesn’t like this type of festival… Is it possible to you… ”


कबीर लगेचच Yess म्हणून मेसेज पाठवून देतो…. कबीर ठरवतो की कायाला नव्याने आपल्या प्रेमात पाडायच आणि दिपकपासून तिची सुटका करायची…..


सकाळी लवकर उठून मस्तपैकी तयार होऊन कबीर मधूच्या घराबाहेर उभा असतो… काया येताच त्याची नजर तिच्यावरच स्थिरावते…. रेड कलरचा शॉर्ट वन पीस गाऊन.. त्यावर डेनीमच जॅकेट… केस वनसाइड पीनप करुन डाव्या बाजूला रोल करून मोकळे सोडलेले… कानात स्टडस… हातात नाजूक ब्रेसलेट, पायात ब्लॅक शूज…. आणि पाठिवर guitar…..


तिने निघूया का?? अस विचारताच कबीर भानावर येतो… ते दोघेही इवेंटच्या ठिकाणी पोहचतात.. इवेंट संपल्यावर तिला एका स्टुडिओत जायच होत… तो स्टुडिओ इवेंट ग्राउंडपासून तीन तासाच्या अंतरावर होत… त्यांनी ट्रेन ने जाण सोईस्कर समजून ते निघाले… वाटेत दोघांच्या छान गप्पा रंगल्या… ट्रेनमधे गर्दी जरी नसली तरी बसायला जागा नव्हती ते उभ्यानेच प्रवास करत होते… एका स्टॉपवर काही चार पाच मुले ट्रेनमधे चढली… थोडी टपोरीच होती ती मुल… कायाला बघून ते मुद्दाम तिच्याच बाजूला येऊन उभे राहिले… मुद्दाम तिला स्पर्श करू लागले… कबीर त्यांना काही बोलणार तर कायाने त्याला अडवले… ते चार पाच जण आणि तु एकटा आहेस… नको पंगा घेउ अस सांगत कबीरला अडवल… पण त्या मुलांचा आगाऊपणा चालूच होता… कबीर आणि काया थोडे मागे सरकले… रेल्वे डब्याला चिटकून उभे होते… आता आणखी मागे कुठे जाणार पण ती मुल अजूनच अंगावर येत होते… आता कबीर कायाच्या समोर उभा राहिला आपले हात त्या रेल्वे डब्याच्या भिंतीला टेकवून तेही कायाला अजिबात स्पर्श न करता… आणि त्याने नजरेनेच कायाला धीर दिला… पण ती आगाऊ मुले आता कबीरला धक्का मारू बघत होते.. ते चौघ एकत्र कबीरला टेकून होते.. आणि टिंगलटवाळी करत नुसते मस्ती करत होते.. त्यांच वजन कबीरने पाठीवर झेलल.. त्यामुळे तो कायाच्या खूप जवळ आला होता इतका की त्या दोघांचे ओठ आता एकमेकांवर टेकणारच होते पण कबीर पूर्ण तोल सांभाळून होता… कायाच अंग भितीने थरथरायला लागल होत… इतक्यात त्या मुलांच स्टेशन आलं आणि ते उतरले…


कबीर आणि कायाने सुटकेचा निःश्वास सोडला..कबीरचं तिला अस प्रोटेक्ट करण तिला खूप भाळल… नकळत झालेल्या त्याच्या स्पर्शाने तिला शहारून आल होत… थोड्यावेळ कोणीच कोणाशी बोलत नव्हत… संध्याकाळ होऊन गेली होती… वातावरणात बऱ्यापैकी गारवा जाणवत होता… बाहेर बर्फ पडायला लागला होता… त्यांच स्टेशन येताच ते उतरले… स्टेशनपासून चालत जाण्याइतपत ते स्टुडिओ जवळ होत… तिथे पोहचल्यावर स्टुडिओत त्यांचे दोन तास गेले….. बाहेर येऊन बघतात तर सगळीकडे बर्फ जमा झालेला असतो… थंडीपण खूप पडलेली असते…. कायाला परत स्टुडिओच्या वेटींग रुममध्ये बसवून तो बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडतो… काया आपली हातांवर हात चोळत बसून असते…. असा अचानक पाऊस येइल याचा अंदाज दोघांना पण नसतो. ..


थोड्यावेळाने कबीर परत येतो… तोही बराच गारठलेला असतो…. त्याच्या लेदर जॅकेटमुळे थोडा का होईना पण जरा कमी थंडी जाणवत होती…


कबीर : अती बर्फ पडल्याने बाहेर वाहतुक बंद आहे… परीस्थिती नॉर्मल होईपर्यंत इथेच थांबाव लागेल…


काया : (हातावर हात घासत ) इथे??? No ways…. कुल्फी जमा होईल आपली….


कबीर : बघतो काय करता येईल ते… (विचार करून)


तेवढ्यात त्याची नजर त्या पारदर्शक काचेतून दिसणाऱ्या समोरच्या हॉटेलवर जाते… पण ती काय म्हणेल या विचाराने तो गप्प बसतो… काया त्या स्टुडिओतल्या रिसेप्शनला इथे जवळपास कुठे हॉटेल आहे का विचारून येते… रिसेप्शन सुद्धा तिला समोरच हॉटेल सुचवते… कबीर आधी नाही म्हणतो पण नंतर पर्याय नसल्याने तयार होतो… दोघेही त्या हॉटेलवर जातात…


आत प्रवेश करताच मोठी लॉबी असते… उजव्या बाजूला भल मोठ रिसेप्शन…. प्रशस्त अस हॉटेल असत.. कबीर रिसेप्शनवर चौकशी करून येतो… तिथे एकच रूम शिल्लक असते… कबीर कायाला सांगतो… काहिच ओपशन नसल्याने ते दोघ एकच रूम बुक करतात… कायाला आता खूप अॉकवड फील होत की एकाच रूममध्ये दोघ कसे राहणार? पण आता काय करणार… नाइलाज होता… कबीर म्हणाला देखील कायाला की मधू तु जा मी इथेच थांबेन… पण मधूला ते योग्य वाटले नाही ती त्याला सोबत घेऊन गेली…


दुसऱ्या मजल्यावर त्यांची रूम असते… दोघेही आत जातात… थंडीमुळे काया थरथर कापत होती…. रूममध्ये शेकोटीसाठी चिमणीची सोय होती… सर्वंटने त्यांना शेकोटी पेटवून दिली.. काया पटकन जाऊन शेकोटीजवळ बसली… कबीरने जेवणाची अॉर्डर देऊन ठेवली होती आणि जेवण रूमवरतीच मागवल… कायाने पायातले शूज काढले आणि शेकोटीची ऊब घेऊ लागली… कबीर लांबूनच तिला बघत होता…


थोड्याच वेळात रूम सर्वंट जेवण घेऊन आला… दोघेही छान गप्पा मारत जेवण करत होते…


मधू : कबीर... तु दिपकचा खास मित्र ना???


कबीर : (घास तोंडात घेत )हममम…


मधू : मग आमची love story सांग ना…. तुला तर नक्कीच माहित असेल… (अगदीच सहज)


हे ऐकून कबीरचा घास घशातच अडकतो… त्याला जोरात ठसका लागतो… मधू त्याला पटकन पाणी पाजते आणि त्याची पाठ चोळते…ठसका थांबल्यावर लक्षात येत की नकळत मधू बरीच जवळ होती कबीरच्या त्याला खूप बर वाटल… मन करत होत की आता तीला आपल्या कुशीत घेऊ आणि घट्ट मिठीत धरून ठेउ… पण कबीरच्या डोळ्यात चटकन पाणी आले… त्याने अश्रू लपवत जेवणावर लक्ष केंद्रीत केल… जेवण झाल्यावर मधू बेडवर जाऊन झोपते….


तिला गार झोप लागलेली बघून कबीरने बेडवरच ब्लँकेट तिच्या अंगावर ओढले आणि स्वतः बाजूच्या सोफ्यावर जाऊन तिला एकटक बघत झोपी गेला…


सकाळी मधूला जाग आली तेव्हा तिने पाहिल कबीर नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता… त्याने मधूकडे पाहिल तस ती झोपेच नाटक करू लागली… तिने परत ब्लँकेटच्या आडून त्याच्याकडे पाहिल…. जीम करून कमावले पिळदार शरीर… त्याचे ते मसल्स….तिची तर नजरच हटत नव्हती त्याच्यावरून… कबीरने अंगावर शर्ट चढवला आणि तो रूमच्या बाहेर निघून गेला… ती उठून फ्रेश होण्यासाठी निघून जाते…


अंघोळ करताना ती कबीरचाच विचार करत असते… कि कसे आपण रात्रभर एकाच रुममध्ये होतो… पण कबीरने त्याचा गैरफायदा घेतला नाही… उलट आपली काळजीच घेतली.. ट्रेनमधे पण त्याने आपल्याला कस प्रोटेक्ट केल…. त्या विचारांच्या तंद्रीत ती फक्त टॉवेल अंगाभोवती लपेटून बाथरूम मधून बाहेर आली.. इतक्यात कबीरने बाहेरुन दार उघडून आत प्रवेश केला… मधू त्याला बघताच दचकली आणि पाठी फिरली…. कबीरही तिला या अवस्थेत बघून नजर फिरवून मागे वळला आणि तसाच सॉरी बोलून रूमच्या बाहेर पडला…. मधूला खूप अवघडल्यासारखे झाले…आणि कबीरबद्दल हसूही आले….


कबीरने यावेळेस प्रायव्हेट कॅब बुक केली… मगाजच्या प्रसंगानंतर कोणीच कोणाशी बोलत नव्हते… कबीर थोडा खुश होता कारण कालचा संपूर्ण दिवस आणि रात्र काया त्याच्या सोबत होती….


तीन चार तासांचा प्रवास करून ते घरी पोहचले… कबीरही हॉटेलवर निघून गेला… इथे घरी आल्यावर तीने आपल्या बाबांना कबीरच्या वागणुकीबद्दल सांगितले… तिला दिपकपेक्षा कबीरची ओढ जास्त वाटते हेही सांगितले….


-------------------------------------------------------------------------


रात्री उशीरा दिपक आणि मधू मुव्ही बघायला जातात… मुव्ही बघायला लागल्यावर काहीवेळाने दिपक तिची जवळीक साधायला बघतो… तिला किस करायला जातो पण मधूला हे सहन होत नाही आणि ती बाहेर निघून येते.. .. तिच्या मागोमाग दिपकही बाहेर येतो… आणि त्यांचे कडाक्याचे भांडण होते… दिपकने जरी त्याची ओळख तिला तिचा नवरा म्हणून केली असली तरी मधूने त्याला अजूनही स्विकारलेल नव्हतं… तिने आजपर्यंत त्याला जवळीक साधू दिलेली नसते… त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडण होत असे… आजही तो भांडणानंतर तिला तिथेच एकटीला सोडून निघून गेला….



मधूला काहिच सुचत नव्हते… तिला तर रडूच आले होते…. इतक्यात तिच्या मोबाईलवर कबीरचा Hiiii म्हणून मेसेज आला…. तिला जरा हायसे वाटले…. तिने पटकन कबीरला फोन करून दिपक आणि तिच्या भांडणाबद्दल सांगितले आणि ती तिथे एवढ्या रात्री एकटीच उभी असल्याचेही सांगितले.. तिचा रडवेला आवाज ऐकुन कबीरने मी तिथे येतो तु थांब तिथे आणि घाबरू नको असे सांगितले… कबीरला तिथे पोहचायला वीस मिनिटे लागणार होती…. तिला तिथेच बाहेर न थांबता मुव्ही बघत टाईमपास करण्यास सांगितले… आणि मी लवकरात लवकर पोहचतो असे आश्वासन देऊन तो हॉटेलवरून निघाला….



कबीर कॅब घेऊन पोहचतो… कबीरला पोहचायला दहा मिनिटे उशिर झाला होता… तिथे पोहचल्यावर तो मधूला फोन करतो… पण तिचा फोन बंद येतो… तो संपूर्ण ठिकाणी तिला शोधतो… पण ती तिथे नसते… परत बाहेर येऊन बघतो…. तर ती बाहेर एका बेंचवर बसलेली होती.. कबीर धावतच तिथे गेला आणि तिच्या समोर उभा राहिला… आपल्या गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून धापा टाकत होता… तिला बघताच क्षणी त्याच्या जिवात जीव आला….


कबीर : (थोड रागातच) Have you gone mad?? तुला आतच बसून रहा सांगितलं होतं ना?? मग इथे का बसलीस ?? तुला काही झालं असत तर??


मधू : (तीही रागातच आहे) yess I am mad… आणि मला काही झालं असतं तर दिपकला फरक पडायला हवा… तुला काय फरक पडतो??


कबीर : (तिला हळूवार समजावत) हे बघ काया मला तस म्हणायच नव्हत…


मधू : काया??? (प्रश्नार्थक मुद्रेने) येवढ्या मध्यरात्री दिपक मला असाच इथे रागात सोडून गेला आणि तु!!! …., तुला एक हाक दिली तर तर तु धावत आलास…… माझ्यासाठी….., त्यादिवशी ट्रेनमध्ये मला प्रोटेक्ट केलस अंगावर लोड येऊनही साधा मला स्पर्श होऊ नये म्हणून किती दक्षता घेत होतास…. त्या रात्री होटेल मध्ये मी तुला एक प्रश्न विचारला तर त्याच उत्तर तु टाळलस… तुला ठसका लागला तेव्हा नकळत मी तुझ्या काळजीने व्याकुळ होऊन तुझी पाठ थोपटली… त्यावेळी झालेल्या तुझ्या स्पर्शाने मी मोहरून गेले… “दिपक”…. जो स्वतःला माझा नवरा म्हणवतो त्याच्या सोबत असूनही का मला ती ओढ जाणवत नाही जी तुझ्या सोबत असल्याने जाणवते….


कबीर : (अजूनही समजावण्याच्या प्रयत्नात) हे बघ मधू… आता शांत हो… आपण बोलू नंतर…


मधू : काय बोलू नंतर कबीर??? आत्ता का नाही???? ज्याला माझी काळजी असायला हवी तो मला इथे सोडून जातो… आणि तु इथे माझी काळजी करत येतोस… तु का आलास कबीर???? का कबीर का??? बोल ना कबीर?? का तुला नी मला एकमेकांची ओढ जाणवतेय??? बोल ना कबीर बोल?? (त्याच्या शर्टाला धरून रडत रडत विचारते)


कबीर : (तिच्या प्रश्नांचा भडीमार असह्य झाल्याने) Because I love you dammit…. I love you so much….. (तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन, पाणावलेल्या डोळ्यांनी मनावरचा संयम सुटल्याने)


मधू त्याच्या डोळ्यांत एकटक पाहत बसते… त्याचे पाणावलेले डोळे खूप काही सांगून जातात… मधूही रडतच असते….तिच्या डोळ्याच्या किनारातून अश्रूंची धार ओघळते ….


कबीर तसाच आपल्या हाताने तिचा चेहरा अजून आपल्या जवळ घेतो… दोघांच्याही हृदयाचे ठोके वाढतात… पोटात फुलपाखरू उडायला लागतात, श्वासांत श्वास मिसळले आणि दोघांचेही ओठ एकमेकांच्या ओठांवर टेकले… मधू काहीच प्रतिसाद देत नव्हती… पण आज कबीर थांबणार नव्हता… तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि स्वतःच्या मनाची घालमेल आज त्याला सोडवायचीच होती… तो तसाच आपले ओठ तिच्या ओठांवर क्रश करत होता… आता तिचाही संयम तुटला होता… भावनांचा बांध मोकळा झाला होता… आणि तिही त्याच्यात हरवून गेली होती……


हो हो…. 

सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची

वाट हळवी वेचताना सावर रे मना

सावर रे

सावर रे

सावर रे एकदा

सावर रे

सावल्या क्षणांचे भरून आल्या घनांचे

थेंब ओले झेलताना सावर रे मना

सावर रे

सावर रे

सावर रे एकदा

सावर रे

भान उरले ना जगाचे ना स्वतःचे

सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे

फितूर झाले रात दिन तू सावर रे

सावर रे मना

सावर रे

सावर रे एकदा

सावर रे

मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे

पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे

मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे

पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे

येतील आता आपुले ॠतू

बघ स्वप्न हेच खरे

पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्याचे

पानगळ ही सोसताना सावर रे मना

सावर रे मना

सावर रे

सावर रे एकदा

सावर रे

सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची

वाट हळवी वेचताना सावर रे…..


काही वेळाने दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली…त्यांच्या हृदयाचे ठोके आता एकाच वेगाने धडधडत होते….. दोघांनीही एकमेकांच्या नजरेत पाहिले….कबीरने कायाचा चेहरा परत आपल्या हातात घेतला आणि तो वेड्यासारखा तिच्या चेहर्‍यावर किस करू लागला….


कबीर : I love you … I love you… I love you so much काया…. I love you…


मधू : (काया हे नाव ऐकून तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले) काया??? कोण आहे मी कबीर??? तुझी काया की दिपकची मधू??? (अश्रूंनी डोळे भरलेले….. घसा एव्हाना कोरडा पडला होता) हे द्विधा आयुष्य मला नाही जगायच कबीर…. मला माझी खरी ओळख हवी आहे कबीर………. I want my life back कबीर…. I want my life back ….. (ती जिवाच्या आकांताने रडून रडून विचारत होती)


कबीर स्तब्ध होऊन जातो…. त्यालाही आता रडू येत होत… मधू आपल्याच आयुष्याने आपल्या सोबत खेळलेल्या खेळीला वैतागून रडत होती…. कबीर निरुत्तर राहून तिथेच बेंचवर आपल्या हाताच्या ओंजळीत आपल तोंड धरून रडत बसतो…. मधू सगळं असह्य झाल्याने रडतच पळत सुटते….कबीरच्या लक्षात येताच तो तिच्या मागे जातच असतो इतक्यात भरधाव गडीने मधूला धडक दिली…. तिच्या डोक्याला जबर मार लागला… गाडी तर पुढे निघून गेली आणि त्या निर्जन रस्त्यावर कबीर मदतीची भीक शोधू लागला…. तो वेड्यासारखा मदतीची हाक मारत होता…


इतक्यात समोरून येणार्‍या गाडीला थांबवून कबीरने मदतीची विनंती केली… नशीबाने ते लोक मदतीला तयार झाले… कबीरने मधूला उचलून गाडीत घेतली.. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होत… त्याने आपल्या हाताने तीच डोक दाबून धरल…. वाहणार रक्त प्रवाह थोडा कमी होत होता… त्यांनी जवळच्याच हॉस्पिटल मध्ये तिला नेले आणि डॉक्टरांनी ताबडतोब उपचाराला सुरूवात केली… कबीरने तिथून निघतानाच मधूच्या वडिलांना फोन करून परिस्थिती सांगितली होती… तेही तिथे हजर झाले… त्यांच्या येण्याने डॉक्टरांना कायाच्या केसमध्ये मदत झाली….


कायाला operation theater मध्ये नेले… कबीर रागाच्या भरात भिंतीवर आपल्या हाताचे मुठ्ठी मारू लागला…खुपच काळजीत पडला होता सारखा स्वतःलाच दोष देत होता… मी हे काय केलं…. मी स्वतःवर संयम ठेवायला हवा होता… काया…. काया…. Ohh god please…. (अजूनही आपले हात भिंतीवर आपटत होता )


पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे 

उठला हा जाळ आतून करपल रान रे 

उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान 

डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान


दूर दूर चालली आज माझी सावली………२ 

कशी सांज हि उरी गोठली 

उरलो हरलो दुखः झाले सोबती ………….२


काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला

मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला 

मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा 

रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा 

आपुलाच तो रस्ता जुना…….२ मी एकटा चालू किती

उरलो हरलो दुखः झाले सोबती ………….२


कबीरला खूपच एकट पडल्यासारखे वाटते… तो नेहा आणि राजेशलाही बोलावून घेतो…


इथे सहा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर डॉक्टरांना कायाला वाचवण्यात यश येते.. डॉक्टर operation theater बाहेर येताच कायाची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगतात पण ती शुद्धीवर आल्यावर खरी परिस्थिती कळेल…. कबीर डॉक्टरांचे हात धरून त्यांचे आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी आभार मानतो… डॉक्टर कबीरच्या पाठीवर हात थोपटतात आणि निघून जातात… थोड्यावेळाने कायाला operation theater मधून special ward ला शिफ्ट करतात…


कबीर दार उघडून आत जातो… ती निपचित पडून असते…. कबीर बेड शेजारी बसून कायाचा हात हातात घेतो… तिचा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडून आपल्या ओठांना टेकवून परत रडायला लागतो…


नेहा आणि राजेश दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलला पोहचतात… सोबत रेवाही येते… काया अजूनही शुद्धीवर आलेली नसते… सगळी हकीकत कळल्यावर राजेश आणि नेहा कबीरला धीर देतात… मागोमाग दिपकही तिथे पोहचतो… त्याला बघताच कबीर पेटून उठतो…. पण त्या आधीच तो कबीर आणि बाकी सर्वांची माफी मागतो… पण कबीर काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतो… राजेश आणि रेवा कसबस त्या दोघांना वेगळ करतात आणि दिपकला तिथून निघून जाण्यास सांगतात…


सगळं शांत झाल्यावर नेहा कबीरला हॉटेलवर जाऊन आराम करण्यास सांगते… पण कबीर तिथून जाण्यास तयार नसतो… त्याला कायाची खूपच काळजी वाटत असते… तो बाहेरच बसून काया शुद्धीवर येण्याची वाट पहात असतो…



रात्री उशिराने काया शुद्धीवर येते त्यावेळेस नेहा तिच्या बाजुला बसून असते… नेहा ताबडतोब डॉक्टरांना बोलावते… लगेच डॉक्टरांची टीम येऊन तीची तपासणी करतात… अजूनही गुंगी पूर्ण उतरलेली नसते…ती परत झोपी जाते नेहा आणि राजेश तिथेच उभे असतात…. रेवा कबीर सोबत बाहेर उभी असते… डॉक्टरांनी मुद्दाम कबीरला कायाच्या नजरेपासून दूर राहण्यास सांगितले….


सकाळी लवकरच कबीर छानपैकी तयार होऊन फूलांचा गुच्छ घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो… काया आता पूर्ण शुद्धीवर होती…राजेश सोबत बोलत होती… तिला आता सर्वकाही आठवत होतं… कबीर तिला दाराच्या काचेतून मन भरून पाहत होता… मागून रेवाही फूलं घेऊन आली… रेवा येताच त्याने आपले अश्रू सावरले आणि हिंमत एकवटून आत शिरला…


कबीर : (गुच्छ पुढे करत) कशी आहेस???


काया : (रागात) कोण तू??? आणि इथे का आलास??? दिला तेवढा त्रास पूरे नाही झाला का??


कबीर : (त्याला काहिच कळत नव्हते) काया!!! Please माझ ऐकून घे… मी काही नाही केल ग… Please एकदा ऐकून घे माझं….


काया : मला तुझ काही एक ऐकायच नाहीए… तू जा इथुन…. मला खूप त्रास होतोय…


इतक्यात डॉक्टर आत येतात… राजेश आणि रेवा कबीरला बाहेर घेऊन येतात… थोड्यावेळाने डॉक्टर बाहेर येऊन कबीरला खूप ओरडतात… कबीर!!! तुला आम्ही कालच काया पासुन दूर राहण्यास सांगितले कारण तिच्या डोक्यावर जास्त ताण पडता कामा नये… आता जे ती चिडली, रागावली हे तिच्या तब्बेतीला घातक आहे… Please try to understand… इतक समजावून ते निघून जातात…


कबीर हतबल होऊन बसून राहतो… रेवा त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते पण तो तिथुन निघून जातो….




कसा सांग उरातला घाव विसरावा

वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा


कशापाई जडवावा

गुंतवावा सोडवावा

कितीदा नि कुणासाठी

आसवात भिजवावा

जीव हा… सांग ना


कसा सांग उरातला घाव विसरावा

वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा


सैरभैर झालं मन

हरपल देह भान

उरात घाव सलतो

नाही तोल काळजाला

कसं समजावू त्याला

तुझ्यात गुरफटतो

जीव हा… सांग ना… सांग ना…


कबीर रोज कायाला दाराच्या काचेतून न्याहाळत असतो… आठवड्याभराने कायाला डिस्चार्ज देण्यात येतो… सगळे परत मुंबईला रवाना होतात… इथे आल्यावर कबीर परत कायाला भेटण्याचा प्रयत्न करतो… पण यावेळेस राजेश त्याला अडवतो….


राजेश : कबीर कायाला नाही भेटायच तुला…


कबीर : ती माझी बायको आहे राजेश…. मी मनवीन तिला… Please मला भेटू देत…


राजेश : विसरतोयस तु कबीर… खोटे रजिस्टर पेपर बनवले होते तु… याचा अर्थ ती तुझी बायको नाही…


कबीर : (विनवणी करत) पण राजेश तुला खर माहित आहे ना कि मी तिच्यावर किती प्रेम करतो…


राजेश : हात जोडतो तुझ्या पुढे… Please leave her… नको त्रास देऊस आता…. जा इथून… तुझ्यामुळे परत तीच बरेवाईट झालेल मला नाही बघवणार….


कबीर निराश होऊन तिथून निघून जातो… घरी आल्यावर आई त्याला कायाचा नाद सोडून द्यायला सांगते आणि मी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करून नवीन आयुष्याला सुरूवात करण्यास सांगते… पण कबीर मानायला तयार नसतो… मघ नेहा समजावते आणि रेवा त्याला खूप लाइक करते आणि तिच खूप प्रेम आहे तुझ्यावर अस सांगते… रेवा तिथेच समोर उभी असते… कबीर तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण रेवा काहीच ऐकून घेत नाही उलट मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय अस सांगून कबीरला द्विधा मनस्थितीत टाकते… शिवाय कायाने स्वखुशीने दिपक सोबत लग्नाला होकार दिल्याचे नेहाने सांगताच तो आतून चूर चूर होउन जातो…. अखेर हिच आपल्या चुकीची शिक्षा समजून तो रेवासोबत लग्नाला तयार होतो….


दहा दिवसांनंतर कबीर आणि रेवाच्या लग्नाचा दिवस उजाडतो… रेवा खूप खुश असते…. लग्न रेवाच्या म्हणजे गुज्जू पद्धतीने करायच ठरल होत…सगळी तयारी झालेली होती… कबीर छान शेरवानी घालून तयार बसला होता अगदी एखाद्या राजकुमारा प्रमाणे भासत होता आणि ती…. गडद जांभळ्या रंगाचा घागरा चोली त्यावर हिर्यांच नक्षीदार वर्क…. त्याला साजेसा घुंगट छान डुल असलेला…. चेहरा अर्धा झाकलेला… ज्यातून फक्त तिचे अर्धे गाल आणि लाल रंगात भिजलेले ओठच दिसत होते… हातात तो गुजराती स्टाईल चुडा… अगदी राजवाड्यातील राणीप्रमाणे भासत होती ती… पण कबीरने तिच्याकडे नीट पाहिले देखील नाही कारण अजूनही मनात काया घर करून बसली होती….


सगळा लग्न सोहळा विधीवत पार पडला…. घरी आल्यावर अगदी पारंपरिक पद्धतीने नव्या नवरीचे स्वागत झाले… माप ओलांडून ती आत आली… कबीर सरळ आपल्या रूममध्ये निघून जातो… इथे सगळे बाहेरचे पाहूणे गेल्यावर घरचीच काही मंडळी उपस्थित होती… सगळी आवराआवर झाल्यावर नेहा आपल्या नव्या नवरीला त्यांच्या म्हणजे कबीरच्या रुममध्ये घेऊन जाते… कबीर आतून कडी लावून बसलेला असतो… नेहा बाहेरून दार ठोकत असते… नाइलाजाने कबीर दार उघडतो… समोर ती दुधाचा ग्लास घेऊन उभी असते… तो परत जाउन बेडवर बसतो…दुधाचा ग्लास ठेवून ती दार बंद करायला जाते तर तो दार उघडच ठेव म्हणून सांगतो…


रेवा : सर!!! नक्की…. तुम्हाला चालेल????


कबीर : हो.. (थोडा रागात)


रेवा : पण आम्हाला नाही ह चालणार… (अस बोलून जोर जोरात हसायला लागते)


तसे नेहा आणि राजेशही हसायला लागतात (जे तिथेच लपून बसलेले असतात) कबीर वळून बघतो तर रेवा छान पंजाबी ड्रेस घालून उभी असते तिच्या सोबत राजेश, नेहा आणि दिपकही जोरजोरात हसत असतात…(गोंधळून) कबीर त्या घुंगटवाल्या मुलीकडे जातो आणि तिचा घुंगट उचलून पाहणार तोच सगळे त्याला थांबवतात… आणि आम्ही आता जातो मग तुम्ही काय ते करा…. अस सांगून बाहेरून दार लावून घेतात… ती शांतपणे बेडवर जाऊन बसते…


कबीरला काहीच कळत नसत तो परत रागाच्या भरात आपली मुठ्ठी भिंतीवर आपटतो तशी ती पुढे जाऊन त्याचा हात धरते… तिच्या स्पर्शाने तो शहारून निघतो… त्याला तो स्पर्श ओळखीचा वाटतो…. तो अधीरतेने तिचा घुंगट उचलतो….


कबीर : (आश्चर्याने) काया !!!!!


काया : (त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेत) कबीर…


इतक्यात परत दार उघडून नेहा आणि रेवा हसत हसत त्यांना चिडवतात… अरे आता काय एकमेकांची ओळख करून देताय (रेवा म्हणाली) आता तरी आतुन दार लावून घे… (नेहा म्हणाली)


कबीर : रेवाची बच्ची थांब तुला मी सकाळी बघतो… आणि दी please ना जा इथून…


नेहा : हो हो आता आम्ही कशाला पाहिजे?? (लटक्या रागाने)


आणि त्या हसतच निघून जातात… कबीर आतून दार लावून घेतो…. कायाच्या समोर जाऊन हळूच तिचा घुंगट दूर सारतो… लाजताना किती गोड दिसत होती ती…. आणि हळुच तिला आपल्या मिठीत घेतो… आज कितीतरी दिवसांनी असा सुखद क्षण त्यांच्या वाटेला आलेला असतो….


कबीर : (थोड्यावेळाने) काया मग ते हॉस्पिटलमध्ये तुझ वागण आणि रेवा… हा सगळा काय प्रकार आहे….


काया : (हलकेच हसून ) इतक्या दिवसांच्या विरहानंतर आपल मिलन मला खास बनवायच होता… असा सहज वाया घालवायचा नव्हता…. राग तर तुझ्यावर होता पण प्रेम त्याहीपेक्षा जास्त… खोट रजिस्टर मॅरेज असल तरी माझ्यासाठी ते खर होत… मी पूर्णपणे तुझ्या स्वाधीन झाले होते पण तु तुझ्यावर संयम ठेवून होतास… माझ्यासोबत तु काहीही करू शकला असतास पण तस नाही केलस…


सकाळी पूर्ण शुद्धीवर आल्यावर दिपक आला होता तुझ्याआधी भेटायला…. त्याने स्वतःची चूक कबूल करून माफी मागितली आणि तुझ माझ्यावर किती प्रेम आहे हे सुद्धा सांगितल… त्यानंतर प्लान करुन आपल्या या क्षणांना आम्ही अस खास बनवल आणि तुला सरप्राइज दिल…


कबीर : (लटक्या रागात) पण तुझ्या या सरप्राइज ने माझा जीव काढला ना… आणि माझ प्रेम तुला दुसऱ्याने सांगितल्यावर कळल का??? (आणि तो मुद्दाम खिडकीजवळ जाऊन उभा राहतो)


काया : (त्याला अपसेट पाहून पळत जाऊन मागून मीठी मारते) नाही ना रे… मला कुणाकडूनही तुझ्या प्रेमाचा दाखला नकोय… फक्त तुझा आनंद द्विगुणित करायचा होता… Sorry… ना… गंमत केली….(अगदी लाडात आपले गाल त्याच्या पाठीवर चोळत)


कबीर : मी पण आता थोडी गंमतच केली… तुला स्वतःहून माझ्याकडे ओढण्यासाठी…


काया : (रागात मागे वळून) ए काय रे.. मी नाही बोलत जा..


कबीर : (मागून तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवून आपल्या दोन्ही हातांनी तिला विळखा घालून) ओ…. राग आला माझ्या काऊला… काऊ…. I love you… (आणि हळूच त्याने आपले ओठ तिच्या खांद्यावर टेकवले… तशी ती शहारली.. मग मानेवर किस केल… हलकेच कान चावला…)


काया :(तिच्या हृदयाची धडधड वाढायला लागली… )कबीर काय करतोयस???


कबीर : (तिची हनुवटी आपल्या हातात घेत) अच्छा तुला नाही माहित मी काय करतोय??? (आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवणार तो ती दूर पळायला बघते)


कबीर तिला भिंतीजवळ अडवतो….तिचे दोन्ही हात भिंतीवर धरून गच्च पकडतो… तिच्या पोटात आता फुलपाखरे उडायला लागतात… तिची नजर आता कबीरवरच स्थिरावते…


काया : कबीर सोड मला…. (लाजतच) मला जाऊ देत please….


कबीर : आता तर तु officially माझी आहेस… खूप गंमत केलीस माझी आता मी तुला नाही सोडणार… अस बोलून तो आपली पकड अजून घट्ट करतो… आणि patiently आपले ओठ तिच्या ओठांवर क्रश करतो… त्याच्या स्पर्शाने तिही मोहरते… आता ती सुद्धा त्याला प्रतिसाद देत त्याच्यात हरवून जाते….


असाच दहा एक मिनिटांनी ते भानावर येतात… काया लाजून त्याच्या मिठीत शिरते… कबीर तिला कुशीत उचलून घेतो आणि बेडवर बसवतो… आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून शांत तिला बघत राहतो… ती संपूर्ण रात्र ते आपल्या गोड जून्या आठवणीत आणि भविष्याची स्वप्न रंगवण्यात घालवतात….




बस ना आता अजून काय विचार करताय??? कथा संपली… विसरलात का दुसऱ्या दिवशी प्रथेप्रमाणे सत्यनारायणाची पूजा असते…. हनिमूनला वेळ आहे… ते आता त्यांच त्यांना ठरवू देत… पण तुम्ही मात्र कथा कशी वाटली हे नक्की सांगा… ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance