Bipin More

Abstract Tragedy Inspirational

3.6  

Bipin More

Abstract Tragedy Inspirational

शेतकरी

शेतकरी

1 min
606


आज स्वप्नात शेतावर गेलो होतो तिथं एक शेतकरी बांधावर बसला होता. त्यांचे डोळे आभाळाकडं लागले होते.


शेतात अजून पाणी सुकल नव्हतं. गव्हाचं लोबं अजून वाळलं नव्हतं.त्या शेतकऱ्याने आपल्या हातानं मुठं मुठं पिक हाताने काढून शेताबाहेर फेकून दिल.


अर्ध अधिक शेत मोकळं केलं आणि पुन्हा नांगराला बैल जोडले.शेत नांगरायला घेतलं, माती मोकळी करायला घेतली.

मी एक क्षण जवळ जाऊन विचारलं," दादा हे सगळं कायं झालं?"


त्यानं कोरड्या डोळ्यांनी पाहत दीर्घ निःश्वास टाकला.

मला म्हणाला," तो अजून थकला नाही आणि मी अजून संपलो नाही."


सकाळ झाली आणि दिवस पुन्हा सुरू झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract