Gaurangi Gujar- Mehta

Abstract

4.8  

Gaurangi Gujar- Mehta

Abstract

रोज़ डे

रोज़ डे

1 min
528


आज तिला झोप लागत नव्हाती. उद्या रोज़ डे म्हणून ती आज भलतीच उत्सहात होती. दुसर्या दिवशी ती भल्या पहाटेच उठली. अगदी खुशीत गाणं गुणगुणत भराभर आवारलं, आईनी बनवलेला ब्लैक टी प्यायला आणि २ पिशव्या आणि साठवलेले सगळे पैसे घेऊन ती लगबगीने घरबाहेर पडली. तीला लवकर पोहचायचं होतं. तरच सगळ्यात चांगला माल तिला मिळाला असता. ती मार्केट उघडायच्या आधीच जाऊन पोहचली.


दुकान उघडल्या उघडल्या ती आत शिरली आणि पटपट तिला अवडतील त्या वस्तू उचलल्या. पैसे देऊन सामान पिशवीत भरून ती घरी आली. तीचे भाऊ वाटच बघत होते. ती आल्या आल्या दोघा भवांनी पिशव्या उघडून आतलं सामान छान पॅक करून आपसात वाटुन घेतलं. मोठा वाटा तिने स्वतःला घेतला आणि परत बहर पडली. तीच्या रोजच्या स्पॉटला जाऊन थांबली.


आज रोज़ डे होता, सिग्नलला दिवसभर तिने आणि तिच्या भावांनी सगळे गुलाब विकले. आज बऱ्याच दिवसांनी तिच्या परिवारला पोट भरून जेवता येणार होतं. बरोबर १२ दिवसांनी! २६ जानेवारीला याच सिग्नलला झेंडे विकले तेव्हा ते शेवटचं पोट भरून जेवले होते! ती आज खुश होती. आज रोज़ डे होता!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract