STORYMIRROR

Dilip Bhide

Drama Action Classics

4.5  

Dilip Bhide

Drama Action Classics

ह्याला जीवन ऐसे नाव भाग ५ दूसरा

ह्याला जीवन ऐसे नाव भाग ५ दूसरा

6 mins
470


भाग 5

भाग 4 वरुन पुढे वाचा ..............


लोकांना मराठी जरी कळलं नाही तरी आशय कळला. हॉल मध्ये pin drop silence. पंडित पूजा सांगायला बसला होता म्हणून पाहुण्यांपैकी दोन बायकांनी स्वयंपाकाचा जिम्मा उचलला. जेवण झाल्यावर श्रीवास्तव नामक एक माणूस म्हणाला की.

“पंडित हमारी समजमे ये तो आ गया की आपको आरती और कथा आती नहीं है इसलिए आपने नहीं किया. लेकिन इसके बावजूद आपने जो प्रवचन दिया वो भी अपने जगह पर सही था. लेकिन एक दो बाते और पुछनी थी, पुछू ?”

“सरजी, मैं बहुत छोटा आदमी हूँ. अगर आप मजाक नहीं कर रहे हैं, तो मेरी समज के अनुसार मैं जवाब दे सकता हूँ.” पंडित विनयाने बोलला.

“अरे नहीं नहीं, जिस तरहसे आपने पूजा की हैं, हम आपका मजाक उड़ानेकी सोच भी नहीं सकते. आप हमारे लिए आदरणीय हैं. क्यूँ भाई?” – श्रीवास्तव

“हाँ हाँ बराबर हैं.” सगळ्यांनी एका आवाजात म्हंटलं.

“ठीक हैं पूछिए.” – पंडित. 

“आपने शूरवात मे शायद सरस्वती वंदना की. किसलिए? सबसे प्रथम गणेश वंदना करते है ना?” – श्रीवास्तव.

“आपकी बात सही हैं” पंडितनी उत्तर दिलं. “लेकिन देवी सरस्वती वाणी की देवता हैं. पूजा के लिए मंत्रोच्चार करते समय मेरी वाणी कहीं अटक ना जाए और उच्चार शुद्ध रहे इसके लिए मैंने सरस्वती देविसे प्रार्थना की. अगर आपको कहीं मेरे उच्चारण मे कोई कमी नजर आई होगी तो बता दीजिए, मैं सुधार लूँगा.”

“अरे, नहीं भई, हम क्या गलतिया निकालेंगे आपकी, हम तो ये पूछ रहे हैं की, क्या सिर्फ पूजा करनेसे पुण्य बढ़ जाएगा ? और कैसे पता चलेगा ?” – पुन्हा श्रीवास्तव म्हणाला.

“नहीं सिर्फ पूजा करनेसे पुण्य मे वृद्धि नहीं होती.” – पंडित.

“पंडित ये आपने क्या कह दिया,” पुन्हा एकदा श्रीवास्तव, त्याचं शंका समाधान काही होत नव्हतं. “ये तो contradictory statement हो गया.”

“नहीं, ऐसा नहीं हैं. मैं थोड़ा विस्तारसे बताना चाहूँगा. देखिए, आपको पताही होगा की एक लोहेकी पट्टीपर चुंबक घुमानेसे, पट्टी भी चुंबक बन जाती हैं. ये परिवर्तन कैसे आता हैं ? कोई भी पदार्थ अणु ,परमाणु से बना होता हैं. ये अणु किसीभी दिशामे घूमते रहते हैं. इसको random motion बोलते हैं. चुंबक घुमानेसे उसकी गति streamline होती हैं. और इसकी वजहसे वो भी चुंबक बन जाता हैं. ठीक उसी तरह मंत्र जागरण से, आपके दिमाग या मन मे जो विचार हैं, जो भटक रहे हैं, जिस पर आपका कोई कंट्रोल नहीं हैं, वो थोड़े स्थिर हो जाते हैं और आपका मन शांत हो जाता हैं. शांत मनमे अच्छे विचारही आते हैं और अच्छे विचारोसे आप अच्छा काम भी कर जाते हैं. अब आपही सोचिए अच्छे काम का फल पुण्य ही होगा. आपने पढ़ा होगा या कहानी मे सुना होगा की पुरातन काल मे राजा महाराजा लोग काफी यज्ञ और अनुष्ठान करते थे, इसकी यही वजह हैं, उनकी सतसद्विवेकबूद्धि कायम जागृत रहती थी और उन्हे प्रजा के प्रति सदाही सजग रहनेके लिए प्रेरित करती थी.” आता यावेळेस पंडितने षटकार मारला होता. 

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. कदाचित पंडित जे काही बोलला त्यावर विचार करत होते बहुधा. पंडित ने एक नी:श्वास टाकला. त्याला वाटलं की त्याची सुटका झाली. हे सर्व तत्वज्ञान त्याच्या साठी पण भारी होतं. तो हे सगळं कसं काय बोलला याचच त्याला आश्चर्य वाटलं. मॅडम त्याच्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघत होत्या. आधी धोबी, मग फायटर मग चौकीदार मग स्वयंपाकी आणि आता पंडित, संस्कृत मंत्रोच्चार सुद्धा सुस्पष्ट आणि खणखणीत आवाजात, त्यांना कळेना की हा माणूस आहे तरी कोण ? नक्कीच दिसतो तसा नाहीये. सर्व महिलावर्गावर तर मोहिनीच पडल्यासारखी झाली होती. सगळे त्याच्याकडेच बघत होते. पंडितला त्या नजरा झेलणं कठीण झालं. तो बसल्या जागीच चुळबुळत राहिला. त्याला कधी एकदा हे सगळं संपतं अस झालं होतं. तो उठला. मुझे बहुत सारा काम निपटाना हैं, अब मुझे इजाजत दीजिए. अस म्हणून किचन मध्ये जायला निघाला. पण त्याला लोकांनी थांबवलं. लोक अजून काही ऐकायला उत्सुक होते. आता आणखी किती परीक्षा होणार आपली या विचारांनी पंडितच्या पोटात गोळा उठला. पण इलाज नव्हता त्याला ह्या नवीन भूमिकेला न्याय द्यावाच लागणार होता. काही पर्याय उपलबद्धच नव्हता. जमलेल्या लोकांमध्ये कानपूरलाच स्थायिक झालेली दोन मराठी कुटुंब होती. त्यांच्यापैकी एक म्हणाली

“पंडित आम्ही मागच्या वर्षी सांगलीला लग्नाला गेलो होतो. तिथे गणेश

याग झाला होता. तेंव्हा जसं प्रसन्न वाटलं तसंच आज वाटलं. आमच्याकडे तुम्ही याल का ? यांची पण फर इच्छा आहे गणेश याग करायची.” तिचा नवरा लगेच म्हणाला. “ हो हो खरंच गुरुजी याल का तुम्ही आमच्याकडे ? आम्हाला फार आनंद होईल तुम्ही आलात तर.” आता ते संबोधन पंडित न करता गुरुजी करत होते. आता लोक त्याच्याकडे आदराने पहात होते. पंडितला कळेना काय बोलावं ते. मॅडम कडचं काम सोडून तो केंव्हाही जाऊ शकत होता पण गुरुजी असा शिक्का बसल्यावर सोडून जाणं अवघड झालं असतं. त्याला typecast व्हायचं नव्हतं. म्हणून तो सुटका करून घेण्याच्या इराद्याने म्हणाला.

“खरं सांगायचं तर मी पुरोहित नाहीये. मॅडमची अडचण होती, ती मी सोडवली इतकंच. पुरोहित व्हायचं तर तशी संथा घ्यावी लागते. मला इच्छा होती म्हणून मी हे सगळं शिकलो. पण त्याचा व्यावसायिक उपयोग नाही करता येणार. तसं केलं तर ते चुकीच होईल. त्यामुळेच मी मॅडम कडून फक्त एक रुपया घेतला, दक्षिणा म्हणून. आणि म्हणूनच मी तुमच्या विनंतीचा स्वीकार नाही करू शकत. मला माफ करा.” पंडितचं उत्तर ऐकून ती मंडळी नाराज झाली, पण त्याला इलाज नव्हता. समारंभ संपला आणि सगळी मंडळी आपापल्या घरी निघाली. पंडित पण सगळी आवरा सावर करून झोपायला गेला.

एक दिवस मॅडम म्हणाल्या की “पंडित, मला उद्या वेळ आहे. जे काही सामान, सुमान आणायचं आहे त्यांची लिस्ट करून ठेव. उद्या शनिवारी दुपार नंतर मला वेळ आहे. आपण सुपर मार्केट मध्ये जाऊ.”

सुपर मार्केट मध्ये बरीच गर्दी होती आणि खरेदी आटपता आटपता रात्रीचे आठ वाजले. मॅडम म्हणाल्या की पंडित आता घरी जावून स्वयंपाक करायचा, त्यापेक्षा आपण इथे एक चांगलं हॉटेल आहे तिथेच जेवू. पंडितला नवल वाटलं. तसं त्याच्या हे आधीच लक्षात आलं होतं की हळू हळू त्याच्याकडे बघण्याचा मॅडम चा दृष्टीकोन बदलत चालला आहे. आणि पूजे नंतर तर बराच फरक पडला होता. घरातलाच एक माणूस समजून आता मॅडम त्याच्याशी वागत होत्या. नोकर, मालकाचं नातं, केंव्हाच संपलं होतं.

जेवण झाल्यावर, पार्किंग मध्ये गाडी काढायला जातांना दुसरी गाडी अचानक रिर्वस मध्ये येऊन त्या गाडीने मॅडम ला उडवलं. त्या वेळी पंडित सामान गाडी मध्ये ठेवत होता. तो लगेच धावला, मॅडम पडल्या होत्या त्यांना उठवायचा प्रयत्न करत होता पण त्यांना उठता येत नव्हतं. तो दूसरा गाडीवाला पण थांबला. त्यांनी मदत केली आणि मॅडमना मागच्या सीटवर झोपवलं. त्यांनी आपलं कार्ड दिलं आणि म्हणाला माझी चूक झाली आहे आणि जो काही खर्च येईल तो देईन. तो तर निघून गेला.

मॅडम कारच्या मागच्या सीट वर विव्हळत होत्या. त्यांना ताबडतोब हॉस्पिटल नधे नेण आवश्यक होतं. पंडित ने त्यांनाच विचारलं की कोणच्या हॉस्पिटल मध्ये जायचं. त्यांनी हॉस्पिटलच नाव सांगितलं. पंडितने मोबाइल वर गूगल मॅप लावला आणि ड्रायव्हिंग सीट वर बसला. हॉस्पिटलला पोचल्यावर सगळ्या गोष्टी पटापट झाल्या. क्ष किरण तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले की पायाचं हाड मोडलं आहे आणि ऑपरेशन करावं लागणार आहे. उद्या सकाळी ऑपरेशन करू. आणि त्यांना अॅडमिट करून घेतलं. मॅडम नी सांगितल्या प्रमाणे, पंडितने त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला विषाखाला फोन केला. अर्ध्या तासात त्या आणि त्यांचे पती दोघेही येऊन पोचले. रात्रभर सर्वच हॉस्पिटल मध्ये होते.

चार दिवसांनी मॅडम घरी आल्या. पायाला प्लास्टर लावलं होतं. नंतर वेगळच रुटीन सुरू झालं. दिवसभर एक बाई देखभाल करायला असायची. ती रात्री नऊ ला गेली की मॅडम झोपायला जायच्या. दिवसभर पंडित मॅडम च्या सेवेत असायचा. त्यांना काय हवं नको सगळं निगुतीने बघायचा. संध्याकाळी कोणी ना कोणी चौकशी करायला येऊन जायचं. त्यांच्या समोर मॅडम सतत पंडितची तारीफ करायच्या. पंडितला अवघडल्यासारखं व्हायचं. या काळात मॅडम दिवसभरच घरी असायच्या त्यामुळे पंडित आणि मॅडमच्या बऱ्याच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. एक दिवस त्यांनी पंडितला विचारलं की “इतक्या वेगवेगळ्या विषयांबद्दल तुला बरीच माहिती कशी काय आहे ?” तेंव्हा पंडित ने सांगितलं होतं की त्याला वाचनाची खूप आवड होती त्यामुळे बरीच माहिती त्याच्याजवळ गोळा झाली आहे.

“आणि पूजा आणि मंत्र ? ते केंव्हा शिकला ? त्याच्यासाठी तर बरीच वर्ष खर्ची घालावी लागतात. पण एवढी वर्ष घालवून सुद्धा तू म्हणतोस की तू पौरोहित्य करणार नाहीस म्हणून, हे कसं काय ?” मॅडमचा दूसरा प्रश्न.


क्रमश: .............



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama