SHUBHANGI SHINDE

Thriller

4.3  

SHUBHANGI SHINDE

Thriller

"राजहंस" मिशन (एक प्रेमकथा)

"राजहंस" मिशन (एक प्रेमकथा)

17 mins
480


हैद्राबाद रिसर्च सेंटर चे हेड प्रोफेसर संदीप नाईक यांच्या रिटायरमेंटची पार्टी आयोजित केली होती…. सगळे मोठ मोठे अधिकारी, विज्ञान क्षेत्रातील नामवंत हस्ती सगळेच तिथे हजर होते…. पार्टी छान रंगात आली होती… सगळेच प्रोफेसर नाईक यांना भेटून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते… त्यांनी केलेल्या अफाट कार्याचे कौतुक करत होते…


(इतक्यात मागून आवाज ऐकू येतो)


राजवीर : Hello प्रोफेसर….


नाईक : (मागे वळून) राजवीर…. Hello…. After a very long time…. How are you….(हात मिळवणी करत) हल्ली नाव खूप गाजतय तुमच….


राजवीर : काय मस्करी करताय सर…. तुमच्याच हाताखाली तयार झालो आहे….


नाईक : No no… You really deserved….. आता एक नवीन मिशन हाती घेतल आहेस म्हणे ??


राजवीर: हो…


नाईक : बर मला तुझी help हवी होती… If you don’t mind…


राजवीर: बोला ना सर… It’s my pleasure to help you….


नाईक : माझी भाची आहे “हंसीका”…. ती आपल्या शास्त्रज्ञांवर एक documentary बनवत आहे… So can you please help her for that???


राजवीर : मी ह्यात काय मदत करणार ???


नाईक : मी केली असती पण तिचा हट्ट आहे तुझ्यासोबत ही documentary बनवण्याचा…


पुढे काही बोलायच्या आत प्रोफेसर इतर गेस्ट सोबत बिझी झाले…. तसा राजवीरला पार्टीत फार रस नव्हता… पण प्रोफेसर नाईक हे त्याचे गुरु होते… त्यांना तो आपले आदर्श मानत होता…. आज खास त्यांच्यासाठी म्हणून राजवीरने पार्टी अटेंड केली…. पार्टी संपवुन तो परत आपल्या घरी यायला निघाला….  राजवीर….एक देखणा… राजबिंडा… तरुण… गोरापान आणि धिप्पाड देहयष्टी…. शिक्षणाची प्रचंड आवड आणि त्यामुळेच एक हुशार शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होता… त्याच्या तल्लख बुद्धीचा चिकाटीने वापर करून तो आज उंच शिखरावर पोहचला होता…..


राजवीरच घर लोणावळ्याच्या उंच टेकडीवर… निसर्गाच्या सानिध्यात अगदी आडोशाला लपवून ठेवाव अस शांत आणि फार कमी रहदारी असलेल्या ठिकाणी होत…. राजवीरच्या मतानुसार मनाच्या एकाग्रतेसाठी अशी जागा कधीही उत्तम…. राजवीर काही नवीन प्रोजेक्ट असले की सहसा याच ठिकाणी काम करत असे… आता तर काम असो वा नसो तो याच घरी असायचा…. त्याचे आईबाबा मुंबईत राहायला असायचे….


राजवीर घरी पोहचला…. समोर दारावर एक सत्तावीस अठ्ठावीसच्या वयातील गोरीपान, उंच देखणी तरूणी येरझारा घालत होती…. लांब पायापर्यंत लोळणारा रंगीबेरंगी घागरा….त्याला लांबसर वूलनची दोरी आणि त्या दोरीला दोन लाल पिवळ्या रंगाचे गोंडस, सफेद रंगाचा ३/४ स्लिव्हचा टी – शर्ट, गळ्यात घागरा मॅच होईल असा दुपट्टा, एका हातात जाड कडा, डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ, केसांची घट्ट अशी बांधलेली पोनी, कानात खड्याचे छोटे टॉप्स, लांब सडक नाक, घारे डोळे आणि गुलाबी ओठ... कमाल होती ती... पण तिला पाहताच राजवीरचा पारा एकदम चढला…


राजवीर : तू इथे पण पोहचलीस ?? तुला एकदा नाही सांगितलेलं कळत नाही का???… Without permission तु इथे कशी आलीस …??


ती : ओ Hello… तुम्हाला कोणी सांगितलं की मी without permission आलीए…. आज मी permission घेऊन आली आहे… प्रोफेसर नाईक यांनी permission दिली आहे मला… (अगदीच नटखट attitude मध्ये)


राजवीर : त्यांनी त्यांच्या भाची बद्दल विषय मांडला होता, तुझा काय संबंध?? अजून मी त्यांना होकारही सांगितला नाही….


ती : अहो मीच ती भाची…. हंसीका!!..


राजवीर : अरे यार काय ताप आहे?? (स्वतःशीच बडबडत घराच दार उघडतो)


हंसीका : अय्या काय भुत बंगला आहे हो तुमच घर… घरात लाईट नाही आहे का?? (उगाच काहीच कळत नसल्याचा आव आणत)  राजवीर : (मुद्दाम घाबरवून) हो.. भुतच राहतात इथे… कधी कधी दिसतात राउंड मारताना…. तरी पण तुम्हाला यायच असेल आत तर येऊ शकता….


हंसीका : अय्या खरच…?? मग मस्तच आहे …. तुमच झाल की, मी त्यांच्यावर पण documentary बनवू शकते इथे….


राजवीर : (डोक्यावर हात मारून) चला आता….


डोक्यावर मारल्याने टाळीचा जो आवाज आला त्याने लाईट आपोआप चालू झाली… Automatic system बसवून घेतली होती त्याने…. जिथे गरज नाही तिथे दिवे आपोआप बंद राहतील अशी चोख व्यवस्था केली होती… एक हॉल, दोन बेडरूम, एक स्टडी रूम, किचन आणि जिम साठी सुद्धा एक स्वतंत्र खोली, एक automatic दार…. त्या दाराच्या पलीकडे राजवीरची खास संशोधन खोली होती… तिथे जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती…. थोडक्यात काय तर शास्त्रज्ञानाला शोभाव असच घर होतं राजवीरच…..


हंसीकाला तिची रूम दाखवून त्याने त्या घरासाठी बनवलेली नियमावली तिच्या हातात दिली आणि इथे राहायच असेल तर हे नियम पाळावेच लागतील… अस तिला खडसावून सांगितल….. आणि तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला….. हंसीका मात्र राजवीर गेल्यावर त्या automatic दाराजवळ गेली…. त्याला विशिष्ट प्रकारची उभी काच होती…. तिने त्यातून पलीकडे बघण्याचा प्रयत्न केला पण काहीच दिसत नव्हते…..


इतक्यात तिचा मोबाईल वाजतो…. मोबाईलच्या रिंगमुळे त्या डोअर मधून एकप्रकारचा सायरन बाजू लागला आणि रंगीबेरंगी लाईट चमकू लागली… ती घाबरली…. मागून राजवीर आला…. तो रागातच म्हणाला…. नियमावली आधी वाचुन घे मला उगाच त्रास देऊ नको….(फोनची रिंग वाजतच होती) आधी तो फोन रिसीव्ह कर….. राजवीर म्हणाला…


हंसीका : (जरा घाईतच) Hello…..


नाईक : भेटला का राजवीर??? कसा वाटला???


हंसीका : हो भेटला ना…. खडूस आहे थोडा….( तोंड वाकडं करून हळू आवाजात)


नाईक : बर बर…. (अचानक घाबरलेल्या आवाजात) कोण??? कोण आहात तुम्ही??? काय हवयं तुम्हाला???


हंसीका : (पलीकडून बराच गोंधळ ऐकून) Hello…. Uncle??? any Problem??? काय झालं? कोण आहे?? Hello…. Hello….. (आणि फोन कट होतो)  हंसीका परत परत प्रोफेसर नाईक यांना फोन करते पण आता फोन बंदच येत असतो…. राजवीर तिच्या गोंधळाच कारण विचारतो तेव्हा तोही टेंशनमध्ये येतो…. आपल्या ओळखी कामाला लाऊन तो प्रोफेसर नाईक यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो…. तेव्हा कळत की प्रोफेसर नाईक यांचे अपहरण झाले आहे….


हंसीका शांत असते… मगाचशा आपल्या वागणुकीबद्दल राजवीर तिची माफी मागतो… आणि दोघेही आपापल्या रुममध्ये निघून जातात…. रात्री सगळं शांत आहे हे पाहून हंसीका घराची पाहणी करायला लागते… इतक्यात राजवीर रुमच्या बाहेर येतो… तशी ती आडोशाला लपवून रहाते… राजवीर त्याच्या संशोधन खोलीत जाऊन काम करायला सुरवात करतो….


इथे हंसीका मात्र वेगळ्याच शोधात असते… आपल्या सोबत आणलेल्या कसल्याशा छोट्या डिवाइस ने घराचा कोपरान कोपरा चाचपडत असते…. असेच सकाळचे सात कधी वाजले कळलेच नाही… काहीही न घडल्याच्या आवेशात हंसीका कॉफी घेऊन येते आणि राजवीरला त्या automatic दाराबाहेर उभी राहून बोलवण्याचा प्रयत्न करते… पण राजवीर त्याकडे दुर्लक्ष करतो… तो काही प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर तिने आपला मोबाईल त्या दाराजवळ नेऊन मोठ्याने रिंगटोन वाजवली… त्या बरोबर परत कालच्या सारखा सायरन वाजायला लागला… रंगीबेरंगी लाइट चमकू लागली... तसा राजवीर तावातावाने बाहेर आला… त्याला असं त्याच्या कामात व्यत्यय आणलेला अजिबात चालत नसे… दार उघडून बाहेर येताच समोर उभ्या असलेल्या हंसीकाच्या हातातल्या ट्रेला धडपडून काॅफी त्याच्या अंगावर सांडते... तशी हंसीका खळखळून हसायला लागते...


राजवीर : What rubbish??? हा काय प्रकार आहे??


हंसीका : (आपल हसू आवरत) अहो म्हटलं रात्रभर जागरण केलात म्हणून तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले होते पण काही हरकत नाही .. परत करते…. (आणि ती हसायला लागते)


पुढे राजवीर काही बोलणार तोच घरात military प्रवेश करते…. राजवीर आणि हंसीका दोघेही गोंधळून जातात…. इतक्यात त्यांच्यातला मुख्य कमांडर आपली ओळख करुन देतो आणि राजवीरच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याच इथे रहाण सुरक्षित नाही… आणि त्यासाठीच ते त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास आले आहेत असं सांगितलं….  राजवीर गेले दोन महिने एका प्रोजेक्टवर काम करत होता… काल रात्रीच त्याच ते काम पूर्ण झाले होते… शिवाय सकाळी तो त्याचीच टेस्ट घेत होता… त्याने कमांडरकडे पंधरा मिनिटे मागितली आणि आधी त्याने बनवलेले software device जे एक छोट्या Hard disk प्रमाणे होत ते आणि आपला laptop सोबत घेतला… संपूर्ण टीम हंसीका आणि राजवीरला घेऊन निघाली…. डोंगरावरून खाली उतरताच मोठ्या स्फोटाचा आवाज आला… त्यांनी गाडीच्या काचेतून पाहीले तर ते राजवीरचे घर होते… काळाकुट्ट धूराचा लोंढच्या लोंढ आकाशात झेपावत होता….


राजवीर : (अवाक होऊन) Ohhh no… हे सगळं काय आहे???


कमांडर : सर आम्हाला फक्त तुम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी दिली आहे याव्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही… काही तासाच्या अंतरावर पोहचताच समोर काही गाड्या येऊन थांबतात आणि अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात करतात… काही कळायच्या आतच बाकी कमांडर सुद्धा गाडीतून खाली उतरतात… आणि प्रतिकार करतात…. मुख्य कमांडर आपल्या अजून चार जवानांच्या मदतीने राजवीर आणि हंसीकाला सुरक्षित बाहेर काढून जंगलाच्या दिशेने पलायन करतात…. त्यांच्या मागोमाग काही हल्लेखोर सुद्धा मागे लागतात….


मागून येणाऱ्या हल्लेखोरांना प्रतिकार करताना ते चारही कमांडर धारातिर्थी पडतात… पण त्याआधी त्या हल्लेखोरांचा नायनाट करतात…. मागे फिरण कठीण असतं… दोघेही वाट मिळेल त्या दिशेने पळत सुटतात…. पळत पळत कोणत्यातरी गावाच्या वेशीवर येऊन पोहचतात…. थकल्यामुळे पुढे काहिच सुचत नसते…. थोडा वेळ इथे आराम करून मग पुढचा प्रवास करू अस ठरत….


गावात मोबाईला रेंज सुद्धा नसते त्यामुळे कोणालाही संपर्क करता येत नव्हता…. गावातल्या लोकांकडून माहिती काढून संध्याकाळी एसटी पकडून मुंबईत येण्याचे ठरवले…. आपल्यामुळे हंसीकाही अडचणीत आल्याचे त्याला वाईट वाटत होते…..


राजवीर : (बराच वेळ विचार करून) I am sorry…..


हंसीका : (मुद्दाम) मला काही म्हणालात का???


राजवीर : actually माझ्यामुळे तुलासुद्धा या अडचणीत पडाव लागलो….  हंसीका : (काहीशी गमतीने) मग आतातरी मदत कराल ना मला documentary बनवायला….


राजवीर काहीच न बोलता फक्त हसत राहतो…. झाडाच्या सावलीखाली दोघेही विसावतात…. जेव्हा जाग येते तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडलेला असतो…. राजवीर आसपास नजर टाकतो तर हंसीका तेथे नसते…. तो जरा घाबरतो…. मग त्याच्या लक्षात येत तर त्याची ती laptop and device ची बॅगही जवळ नसते……तो उठुन इथे तिथे शोधायला लागतो…


एका ठिकाणी तिला कोणासोबत तरी बोलताना बघतो… बोलन संपवून तो माणूस निघून जातो… राजवीर पळत पळत हंसीका जवळ जातो आणि एक फटकन तिच्या कानशिलात लगावून देतो…


राजवीर : मूर्ख बाई…. अक्कल आहे तुला??? मला न सांगता माझ्या बॅगेला हात कसा लावलास तु??? किती महत्वाच डिवाइस आहे ते माहीत आहे तुला??? गेले दोन महिने दिवसरात्र एक करून बनवल आहे मी…. आणि तु बिनधास्त अशी घेऊन फिरते आहेस….


हंसीका पटकन राजवीरला मिठी मारते… तसा मागून कोणीतरी खाली पडल्याचा आवाज येतो…. राजवीर मागे वळून बघतो तर एक माणूस खाली जखमी अवस्थेत पडलेला असतो त्याच्या पोटातून रक्त वाहत असत… तो हंसीकाला बघतो तर तिच्या हातात बंदूक असते… कदाचित त्या बंदुकीला सायलेंसर फिट केला असावा म्हणून गोळी झाडल्याचा आवाज नाही आला…. हंसीका त्या खाली पडलेल्या व्यक्तीला (जो अजूनही जिवंत आहे) विचारत असते की त्याला इथे कोणी पाठवल?? आणि इतक्यात त्या माणसाला दुसराच कोणी गोळी मारतो… तशी हंसीका होऊन राजवीरला घेऊन गाडीत बसून निघते… आता थोड्यावेळ आधी ती ज्या माणसासोबत बोलत असते तो तिचाच साथीदार असतो आणि तोच आता गाडी घेऊन येतो ज्या गाडीत बसून ती राजवीरला घेऊन निघते ….


गाडी भरधाव वेगाने धावत सुटते… राजवीर तर शॉकच होऊन जातो… ज्या बाईला आपण मूर्ख आणि बावळट समजत होतो तिने आत्ताच थोड्या वेळापूर्वी एकाला ठार मारल आणि आता आपल्याला घेऊन चालली आहे… कोण आहे ही??? आणि काय हेतू असावा हिचा… ??  राजवीर : कोण आहेस तू नक्की?? आणि हे सगळं काय चाललंय??


हंसीका : (राजवीरने लगावलेल्या कानशिलामुळे तोंडातून येणार रक्त पुसत) कळेल लवकरच… आम्ही तुमच्या सेफ्टी साठीच आहोत…


राजवीर: माझी बॅग??


हंसीका : (नजरेनेच खूणावून समोरच्याला ती बॅग राजवीरला देण्यास सांगते…)


राजवीर ती बॅग घट्ट धरून बसतो…. गाडीच्या वेगाने शरीराला झोंबणार्या गार वार्‍यामुळे त्याला झोप लागते… सकाळी झोप उघडली तेव्हा गाडी एका वाड्या बाहेर येऊन थांबली होती…. राजवीर गाडीतून बाहेर पडून अंग झटकून आळस देतो… हंसीका त्याला आत येण्यास सांगते….


राजवीर : आपण इथे का आलोत??? आपल्याला मुंबईला जायच होत ना???


हंसीका : (काहीसा विचार करून) नाही… प्लान थोडा बदलला आहे… दोन एक दिवस इथे राहून मग निघायच आहे… तुमच्या माघावरचा शोध कमी झाला की आपण निघू…


इतक्यात समोरून एक वयस्कर दाम्पत्य राजवीरजवळ येतात… त्याच्या गळ्यात पडून तो आल्याचा आनंद व्यक्त करतात… हंसीका त्यांना आधार देत बाजुला सारते…


हंसीका : आईबाबा तो थकून आला आहे प्रवासातून… हमम् नंतर निवांत बसू आपण….


आई : हो पोरी… तुम्ही हातपाय धुऊन घ्या… मी न्याहारीच बघते….


हंसीका : या राज आराम करा थोडा….


(राजवीर सगळीकडे आश्चर्याने बघत असतो)


बाबा : अरे पोरा अस काय पाहतोस?? आपलच घर आहे… जा तू आधी हातपाय धुऊन घे नी आराम कर….


राजवीरला हे काय चाललंय काहीच कळत नसत… तो शांतपणे हंसीकाच्या मागोमाग जात होता….. जाता जाता संपूर्ण घर न्याहाळत होता…. हंसीका त्याला एका खोलीत घेऊन जाते…. हंसीका : तुम्ही आराम करा मी आलेच…


राजवीरने खोलीत चहुदिशेने नजर फिरवली आणि त्याची नजर टेबलावरच्या फोटोवर येऊन स्थिरावली… त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्या फोटोत हंसीका होती आणि तिच्यासोबत त्याचा फोटो होता… फक्त फोटोमधल्या राजवीरला रुबाबदार मिशा होत्या… तो आश्चर्य चकीत होऊन हंसीकाला विचारण्यासाठी मागे वळतो… तेवढ्यात हंसीका ती फोटो फ्रेम हातात घेऊन…..  हंसीका : हे माझे पती राजेंद्र दातार….स्पेशल कमांडो होते… ड्युटीवर असताना अचानक गायब झाले…. घरच्यांना माहित नाही याबद्दल …. या वयात ते हे दुःख नाही पचवू शकणार म्हणून मीच ते लपवून ठेवले…. (डोळ्यातील अश्रू आवरत) बाहेर जे भेटले ते राजेंद्रचे आईबाबा होते…. राजेंद्र त्यांचा एकुलता एक मुलगा….


राजवीर: I am sorry….


आई : बेटा आता आलाच आहेस तर एकमेकांना वेळ द्या… मागच्या वेळेसारख भांडत बसू नका….


हंसीका : अश्रू अनावर झाल्यामुळे आत निघून जाते….


राजवीर काहीच बोलत नाही फक्त आईच्या हो… ला… हो… देत असतो…. त्यादिवशी राजेंद्र आणि हंसीकाच्या लग्नाचा वाढदिवस असतो… आणि राजेंद्र घरी आल्याच्या खुशीमध्ये बाबा एक छोटा गेट टुगेदर अरेंज करतात…. ते राजवीरलाच त्यांचा राजेंद्र समजत होते…. दोघांसाठी गेटटुगेदर हे एक सरप्राइज होत….


संध्याकाळी आई हंसीकाला साडी नेसून तयार होण्यास सांगतात…. छान गडद डाळिंब रंगाची… काठपदरी साडी, छान पीनप केलेले केस, कानात झुमके त्यावर माळलेली कानवेल…. गळ्यात लांब मंगळसुत्र… .थोटी ठुशी… हातात हिरव्या बांगड्या आणि पुढे सोन्याचे कडे… हंसीका तयार होऊन बाहेर आली… काहीतरी कमी असल्याच सांगत आई तिच्या जवळ आली आणि हंसीकाच्या कपाळावर साजेसा कुंकूवाचा टिळा लावला…. आता ती अगदी नव्या नवरीसारखी भासत होती…. अगदी तशीच जशी लग्न करून पहिल्यांदा घरी आली होती….


राजवीर बाजूलाच सोफ्यावर बसून तिला एकटक पाहत होता….. काय विलक्षण सुंदर दिसत होती ती…. आईंनी तीच्या चेहर्‍यावर हात फिरवून आपल्या डोक्यावर बोटे मोडून तिची नजर काढून आपल्या डोळयातील काजळाने तिच्या कानामागे नजरेचा तिठ लावला… आणि राजवीरलाही तयार होण्यास सांगितले…. आता हळूहळू घरच्या पाहुणे मंडळी येऊ लागली…. हंसीका राजवीरला घेऊन खोलीत गेली…


हंसीका : आज आमच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस आहे… कदाचित बाहेर त्याचीच लगबग असावी…. I’m sorry माझ्यामुळे तुम्हाला उगाचच त्रास….  राजवीर काहिच न बोलता हंसीकाने दिलेले राजेंद्रचे कपडे परिधान करून बाहेर येतो…. बाहेर सगळे पाहुणे त्यांच अभिनंदन करतात… कोणी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतय तर कोणी भेट वस्तू देऊन…आणि कोणी आशिर्वाद देऊन…. राजवीरही काही आढेवेढे न घेता सर्वांना हसून प्रतिसाद देत होता…. आईंनी दोघांनाही एकत्र बसवुन त्यांच औक्षण केल…. काही वेळ पाहुण्यांमध्ये हसतखेळत घालवून त्याच्या लक्षात आलं की बराच वेळ झाला हंसीका दिसत नाही….. म्हणून तो तिला बघायला घरभर फिरतो….. राजवीर हंसीकाला शोधत त्यांच्या खोलीत येतो आणि बघतो तर हंसीका laptop वर काही काम करत असते….


राजवीर : इथे काय करताय तुम्ही…


हंसीका : (चकीत होऊन) तू वरून डायरेक्ट तुम्ही?? प्रगती आहे…


राजवीर : (हलकेच हसून) No no... I mean…


हंसीका : मस्करी केली मी… (आणि हसायला लागते)


राजवीर : (मनात) जवळ एवढ दुःख असताना सगळ्यांकडून ते लपवून अस खोट हसु आनण कस काय जमत असेल हिला….


हंसीका : (चुटकी वाजवून) Hello… कुठे हरवलात???


राजवीर : तुम्हाला आठवण नाही येत राजची??


हंसीका : (मानेनेच नाही) हमम् हमम् नाही… आठवण येण्यासाठी आधी विसराव लागत…आणि राजेंद्र तर माझ्या हृदयात रुजले आहेत…


राजवीर: True Love हा….


हंसीका : हममम् ( हलकेच हसून)…. मग प्रोफेसर तुम्ही पडलात की नाही कोणाच्या प्रेमात ??


राजवीर : (हळू आवाजात) हो पडलो ना मगाशीच….


हंसीका : काही म्हणालात का???


राजवीर फक्त तिच्या एकाकी मुद्रेकडे पहात होता… काही क्षणाने भानावर येऊन


राजवीर : माझा फोन तर… You know काय झालं ते… मला घरी फोन करायचा होता आईबाबांना…


हंसीका : (थोडी गंभीर होऊन) हो बरोबर आहे तुमच पण मी तुमच्या घरी already सगळी कल्पना दिलेली आहे…


राजवीर : पण तुम्हाला त्यांचा नंबर???


हंसीका : तुमच्या मोबाइल मधुन मी आधीच घेतला होता… राजवीर : तरी मला एकदा बोलायच होत… But anyways… हंसीका : हमम् आराम करा. .. थकला असाल तुम्ही नाई???


राजवीर : (थोडा विचार करून) मग मी माझ्या रिसर्च सेंटर मध्ये एकदा फोन करतो….


हंसीका : (अजून गंभीर होत) कळत कस नाही तुम्हाला… तुम्ही घरातून गायब आहात.. . तुमच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे… तुमच घर बेचिराख झालं आहे…. तुमचा शोध अजून जास्त वाढलाय…. रिसर्च सेंटरचे सगळे फोन कॉल्स टॅप केलेले असू शकतात… So please co-operate… (आता हंसीकाचा पारा चांगलाच चढला होता)


राजवीर : (आश्चर्याने) पण शांतपणे तिच ऐकून घेतो.. .


हंसीका : (त्याने संशय घेऊ नये म्हणून शांतपणे) हे बघा प्रोफेसर तुमच्या आणि या डिवाइसच्या भल्यासाठी सांगतेय मी…. Please….. हमम्….


राजवीर: OK… Good night…


रात्री झोपताना तो हंसीकाचाच विचार करत होता… मघाशी तिला पाहताच क्षणी तो तिच्यात हरवून गेला होता… तिचा विचार करता करता झोप कधी लागली कळलेच नाही…


दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा हंसीका संपूर्ण खोलीत धुपारत फिरवत होती… त्या धुपारताचा सुगंध सगळीकडे दरवळत होता…. त्या धुक्यातून तिची एक झलक त्याच्या काळजाला भिडली…. हलक्या पिवळ्या रंगाची शिफॉन साडी तिच्या कमनीय देहयष्टीला अजूनच उजळून दिसत होती… नुकतेच अंघोळ करून ओले झालेले केस टॉवेलने अर्धवट पुसून तिच्या डाव्या खांद्यावर सोडलेले ज्यातून अजूनही पाण्याचे थेंब टपकत होते… गोरापान चेहरा… कपाळावर छोटी लाल रंगाची टिकली… नाकात नाजूक हिऱ्याचा खडा… त्यात तिचे घारे डोळे…. नैसर्गिक गुलाबी ओठ…यावरून नजर काही हटत नव्हती त्याची…. ती जशी जवळ आली तशी त्याच्या हृदयाची धडधड एकदम वाढली…. इतक्यात आई दारावर टकटक करत चहा घेऊन आली तसा तो भानावर आला…. आणि ही अप्सरा आधिच दुसर्‍या कोणाची असल्याची जाणीव होताच त्याच्या मनाने आवरतं घेतल….


दोन दिवस वाड्यात राहिल्यावर सकाळी पाचला हंसीकाची तयारी सुरू झाली… राजवीरला पण तयारी करून निघण्याची कल्पना दिली… परत त्याच गाडीत बसून ते लोक निघाले…. राजवीरला तर अजूनही काय बोलाव कळत नव्हतं… कालचा हंसीकाचा हसतमुख चेहरा आता गंभीर होताना दिसत होता….. एक वेगळाच ताठकपणा जाणवत होता तिच्यात… ती पुढे ड्रायव्हर सीटच्या बाजुला बसली होती… तीच लक्ष अगदी सतर्क असल्याच जाणवत होतं…. तिने मागे वळून एकदा राजवीरला नजरभेट दिली… तिच्या घाऱ्या डोळ्यांच्या नजरेत त्याला काहीतरी गूढ असल्याच जाणवल… पण तो निरागस चेहरा आणि एक वेगळीच हंसीका जी आपण वाड्यात अनुभवली ती आपला घात अजिबात करणार नाही याची त्याला खात्री होती…. बराच प्रवास केल्यावर गाडी एका अज्ञात स्थळी थांबली… पण आता मात्र त्याने न राहवून तिला प्रश्न केलाच…. येवढ्या घनदाट जंगलात येण्याच कारणच काय…?? सेफ्टी सेफ्टी म्हणताय तर एका मुलीवर माझी जबाबदारी सोपवली?? तीही एकट्या मुलीवर??? काल परवा तर निदान पाच कमांडो तरी सोबत होते आणि आज फक्त तू आणि हा ड्रायव्हर??? मुंबईला सरळ जायच सोडून या जंगलात घेऊन आलात तुम्ही??? तु नक्की कोण आहेस???


इतक्यात आजूबाजूला काही बंदूकधारी लोक ज्यांनी आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता ते जमा झाले… त्यातल्या एकाने राजवीरच्या पाठीवर बंदुक ताणली… आणि हातातली बॅग देण्यास सांगितले पण राजवीरने त्यांच काहीही न ऐकता बॅग अजून घट्ट आवळून पकडली…. तशी हंसीकाने जोरदार त्याच्या कानशिलात लगावली…. आणि बॅग त्याच्याकडून हिसकावून घेऊ लागली पण राजवीर काही बॅग सोडायला तयार नव्हता… शेवटी त्यातल्या एकाने त्याच्या डोक्यात त्या मोठ्या बंदुकीचा फटका मारला तस राजवीर खाली पडला.. अजून दोघा तिघांनी लाथा बुक्के मारून ती बॅग हिसकावून घेतली… राजवीर मात्र मार खाता खाता हंसीकाला पाहत होता… ती मात्र तशीच तटस्थ उभी होती…. आणि राजवीरला भूवळ आली… डोळे बंद होताना सुद्धा तो हंसीकालाच पाहत होता …


राजवीरला जेव्हा जाग आली तेव्हा तो एका खुर्चीवर बसुन होता… त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले होते…. त्याने नजर वर करून पाहिले तर समोर हंसीका आणि तेच मगाचचे बंदुकधारी…. आणि अजून एक ओळखीची व्यक्ती… ते म्हणजे प्रोफेसर नाईक…. त्याला आनंद झाला की प्रोफेसर नाईक सुखरूप आहेत पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही…. नाईक : Well done हंसीका…. You did it great job…. राजवीर… तु खरच खूप छान डिवाइस बनवल आहे… बाहेर या डिवाइसचे मला 500 कोटी अडवान्स सुद्धा मिळाले… मी तुलाही 200 कोटी मिळवून देतो… माझ्या सोबत काम कर…. आपण हा देश सोडून जाउ …. कशाला ती मोजक्या पगाराची नोकरी करतोस???


राजवीर : (रागात) गद्दार…… प्रोफेसर!!…. तुम्ही पैशासाठी विकले गेले असाल पण मी नोकरी करत नाही देश सेवा करतो… माझ्या देशाशी मी गद्दारी करणार नाही आणि गद्दारी करणाऱ्याला मी साथ देणार नाही…


हंसीका : विचार कर राजवीर तुझा जीवही जाऊ शकतो…. राजवीर : shut up you…——- (अर्वाच्य भाषेत शिवी देत)


हंसीका : (त्याच्या तोंडून शिवी ऐकून परत त्याच्या एक कानशिलात लगावते)


नाईक : calm down हंसीका….. याला आपण नंतर बघू….. संध्याकाळी मिटींगमध्ये आज या डिवाइसची डील फिक्स होईल… तुझे वीस कोटी advance transfer केलेत… संध्याकाळी भेटू राजवीर….


हंसीका : Thank you… प्रोफेसर….


प्रोफेसर आणि हंसीका निघून जातात….. राजवीरला आता स्वतःचाच राग येत होता…. आणि त्याहून जास्त काळजी त्याने बनवलेल्या डिवाइसची वाटत होती…. राजवीर ने जे डिवाइस बनवल होत त्याने आपल्या रडारमध्ये येणाऱ्या दुश्मनाच्या मिसाइल किंवा विमाने यांचा प्रोग्राम हॅक करून ते निकामी करू शकतो… आणि आल्या पावली त्यांना त्यांच्याच जागी परतवून प्रतिहल्ला करू शकतो…. हे डिवाइस त्याला आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेला सुपूर्त करायचे होते….


इथे संध्याकाळी मिटींगसाठी सगळे जमा झाले.. सर्वांच्या भेटीगाठी झाल्यानंतर प्रोफेसर नाईकनी सर्वांना त्या डिवाइसची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवले… डील जवळ जवळ फायनल झाली आणि अचानकपणे तिथे भारतीय सैन्य दलाने भराभरा प्रवेश केला… तिथे उपस्थित सर्वांना ताब्यात घेतले… काय तो आपल्या भारतीय सैन्य दलाचा रुबाब… वाहह!! त्यांची तर बातच न्यारी… आपल्या जवानांना पाहताच दुश्मन देशाचे धाबे दणाणतात ते काही उगाच नाही याची प्रचिती तिथे उपस्थित असलेल्या त्या गद्दारांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती…. प्रोफेसर नाईक पुढे काही आक्रमक हालचाल करणार तेवढ्यात हंसीकाने त्याला रोखल….. नाईक : हंसीका?? (तिच्या प्रतिकाराला चिडून)


हंसीका: take it easy प्रोफेसर…. I am हंसीका दातार… A secret agent…


नाईक : म्हणजे??? तु??? (आश्चर्यचकित होऊन)


इतक्यात बाकीचे जवान नाईकच्या त्या तळात कैद असलेल्या आपल्या इतर शास्त्रज्ञ आणि ओलिस ठेवलेले इतर लोकांची सुटका करतात…. त्यात राजवीरही असतो…


हंसीका : हो.. माझे पती राजेंद्र यांना काही पुरावे मिळाले होते प्रोफेसर तुमच्या विरोधात… पण ते अपुरे होते तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आणि आम्हाला हे पण जाणून घ्यायच होत की कोण कोण यात सहभागी आहे… राजेंद्र गायब झाल्याने तुमच्या वरचा संशय अजून वाढला पण ठोस हाती काहीच लागत नसल्याने विषय काहीसा थांबत चालला होता… येव्हाना माझी ट्रेनिंग पूर्ण होत आली होती आणि मी secret agent बनण्याचा निर्णय घेतला…. गेली दोन वर्षे लागली मला हे सगळं सफल करण्यासाठी…. त्याच दरम्यान राजवीरच्या डिवाइसमध्ये तुमचा वाढता रस ओळखून आम्ही त्या दिशेने वेग वाढवला…. (राजवीर आवासून ऐकत होता) नाईक : (चलाखीने डिवाइस आॅन करून) पण त्याचा काही उपयोग होणार नाही…. मी आता हे डिवाईस ऑन केलं आणि आता तुमचे सगळे यंत्रणा नेस्तनाबूत होणार….


हंसीका : (हसून) दोन दिवस माझ्या घरी राहून हा duplicate डिवाइस बनवला आहे आता याच्या प्रोग्राम नुसार तुमच तळ पुढच्या अर्धा तासात उद्ध्वस्त होणार…. खरा डिवाइस तीन दिवसापूर्वीच आपल्या सुरक्षित ठिकाणी पोहचला…. काय प्रोफेसर राजवीर त्या डिवाइसचा पासवर्ड तुम्ही स्वतः आहात… तुमच्या eye scan शिवाय ते ओपन होत नाही विसरलात का??? (राजवीर आश्चर्याने बघत बसतो) Quick boys…. (जवानांना) लवकर इथुन निघा आपल्याकडे फार कमी वेळ आहे….


सगळे भराभर बाहेर पडतात…. आपले helicopter तयारच असतात… सगळ्यांना त्यात बसवून एक एक उड्डाण करतात… याच दरम्यान राजवीरची नजरभेट बघून हंसीका त्याला मिठी मारून त्याची पाठ थोपटून झालेल्या सगळ्याच बाबतीत माफी मागते…. शेवटचे दोन helicopter उड्डाण करणार इतक्यात नाईक तिला राजेंद्र याच तळाच्या गाभाऱ्यात कैद असल्याचे सांगतो…. हे ऐकून हंसीका शॉक होउन जाते… आणि तशीच पाठी फिरुन ती त्या तळात राजेंद्रला शोधण्यास निघून जाते…. ती घड्याळ बघते अजूनही पंधरा मिनिटे बाकी असतात…. जीवाचा आटापिटा करुन ती तळघर शोधते…. एव्हाना एक एक करून तळाचा भाग उद्ध्वस्त होण्यास सुरुवात होते… तो आवाज ऐकून हंसीका अजून जोर धरू लागते… एका ठिकाणी कोपर्‍यात एक दार सापडत ज्याला लोखंडी सळीची खिडकी असते… त्यातून वाकून बघते तर समोर राजेंद्र असतो… साखळीने बांधलेल्या अवस्थेत… खूप प्रयत्नानंतर ती ते दार तोडण्यात यशस्वी होते…. हंसीका धावत जाऊन राजेंद्रला घट्ट मिठी मारते…. वेड्या सारखी आनंदून जाते… राजेंद्रही तिला बघून खुश होतो… साखळी सोडून दोघेही बाहेर पडतात पण स्फोटामुळे तळ उध्वस्त होण्यास सुरुवात झालेली होती आणि बाहेर पडण्याचे एक एक रस्तेसुद्धा बंद झाले होते…. दोघांनाही आता कळून चुकलं होतं की आता बाहेर पडण अशक्य आहे…. हा आत्ताचा क्षण ऐकमेकांच्या मिठीत सामावून घेत त्यांनी डोळे बंद केले ते कायमचेच….


स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की फार दुरूनही आगीचे लोट स्पष्ट दिसत होते…. राजवीरने तो शेवटचा स्फोट ऐकला आणि त्या दोघांनाही मनोमन आदरांजली वाहिली….


हंसीकाने ते वीस कोटी रुपये military फंडला आधीच दान केले… सरकारने हंसीका आणि राजेंद्र यांचा गौरव करून त्यांना योग्य सन्मान केला… तीन महिन्यानंतर राजवीरचा डिवाईस सगळ्या टेस्ट पास करून भारतीय सुरक्षा यंत्रणेला सुपूर्त करण्यात आला… त्या डिवाईला राजवीरने “राजहंस” असे नाव दिले… राजेंद्र आणि हंसीका यांच्या देशप्रेमाच आणि त्यांच एकमेकांवर असलेल्या प्रेमाच प्रतिक…… ” राजहंस” हंसीकाचे सासूसासरे म्हणजे राजेंद्रचे आईवडील यांची राजवीरने, राजेंद्र बनून जबाबदारी स्वीकारली….

धन्य ती हंसीका…. धन्य तो राजेंद्र… धन्य तो राजवीर आणि धन्य ते त्यांच देशप्रेम…


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller