Chandanlal Bisen

Action

4.0  

Chandanlal Bisen

Action

वाटेरु

वाटेरु

1 min
279


एक वाटेरु डोक्यावर गाठोडे घेऊन वाटेने निघाला होता. उन्हाळ्यातील नवतपाचे दिवस होते. चालून- चालून खूप दमला होता. घामाने भिजून चिंब झाला होता. त्याला खूप तहानभूखही लागली होती. काही अंतरावर मोठे आंब्याचे झाड दिसले. त्याला वाटले थोडा विसावा घ्यावा.

  गाठोळे खाली ठेवले, पळसाची पाने तोडली व त्यावर निवांत बसला. आपल्या जवळची एक भाकरी खाल्ली व पाच सहा घोट पाणी प्यायला, आंब्याचा एक पाळ खाल्ला, डोक्याखाली गाठोळे ठेवून अर्ध्या तासाची वामकुक्षी घेतली.

    डोळे उघडले. आता त्याला ताजेतवाने वाटू लागले होते. बसल्या-बसल्या त्याच्या डोक्यात विचार आला की, आपल्या पूर्वजांनी लावलेले झाड किती कामात येतात? त्याचे मोल शब्दात नाही तोलू शकत.    आपले पूर्वज भविष्याचा वेध घेणारे नक्कीच होते. येणाऱ्या पुढील पिढी करिता नियोजन होता त्यांच्याकडे..! ते आपला विचार न करता भावी पिढीचा विचार करून, प्रत्यक्ष कृती अमलात आणायचे. किती शहाणे होते आपले पूर्वज?

     आम्ही आयतेच पाहतो. पूर्वजांनी केलेल्या पुुण्य कर्माचे फळ नुसते चाखत बसतो. आपण किती ऐतखाऊ आहोत? असे त्याला वाटू लागले. पूर्वजांची प्रेरणा डोक्यात शिरली.

     आता आपणही एक पाऊल पुढे टाकायचा, असे त्यांनी निर्धार केले. वाटेरुनी येत्या जून महिन्यात दोनशे झाडे लावण्याचा निश्चय केला. आपले गाटोळे डोक्यावर घेऊन, झाडे लावण्याचा निर्धार मनात घोळवत पुढच्या प्रवाशाला निघाला.


बोध- सर्वांनी, पूर्वजांची प्रेरणा घेऊन, असेच निर्धार पूर्वक झाडे लावण्याचे कार्य केले तर, पूर्ववत अभयारण्ये निर्माण होतील. पृथ्वीतलावर, स्वर्गापरी सुख समृद्धी नांदेल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action