प्रवास स्वप्नांचा
प्रवास स्वप्नांचा
आज नेहाचं एमबीबीएससाठी अॅडमिशन झालं, खेड्यातील नेहा आता शहरात जाणार होती शिक्षणासाठी. अॅडमिशन घेण्यासाठी ती व तिचे बाबा जे की शेतकरी होते दोघेही ट्रेनमधून कॉलेजला गेले. नेहाला तिच्या मेरिटवरती अॅडमिशन मिळालं होतं. कोणतीही अतिरिक्त फी न आकारता.
घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने कोणताच क्लास लावला नव्हता. स्वतःच्या कष्टावर तिने इथवरचा प्रवास केला होता. तिच्या गावामधल्या शाळेत तिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळेस ती एकच म्हणाली, माझ्या स्वप्नांना गरीबी माहितच नव्हती म्हणून मी इथवर येऊ शकले...