Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

4.7  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

विषय:-अंतर्मुख

विषय:-अंतर्मुख

1 min
620


    आज महिला दिन तरी पतीनं किमान एक गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा द्याव्या हि तिची अपेक्षा.विसरभोळे महाशय मात्र विसरून गेले.संतापाने तिचा पारा चढला व ती बाहेर पडली.तोच चौकात तीन महिन्यांपूर्वी कर्जाला कंटाळून एकाच परिवारातील पिता पुत्रांनी गळफास लावून घेतलेल्या दोघांच्याही विधवा स्रिया तिला फळांच्या गाडीवर दिसल्या.वयस्कर सासू व तान्हुल्या मुलीसवे तरुण सून जिने मुलीच्या जन्मदिवशीच पती गमावला होता.ते ह‌दयद्रावक दृश्य पाहून ती विमनस्क अवस्थेत अंतर्मुख होऊन घराकडे परतली.


एवढ्या तेवढ्या शुल्लक कारणावरून पतीवर नाराज झालेल्या स्रीच्या डोळ्यांत समाजातलं मन विदीर्ण करणा-या जळजळीत वास्तवानं अंतर्मुख केलं हेच या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract