The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Pournima Hatekar

Inspirational Tragedy

2.7  

Pournima Hatekar

Inspirational Tragedy

जीवन दान..

जीवन दान..

9 mins
9.0K


मेघनाच्याडोक्यात विचारांची ये जा सुरु होती. पहाटेच्या नीरव शांततेत अकस्मात होणाऱ्या गजराने ती अचानक भानावर आली, 5.30 अरे बापरे! अचानक तिला जाणीव झाली की आजचा दिवस रोजच्या दिवसां पेक्षा वेगळा होता. घाई घाईने उठून ती खोलीच्या बाहेर आली. अमृतच्या खोलीत तिने डोकावून पाहिलं, तो साखर झोपते होता. अमृत, अजय आणि मेघनाचा एकुलता एक मुलगा! त्याच्याकडे ती कौतुकाने बघत होती. तिच्या लगेच लक्ष्यात आल की अमृत बहुदा उशीरा झोपला असावा. त्याला न उठवता ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि चहा मांडला. बाहेर गुलाबी सूर्य किरण पसरले होते. स्वयंपाक घरतल्या खिड़की बहेरच्या अंब्याच्या झाडावर कोकिळा गात होती. हे सगळं आधी मेघनाला स्फूर्ती देत असे पण आजकाल तिला ह्या गोष्टी निरस वाटत होत्या. तिच्या मगोमाग अजय पण उठला बाहेर येता येता त्याने पण अमृत कड़े डोकवले. तो स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन मेघनाला म्हणाला, "काय आज चिरंजीव उठले नाहीत अजून", "नाही रे तो इतका गाढ झोपलाय, झोपू देत, रात्री उशीरा झोपला असावा कदाचित. मुद्दामच उठवलं नाही त्याला, शांत झोप लागली आहे बरेच दिवसांनी, माला तर झोपच नाही लागली..." मेघना म्हणाली. अजय हसत तिची खोड़ काढत तिला म्हणाला, "अग बराव्वीचा निकाल अमृतचा आहे तुझा नाही!. सगळ छान होईल बघ, मस्त टक्क्यान्नी उत्तीर्ण होतील आपले चिरंजीव काळजी नसावी!".

आज अमृतचा बरावीचा निकाल होता, त्याला साइंटिस्ट व्हायचे होते, आणि त्यानी त्या करता मेहनतही तशीच केली होती. मेघना अजयला उत्तर देत म्हणाली, "हो रे अमृतने तर मेहनत केलीच आहे, ,पण मला सारख नूर बद्दल वाइट वाटतं इतकी हुशार मुलगी अस का म्हणून व्हाव तिच्या सोबत तिला खूप शिकायचे आहे रे..."

नूर म्हणजे मेघनाच्या घरी काम करणाऱ्या तबस्सुनची मुलगी. ती आणि अमृत दोघे सोबत अभ्यास करायचे आणि मेघना दोघांचा अभ्यास घ्यायची अगदी लहानपणा पासून. नूर पण हुशार मुलगी होती. मेघना आणि अजय ह्यांनी नूरला अगदी मुली सारख वगवलं होतं. पण मागच्या काही महिन्यां पासून नूर सारखी आजारी रहायची. एक दिवस मेघना स्वताः तिला डॉक्टर कडे घेऊन गेली सगळ्या टेस्ट झाल्यावर त्यांच्या लक्ष्यात आले की नूरच हॄदय खूप नाजूक आहे आणि अश्या परिस्थितीत फक्त एकच उपाय होता तो म्हणजे "हार्ट ट्रांसप्लांट!"

नूरचं स्वप्न होतं, तिला खूप शिकायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं. तिचं ते स्वप्न आता तिला अशक्य वाटत होत. तबस्सुनची परिस्थिती हलाखीची होती. नूर तीचा खुप मोठा आधार होती आणि तिची ही अवस्था ऐकुन तबस्सूनच्या पायखलची जमीनच निसटली होती. ती घरकामं करून कसंबसं तीचे घर चालवत होती त्यात आधीच चार पोरं आणि नवऱ्याच्या आजारपणात तिचा खूप पैसा खर्च झाला होता. नूरच्या शिक्षणाचा खर्च मेघना आणि अजय करत होते. पण आता तिच्या ह्या आजारपणा करता येणारा खर्च तबस्सूनला न परवडणारा होता. ती एका समाज सेवीकेच्या घरी काम करायची आणि तिला नूरची माहिती देताच तिने तिच्याकडून सगळे प्रयत्न सुरु केले होते.

तबस्सून दुधाचे पाकीट घेत आत आली तेव्हा सात वाजले होते आज तिला कामं लवकर आटोपून नूर सोबत कॉलेजला जायचे होते. अमृत उठला आणि बाहेर आला, अजय पेपर वाचत सोफ्यावर बसला होता आणि मेघना स्वयंपाक घरात तिची कामं उरकत होती. तबस्सून मेघनाला त्या समाज सेविकेबद्यल माहिती देत होती,"दिदी, वो भार्गवी दिदी हर तरफ से कोशीष कर रही है पर...", तेवढ्यात नूर आली आणि तबस्सून तिथेच बोलायचं थांबली. नूर आणि अमृत आज खुश पण होते आणि थोडी भीती पण होती त्यांच्या मनात. अजय नूरला चिडवत म्हणाला, "अरे नूर तू पेढे पण घेऊन आली, निकाल तर कळू देत, उगाच पेढे वाया नको जायला काय?", नूर रागावून मेघनाला म्हणाली, "देखीये चाचीजी, भाईजान को हमपे भरोसा नही", मेघना तिला हसत म्हणाली, "अगं तो तुझी खोड काढतोय, तू लक्ष नको देऊस".

अजय आणि अमृत त्याच्या कॉलेज मध्ये पोहोचले. ते थेट प्रिन्सिपॉलच्या केबिन मध्ये जाऊन उभे होते. एका प्युननी त्यांना तसा निरोप दिला होता. केबिन मध्ये जाताच प्रिन्सिपॉल सरांनी दोघांचे अभिनंदन केले आणि अमृत त्यांच्या कॉलेजमधून पहिला आलाय आणि नेहमी प्रमाणे नूर दुसरी आली आहे असे सांगत असतांनाच नूर आणि तबस्सून तिथे आलेत. दोघे खूप खुश होते सगळ्या मित्र मैत्रिणींशी आणि शिक्षक वर्गाशी ते दोघे उत्साहाने बोलत होते.

मेघनाला खुप उत्सुकता होती पण तीचा फोन, ना अजय उचलत होता ना अमृत. ती आता अस्वस्थ झाली होती, अंगणातून आत, आतून अंगणात फेऱ्या मारत होती." अजून कसे आले नाहीत हे लोक, फोन पण उचलत नाहीत काय झाल असेल?". आता उत्सुकतेची जागा काळजी ने घेतली होती. तिला गाडीचा आवाज आला तशीच ती बाहेर धावली. पहाते तर अजय आणि अमृत दोघे गाडीतून उतरून जड पावलांनी घराकडे येत होते आणि दोघांचेही चेहरे पडलेले होते. मेघनाच्या काळजाचा ठोका चुकला! तीने अमृत चे हात आपल्या हातात घेतलेआणि विचारले, "काय झालं अमृत, तुझा चेहरा असा का दिसतोय?" अजय अरे तू तरी सांग, मी कधीची फोन करतेय?" नूर कुठंय? त्या दोघी तुमच्या सोबत येतील असं वाटलं होतं मला...! अरे बोला काहीतरी...!, आता मेघना रडणार तेवढ्यात अजयला हसू फुटले आणि दोघे मिश्किल पणे हसू लागले. अमृतने आईला कडकडून मिठी मारली, "मी कॉलेज मधून पहिला आलोय आई आणि नूर दुसरी!" असे म्हणत मेघनाला तो आत घेऊन आला. मेघनाच्या डोळ्यातली काळजीची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली होती. ती त्याच्या डोळ्यातल्या आनंद आणि उत्साह न्याहाळत होती. तिचे आणि अजय चे डोळे पाणावले होते. ती पटकन आत गेली देवाजवळ दिवा लावला तिघांनी मग देवाला नमस्कार केला. अमृत ने पेढ्याचा नैवद्य दाखवला, आई वडिलांना नमस्कार केला, मेघना ने त्याला पेढा भरवला आणि तेवढ्या मेघनाचा फोन वाजला, " हॅलो आई, अगं अमृतला 97% पडलेत, हो... देते त्याला", "हॅलो आजी इथूनच नमस्कार तुला आणि आजोबांना पण सांग नक्की...! आईला देतो" म्हणत त्याला आलेला फोन त्याने घेतला. इकडे अजयचा फोन वाजला, "हॅलो बाबा हो, अमृत कॉलेज मधून पहिला आलाय, देतो थांबा. आजोबा, तुमचे आशीर्वाद होते ना सोबत, आजीला आणि तुम्हाला माझा नमस्कार!", परत तो त्याच्या फोन मध्ये गुंतला...

एकसारखे फोन वाजत होते आणि आई वडील पोराचं कौतुक दिमाखात सगळ्यांना सांगत होते. तेवढ्यात अमृत तयार होऊन बाहेर आला, "आई बघ तू घेतलेला tshirt घातलाय मस्त फिटिंग आहे बरं, माझ्या करता तूच बेस्ट शॉपिंग करते" म्हणत तो बुट घालूलागला, "अरे आता कुठे निघालास जेऊन जा!" नाही आई सगळे पार्टी मागताहेत, बाबा जरा पैसे देता का..?"

"अरे, त्यात काय आज तो हम बोहोत खुश है, ये लो और एन्जॉय करो...!" अजय ने त्याला पैसे दिलेत आणि अमृत निघाला जाता जाता "मी उशीरा येईल काळजी नसावी!" म्हणत गाडीला किक मारली आणि थेट गेट पार केले, मेघना त्याच्या कडे तो वाळे पर्यंत बघत राहिली.

अजय आणि मेघना खुश होते सारखे फोन सुरूच होते. त्या दोघांना अमृत शिवाय जेवण कसं जाणार? पण जेवले आणि अजय ने सुट्टी घेतली होती, मेघनाला रात्रभर झोप नव्हती. ते दोघे जरा आडवे झाले आणि कधी त्यांना झोप लागली ते कळलेच नाही.

संध्याकाळचे 4 वाजले होते, अजयच्या मोबाईलच्या रिंग ने दोघांची झोप उडाली. अजयने अर्धवट झोपेत डोळे चोळत फोन रिसिव्ह केला, तो नंबर unknown होता. "हॅलो, तुम्ही अजय जोशी का?, "हो बोलतोय, आपण कोण?." " मी इंस्पेक्टर खांझोड़े, साहेब तुमच्या मुलाचा अपघात झालाय, तबड़तोब "नव जीवन", होस्पिटलला या."अजय दोन मिनीटं स्तब्ध झाला, नाको ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले, मेघना अजय ला बघून घबरली, " काय झाल अजय? कुणाचा फ़ोन होता? अरे, बोल ना काय झालय?", अजय ने मेघनाला सांगताच ती तशीच उठली तीने पर्स घेतली सगळे कार्ड्स पैसे सोबत घेतलेत आणि घाई घाईत दोघे बाहेर पडत होते तेवढ्यात, मेघनाच लक्ष अमृतच्या हेलमेट कड़े गेलं, न विसरता हेलमेट घलणारा मुलगा आज कसा विसरला? तिच्या डोक्यात नको ते विचार आलेत आणि तिच्या डोळ्या समोर अंधार पसरला पण तिनी स्वतःला सांभाळून घेतलं आणि दोघं हॉस्पिटलला पोहोचले. तिथे खूप गर्दी पाहून दोघे घाबरले, इन्स्पेक्टर समोरच उभे होते अजयने विचारले काय झालं साहेब?, मी अजय, अजय जोशी, अमृतचा बाबा मी! इंस्पेक्टरांनी अजयची आणि डॉक्टरची भेट घालून दिली, "डॉक्टर, अमृत कसाय? कुठे लागल त्याला? फ्रैक्चर आहे का? ऑपरेट नही ना कराव लागणार? प्लीज डॉक्टर कही बोला प्लीज!" डॉक्टर ने अजयला केबिन मधे नेलं बसायला सांगितल. अजय आता थार्थरत्या हतांनी खुर्ची ओढ़त बसला, "डॉक्टर..." म्हणत अजय चे डोळे पाणावले होते, त्याला पुढे बोलता येईना, डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव, त्या केबिन मधला तणाव, शांतता त्याला आता सहन होत नव्हती. शेवटी डॉक्टर म्हणले, "हे बघा मिस्टर जोशी, मी तुमच्या भावना समजू शकतो, आम्ही सगळ्या बाजूंनी प्रयत्न केला, व्ही आर सॉरी टू से,अमृत इज नो मोर विथ अस... ब्रेन डेड! तो वेंटिलेटर वर आहे पण, परत कधीच डोळे उघडू शकणार नाही!"

अमृतssssssss! नाही! हे , हे खोटं आहे, डॉक्टर प्लीज त्याला वाचवा मेघना दारात उभ्या उभ्या कोसळली...! आता अजयचा श्वास थांबला होता, त्याच्या डोळ्या पुढे अंधारी अली होती तो शून्यात बघत होता, " डॉक्टर अमृतचा आज निकाल होता तो कॉलेज मधून पहिला आलाय आणि त्याला सायंटिस्ट व्हायचंय असा कसा तो हार मानेल? नाही मी त्याला हारु देणार नाही!

तेवढ्यात अजय चे मित्र तिथे आलेत मेघनाला आणि अजयला आवरणं अशक्य होतं त्यांचा आक्रोश असहाय्य होता. डॉक्टरने अजयला आत बोलावले, " मिस्टर जोशी, मला माहितीय की ही वेळ हे बोलण्याची नाही पण मी एक डॉक्टर आहे त्या नात्याने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या कडे वेळ कमी आहे आणि तुमचा निर्णय लवकरात लवकर मिळावा अशी आशा आहे. अमृतला जीवंत ठेवण्याचा एक उपाय आहे...! अजयने डॉक्टरचे पाय धरलेत, "डॉक्टर तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे...", "अजय उठ... आमच्या कडे खूप कमी पेशंट्स येतात जे ब्रेन डेड असतात... आणि फक्त अश्याच लोकांचे अवयव आम्ही गरजू लोकांना ट्रान्सप्लांट करू शकतो, एखाद्या गरजू व्यक्तीला अवयव दान करून त्याचा जीव वाचवू शकतो पण ह्याला तुमची सहमती लागेल..."इन्स्पेक्टरचे NoC लागेल आणि हे सगळं कायद्याने होईल by "THE TRANSPLANTATION OF HUMAN ORGANS AND TISSUES ACT 1994" अजयला काहीच कळत नाही डॉक्टर असं का म्हणताहेत "काय सुरू आहे हे....?!" , इथे मी तुमच्या पाया पडतोय की माझ्या मुलाला वाचवा आणि तुम्ही....!?

हे सगळं मेघना ऐकत होती, तेवढ्यात तिच्या खांद्यावर तिला एक स्पर्श जाणवतो, ती मागे वळून पाहते, "मी डॉक्टर भार्गवी, मी समाज सेविका आहे... मेघनाला ते नाव ओळखीचं वाटतं. मी तुमच्या भावना समजू शकते पण थोडा विचार करा आज तुमच्या मुला मुळे किती लोकांचे जीव वाचतील... किती लोकांना " जीवन दान" मिळेल...", मेघनाला तिच्या भावाची आठवण येते, त्याला किडनी न मिल्यामुळे त्याचा झालेला मृत्यू... मेघना आणि अजय स्थिरावतात दोघं एकमेकांचा हात हातात घेतात आणि खुप वेळ तसेच बसले असतात...! शेवटी मेघना उठते स्वतःला सावरत डॉक्टर कडे जाते आणि अवयव दानाचा फॉर्म मागते...

अजय आणि मेघना तो फॉर्म भारतात...

"अमृतचे सगळे अवयव दानकरण्यात आमची हरकत नाही....!"

आणि दोघांच्या सह्या.....

मेघना ICU मध्ये जाते, अमृरच्या हृदयाचे ठोके ती पूर्ण जीव कानात ओतून ऐकते... त्याच्या डोक्यावरून शेवटचा हात फिरवते, तिच्या समोर अमृतच्या लहानपणा पासूनच्या सगळ्या आठवणी जीवंत होतात आणि ती अश्रूंना वाटा देते... तेवढ्यात तिची बाहेर नजर जाते, तिथे नूर उभी असते... भार्गवी... समाज सेविका.... नूर... हार्ट ट्रान्सप्लांट....! मेघना धावत बाहेर येते आणि नूरला घट्ट मिठी मारते...!

नूर आणि ताबस्सून मान खाली करून हात जोडून उभ्या असतात. त्या दोघींच्या डोळ्यात अजय आणि मेघनाला दुःख, कृतज्ञता आणि प्रेम ओसंडून वाहतांना दिसतं. नूर ऑपरेशन टेबलवर तिच्या स्वप्नांना पूर्ण होतांना बघत असते. तीने भाईजान गमावला असतो, पण जाता जाता त्याने तिची रक्षा करण्याचे वचन चोख बजावलेले असते. नूर शुद्धी वर येते आणि नवीन हृदया सोबत नवीन जीवन जगण्यास तयार असते. मेघना नूरच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिच्या हृदयाचे ठोके ऐकण्याकर्ता अलगद मान खाली नेते, तीला हृदयाचे ठोके ऐकू येताच आनंदाने ती अजयला जवळ बोलावते... "ऐक अजय अमृत जीवंत आहे...!" अजयचे डोळे पाणावतात, तो पण प्रेमाने नूरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो "जिती रहो बेटी...!"

मेघना आणि अजयला त्यांच्या दुःखाच्या गावातून बाहेर आणण्यात नूरचा खूप मोठा वाटा आहे...

अमृतचं "हृदय"आता नूरच्या शरीरात जगतय... नूरला MBBS ला ऍडमिशन मिळाली आहे. तिचा सगळा खर्च अजूनही अजय आणि मेघना करताहेत...

अमृर तर गेला पण जतानाहीं खूप लोकांना "जीवन दान" देऊन गेला....

"ही कथा आणि कथेतील पात्र काल्पनिक आहे आणि त्याच वास्तवतेशी संबंध नाही. कुठेही समानता आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा."


Rate this content
Log in

More marathi story from Pournima Hatekar

Similar marathi story from Inspirational