अहंकारी साप (अलक)
अहंकारी साप (अलक)
अनेक दिवसांपासून एक साप अहंकारात वागत होता. त्याला वाटे आपणच शक्तीशाली आहोत. कमी संख्येत असलेल्या किळे माकोळे यांना चिरडत जाही. त्यामुळे त्या समूहातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असे. एकेदिवसी लाल जमातीच्या सर्व मुंग्यानी एक मताने सामूहिक विचार करून, निर्णय घेतला की, या अहंकारी सापाला धडा शिकवूच..! तो आम्हाला तुच्छ समजतो काय?
सर्व मिळून एकजुटीने, एकसाथ कडकडून चावा घेऊन त्याचा फडशाच पाडूया. आपण योग्य संधीची आता वाट पाहूया. मुंग्यांना संधी चालून आली. साप नित्याप्रमाणे अहंकारात येतांना दिसला. इकडे त्याच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या मुंग्या, साप जवळ येताच नियोजनाप्रमाणे तुटून पडल्या. थोड्या वेळातच त्या अहंकारी सापाचा फडशा पाडला. एकजुुटीचा विजय झाला.