Chandanlal Bisen

Inspirational

2  

Chandanlal Bisen

Inspirational

'टुमदार घर, उपकाराचे विसर'

'टुमदार घर, उपकाराचे विसर'

2 mins
150


एक कावळा होता. इतर कावळ्यांपेक्षा हुशार व कर्तबगार होता. सृजनशील गुण त्याच्या अंगी होते. त्याच्या मनात भन्नाट एक कल्पना सुचली की, आपण एक सुंदरसा अवरस-चवरस टुमदार घरटं बांधावं. माझ्या घरट्यासारखं या पक्षी जगात कुणाचंच घरटं असणार नाही, आणि असं घरटं की, नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण होईल. माझ्या बांधण्यात येणाऱ्या घरट्यावर ऊन्ह, वारा, पाऊस, यासारख्या आपत्तीदायक गोष्टीचा घातक परिणाम होणार नाही.

    आपल्या सहचारिणी पत्नीला त्यांनी आपल्या मनातील बेत सांगितला. पत्नीला सुद्धा घरटं बांधण्याचं बेत आवडला. म्हणाली, मी सुद्धा प्राणपणाने तुमच्या कार्यात मदत करीन. पावसाळा सुरू व्हायला फक्त एक महिना बाकी होता. दोघेही मिळून-मिसळून लागले कामाला..चहू दिशेतून मटेरियल आणून आपल्या कल्पकतेतून एक-एक वस्तू भव्य-दिव्य घरट्याला जोडू लागली. पाहता पाहता एक मोठं टुमदार घरटं, पावसाळा सुरू होण्याच्या आठ दिवस पूर्वीच तयार झाला.

     मऊ गादी तयार करण्यात आली. जमातीच्या लोकात टुमदार घरट्याची वाहवा होऊ लागली. आपल्या परिवारांसह निश्चन्त घरट्यात राहू लागली.

      एक चिमणी सुद्धा शेजारीच आपल्या परिवारासह सुखाने आपल्या घरट्यात राहत होती. एकदा जोरात वादळासह, मेघ गर्जनेसह पाऊस पडला. जवळून एक नदी वाहत होती. नदीला पूर आला होता. नदीच्या काठावर असलेल्या झाडावरच्या फांदीवर घरटं वसलेलं होतं. त्या वादळात घरटं सरकल्याची चाहूल लागली. तसंच परिवाराला धोक्याची सूचना अवगत करून क्षणाचाही विलंब न करता कसंबसंतरी कावळ्या शेजारी असलेल्या गर्द घनदाट झाडावर विसावा घेत, कावळ्याला मदत मागावं, अशी कल्पना मनात जागी झाली.    एके समयी आपण कावळे भाऊला आसरा दिला होता. तो आपल्याला नाही म्हणणार नाही. तो आपल्या घरात पावसाळ्याच्या काही दिवस नक्कीच राहू देईल, मला विश्वास आहे, असे आपल्या परिवारासह बोलून, चिमाणिताई परिवारासह कावळे भाऊच्या द्वाराशी गेल्या. द्वारावर चोचीने टिकटिक करू लागली. कोण आहे बाहेर म्हणून, बाहेर येऊन पाहतो तर समोर चिमणी ताईचा परिवार..तो समजला. ही मला आसरा मागायला आली. 

    चिमणी म्हणाली कावळे भाऊला: माझे घरटे नदीत वाहून गेले, मला पावसाच्या सरी संपेपर्यंत आसरा देशील का रे भाऊ? छे! मी नाही देणार असरा-गीसरा..! खूप विनवणी केली चिमणी ताईने; पण त्याचा अजिबात फरक पडला नाही. कावळे भाऊनी द्वाराची कडी लावून टाकली. मोठ्या विवेचनेत पडली चिमाणिताई. आता काय करावं, कुठं जावं? एके समयी मी याला असा दिला होता; पण हा भाऊ बेईमान झाला. या भाऊला गर्व झाला. 

    ताईने क्रोधात येऊन, शाप दिला. भाऊ तू उपकारास विसरलास..! माझे घर जसे नदीत वाहून गेले, तसेच तुझे सुद्धा घर एकेदिवशी वादळात नेस्तनाभूत होईल. पुन्हा धोधो पाऊस पडू लागला त्यात चिमनिसह परिवार गतप्राण झालेत. पुढील पावसाळ्यात चिमणीताईच्या शापाने कावळेभाऊ सुद्धा सह परिवार गतप्राण झालेत.


बोध- उपकाराची परतफेड करणे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational