Pournima Hatekar

Inspirational Drama

2.8  

Pournima Hatekar

Inspirational Drama

नव्याने उमगलेलं जुनं नातं

नव्याने उमगलेलं जुनं नातं

10 mins
16.9K


त्या तुफान पावसात ती सापडली होती. एक लांबच लांब रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजुनी असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ, अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करीत होती. पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या टिणावर कर्कश्य आवाज़ करत होते, रस्त्यावर कुणीच नव्हतं, होता तो फक्त गोलमोहराच्या फुलांचा पडलेला केशरी सडा. सैरावैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता, अचानक आलेल्या पावसा पासुन बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला, त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिल कॅब पण बुक करता येईना, आणि दुपारच्या वेळी सगळी दुकान बंद! तिला आता काळजी वाटू लागली, " मी घरी परत कशी जाणार? पाऊस कधी थांबेल, त्यात हा फोन.. ! आताच बंद पडायचं होतं ह्याला, मी आता काय करू? कुणाला मदत मागू?" 

एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली, त्या रस्त्यावर तासाभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन, तिने हात दखावला नाही कारण अनोळखी रस्ता, त्यात अनोळखी व्यक्ती... तिला अजून संकट नको होते, पण थोडच पुढे जाऊन ती कार हळूवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं, ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा! तिला एका क्षणी खुप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी खुप भीती वाटली. ड्राइवर सीटच्या बाजूची पावसामुळे अंधुक झालेली काच जशी हळूहळू खाली येत होती, हिच्या हॄदयाचे ठोके तसेच वाढत होते. 

स्टेयरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हात, हातात नाजुक घड्याळ, लगेच तिने वर पहिले आणि तिच्या मनातील भीती ची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला. ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे ह्याचा तिला आनंदच झाला होता... 

"मी तुम्हाला काही मदत करू शकते का?" हा प्रश्न येताच, ही लगेच म्हणाली, "होय, मी, माझ नाव प्रिती, मी इथे एका कामाकरता आले होते, पण काम संपवून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला, माझ्या फोन ची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कुणाला कॉन्टॅक्ट पण नाही करु शकत, तुमच्या फोन वरुन एक कॉल करू का?" , "ओह, सो सॉरी मी माझा फोन घरीच विसरलीये " दोघींना एकदम हताश वाटल, त्या कार मधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पाऊसात भिजत असलेल्या प्रिती कडे पाहिलं. पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजुक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होत, कोसळणाऱ्या पावसामुळे प्रितीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती, आणि एकंदरीत ती चांगल्या घराण्यातली वाटत होती. ती लगेच म्हणाली, " माझं नाव सुधा, मी इथे समोरच राहते, if you don't mind, तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा, इथे किती वेळ थांबाल?" प्रितीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्या कडे दुसरा पर्याय नव्हताच! 

समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमधे सुधा राहत होती, तीची स्वतःची एक फर्म होती, त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले असे ती प्रितीला सांगत होती. पावसाने सगळाच गोंधळ केला! प्रितीने पण सांगिलते की ती एका ऑर्डरच्या डिलीवरी करता आली होती, प्रिती एक प्रोफेशनल फोटग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा delivery boy सुट्टी वर असल्याने एक अर्जंट डिलीवरी द्यायला ती आलेली होती. सुधाची एक Event Management फर्म होती आणि सुधाच्या फोटोग्राफर ची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्याच शोधत बाहेर गेली होती पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला प्रितीच्या रूपात एक तारणहारच जणू भेटली होती. त्या दोघींना एकमेकीं मधे एक वेगळाच आपलेपणा जाणवू लागला होता. 

गप्पा सुरु असतानाच त्या सुधा च्या फ्लॅट समोर पोहोचल्या, सुधाने बेल वजवताच दार उघडल, दार उघड़ल ते एका छोट्याश्या मुलीने, आणि ती लगेच गाऱ्हाणे करू लागली, "आई कुठे गेली होतीस, आम्ही कधीची वाट पहतोय..!", सुधा ने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला. ती लगेच म्हणाली, "चिऊ बघ कोण आलय माझ्या सोबत, ही प्रिती मावशी आहे तिला hi कर.."

चिऊ ने लगेच "Hi" म्हणटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली. सुधाने प्रीतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली. सुधा चे घर प्रसन्न होते, मोठा हॉल त्याला लागून एक टेरेस, टेरेस वर खुप सुंदर सजवलेली फुल झाडं, नीलम रंगाचा सोफा सेट, डायनींग आणि लिवींग स्पेस ला विभागणारं ते जाळीच लाकडी पार्टीशन... 

ते घर प्रसन्न असल तरी प्रिती ला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बेचैनी तिला स्वस्थ बसू देत नव्हती, जमिनीवर टाकलेल्या मऊ गलिच्यावर ती पायाच्या अंगठ्याने रेघा काढत त्या रेघा बघत होती, एकाहाताची मुठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती, तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टीशन च्या मागून एक व्यक्ति हळू हळू त्या पार्टीशन ला मगे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती सुधा नव्हती, प्रितीच्या अंदाजाने तो सुधाचा नवरा असावा. 

तिचा मोबाइल खाली पडला तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच समोर कुणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवल, आणि लगेच आवाज़ आला, "Hi", तो आवाज़ ऐकून तिच्या हॄदयाचा एक ठोका चुकला, तिने आश्चर्याने वर पाहिले आणि... कॉलज मधले ते अविस्मरणीय दिवस तिच्या समोर नाचू लागले, एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्या समोर झरा झरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवळच आली आणि ती त्याच्याकड़े आणि तो तिच्याकड़े स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले. तिचे डोळे अश्रूंनी डच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच सुधा बाहेर आली. इकडे प्रिती ची ही अवस्था होती पण सुयश आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो रुक्ष आणि अजाण दिसत होता. जणू त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही, तो तिला ओळखतच नाही. प्रिती ने कसेबसे ते अश्रू आवरले, एक मोठा आवंढळा गिळला. 

तितक्यात सुधाने ओळख करून दिली, " हा सुयश, माझा नवरा...! आणि सुयश, ही माझी तासाभरा आधी झालेली मैत्रीण प्रिती!, अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली, तुला माहिती आहे प्रिती माझ्या इवेंट करता माझी मदत करायल तयार पण झाली, I'm feeling blessed today...!" एकीकडे सुधा आनंदाने उत्साहने घड़लेल सगळ सविस्तर सांगत होती आणि एकीकडे प्रिती ला बाहेर पडणाऱ्या पाऊसच्या आणि ढगांच्या कडकडाटा ऐवजी कही काहीच ऐकू येत नव्हते. त्या थोड्या वेळा आधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या... सुयश सुद्धा तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता, प्रिती ने लगेच सुधाला वॉशरूम कुठय विचारले आणि तिथून थोडावेळ का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला. ती तिथून जाताच सुयश पण थोड़ा स्थिरावला. 

प्रिती आत जाऊन ढसा ढसा रडली, तिला आता परत त्यादोघां समोर जायची हिम्मतच राहिली नव्हती, सुयश आणि प्रितीच एकमेकांवर जीवपाड प्रेम होत, त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पहिले होते, खूप खूप रंगीत चित्र रंगवले होते, पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते. 

तिला सुयश च वाक्य अठवलं, "या पुढे कधीच माझ्या समोर येऊ नकोस, आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नही...!" आणि तिने पण त्याला वचन दिल होत की त्याला कधीच तिचा चेहरा दखावणार नाही, पण आज नियती ने त्यांना एकमेकां समोर आणून उभ केल होत आणि आता ह्यातून कसं बाहेर पडायच हा विचार दोघेही करत होते...! 

प्रिती बाहेर आली तेव्हा फक्त सुधा तिथे बसली होती आणि चिऊ खेळत होती, प्रिती ला सुयश च तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होत, तिने लगेच सुधाला फोन मागितला, सुधा ने आत जाऊन फोन आणला, "हे काय? माझा फोन पण ड्रेन झालाय, चिऊ खेळत बसली असेल, थांब मी आलेच", सुधा ने तिला सुयश चा फोन आणून दिला, तिने लगेच तिच्या नवऱ्या ला, प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलावले पण पावसा मुळे त्याला यायला उशीर होणार होता, प्रीती ने लगेच cab बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघुन आली... ती रात्र तिच्या करता न संपणाऱ्या काळोखा सारखी होती... 

अचानक तिला आठवले, तिने प्रतीकचा फोन घेतला त्यातून रिसिव्हड कॉल्स मधून सुयश चा नंबर स्टोर करून घेतला.

दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं पण आता ते शक्य नव्हतं. तिने सुयश ला मेसेज पाठवाला, "Hi...", पण एक तास झाला तिला काहीच reply आला नही आणि तिने तिच्या कृती करता स्वतःला खूप कोसले... तब्बल तीन तासांनी सुयश चा reply आला... "Hi..."

प्रिती एका वेगळ्याच परिस्थितीत होती, ती हसत होती पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळत होते, मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती... 

तिने थरथरत्या हातांनी त्याला लिहलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला तो असा...

प्रिती- "मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी जे काही झालं, तो फक्त एक योगायोग होता, मी तुला वचन दिल होत कि तुझ्या समोर कधीच येणार नही पण... शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला... मला, तुझ्याशी खुप बोलयचे आहे रे, तुला खुप सांगायचे आहे तुझी माफी मगायची आहे, मी तुला दुखावलं त्या करता मी तुझी माफी मागते, माझा हेतू तुला दुखावण्याचा मुळीच नव्हता, तुझ्या पासून दूर जायचे मला ही तेवढेच दुःख आहे... 

मला माफ करशील...? 

सुयश- मी तुला माफ करणारा कोण? जे झालं ते होऊन गेलं, जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे...

प्रिती- Please, मला एकदा माफ कर

सुयश- Ok, if You say so...

प्रिती- Thank You... Thanks a lot... !

आणि प्रिती च्या मनावरचे खूप खूप मोठे ओझे उतरले. त्यानंतर एक दिवस प्रिती ने सुयश ला फोन केला, सुयश तसा तिच्यावर नाराज होताच कारण ती त्याला मधेच सोडून गेली होती. पण तो सुयश होता, झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला, त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार, रुक्ष पणा, एक अनोळखी पणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खुपत होता... प्रिती ने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगीतल्या, ती म्हणाली, "सुयश, मी तुला गमावलं ह्याचं मला दुःख आहे, पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं ते ह्याचं की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावलं, तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही, तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात, खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं, तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस, सुधा खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात ह्यात दुमत नाही. मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत, आनंदात राहा...

पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही ह्याचं दुःख वाटतं"

सुयश हे एक प्रगल्भ व्यक्तीमत्व होत, आणि त्याला प्रिती च्या भावानांची पूर्ण जाणीव होती, मनाने हळवी, साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती... तिच्या फोन नंतर त्याला त्या दिवसांची आठवण झाली. तीचा तो सोज्वळ चेहरा, ते गोड हास्य, तिची काळजी, तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला रुक्ष पणा. सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात, मनात भरून आल्या होत्या. त्याला खूप रागही येत होता आणि त्याच क्षणी तिच्याशी खूप खूप बोलावसं ही वाटत होतं पण त्याने स्वतःला आवरलं.०

त्या दिवशी प्रिती चा वाढदिवस होता... आता सुधा आणि प्रीती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या खूप प्रोजेक्ट्स त्यांनी मिळून केले होते, आणि त्या दिवशी सुधा ने प्रितीला surprise द्यायचा प्लॅन केला, सुयशला त्याच्या बायकोच म्हणणं टाळता नाही आल, ते तिघं केक, फुलं आणि गिफ्ट घेऊन प्रिती च्या घरी जायला निघालेत... सुयश, वेगळ्याच मनस्थितीत होता. त्या दिवशी नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्षाने टाळले होते, परीक्षेला जातांना जी अस्वस्थता जाणवते तिच त्याला जाणवत होती. मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद तर दुसऱ्या बाजूला तिच्या बद्धल असणारा राग ह्या संमिश्र भावनांनी त्याच मन दाटून गेलं होतं.

लिफ्ट च दार उघडलं आणि समोरच एक फ्लॅट होता, दारावर पाटी होती मिस्टर ऍण्ड मिसेस कारखानीस, सुयश ला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रिती त्याच्या सोबत शेवट चं बोलली होती आणि तीला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानीस!

सुधा ने बेल वाजवली, प्रितीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, सुधा, चिऊ आणि त्यांच्या मागे उभा सुयश... त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले, प्रिती चे डोळे तराळले, तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. सुधा ने प्रिती ला मीठी मारली आणि फुलं दिली, मागून प्रतीक आला त्याने त्या तिघांना वेलकम केलं, प्रिती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना सावरत बाहेर आली. सुयश आधी कोड्यात पडल्यागत सुन्न होऊन बसला होता जे होत आहे ते सत्य आहे ह्याचे त्याला भानच नव्हते. समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंवर सुयश च लक्ष गेलं, ती आणि प्रतीक एकमेकां सोबत खुश होते हे पाहून त्याला कुठे तरी स्थिर वाटलं. प्रिती ने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होता. तसेच फिकट रंगाचे पडदे, त्याच सगळ्या फुलांची झाडं, सगळं तसंच. प्रतीकनेच मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग सुयश आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेलेत. प्रिती चे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षयांनी ऐकलं होतं, पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसवत रहाणारी प्रिती आता हरवली होती. त्याला कुठे तरी ते जाणवलं आणि तीची ही अवस्था आपल्या न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली... त्या दिवशी प्रिती सोबत घालवलेले ते काही तास सुयश ला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते. त्याला जुनी प्रिती आठवली, ती प्रिती जी त्याची जिवाभावाची मैत्रीण होती, ती प्रिती जी निरागस आणि मनानी अगदी लहान मुलीसारखी होती, ती प्रिती जिला सुयश त्याच्या मनातलं सगळं सगळं सांगायचं, आणि काही गोष्टी न सांगता सुध्दा तिला समजायच्या, ती प्रिती जी क्षणा क्षणा ला जोक्स सांगून हसवायची हसायची, दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम्स सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत! कुठे तरी सुयश पण प्रिती च्या पवित्र मैत्रिला मिस करत होता... खूप गप्पा आणि डिनर आटोपून सुयश, सुधा आणि चिऊ घरी परतले. 

रात्री चे पावणे बारा वाजले होते, प्रिती चा मोबाईल बीप झाला, तीने थकलेल्या हातांनी तो हातात घेतला, स्क्रीन वरच नोटिफीकेशन पाहून तीच्या आनंदाला पारावार राहीला नाही... तो मेसेज सुयश चा होता...

"Happy Birthday... I'm, Delighted to have a friend like you, now and forever...!"

- Suyash

त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होत, मैत्रीच्या नात्याला... 

माणूस कधीच वाईट नसतो परिस्थीती वाईट असते हे त्या दोघांना ही कळून चुकले होते... मैत्री चं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोकं भाग्यवान असतात ह्यात दुमत नाही!

अशीच उमगतात नव्याने जुनी झालेली नाती...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational