कर्माशिवाय नाही उत्कर्ष
कर्माशिवाय नाही उत्कर्ष
एक व्यक्ती एका साधूला भेटायला गेला. साधुची कुटी गाठली. साधूला अभिवादन करून खाली बसला. बोल बेटा, येथे येण्याचं काही प्रयोजन..? होय बाबा, प्रयोजन आहे. मला आपल्याकडून जीवनात तरक्की करण्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. ..तर कृपा करून सांगालना बाबा? हात जोडून म्हणाला. ठीक आहे म्हणून, साधू रहस्य कथन करू लागला.
बेटा ऐक तर.. जीवन उत्कर्ष रहस्य...!!
"कोणताही क्षेत्र असो ,प्रगतीचे शिखर गाठलेले व्यक्ती ,त्यांच्या पूर्वायुष्यात जीवन भकास होते. दारिद्र्याच्या खाईत विस्कटलेले होते .त्यांचे जीवन क्षुद्रावस्थेत गटांगळ्या खात होते त्यांचे आयुष्य..! यशोशिखर करणारे महान व्यक्ती सुद्दा कष्टाच्या सानिध्यातून इच्छाशक्तीच
्या बळावर आत्मविश्वासाने, जिद्द चिकाटीने, अहोरात्र कर्मकृतीच्या माध्यमातून, स्वतःच्या विचारांनी न डगमगता, समाजातून हिणवण्याची तमा न बाळगता प्रयत्नाचे पाऊल पुढेच टाकत गेले. तेव्हा पुढे त्यांचे आयुष्य ताऱ्या सारखं लाकाकताना दिसतोय. सुखात जीवन व्यतीत करत आहेत. थोर साधूसंत महात्मेसुद्धा कष्टाने झिजून किर्तीने अमर झाले आहेत. अर्थात सांगण्याचं सार असं की, कर्माचे मोल समजून ते अनुसरण केल्याशिवाय जीवनाचा उत्कर्ष नाही."
उमगले बाबा, आपण सांगितलेले कर्मोत्कर्षाचे रहस्य मी चिरकाल लक्षात ठेवणार. भावी पिढीला श्वास असेपर्यंत मार्गदर्शन करत राहणार, अशी ग्वाही देत, हात जोडून, धन्यवाद व्यक्त करून निघून गेला.
बोध:- कर्माशिवाय उत्कर्ष नाही.