Jyoti gosavi

Drama Tragedy


5.0  

Jyoti gosavi

Drama Tragedy


कथा तिची व्यथा तिची

कथा तिची व्यथा तिची

11 mins 913 11 mins 913

आजही तो दिवस आठवला कि तीच्या मस्तकाची शिर हलते, आणि घरातल्या त्याला हाकलून द्यावे अशी तीव्र इच्छा तिच्या मनात होते त्यातूनच आज-काल त्याचे डेरिंग वाढलेले होते. नवरा म्हणून ती आता त्याचा विचार देखील करू शकत नव्हती.

फक्त दोन वेळच्या अन्नाला मोताद झालेला हा माणूस रस्त्यावर कुठे टाचा घासून मरू नये म्हणून तिने त्याला आश्रय दिला होता

 तिने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर मागील वीस वर्षांचा चित्रपट उभा राहिला

ज्या काळात लोकांना कॉम्प्युटर मधला सी देखील माहीत नव्हता त्याकाळात तो कॉम्प्युटर इंजिनिअर झाला आणि त्याने स्वतःची सरकार मान्य संस्था उघडली. खरेतर टाईपरायटर बडवण्याचा तो काळ, नुकताच कोठे कॉम्प्युटर उदयाला येऊ लागला होता काळाची पावले ओळखण्यात तो हुशार होता इथून पुढचा काळ फक्त कॉम्प्युटरचा असेल हे त्याने ओळखले आणि स्वतःची सरकार मान्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली. छोटे छोटे तीन महिन्याचे, सहा महिन्याचे सरकार मान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले त्याच्या नावाचा बर्‍यापैकी बोलबाला होता. दहावी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कॉम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळत होती. त्याचे नाव ऐकूनच ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली.

त्यादिवशी नेमकी त्याची रिसेप्शनिस्ट आलेली नव्हती त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता.

एस्क्युज मी सर मला येथे ऍडमिशन मिळेल का?

अहो त्यासाठीच तर मी बसलोय ना! तो मिश्किलपणे म्हणाला त्यावर ती एकदम लाजली.

अरे वा सुंदर मुलींना लाजता पण येते वाटतं?

"अहो काहीतरीच काय"

ती अजूनच लाजली

आता लाजतच बसणार का ऍडमिशन पण घेणार? त्याने विचारले.

त्याने स्वतःहून तिला हजार रुपयाचे कन्सेशन दिले

तिने तर नुकतेच वयाचे सोळा ओलांडले होते तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल टाकलेले होते तरल, कोमल भावना आताशी कुठे तिच्या मनात उमलू लागल्या होत्या.

"सोळावं वरीस धोक्याचं" अशी तिची परिस्थिती होती आणि हीच त्यांची पहिली ओळख तिच्या मनात एक ठसा उमटवून गेली. तिलाही तो प्रथम दर्शनी आवडलेला होता. उंचापुरा धिप्पाड काळासावळा तरुण तिच्या हृदयात घर करून गेला तिचं वयच होतं प्रेमात पडायचं...

हळूहळू दोघेजण एकमेकांकडे चांगलेच आकृष्ट झाले .हिंडू फिरू लागले, नाटक सिनेमाला जाऊ लागले. हॉटेलिंग करू लागले ती आता मालकिणीच्या तोऱ्यात इन्स्टिट्यूटमध्ये वावरू लागली आणि यांचा प्रकरण घरच्यांच्या कानावर गेल.

दोघांच्या घरून देखील परवानगी मिळणे शक्य नव्हतं जाती-धर्माचा मोठा अडसर होता ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन होता. त्याचं नाव पीटर अल्मेडा तर तिचं नाव नंदिनी हसबनीस.

घरची जेमतेम परिस्थिती असल्याने तिला दहावीच्या शिक्षणानंतर कॉम्प्युटर कोर्सला घातले घरात तीच मोठी असल्याने एखाद्या वर्षाचा कॉम्प्युटर कोर्स केला की हिला नोकरी लागेल व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवली होती. पण ती शिक्षण सोडून नको ते उद्योग धंदे करत होती घरच्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रेनिंग मधून काढून घरात बसवलं. पण ते म्हणतात ना ,क्रिया कशी प्रतिक्रिया त्याप्रमाणे जेवढा घरातून विरोध झाला तेव्हढी यांनी जास्तच बंडखोरी केली व पळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वय अठरा देखील पुर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण घ्यायचे करिअर करायचे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली. त्याच्यासाठी तिने आपले घरदार, जात धर्म आई बाप सारं काही सोडलं. ब्राह्मण संस्कारात वाढलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली त्यांचे संस्कार पाळू लागली . दर रविवारी चर्चला जाऊ लागली. आई-बापानी तिचं नाव आणि राहता गाव दोन्ही सोडले तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले पाठीमागे एक बहीण होती हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात त्यांना बाधा नको होती.

पीटरच घरातील कर्ताधर्ता असल्यामुळे त्याच्या घरी एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता विधवा आई ,एक लग्न झालेली बहीण व दोन छोटे भाऊ असा त्याचा परिवार होता लग्न झालेल्या बहिणीचा नवरा बाहेरगावी असल्यामुळे ती माहेरीच राहत होती

सुरुवातीला त्या मायलेकींनी तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्यांचा विरोध मावळला नंदिनीची ती आता रिटा अल्मेडा झाली होती.

काळ पुढे सरकत गेला त्यांना दोन मुले देखील झाली तिने हट्टाने मुलीचे नाव गार्गी ठेवले मुलाचे नाव मात्र त्यांच्या पद्धतीने अल्वीन ठेवले

हिंदू धर्माचे काही संस्कार ती पुन्हा पाळू लागली. नाही म्हटलं तरी पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला जाता-येता हात जोडण्याची सवय होती ती काही केल्या जाईना. लग्नाला पाच वर्षे झाली ती त्यांच्यात साखरेसारखे विरघळत गेली संसारिक तर ती होतीच. माहेरी जेमतेम परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती त्यामुळे ती पाठीमागे पैसा टाकू लागली .खूप दिवस झाले घरात गणपती आणण्याची इच्छा होती नवर्याला पटवून तिने घरी गणपती देखील बसवला कुरकुरत का होईना सासू आणि नणंदेने परवानगी दिली. पाच दिवस तिने मोठ्या आनंदात घालवले मनाला थोडी शांती वाटली ती तेवढ्याच भक्तिभावाने चर्चमध्ये देखील जात असे मात्र आताशा तिला पीटर साठी वेळ देता येत नव्हता. ती आपली घरकाम आणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता .पीटर देखील थोडे अंतर राखूनच राहू लागला सतत तक्रारीचा व नाराजीचा सूर लावू लागला दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घर कामात ती थकून जात असे त्याला मात्र पहिल्यासारखीच बायको नटून-थटून आपल्या स्वागताला टवटवीत दिसली पाहिजे असे वाटते असे. ती मुलांची आई झाली होती ती पण तो मात्र अजुन नवराच राहिला होता. तो मात्र बाप झाला नव्हता


त्याचे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोराने चालत होती हातात पैसा खुळखुळत होता मग त्याला चारी दिशांनी पाय फुटतात एकदा गंमत म्हणून तो डान्स बार मध्ये मित्रानं बरोबर गेला दारू चे संस्कार तर त्याच्यावर लहानपणापासून होतेच तेथे नाचणाऱ्या मुलींमध्ये सपना नावाची डान्सर त्याला आवडली तिच्यासाठी तो रोज रोज डान्सबारमध्ये जाऊ लागला. तिच्यावर नोटा उडवू लागला .इकडे शशमात्र घरात पैसे देईन जेमतेम घर चालवणे पुरता पैसा तिच्या हाती पडू लागला इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्या मुलांची आबाळ होऊ लागली.

ही सपना बांगलादेशी मुस्लिम होती ती या महानगरी च्या उपनगरात आपले पोट भरण्यासाठी आली अशा हजारो बांगलादेशी मुस्लिम मुली मुंबईत सपना ,विणा, मीना इत्यादी नावाने वावरत असत. तिने पण हा आपल्यावर लट्टू आहे ते ओळखले व त्याला चांगली सेवा देत राहिली दोघेजण अधेमधे नाईट आउट ला पण जावु लागले आता त्याला सपना पुढे बायको म्हणजे सुरमई मच्छी पुढे वरण-भात वाटू लागली. तो सतत मनात दोघींची तुलना करू लागला. हळू हळू त्याचं ते लफडं देखील घरात माहीत झालं त्यावरुन नवरा बायकोचे सतत खटके उडू लागले एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील टाकला. त्यावेळी तिला आईवडिलांचे बोल आठवले ,पण आता वेळ निघून गेली होती त्या दिवशीच्या मार पिटी नंतर तो सरळ सपनाच्या घरी जाऊन राहू लागला बायकोकडे त्याने पूर्ण पाठ फिरवली.

सपना च्या घरात देखील सगळ्या बायकांचा भरणा होता एक आई व पाठच्या तीन बहिणी यांचे पोट ती एकटी डान्सबारवर भरत होती. तिला पण घरात एका पुरुषाची गरज होती संरक्षणाच्या निमित्ताने घरात सुसूत्रता आणण्याच्या निमित्ताने एका म्होरक्याची तिला गरज होती.

आता तो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून मिळणारा सगळा पैसा सपना च्या घरी आणून टाकत होता.

इकडे मुलगा घरी देखील येत नाही व पैसा देखील देत नाही या कारणांनी तिचा भरपूर उद्धार होत होता वर घरात गणपती बसवला म्हणूनच असे झाले म्हणून तुला नवरा सोडून गेला असेदेखील त्यांनी तिला सांगितले शेवटी एक दिवस तिला घराच्या बाहेर काढले.


नणंदेला बाहेरगावावरून नवऱ्याचा पैसा येत होता आज पर्यंत तिने स्वतःचा एक पैसा देखील या घरात खर्च केला नव्हता आता मात्र मायलेकींची त्या पैशात चांगले भागत होते

प्रश्न होता नंदिनीचा, माहेरी जायला तोंड नव्हते सासरी कोणी घरात घेत नव्हते दोन वेळेच्या खाण्याचे देखील वांदे होते .त्यात मुलांना घेऊन ती कोठे जाणार ?एकटी असती तर जीव तरी दिला असता पण आता या दोन मुलांच्या प्रेमाच्या बेड्या तिला मागे खेचत होत्या .

अचानक तिला आपण साठवलेल्या पैशांची आठवण झाली लहानपणी आई-बापांनी लावलेली बचतीची सवय आज कामाला आली होती. बँकेत जाऊन तिने बघितले तर जवळजवळ अडीच लाख रुपये रक्कम तिच्या नावाने होती तिला तर एकदम 

"खुल जा सिम सिम"असे झाले त्याकाळी अडीच लाख म्हणजे खूप होते त्यात तिने रेडिमेट कपड्याचे दुकान" गार्गी रेडिमेट फॉर ऑल फॅमिली" "नावाने टाकले.

टेलरिंग चा कोर्स केला रेडीमेड ब्लाऊज साठी एक वेगळा विभाग ठेवला. त्याकाळी स्रिया आपली साडी घेऊन प्रत्येक मॅचींग सेंटर मध्ये फिरत असत . व मॅचिंग रंगाचा कपडा निवडून ब्लाऊज शिवायला टाकत.

तेव्हा तिने आरसे वाले, गोंडे वाले ,रेडीमेड ब्लाऊज शिवून विकायला सुरुवात केले त्या व्यवसायाचे खरी फाउंडर ती होती.

लगेच काही जादूची कांडी फिरली नाही पण व्यवसायातले चढ-उतार बघत बघत हळूहळू तिचा जम बसत गेला आता तर तिचे ब्लाऊज परदेशात देखील एक्सपोर्ट होऊ लागले. मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडीमेड ब्लाउज वरती लक्ष केंद्रित केले चार मशीन टाकून त्यावर कामासाठी व विक्रीसाठी मुली ठेवून ती आता गल्ल्यावर बसू लागली. 

बघता-बघता पंधरा वर्षाचा काळ कसा गेला कळलेच नाही मुले मोठी झाली मुलगा इंजिनिअरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ लागले. तारुण्याचा बहर ओसरून ती आता चाळिशीला आली पिकलेले केस डोक्यात डोकावू लागले.

न ऊल्हासे न संतापे"

अशा विरक्त वृत्तीने ती जीवन जगत होती.

तारूण्यात आईबापाचे न ऐकता एकदा केलेल्या चुकीचे परिमार्जन तिने पुरेपूर केलेले होते. आपल्या आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासून पाहिल्यामुळे मुले पण एकदम समंजस निघाली.

दुपारी एक ते तिन जेवणाची वेळ आपला डबा ती कामाला असलेल्या मुलीं बरोबर बसून खात असे मी मालकीण, व त्या कामवाल्या मुली असा भेदभाव कधी केला नव्हता. त्यादिवशी ती तशीच सर्वांसोबत जेवायला बसली असताना पहिला घास तोंडात घालणार तोच

"मॅडमजी आपको कोई मिलने आया है, लगता तो भिकारी जैसा है पर आप को नाम से पुछ रहा है इसके लिए आपको बुलाने आया"

दारावरचा सिक्युरिटी मोठ्या अजीजीने बोलत होता

तिने बाहेर येऊन बघितले तर खरोखरी दाढी वाढलेला अत्यंत कृश झालेला उंच माणूस तिच्या दारात उभा होता. तिच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह पाहून"मला ओळखलं नाहीस नंदू ? तिच्या लाडक्या नावाने त्याने हाक मारली

तिला नंदू या नावाने फक्त तीनच माणसे हात मारत असत एक तिचे आई-वडील आणि दुसरा तिचा नवरा. निव्वळ त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखला त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला सगळ्या जुन्या आठवणी क्षणभर उफाळून आल्या. याच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची धर्माची सगळी बंधने तोडून त्याच्यापाशी आली होती आणि त्याने तिचा विश्वासघात केला होता. त्याच्यावर अशी परिस्थिती आल्यावर निर्लज्जपणे तिच्या दारात उभा होता.

गेल्या पंधरा वर्षात ती मेली किंवा जगली मुले कोठे आहेत ?कशी आहेत ?काय करतात? याची साधी त्यांनी चौकशी देखील केलेली नव्हती. तिला त्याची घृणा आली.

ती पाठ फिरवणार तोच प्लीज नंदू माझ्याकडे पाठ फिरवू नको जगाने मला ठोकरले, तरी तू माझ्यावरती प्रेम केले होतेस, तू माझी लग्नाची बायको आहेस, तो तिला प्रेमाचा व लग्नाचा वास्ता देऊ लागला.

"तुला आता माझी आठवण आली का ?असे म्हणून ती पाठफिरवून चालू लागली तर हा तिच्या पायावरच पडला आणि क्षमा मागू लागला शेवटी स्त्री ची जात लगेच पाझर फुटतो शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने त्याला सिक्युरिटी बरोबर घरी पाठवले तिथे न्हावी बोलावून दाढी केस कापून घ्यायला सांगितले ,घरातील नोकराकडून आंघोळ घालून घेतली चांगले कपडे घातले तेव्हा कुठे तो ओळखू आला

ज्याच्या उंचापुरा धिप्पाड शरीरावर कधीकाळी आपण प्रेम केले होते ,तो हा नव्हता याला एच आय व्ही ची लागणझालेली होती आज काल टीव्ही पाहून व युट्युब वरून सर्वांनाच याचे ज्ञान असते

तिला सोडून गेल्यानंतर पंधरा वर्षाचा आढावा त्याने खालील प्रमाणे दिला.

सुरुवातीची दोन चार वर्ष सपनाच्या फॅमिली बरोबर चांगली गेली. हा जे पण कामावर होता ते सारे तिच्या फॅमिलीला देत होता पण त्या सार्‍यांना छान छोकीची सवय लागलेली.  चांगले ब्रँडेड कपडे, हॉटेलिंग रोजच्या रोज फिरायला बाहेर पडणे दागिने गुटका, दारू हे सारेच शौक त्या फॅमिली ला होते त्यांना फक्त दोन वेळचे जेवण कपडालत्ता डोक्यावर छप्पर एवढेच पुरेसे नव्हते.

सपना परत बार मध्ये जाऊ लागली रोज रोज नव्या गिऱ्हाईका बरोबर नाईट आउट जाऊ लागली. याला कोणी घरात किंमत देईना.

त्याच्या अनियमिततेमुळे त्याची इन्स्टिट्यूट चालेना एक तर बाजारात नव्या नव्या संस्था उदयास आल्या याचे कॉम्प्युटर आता जुन्या वर्जन चे झाले त्यामुळे कोणी याच्याकडे फिरके ना शिवाय हा घरदार सोडून बारवाली कडे राहतो ही गोष्ट काही लपलेली नव्हती. जरी कोणी तोंडावर बोलले नसले तरी धंद्यावर परिणाम झालाच. एक तर याचे पहिले आपल्याच विद्यार्थिनीशी लव मॅरेज व आता बारवाली चे प्रकरण त्यामुळे आपल्या मुली कोणी तेथे शिक्षणासाठी पाठविना शेवटी त्याने जागे सकट संस्था विकली. तो पैसा देखील सपनाचा फॅमिलीत घातला. सपना च्या वागण्याने आता त्याला डिप्रेशन आले तो दिवस रात्र दारूत बुडून जात होता. अधेमधे कुठल्यातरी इन्स्टिट्यूटमध्ये त्याला तासावर लेक्चर चे काम मिळे. ते नाही मिळाले कॉम्प्युटर दुरुस्ती पण करीत असे त्याबाबतीत तो हुशार होता. स्वतःच्या पोटापुरता पैसा मिळवू लागला शेवटी पाच सहा वर्षांनी त्यांनी त्याला हाकलून दिले

"मी काही तुझी लग्नाची बायको नाही तुला पोसायची माझी जबाबदारी नाही"असे त्याला सपनाने सांगितले व बाहेरचा रस्ता दाखवला त्या काळातलाकॉम्प्युटर इंजिनियर बाई व बाटली च्या नादाने पार रस्त्यावर आला .

 स्टेशन वर हमाली करु लागला ,रस्त्यावर बिगाऱ्याची कामे करू लागला, चार दिवस कमवायचे आणि चार दिवस मग दारू ढोसून कोणत्यातरी बाईकडे पडायचे हा त्याचा नित्यक्रम झाला त्यातचं त्याला कधीतरी एड्स लागला आता त्याला कोणीच विचारीना.  कोणी कामावर पण घेईन तो फिरून फिरून सपना च्या दारात गेला. ती एका शेख बरोबर दुबई ला गेली होती तिच्या दोन्ही बहिणी डान्स बार मध्ये काम करत होत्या . ज्या पोरींना तो सपनाच्या बहिणी म्हणून फिरायला नेई, त्यांचे लाड करत असे, त्यांना भारी भारी कपडे घेऊन देत असे, त्या आता त्याला ओळख देखील देत नव्हत्या शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला.

सहज दुकानाचे नाव"गार्गी"बघून त्याने इथे नंदू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात मारलेला नेम बरोबर लागला खरोखरी त्याची नंदू त्याचे पुढे उभी होती.

तिने त्याला घरी नेले खरे पण त्याला स्पष्टपणे सांगितले दोन वेळचे जेवण ,डोक्यावर छप्पर आणि वेळेला औषध पाणी याशिवाय तुला काही मिळणार नाही. 

मी तुझी बायको नाही किंवा ही मुले तुझी नाहीत. तू कोणताही नातेसंबंध दाखवायचा नाही हाँल शिवाय घरात कोठेही डोकवायचे नाही.मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही या सर्व अटीवर तो तेथे राहण्यास तयार झाला. दोन टाईम व्यवस्थित जेवण औषध उपचार त्यामुळे तो जरा तरतरीत झाला त्याच्यातील नवरा पुरुष पुन्हा जागा झाला त्याला आता हे घर व घरातील माणसे त्यांच्यावर हक्क वाटू लागला. एकदा ती नसताना मुलांना त्याने मी तुमचा बाप आहे हे पण तुमची आई मला नीट वागवत नाही अशी तक्रार देखील केली त्यावर मुलांनी त्याला साफ धुडकावून लावले. आमच्या लहानपणापासून आमची आई आमच्यासाठी आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभावत आहे आम्हाला वडील नाहीत.

संध्याकाळी मुलांनी आईला सांगितले तू जो माणूस घरात आणून ठेवला आहेस तो फक्त आमचा फिजिकल बाप आहे बाकी त्याचा आमचा काही संबंध नाही. तू आम्हाला लहानाचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्यावर बापाचा अधिकार गाजवतोय तू याला घरात ठेवू नको.

काय करावे तिला मोठा पेच पडला मुलांना दुखवता येईना व नवऱ्याला हाकलून देता येईना असेच काही दिवस गेले आज दुकानाला सुट्टी होती मुले पण दोघे पिकनिकला गेली होती ती घरात एक मेड व ती अशा दोघी जणी होत्या.

ताई तुम्ही घरात नसताना हा माणूस माझ्या अंगचटीला येतो एक धक्का दिला तर खाली पडेल पण मी तुमच्याकडे बघून त्याला मारत नाही पण जर जास्त झाले तर मी काम सोडून जाईन"

ही गोष्ट पण तिने कानाआड केली आता म्हातारपणी कुठे याला भीक मागायला लावू म्हणून ती गप्प होती तिच्या गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतला

तिची झोप लागलेली असताना तो हळूच बेडरुममध्ये शिरला व आतून कडी लावली व तिच्या अंगाशी झोंबू लागला तिला त्याची किळस आली तिचे डोकेच फिरले एखाद्या झुरळा सारखे तिने त्याला ढकलून दिले.

"मी तुझा नवरा आहे तू माझी हक्काची बायको आहेस माझी इच्छा तू पूर्ण केली पाहिजे असे म्हणून तो तिच्या अंगाशी झोंबू लागला तिने सरळ बेडरूम मधली कपडे वाळत घालण्याची काठी उचलली व त्याला धोपटायला सुरुवात केली तो पार निपचित पडल्यावर तिने हातातली काठी फेकली व दुःखाने मानसिक ताणाने ती मोठ्याने रडू लागली.

कसेबसे तिला तिच्या घरातील नोकरांनीने समजावले व त्याला ओढत बाहेर आणले.

दूर गोव्याकडे त्याचे एक छोटेसे खेडेगाव होते तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली.

"मला तुमच्यात राहू द्या मला माझ्या कुटुंबात मरु द्या मी पुन्हा असे करणार नाही वगैरे भावनिक साद त्याने घातली

पण ती चक्क पाठ करून उभी राहिली कामगारांनी त्याला गाडीत कोंबले व गाडी गोव्याकडे रवाना झाली.

पंधरा वर्षे दाबून ठेवलेल्या साऱ्या भावभावना तिच्या डोळ्यातून वाहत होत्या पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येऊन तो वादळ निर्माण करून गेला.Rate this content
Log in

More marathi story from Jyoti gosavi

Similar marathi story from Drama