STORYMIRROR

Bipin More

Drama Classics Inspirational

3  

Bipin More

Drama Classics Inspirational

चित्र

चित्र

1 min
203

चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं.त्यात बरीच वेगळी वेगळी चित्र होती.एक चिमणीच चित्र होतं. छोटं घरटं आत दोन पिल्लं आणि आई. चिमणी आपल्या चोचीत काही आणून पिल्लांना भरवत होती. सुंदर रंग,सुरेख कलाकृती. एक खूप वयस्कर आजी आपल्या नातीला हाताशी धरून ते चित्र पाहात उभ्या होत्या.


अचानक आजी रडू लागल्या , कुणाला काहीचं कळेना की आजी एकदम का रडायला लागल्या.आजूबाजूला उभ्या लोकांनी त्यांची विचारपूस केली त्यांना बसायला व्यवस्था केली,पाणी दिलं, नातीला विचारलं,

"आजी का रडत आहेत? " 


नातीने आजीचा हात हातात घेतला आणि दुसऱ्या क्षणी आजीला आपल्या पोटाजवळं घेऊन घट्ट मिठी मारली. डोक्यावरून हात फिरवला.


आजी बराच वेळ रडली मग शांत झाली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama