योगसामर्थ्य
योगसामर्थ्य
योगाचे सामर्थ्य
उद्या 21 जून हा जागतिक योग दिन आहे. या योग दिनाचा योगा डे कधी झाला ते आपल्याला समजलेच नाही. आपलाच माल नेऊन, चकाकत्या वेष्टनात मध्ये टाकून आपल्यालाच विकायचा अशी परिस्थिती. वास्तविक योगशास्त्र हे संपूर्णपणे भारतीय असून त्यावर भारताचाच अधिकार आहे. आपल्या देशभर अनेक छोटे मोठे हठयोगी, योगा करणारे होते, परंतु जागतिक पातळीवर मात्र बाबा रामदेव यांनी योगाचे ग्लोबलायझेशन केले. आणि माननीय पंतप्रधान मोदी जी यांनी तो जगभर आंतरराष्ट्रीय योगा दिन केला. आता या योगाचे मूळ पाहूया योग म्हणजे एक विशिष्ट अध्यात्मिक प्रक्रिया आहे ज्याने आपल्या मनातील भावभावनांचा निरोध करता येतो ,असे पतंजलीने सांगितले. योग म्हणजे समाधी योग आहे असे व्यासांनी सांगितले. तर योग वशिष्ठ या ग्रंथामध्ये असं काही शास्त्र ज्यानुसार संसार सागर पार करता येईल असे सांगितले आहे . योगाची अनेक अंगे अशी आहेत की ज्यामध्ये ध्यान समाधी आणि मोक्षा पर्यंत जाता येते. हिंदू धर्म जैन धर्म आणि बौद्ध धर्म या तिन्ही धर्मांमध्ये योग संप्रदाय आहेत. सगळ्यात प्रथम ऋग्वेदामध्ये योग या शब्दाचा उल्लेख आहे. कठोपनिषदामध्ये योगाचा अर्थ समजावून सांगितला आहे जो आपण आजही त्या अर्थाने घेतो. इसवी सन पूर्व 30 शताब्दी च्या कालखंडात पतंजलीने योगसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. हठ योगा वरती नववी ते अकरावी शताब्दी या काळात ग्रंथ लिहिला गेला. योग मुख्यता आसनांवर आधारित आहे आणि परंपरागत योग हा ध्यान याच्यावर आधारित आहे पश्चिमी जगतात आपल्या अनेक गुरूंनी योग याबद्दल माहिती दिली आहे त्यामध्ये सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांनी येथे या विषयावरती अनेक सभा घेतल्या. या योगशास्त्राचे आठ नियम आहेत 1यम(संयम) 2 नियम (पालन) 3 आसन(आसन प्रकार आसनमुद्रा) 4 प्राणायाम (श्वास नियंत्रण) 5 प्रत्याहार (इंद्रियांना नियंत्रित करणे) 6 धारणा (एकाग्रता) 7 ध्यान (ध्यान) 8 समाधी(सेमी कॉन्शियस कंडिशन) योग मध्ये यम या शब्दाचा अर्थ आहे नियंत्रण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्यानुसार दररोजच्या योगसाधनेमुळे ताण तणाव दूर होतात मानसिक स्वास्थ्य मिळते वजन कमी करण्यास मदत होते चांगली झोप मिळते योग करण्याचे दहा लाभ 1 शारीरिक तंदुरुस्ती 2 मानसिक शांती 3 विचारात स्पष्टता आणि गोष्टी वरती फोकस 4 चांगली शांत झोप 5 शारीरिक उत्साह आणि मानसिक शांती 6 शांत आणि नियंत्रित श्वसन 7 वजनावरती नियंत्रण 8 रोगप्रतिकारशक्ती वाढवते योग करण्यासाठीचे 10 नियम नियमितता योग करण्यामध्ये नियमितपणा असावा सुखदस्थान ज्या जागी तुम्हाला शांतता आणि योगास योग्य असे वातावरण वाटेल खाली पेट योग करण्यापूर्वी दोन तीन तास पोट खाली असले पाहिजे योग्य आसन सुरुवातीला कोणाच्यातरी मार्गदर्शनाखाली केला असता ते तुमच्या शरीराला सूटेबल अशी असणे सांगतील योग्य श्वासो श्वास काही असं प्रक्रिया करताना दीर्घ श्वास हळूहळू घेणे हळूहळू सोडणे इत्यादी गोष्टींचे पालन स्थिरता योग करत असताना स्थिर आसन आणि स्थिर बन असावे स्वतंत्रता जी असं नाही दुसरे करतात ते तुम्हाला जमतीलच असे नाही तुमच्या क्षमतेनुसार करावीत स्नान योग अभ्यास करण्यापूर्वी स्नान करून बसावे प्राणायाम श्वासावर नियंत्रण संयम मनावर संयम योगाचे स्थूल मानाने चार प्रकार मांडले जातात कर्मयोग ज्यामध्ये आपण शारीरिक क्रिया करतो आणि आध्यात्मिक विकास प्राप्त करून ध्यान योग करण्यापर्यंत पोहोचतो भक्ती योग योगाच्या या मार्गामध्ये भक्ती आणि प्रेम जे मीराबाईंनी केले आपल्याकडील अनेक साधुसंतांनी केले त्यातून ध्यानधारणेपर्यंत जाता येते तो भक्तीयोग ज्ञानयोग यामध्ये ज्ञान आणि बुद्धीने तुमचा अध्यात्मिक विकास करून घेणे आणि धान धारणे पर्यंत स्वतःला उन्नत करणे क्रियायोग हा योग करण्याचा असा प्रकार आहे ज्यामध्ये ऊर्जेच्या माध्यमातून अध्यात्मिक विकास आणि ध्यानधारणा करता येते प्राणायामाचे प्रकार सूर्यवेधन, उज्जाई शितकारी, शीतली, भस्रिका, भ्रामरी , मुर्च्छा आणि प्लाविनी सूर्यनमस्कार हे योग प्रकारातील एक महत्त्वाचा व्यायाम आहे त्यामध्ये आपल्या हातून बारा असं होतात प्रणाम आसन हस्तउत्तानासन हस्त पादासन अश्व संचालनासन अधोमुखश्वानासन पर्वतासन अष्टांग नमस्कार भुजंगासन पर्वतासन ताडासन हस्त पादासन ही आसने आपोआप होतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2015 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली आणि संपूर्ण जग तो दिवस साजरा करते. भारतासारख्या गरीब देशाला किंवा आता भारताला जरी आपण गरीब म्हटलो नाही तरी येथील वैद्यकीय अवस्था अद्यापि बिकटच आहे आणि खाजगी मध्ये न परवडणारा खर्च लोकांना येतो अशावेळी जर आधीपासूनच योगासन केले ध्यानधारणा प्राणायाम इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर, अनेक आजारापासून विना खर्चाची मुक्ती मिळते. प्रत्येक खाजगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये किमान एक एक तासाची योग साधना सर्वांकडून करून घेतली पाहिजे. त्यासाठी वेळही दिला पाहिजे. अनेक मध्यमवर्गीय किंवा सर्वच लोक आयुष्यभर आणि तारुण्याच्या काळात पैशाच्या मागे धावतात, आणि नंतर तो आलेला पैसा आजारपणावरती खर्च करतात, त्यापेक्षा वेळेत सावध होऊन योग आपलासा केला पाहिजे. योग साधनेने होईल तुमचा योगक्षेम वाहम्यम् ❤️
