Chandanlal Bisen

Others

4.0  

Chandanlal Bisen

Others

विद्यार्थी जीवनातील प्रसंग

विद्यार्थी जीवनातील प्रसंग

2 mins
268


मी गावच्या शाळेत ७ वा वर्ग पास झालो. त्या शाळेत ७ वी पर्यंतच शिक्षण होते. आता पुढील शिक्षणाकरिता नवीन शाळेचा ध्यास लागला होता. हायस्कुल मध्ये प्रवेश होणार होता. आमच्या गावावरून हायस्कुल ५ कि. मी. अंतरावर वडेगाव येथे होते. वडिलांबरोबर जाऊन प्रवेश घेतला. ५ कि. मी. जाणे व ५ कि. मी . येेणे असा रोजचा प्रवास होता. कसाबसा तरी शर्ट व प्यांट चा कपडा तालुक्याच्या ठिकाणाहून आणून, शिंप्या कडून शिवून घेतले. त्याकाळी बस्ते (बॅग) नसायचे. हातात पूर्ण विषयांच्या पुस्तका धरून जावे लागे. चपला, जूते-मोजे पायात नसत. अनवाणी पायाने मार्गक्रमण करावे लागे. पाण्याची बॉटल शोबत नसायची. वाट मार्गेने तहान लागलीच तर, त्याकाळी धर्मात्मे लोक जनावरांना तसेच वाटेरु माणसांना पाणी मिळण्याकरिता, आपल्या शेतातील विहिरीवर बदली ठेवायचे. त्या बदलीने पाणी खेचून आम्ही विद्यार्थी मुले तृष्णा भागवायची. 

    जाण्याचा सरळमार्ग म्हणजे कन्हार शिवारातून गेलेली वळणावळणीची पायवाट होती. वाटेत झाडी-झुडपी, धुरे-पारी, धोडी-नाला, आंबे-मोवांची पळसाची व इतर मोठाली भयावह वृक्ष वाटेत मिळायची. वाटेत एक खूप मोठा अवाढव्य नाला होता. त्या नाल्याच्या काठावर उंच उंच अंजनाची झाडे होती, त्या सह विविध वृक्षरूपी झाडी होती. नाला जवळपास आला की, आपसूकच मनात धडकी भरायची. मनातल्या मनात 'जय बजरंग बली' चे उच्चारण आपोआपच यायचे. नाला पार झाला की, सुटकेचा स्वास् वाटायचा. 

    याच नाल्याकाठावरचा एक प्रसंग आठवतो. ४० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या नाल्याच्या काठावर थोडा मैदान होता. तिथे थोडी हिरवळ होती. त्या ठिकाणी दोन-तीन तेरा-चौदा वर्षाची मुले गायी-म्हशी चारायचे. येतांना जातांना आम्हाला आमची चेष्टा करून, त्रास देत असत. रस्त्यात आडवे होत असत. तरी आम्ही प्रत्युत्तर ना देता आपल्या रस्त्याने निशब्द राहता चालायचो.

तरी त्रास देणे कमी होत नव्हता.

    एकेदिवशी शाळेतून, मध्यांहाच्या सुटी नंतर गावाकडे जायला निघालो. आम्ही दोघेच होतो. माझ्याबरोबर धर्मदीप नावाचा मुलगा होता. तो पण बुटक्या काठीचा होता. नाला आला. नाल्याच्या काठावर चढताच नेहमी प्रमाणे आम्हाला चमकवाने, शिव्या देणे सुरू केले. 

     माझ्या मनात अचानक धाडस निर्माण झाले. झाडशीतून एक छिपटी तोडली व रागाने तापत होऊन त्यांचा प्रतिकार आगेकूच केली. आम्ही 'जसला तस' झाल्यामुळे ती बदमाश मुले जरा घाबरलीच..!

त्या नंतर त्या मुलांनी कधी त्रास दिला नाही. "जशास तसे" हे त्याचे खरे उत्तर होते. माझ्या बालपणातील/ विद्यार्थी जीवनातील हा एक प्रसंगात्मक क्षण मला आठवत राहतो. 


Rate this content
Log in